इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

१.  पृथ्वी आणि वृत्ते
२.  चला वृत्ते वापरूयात !
३.  तापमान
४.  पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट
५.  हवा व हवामान
६.  महासागरांचे महत्त्व
७.  खडक व खडकांचे प्रकार
८.  नैसर्गिक संसाधने
९.  ऊर्जा साधने
१०.  मानवाचे व्यवसाय

पूर्ण प्रकरण वाचण्यासाठी, कृपया अधोरेखित केलेल्या प्रकरणाच्या नावावर क्लिक करा

१. पृथ्वी आणि वृत्ते

पृथ्वीच्या पूर्व-पश्चिम व उत्तर – दक्षिण या व्यासांची लांबी दाखवली आहे. यावरून तुम्हाला पृथ्वीच्या प्रचंड आकारमानाची कल्पना येईल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील महासागर, जमिनीचा उंचसखल भाग, वने, इमारती व असंख्य लहान-मोठी बेटे यांमुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर अशा उभ्या-आडव्या रेषा काढणे शक्य नाही.                                                          

यावर उपाय म्हणून पृथ्वीची प्रतिकृती म्हणून पृथ्वीगोल मानवाने निर्माण केला. पृथ्वीवरील स्थाननिश्चिती करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पृथ्वीगोलावर काढलेल्या या रेषा प्रत्यक्ष पृथ्वीवर नाहीत. त्या काल्पनिक आहेत.

कोनीय अंतर

कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करण्यासाठी पृथ्वीच्या केंद्रापासून पृथ्वीवर ते कोठे आहे हे पाहिले जाते. ते पाहण्यासाठी त्या स्थानाचा बिंदू व पृथ्वीचे केंद्र यांना जोडणारी सरळ रेषा विचारात घ्यावी लागते. ही रेषा विषुववृत्ताच्या प्रतलाशी पृथ्वीच्या केंद्राजवळ कोन करते. हे कोनीय अंतर स्थान निश्चितीसाठी वापरले जाते.

                          इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

विषुववृत्ताच्या प्रतलाप्रमाणे त्याला समांतर असलेले क्ष बिंदूतून जाणारे प्रतल आकृती १.३ मध्ये दाखवले आहे. त्या प्रतलाची पृथ्वीवरून जाणारी रेषा आकृतीत पहा. या रेषेवरील पृथ्वीवर असणारा कोणताही बिंदू पृथ्वीच्या केंद्राशी ३०° चाच कोन करतो.

२. चला वृत्ते वापरूयात !

महत्वाची वृत्ते 

  विषुववृत्तापासून २३°३०’ उत्तर तसेच २३° ३०’ दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात. पृथ्वीवर इतर भागांत सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत. २३° ३०’ उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त व २३°३०’ दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात.

 

 विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील ६६° ३०’ ही दोन अक्षवृत्ते देखील महत्त्वाची आहेत. विषुववृत्त ते ६६° ३०’ उत्तर व दक्षिण अक्षवृत्ते यादरम्यान वर्षभरात २४ तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. यांना अनुक्रमे आर्क्टिक आणि अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतात.

 ६६° ३०’ उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून ९०° उत्तर व ९०° दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे २४ तासांपेक्षा जास्त असू शकतो. हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त ६ महिन्यांचा असतो. येथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्य क्षितिज समांतर दिसतो.

इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

 सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यांनुसार पृथ्वीवर विविध तापमानांचे पट्टे (कटिबंध) तयार होतात. तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाबपट्टे निर्माण होतात. विविध तापमानांचे पट्टे (कटिबंध) तयार होतात. तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाबपट्टे निर्माण होतात.

३. तापमान

पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यांमुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण पाहिले. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते.                   

तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुवृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे तीन कटिबंधांत (पट्ट्यांत) विभाजन करता येते. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात. परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो.

इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

ते घटक पुढीलप्रमाणे आहेत. समुद्रसान्निध्य, खंडांतर्गतता, समुद्रसपाटीपासूनची उंची  प्राकृतिक रचना या घटकांनुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते. यांशिवायढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औदयोगिकीकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो.

४. पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट

 नकाशे हे द्विमितीय असतात तर पृथ्वीगोल हा त्रिमितीय असतो.

 द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते.

 त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते. तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते.

 नकाशाच्या साह्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो.

• पृथ्वीगोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते.

इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

भूगोल दालन

‘अर्था’ हा जगातील एक सर्वांत मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये मेन (Maine) राज्यात ‘यारमथ्’ (Yarmouth) येथे ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे. या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वे पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे.

५. हवा व हवामान

हवा

एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक जण अनुभवत असतो. तिचे वर्णनही आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते. यालाच आपण त्या ठिकाणची हवा म्हणतो. उदा., थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी.

हवामान

हवामानशास्त्रज्ञ एखादया प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे ‘हवामान’ होय.

उदा. हवामान शीत व कोरडे, उष्ण व दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते. हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता इत्यादींमुळे वारंवार बदल घडताना आढळतात. ही सर्व हवेची मुख्य अंगे आहेत. त्यांचा आपल्या दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो. हवेच्या या अंगांचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो.

हवेची अंगे

तापमान

पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या भूपृष्ठाच्या सान्निध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात. त्यामुळे समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जाऊ तसतसे हवेचे तापमान कमी होते. अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते.

इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

हवेचा दाब

हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो. याला हवेचा दाब म्हणतात. वातावरणाच्या सर्वांत खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब पडतो त्यामुळे हवेची घनता वाढते. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा दाब जास्त असतो. उंचीनुसार तो कमी होतो. हा झाला हवेचा ऊर्ध्व दाब. तापमानातील फरकामुळे देखील हवेच्या दाबात बदल होतो. हे बदल क्षितिज समांतर दिशेत घडतात. त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते.

६. महासागरांचे महत्त्व

पृथ्वीपृष्ठावरील सर्व जलभागांचा समावेश जलावरणात केला जातो. महासागर, समुद्र, नदया, नाले, सरोवरे व जलाशय तसेच भूजल हे सर्व जलावरणाचे घटक आहेत. यांपैकी एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे ९७.७% जल महासागरात आहे.                                                       

आपल्या परिसरातील सजीवसृष्टी आपण नेहमी पाहत असतो. जमिनीवरील सजीवसृष्टीत खूप विविधता आहे. परंतु जमिनीवर असलेल्या एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात राहते ! आणि त्यात कितीतरी अधिक विविधता आहे. (आकृती ६.१)

इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

भौगोलिक स्पष्टीकरण

बशीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बशीत पाण्याच्या जागी सफेद रंगाचा थर साचलेला दिसेल. हा थर चवीला खारट तुरट असतो. हे पाण्यातील क्षार असतात, हे आपल्या लक्षात येईल. पेयजल म्हणून आपण जे पाणी वापरतो त्यामध्ये क्षारांचे प्रमाण कमी असते. महासागर, सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते. म्हणून ते पाणी चवीला खारट लागते.

७. खडक व खडकांचे प्रकार

भूपृष्ठावर व त्याखालीसुद्धा खडक आढळतात. भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. खडकाला दगड, पाषाण, अश्म, शिला किंवा शिळा असेही म्हणतात.

खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खडकांमध्ये सिलिका, ॲल्युमिनिअम, मॅग्नेशिअम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. यांशिवाय इतरही खनिजे असतात.

खडकांचे प्रकार

निर्मितीप्रक्रियेनुसार खडकांचे तीन प्रमुख प्रकार पडतात.

 अग्निजन्य खडक / अग्निज खडक / मूळ खडक गाळाचे खडक / स्तरित खडक

 रूपांतरित खडक

इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

अग्निजन्य खडक

ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस (मॅग्मा) आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थांपासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात.

८. नैसर्गिक संसाधने

पृथ्वीवर अनेक गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात. त्यांपैकी काही गोष्टी आपल्या नेहमीच्या वापर करतोच असे नाही. निसर्गातून उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करायला आपण शिकलो आहोत. उदा., पाणी. ज्या नैसर्गिक घटकांचा मानव वापर करतो, त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात.

नैसर्गिक संसाधने वापरून मानव आपल्या गरजा भागवतो. हवा, पाणी, मृदा, जमीन, खनिजे, वनस्पती आणि प्राणी ही नैसर्गिक संसाधने आहेत. बहुतांशी नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे ती अमूल्य आहेत. यांपैकी हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते.

हे संसाधन कधीही कमी होत नाही. परंतु हवेच्या गुणवत्तेत बदल होऊ शकतो. हवेचा वापर आपण श्वासोच्छ्वासापासून ते अगदी ज्वलन प्रक्रियेपर्यंत करत असतो. आकृती क्र. ८.२ ते ८.१३ यांमधील चित्रांवरून या सर्व घटकांची कल्पना करता येईल.

इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

भौगोलिक स्पष्टीकरण

आकृती ८. २ मध्ये बैलांच्या साहाय्याने शेतकरी जमीन नांगरताना दिसत आहे. शेतकरी जमिनीवरील मृदेचा थर नांगरून जमीन कसण्यायोग्य करतो. या कसलेल्या जमिनीतून विविध प्रकारची पिके घेतो. या पिकांच्या उत्पन्नातून स्वतःची व इतरांची अन्नाची गरज भागवतो. हे सर्व करण्यासाठी जमिनीवर निसर्गतः उपलब्ध असलेली मृदा तो संसाधन म्हणून वापरत असतो.                            

मृदेचा वापर हा जगात सर्वत्र केला जातो आणि म्हणूनच मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे एक महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. मृदा निर्मिती प्रामुख्याने मूळ खडक, हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकांवर अवलंबून असते. यांपैकी हवामान व खडकांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशांत निरनिराळ्या प्रकारची मृदा तयार होते.

९. ऊर्जा साधने

आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण विविध गोष्टी करत असतो. यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज भासते. पूर्वी मानवी श्रमाचा व प्राण्यांचा वापर करून कामे केली जात असत. मानवाच्या गरजा जसजशा वाढत गेल्या तसतसा ऊर्जा साधनांच्या व ऊर्जा स्रोतांच्या वापरामध्येही बदल होत गेला. ही ऊर्जा मानव मुख्यत्वेकरून निसर्गातूनच मिळवतो.                           

इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

 पेट्रोल, वारा, नैसर्गिक वायू, सूर्यप्रकाश, इत्यादी ऊर्जा साधनांचा वापर आपण करतो. याशिवाय इतरही ऊर्जा साधने आहेत. ऊर्जा साधनांचे अनेक प्रकारे वर्गीकरण करता येते. यांत प्रामुख्याने पारंपरिक – अपारंपरिक, जैविक अजैविक, नूतनीकरणीय अनूतनीकरणीय, पदार्थांवर आधारित प्रक्रियांवर आधारित इत्यादी. आपण पदार्थांवर आधारित व प्रक्रियांवर आधारित या वर्गीकरणाचा विचार करणार आहोत.

१०. मानवाचे व्यवसाय

वरील सर्व चित्रे पाळीव प्राणी पाळणे, त्यांच्यापासून दूध मिळवणे, दुधाची विक्री करणे, दुधावर दुग्धप्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे, दुधापासून तूप, लोणी, चीज, श्रीखंड, पनीर, भुकटी इत्यादी पदार्थ बनवणे, त्यांची बाजारात विक्री इत्यादींशी संबंधित आहेत. यासाठी विविध स्तरांवर कामे केली जातात. या सर्व कृती मानव स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी करत असतो. या कृतींच्या स्वरूपावरून, त्यांतून मिळणाऱ्या घटकांनुसार त्यांचे आपण वर्गीकरण करू शकतो.

आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक कृती करत असतो. या कृतींना आपण व्यवसाय, उद्योग, व्यापार म्हणतो. आपण करत असलेल्या या कृतींपैकी काही कृती थेट निसर्गावर आधारित असतात. म्हणजे या कृतींमधून मिळणारे उत्पन्न हे निसर्गाकडून आपल्याला मिळते

जसे, गाई- म्हशी हे प्राणी आहेत. त्यांना आपण पाळतो. चित्र ‘अ’ पहा. त्यांच्यापासून आपल्याला मिळते. त्यामुळे हा व्यवसाय निसर्गावर आधारित आहे. अशा प्रकारे निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात. उदा., पशुपालन, मासेमारी इत्यादी.

प्राथमिक व्यवसायांतील काही उत्पादने आपण थेट वापरतो, तर काही त्यांच्या मूळ रूपात बदल करून वापरतो. आता चित्र ‘उ’ पहा. या चित्रात, मिळालेले दूध हे दूध डेअरीमध्ये आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. म्हणजेच निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती केली जात आहे.

इयत्ता सहावी भूगोल – 6th Class Geography Book

उदा., दुधापासून श्रीखंड, लोणी, चीज व दूध पावडर तयार करणे. हे पदार्थ जास्त टिकाऊ असतात. त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते. त्यामुळे त्यांची किंमतही जास्त असते. अशा प्रक्रिया करण्याला ‘उद्योग’ म्हणतात. उद्योग हे कच्च्या मालावर आधारित असतात. या प्रक्रियेत कच्च्या मालापासून जास्त टिकाऊ पक्का माल तयार होतो.

इयत्ता पाचवीचा भूगोल वाचण्यासाठी खाली दिलेल्या टॉपिक वर क्लिक कर 

इयत्ता पाचवी भूगोल – 5th Class Geography Book

 

तुम्हाला संपूर्ण इतिहास वाचण्यासाठी खाली दिलेल्या टॉपिक वर क्लिक करा 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इयत्ता पाचवी इतिहास – 5th Class History Book

इयत्ता सहावी इतिहास – 6th Class History Book

इयत्ता सातवी इतिहास – 7th Class History Book

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book