राजर्षी शाहु महाराज – Rajarshi Shahu Maharaj

राजर्षी-शाहु-महाराज-Rajarshi-Shahu-Maharaj

राजर्षी शाहु महाराज – Rajarshi Shahu Maharaj Information in Marathi

जन्म – 26 जुन 1874 ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला.  त्यांच्या आईचे नाव – राधाबाई होते.  वडिलांचे (जनकपिता) नाव – जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे. शाहू महाराजांचे मुळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे.  कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब यांना पुत्र नसल्यामुळे त्यांनी यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले.

त्यांचा दत्तक विधान समारंभ 17 मार्च 1884 रोजी होवून त्यांचे नामकरण शाहु असे झाले. पोलीटीकल एजंट कर्नल रिव्हज व मुंबई प्रांताचे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन यांनी शाहूंच्या दत्तक विधानास मंजुरी दिली.  शाहू महाराजांचे प्राथमिक शिक्षण – 1885 ते 1889 दरम्यान राजकोट येथे राजकुमार कॉलेज मध्ये झाले. सर एस. एम. फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली 1890 ते 1894 या काळात धारवाड येथे शिक्षण घेतले.

 • 1891 ला लक्ष्मीबाईंशी विवाह झाला.
 • त्यांनी राज्यकारभाराची सुत्रे 2 एप्रिल 1894 रोजी हातात घेतली.
 • 1895 मध्ये शाहपुरी गुळाची बाजारपेठ स्थापन केली.
 • 1896 मध्ये पहिले वस्तीगृह सर्व जाती जमातीसाठी सुरु केले.

1899 मध्ये शाहू महाराज आपली पुजा-अर्चा करीत असतानात्यांचा पुरोहित नारायण भटजी वेदोक्त मंत्राऐवजी पुराणेक्त मंत्र म्हणत असल्याचे शाहूंच्या लक्षात आले. महाराजांनी खुलासा विचारल्यानंतर पुरोहिताने सांगितले क्षत्रियांसाठी वैदिक मंत्र व शूद्रांसाठी पुराणोक्त मंत्र आहेत,आपण क्षत्रिय नाहीत म्हणून आपल्यासाठी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे सांगितले. (वेदोक्त प्रकरण 1899)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History

 • 1901 मध्ये गोवध प्रतिबंध कायदा पारीत केला.
 • 1901 मध्ये मराठा मुलांसाठी वस्तीगृह स्थापन केले.
 • 1902 मध्ये मागासवर्गीयांना 50 टक्के आरक्षणाचा कायदा पारीत केला. याच वर्षी केंब्रीज विद्यापिठाने त्यांना L.L.D. पदवी दिली
 • 1906 मध्ये मुस्लीम बोर्डींग स्कुलची व शाहू मिलची स्थापना.
 • 1907 मध्ये भोगावती नदीवर राधानगरी धरण उभारले. 1908 मध्ये लक्ष्मीबाई तलाव बांधला.
 • 1911 मध्ये कोल्हापूर येथे भास्करराव जाधवांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करुन तिस शिवाजी सत्यशोधक समाज असे नाव दिले. उपाध्यक्ष – अण्णासाहेब लठ्ठे, कार्यवाहक – हरिभाऊ चव्हाण
 • 1912 मध्ये प्राथमिक शिक्षक मोफत व सक्तीचे केले.
 • 1912 कोल्हापूर सहकारी कायदा केला.
 • 1912 ला पाटील स्कुलचा आदेश काढला.
 • 1913 पासून पाटील स्कुल सुरु केल्या.
 • 1913 मध्ये कोल्हापूरात सत्यशोधक समाज शाळा स्थापन करून विसोजी डोणे यांच्याकडे सोपविली. 1913 ला गावात एकतरी शाळा असावी असा आदेश केला.
 • 1913 मध्ये प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा सुरु केल्या.
 • 1916 मध्ये डेक्कन रयत शिक्षण संस्था निपाणी येथे स्थापन केली.
 • 1917 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पारीत केला.
 • 1917 ला फि माफीची घोषणा केली.
 • 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन केली. व डी. टी. मालक यांना आर्य समाजाचे व्यवस्थापक म्हणून नेमले.
 • 1918 मध्ये आंतरजातीय विवाह कायदा पारीत केला.
 • 1918 मध्ये तलाठी शाळा सुरु केल्या व कुलकर्णी वतने बंद केली.
 • 1918 मध्ये शिक्षक पदासाठी परीक्षा पध्दत सुरु केली.
 • 1918 मध्ये शिवाजी स्कुल स्थापन केले.
 • 1918 मध्ये अस्पृश्यता प्रतिबंधक कायदा केला.
 • 1918 मध्ये वेठबिगारी बंदीचा कायदा केला.
 • 1918 ला बलुतेदारी पध्दत कायदयाने बंद केली.
 • 1918 ला महार वतने बंद केली.
 • 1918 ला शिक्षणविषयक कराचा कायदा केला.
 • 1918 ला गुन्हेगारी जमातींच्या हजेरीचा कायदा रद्द केला.
 • 1919 शाळेत अस्पृश्यता पाळण्यास बंदीचा हुकूम केला.
 • 1919 मध्ये स्त्री अत्याचाराविरोधी स्त्रियांना क्रूरपणे वागवण्यास बंदीचा कायदा पारीत केला.
 • 1919 ला कुर्मी अधिवेशनामध्ये त्यांना राजर्षी ही पदवी देण्यात आली.
 • 1920 मध्ये घटस्फोट विषयक कायदा केला.
 • 1920 मध्ये शिवाजी वैदिक विद्यालय/पाठशाळा सुरु केली.
 • 1920 ला देवदासी प्रथा कायदयाने बंद केली.

महात्मा फुले यांच्या निधनानंतर ब्राम्हणेत्तर चळवळीचे नेतृत्व राजर्षी शाहू महाराजांनी केले. लोकमान्य टिळकांनी शाहू महाराजांच्या ब्राम्हणेत्तर चळवळीला विरोध केला होता. त्यांनी गंगाधर कांबळे या दलित तरुणास चहाचे सत्यसुधारक हॉटेल टाकून दिले. तेथे शाहू महाराज स्वतः चहा पित असत. शाहू महाराजांनी क्षात्रजगत्गुरूंचे नवे पीठ निर्माण केले व या पीठावर सदाशिवराव लक्ष्मण बेनाडीकर पाटील या मराठा जातीच्या व्यक्तीची निवड केली.

राजर्षी शाहु महाराज – Rajarshi Shahu Maharaj

 • 1897 मध्ये दुष्काळ निवारणाची कार्ये केलीत महारोग्यासाठी उचगाव येथे आश्रम सुरु केला. त्यास राणी व्हिक्टोरिया आश्रम नाव दिले.
 • 1920 च्या माणगाव अस्पृश्य परिषदेत भाषण केले. अस्पृश्य समाजाला डॉ. आंबेडकरांच्या रुपाने मोठा नेता मिळाला असे याच परिषदेत सांगितले.
 • 20 व 21 मार्च 1920 च्या माणगाव परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून शाहू महाराज हजर होते.
 • 1920 च्या हुबळी-कर्नाटक येथील ब्राम्हणेतर समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
 • 1921 ला शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला.
 • 1920 च्या हुबळी-कर्नाटक येथील ब्राम्हणेतर समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
 • 1921 ला शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला.
 • 1922 च्या दिल्ली येथील अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

संस्थानाच्या शिक्षणाधिकारी मिस लिटल यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीमती रखमाबाई केळवकर यांची त्या पदावर नियुक्ती केली. कृष्णाबाई केळवकर या हुशार विदयार्थीनीला ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठविले.  शंकर बाजी ढवळे यांना ICS साठी इंग्लडला जाण्यासाठी आर्थिक मदत केली. लष्करी शिक्षणासाठी इंन्फ्रटी स्कूलची स्थापना केली. जयसिंगराव घाटगे टेक्नीकल इन्स्टिट्युटची स्थापना करून तरुणांना तांत्रिक शिक्षण उपलब्ध करुन दिले.

नाशिकचे उदोजी वस्तीगृह, कोल्हापूरचे मराठा वस्तीगृह, सांगलीचे विलिंग्डन महाविदयालय, बनारस हिंदू युनिव्हरसिटी या संस्थांना शाहूंनी आर्थिक मदत केली. 1920 मध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली. कोल्हापूर संस्थानात सरकारी महसुलाच्या 6% खर्च शिक्षणावर होत असे. पुण्याला श्री शिवाजी प्रिपेटरी मिलीटरी स्कूल-ही सैनिकशाळा काढली.  जपानमधील सामुराई समाजाबद्दल शाहूंना आस्था होती.

राजर्षी शाहु महाराज – Rajarshi Shahu Maharaj

शाहूंनी अस्पृश्यांना तलाठी म्हणून नेमले. शाहूंनी अस्पृश्यांना वकिलीच्या सनदा दिल्यात.  लोकराजा राजर्षी शाहू या दूरदर्शन मालिकेचे निर्माते व्ही. बी. पाटील, दिग्दर्शक सतीश रणदिवे, शाहूंची भूमिका राहुल सोलापूरकर व डॉ. आंबेडकरांची भूमिका शैलेश दातार यांनी साकारली. शाहूंनी अस्पृश्यांसोबत सहभोजने आयोजित केली.

प्रबोधनकार केशवराव सिताराम ठाकरे हे सत्यशोधक समाजाचे भिष्माचार्य होते. कोल्हापूरला करमणुकीच्या कार्यक्रमासाठी देवल क्लबची स्थापना केली. मोतीबाग व खासबाग येथे तालीम बांधली. ए. लॉरेन्स हे ख्रिश्चन पैलवान शाहु महाराजांचे अंगरक्षक होते.  कुस्ती हा शाहु महाराजांचा आवडता खेळ होता.  मल्लांना गदा देण्याची प्रथा शाहूंनी सुरु केली.

अण्णाजी धुंडीराज मुरतले उर्फ कवी महाराजांच्या दरबारी होते. त्यांना कवी मौत्तीक ही पदवी दिली. या कवींनी गीतावली, भावनीनाद, शोकतरंगीनी, मौत्तीकमाला इ. काव्ये लिहिली.

छ. शाहू महाराज यांच्यासारखा सखा अस्पृश्यांना पुर्वी लाभला नव्हता व पुढेही लाभेल की नाही याबाबत शंका आहे. – डॉ. आंबेडकर

He was King. but democratic king भाई माधवराव बागल

शाहूंचे राज्य लोककल्याणकारी होते. शाहू हे सर्वांगपुर्ण राष्ट्रपुरुष होत – म.वि. रा. शिंदे.

फासेपारध्यांना माणसासारखे जगू दयावे असे शाहू महाराज म्हणत.

शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केलेली वृत्तपत्रे : श्रीपतराव शिंदे यांचे विजयी मराठा (ब्राम्हणेतरांचा केसरी), डॉ. आंबेडकर यांचे मुकनायक, वालचंद कोठारी यांचे जागरुक व डेक्कन रयत, शामराव भोसले यांचे राष्ट्रवीर, अच्युत कोल्हाटकर यांचे संदेश, दत्तात्रय रणदिवे यांचे संजीवन, किर्तीवान निंबाळकरांचे शिवछत्रपती, भगवंतराव पाळेकर यांचे जागृती, मुकुंदराव पाटील यांचे दिनमित्र, दिनकरराव जवळकरांचे तरुण मराठा, कैवारी व तेज, खंडेराव बागल यांचे हंटर, केशवराव ठाकरे यांचे प्रबोधन, आगरकरांचे सुधारक इ.

शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती झाली नाही असे इतिहास सांगतो. म्हणून हिंदुस्थानला सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे – शाहू महाराज

शाहू महाराजांनी आपले राजचिन्ह म्हणून गंगावतरण घेतले होते.  राजर्षी शाहू महाराजांचे अनुयायी प्रबोधनकार केशवराव ठाकरे, भास्करराव जाधव, केशव विचारे, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील इ. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा व थिऑसॉफिकल सोसायटीचा छ. शाहू महाराजांवर विशेष प्रभाव होता.

राजर्षी शाहु महाराज – Rajarshi Shahu Maharaj

माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली असती तरी तिच्या हाती राज्य काराभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती. छ. शाहू महाराज 26 जून हा यांचा जन्मदीन महाराष्ट्रात सामाजीक न्यायदिन म्हणून साजरा करतात.

त्यांना भारतीय आरक्षणाचे जनक आणि भारतीय वस्तीगृहाचे जनक असे म्हणतात. 6 मे 1922 ला शाहु महाराजांचा मुंबई येथे मृत्यू झाला.


Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)


छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  

Leave a Comment