महाराष्ट्राची निर्मिती
1. मुंबई इलाखा (Bombay Presidency)- 1668 ते 1937 यामध्ये मुंबई, अहमदाबाद, सिंध, बेळगाव हे चार विभाग होते.
2. मुंबई प्रांत (Bombay Province)- 1937 ते 1947 1935 च्या भारत सरकार कायद्यानुसार 1937 मध्ये मुंबई प्रांत निर्माण झाला, मुंबई प्रांतात मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेळगाव हे विभाग होते.
3. मुंबई राज्य (Bombay State)- 1947 ते 1956 मुंबई प्रांतातील प्रदेशांपैकी सौराष्ट्र, कच्छ हा गुजराथी भाग वगळून मुंबई राज्य निर्माण केले गेले.
4. द्विभाषिक मुंबई राज्य (Bilingual Mumbai State)- 1956 ते 1950: तत्पूर्वी विदर्भ भाग (अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर हे जिल्हे) 1956 पर्यंत मध्यप्रदेश राज्यात समाविष्ट होते. नागपूर हे मध्यप्रदेश राज्याचे राजधानीचे ठिकाण होते. नागपूर ही मध्यप्रदेश राज्याची 1956 पर्यंत राजधानी होती.
हैद्राबाद संस्थानात औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड व उस्मानाबाद हे मराठी भाषिक जिल्हे बिदर, गुलबर्गा व रायचुर हे कन्नड भाषिक जिल्हे आणि अदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वरंगल, महेबुबनगर, अंतराफ ई खल्दा, नलगोंडा व हैद्राबाद हे तेलगू भाषिक जिल्हे होते. मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 ला निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. नागपूर करार 1953 ला झाला.
मराठवाडा व विदर्भ नागपूर करारानुसार मुंबई विभागात सामील झाले. 1953 ला भाषावार प्रांतरचना समिती स्थापन झाली. अध्यक्ष डॉ. फाजल अली होते व सदस्य के. एन. पीकर व हृदयनाथ कुंझरा होते. देशातील काही प्रमुख नेत्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला विरोध होता. जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हा केंद्रशासीत प्रदेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
नेहरूच्या या निर्णयाला राज्यातील जनतेने विरोध केला. 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना समितीच्या शिफारशीनुसार द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले
5. महाराष्ट्र राज्य (Maharashtra State) – मे 1960 पासून मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला यासाठी संयुक्त महाराष्ट्र आधिपासूनच सुरु होती. द्विभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीनंतर या चळवळीला वेग आला. महाराष्ट्रात 1960 ला एकूण 26 जिल्हे होते तर सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत.
महाराष्ट्रात आचार्य अत्रे. श्री. एस. एम. जोशी, रामराव देशमुख, श्री ना. ग. गोरे, श्रीपाद डांगे यांनी आंदोलन केले. महाराष्ट्र आंदोलनात 107 जणांना हौतात्म्य प्राप्त झाले. 4 डिसेंबर 1959 रोजी काँग्रेस कार्यकारणीने मुंबई या द्विभाषिक राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांच्या निर्मितीच्या ठरावाला संमती दिली.
मराठी भाषिकांचे महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आले. 2016 पर्यंत 106 हुतात्म्यांचा दाखला दिला आत असे परंतु राज्यशासनाने 13 जानेवारी 2016 रोजी 107 से हुतात्मा म्हणून राजपत्रात शंकरराव दत्तात्रय तोरस्कर यांचे नाव नोंदवले. मुंबईच्या हुतात्मा स्मारकावरही आता 107 हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत.
इतिहास – प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास
महाराष्ट्राचे स्थान व सीमा
- अक्षांश विस्तार : 15, 8° उत्तर अक्षवृत ते 22. 1° उत्तर अक्षवृत्त
- रेखांश विस्तार : 72.6° पूर्व रेखांश ते 80.9° पूर्व रेखांश
- अक्षवृत्त म्हणजे आडवी रेघ
- रेखावृत्त म्हणजे उभी रेघ
- महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा – सिंधुदुर्ग
- महाराष्ट्राच्या अतिउत्तरेकडील जिल्हा – नंदुरबार
- महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा – गडचिरोली
- महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा – पालघर
- महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार – त्रिकोणाकृती, पाया कोकणात व निमुळते टोक पूर्वेस भंडाऱ्याकडे.
- क्षेत्रफळ – 3,07,713 चौ.कि.मी.
- भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक आहे.
- पूर्व – पश्चिम लांबी – सुमारे 800 कि.मी.
- दक्षिण उत्तर रुंदी – सुमारे 700 कि.मी.
- समुद्रकिनारा – 720 कि.मी.
- राजधानी – मुंबई
- उपराजधानी – नागपूर
- नैसर्गिकसीमा – पूर्वेस – चिरोली टेकड्या, भामरागड डोंगर
- पश्चिमेस – अरबी समुद्र
- दक्षिणेस – हिरण्यकेशी नदी, तेरेखोल नदी
- उत्तरेस – सातपुडा पर्वतरांग, गाविलगड टेकड्या
- वायव्येस – सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या, अक्राणी टेकड्या
- ईशान्येस – दरकेसा टेकड्या
- राजकीय सीमा – शेजारी सहा राज्ये व एक केंद्रशासीत प्रदेश
- पूर्वेस – छत्तीसगड
- दक्षिणेस – कर्नाटक व गोवा
- उत्तरेस – मध्यप्रदेश
- आग्नेयेस – तेलंगणा
- वायव्येस – गुजरात व दादरा नगर हवेली
महाराष्ट्राचा रचनात्मक प्राकृतिक भुगोल
महाराष्ट्राचे रचनात्मकदृष्ट्या तीन भाग पडतात.
1) कोकण किनारपट्टी
2) सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट (सह्याद्रीच्या व सातपुडा पर्वताच्या डोंगररांगा)
3) महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचा पठारी प्रदेश किंवा देश.
1) कोकण किनारपट्टी
सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट चिंचोळ्या सखल भागालाच कोकण म्हणतात
कोकणाची प्राकृतीक रचना – सह्याद्री पर्वतामधून निघालेल्या डोंगराचे कडे पश्चिमेस किनान्यापर्यंत जातात. किनान्याजवळ वाळूचे पट्टे आहेत. किनाच्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत ही उंची सुमारे 250 मीटरपर्यंत वाढते. प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पुर्व पश्चिम दिशेने आहे.
खलाटी व वलाटी – पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात. खलाटीच्या पुर्वेस जो डोंगराळ भाग आहे त्यास वलाटी असे म्हणतात.
खाड्या – भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते. तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असे म्हणतात. कोकणची किनारपट्टी रिया प्रकारची आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्या दातीवरे, वसईची खाडी, धरमतर, राजापुरी, बाणकोट, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग, कर्ली, तेरेखोलची खाडी.
सागरी किल्ले – महाराष्ट्रात काही किल्ले सागर किनाऱ्यावर किंवा समुद्रातील खडकांवर बांधलेली आहेत. त्यांना सागरी किल्ले म्हणतात. उदा. जंजीरा, सुवर्णदूर्ग, विजयदुर्ग, वसईचा किल्ला इ.
बंदरे – मुंबई हे नैसर्गिक आंतरराष्ट्रीय बंदर आहे. मुंबईजवळच न्हावा- शेवा हे बंदर आहे. मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, श्रीवर्धन, मालवण, रत्नागिरी, जयगड, वेंगुर्ला ही बंदरे आहेत. महाराष्ट्रात एकूण 52 बंदरे आहेत.
2) सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट (सह्याद्रीच्या व सातपुडा पर्वताच्या डोंगररांगा)
सह्याद्री पर्वतरांगामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी नदयांचे आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नदयांचे जलविभाजक वेगवेगळे झाले आहेत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत सह्याद्री समांतर आहे. महाराष्ट्रात 750 कि.मी. लांबीचा सह्याद्री पर्वत आहे.
सह्याद्री पर्वतावरील शिखरे
सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. साल्हेर हे सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे.
किल्ले – सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर शिवनेरी, रायगड, सिंहगड, प्रतापगड, पन्हाळगड, विशालगड हे किल्ले बांधण्यात आले आहेत.
घाट किंवा खिंड – पर्वतांच्या रांगा जेव्हा लांबच लांब पसरलेल्या असतात तेव्हा त्या उंच लांब रांगामध्ये कमी उंचीचा भाग असतो अशा कमी उंचीच्या भागाला खिंड म्हणतात. खिंडीतुन वाहतूकीचे मार्ग जातात. वाहतुकीच्या या ठिकाणाला घाट असे म्हणतात.
सह्याद्री पर्वतात उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास थळघाट, माळशेज, बोरघाट, आंबेनळी, कुंभार्ली घाट, आंबाघाट, फोंडाघाट, आंबोली घाट हे घाट लागतात.
सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगा – शंभूमहादेव डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, सातमाळा – अजिंठा डोंगररांग – जगप्रसिद्ध अजिंठा व वेरूळची लेणी, दौलताबादचा किल्ला, निर्मल रांग इ.
सातपुडा पर्वताच्या डोंगररांगा – अस्तंभा डोंगर, गाविलगड टेकड्या, वैराट डोंगर इ.
3) महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचा पठारी प्रदेश किंवा देश
सह्याद्री पर्वताच्या पुर्वेस विशाल पठारी प्रदेश पसरलेला आहे. याला महाराष्ट्र पठार दख्खनचे पठार असे म्हणतात. सर्वसामान्य लोक त्यास व्यवहारांत देश असे म्हणतात. नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्र पठार तयार झालेले आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व-पश्चिम लांबी 750 कि.मी आहे. महाराष्ट्र पठाराची दक्षिणोत्तर रुंदी सुमारे 700 कि.मी आहे.
पठाराची सर्वसाधारण उंची 450 मी. आहे. महाराष्ट्राचा 90 टक्के भुभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. लाव्हारसापासून महाराष्ट्र पठार तयार झाल्याने त्यास ‘दख्खन लाव्हा’ या नावानेही ओळखतात. सुमारे 29 वेळा उद्रेक होऊन शेवटी हा पठार तयार झाला आहे.
दख्खनची पठारे – दख्खनच्या पठारी प्रदेशात डोंगररांगांवर काही भागात लहान लहान पठारे तयार झालेली आहेत. बालाघाट डोंगररांगावर अहमदनगर बालाघाट पठार तयार झालेले आहे. या पठारामुळे उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे.
या पठाराची पश्चिमेकडील उंची 850 मी व पुर्वेकडील उंची 600 मी आहे. या प्रदेशातून मुळा आणि सीना नदया वाहतात. शंभू महादेव डोंगरांच्या उंचवट्यावर सासवडचे पठार आहे. मराठवाड्यात मांजरा पठार आहे.
महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार व पिके
1) काळी मृदा किंवा रेगुर मृदा – महाराष्ट्रात सर्वात महत्वाची काळी मृदा म्हणजे दख्खनच्या पठारावरील कापसाची काळी मृदा होय. तिने दख्खनच्या पठारावरील सर्वात जास्त भाग व्यापला आहे. महाराष्ट्रात कापसाची मृदा ही गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी या नद्यांच्या खोऱ्यात आढळते. या नद्यांच्या उपखोऱ्यातही ही मृदा आढळते.
पिके – खरीप आणि रब्बी हंगामी दोन्ही हंगामातील पिकांची लागवड या मृदेत केली जाते. कापूस, गहू, ऊस, ज्वारी, तंबाखू, जवस तसेच कडधान्यांचे उत्पादनही घेतले जाते.
2) जांभी मृदा – महाराष्ट्रामध्ये कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात ही मृदा आढळते.
पिके – कोकणामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे. रत्नागिरीतील हापूस आंबा जगप्रसिध्द आहे. याशिवाय काजू, चिकू वगैरे फळझाडांचे उत्पादन मिळते.
3) किनाऱ्याची गाळाची मृदा – महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेश गाळाची मृदा आहे. तिलाच भावर मृदा असेही म्हणतात. ही मृदा कोकणात उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्टीलगत असून अतिशय चिंचोळ्या प्रदेशात आढळते.
पिके – तांदळाचे पिक घेतले जाते. तसेच किनाऱ्यालगतच्या प्रदेशात नारळ व फोफळीच्या (सुपारीच्या) बागा आढळतात.
4) तांबडी आणि पिवळसर मृदा – सह्याद्रीच्या पर्वतमय भागात विशेषतः उत्तर कोकणालगत विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नदयांच्या खोऱ्यात ही मृदा आढळते.
पिके – उंचावरच्या प्रदेशातील तांबड्या मृदेत भरड धान्य प्रामुख्याने बाजरीसारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. विदर्भामध्ये – भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत तांदळाची लागवड केली जाते.
5) क्षारयुक्त व विम्ल / अल्कली मृदा – ही जमीन खारवट असते किनारपट्टी व कालव्याच्या भागात आढळते. महाराष्ट्रात रत्नागिरी, रायगड, ठाणे व अहमदनगर जिल्ह्यात आढळते. या मृदेत कॅल्शियम व सोडिअमचे क्षार जास्त असते. पीक उत्पादन कमी होते.
6) वनजमीन / मृदा – या जमीनीवर दाट वने असतात. महाराष्ट्रात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात ही जमिन आढळते.
7) पर्वतीय मृदा – खडकांचा चुरा उताराच्या दिशेने वाहतो. त्यामुळे पर्वतीय भागाच्या मृदा निर्मीतीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. म्हणून ही मृदा अपरिपक्व असते. जलधारण क्षमता कमी असते. महाराष्ट्रात पर्वतीय भागात अल्प प्रमाणात ही मृदा आढळते.
महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे
शिखर | उंची (मीटर) | जिल्हा |
कळसुबाई | 1646 | अहमदनगर |
साल्हेर | 1546 | नाशिक |
महाबळेश्वर | 1438 | सातारा |
हरिश्चंद्रगड | 1424 | अहमदनगर |
सप्तश्रृंगी | 1416 | नाशिक |
तोरणा | 1404 | तोरणा |
अस्तंभा | 1325 | नंदुरबार |
त्र्यंबकेश्वर | 1304 | नाशिक |
तौला | 1231 | नाशिक |
वैराट | 1177 | अमरावती |
चिखलदरा | 1115 | अमरावती |
हनुमान | 1063 | धुळे |
महाराष्ट्रातील प्रमुख घाट
मार्ग | घाट |
कोल्हापूर – पणजी | फोंडा घाट |
सावंतवाडी – बेळगाव | आंबोली घाट |
कोल्हापूर – रत्नागिरी | आंबा घाट |
कराड – चिपळूण | कुंभार्ली घाट |
नाशिक – मुंबई | थळ (कसारा) घाट |
पुणे- मुंबई | बोर घाट |
पुणे – सातारा | खंबाटकी घाट |
पुणे- बारामती | दिवा घाट |
करंजखेड-चाळीसगाव | म्हैसघाट |
कन्नड-चाळीसगाव | औट्रम घाट |
कोल्हापूर – राजापूर | अणुस्कुरा घाट |
वाई-महाबळेश्वर | पसरणी घाट |
पुणे-नाशिक | चंदनपुरी घाट |
भोर-महाड | वरंधा घाट |
पुणे- रायगड | भिमाशंकर घाट |
कोल्हापूर- कुडाळ | हनुमंत घाट |
अहमदनगर-कल्याण | माळशेज घाट |
रत्नागिरी – रायगड | केळशी घाट |
महाबळेश्वर महाड | पारघाट |
पुणे-सातारा | कात्रजघाट |
महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले
किल्ले | जिल्हा |
माहुली, गोरखगड | ठाणे |
वसई, अर्नाळा | पालघर |
कर्नाळा, साकसई, प्रबळगड | रायगड |
कुलाबा, जंजिरा, लिंगाणा | रायगड |
अलिबाग, सुधागड, रसगड | रायगड |
पालगड, मंडणगड, सुवर्णदुर्ग | रत्नागिरी |
पूर्णगड, फत्तेगड, जयगड | रत्नागिरी |
सिंधुदूर्ग, भरतगड, निवती | सिंधुदूर्ग |
देवगड, महादेवगड, रांगणा | सिंधुदूर्ग |
अंजनेरी, त्र्यंबकगड, मदनगड | नाशिक |
साल्हेर- मुल्हेर, गाळणा | नाशिक |
कळसुबाई, अहमदनगर, मुंगी | अहमदनगर |
पेडगाव, हरिश्चंद्रगड | अहमदनगर |
पुरंदर, शिवनेरी, वज्रगड | पुणे |
सिंहगड/कोंडाणा, रायरेश्वर | पुणे |
तोरणा/प्रचंडगड | पुणे |
राजगड, मल्हारगड | पुणे |
अजिंक्यतारा, प्रतापगड (A) | सातारा |
पांडवगड, सज्जनगड, वासोटा | सातारा |
वर्धनगड, वैराटगड, मकरंदगड | सातारा |
पन्हाळा, विशाळगड, गगनबावडा | कोल्हापूर |
महिपालगड, मनोहरगड | कोल्हापूर |
चंदगड, पारगड, भुदरगड | कोल्हापूर |
थाळनेर, सोनगीर, रायकोट | धुळे |
पारोळा, यावल | जळगाव |
फत्तेखर्डा, मलकापूर | बुलढाणा |
अंबागड, पवनी, कामठा | भंडारा |
देवगिरी/दौलताबाद, अंतुर | औरंगाबाद |
नर्नाळा, बाळापूर, अकोला | अकोला |
वैरागड, सुरजागड | गडचिरोली |
नळदुर्ग, परांडा | उस्मानाबाद |
देवळी, सोनेगाव, आबाजी | वर्धा |
प्रतापगड (2) | गोंदिया |
अचलपूर, आमनेर | अमरावती |
गाविलगड, भवरगड, भैरवगड | अमरावती |
धारूर, धर्मापुरी | बीड |
औसा, उदगीर | लातूर |
जालना | जालना |
करमाळा, अक्कलकोट | सोलापूर |
नागपूर, भिवगड | नागपूर |
चंद्रपूर, माणीकगड | चंद्रपूर |
नांदेड, माहूर,कंधार | नांदेड |
महाराष्ट्र जिल्हावार डोंगर/पर्वत/डोंगररांग/टेकडी
जिल्हा | डोंगर / पर्वत / डोंगररांग / टेकडी |
औरंगाबाद | अजिंठा, सातमाळा, सुरपालनाथ |
जालना | अजिंठ्यांची रांग, जांबुवंत टेकडी |
परभणी | उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग |
हिंगोली | अजिंठ्याची डोंगररांग, हिंगोलीचे डोंगर, सातमाळा, निर्मळ, मुदखेड |
नांदेड | सातमाळा, निर्मळ, मुदखेड, बालाघाटचे डोंगर |
लातूर | बालाघाटचे डोंगर |
उस्मानाबाद | बालाघाट, तुळजापूर व नळदुर्ग डोंगर |
नंदुरबार | सातपुडा, तोरणमाळचे डोंगर |
बीड | बालाघाटचे डोंगर |
धुळे | धानोरा व गाळण्याचे डोंगर |
जळगाव | सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली व हस्तीचे डोंगर |
अमरावती | सातपुडा, गाविलगडच्या रांगा, पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर |
वर्धा | रावणदेव, गरमसूर, मालेगाव, नांदगाव, ब्राम्हणगाव टेकड्या |
भंडारा | गायखुरी, आंबागडचे डोंगर व भीमसेन टेकड्या |
चंद्रपूर | पेरजागड, चांदुरगडचे डोंगर |
यवतमाळ | अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या |
नागपूर | सातपुड्याचे डोंगर, गरमसुर, माहादागड, फिल्कापार टेकड्या |
गोंदिया | नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, दरकेसाचे डोंगर |
गडचिरोली | टिपागड, चिरोली, सिरकोडा, सुरजागड, भामरागड, चिकियाला डोंगररांग |
नाशिक | सहचाद्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर, वणी, चांदवड, सातमाळा रांगा |
अहमदनगर | सहयाद्री, कळसूबाई, अदुला, हरिश्चंद्रगड डोंगररांग |
सातारा | सहयाद्री, परळी, बाणमोली, महादेव, यवतेश्वर, मेंढोशी, आगाशीव, औंध, सीताबाई रांग |
पुणे | सह्याद्री, हरिश्चंद्र, शिंगी, तसुबाई, पुरंदर, ताम्हानी, अंबाला डोंगररांग |
कोल्हापूर | सह्याद्री, पन्हाळा, उत्तर व दक्षिण दूधगंगा, चिकोडी रांग |
सोलापूर | महादेव, बालाघाट, शुकाचार्य |
सांगली | होनाई, शुक्राचार्य, आष्टा, कमलभैरव, बेलगबाड, आडवा, मुचुंडी, मल्लिकार्जून, दंडोबा रांग |
ठाणे | सह्याद्री |
रायगड | सह्याद्री |
सिंधुदूर्ग | सह्याद्री |
रत्नागिरी | सह्याद्री |
मुंबई शहर व मुंबई उपनगर | पाली, शिवडी, खंबाला, ॲन्टॉप हिल, मलबार हिल |
महाराष्ट्र फलोत्पादनात प्रसिध्द
फळे | प्रसिध्द ठिकाणे/जिल्हे |
पेरु | दौलताबाद |
संत्री | नागपूर |
द्राक्षे | नाशिक, सांगली |
चिकू | घोलवड-डहाणु(पालघर), पिशोर (औबाद) |
सिताफळ | दौलताबाद (औरंगाबाद) |
केळी | जळगाव, वसई |
अंजीर | राजेवाडी, (पुणे) |
हापूस आंबा | रत्नागिरी |
कलिंगड | अलीबाग |
नारळ | ठाणे, रायगड, रत्नागिरी |
काजू | रत्नागिरी, मालवण-सिंधुदूर्ग, कोल्हापूर |
फणस | ठाणे, रायगड, रत्नागिरी |
डाळिंब | अहमदनगर, पुणे, सोलापूर |
बोरे | मेहरुण-जळगाव, पुणे, धुळे |
स्ट्रॉबेरी | सातारा/महाबळेश्वर |
लिची | ठाणे |
प्रसिध्द व्यक्ती व त्यांची स्मारके
प्रसिध्द व्यक्ती | स्मारक ठिकाण |
साने गुरुजी स्मारक | माणगाव |
स्वा. सावरकर स्मारक | पुणे |
शिवछत्रपती स्मारक | मुंबई |
ग.दि. माडगुळकर स्मारक | पुणे |
शहाजीराजे भोसले स्मारक | वेरुळ |
गोविंदभाई श्रॉफ स्मारक | औरंगाबाद व हैद्राबाद |
बालगंधर्व स्मारक | नागठाण जि. सांगली |
डॉ. द्वारकादास कोटणीस स्मारक | सोलापूर |
शिरीषकुमार स्मारक | नंदुरबार |
कान्होजी आंग्रे स्मारक | अलिबाग |
वि.वा. शिरवाडकर स्मारक | नाशिक |
महाराष्ट्रातील प्रस्तावित निर्यात क्षेत्रे
क्षेत्र | ठिकाण |
कृषि निर्यात क्षेत्र | नाशिक, सातारा, पुणे, सांगली, अहमदनगर |
द्राक्ष वाईन पार्क | विंचूर (नाशिक), पलुस (सांगली) |
फुड पार्क | मनेराजुरी (सांगली) |
फ्लोरीकल्चर पार्क | तळेगाव |
ऑरेंज सीटी पार्क | नागपूर |
बायोटेक पार्क | हिंजवडी (पुणे), जालना |
जेम्स ज्वेलरी पार्क | महापे, नवी मुंबई |
टेक्सटाईल पार्क | बुटीबोरी (नागपूर) |
सिल्व्हर पार्क | हुपरी (कोल्हापूर) |
मराठी ऋतू , महिने व सण
ऋतू | मराठी महिने | महत्वाचे सण |
वसंत | चैत्र | रामनवमी, गुढीपाडवा |
ग्रीष्म | वैशाख | – |
ग्रीष्म | ज्येष्ठ | वटपौर्णिमा |
वर्षा | आषाढ | आषाढी एकादशी |
वर्षा | श्रावण | नारळी पौर्णिमा, जन्माष्टमी, नागपंचमी |
शरद | भाद्रपद | गणेश चतुर्थी |
शरद | अश्विन | नवरात्री, कोजागिरी, दसरा, दिवाळी |
हेमंत | कार्तिक | भाऊबीज, कार्तिकी एकादशी |
हेमंत | मार्गशिर्ष | – |
शिशिर | पौष | पौष अमावस्या |
शिशिर | माघ | महाशिवरात्री, मकरसंक्रांत |
वसंत | फाल्गुन | होळी |
महाराष्ट्राची चर्तुःसीमा
पूर्वेला | छत्तीसगड |
पश्चिमेला | अरबी समुद्र |
उत्तरेला | मध्य प्रदेश |
दक्षिणेला | गोवा व कर्नाटक |
आग्नेयला | तेलंगणा |
ईशान्येला | छत्तीसगड |
वायव्येला | गुजरात व दादरा नगर हवेली |
महाराष्ट्रातील प्रमुख अदिवासी व त्यांचे वास्तव्य क्षेत्र
प्रमुख अदिवासी जमाती | वास्तव्य असणारा प्रदेश |
गोंड | चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड |
भिल्ल | धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्हयातील सातपुडा पर्वताचा प्रदेश आणि नांदेड जिल्ह्यातील डोगराळ प्रदेश |
कोकणा | नाशिक, धुळे, जिल्ह्यांचा डोंगराळ प्रदेश |
कोरकू | अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रदेश |
वारली | ठाणे जिल्ह्यातील डहाणू, मोखाडा, तलासरीचा जंगलपट्टीचा प्रदेश |
ठाकर, महादेव कोळी | पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील डोंगराळ व पठारी प्रदेश |
कोलाम | राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा प्रदेश |
गोवारी | नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्षा |
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निर्मीती
मुळ जिल्हा | नवीन जिल्हा | विभाजन तारीख |
रत्नागिरी | सिंधुदूर्ग | 1 मे 1981 |
औरंगाबाद | जालना | 1 मे 1981 |
उस्मानाबाद | लातूर | 16 ऑगस्ट 1982 |
चंद्रपूर | गडचिरोली | 26 ऑगस्ट 1982 |
बृहमुंबई | मुंबई शहर व मुंबई उपनगर | 1 ऑक्टोबर 1990 |
अकोला | वाशिम | 1 जुलै 1998 |
धुळे | नंदुरबार | 1 जुलै 1998 |
परभणी | हिंगोली | 1 मे 1999 |
भंडारा | गोंदिया | 1 मे 1999 |
ठाणे | पालघर | 1 ऑगस्ट 2014 |
महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्ये
अभयारण्य | जिल्हा |
1. औरंगाबाद विभाग
जायकवाडी पक्षी नायगाव मयूर येडशी – रामलिंगे घाट |
औरंगाबाद व अहमदनगर बीड उस्मानाबाद |
2. नागपूर विभाग
नागझिरा बोर अंधारी चपराळा भामरागड |
गोंदिया वर्धा व नागपूर चंद्रपूर गडचिरोली गडचिरोली |
3. अमरावती विभाग
मेळघाट (व्याघ्र) काटेपूर्णा पैनगंगा अंबाबरवा ज्ञानगंगा लोणार नर्नाळा वान टिपेश्वर |
अमरावती अकोला यवतमाळ नांदेड बुलढाणा बुलढाणा बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ |
4. नाशिक विभाग
रेहेकुरी, काळवीट माळढोक पक्षी कळसूबाई, हरिश्चंद्रगड यावल गौताळा ऑट्रमघाट नांदूर मधमेश्वर अनेर धरण |
अहमदनगर अहमदनगर – सोलापूर अहमदनगर जळगाव जळगाव – औरंगाबाद नाशिक धुळे |
5. पुणे विभाग
भीमाशंकर कोयना उद्यान सागरेश्वर राधानगरी मयुरेश्वर, सुपे |
पुणे व ठाणे सातारा सांगली कोल्हापूर पुणे |
6. कोकण विभाग
कर्नाळा पक्षी तानसा फणसाड मालवण सागरी |
रायगड पालघर रायगड सिंधुदूर्ग |
महाराष्ट्रातील सहा राष्ट्रीय उद्याने
राष्ट्रीय उद्यान | जिल्हा |
पेंच (महाराष्ट्रातील सर्वात मोठे ) | नागपूर |
ताडोबा (मगरीसाठी प्रसिध्द) | चंद्रपूर |
नवेगाव | गोंदिया |
गुगामल (वाघांसाठी प्रसिध्द) | अमरावती |
चांदोली | कोल्हापूर, सातारा, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सरहद्दीत |
संजय गांधी
(महाराष्ट्रातील सर्वात लहान उद्यान) |
बोरिवली, मुंबई उपनगर |
- महाराष्ट्रात एप्रिल 2015 मध्ये 190 वाघ होते त्यापैकी विदर्भात सर्वात जास्त वाघ आहेत. त्यामुळे नागपूर ही वाघांची राजधानी म्हणून राज्य शासनाने घोषित केली आहे.
- महाराष्ट्रात सहा व्याघ्र (वाघ) प्रकल्प असून यामध्ये, मेळघाट (1974), पेंच (1977), आता याचे नवीन नाव पं. जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय उद्यान, ताडोबा (1993), सह्याद्री (2007), नवेगाव-नागझिरा (2013) व बोर व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश आहे.
- मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा देशातील घोषित प्रथम नऊ व्याघ्र प्रकल्पापैकी एक तसेच महाराष्ट्रातील प्रथम व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाची स्थापना 22 फेब्रुवारी 1974 रोजी करण्यात आली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रामध्ये एकुण चार अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश आहे. व्याघ्र प्रकल्प क्षेत्रामध्ये मेळघाट अभयारण्य, नर्नाळा अभयारण्य, अंबाबरवा अभयारण्य तसेच गुगामल राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश असून सदर क्षेत्र हे मानव विरहीत आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख वन्य प्राण्यांची क्षेत्रे
जिल्हा | वन्य प्राणी |
चंद्रपूर, गडचिरोली, | सांबर, चितळ, निलगाय |
भंडारा व गोंदिया | चौशिंगा |
कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, गोंदिया व अमरावती | गवे |
सिंधुदूर्ग, रत्नागिरी, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नांदेड, अमरावती | जंगली कुत्रे व अस्वले |
भंडारा, गोंदिया, अमरावती, कोकण | कस्तुरी मांजरे, पाणमांजरे |
महाराष्ट्रातील वनोद्याने
जिल्हा | वनोद्याने |
औरंगाबाद | अजिंठा, जायकवाडी, हिमायतबाग |
परभणी | येलदरी |
नांदेड | शांतीघाट, बहादूरपूरा |
नाशिक | गंगापूर, सप्तश्रृंगी |
नंदुरबार | तोरणमाळ |
जळगाव | पाल, पाटणादेवी, पदमालय |
अमरावती | चिखलदरा |
बुलढाणा | राणीबाग, लोणार, बुलढाणा |
नागपूर | सेमिनरी हिल, रामटेक |
चंद्रपूर | माणिकगड |
कोल्हापूर | तबक उद्यान (पन्हाळा), आळते (हातकणंगले) |
सांगली | दाडोबा डोंगर |
सातारा | प्रतापसिंह (महाबळेश्वर), प्रतापगड |
पुणे | बनेश्वर, सिंहगड, पाचगाव, पर्वती, भांबर्डा,
मुळा-मुठा, शिवनेरी, उजनी-भिगवण |
सिंधुदुर्ग | आंबोली, नरेंद्र डोंगर |
रायगड | घारापूरी (एलिफंटा), माथेरान |
ठाणे | वज्रेश्वरी |
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे
थंड हवेचे ठिकाण | जिल्हा |
महाबळेश्वर | सातारा |
पाचगणी | सातारा |
पन्हाळा | कोल्हापूर |
लोणावळा | पुणे |
खंडाळा | पुणे |
तोरणमाळ | अमरावती |
जव्हार | नंदुरबार |
माथेरान | रायगड |
आंबोली | सिंधुदूर्ग |
म्हैसमाळ | औरंगाबाद |
किल्ले- अंतुर | औरंगाबाद |
- महाबळेश्वरला काश्मिरची उपमा दिली जाते..
- आंबोली ही सावंतवाडी संस्थानाची उन्हाळ्यातील राजधानी होती.
- महाराष्ट्राच्या पर्यटनस्थळांची राजधानी महाबळेश्वर आहे.
- महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबाद ही राज्यशासनाने 2010 साली घोषित केली आहे.
- मुंबईपासून 110 कि.मी. अंतरावर असलेले माथेरान महाराष्ट्रातील एकमेव प्रदूषणविरहित पर्यटन स्थळ आहे.
महाराष्ट्रातील विद्यापीठे
विद्यापीठांचे नाव | स्थान | स्थापना |
मुंबई विद्यापीठ | मुंबई | 1857 |
टिळक महराष्ट्र विद्यापीठ | पुणे | 1921 |
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ | नागपूर | 4 ऑगस्ट 1923 |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ | पुणे | 1948 |
श्रीमती नाथीबाई दामोदर
ठाकरसी महिला विद्यापीठ |
मुंबई | 1951 (मुळ स्था. 1916 नामकरण 1951) |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ | औरंगाबाद | 1958 |
शिवाजी विद्यापीठ | कोल्हापूर | 18 मे 1962 |
संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती | अमरावती | 1983 |
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ | नाशिक | 1989 |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ | लोणेरे (रायगड) | 1989 |
कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ | जळगाव | 15 ऑगस्ट 1990 |
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ | नांदेड | 1994 |
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ | वर्धा | 1997 |
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ | नाशिक | 1998 |
कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ | रामटेक (नागपूर) | 1997 |
पुण्य. अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ | सोलापूर | 2004 |
गोंडवाना विद्यापीठ | गडचिरोली | 2011 |
कृषी विद्यापीठे
विद्यापीठाचे नाव | स्थान | स्थापना |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ | राहुरी (अहमदनगर) | 1968 |
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ | अकोला (अकोला) | 1969 |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ | दापोली (रत्नागिरी) | 1972 |
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ | परभणी (परभणी) | 1972 |
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ | नागपूर (नागपूर) | 2000 |
महाराष्ट्र – प्रमुख खनिज संपत्ती
जिल्हे | खनिज संपत्ती |
सांगली | बॉक्साईट, चुनखडी |
रायगड | बॉक्साईट, मीठ, खनिज तेल, लोहखनिज (तुरळक), मिठागरे |
ठाणे | रेती, बांधकाम दगड, बॉक्साईट, खनिज तेल, मीठ. |
सिंधुदूर्ग | शिरगोळा, गेरु, ग्रॅनाईट, वाळू, सिलिकामय, डोलोमाईट, चुनखडी,क्रोमाईट, लोहखनिज, मँगनीज. |
रत्नागिरी | डोलोमाईट, सिलिका, वाळू, बराईट, खनिज तेल, बॉक्साईट, क्रोमाईट, इल्मेनाईट, शिरगोळा |
नागपूर | जांभा, संगमरवर, टंगस्टन, गॅलिअम, अभ्रक, रेतीवाळू, मॅगनीज, लोहखनीज, चुनखडी, डोलोमाईट |
कोल्हापूर | बॉक्साईट, बराईट, चिनी माती, सिलिका, जांभा, लोहखनिज. |
चंद्रपूर | तांबे, बराईट, वालुकाश्म, ग्रॅनाईट, लोहखनिज, चुनखडी. |
भंडारा – गोंदिया | कायनाईट, क्वार्टसाईट, सिझियम, व्हॅनेडियम, मँगनीज, लोहखनिज, क्रोमाईट |
गडचिरोली | चुनखडी, डोलोमाईट, ग्रॅनाईट, तांबे, लोहखनिज |
महाराष्ट्रातील प्रमुख जलविद्युत प्रकल्प
जलविद्युत प्रकल्प | जिल्हा | |
टाटा खोपोली | रायगड | |
टाटा भिवपुरी | रायगड | |
टाटा भिरा | रायगड | |
भिरा | रायगड | |
कोयना टप्पा 1,2 व 3. | सातारा | |
कोयना धरण | सातारा | |
धोम | सातारा | |
कण्हेर | सातारा | |
वैतरणा | नाशिक | |
वैतरणा धरण | ठाणे | |
भातसा | ठाणे | |
तिल्लारी | कोल्हापूर व सिंधुदूर्ग | |
राधानगरी | कोल्हापूर | |
येलदरी | परभणी | |
जायकवाडी (पैठण) | औरंगाबाद | |
पेंच टप्पा 1,2 | नागपूर | |
भंडारदरा | अहमदनगर | |
उजनी | सोलापूर | |
येवतेश्वर | सातारा | |
भाटघर | पुणे | |
वीर | पुणे | |
पवना | पुणे | |
पानशेत | पुणे | |
वरसगाव | पुणे |
- कोयना जलविद्युत केंद्रास ‘अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा/भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते.
- खोपोली जलविद्युत केंद्र रायगड हे राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र.
- जायकवाडी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प.
- तिल्लारी प्रकल्प कोल्हापूरचा चंदगड तालुका व सिंधुदुर्गचा दोडामार्ग तालुका या भागात आहे
- जायकवाडी प्रकल्प यास जपान सरकारने सहकार्य केले आहे.
- कोयना जलविद्युत प्रकल्प सातारा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. राज्यात फक्त कोयना धरणातच लेक टॅपींग विज निर्मिती तंत्र (पाण्याखालील तळात बोगदा) वापरले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प
औष्णिक विद्युत केंद्र | जिल्हा |
कोराडी टप्पा 1 ते 7 | नागपूर |
खापरखेडा | नागपूर |
दुर्गापूर | चंद्रपूर |
बल्लारपूर | चंद्रपूर |
चंद्रपूर | चंद्रपूर |
पारस | अकोला |
परळी वैजनाथ टप्पा 1 ते 5 | परळी, बीड |
फेकरी टप्पा 1 ते 3 | भुसावळ, जळगाव |
एकलहरे टप्पा 1 ते 5 | नाशिक |
चोला | कल्याण, ठाणे |
तुर्भे | मुंबई उपनगर |
डहाणू (बी.एस.ई.एस.) | ठाणे |
- राज्यातील पहिले आणि मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोराडी आहे
- महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड, मुंबई
महाराष्ट्रातील अणूविद्युत प्रकल्प
- तारापूर अणुविद्युत प्रकल्प – पालघर
- उमरेड अणुविद्युत प्रकल्प – नागपूर
- जैतापूर अणुविद्युत प्रकल्प – जैतापूर रत्नागिरी
- तारापूर येथे अमेरिकेच्या मदतीने 1969 साली अणुकेंद्र उभारले.
- भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना 10 ऑगस्ट, 1948 रोजी झाली.
- अप्सरा अणुभट्टी भारतातील पहिली अणुभट्टी 4 ऑगस्ट 1956 रोजी ग्रेट ब्रिटनच्या सहाय्याने उभारली.
- सायरस अणुभट्टी कॅनडा इंडियन रिअॅक्टर ही कॅनडाच्या सहकार्याने 10 जुलै, 1960 रोजी उभारली.
महाराष्ट्रातील पुळणे
पुळण | जिल्हा |
जुहू चौपाटी | मुंबई शहर |
दादरा | मुंबई शहर |
गिरगांव | मुंबई शहर |
उड्डाण | ठाणे |
अलिबाग | रायगड |
मुरुड जंजिरा | रायगड |
श्रीवर्धन | रायगड |
मुरुड | सिंधुदुर्ग |
तारकर्ली | सिंधुदुर्ग |
मोचेमाळ | सिंधुदुर्ग |
उभादांडा | सिंधुदुर्ग |
दापोली | सिंधुदुर्ग |
शिरोडा | सिंधुदुर्ग |
गणपतीपुळे | रत्नागिरी |
हर्णे | रत्नागिरी |
गुहागर | रत्नागिरी |
महाराष्ट्रातील वने
महाराष्ट्रातील वनांचे प्रकार
- उष्ण कटिबंधीय सदाहरित वने : महाराष्ट्रामध्ये 250 सें.मी. ते 300 सें. मी. अथवा त्यापेक्षा जास्त पर्जन्य प्रदेशात कोकणाच्या सहयाद्री लगतच्या भागात ही वने आहेत. त्यांना सदाहरित संदपर्णी असेही म्हणतात. महाबळेश्वर व माथेरान परिसरात या प्रकारची जंगले आढळतात. येथील जंगलात सेदार, नागपंचा, फणस, जांभूळ, कावशी, मँगनोलिया,ओक,शिसव,तेल्याताड, जंगली आंबा इत्यादी जातीचे वृक्ष आढळतात. या जंगलात अधूनमधून वेत व बांबू यांची झाडे आढळतात.
- उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने : ज्या प्रदेशात 150 ते 200 सें.मी. पाऊस पडतो तेथे निमसदाहरित जंगले आढळतात. सह्याद्रीच्या पश्चिम व पूर्व पायथ्याजवळ ही जंगले आढळतात. पश्चिमेस कोकणात आणि पूर्वेस घाट माथ्यावर असे या वनांचे दोन प्रकार सलग पट्टे आहेत. कदंब, शिसम, किंडल, बिबळ, आईन, वावळी, किंजल, बेहडा, सावर, किन्हई, जीबत हे उंच वृक्ष व जांभूळ, आंबा, अंजन, गेळा हे मध्यम आकाराचे वृक्षांचे प्रकार आढळतात.
- उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वने : सह्याद्रीच्या उंच भागातील 350 ते 400 सें.मी. पावसाच्या समुद्र सपाटीपासून सुमारे 1200 मीटर पेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात आढळतात. अंजन, हिरडा, बेहडा, आंबा, शेंद्री, रानफणस, काटेकुवर, तेजपान, सुरंगी, येवती, बामणी, कुसुम, पिंपरनेल, लव्हेंडर, कारवी अशा असंख्य जातीचे वृक्ष. झुडूपे व वेली या वनात आढळतात.
- आर्द्र पानझडी अथवा मोसमी वने : पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या वनस्पतींना आर्द्र पानझडी असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे 125 सें.मी. ते 200 सें.मी. पर्जन्य विभागात 700 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात आर्द्र पानझडी वने आहेत. या वनात सागवान, शिसव, सावर, बीजा, कदंब, आईन, शिरीष, अर्जुन, धावडा, सादोडा, आवळा, अंजन, खैर विबळा, किंदळ इत्यादी जातीचे वृक्ष आढळतात. गडचिरोली जिल्ह्यात चिरोलगड, टिपागड, सुरजागड, भामरागड, चिकियाला व सिरकोडा डोंगरात, चंद्रपूर जिल्हयातील चांदूरगड परिसरात, भंडारा जिल्हयात नवेगाव, अंबागडे, गायखुरी डोंगरात या प्रकारची जंगले आहेत. पाने विशिष्ट ऋतुत गळून पडत असल्याने या वनस्पतींना पानझडी वनस्पती असे म्हणतात.
- शुष्क पानझडी वने : सातपुडा श्रेणीतील डोंगररांगा, पश्चिम विदर्भातील डोंगररांगा, अजिंठा, सह्याद्रीचा पूर्वभिमुख उतार इत्यादी प्रदेशात शुष्क पानझडी वने आहेत. सुमारे 50-100 सें.मी. पर्जन्य विभागात शुष्क पानझडी वने आहेत. महाराष्ट्र एकूण वनक्षेत्राच्या सुमारे 62% क्षेत्रावर या प्रकारची वने आहेत. साग, ऐन, तिवस, खैर, धावडा, रोहन, सावर, शेंद्री, चेरी, चारोळी, आवळा, बेहडा, पळस, टेंभुर्णी, बेल, बीलसाल, तेंदू, बाभूळ व बोर इत्यादी वनस्पती या वनक्षेत्रात वाढतात.
- शुष्क काटेरी वनस्पती वने : महाराष्ट्र पठारावरील 50 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या विभागात शुष्क काटेरी वनस्पती वाढतात. यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा समावेश आहे. या वनात बोरी, बाभळी, निंब, खैर ही झाडे तसेच टाकळा, तरवड, निवडुंग इत्यादी झुडपे प्रमुख वनस्पती आहेत.
- खाजण अथवा मॅग्रोव्ह वने : महाराष्ट्रातील किनाऱ्यालगतच्या भागात भरती व ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यानच्या भागात तसेच खाड्यांच्या मुखांशी असणाऱ्या दलदलयुक्त खाजण भूमीवर खाजण अथवा मॅग्रोव्ह वनस्पती आहेत. खाजण वनातील झाडांना सुंद्री असे सामान्य नाव आहे. कोकणात कांदळ, चिपी, तीस, तिवर, मारांडी, समुद्रफळ, अंबोरी, काजळी इत्यादी जातीची झाडे खाजण वनात आहेत.
महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक | महामार्गाचे | राज्यातील लांबी (कि.मी.) |
3 | मुंबई – आग्रा | 391 |
4 | मुंबई – बंगलोर – चेन्नई | 375 |
4 – ब | कळंबोली – पळस्पे | 20 |
4- क | 4- ब च्या 16.687 कि.मी. पासून ते कळंबोली पर्यंत | 7 |
6 | धुळे – कोलकाता | 813 |
7 | वाराणसी – कन्याकुमारी | 232 |
8 | मुंबई – दिल्ली | 128 |
9 | पुणे-विजयवाडा-मच्छलीपट्टणम | 336 |
13 | सोलापूर – चित्रदुर्ग | 43 |
16 | निजामाबाद – जगदलपूर | 52 |
17 | पनवेल – मंगलोर | 482 |
50 | पुणे – नाशिक | 192 |
69 | नागपूर – अब्दुलागंज | 56 |
204 | रत्नागिरी – कोल्हापूर | 137 |
211 | सोलापूर – धुळे | 453 |
222 | कल्याण-नलकोंडा (तेलंगणा) | 550 |
राज्यातील व देशातील सर्वात कमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग हा 4 क असून तो रा. महामार्ग क्रमांक 4-ब च्या 16.684 कि.मी. पासून ते कळंबोली पर्यंत 7 कि.मी. चा आहे.
रेल्वे वाहतूक
प्रकार – A. ब्रॉडगेज B. मीटरगेज C. नॅरोगेज
महाराष्ट्रातील प्रमुख ब्रॉडगेज मार्ग
1. मध्य रेल्वे
1. मुंबई – दिल्ली
2. मुंबई कोलकाता
3. मुंबई- चेन्नई
4. मुंबई- हैद्राबाद
5. मुंबई – वाराणसी
6. मुंबई – बंगळुरु
7. चेन्नई दिल्ली
8. भुसावळ – सुरत
9. मुंबई – अमृतसर
2. पश्चिम रेल्वे
1. मुंबई – दिल्ली
2. मुंबई – अहमदाबाद
3.मुंबई – जम्मू-तावी
4. मुंबई – जयपूर
3. कोकण रेल्वे
1. मुंबई – मंगळूर
2. मुंबई _ तिरुअनंतपुरम
4.दक्षिण – मध्य- रेल्वे
1. मुंबई – हैद्राबाद
2. सोलापूर गदग
3. नांदेड – अमृतसर
4. हैद्राबाद – अकोला
5.धर्माबाद – मनमाड
6. काचिगुडा – मनमाड
7. परळी- अकोला
5.अन्य रेल्वे मार्ग (ब्रॉडगेज)
1. कोल्हापूर – गोंदिया (महाराष्ट्र एक्सप्रेस)
2. मुंबई – कोल्हापूर
3.अकोला जयपूर
4.भुसावळ- सुरत
6. महाराष्ट्रातील उपनगरी रेल्वे वाहतूक
मुंबई, नागपूर व पुणे या शहरात उपनगरी रेल्वे वाहतूक सेवा कार्यरत आहे.
1. मुंबई – 1 पश्चिम रेल्वे – चर्चगेट ते विरार डहाणूपर्यंत
2. मुंबई – 2 मध्य रेल्वे – सी.एस.एम.टी. (छत्रपती शिवाजी महाराज, टर्मिनस) ते कसारा, कर्जत, खोपोली व पनवेलपर्यंत
3. मुंबई – मेट्रो
4. नागपूर – नागपूर ते अजनी, कामठीपर्यंत
5. पुणे – पुणे ते लोणावळा, पुणे ते दौंडपर्यंत
विमान वाहतूक विमानतळ
1. सांताक्रुझ, मुंबई
2. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सहारा) मुंबई
3. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (सोनेगाव), नागपूर
5. लोहगाव (पुणे)
6. चिकलठाणा, औरंगाबाद.
7. ओझर, नाशिक
8. गुरुगोविंदसिंगजी विमानतळ, नांदेड
9. सोलापूर
10. छत्रपती राजाराम महाराज विमानतळ कोल्हापूर
11. कराड
12. देवळाली, नाशिक
13. अकोला
14. उस्मानाबाद
15. धुळे
16. चंद्रपूर
17. रत्नागिरी
18. जळगाव
19. फलटण
20. भंडारा
21. किनवट
22. वाडा
23. शिर्डी, अहमदनगर
सर्वसामान्यांना विमान प्रवासासाठी केंद्राची उडाण योजना आहे.
जल वाहतूक
एकूण बंदरे 54 आहेत. यापैकी आंतरराष्ट्रीय बंदरे दोन आहेत.
1. मुंबई 2. न्हावा-शेवा ऊर्फ जवाहरलाल नेहरु बंदर (रायगड जिल्ह्यात आहे)
अन्य बंदरे (एकूण अन्य बंदरे – 52) त्यातील महत्वाची बंदरे खालीलप्रमाणे.
1. आचरे
2. जयगड
3. अलिबाग
4. मनोरी
5. विजयदुर्ग
6. हर्णे
7. कारंजा
8. तुर्भे
9. देवगड
10. दाभोळ
11. रेवस
12. वेलासूर (उल्हास)
13. वेंगुर्ला
14. जैतापूर
15. दिघी
16. मोरा
17. दातीवरे
18. मालवण
19. रत्नागिरी
20. धरमतर
21. कल्याण
22. डहाणू
23. रेडी
24. पूर्णगड
25. राजापुरी
26. वर्सोवा
27. सातपाटी
28. श्रीवर्धन
29. गरुड
30. मांडला
महाराष्ट्रातील संताची जन्मस्थाने
संत | जन्मस्थळ | जिल्हा |
जनाबाई | गंगाखेड | परभणी |
रामदास स्वामी | जांब | जालना |
संत नामदेव | नरसी | हिंगोली |
संत ज्ञानेश्वर | आपेगाव | औरंगाबाद |
सोपानदेव | आपेगाव | औरंगाबाद |
निवृत्तीनाथ | आपेगाव | औरंगाबाद |
मुक्ताबाई | आपेगाव | औरंगाबाद |
संत तुकाराम | देहू | पुणे |
गोविंद प्रभू | रिध्दपूर | अमरावती |
संत एकनाथ | पैठण | औरंगाबाद |
गाडगे महाराज | शेणगाव | अमरावती |
विनोबा भावे | गागोदे | रायगड |
मारोती महाराज | दस्तापूर | परभणी |
साईबाबा | पाथरी | परभणी |
तुकडोजी महाराज | यावली | अमरावती |
महाराष्ट्रातील संताची समाधीस्थळे
संत | समाधीस्थळ | जिल्हा |
गुरुगोविंदसिंग | नांदेड | नांदेड |
जनार्दन स्वामी | कोपरगाव | अहमदनगर |
संत एकनाथ | पैठण | औरंगाबाद |
गोरोबा कुंभार (काका) | तेरणा | उस्मानाबाद |
दासोपंत | अंबेजोगाई | बीड |
संत नामदेव | पंढरपूर | सोलापूर |
रामदास स्वामी | सज्जनगड | सातारा |
श्रीधरस्वामी | पंढरपूर | सोलापूर |
दामाजी पंत | मंगळवेडा | सोलापूर |
चोखामेळा | पंढरपूर | सोलापूर |
निवृत्तीनाथ | त्र्यंबकेश्वर | नाशिक |
साईबाबा | शिर्डी | अहमदनगर |
संत तुकाराम | देहू | पुणे |
तुकडोजी महाराज | मोझरी | अमरावती |
संत ज्ञानेश्वर | आळंदी | पुणे |
गजानन महाराज | शेगाव | बुलढाणा |
गाडगे महाराज | अमरावती | अमरावती |
गोविंदप्रभू | रिध्दपूर | अमरावती |
संत जनाबाई | गंगाखेड | परभणी |
उदगीर महाराज | उदगीर | लातूर |
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे
झरे | जिल्हा |
सुनपदेव, उनपदेव, चांगदेव | जळगाव |
वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलोली | ठाणे |
सालबर्डी | अमरावती |
साव | रायगड |
कापेश्वर | यवतमाळ |
उन्हवरे-ताम्हाने, खेड, तुरळ | रत्नागिरी |
महाराष्ट्रातील देवीची साडे तीन पीठे
स्थळ | जिल्हा |
महालक्ष्मीदेवी | कोल्हापूर |
रेणुकादेवी | माहूर (नांदेड) |
भवानी देवी | तुळजापूर (उस्मानाबाद) |
सप्तश्रृंगीदेवी | वणी (नाशिक) |
- महाराष्ट्रातील शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणजे वणीची सप्तश्रृंगी सात श्रृंगे किंवा शिखरे असलेल्या डोंगरावरील देवीचे स्थान, हे स्थान नाशिकच्या उत्तरेस 27 मैल अंतरावर, चांदवड डोंगराच्या रांगेत असलेल्या सप्तश्रृंगी खडकावर कोरलेले आहे.
- महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांचे सांस्कृतीक अनुबंध जोडणारी शक्तीदेवता म्हणजेच कोल्हापूर येथील महालक्ष्मी हे महाराष्ट्रातील शक्ती देवतेच्या इतर पीठांपैकी सर्वात मोठे तीर्थक्षेत्र किंवा शक्तीपीठ आहे. महालक्ष्मीचे हे मंदिर हेमाडपंथी आहे.
- मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले तुळजापूर हे तुळजाभवानी देवीच्या नावावरुन वसलेले साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ होय. या तीर्थक्षेत्राला इ.स 1000 पूर्वीची प्राचीन पंरपरा आहे तुळजापूरचे मंदिर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरासारखे हेमाडपंथी आहे.
- माहूरगडची रेणूका देवी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या आग्नेय दिशेस 125 कि.मी. वर असलेले हे ठिकाण विदर्भातील यवतमाळ जिल्हयाच्या अगदी जवळ आहे.
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग स्थळे
स्थळ | जिल्हा |
परळी वैजनाथ | बीड |
औंढा नागनाथ | हिंगोली |
भीमाशंकर | पुणे |
घृष्णेश्वर | औरंगाबाद |
त्र्यंबकेश्वर | नाशिक |
भारतातील इतर सात ज्योतिर्लिंग स्थळे
स्थळ | जिल्हा |
ओंकारेश्वर | खांडवा (मध्यप्रदेश) |
महाकालेश्वर | उज्जैन (मध्यप्रदेश) |
काशी विश्वेश्वर | बनारस-वाराणसी (उत्तरप्रदेश) |
केदारनाथ | रुद्रप्रयाग (उत्तराखंड) |
सोमनाथ | गीर सोमनाथ (गुजरात) |
रामेश्वर | रामेश्वर बेटावर (तामिळनाडू) |
श्री. शैल्यमल्लिकार्जुन | कुरनूल (आंध्रप्रदेश) |
महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थळे
स्थळ | जिल्हा |
मोरेश्वर, मोरगाव | पुणे |
चिंतामणी, थेऊर | पुणे |
विघ्नेश्वर, ओझर | पुणे |
महागणपती, रांजनगाव | पुणे |
गिरिजात्मक, लेण्याद्री | पुणे |
सिध्दिविनायक, सिध्दटेक | अहमदनगर |
बल्लाळेश्वर, पाली | रायगड |
वरदविनायक, मढ | रायगड |
उदयोगधंदे आणि संबंधित स्थळे
उद्योगधंदे | संबंधित स्थळे |
हातमाग | इचलकरंजी, मालेगाव, सोलापूर, भिवंडी |
काचेच्या वस्तू | तळेगाव, चंद्रपूर |
चलनी नोटा | नाशिक |
लाकुड कारखाने | बल्लारपूर, चंद्रपूर, अमरावती |
कापड गिरण्या | मुंबई, नागपूर, सोलापूर |
तेलशुध्दीकरण केंद्रे | तुर्भे (नवी मुंबई) |
शेतीची अवजारे | किर्लोस्करवाडी, सातारा, पुणे, इचलकरंजी |
साखर कारखाने | सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर इ. |
कागद गिरण्या | बल्लारपूर (चंद्रपूर) थेरगाव, (चिंचवड-पुणे), खोपोली (रायगड), भिगवण (इंदापूर-पुणे) |
सॉ-मील्स | चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा बल्लारपूर, नंदूरबार, मुंबई, नागपूर, बल्लारशा, नवापूर, डहाणू |
आगपेटया | अंबरनाथ, नागपूर |
पेपर व पेपर बोर्ड | वारणानगर (कोल्हापूर), नवापूर (नंदुरबार), खोपोली (रायगड), बल्लारपूर (चंद्रपूर) |
रासायनिक उद्योग | ठाणे, रायगड (नागोठणे) येथे मोठे पेट्रोरसायन केंद्र आहे |
अन्नप्रक्रिया उद्योग | ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक |
खतनिर्मिती | मुंबई, रायगड, परभणी, अमरावती, यवतमाळ, नागपूर, थळ-वायशेत मोठा खतनिर्मिती कारखाना |
माहिती तंत्रज्ञान | मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक |
सिमेंट | चंद्रपूर |
विमान | नाशिक (ओझर येथे मिग विमानाची निर्मिती होते) |
औषधे | रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अमरावती |
वाहननिर्मिती | मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर |
चित्रपट निर्मिती | मुंबई, पुणे, कोल्हापूर |
अभियांत्रिकी उद्योग | ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई उपनगर, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर |
संरक्षण साहित्य | खडकी पुणे, भद्रावती (चंद्रपूर), जवाहरनगर (भंडारा) |
महाराष्ट्रातील लघुउद्योग
शहर / गाव | लघुउद्योग |
नागपूर | रेशीम व सुती साड्या |
मालेगाव | हातमाग उद्योग |
सोलापूर | चादरी |
अहमदनगर | सुती व रेशीम साड्या |
भिवंडी (ठाणे) | हातमाग व यंत्रमाग उद्योग |
पैठण (औरंगाबाद) | पैठण्या व शालू |
येवले (नाशिक) | पितांबर व पैठणी |
औरंगाबाद | हिमरू शाली |
इचलकरंजी (कोल्हापुर) | साड्या व लुगडी |
साबळी व नागभीड (चंद्रपूर) | रेशमी कापड (कोशा रेशीम) |
बापेवाडा व गणेशपूर (भंडारा) | रेशमी कापड (कोशा रेशीम) |
जालना, संगमनेर, वैजापूर | वीडी |
कागजीपूरा (औरंगाबाद) | हातकागद |
मुंबई, मालवण | मासे हवाबंद डब्यात ठेवणे. |
रत्नागिरी, सिंधुदूर्ग | फळे हवाबंद डब्यात ठेवणे. |
कोकण, भंडारा | भात सडण्याच्या गिरण्या |
पुणे, नाशिक | भांडी बनविणे. |
सावंतवाडी(सिंधुदुर्ग) | लाकडी खेळणी |
महाराष्ट्रातील प्रमुख पिके
कृषी पिक | उत्पादक प्रदेश |
तांदूळ | रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे |
गहू | नाशिक, नागपूर, धुळे, औरंगाबाद |
ज्वारी | सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव, धुळे |
बाजरी | पुणे, अहमदनगर, सातारा |
ऊस | अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे |
तंबाखू | कोल्हापूर, सांगली, सातारा |
कापूस | धुळे, नंदूरबार, तुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती |
मिरची | |
हळद | सांगली आणि सातारा |
कांदा व लसुन | निफाड व लासलगाव (नाशिक), जुन्नर, चाकण, फुरसुंगी (पुणे) |
सीताफळ | औरंगाबाद |
फणस | सिंधुदूर्ग,रत्नागिरी, रायगड, ठाणे |
डाळींब | अहमदनगर, पुणे, सोलापूर |
कागदी लिंबू | अहमदनगर, पुणे, जळगाव |
काजू | रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर |
आंबे | रत्नागिरी, सिंधुदूर्ग |
द्राक्षे | सांगली, नाशिक, पुणे, अहमदनगर |
संत्री | नागपूर, अमरावती |
केळी | जळगाव, ठाणे |
लीची | ठाणे |
चिकू | पालघर |
1)पावसाळ्यात येणारी पिके (खरीप पिके)
बाजरी, तांदूळ, कापूस, उडीद, तूर, ज्वारी, सोयाबीन, भुईमुग, मुग, मटकी, घेवडा इ.
2)हिवाळ्यात येणारी पिके (रब्बी पीके)
गहू, हरभरा, ज्वारी, तीळ, करडई. ज्वारी हे पीक खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते.
3) बहूहंगामी पिके – मका, सुर्यफूल (कोणत्याही/सर्व हंगामात येतात.)
महाराष्ट्रातील तापमान
तापमान – महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे 16° उ. अ. ते 22° 3. अ. दरम्यान आहे. या दरम्यान तापमान वाढत जाते.
1) दैनिक कमाल तापमान
कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान 30° ते 33° से. च्या दरम्यान आढळते. मुंबईला 33° से. तापमान असते तर रत्नागिरीला 32° से. तापमान असते. सोलापूरला 41° से. पर्यंत तापमान वाढत जाते. नागपूर अमरावती भागात तर 42° से. ते 43° से. च्या आसपास तापमान असते. उन्हाळ्यात ऐन मोसमात खानदेश व विदर्भात तापमान 46° ते 48° सें. असते. कोकणात 41° से. पेक्षा जास्त तापमान वाढत नाही.
2) दैनिक किमान तापमान
उत्तर कोकणात दैनिक किमान तापमान 26° ते 31° से. तापमान असते. तर दक्षिण कोकणात 24° ते 27° से. दरम्यान असते. सोलापूर व पुणे दैनिक किमान तापमान अनुक्रमे 22° से. ते 25° से. असते. तर अमरावती व नागपूर भागात तापमान 28° से. असते.
3) दैनिक तापमान कक्षा
उन्हाळ्यामध्ये काही महत्वाच्या शहरांच्या दैनिक तापमान कक्षा पाहिल्या असता असे आढळते कि कोकणामध्ये दैनिक तापमान कक्षा 5° ते 6° से. दरम्यान असते तर मे महिन्याच्या अतिशय कडक ऊन असणाऱ्या दिवसाचे तापमान पाहिल्यास आपल्या लक्षात येते की, विदर्भात किती असह्य उन्हाळा असतो. नागपूरमध्ये दिवसाचे तापमान 48° से. पर्यंत वाढत जाते व रात्रीचे तापमान 19° से. असते.
महाराष्ट्रातील पर्जन्यमान
एप्रिल व मे मध्ये अधूनमधून वळवाचा पाऊस पडतो. काही वेळेस ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट होऊन वादळी वारे वाहतात. महाराष्ट्रात एप्रिल व मे महिन्यात जो पाऊस पडतो. याला भारतीय उपखंडातील हवामानाची परिस्थिती बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. कमी दाबाच्या प्रदेशाकडे दक्षिणेकडील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात.
हे वारे काही प्रमाणात समुद्रावरून वाहत येतात. ते एप्रिल महिन्यात महाराष्ट्राच्या काही भागातून वाहत जाऊन पाऊस देतात. या वेळेस आंब्यांचा बहर असतो म्हणून या पावसास आंबेसरी असे म्हणतात.
विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील नाशिकचा दक्षिण भाग, अहमदनगर, पुणे, साताऱ्यातील खंडाळा, फलटण, दहीवडी आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण 2.5 ते 5 सें.मी. आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्याचा सावंतवाडी वगळता संपूर्ण जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, संगमेश्वर, चिपळून, खेड तालुके, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, सातारा जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग, सांगली जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग याप्रमाणे गडचिरोलीच्या दक्षिण भागात उन्हाळ्यातील पावसाचे प्रमाण 5 ते 7.5 सें. मी आहे.
महाराष्ट्रात उन्हाळ्यात सर्वात जास्त पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज व चंदगड या भागात 10 सें.मी. ते 12.5 से. मी. दरम्यान पाऊस पडतो. तर महाराष्ट्रात सर्वाधिक वार्षिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे सुमारे 750 सें.मी. पडतो.
महाराष्ट्रातील खडक व खडकांचे प्रकार
खड़क | ठिकाण | उपयोग |
आर्कियन खडक | गोंदिया, भंडारा सिंधुदुर्ग, चंद्रपूर | यात लोह सापडते |
गोंडवन खडक | चंद्रपूर, यवतमाळ,अमरावती, नागपूर | या खडकात दगडी कोळसा सापडतो |
कडप्पा खडक | चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर | लोह व पोलाद कारखान्यात उपयोग |
विध्यायन खडक | चंद्रपूर | इमारती बांधकामासाठी |
जलजन्य खडक- गाळाचे खडक | महाराष्ट्रातील मोठ्या नद्यांच्या खोऱ्यात | इमारत बांधकाम सिमेट व विटा निर्मिती |
धारवाड खडक | सिंधुदुर्ग, चंद्रपूर भंडारा | मँगनीज सापडते |
ज्वालामुखी खडक | संपूर्ण पठारी भाग महाराष्ट्र पठार या खडकापासून बनले आहे | इमारत, रस्ते, धरणे, विहीरी आणि इतर बांधकामासाठी |
महाराष्ट्रातील प्रेक्षणीय शिल्पे व लेण्या
ठिकाण व जिल्हा | लेण्या |
औरंगाबाद | वेरुळ व अजिंठा बौद्ध लेण्या, हिंदु लेण्या व प्राचीन रंगीत चित्रे |
औरंगाबाद | पितळखोरा लेण्या, औरंगाबाद लेण्या |
औरंगाबाद | म्हैसमाळ, गलवाडा, कैलासलेणे (वेरुळ) |
नाशिक | जैन लेणी, चांभार लेणी, अंकाई लेणी |
नाशिक | पांडवलेणी, देवळाणे, त्र्यंबकेश्वर |
सातारा | बौद्ध लेणी, लोहारे |
परभणी | जिंतूर लेणी, बामणी |
पुणे | कान्हेरी लेणी, बौध्द लेणी, जेजुरी |
पुणे | भीमाशंकर, कार्ले भाट्ये, बेडसा |
रायगड | बौध्द लेणी, चामले, तळे |
रायगड | चोल लेण्या, गांधार लेण्या, घारापूरी |
लातुर | खरोसा लेणी |
उस्मानाबाद | धाराशिव |
ठाणे | अंबरनाथ, सोपारा |
कोल्हापूर | खिद्रापूर, कुंभोज |
मुंबई उपनगर | कान्हेरी लेण्या, जोगेश्वरी, महाकाली |
बीड | अंबेजोगाई |
अकोला | बार्शी-टाकळी |
यवतमाळ | दारव्हा |
जालना | भोकरदन लेण्या |
पालघर | आशेरी प्राचीन लेण्या |
जळगाव | पाटणादेवी |
महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संबोधने
- महाराष्ट्राची आर्थीक राजधानी – मुंबई
- महाराष्ट्राची सांस्कृतीक राजधानी – पुणे
- महाराष्ट्राची ऐतिहासीक राजधानी – कोल्हापुर
- महाराष्ट्राची आध्यात्मीक राजधानी – पंढरपूर
- महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी – पुणे
- महाराष्ट्राची पर्यटन राजधानी – औरंगाबाद
- मराठवाड्याची राजधानी – औरंगाबाद
- महाराष्ट्राचे विदयेचे माहेर घर – पुणे
- अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार – जळगाव
- मुंबईची परसबाग – नाशिक
- महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा – गोंदिया
- महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा – औरंगाबाद
- महाराष्ट्रातील सर्वाधिक वनांचा जिल्हा – गडचिरोली
- महाराष्ट्रातील सर्वाधिक रेल्वेचे जाळे असणारा जिल्हा – सोलापुर
- महाराष्ट्रातील सर्वाधिक आदीवासींचा जिल्हा – नंदुरबार
- महाराष्ट्रातील बावन्न दवाजांचे शहर – औरंगाबाद
- महाराष्ट्रातील दारुबंदीचा जिल्हा – चंद्रपुर
- महाराष्ट्रातील यादवांच्या काळातील भारताच्या राजधानीचा जिल्हा – औरंगाबाद
- महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा – कोल्हापुर
- महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा – बीड
- महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण असणारा जिल्हा – नाशिक
- महाराष्ट्रातील कुंभमेळ्याचा जिल्हा – नाशिक
महाराष्ट्र शासनाची विविध महामंडळे
महाराष्ट्र राज्यात सुरुवातीपासून वेगवेगळ्या विषयांसाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन केली गेली. या महामंडळांने राज्याच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्वाचे योगदान आहे.
1. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
स्थापना – 1960, मुख्यालय – मुंबई
याची मुळ सुरुवात 1948 ला बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन म्हणून झाली. 1960 ला त्याचे MSRTC त रुपांतर झाले. महाराष्ट्रात प्रवासी व पार्सल वाहतूक सेवा देते..
2. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (MSEB)
स्थापना – 1960, मुख्यालय – मुंबई
विद्युत निर्मिती व पुरवठा यासाठी कार्यरत होते. जून 2005 मध्ये या महामंडळाचे कामकाजाच्या सोईसाठी चार वीज कंपन्यात विभाजन केले गेले.
3. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (MSWC)
स्थापना – 1957, पुर्नरचना– 1962, मुख्यालय – पुणे
महाराष्ट्रात शेतमाल व इतर माल साठविण्यासाठी वखारी व गोदामे बांधते.
4. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
स्थापना – 1962, मुख्यालय – मुंबई
औद्योगिक वसाहती विकसित करते.
5.महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC)
स्थापना – 1962, मुख्यालय – मुंबई
घुउद्योगांच्या विकासासाठी कार्य करते. त्यांना कच्चा माल पुरविते. लघुउद्योग हे मराठी मासिक चालविते.
6. महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ/महावित्त (MSFC)
स्थापना – 1966, मुख्यालय – मुंबई
लघु व मध्यम उद्योगांना कर्जपुरवठा करते.
7. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ (MSKVIB)
स्थापना – 1962, मुख्यालय – मुंबई
राज्यातील खादी आणि ग्रामोदयोगांच्या विकासासाठी कार्य करते.
8. महाराष्ट्र राज्य कृषीउद्योग विकास महामंडळ मर्यादित (MAIDCL Ltd)
स्थापना – 1965, मुख्यालय – मुंबई
कृषी प्रक्रिया उद्योगांच्या व इतर कृषी उद्योगांच्या विकासासाठी कार्य करते.
9. महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूक महामंडळ मर्यादित (SICOM Ltd)
स्थापना – 1966, मुख्यालय – मुंबई
महाराष्ट्रात औद्योगिक गुंवणूक वाढविण्यासाठी कार्य करते.
10. महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ मर्यादित/महावस्त्र (MSTC Ltd)
स्थापना – 1966, मुख्यालय – मुंबई
वस्त्रोद्योग विकासासाठी कार्य करते.
11. मराठवाडा विकास महामंडळ (MVM)
स्थापना – 1967, मुख्यालय – औरंगाबाद
मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्नशील.
12. शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित (CIDCO Ltd)
स्थापना – 1970, मुख्यालय – मुंबई
शहर नियोजन, गृहनिर्माण, औद्योगिक विकास यासाठी कार्य करते.
13. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB)
स्थापना – 1970, मुख्यालय – मुंबई
प्रदूषण नियंत्रणासाठी कार्य करते.
14. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित (MSHC Ltd)
स्थापना – 1971, मुख्यालय – नागपूर
हातमाग उदयोगाच्या विकासासाठी कार्य करते.
15. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित (MSCTDC Lid)
स्थापना – 1972, मुख्यालय – नाशिक
आदिवासींच्या लघु व कुटीरउद्योगांना प्रोत्साहन देते, मदत, मार्गदर्शन करते.
16. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ मर्यादित (MSMC Ltd).
स्थापना – 1973, मुख्यालय – नागपूर
महाराष्ट्रात खाणींचा विकास करणे व खनिजोत्पादन वाढविण्यासाठी कार्य करते.
17. महाराष्ट्र चर्मोद्योग विकास महामंडळ (LIDCOM)
स्थापना – 1974, मुख्यालय – मुंबई
चर्मोद्योगांच्या विकासासाठी प्रयत्नशील.
18. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित (MSPHC Ltd)
स्थापना – 1974, मुख्यालय – मुंबई
राज्यातील पोलीस कर्मचान्यांना गृहबांधणीस सहाय्य व त्यांच्या कल्याणासाठी मदत करते.
19. महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित (FDCM Lid)
स्थापना – 1974, मुख्यालय – नागपूर
महाराष्ट्रात वनविकासासाठी कार्य करते.
20. महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळ/माविम (MWEDC)
स्थापना – 1975, मुख्यालय – मुंबई
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी कार्य करते.
21. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC)
स्थापना – 1975, मुख्यालय – मुंबई
महाराष्ट्रात पर्यटन सुविधा देते. पर्यटन विकासासाठी कार्य करते.
22. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ/महाबीज (MSSC Ltd)
स्थापना – 1976, मुख्यालय – अकोला
दर्जेदार शेती बियाणे रास्त भावात शेतकऱ्यांना पुरविते.
23. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA)
स्थापना – 1976, कार्य सुरु– 1977, मुख्यालय – मुंबई
महाराष्ट्रात गृहबांधणी करते. गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करते.
24. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक महामंडळ (MELTRON)
स्थापना – 1978, मुख्यालय – मुंबई
महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक उद्योगांच्या वाढीसाठी कार्य करते.
25. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित (MPBCDC) Ltd)
स्थापना – 1978, मुख्यालय – मुंबई
मागासवर्गीयांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करणे
26. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी आणि शेळी विकास महामंडळ
स्थापना – 1978, कार्य सुरु – 1979, मुख्यालय – पुणे
शेळी, मेंढी यांच्या प्रजातींचा विकास व त्यांच्या पालनासाठी गरजू पशुपालकांना मदत करते. त्यासाठी विविध योजना राबविते.
27. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED)
स्थापना – 1985 , मुख्यालय – औरंगाबाद
उदयोजक घडविण्यासाठी कार्य करते. उदयोजक हे मराठी मासिक चालविते
28. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित
स्थापना – 1985, मुख्यालय – मुंबई
राज्यातील दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मदत व अर्थसहाय्य करते.
29. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित (MSRDC Ltd)
स्थापना – 1996, मुख्यालय – मुंबई
महाराष्ट्रातील रस्ते, पुल बांधणी व विकास यासाठी कार्य करते.
30. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ
स्थापना – 1996, मुख्यालय – पुणे
कृष्णा खोऱ्यातील पाटबंधारे, धरणे यांचे बांधकाम व विकास यासाठी कार्य करते.
31 विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
स्थापना – 1997, मुख्यालय – नागपूर
विदर्भातील पाटबंधारे, धरणे यांचे बांधकाम व विकास यासाठी कार्य करते.
32. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
स्थापना – 1997, मुख्यालय – ठाणे
कोकणातील पाटबंधारे, धरणे यांचे बांधकाम व विकास यासाठी कार्य करते.
33. तापी पाटबंधारे विकास महामंडळ
स्थापना – 1997, मुख्यालय – जळगांव
खानदेश (धुळे, नंदूरबार, जळगांव) मधील पाटबंधारे, धरणे यांचे बांधकाम व विकास यासाठी कार्यरत.
34. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ
स्थापना – 1998, मुख्यालय – औरंगाबाद
मराठवाड्यातील पाटबंधारे, धरणे यांचे बांधकाम व विकास यासाठी कार्यरत.
35. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP)
स्थापना – 1997, मुख्यालय – मुंबई
जलशुध्दीकरण, पाणीपुरवठा व मलनिस्सारण यासाठी कार्य करते.
36. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
स्थापना – 1998, मुख्यालय – मुंबई
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व ज्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही अशा मराठा व बाकी तरुणांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबविते.
37. मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित
स्थापना – 2000, मुख्यालय – मुंबई
अल्पसंख्यांकाच्या आर्थिक विकासासाठी, स्वयंरोजगार योजना राबविते.
38. महाराष्ट्र कृषी आणि फळ प्रक्रिया महामंडळ मर्यादित (MAFCO Ltd)
स्थापना – 2004, मुख्यालय – मुंबई
कृषीप्रक्रिया, फळप्रक्रिया उद्योग चालवत असे. 31 जुलै 2017 पासून बंद केले गेले. त्यास पुन्हा सुरु करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे.
महाराष्ट्रातील सर्वात उंच, जास्त, प्रथम, लहान, मोठे इत्यादी
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
- महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर – मुंबई शहर
- महाराष्ट्रातील प्रशासनातील सर्वोच्च पद – मुख्य सचिव
- महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर – कळसुबाई
- महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना – प्रवरानगर (लोणी)
- महाराष्ट्रातील राष्ट्रपतीपदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट – श्यामची आई
- महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा – वर्धा
- महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग
- महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र – आर्वी (पुणे)
- महाराष्ट्रातील पहिले अणुविदयुत केंद्र – तारापुर (पालघर)
- महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र – खोपोली (रायगड)
- महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य – कर्नाळा (रायगड)
- महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा – पुणे (1848)
- महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी – मुंबई
- महाराष्ट्रातील पहिले मराठी दैनिक – ज्ञानप्रकाश
- महाराष्ट्रातील पहिले साप्ताहीक – दर्पण
- महाराष्ट्रातील पहिले मासीक – दिग्दर्शन
- महाराष्ट्रातील पहिला लोहपोलाद प्रकल्प – चंद्रपूर
- महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र – मुंबई (1927)
- महाराष्ट्रातील पहिले दुरदर्शन केंद्र – मुंबई (1972)
- महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा – सोलापूर
- महाराष्ट्रातील पहिली महानगरपालीका – मुंबई
- महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह – शण्मुखानंद हॉल, मुंबई
- महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपालकचेरी – मुंबई
- महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपटटीचा जिल्हा – रत्नागिरी
- महाराष्ट्रातील सर्वाधिक आदीवासी लोकसंख्येचा जिल्हा – नंदुरबार
- महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा – गडचिरोली
- महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी – गोदावरी
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा – सोलापूर
- महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान रेल्वे – इंद्रायनी एक्सप्रेस
- महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे – महाराष्ट्र एक्सप्रेस
- महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण – आंबोली (सिंधुदुर्ग)
- महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचा जिल्हा – चंद्रपूर
- महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाचे प्रमाण असलेला जिल्हा – लातूर
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण
- महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल – श्री. प्रकाश
- महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण – गंगापूर (नाशिक)
- महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर – आनंदीबाई जोशी
- महाराष्ट्रातील अखिल भारतीय साहित्य संमेलनाची पहिली महिला अध्यक्षा – कुसुमावती देशपांडे
- भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय – धोंडो केशव कर्वे
- ज्ञानपीठ मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय – वि. स. खांडेकर
- म. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले – विनोबा भावे
- महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प – जामसांडे देवगड
- महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकीत हॉटेल – ताजमहल (मुंबई)
- महाराष्ट्रातील पहिले रँग्लर – र. पु. परांजपे
- महाराष्ट्रातून एव्हरेस्ट सर करणारा पहिला – सुरेंद्र चव्हाण
- महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षीका – सावित्रीबाई फुले
- महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा – सातारा
- महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ – राहुरी, अहमदनगर
- महाराष्ट्रातून परदेशातुन डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महिला – आनंदीबाई जोशी
- महाराष्ट्रातून एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुन महिला – कृष्णा पाटील
- महाराष्ट्रातून साहित्य अकादमी पुरस्कार मिळविणारी महिला – इंदिरा संत
- महाराष्ट्रातून दादासाहेब फाळके पुरस्कार मिळविणारी पहिली महिला – दुर्गा खोटे (1983)
- महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला – लता मंगेशकर
- महाराष्ट्र शासनाचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार मिळविणारी महिला – नाणिक वर्मा
- महाराष्ट्रातील उत्तर ध्रुवावर पॅराशुट जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला – शितल महाजन
- महाराष्ट्रातील पहिले ऊस संशोधन केंद्र – मांजरी (पुणे)
- महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग
- महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा – औरंगाबाद
- महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव – कापडगाव (रत्नागिरी)
- महाराष्ट्रातील पहिले हॉर्टीकल्चर केंद्र – तळेगाव दाभाडे
- महाराष्ट्राची पर्यटन राजधानी – औरंगाबाद
- महाराष्ट्रातून पहिला समुद्राच्या लाटापासुन वीज प्रकल्प – घारापुरी बेट रत्नागिरी
- महाराष्ट्रातून पहिले पाण्याचे खाजगीकरण करणारे शहर – चंद्रपूर
- महाराष्ट्रातून पहिली संपुर्ण महिला ग्रामपंचायत – घाटाव (रायगड)
- माहितीच्या अधिकाराच्या अर्जाची ऑनलाईन व्यवस्था करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण – जायकवाडी
- महाराष्ट्रातील ग्रामसभेने बरखास्त केलेली पहिली ग्रामपंचायत – देवगाव (अकोला)
- आय.एस.ओ. पुरस्कार मिळविणारे पहिले तहसील कार्यालय – कनकवली
- भारताच्या जी.डी.पी. मध्ये सर्वाधिक हिस्सा असलेले राज्य – महाराष्ट्र
- महिला उद्योजिकांसाठी विशेष/स्वतंत्र धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र
- क्रीडा धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र
- देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे राज्य – महाराष्ट्र
- देशातील सर्वाधिक औद्योगीकरण झालेले राज्य – महाराष्ट्र
- बालकासाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र
- मानव विकास मिशन स्थापन करणारे देशातील पहिले राज्य व मुख्यालय – महाराष्ट्र, औरंगाबाद
- महाराष्ट्रातील पहिली आय.एस.ओ. अंगणवाडी – अब्दीमंडी औरंगाबाद
- शुन्याधारीत अर्थसंकल्प धोरण राबविणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र (दुसरे राज्य आंध्रप्रदेश)
- आदीवासीसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरु करणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र
- प्रदुषण नियंत्रणाचा कायदा करणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र
- भारतातील पहिले जैवतंत्रज्ञान धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र
- गर्भजल परीक्षणावर बंदी घालणारे पहिले राज्य – महारष्ट्र
- फळबाग योजना राबविणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र
- महाराष्ट्र पोलीस दलातून एव्हरेस्ट सर करणारा पहिला – रफीक शेख,औरंगाबाद
- मराठीतील पहिला बोलपट – अयोध्येचा राजा
- पहिला मुकपट – राजा हरिश्चंद्र
- राज्य फुलपाखरु जाहीर करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र
- लोकायुक्त व उपलोकायुक्त यांची कायद्याद्वारे नेमणूक करणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र
- सहकार क्षेत्रात देशातील अग्रेसर राज्य – महाराष्ट्र
- फायनान्शियल टेक्नॉलॉजी धोरण (फिनटेक) जाहीर करणारे देशातील पहिले राज्य – महाराष्ट्र
महाराष्ट्रातील प्रमुख स्थळे/शहरे व त्यांची प्रसिध्दी
1.आंबोली – महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हयात सावंतवाडी तालुक्यात थंड हवेचे ठिकाण. समुद्रसपाटीपासून उंची 1023 मीटर आहे.
2. रत्नागिरी – महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्हयाचे मुख्य ठिकाण, रत्नागिरी हेच लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान.
3. गणपतीपुळे – येथील गणपती मंदिर प्रसिध्द आहे. रत्नागिरीपासून 27 20 कि.मी. अंतरावर रत्नागिरी तालुक्यात मोडते.
4. भाट्ये – येथे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत नारळ संशोधन केंद्र आहे..
5. अलिबाग – कान्होजी आंग्रे यांचे स्मारक अलिबाग येथे आहे.
6. महाड – 20 मार्च, 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून इतिहासात प्रसिध्द आहे.
7. मुंबई – महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी आहे. गेट वे ऑफ इंडिया भारताचे हे प्रवेशद्वार 1911 मध्ये राजा पाचवा जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव बांधण्यात आले. येथे सहारा व सांताक्रुझ विमानतळ आहे. मणीभवन किंवा गांधी मेमोरियल हे ठिकाण गांधीजीच्या वास्तवाने पुनीत झाले आहे.
8. ठाणे – ठाणे जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. सर्वाधिक मनपा असणारा महाराष्ट्रातील जिल्हा.
9. वसई – वसईची केळी व खायच्या विड्यांची पाने प्रसिध्द आहेत.
10. नाशिक – गोदावरीकाठी वसलेले हे शहर एक तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो, काळाराम मंदिर येथेच आहे.
11. येवले – येथील शालू, पैठण्या व पीतांबरे प्रसिध्द आहे. 1857 च्या उठावातील एक सेनानी तात्या टोपे यांचे जन्मगाव आहे.
12. भगूर – नाशिक जिल्हयातील हे गाव स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान म्हणून प्रसिध्द आहे.
13. धुळे – पांझरा नदीकाठी वसलेले शहर आहे.
14. नंदुरबार – बालक्रांतीकारक शिरीषकुमारचे स्मारक आहे.
15. प्रकाशे – खानदेशची काशी म्हणून ओळखतात.
16. तोरणमाळ – प्राचीन मांडू घराण्याच्या राजधानीचे ठिकाण म्हणून ओळखतात.
17. जळगाव – या शहरास अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते.
18. अमळनेर – सखाराम महाराजांची समाधी आहे. साने गुरुजींनी काही काळ येथे शिक्षणप्रसार व समाजसेवेचे कार्य केले. ही त्यांची कर्मभूमी.
19. फैजपूर – जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आहे. येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन 1936 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
20. अकोले जि. अहमदनगर – प्रवरा नदीकाठी वसलेले आहे.
21. प्रवरानगर – देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला आहे.
22. नेवासे (अहमदनगर) – येथेच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली.
23. शनि शिंगणापूर (अहमदनगर) – शनिमंदिर प्रसिध्द आहे.
24. राहुरी (अहमदनगर) – मुळा नदीकाठी वसलेले शहर आहे.
25. राळेगण सिद्धी (अहमदनगर) – हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आहे. थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव आहे. संपूर्ण व्यसनमुक्त असलेले हे गाव आहे.
26. पारनेर (अहमदनगर) – सेनापती बापटांची जन्मभूमी आहे.
27. पुणतांबे (अहमदनगर) – अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव कोपरगाव तालुक्यात गोदावरीकाठी वसले आहे. येथे चांगदेवाची समाधी आहे.
28. शिर्डी – साई मंदिर, देशभरातून सर्वधर्मीय लाखो भक्तगण येथे श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी येतात.
29. पुणे – मुळा-मुठेच्या संगमावर वसलेले शहर आहे. पेशव्यांची राजधानी होती. पुण्यानजीक भोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था (NARI) आहे.
30. भीमाशंकर – येथूनच भीमा नदीचा उगम होतो. येथील महादेवाचे देवस्थान बारा ज्योर्तिलिंगापैकी एक मानले जाते.
31. आळंदी – इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली.
32. देहू – संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आहे. येथून पाच कि.मी. अंतरावर भंडारा डोंगर आहे. तेथे एकांतात तुकाराम महाराज चिंतन करीत.
33. राजगुरुनगर – हुतात्मा राजगुरुचे जन्मस्थान आहे.
34. सासवड – येथे सोपानदेवाची समाधी आहे.
35. जेजूरी – येथील गडावर महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाचे देवस्थान आहे.
36. भाटघर – नीरेची उपनदी वेळवंडीवर बांधलेले लॉईड धरण येथे आहे. या धरणाच्या जलाशयाचे नाव ‘येसाजी कंक’ आहे.
37. आर्वी – विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.
38. सातारा – महाराणी ताराबाईच्या कारकिर्दीत राजधानी होती.
39. महाबळेश्वर – थंड हवेचे ठिकाण या परिसरातूनच कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचा उगम होतो.
40. पाचगणी – थंड हवेचे ठिकाण आहे. निवासी शाळा, रेशीम संशोधन केंद्र आहे.
41. वाई – कृष्णा नदीकाठी वसले आहे
42. शिंगणापूर – शंभू-महादेव हे जागृत देवस्थान आहे.
43. कऱ्हाड – येथे यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. येथे कोयना व कृष्णा यांचा प्रीतिसंगम होतो.
44. औंध – पूर्वीच्या औंध संस्थानाची राजधानी आहे.
45. प्रतापगड – 1656 मध्ये शिवरायांनी या गडाची उभारणी केली. महाराजांनी याच गडावर अफझलखानाचा वध केला.
46. सांगली – हे शहर कृष्णा नदीच्या काठी वसले आहे.
47. देवराष्ट्रे – स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी आहे.
48. सोलापूर – येथील चादरी विशेष प्रसिध्द आहेत.
49. पंढरपूर – महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा पंढरपुरात भरते. भीमा नदीकाठी वसलेले शहर आहे. देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
50. आष्टी – इंग्रज व मराठे यांच्यातील शेवटची लढाई 1818 मध्ये येथे घडून आली.
51. मंगळवेढे – चोखामेळा, दामाजीपंत व कान्होपात्रा या संताची पावनभुमी आहे.
52. कोल्हापूर – पंचगंगेकाठी वसलेले हे शहर आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे. महालक्ष्मी मंदिर, कुस्तीगिरांची पंढरी म्हणून प्रसिध्द आहे.
53 औरंगाबाद – 52 दरवाजांचे शहर, बीबीका मकबरा म्हणून प्रसिध्द आहे. जल व भूमी व्यवस्थापन (WALMI) संस्था आहे. खाम नदीकाठी वसलेले शहर आहे.
54. दौलताबाद (औरंगाबाद) – यादवांची राजधानी होती. महंमद तुघलकने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीस आणली होती.
55. खुलताबाद (औरंगाबाद) – मोगलसम्राट औरंगजेबाची कबर आहे.
56. म्हैसमाळ (औरंगाबाद) – थंड हवेचे ठिकाण आहे.
57. वेरुळ (औरंगाबाद) – वेरुळची लेणी प्रसिध्द आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वर मंदिर येथेच आहे.
58.अजिंठा (औरंगाबाद) – अजिठ्यांची जगप्रसिद्ध लेणीसमूह आहे.
59. पैठण (औरंगाबाद) – गोदावरीकाठी हे प्राचीन शहर वसले आहे. एकेकाळी सातवाहनांच्या राजधानीचे ठिकाण आहे.
60. आपेगाव (औरंगाबाद) – संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे.
61. पितळखोरा (औरंगाबाद) – ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन लेणी गणली जाते.
62. जालना – हे शहर कुंडलिका नदीकाठी वसले आहे.
63. परभणी – हजरत सय्यद शाह तुराबुलहक यांचा दर्गा आहे.
64. गंगाखेड – संत जनाबाईंची समाधी आहे. हे शहर गोदावरी नदीकाठी वसले आहे.
65. हिंगोली – हे शहर कयाधू नदीच्या काठी वसले आहे.
66. औंढा – हे स्थान देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग आहे.
67. नरसी – कयाधू नदीच्या काठी वसले आहे. संत नामदेवाचे जन्मस्थान मानले जाते.
68. बीड – बिंदुसरा नदीकाठी वसले आहे.
69. आंबेजोगाई – आद्यकवी मुकुंदराज व संतकवी दासोपंत यांच्या समाधी आहेत.
70. राक्षसभुवन – गोदावरीकाठी वसले आहे.
71. नांदेड – हे शहर गोदावरी नदीकाठी वसले आहे. शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंहजी यांची समाधी आहे.
72. उस्मानाबाद – या शहराचे नाव पूर्वी धाराशीव होते. हे शहर भोगावती नदीच्या काठी वसले आहे.
73. तुळजापूर – येथील तुळजाभवानी महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे.
74. तेरणा – तेर नदीकाठी वसले आहे. संत गोरोबा कुंभार यांची समाधी.
75. लातूर – शिक्षणक्षेत्रात लातूर पॅटर्न ने अभूतपूर्व क्रांती घडविली.
76. खामगाव – वाघरा नदीकाठी वसले आहे
77. देऊळगाव – बालाजी मंदिर प्रसिध्द आहे.
78. शेगाव – येथे गजानन महाराजांची समाधी आहे.
79. सिंदखेड – राजा – छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान आहे. राजे लखुजी यांचा वाडा. जिजाऊसृष्टी येथेच आहे.
80. अकोला – हे शहर मोर्णा नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे.
81. अमरावती – संत गाडगे महाराजांची समाधी आहे.
82. मोझरी – येथे संत तुकडोजी महारा समाधी आहे.
83. कौडिण्यपूर – प्राचीन अवेशषांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.
84. यवतमाळ – 1932 मध्ये स्थापन झालेली प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था येथे आहे.
85. वणी – निरगुडा नदीकाठी वसले आहे.
86. घाटंजी – वाघाडी नदीकाठी वसले आहे.
87. पुसद – पूस नदीकाठी वसले आहे.
88. आर्णी – अरुणावती नदीकाठी वसले आहे.
89. वर्धा – पालकवाडी नावाच्या लहान वस्तीचा नियोजनबध्द विकास होऊन आजचे वर्धा शहर अस्तित्वात आले आहे. महात्मा गांधीनी 1934 मध्ये आपल्या कार्यासाठी या शहराची निवड केली. सेवाग्राम महात्माजींचा तर पवनार विनोबाजींचा आश्रम आहे.
90. नागपूर – नाग नदीकाठी वसलेले शहर राज्याच्या उपराजधानीचे ठिकाण आहे.
91. आमगाव – प्रसिद्ध संस्कृत नाटककार भवभूती यांचे स्मारक आहे.
92. चंद्रपूर – वर्धेची उपनदी इरई नदीकाठी वसलेले शहर आहे.
93. बल्लारपूर – वर्धा नदीकाठी वसले आहे.
94. वरोडा – बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प येथे आहे.
95. हेमलकसा – अपंग व कुष्ठरोगी यांच्या उपचार व पुनर्वसनासाठी बाबा आमटे यांनी हेमलकसा नागेपल्ली हा प्रकल्प सुरु केला आहे.
Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History
इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा