4th History Book in Marathi PDF
Click here to Download 4th History Book – इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता चौथी | PDF Size : 24 MB
Name of Book | 4th History Book |
PDF Size | 24 MB |
Language | Marathi, Hindi, English |
Click here to Download 4th History Book in Marathi PDF | |
Click here to Download in Hindi PDF | |
Click here to Download in English PDF |
तुम्ही पूर्ण पुस्तक इथेही वाचू शकता…!!
4th History Book in Marathi PDF Download – इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता चौथी
अभ्यासक्रमाची उद्दिष्टे
- ऐतिहासिक संदर्भात भारतीय समाजाच्या समकालीन समस्यांचा भूतकाळातील घटनांशी योग्य मेळ घालण्याची क्षमता निर्माण करणे.
- ‘समृद्ध वारशाचे जतन, पण हीन असेल त्याचा त्याग’, ही दृष्टी विकसित करणे.
- सहिष्णुता, सामाजिक सुसंवाद व समता या जाणिवा विकसित करणे.
- ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाची आवश्यकता पटवून देऊन त्यांचे जतन करण्याबाबत जाणीव निर्माण करणे. समाजहितासाठी असणाऱ्या नियमांचा आदर करून त्यांचे पालन करण्याची वृत्ती वाढीस लावणे.
- सार्वजनिक मालमत्तेच्या जतनाची आवश्यकता पटवून देऊन तिचे जतन करण्याबाबत जाणीव निर्माण करणे…
4th History Book in Marathi PDF Download – इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता चौथी
इतिहास व नागरिकशास्त्राचे पाठ्यपुस्तक वरील उद्दिष्टांनुसार तयार करण्यात आलेले आहे. इतिहास विषयात छत्रपती शिवाजीमहाराजांची मूल्याधिष्ठित आणि प्रेरणादायी जीवनकथा सांगितली आहे. शिवाजीमहाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक अशा प्रकारचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर आणले आहेत. एका नव्या युगाचा निर्माता म्हणून शिवरायांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली आहे.
नागरिकशास्त्राच्या पाठांमधून विद्यार्थ्यांमध्ये आपला समाज आणि सामाजिक संस्था यांची माहिती करून देण्यात आली आहे. व्यक्ती आणि समाज यांच्यातील परस्परावलंबनाचे आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व या पाठांत अधोरेखित केले आहे. आधुनिक गतिमान समाजातील नागरिक जबाबदार व क्रियाशील असले पाहिजेत, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या वृत्ती आणि जाणिवा निर्माण करण्याचा प्रयत्न या पाठांमधून केला आहे. शिक्षक त्या दृष्टीने अध्यापन करतील ही अपेक्षा.
4th History Book in Marathi PDF Download – इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता चौथी
आज्ञापत्र
रामचंद्रपंत अमात्यांनी ‘आज्ञापत्र’ लिहिले. यात शिवाजी महाराजांच्या धोरणांचे प्रतिबिंब आढळते. खालील उताऱ्यातून महाराजांचा पर्यावरणासंबंधीचा दृष्टिकोन स्पष्ट होतो..
“आरमारास तख्ते, सोट, डोलाच्याकाठ्या आदिकरून थोर लाकूड असावे लागते आपले राज्यात अरण्यात सागवानादि वृक्ष आहेत, त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लेहून हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. याविरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदिकरून हेही लाकडे आरमारचे प्रयोजनाची, परंतु त्यांस हात लाऊ न दयावा. काये म्हणोन की, ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात यैसे नाही. रयतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुत काल जतन करून वाढविली. ती झाडे तोडल्यावरी त्याचे दुःखास पारावार काये?
एकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारासहित स्वल्पकालेच बुडोन नाहीसेच होते; किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडणाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावे हानीही होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न दयावी. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे तोडून न्यावे…”
Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History
इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा