इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

 इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

१  आपली पृथ्वी आपली सूर्यमाला
२  पृथ्वीचे फिरणे
३  पृथ्वी आणि जीवसृष्टी
४  पर्यावरणाचे संतुलन
५  कुटुंबातील मूल्ये
६  नियम सर्वांसाठी
७  आपणच सोडवू आपले प्रश्न
८  सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा
९  नकाशा आपला सोबती
१०  ओळख भारताची
११  आपले घर व पर्यावरण
१२  सर्वासाठी अन्न
१३  अन्न टिकवण्याच्या पद्धती
१४  वाहतूक
१५  संदेशवहन व प्रसार माध्यमे
१६  पाणी
१७  वस्त्र आपली गरज
१८  पर्यावरण आणि आपण
१९  अन्नघटक
२०  आपले भावनिक जग
२१  कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये
२२  वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास
२३  संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध
२४  पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा
२५  सामाजिक आरोग्य

                      पूर्ण प्रकरण वाचण्यासाठी, कृपया अधोरेखित केलेल्या प्रकरणाच्या नावावर क्लिक करा

१. आपली पृथ्वी आपली सूर्यमाला

तारे: ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी-जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. सूर्य हा एक तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत.

ग्रह : ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात.

सूर्यमाला : आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते. त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत. बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठरावीक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्यमालेत ग्रहांबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो.

२. पृथ्वीचे फिरणे

पृथ्वीचे परिवलन

ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या लक्षात येईल, म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. NS या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात.

N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला ‘विषुववृत्त’ म्हणतात. वरील पृथ्वीगोल पहा. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

सूर्योदय आणि सूर्यास्त

पृथ्वीही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती ‘परिभ्रमण’ करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला ‘वर्ष’ म्हणतात. एका वर्षात सुमारे ३६५ दिवस आणि तास असतात.

३.   पृथ्वी आणि जीवसृष्टी

पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागांत जमीन तर काही भागांत पाणी दिसते. पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते. जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते. पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो. पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. जीवावरण हे इतर तीनही आवरणांत दिसून येते.

शिलावरण आणि जलावरण

पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे. ते माती व खडकांचे बनलेले आहे. आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकांचे थर पाहतो. कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो, तर कोठे ओसाड जमिनीवर वाळूच वाळू असते. कोठे जमीन पिकांनी, तर कोठे झाडांनी झाकलेली असते.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीचे खोलवरचे थर दिसतात, तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी दुभंगलेले खडक दिसतात. काही ठिकाणी पर्वतांचे उतार असतात. तर कोठे खडकांचे उंचच उंच सुळके दिसतात. पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे.

४. पर्यावरणाचे संतुलन

एखादया क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात, त्यांची संख्या खूप मोठी असते. दिन-रात्र, विविध ऋतू अशा सर्व परिस्थितींमध्ये शास्त्रज्ञ नोंदी घेतात. खूप उंचावरच्या भागात व खोल पाण्यात राहणान्या सजीवांचे, तसेच सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी ते विशेष साधने वापरतात.

अनेक वैज्ञानिकांनी केलेली निरीक्षणे जमा केली जातात. त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. असे सर्व प्रयत्न दीर्घकाळपर्यंत केले जातात, तेव्हा कुठे वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री वाटते.

पर्यावरण

 

परिसर’ हा शब्द तुम्हांला माहीत आहे. ‘शाळेचा परिसर सुंदर आहे’, ‘बाजाराचा परिसर अस्वच्छ झाला आहे’, अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. परिसर म्हणजे आसपासची जागा. घराच्या शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर अधिक मोठा असतो. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते. सजीव आणि निर्जिव एकमेकांवर अवलंबून असतात. यांच्यामध्ये काही देवाण घेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो.

५. कुटुंबातील मूल्ये

कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. विचार आणि मतेही भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो. असे असले, तरी अनेक बाबतींत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते.

आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो. परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होते ?

• आपल्याला काय वाटते, हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते. एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजतात.

• घरात आपल्या मताला महत्त्व दिले जात आहे, हे पाहून आपल्याला कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते.

आपल्या कुटुंबातील काही निर्णयांत जसा आपला सहभाग असतो, तसाच तो आपल्या सार्वजनिक प्रश्नांबाबतही असतो. वृत्तपत्रांत आपण लोकसहभागाच्या काही बातम्या वाचतो. ६.

६. नियम सर्वांसाठी

वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व आपण ते पाळतो. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये काय आहेत हे कळावे, यासाठी नियम तयार करावे लागतात. नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते. आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो.

नियम सर्वांसाठी असतात. ते सर्वांना सारखेच लागू होतात. नियमांपुढे कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते. नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. अशा प्रकारे ‘समानता’ हा नियमांचा आधार असतो.

                इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल

आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. हे नियम आपणच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्यांचे पालन करतो. समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यांत फरक आहे.निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमांनुसार चालतात.

७. आपणच सोडवू आपले प्रश्न

सार्वजनिक समस्या

आपल्या समूहजीवनात विविध समस्या असतात. या समस्यांमुळे आपली गैरसोय होते. कधीकधी आपले समूहजीवन विस्कळीत होते. समस्यांकडे डोळेझाक केल्यास त्या अधिक तीव्र बनतात, म्हणून वेळच्यावेळी समस्यांचे निराकरण करावे. आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल. परिसरातील समस्या ओळखणे, हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही. त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

तंटा निवारण
आपल्या गावात किंवा शहरात वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे हीसुद्धा एक समस्या होऊ शकते. सतत होणाऱ्या तंट्यांमुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते. एकोपा राहत नाही. गावाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. तंट्याचे स्वरूप गंभीर नसले; तर परस्परांशी बोलून ते सोडवता येतात; परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाहीत, तर तंटा निवारणासाठी असणाऱ्या संस्थांची आणि न्यायालयाची मदत घ्यावी लागते.

८. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा

आपण सर्वजण सार्वजनिक सेवासुविधांचा वापर करत असतो. पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि वाहतूक या काही महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत. या सेवा सर्वासाठी असतात. सार्वजनिक सेवा, त्या देणाऱ्या संस्था आणि आपण यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते. आपली शाळा ही सार्वजनिक व्यवस्थेचा एक भाग आहे.

शाळेत आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध असतात. तशाच सुविधा आपल्याला बाहेरच्या सार्वजनिक जीवनातही उपलब्ध असतात. बस, रेल्वे या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा आहेत. याशिवाय टपालसेवा, दूरध्वनी, अग्निशमन दल, पोलीस, बँका, नाट्यगृहे, बागबगिचे, पोहण्याचे तलाव यांसारख्या अनेक सार्वजनिक सेवांचा आपण उपयोग करत असतो. या सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते. आपल्याला जसे आपले घर आवडते, तशीच शाळाही आवडते. प्रत्येक शाळेची एक स्वतंत्र ओळख असते.  शाळा सर्वांसाठी असते. शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे. याला शिक्षणाचा हक्क असे म्हणतात. शिक्षण हक्क कायदयानुसार ६ ते १४ वयोगटांतील सर्व मुलामुलींनी शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजे. विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी कमाल वयाची अट १४ ऐवजी १८ वर्षे आहे.

९. नकाशा आपला सोबती

आपल्या परिसरातील जमीन सारख्या उंचीची नसते. उंचसखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. त्यामुळे डोंगर, दऱ्या, पठारे, मैदाने, बेटे इत्यादी भूरूपे तयार होतात. हे तुम्ही तिसऱ्या पाठात अभ्यासले आहे. आपला परिसर कसा आहे ते योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी तेथील भूरचनेची म्हणजेच प्राकृतिक रचनेची माहिती असणे आवश्यक ठरते.

इयत्ता चौथीमध्ये आपण नकाशासंबंधी माहिती घेतली होती. त्यात पाच हजार वर्षांपूर्वीचा नकाशासुद्धा होता. याचा अर्थ मानवाला पूर्वीपासून नकाशा तयार करण्याची गरज वाटत होती. त्या वेळी नकाशांचा उपयोग मुख्यतः युद्धासाठी होत असे. युद्ध करताना प्रदेशाच्या भूरचनेची / प्राकृतिक रचनेची सखोल माहिती आवश्यक होती. शत्रूचा पराभव करण्यासाठी डावपेच आखणे सोपे होत असे. त्यासाठी परिसराच्या भूरचनेचे नकाशे वापरले जात.

                इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

भूरूपाची उंची, आकार इत्यादींमधील फरक विचारात घेऊन नकाशात विविध भूरूपे दाखवता येतात. ही भूरूपे नकाशावर वेगवेगळ्या पद्धतींनी दाखवली जातात. नकाशांच्या आधारे भूरूपे कोणकोणत्या पद्धतीनी दाखवता येतात ते आपण समजून घेऊ.

कागदावर नकाशा काढताना भूरचनेची लांबी व रुंदी सहज दाखवता येते. परंतु भूरचनेची खोली व उंची सहजपणे दाखवता येत नाही. नकाशात या बाबी देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो.

१०. ओळख भारताची

आपला देश विविध नदया, पर्वत, पठारे, मैदाने, बेटे इत्यादींनी नटलेला आहे. भारतीय भूखंडाच्या तीन दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास ‘भारतीय द्वीपकल्प’ म्हणतात. आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे. आपल्या देशात बने, मैदाने, वाळवंटे इत्यादी आहेत. 

आपल्या देशाचा विस्तार मोठा आहे. शिवाय समुद्रसपाटीपासून उंचीतील फरक ८००० मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रदेशांनुसार भारताच्या हवामानात विविधता आढळते. हवामानातील या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी व पक्ष्यांमधील विविधतासुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. तसेच पीकपाण्यातही विविधता आढळून येते.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

जसे, उत्तर भारतात गहू हे प्रमुख पीक आहे, तर किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात भात हे प्रमुख पीक आहे. मध्यभारतात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपले जीवनमान, चालीरीती, परंपरा, लोकजीवन व संस्कृतीवर झालेला आढळतो.  आपल्या देशात विविध जाती, जमाती व धर्मांचे लोक राहतात.

११. आपले घर व पर्यावरण

घरांचा उपयोग प्रामुख्याने खालील बाबींसाठी होतो.

* निवान्यासाठी.

* विश्रांतीसाठी.

* थंडी, ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी.

* जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी

* समाजकंटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी. 

त्या त्या प्रदेशांत असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली आढळतात. घरांच्या प्रकारात, त्यांच्या रचनेत, ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता आढळते. यामुळे आपल्याला घरांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र व निवाऱ्याची गरज असते; परंतु या गरजांची पूर्तता सर्वांच्या बाबतीत होतेच असे नाही. त्यामुळे खालील बाबी घडतात.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

निवारा नसलेले अनेक लोक आपल्या अवतीभवती दिसतात. असे लोक रस्त्याच्या बाजूच्या माळरानावर, पदपथांवर, पुलाखाली पडक्या इमारतींमध्ये, रेल्वे स्टेशन किंवा बसस्थानके अशा अनेक ठिकाणी निवारा करून राहतात. उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते.

१२. सर्वासाठी अन्न

शेती

शेतीचे हंगाम

वनस्पतींपासून आपल्याला अन्न मिळते. त्यासाठी शेतांमध्ये पिकांची पेरणी व बागांमध्ये फळझाडांची लागवड केली जाते. भारताचा सुमारे ६०% भूभाग शेतीसाठी वापरात आहे. ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे दोन प्रमुख हंगाम असतात. जून ते ऑक्टोबरपर्यंतच्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात.

या हंगामात पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर होतो. ऑक्टोबर ते मार्चपर्यंतच्या हंगामाला रबी हंगाम म्हणतात. या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी, परतीचा मान्सून आणि पडणारे दव यांचा उपयोग होतो. याशिवाय मार्च ते जूनमध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके म्हणतात.

शेतीची कामे

आपल्या शेतातील पीक चांगले वाढावे, असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. पीक चांगले वाढले, तर त्यापासून त्याला उत्पन्नही अधिक मिळते. भरघोस शेती उत्पादनासाठी उत्तम जमीन, उत्तम बियाणे व खते तसेच पाण्याची उपलब्धता असावी लागते. मशागतीची कामे करणे आवश्यक असते.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

त्याचबरोबर शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागते आणि शेवटी हाती आलेल्या धान्याची सुरक्षित साठवण करावी लागते. या सर्वच प्रक्रिया महत्त्वाच्या असतात. आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली, तरी सर्वांच्या अन्नाची गरज भागवली जात आहे. शेतीच्या धारित पतीचा वार केल्यामुळे हे शक्य झाले आहे.

पारंपरिक शेती

पूर्वापार पद्धतीने शेती करताना बैलाने ओढायचे नांगर, औत वापरत. तसेच शेताला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर होत असे.
कापणी, मळणी इत्यादी कामे शेतकऱ्यांचे कुटुंबीय स्वतः किंवा बैलांच्या मदतीने करत; परंतु आता शेतकरी ही सर्व कामे यंत्रांच्या साहाय्याने करत आहे. 

१३. अन्न टिकवण्याच्या पद्धती

गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये यांसारख्या धान्यांची आपल्याला सतत गरज भासते; परंतु त्यांची पिके वर्षाकाठी ठरावीक काळातच येतात. हे पदार्थ नेहमी उपलब्ध होण्यासाठी एका हंगामाचे पीक पुढील हंगाम येईपर्यंत वर्षभर पुरवावे लागते व ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते.

विविध अन्नपदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात. तेथून दूर असलेल्या लोकांपर्यंत ते सुस्थितीत पोचवावे लागतात. उदाहरणार्थ, दूध, दुधाचे पदार्थ व अंडी हे दुग्धव्यवसाय केंद्र, कुक्कुटपालन केंद्र यांपासून लोकांना मिळेपर्यंत टिकून राहण्याची सोय करावी लागते.

        इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. त्यांच्या नैसर्गिक हंगामात त्यांचा स्वादही सर्वोत्तम असतो. मोठ्या प्रमाणावर आलेली फळे व भाज्या वाया जाऊ नयेत तसेच वर्षभर त्यांचा आस्वाद घेता यावा, यासाठी आपण ती टिकवण्याचा प्रयत्न करतो. घरोघरी अनेक प्रकारचे पापड-कुरडया, मुरांबे लोणची, कांदा, मासळी, मसाले इत्यादी चविष्ट पदार्थ वर्षभरासाठी टिकवून ठेवले जातात.

१४. वाहतूक 

आजच्या गतिमान युगात प्रवास व साहित्याची ने-आण करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते.

वाहतुकीचे अनेक फायदे आहेत.

• कामे जलद गतीने होतात.

• वेळ व श्रमांची बचत होते.

• व्यापारवाढीस चालना मिळते.

• जगातील विविध प्रदेशाच्यामुळे एकमेकांशी जोडले गेले आहेत.

• जागतिक स्तरावरदेखील वस्तूंची वाहतूक सहज व सोपी झाली आहे.

• विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे.

• पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत.

• विविध प्रकारच्या वाहतुकींच्या सोईंमुळे जग जवळ आले आहे.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची ये-जा सतत चालू असते. इंधनांच्या ज्वलनामुळे वाहनांतून सातत्याने धूर व काही विषारी वायू सोडले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड व सल्फर डायऑक्साइड हे वायू असतात. . तसेच धुरावाटे कार्बन, शिसे यांचे सूक्ष्मकण बाहेर पडतात व हवेत मिसळतात. या घटकांचा अतिरेक झाल्यास परिसरातील हवेची गुणवत्ता कमी होते. यालाच आपण हवेचे प्रदूषण म्हणतो.

५. संदेशवहन व प्रसार माध्यमे

भारतात संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो. हे उपग्रह इनसॅट (INSAT Indian National Satellite) या नावाने ओळखले जातात.             

प्रसारमाध्यमांचे चांगले परिणाम

१. आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो.

२. माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यांत बचत होते.

३. पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता इत्यादी बाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत मिळते. वादळे, त्सुनामी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींबाबत पूर्वकल्पना मिळू शकते.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

५. आरोग्य, शिक्षण व समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगांबाबत जागरूकता निर्माण होते.

६. लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना यशस्वी करण्यामध्ये मदत होते.

७. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यांबाबतची जाणीव जागृत होते. त्यामुळे जीवनीमध्ये सुधारणा होते.

८. प्रसारमाध्यमांमुळे व्यापार, उदयोगधंदे यांमध्ये वाढ होते.

१६. पाणी

पाण्याचे प्रदूषण

पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते. काही पदार्थ पाण्यात तरंगत राहतात. त्यामुळे पाणी अस्वच्छ किंवा गढूळ दिसते. काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि दिसेनासे होतात. पाण्यात मिसळलेले पदार्थ सजीवांसाठी अपायकारक असले तर ते पाणी प्रदूषित आहे असे आपण म्हणतो. नदया, सरोवरे हे आपले पाण्याचे स्रोत आहेत.

सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट

शहराचे, गावाचे सांडपाणी एकत्र करून सोईच्या ठिकाणी मोठ्या जलसाठ्यात सोडतात. राहत्या इमारतींमधून, तसेच उद्योग, कारखाने यांतून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात. यांपैकी काही विरघळलेल्या तर काही न विरघळलेल्या असू शकतात.

मैलापाण्यात रोग पसरवणारे सूक्ष्मजीव असू शकतात. तर कारखान्याच्या सांडपाण्यात विषारी पदार्थ असण्याची अधिक शक्यता असते. हे सर्व सांडपाणी जसेच्या तसे जलसाठ्यात सोडले तर जलस्रोतांचे प्रदूषण होऊन ते घातक ठरते. असे पाणी पिण्यासाठी किंवा इतर कुठल्याच कामासाठी वापरता येत नाही.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

म्हणून सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडण्याची कारखानदारांवर सक्ती आहे. तसेच गावाचे सांडपाणी, मैलापाणी जलस्रोतांमध्ये सोडण्यापूर्वी त्यांवर शुद्धीकरण प्रक्रिया करतात. असे केल्यामुळे जलप्रदूषण टाळता येते. नदीच्या वाहत्या पाण्याचे नैसर्गिकरीत्याही काही प्रमाणात शुद्धीकरण होत असते. याशिवाय गावाला पाणीपुरवठा करण्यापूर्वी त्याचे शुद्धीकरणही करण्यात येते.

१७. वस्त्र आपली गरज

मानवाच्या उत्क्रांतीदरम्यान त्याच्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेले. शरीरावरील केसांचे प्रमाण कमी होते गेले, हा त्यांपैकीच एक बदल होय. शरीरावरील केसांचे आवरण कमी झाल्याने मानवाला ऋतुबदलांपासून संरक्षणाची आवश्यकता भासू लागली आणि त्यातून वस्त्र ही गरज निर्माण झाली.

मानवाने विविध काळांत वापरलेल्या वस्त्रांमध्ये विविधता दिसून येते. आदिम काळात सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नसे. त्यानंतर झाडांची सालं व पाने वापरली जाऊ लागली. पुढे तो शिकार करून मारलेल्या जनावरांचे कातडे वापरू लागला. कापसासारख्या वनस्पतींपासून सूत तयार करण्याची कला अवगत झाल्यावर सुती कापडाचा वापर होऊ लागला.

निसर्गाने प्रत्येकाची गरज भागेल एवढे दिले आहे, परंतु निसर्ग माणसाचा हव्यास मात्र पूर्ण करू शकत नाही. मनुष्याने आपल्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे. तरच निसर्ग आपल्या सर्वांचा सांभाळ करू शकेल.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

मुंबई हे कापड गिरण्यांसाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होते. या बेटावर दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ होते. त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनले. कापड उद्योगाच्या भरभराटीमुळे भारताच्या विविध प्रदेशांतून रोजगारासाठी येऊन या ठिकाणी लोक स्थायिक झाले. तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडींचे महत्त्वाचे केंद्र बनले.

 

१८. पर्यावरण आणि आपण

जंगलतोड

जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे सहाशे कोटींच्या घरात आहे. या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नांत माणूस नवनवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे. वापरत आहे. यासाठी मानव अधिकाधिक जमीन व जलस्रोत वापरत आहे. शेती, वसाहती, उद्योगधंदे, तसेच रस्ते व लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मोकळी जमीन आवश्यक असल्याने जंगलतोड़ होते.

काही ठिकाणी दलदलीच्या प्रदेशांत किंवा  खोलगट भूभागांत भराव घालून त्या जागी जमिनीचे सपाटीकरण केले जाते. पर्यावरणात वेगवेगळ्या सजीवांचे निवारे असतात. जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात. झाडांवर अनेक पक्ष्यांची घरटी असतात. अस्वल, हरीण, माकड, हत्ती, वाघ यांसारखे प्राणी जंगलामध्ये राहतात. म्हणजे घनदाट जंगल अनेक प्राण्यांचा निवारा असतो.

                                        इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

जंगलातच त्यांच्या गरजांची पूर्तताही होते. जंगले कमी झाली, की तेथील जैवविविधतेचा -हास होतो. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचतो, ऐकतो व पाहतो. याची कारणे बातम्यांमध्ये दिलेली असतात.

 

१९. अन्नघटक

अन्नपदार्थांमध्ये शरीराला विविध प्रकारे उपयोगी पडणारे अन्नघटक असतात. 

कर्बोदके

पिष्ट

पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला, की त्याचा रंग काळसर निळा होतो. याचा अर्थ असा की, बटाट्यात पिष्ट आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ अशा विविध तृणधान्यांमध्ये तसेच साबुदाणा, बटाटा अशा पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात पिष्ट असते. धान्यांचे पीठ होते.                                                     

ही धान्ये आपल्या आहारातील मुख्य पदार्थ असतात. मोठ्या प्रमाणात पिष्ट असणाऱ्या पदार्थांना पिष्टमय पदार्थ म्हणतात. पिष्टमय पदार्थापासून शरीराला ऊर्जा मिळते. ही ऊर्जा शरीराच्या विविध कामांसाठी उपयोगी पडते. याशिवाय शरीर योग्य तेवढे गरम राहण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग होतो.

शर्करा 

वनस्पतीपासून मिळणारे व चवीला गोड लागणारे पदार्थ म्हणजे शर्करा होय. साखर हा शर्करेचा एक प्रकार आहे.

आपण पिष्टमय पदार्थ खाल्ले की त्यांच्या पचनातून शर्करा बनतात. या शर्करेचे शरीराच्या सर्व भागात मंद ज्वलन होते. त्यातून ऊर्जा बाहेर पडते. म्हणजे पिष्टाच्या पचनातून मिळणारी शर्करा शरीरासाठी इंधनाचे कार्य करते.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

शर्करा

गोड लागणाऱ्या अन्नपदार्थामध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात. उदाहरणार्थ, उसाच्या रसापासून आपण गूळ किंवा साखर तयार करू शकतो, कारण त्यात ‘सुक्रोज’ नावाची शर्करा असते. पिकलेला आंबा, केळी, चिकू अशी फळे, तसेच मध, दूध यांतही वेगवेगळ्या प्रकारच्या शर्करा असतात. त्यांच्यापासूनही शरीराला ऊर्जा मिळते.

२०. आपले भावनिक जग

माणसाच्या स्वभावाचे कितीतरी पैलू असतात. माणूस कधी रागावतो, तर कधी कोणाला उदारपणे क्षमा करतो. त्याला कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो, तर कधी कोणाबद्दल प्रेम वाटते. कधी तो फक्त स्वार्थीपणे वागतो, तर प्रसंगी इतरांसाठी त्याग करायला, इतरांना मदत करायलाही पुढे सरसावतो. राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती या सगळ्या आपल्या भावना आहेत.

भावनांचा मेळ कसा घालावा?

माणूस विचारक्षम असतो, तसाच तो भावनाशीलही असतो. विचार आणि भावनांचा योग्य तो मेळ आपल्याला घालता आला पाहिजे. कोणी आपल्याला दुखावले, की आपल्याला वाईट वाटते. ते स्वाभाविक आहे; पण किती वाईट वाटून घ्यायचे हे आपल्याला कळायला हवे. एखादयाने चूक केली, तर आपल्याला राग येतो; पण किती रागवायचे याची मर्यादा कळली पाहिजे.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

एखादी गोष्ट हवीशी वाटणे हे स्वाभाविक आहे; पण त्यासाठी किती हपापलेपणा करायचा हे कळले पाहिजे. विचारीपणाने भावना आवरता येतात. त्यांच्यावर संयम ठेवता येतो. भावनांवर अशा रीतीने नियंत्रण ठेवणे, भावनांचा मेळ घालता येणे, त्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे, याला ‘भावनिक समायोजन’ म्हणतात.

 

२१. कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये

श्वसन

जगण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि अन्न या तीनही गोष्टींची गरज असते. हवेतील ऑक्सिजनचा पुरवठा शरीराला सतत होत राहणे गरजेचे असते. त्यासाठी आपला श्वासोच्छ्वास सतत चालू असतो. आपल्या शरीरात श्वासोच्छ्वासाचे काम करणारी इंद्रिये आहेत. श्वास घेतला की नाकावाटे घेतलेली हवा श्वासनलिकेत जाते.                                                                     

श्वासनलिकेच्या दोन शाखांमार्फत हवा फुप्फुसांत शिरते, फुप्फुसांत या दोन्ही शाखांपर अनेक शाखा फुटतात. या प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात. त्या पिशव्यांना वायुकोश म्हणतात. उरोपोकळी आणि उदरपोकळी दरम्यान लवचीक पडदयासारखा अवयव असतो. त्याला श्वासपटल म्हणतात.

श्वासपटल व त्याची हालचाल

श्वासपटल खालच्या दिशेने सरकते तेव्हा श्वासावाटे हवा नाकावाटे येऊन श्वासनलिका व तिच्या शाखांतून पुढे वायुकोश भरते. श्वासपटल वरच्या दिशेने सरकते तेव्हा उच्छ्वासावाटे हवा बाहेर टाकली जाते.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

वायूंची देवाणघेवाण

वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोचली, की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीकबारीक रक्तवाहिन्यांत जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागांत वाहून नेला जातो. त्याच वेळी शरीराच्या सर्व भागांतून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साइड वायुकोशांमधील हवेत मिसळतो. उच्छ्वासाच्या वेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड वायूंची देवाणघेवाण होते.

शरीराबाहेरील हवेत धूळ व धुराचे कण असू शकतात, तसेच रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतूही असू शकतात. त्यांचा शरीराला त्रास होऊ शकतो. श्वसनेंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते. श्वसनेंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष्म असते. हवेतील कण त्यावर चिकटून बसतात. परिणामी हवेतील हानिकारक कण फुफ्फुसांपर्यंत पोहचू शकत नाहीत.

 

२२. वाढ आणि व्यक्तिमत्त्व विकास

अन्न घेऊन सर्व सजीवांची शारीरिक वाढ होते तशीच आपलीही उंची व वजन जन्मल्यापासून प्रौढावस्थेपर्यंत वाढत राहते. काहींची आताची उंची व वजन तुमच्या उंची व वजनापेक्षा जास्त असेल तर काहींचे कमी असेल; परंतु त्यांच्या स्वतःच्या पहिली- दुसरीतील उंची व वजनापेक्षा ते जास्तच असेल, कारण साधारणपणे १८ वर्षांचे होईपर्यंत सर्व मुला-मुलींचे हे वाढीचेच वय असते.

कौशल्ये आणि कार्यक्षमता

बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही. काही हवे असेल तर रडणे आणि हातपाय हालवणे एवढेच त्याला येते. पण काही दिवसांनी शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या हालचालींवर त्याचे थोडे नियंत्रण येऊ लागते आणि विविध हालचालींमध्ये थोडा समन्वय येऊ लागतो.

                                                          इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book                    

उदाहरणार्थ, पाहिजे त्या दिशेने मान वळवून बाळ वस्तूकडे बघू लागते. एखादी व्यक्ती ओळखीची वाटली, तर तिच्याकडे पाहून हसते. हातात वस्तू धरायला शिकते. हातात धरलेली वस्तू तोंडाकडे न्यायला शिकते. कोणीही न शिकवता हालचालींवरील नियंत्रण आणि समन्वय वाढला, की आणखीही काही कामे ते आपोआप करू लागते.

उदाहरणार्थ, वस्तू उचलून देणे, चमचा हातात धरून ताटावर आपटून आवाज काढणे. स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण येऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे, याला ‘कौशल्य शिकणे’ असे म्हणतात.

 

२३. संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध

संसर्गजन्य रोग

आईचा हात भाजून तिला झालेली जखम किंवा आजोबांची पाठदुखी दुसऱ्यांना होत नाही, परंतु फ्ल्यू, पडसे, नायटा, खरूज, कांजिण्या, गोवर अशा काही आजारांच्या बाबतीत रोग्यांपासून दूर राहण्याची काळजी घ्यावी लागते. या रोगांची एकाची दुसऱ्याला लागण होऊ शकते. अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात.                                                                 

असे रोग कशामुळे होतात ?

हे रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात. अशा रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोगजंतू म्हणतात. प्रत्येक रोगास एक विशिष्ट रोगजंतू कारणीभूत ठरतो. शरीरात एखादया रोगाच्या जंतूंना प्रवेश मिळाला आणि ते शरीरात वाढू लागले, की रोग होतो.

एखाद्याला झालेला रोग दुसन्याला कसा होतो ?

एखाद्याला पडसे झाले असेल तर त्याचे रोगजंतू त्या व्यक्तीच्या शिंक व खोकण्यातून हवेत मिसळतात. ते रोगजंतू दुसऱ्यांच्या शरीरात गेले, की त्यांच्यापैकी अनेकांना पडसे होऊ शकते. याला रोगप्रसार म्हणतात. टायफॉइडग्रस्त व्यक्तीकडून टायफॉइडचे (विषमज्वराचे) रोगजंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्याने टायफॉइडचा प्रसार होऊ शकतो.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

रोगप्रसार

रोगाचा प्रसार कोणकोणत्या पद्धतीने होतो ?

हवेमार्फत रोगप्रसार                        

फ्ल्यूसारख्या रोगाचे जंतू रोग्याच्या थुंकीत असतात. रोग्याने थुंकल्याने, खोकल्याने किंवा शिंकल्याने ते हवेत पसरतात. आसपासच्या लोकांच्या शरीरात हे जंतू श्वासावाटे शिरतात. उघड्यावर थुंकू नका, खोकू नका. हवेवाटे छातीच्या व घशाच्या रोगांचा प्रसार होतो. उदाहरणार्थ, क्षय, स्वाईन फ्ल्यू इत्यादी. म्हणूनच खोकताना किंवा शिंकताना तोंडावर, नाकावर रुमाल धरायला सांगितले जाते.

 

२४. पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा ‎

आपल्या भोवतालचा प्रत्येक पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेला असतो. करवतीने लाकूड कापताना लाकडाचा भुसा म्हणजेच लाकडाचे कण खाली पडतात हे तुम्ही पाहिले असेल. लोखंड किंवा तांबे कानशीने घासतानाही लोखंडाचे, तांब्याचे कण होतात. पेन्सिल, खडू, कागद, लाकूड, गव्हाचे दाणे, लोखंड, तांबे, कोळसा असे सर्व पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात.                                                              

आपल्या डोळ्यांना पदार्थांचे जे लहान कण दिसतात तेदेखील अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. हे कण एवढे लहान असतात, की ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. एखादया पदार्थाचा आपल्याला दिसू शकेल एवढा कण तयार होण्यासाठी त्या पदार्थाचे लाखो कण एकत्र असावे लागतात.

‘पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात,’ हे मत कणाद महर्षींनी मांडले. कणाद महर्षीचा जन्म इसवी सनापूर्वीच्या सहाव्या शतकात गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथजवळच्या प्रभासक्षेत्र येथे झाला. त्यांचे मूळ नाव उलुक होते. चराचर सृष्टीतील वस्तूंचे सात गटांत वर्गीकरण होते, असे मत त्यांनी मांडले होते.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

जगातील प्रत्येक वस्तू सूक्ष्म कणांची बनलेली असते, ही संकल्पना कणाद महर्षीनी मांडली. त्यांनी त्या कणाला ‘पीलव’ असे नाव दिले. पाणी जमिनीवर पडले, की त्याचे शिंतोडे उडतात. शिंतोडे म्हणजे पाण्याचे लहान थेंब. हे थेंबही पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. त्यामुळे आपल्याला भिजायला होते, म्हणजे द्रवपदार्थही कणांचेच बनलेले असतात.

 

२५. सामाजिक आरोग्य

सामाजिक आरोग्य
पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यांतून उत्तम आरोग्य मिळते. व्यक्तीचा विकास होतो. जसे आपण आपले ‘आरोग्य’ सांभाळतो, तसे समाजातील सर्व लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या सर्वांना तणावरहित आणि आनंदी जगणे हवेहवेसे वाटते तसेच ते संपूर्ण समाजालाही उपलब्ध झाले पाहिजे.

व्यक्तिगत आरोग्य व स्वच्छतेच्या सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात. अशा आजारांपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करणे आणि त्यांना आनंदी व स्वास्थ्यपूर्ण जीवन उपलब्ध करून देणे, म्हणजे सामाजिक आरोग्याची जोपासना होय.

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

सामाजिक आरोग्याचे महत्त्व

देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देशातील लोक, स्वच्छ पर्यावरण, पोषक आहार, निर्धोक पाणी आणि आरोग्य जोपासनेसाठी पुरेशा सोई-सुविधा असतील तर लोकांचे स्वास्थ्य टिकते. म्हणूनच पिण्याच्या पाण्याची काळजी.

तुम्हाला संपूर्ण इतिहास वाचण्यासाठी खाली दिलेल्या टॉपिक वर क्लिक करा 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इयत्ता पाचवी इतिहास – 5th Class History Book

इयत्ता सहावी इतिहास – 6th Class History Book

इयत्ता सातवी इतिहास – 7th Class History Book

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book