महात्मा फुले
- जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.
- ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून ज्योतिबा नाव ठेवले.
- फुलेंच्या आईचे नाव चिमणाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते.
- त्यांचे मुळ आडनाव गोऱ्हे होते. पण त्यांच्या आजोबांच्या फुलांच्या व्यापारावरुन फुले हे आडनाव पडले. त्यांनी फुलांचा व्यापार केल्याने त्यांना फुले असे म्हणतात.
- ते एक वर्षाचे असताना त्यांच्या आई चिमणाबाई यांचे निधन झाले.
- म. फुले यांच्या पूर्वजांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण होय.
- म. फुले यांचा विवाह खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्री यांच्याशी झाला.
- शेजारी गफार बेग मुन्शी यांनी फुलेंना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. 1841 ते 1847 स्कॉटिश मिशन शाळा पुणे येथे शिक्षण घेतले.
- 1840 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला.
- महात्मा फुले यांनी समाजकार्य करताना स्त्री शिक्षण व समता या तत्वांना प्राधान्य दिले.
- म. फुलेंनी लहुजी साळवे यांच्याकडून कुस्ती, नेमबाजी, दांडपट्टा यांचे प्रशिक्षण घेतले.
- 3 ऑगस्ट 1848 मध्ये त्यांनी पहिली मुलींची शाळा भिड्यांच्या वाड्यात बुधवार पेठ पुणे येथे सुरु केली.
- 1852 मध्ये वेताळपेठेत पुणे येथे अस्पृशांसाठी दोन शाळांची स्थापना केली. 1852 मध्येच पुना लायब्ररीची स्थापना.
- 1852 मध्ये मेजर कॅन्डीच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
- 1853 मध्ये महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविणारी मंडळी स्थापन केली. 1854 मध्ये स्कॉटीश मिशन शाळेत अध्यापन.
- 1855 मध्ये प्रौढांसाठी रात्रशाळा काढली. ही भारतातील पहिली रात्रशाळा होय.
- 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
- 1864 मध्ये विधवा पुनर्विवाह पुण्याच्या गोखले बागेत घडवून आणला.
- 1865 मध्ये केशवपण बंदीसाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला.
- फुलेंनी सावित्रीबाईस साक्षर करुन शाळेत शिक्षिका म्हणून नेमले.
- म. फुलेंनी कंत्राटदाराचा व्यवसाय केला. त्यांनी पुना कमर्शीयल ॲन्ड कॉन्ट्रक्टींग कंपनीची स्थापना केली.
- फुलेंनी खडकवासला तलावाचे काम पूर्ण केले.
- ब्राम्हण लोक तुम्हास लुटून खात आहेत हे शूद्र बाधवांना सांगण्याच्या हेतूने मी हा ग्रंथ लिहित आहे. अशी प्रस्तावना म. फुलेंनी ब्राम्हणांचे कसब या ग्रंथात मांडली.
- शेतकऱ्यांचे दुःख, दैन्य त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड मध्ये मांडले.
- ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे असे म. फुलेंनी म्हटले.
- इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वरी संकेत आहे. असे मानणाऱ्यांपैकी फुले होते.
- ज्या दिवशी मनुष्य गुलाम होतो. त्या दिवशी त्याचा अर्धा सदगुण जातो. या होमरच्या वचनाने गुलामगिरी या ग्रंथाचा प्रारंभ केला आहे.
- बहुजन समाजाला स्वजागृत व आत्मावलोकन करावयास लावणारा पहिला माणूस म्हणजे ज्योतिबा फुले होय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी.
- थॉमस पेन या उदार-मानवतावादी विचारवंताचा प्रभाव फुलेंवर होता.
- म. फुलेंनाच महाराष्ट्राचे मार्टीन ल्युथर कींग असे ही म्हणतात.
- 28 नोव्हेंबर 1890 ला त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला.
त्यांचे साहित्य – गुलामगिरी, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसुड, शिवाजी महाराजांचा पोवाडा, ब्राम्हणाचे कसब, अस्पृश्यांची कैफियत, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादी काव्यरचना, सत्सार, इशारा इत्यादी
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
सावित्रीबाई फुले
- जन्म 3 जानेवारी 1831 ला नायगाव जि. सातारा येथे झाला.
- सावित्रीबाई फुले यांचा म. फुले सोबत विवाह झाला त्यावेळी त्यांचे वय नऊ वर्षे होते.
- त्यांनी विधवेच्या मुलाला दत्तक घेतले त्याचे नाव यशवंत
- सावित्रीबाई फुलेंनी म. फुलेंच्या शैक्षणिक कार्यास संपूर्ण सहकार्य केले. स्वतः साक्षर होवून शिक्षिका बनल्या.
- 1877 ला धनकवडी पुणे येथे दुष्काळपिडीतांसाठी म. फुले व सावित्रीबाई फुलेंनी कॅम्प उघडला व व्हिक्टोरिया बालकाश्रम सुरु केला.
- 1890 पासून सत्यशोधक समाजाची धुरा सावित्रीबाईंनी संभाळली.
- 1893 मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
- 1896 च्या दुष्काळात सावित्रीबाईंनी दुष्काळपिडितांना मदत केली. महाराष्ट्रातील व भारतातीलही पहिली स्त्री शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका म्हणुन ओळखतात.
- त्यांचे ग्रंथ बावनकशी, सुबोध रत्नाकर, काव्यफुले हे आहे. त्यांनाच महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची अग्रणी असे म्हणतात.
- 10 मार्च 1897 ला प्लेगच्या साथी मुळे त्यांचा मृत्यू झाला.
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
राजर्षी शाहु महाराज
- जन्म 26 जुन 1874 ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला.
- त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते.
- वडिलांचे (जनकपिता) नाव जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे.
- शाहू महाराजांचे मुळ नाव यशवंतराव जयसिंगराव घाटगे.
- कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाईसाहेब यांना पुत्र नसल्यामुळे त्यांनी यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेतले.
- त्यांचा दत्तक विधान समारंभ 17 मार्च 1884 रोजी होवून त्यांचे नामकरण शाहु असे झाले.
- पोलीटीकल एजंट कर्नल रिव्हज व मुंबई प्रांताचे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन यांनी शाहूंच्या दत्तक विधानास मंजुरी दिली.
- शाहू महाराजांचे प्राथमिक शिक्षण 1885 ते 1889 दरम्यान राजकोट येथे राजकुमार कॉलेज मध्ये झाले.
- सर एस. एम. फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली 1890 ते 1894 या काळात धारवाड येथे शिक्षण घेतले.
- 1891 ला लक्ष्मीबाईंशी विवाह झाला.
- त्यांनी राज्यकारभाराची सुत्रे 2 एप्रिल 1894 रोजी हातात घेतली.
- 1895 मध्ये शाहुपुरी गुळाची बाजारपेठ स्थापन केली.
- शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती झाली नाही असे इतिहास सांगतो. म्हणून हिंदुस्थानला सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे शाहू महाराज
- शाहू महाराजांनी आपले राजचिन्ह म्हणून गंगावतरण घेतले होते.
- राजर्षी शाहू महाराजांचे अनुयायी प्रबोधनकार केशवराव ठाकरे, भास्करराव जाधव, केशव विचारे, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील इ.
- महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा व थिऑसॉफिकल सोसायटीचा छ. शाहू महाराजांवर विशेष प्रभाव होता.
- माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली असती तरी तिच्या हाती राज्य काराभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजचविश्रांती घेतली असती. छ. शाहू महाराज
- 26 जून हा यांचा जन्मदीन महाराष्ट्रात सामाजीक न्यायदिन म्हणून साजरा करतात.
- त्यांना भारतीय आरक्षणाचे जनक आणि भारतीय वस्तीगृहाचे जनक असे म्हणतात.
- 6 मे 1922 ला शाहु महाराजांचा मुंबई येथे मृत्यू झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- जन्म 14 एप्रिल 1891 ला मध्यप्रदेशात महु या ठीकाणी झाला.
- त्यांच्या आईचे नाव भीमाबाई त्यांच्या वडीलांचे नाव रामजी असे होते. वडिल लष्करात सुभेदार होते.
- मुळ आडनाव सकपाळ, गावचे नाव आंबावडे, (रत्नागिरी) या गावाच्या नावावरून आंबावडेकर व नंतर गुरुजींचे आंबेडकर हे आपले आडनाव म्हणून स्विकारले.
- बाबासाहेबांचे लहानपणाचे नाव भिमा होते. परंतु त्यांना भिवा म्हणून ओळखले जाई.
- बाबासाहेबांची आई ते सहा वर्षांचे असतानाच वारली.
- 1900 मध्ये सातारा येथील सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला.
- त्याआधी रत्नागिरीला काही काळ शिक्षण घेतले.
- त्यांच्या पत्नीचे नाव रमाबाई असे होते.
- त्यांचा विवाह 1905 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी झाला.
- 1907 साली मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले.
- 1907 लाच एलफिन्स्टन कॉलेज मुंबईला नाव दाखल केले.
- 1913 मध्ये बी.ए. इंग्रजी व पर्शीयन विषय घेवून उत्तीर्ण झाले.
- डॉ. आंबेडकर 1913 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले.
- त्यांना यासाठी बडोद्याचे राजे सायाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली.
- त्यांनी एम.ए. ची पदवी 1915 मध्ये कोलंबिया विद्यापिठातून संपादन केली.
- यात त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध लिहिला.
- 1917 मध्ये त्यांना कोलंबिया विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली.
- 1918 ते 1920 पर्यंत सिडनेहॅम कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्य केले. याच काळात साउथबरो कमिटीसमोर साक्ष दिली व प्रांताच्या कौसीलमध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधीत्व असावे असा विचार मांडला. 1920 ला माणगाव परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. ( या परिषदेचे प्रमुख पाहुणे शाहू महाराज होते.)
- शाहू महाराजांच्या मदतीने 31 जानेवारी 1920 रोजी मुंबई येथे मुकनायक हे साप्ताहिक काढले. सिडनेहॅम कॉलेजला राजीनामा दिला.
- 5 जून 1952 ला डॉ. आंबेडकरांना कोलंबिया विद्यापिठाने L.L.D. ही सन्मानदर्शक पदवी देवून गौरविले.
- 12 जानेवारी 1952 ला उस्मानिया विद्यापिठ (हैद्राबाद) ने डॉ. बाबासाहेबांना D.Lit ही सन्मानदर्शक पदवी देवून गौरविले. (राज्यघटना निर्मिती व इतर कार्याबद्दल)
- स्वा. सावरकरांनी रत्नागिरी येथे बांधलेल्या पतीतपावन मंदिराच्या उद्घाटनासाठी डॉ. आंबेडकरांना निमंत्रित केले होते.
- डॉ. आंबेडकरांच्या दादर-मुंबई येथील समाधी स्थळाचे नाव चैत्यभूमी असे आहे. नागपूरच्या धर्मांतर सोहळा परिसरास दिक्षाभूमी म्हणतात.
- डॉ. आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष 1990-91 हे सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे केले गेले. डॉ. आंबेडकरांचे नाणे या वर्षी काढले गेले.
- 1991 ला डॉ. आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न दिला गेला. त्यांच्यावर पोष्ट तिकिट काढले गेले.
- 6 डिसेंबर 1956 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
साहीत्य – थॉट्स ऑन पाकीस्तान, हु वेअर शुद्राज, दि.अनटचेबल्स, कास्ट इन इंडिया, अॅनहिलेशन ऑफ कास्ट, रानडे, गांधी अॅन्ड जिना, द प्रॉब्लेम ऑफ रूपी, व्हॉट काँग्रेस अॅन्ड गांधी डन टू दी अनटचेबल्स, थॉट्स ऑन लिंगविस्टीक स्टेट्स, बुध्द अॅण्ड हीज धम्म, रिडल्स इन हिंदुइझम, स्टेट्स अँड मायनॉरिटीज इ
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
गोपाळ गणेश आगरकर
- जन्म 14 जुलै 1856 टेंभु जि. सातारा येथे झाला.
- वडिलांचे नाव – गणेश आगरकर, आईचे नाव – सरस्वती
- प्राथमिक शिक्षण गरिबीमुळे कराड येथे मामाकडे झाले.
- काही काळ मुन्सफच्या कोर्टात नोकरी केली.
- उच्च शिक्षणासाठी दुरच्या नातेवाईकाकडे रत्नागिरीला गेले तेथे त्यांनी वार लावून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात अपयश आले.
- पुन्हा कराडला आले व कंपाउंडरची नोकरी करु लागले त्यानंतर अकोल्यास प्रयाण केले व तेथे मॅट्रीकची परिक्षा पास झाले.
- 1876 मध्ये अकोल्याला वऱ्हाड समाचार मधून लेख लिहिले.
- अकोल्याच्या शिक्षकांनी पैसा जमा करून आगरकरांना पुण्याला शिक्षणासाठी पाठविले.
- पुणे येथे B.A. व M.A. पर्यंत शिक्षण घेतले.
- 1877 ला उंब्रजच्या अंबुताई ऊर्फ यशोदाबाई फडके यांच्याबरोबर विवाह.
- 1878 ला B.A. ची पदवी मिळविली. डेक्कन कॉलेजात फेलो बनलेत.
- 1879 M.A. करताना टिळकांसोबत ओळख झाली.
- 1880M.A. ला पुर्ण केले.
- हर्बर्ट स्पॅन्सर व जॉन स्टुअर्ट मिल या उदारमतवादी पाश्चिमात्य विचारवंताचा त्यांच्यावर प्रभाव होता.
- 1880 मध्ये न्यु इंग्लिश स्कुलच्या स्थापनेत सहभाग. संस्थापक – आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर व लोकमान्य टिळक
- 1881 मध्ये केसरी हे मराठी भाषेतून वृत्तपत्र काढले. संपादक आगरकर
- 1882 मध्ये कोल्हापुर प्रकरण/बर्वे प्रकरण संबंधित टिका केल्यामुळे बर्वे यांनी त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा खटला भरला.
- 1882 मध्ये टिळक व आगरकरांना 101 दिवसाची शिक्षा झाली.
- आगरकर हिंदुस्थानातील दारिद्र्याविषयी विशेष दुःखी होते.
- स्त्रियांना शिक्षण दिल्याशिवाय कुटुंबव्यवस्थेची घडी नीट बसणार नाही – आगरकर
- अस्पृश्यता नाहीशी करणे हे सामाजिक कर्तव्य आहे – आगरकर
- अस्पृश्यता पाळणे हे काही लोकांच्या फायदयाचे असले तरी समतेच्या व न्यायाच्या दृष्टीने ते योग्य ठरते काय ? – आगरकर
- शेतीपेढीची कल्पना आगरकरांनी मांडली. (कर्ज पुरवठा करणे यासाठी)
- देव न मानणारा देवमाणूस असे आगरकरांना म्हणतात. आचाराची (वर्तवणूक) इष्टनिष्टता ठरविण्यासाठी बुध्दी हेच एकमेव प्रमाण आहे- आगरकर
- त्यांनी आपल्या प्रेत दहनासाठी 20 रुपये बाजूला काढून ठेवले.
- त्यांचे हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी व स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे हे दोन अग्रलेख प्रचंड गाजले.
- त्यांना समाज सुधारणेसाठी कायद्याची मदत घ्यावी असे वाटत होते.
- यांनी व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार केला व रूढी परंपरेवर कडाडून टिका केली.
- 17 जुन 1895 ला दम्याच्या आजारामुळे त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला.
साहित्य – विकारविलसीत, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस, स्वराज्याच्या दिशेने वाटचाल, गुलामगिरीचे शस्त्र इ. ग्रंथ लिहिले.
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
म. धोंडो केशव कर्वे
- जन्म- 18 एप्रिल 1858रोजी शेरवली (आजोळ) जि. रत्नागिरी येथे झाला.
- 1881 ला रत्नागिरी येथून मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या विल्सन कॉलेजात दाखल झाले.
- 1884 मध्ये मुंबईच्या विल्सन कॉलेजमधुन गणित विषय घेवून बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले.
- 1884 ते 1890 पर्यंत मुंबईत वेगवेगळ्या शाळांत शिक्षक म्हणून कार्य केले.
- 1886 मध्ये मुरुड फंड सुरु केला. 1891 मध्ये त्यांची पहिली पत्नी राधाबाई यांचे निधन.
- महर्षी कर्वे 1891 ते 1914 पर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून होते.
- 1892 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य बनले.
- 1893 मध्ये पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन (मुंबई) मधील बाळकृष्ण केशव जोशी (देवरुख) यांची बालविधवा कन्या गोदावरी हिच्याशी दुसरा विवाह केला. विवाहानंतर गोदावरींचे नाव आनंदीबाई असे ठेवले आनंदीबाईंना बाया कर्वे, गोदूताई म्हणूनही ओळखले जाई. विधवेशी पुनर्विवाह केल्यामुळे समाजातील सनातन्यांनी टिका केली. मुरुडच्या ग्रामस्थांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला.
- 1893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना केली.
- 1894 पुनर्विवाहांचा मेळावा आयोजित केला.
- 14 जून 1896 ला पुणे येथे सदाशिव पेठेत रावबहादूर भीडे यांच्या वाड्यात अनाथ बालिकाश्रम स्थापन केले. या संस्थेची खरी सुरुवात 1899 ला पुणे येथे श्री गोरेंच्या वाड्यात झाली. प्लेगच्या साथीमुळे हा आश्रम सन 1900 ला हिंगणे येथे हलविला.
- महिला निवास पुणेची स्थापना – 1960
- सातारा येथे बाल मनोहर मंदिराची स्थापना – 1960
- भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती.
- त्यांना स्त्री शिक्षणाचे उध्दारकर्ते म्हणतात.
- सर्वाधिक आयुष्य लाभलेले समाजसुधारक – 104 वर्षे
- साहीत्य – आत्मवृत्त हे आत्मचरित्र
- 9 नोव्हेंबर 1962 ला त्यांचे निधन झाले.
रघुनाथ धोंडो कर्वे
- जन्म 14 जानेवारी 1882
- रघुनाथ धोंडो केशव कर्वे हे महर्षी धोंडो केशव कर्वेचे सुपुत्र होत.
- आईचे नाव राधाबाई कर्वे
- पत्नीचे नाव मालती कर्वे
- र. धो. कर्वेनी समाजस्वास्थ हे मासिक चालविले.
- र. धो. कर्वेनी संततीनियमन विचार व आचार, आधुनिक आहारशास्त्र, आधुनिक कामशास्त्र, गुप्तरोगांपासून संरक्षण, वेश्याव्यवसाय इ. ग्रंथ लिहिलेत.
- लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वांना समजावून सांगितले.
- वाढती लोकसंख्या, कुटुंबनियोजन याबद्दल जागृतीचे कार्य केले.
- र. धो. कर्वेच्या जीवनावरिल चित्रपट – कल का आदमी
- र. धो. कर्वेच्या कुटुंबनियोजनाच्या कार्यावरिल चित्रपट ध्यासपर्व
- ध्यासपर्वचे दिग्दर्शक – अमोल पालेकर
- 1921 मध्ये त्यांनी भारतातील पहिले कुटुंब नियोजन केंद्र राईट एजन्सी मुंबई येथे सुरु केले.
- प्रचंड लोकसंख्यावाढ ही भविष्यात भारतासमोरिल समस्या बनणार हे ओळखून त्यांनी या क्षेत्रात महान कार्य केले.
- निधन 14 ऑक्टोंबर 1953
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
डॉ. इरावर्ती कर्वे
- जन्म 15 डिसेंबर 1905 मिंज्यान येथे ब्रम्हदेशात झाला.
- ब्रम्हदेश/म्यानमार येथे त्यांचे वडिल अभियंता म्हणून कार्यरत होते.
- म. धोंडो केशव कर्वे यांच्या त्या सून व दिनकर धोंडो कर्वे यांच्या पत्नी होत्या.
- डॉ. इरावती कर्वे यांचे शालेय व महाविदयायलीन शिक्षण पुणे येथे झाले.
- त्यांनी 1928 मध्ये एम.ए. ची पदवी घेतली.
- पुढे उच्च शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या.
- डॉ. इरावती कर्वे या 1931 ते 1939 या काळात SNDT महिला विद्यापिठाच्या कुलसचिव होत्या.
- 1939 मध्ये पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये समाजशास्त्र व मानववंशशास्त्र या विषयाच्या प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणुक झाली.
- 1947 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये मानववंशशास्त्र विभागाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली.
- 1955 साली लंडन विद्यापीठात व्याखाता म्हणून त्यांनी वर्षभर कार्य केले.
- त्यांचे पुर्वाश्रमीचे नाव इरावती करमकर होते.
- डॉ. इरावती कर्वे या समाजशास्त्रज्ञ, साहित्यिक, संशोधक होत्या. त्या पुरोगामी विचाराच्या होत्या. मानववंशशास्त्रज्ञ, लेखिका,
- लेखन – युगांत (युगांतला साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.), भोवरा, गंगाजल, परिपूर्ती, आमची संस्कृती, धर्म, मराठी लोकांची संस्कृती, हिंदूची समाज रचना, याशिवाय इंग्रजी भाषेत अनेक ग्रंथ लिहिलेत.
- जुन्यातून यशस्वीपणे बाहेर पडणे आणि नवे यशस्वीपणे आत्मसात करणे असे दुहेरी यश डॉ. इरावती कर्वे यांना लाभले. त्या लघुनिबंधाच्या उगमापाशी उभ्या आहे. – डॉ. आनंद यादव
- ललित निबंधातील खरी कलात्मकता आणि खरे लालीत्य अभिव्यक्त करणाऱ्या, नव्या आणि खऱ्याखुऱ्या ललित निबंधाच्या अग्रदूत डॉ. इरावती कर्वे आहेत. – प्रा. नरहर कुरुंदकर
- निधन 11 ऑगस्ट 1970
केशवराव जेधे
- जन्म 21 एप्रिल 1896 पुणे येथे झाला.
- केशवराव जेधे बहुजन समाजोध्दार चळवळीचे नेते होते.
- त्यांच्यावर छ. शाहू महाराजांचा प्रभाव होता.
- जेधे कुटुंब हे कान्होजी नाईक जेधे यांचे वंशज होते.
- केशवराव जेधे यांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जात असे.
- त्यांचा संबंध व संपर्क विदयार्थीदशेपासूनच ब्राम्हणेतर चळवळीशी होता.
- भास्करराव जाधव, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, केशवराव बागडे यांनी 1920 मध्ये ब्राम्हणेतर पक्ष स्थापन केला.
- पुणे येथील जेधे मॅन्शन हे ब्राम्हणेतर चळवळीचे केंद्र होते.
- केशवराव जेधे यांनी शिवाजी मराठा हायस्कूल पुणे येथे शिक्षकाची नोकरी केली.
- 1919 ला लोकमान्य टिळक विलायतेतून परत आले. त्यामुळे त्यांना मानपत्र देण्याचा कार्यक्रम पुणेकरांनी ठेवला. यास केशवराव जेधे यांनी विरोध केला.
- केशवराव जेधे यांनी 1922 मध्ये छत्रपती मेळा काढला.
- त्यांच्या वडिलांचे नाव मारोतराव असे होते.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता.
- शिवाजी मराठा सोसायटी पुणेचे 20 वर्षे खजिनदार होते.
- 1930 पासून त्यांनी काँग्रेसच्या विविध आंदोलनात भाग घेतला. 1935 मध्ये मध्यवर्ती कायदेमंडळात निवडून गेले.
- 1938 ध्ये ब्राम्हणेतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला.
- 1942 च्या आंदोलनात त्यांना तुरुंगवास झाला.
- 1948 च्या महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष होते.1955 च्या गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी भाग घेतला.
- 1956 च्या दरम्यान त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही भाग घेतला. संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते अध्यक्ष होते.
- त्यांनी स्थापन केलेला पक्ष – तरुण मराठा पक्ष
- त्यांचे साप्ताहिक – शिवस्मारक
- त्यांचे वृत्तपत्र मजूर मजुरद्वारे त्यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रसार केला.
- कैवारी या साप्ताहिकाचे ते सहसंपादक होते.
- पुणे मनपाचे काही काळ सदस्य होते.
- पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचे श्रेय त्यांनाच दयावे लागते.
- प्रकाशक – देशाचे दुश्मन पुस्तक (1925)
- निधन – 12 नोव्हेंबर 1959 पुणे येथे झाले.
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
सत्यशोधक भास्करराव जाधव
- जन्म 16 जून 1867, नागाव, अलिबाग येथे.
- वडिलांचे नाव विठोजीराव नागोजीराव जाधव
- आईचे नाव – लक्ष्मीबाई
- ते 1888 ला मॅट्रीक व 1892 ला एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथून बी.ए. झाले.
- विवाह – भगीरथीबाई विचारे यांच्याशी त्यांचा विवाह
- त्यांना सत्यशोधक भास्करराव जाधव म्हणून ओळखले जाते.
- ते विद्वान, व्यासंगी, संशोधक, तत्वनिष्ठ समाजसेवक होते.
- म. फुले यांच्या नंतरच्या काळात व छत्रपती शाहू महाराजांच्या काळात स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष व आधारस्तंभ होते.
- 1930 व 1931 च्या लंडन गोलमेज परिषदेला हजर होते.
- ते छ. शाहू महाराजांचे एक विश्वासू सल्लागारही होते. त्यांनी ब्राम्हणेतर चळवळ जोमाने पुढे नेली.
- विसाव्या शतकाच्या पुर्वार्धातील बहुजन-मराठा समाजाचे एक भारदस्त नेतृत्व म्हणजे सत्यशोधक भास्करराव जाधव होय.
- त्यांचे ग्रंथ – रामायणावर नवा प्रकाश, घरचा पुरोहित, मराठा आणि त्यांची भाषा
- तत्कालीन नियतकालिकांपासून त्यांनी विशेषतः सामाजिक बाबींवर विपुल असे लेखन केले.
- भास्करराव जाधवांनी 1895 ते 1921 पर्यंत कोल्हापूर संस्थानात वेगवेगळ्या पदांवर नोकरी केली.
- त्यांनी कोल्हापूर संस्थानात 1913 मध्ये अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली.
- मराठा समाजात शिक्षणप्रसारासाठी धारवाड, मुंबई येथे मराठा शिक्षण परिषदा आयोजित केल्या.
- छ. शाहूंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजास ते शाहू सत्यशोधक समाज म्हणत असत. कोल्हापूर रीजन्सीत महसूलमंत्री म्हणून कार्य केले.
- त्यांनी नियतकालिक मराठा दिनबंधू हे 1910 मध्ये सुरु केले.
- ते महात्मा फुले यांच्यानंतर च्या काळात सत्यशोधक समाजाचे पाईक बनले. त्यांचे सहकारी दिनकरराव जवळकर होते.
- निधन 26 जून 1950 कोल्हापूर येथे झाले.
सत्यशोधक दिनकरराव जवळकर
- जन्म – 6 जून 1898 चोरांची आळंदी, पुणे.
- महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ व ब्राम्हणेतर चळवळ पुढे नेण्याचे कार्य दिनकरराव जवळकरांनी केले.
- त्यांना सत्यशोधक दिनकरराव जवळकर असेही म्हणतात.
- ते सत्यशोधक भास्करराव जाधव यांचे सहकारी होते. या दोघांच्या विचारात सामनता होती.
- ते पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील म्हातोबाची /चोरांची आळंदी गावचे शेतकरी होते.
- 1925 साली त्यांच्या शेतीचा शेवटचा तुकडा सावकाराच्या घशात गेला.
- छ. शाहू महाराजांबरोबर त्यांनी सामाजिक कार्यात धडाडीने भाग घेतला.
- छ. शाहू महाराजांनी त्यांना कैवारी हे वृत्तपत्र काढून दिले. त्याचे काही काळ दिनकरराव जवळकर संपादकही होते.
- डॉ. आंबेडकरांच्या 1927 च्या महाड सत्याग्रहास व मनुस्मृती दहनास दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे यांनी पाठिंबा दिला व त्यांचे अभिनंदन केले.
- 1928 मध्ये दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, बाबुराव जेधे यांनी तुकडेबंदी विधेयकाला विरोध करण्यासाठी पुणे येथे शेतकरी परिषद घेतली.
- जेधे व जवळकर हे जिवाभावाचे मित्र होते.
- दिनकरराव जवळकरांचे ब्राम्हण विरोधक म्हणत की, हा माणूस लेखणी विषात बुडवून लिहितो व जहरी लेखणी चालवितो.
- देशाचे दुश्मन या पुस्तकात त्यांनी लो. टिळक व विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यावर टिका केली आहे.
- निधन 3 मे 1932
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
आचार्य बाळशास्त्री जांभेकर
- जन्म 6 जानेवारी 1812 मध्ये पोंभुर्ले जि. रत्नागिरी येथे झाला.
- मराठी भाषेत विविध विषयांची पाठ्यपुस्तके पहिल्यांदा तयार करण्याचे कार्य त्यांनीच केले.
- महाराष्ट्रात शुध्दीकरण चळवळ सुरु करणारे पहिले समाजसुधारक
- 1832 मध्ये दर्पण हे पहिले मराठी साप्ताहीक सुरु केले.
- 1840 मध्ये दिग्दर्शन हे पहिले मराठी मासीक सुरु केले.
- त्यांनी अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून कार्य केले.
- ते एलफिन्स्टन कॉलेजमध्ये गणित याविषयाचे प्राध्यापक होते.
- बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र आठ वर्षे चालले व 1840 मध्ये बंद झाले.
- दिग्दर्शन हे मासिक सुरु करायला भाऊ महाजनांनी विशेष सहकार्य केले.
- त्यांनी हिंदु धर्मातील अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी आवाज उठविला.
- ते मुंबई इलाख्याच्या पहिल्या ट्रेनिंग कॉलेजचे संचालक होते.
- त्यांना आद्य इतिहास संशोधक, राष्ट्रजागृतीचे आग्रदूत, आधुनिक महाराष्ट्राचे आद्यऋषी अशा शब्दांनी गौरविले आहे.
- त्यांचे निधन 17 मे 1846 रोजी 34 व्या वर्षी झाले.
- त्यांची ग्रंथसंपदा – हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, सारसंग्रह, इ. शुन्यलब्धी हे त्यांचे पुस्तक गाजलेले पुस्तक आहे.
नाना जगन्नाथ शंकरशेठ
- नानांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 ला झाला.
- त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे होते..
- मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना यांना ओखळले जाते.
- 1823 मध्ये बॉम्बे नेटीव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
- त्यांना आधुनिक मुंबईचे निर्माते किंवा शिल्पकार म्हणतात.
- 1840 मध्ये मुंबई विभागातील शिक्षणव्यवस्थेवर नियंत्रणासाठी सरकारने बोर्ड ऑफ एज्युकेशन स्थापन केले. त्याचे नाना 1840 ते 1856 पर्यंत सदस्य होते.
- जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सहभाग.
- चिंचपोकळी गॅस कंपनी त्यांच्या प्रयत्नाने सुरु झली.
- नाना मुंबई कौसिलचे पहिले सदस्य होते.
- नाना भारतातील पहिली रेल्वे मुंबईत सुरु झाली तेव्हा उद्घाटनास हजर होते.
- मुंबई येथे सर्व प्रथम मुलींची शाळा सुरु केली.
- त्यांना इंग्रजांनी जस्टीस ऑफ पिस ही पदवी दिली (1935 मध्ये)
- स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना नानांनी
- दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी विश्वनाथ मंडलिक यांच्या सहकार्याने केली.
- त्यांनी सती बंदीचा कायदा अमलात आणण्यासाठी मुंबई प्रांतात जनमत तयार केले. त्यांच्याबाबत जनतेत आदर होता.
- त्यांच्या बद्दल आचार्य अत्रेचे उदगार – मुंबईचा अनभिषिक्त सम्राट.
- ग्रँट मेडीकल कॉलेज आणि एल्फीस्टन कॉलेजचे संस्थापक.
- मुंबई येथे मराठी कलावंतासाठी मराठी नाट्यगृह उभारणारे समाजसुधारक.
- निधन 31 जुलै 1865.
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
गोपाळ हरी देशमुख
- जन्म 18 फेब्रुवारी 1823 पुणे येथे.
- त्यांचे मुळ आडनाव सिध्दये होते.
- त्यांनी जातीव्यवस्थेवर प्रखर टिका केली.
- इंग्रजांची शिस्त, उद्योगप्रियता, चिकाटी, देशाभिमान, शौर्य हे गुण त्यांना फार आवडे. त्याऐवजी भारतीय हे आळशी, भित्रे, स्वार्थी, संकुचित आहेत असे त्यांना वाटे.
- पुनर्विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिले.
- बहुपत्नीकत्व, बालविवाह, हुंडा या अनिष्ट सामाजिक बाबीवर त्यांनी टिका केली.
- जुने धर्मग्रंथ प्रमाण मानणे त्यांना मुर्खपणा वाटे.
- त्यांनी मुर्तीपुजेला विरोध केला.
- लोकांना भौतिकशास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.
- त्यांनी ब्रिटीशकाळात शासनात मुन्सफ, भाषांतरकार, असिस्टंट कमिशनर असिस्टंट जज्ज, जज्ज, जॉईंट सेशन जज्ज अशा अनेक पदावर कार्य केले.
- लोक यांना लोकहितवादी या नावाने ओळखतात.
- शतपत्रकार म्हणून ओळखले जाणारे समाजसुधारक.
- इंग्लंडसारखी संसद भारतात असावी अशी इंग्रजाकडे मागणी करणारे समाजसुधारक.
- 1848 ते 1850 दरम्यान भाऊ महाजन यांच्या प्रभाकरमध्ये त्यांनी 108 शतपत्रे लिहीली. सरकारी नोकरी करत समाजसुधारणे साठी कार्य केले.
- 1880 मध्ये मुंबई विधीमंडळ सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झाली.
- 1882 मध्ये लोकहितवादी नावाचे मासिक काढले.
- त्यांची ग्रंथसंपदा ग्रामरचना, पाणिपत, स्थानिक स्वराज्य व्यवस्था, लक्ष्मीज्ञान, शतपत्रे, लंका, आगम प्रकाश, स्वाध्याय, गुजरात, राजस्थान, गीतातत्व इ.
- जस्टीस ऑफ पीस व रावबहादुर या पदव्या सरकारने दिल्या.
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
- जन्म: 23 एप्रिल 1873 ला जामखिंडी कर्नाटक
- शेतकरी परिषदा आयोजित करुन त्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडल्या.
- 1930 ला गांधींच्या सविनय कायदेभंग आंदोलनात भाग घेतला त्याबद्दल त्यांना 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा (येरवडा जेल) झाली.
- द्वारकापिठाच्या शंकराचार्यांनी त्यांचा आधुनिक काळातील महान कालीपुरुष असा निषेध केला.
- 1934 च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी भाग घेतला. त्यातील तत्वज्ञान व समाजज्ञान या शाखा संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
- सुबोधपत्रिका या साप्ताहिकात त्यांनी लेख लिहिले.
- त्यांनी अस्पृश्यता निवारण परिषदा भरविल्या.
- त्यांच्यावर मील, स्पेन्सर, आगरकर, रानडे, भांडारकर यांच्या लेखनाचा प्रभाव होता.
- ब्राम्हो समाजाचे मंगळुर येथे आचार्य म्हणून कार्य केले.
- मराठीतील पहिले विनोदाचे सैध्दांतीक समीक्षक गो. मा. पवार यांनी महर्षी वि. रा. शिंदे यांचे जीवन व कार्य आणि साहित्य यावर संशोधन करुन ते प्रसिध्द केले.
- 1933 मध्ये पंढरपुर येथे अनाथ बालीका श्रमाची स्थापना केली.
- त्यांचे साहीत्य – भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र
- 2 जानेवारी 1944 ला त्यांचा मृत्यू झाला.
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
डॉ. पंजाबराव देशमुख
- त्यांचा जन्म 1898 मध्ये अमरावती जिल्ह्यात पापळ येथे झाला.
- पंजाबराव देशमुख यांचे मुळ आडनाव कदम होते.
- त्यांनी एम.ए. ची पदवी इंग्लड मधील एंडिबरो विद्यापीठातून तर डि. लीट. ही पदवी ऑक्सफर्ड विद्यापीठातून घेतली.
- भारताचे पहिले कृषीमंत्री. विदर्भाचे भाग्यविधाता.
- 1926 मध्ये श्रध्दानंद छात्रालय सुरु केले.
- 1927 मध्ये शेतकरी संघाची स्थापना केली.
- महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र (मासीक) चालविले.
- 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली.
- भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना केली.
- 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली.
- घटना समितीचे सदस्य होते.
- त्यांची 1930 मध्ये प्रांतिक कायदेमंडळावर निवड झाली.
- त्यांनी 1952 ते 1962 या काळात लोकसभेवर निवड व केंद्रीय कृषीमंत्री पद भुषविले.
- 1928 मध्ये अमरावतीचे अंबाबाई मंदीर सर्वांसाठी खुले करण्यासाठी डॉ. पंजाबरावांनी सत्याग्रह केला.
- महाराष्ट्रातील सहकार विकासात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
- अमरावती जिल्हा कौसीलचे अध्यक्ष असताना त्यांनी सार्वजनिक विहीरी सर्वांसाठी 1928 मध्ये खुल्या केल्या.
- कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांनी जपान भातशेतीच्या प्रयोगाचा अवलंब करावा यासाठी त्यांनी मोहिम चालवली.
- त्यांना भाऊसाहेब असेही म्हणतात.
- त्यांचे निधन 10 एप्रिल 1965 ला झाले.
- भारतीय कृषक समाज क्रांतीचे जनकःत्यांना कृषिरत्न म्हणतात.
गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका)
- सार्वजनिक काकांचा जन्म 9 एप्रिल 1828 रोजी सातारा येथे झाला.
- सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे स्वदेशीचे आदयप्रवर्तक.
- 1870 मध्ये रानडेंच्या मदतीने सार्वजनिक सभेची स्थापना केली.
- वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र स्वीकारणारे समाजसुधारक.
- 1880 मध्ये त्यांनी देशी व्यापार उत्तेजक मंडळ स्थापन केले.
- स्वतः तयार केलेली खादी वापरणारे ते पहिले भारतीय होत.
- सार्वजनिक कार्यात ते हिरीरीने भाग घेत म्हणून त्यांना सार्वजनिक काका असे म्हटले गेले.
- स्वदेशी मालाची दुकाने काढून स्वदेशीचा प्रचार-प्रसार केला.
- मुद्रण स्वातंत्र्यास विरोध करणाऱ्या देशी वृत्तपत्र कायदयास त्यांनी विरोध केला.
- सरस्वतीबाई जोशींनी पुण्यात स्त्री विचारवती ही संस्था काढली.
- त्यांच्या पत्नीचे नाव सरस्वतीबाई जोशी होते.
- सरस्वतीबाई जोशी व सार्वजनिक काकांनी समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी हळदी-कुंकू सारखे कार्यक्रम सुरु केले.
- त्यांचे निधन 25 जुलै 1880 रोजी झाले.
कृष्णशास्त्री चिपळूणकर
- जन्म 1824 मध्ये पुणे येथे झाला.
- त्यांचे मुळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावचे होते. पण पुढे त्यांचे पुर्वज पुण्यास येऊन स्थायिक झाले.
- लहानपणापासून कृष्णशास्त्री हुशार होते म्हणून गुरुजन त्यांना बृहस्पती संबोधत.
- संस्कृत व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
- मिशनऱ्यांच्या धर्मप्रसारास विचार लहरी या वृत्तपत्रातून प्रत्युत्तर दिले.
- त्यांना बृहस्पती म्हणून संबोधतात. तसेच मराठीचे जॉन्सन असेही म्हणतात.
- पुना ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य म्हणून कार्य केले.
- विचार लहरी हे वर्तमानपत्र चालविले.
- शलापत्रक हे वृत्तपत्र चालविले.
- ग्रंथसंपदा – अरबी भाषेतील सुरस व चमत्कारीक गोष्टी, अर्थशास्त्र परीभाषा,सॉक्रेटिसचे चरित्र, पद्मरत्नावली, अनेकविया मुलतत्व संग्रह इत्यादी.
- निधन 1878 मध्ये झाले.
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
विष्णूशास्त्री चिपळूणकर
- जन्म 20 मे 1850 रोजी पुणे येथे झाला.
- मराठी भाषेचे शिवाजी.
- आधुनिक मराठी गदयाचे जनक
- निबंधमालाकार मराठी भाषेचे शिल्पकार.
- ते कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे पुत्र होते.
- पुण्याला चित्रशाळा नावाचा छापखाना/प्रिंटींग प्रेस सुरु केली.
- काशिनाथ साने व जनार्दन मोडक यांच्या सहकार्याने काव्येतिहास संग्रह नावाचे मासिक सुरु केले.
- 1873 मध्ये पुना हायस्कुलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली.
- 1874 मध्ये निबंधमाला हे मासीक सुरु केले.
- 1880 मध्ये न्यु इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली.
- कीताबखाना नावाची संस्थाही त्यांनी स्थापन केली.
- 1880 मध्ये पुणे येथे टिळक व आगरकरांसोबत न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर
- जन्म – 6 जुलै 1837 ला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे झाला.
- मुंबई विद्यापीठातून एम. ए. ची पदवी संपादन केली. मुंबई विद्यापिठाची L.L.D. मिळविणारे पहिले व्यक्ती.
- मुंबई येथे काहींसोबत प्रार्थना समाजाची स्थापना.
- त्यांनाच प्रार्थना समाजाचे वैचारीक संस्थापक असे म्हणतात.
- डॉ. भांडारकरांनी बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण मद्यपानबंदी, देवदासी प्रथाबंदी इत्यादी समाजीक सुधारणांचाही पुरस्कार केला.
- भांडारकरांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणला आपली उक्ती आणि कृती यातील एकवाक्यता सिध्द केली.
- 1886 साली भरलेल्या व्हिएन्ना प्राच्यविद्या परिषदेला ते हजर होते.
- त्यांची ग्रंथसंपदा – अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, कलेक्टेड वर्क्स ऑफ आर. जी. भांडारकर, वैष्णविझम, ए पीप इन टू दी अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया इ. आहे.
- म. कर्वेच्या महिला विद्यापिठाचे पहिले कुलगुरु
- ते मुंबई प्रांताच्या लेजीस्लेटीव्ह कौन्सीलचे सदस्य होते.
- त्यांना सरकारने सर हा कीताब देवून गौरविले होते.
- त्यांची ग्रंथसंपदा- अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, कलेक्टेड वर्क्स ऑफ आर. जी. भांडारकर, वैष्णविझम, ए. पीप इन टू दी अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया इ. आहे.
- म. कर्वेच्या महिला विद्यापिठाचे पहिले कुलगुरु होते.
- त्यांचे निधन 24 ऑगस्ट 1925 रोजी झाले.
समाजसुधारक – Maharashtra che Samaj Sudharak
विष्णूशास्त्री पंडीत
- त्यांचा जन्म 1827 मध्ये बावधन, सातारा येथे झाला.
- वेदशास्त्रसंपन्न राघवेंद्रचार्य गजेंद्रगडकर यांच्याजवळ त्यांनी न्याय, व्याकरण यांचा अभ्यास केला.
- स्त्रियांवरिल अन्याय,बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यांना विरोध केला. विधवा पुनर्विवाहांचा पुरस्कार केला.
- विधवेशी विवाह करणारे पहिले समाजसुधारक.
- चार आश्रमांपैकी ब्रम्हचर्याश्रम व गृहस्थाश्रम हे दोनच उपयुक्त आहेत असे ते म्हणत.
- सामाजिक सुधारणांना केवळ कायदयाचा व सरकारचा आधार पुरेसा पडत नाही, त्याला समाजाने अंतःप्ररणेने आशीर्वाद दयावा लागतो असे विष्णुशास्त्री पंडित नेहमी म्हणत.
- ‘विधवा विवाह’ या ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ग्रंथाचा मराठीत अनुवाद विष्णूशास्त्री पंडित यांनी केला.
- 1874 मध्ये कुसुबाई या विधवा कन्येशी त्यांनी पुनर्विवाह केला.
- त्यांनी पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना 1865 मध्ये मुंबईत केली.
- ग्रंथसंपदा आर्य लोकांच्या प्राचीन व अर्वाचीन रिती, पुरुषसुक्त व्याख्या, ब्राम्हण कन्या विवाह विचार, स्मृतीशास्त्र, शूदधर्म
- इंदुप्रकाश या साप्ताहीकाचे मराठी विभागाचे उपसंपादक होते.
- त्यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात.
- यांना कर्ते समाजसुधारक समजले जाते.
Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History
इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा