पूर्ण प्रकरण वाचण्यासाठी, कृपया अधोरेखित केलेल्या प्रकरणाच्या नावावर क्लिक करा
१. भारतीय उपखंड आणि इतिहास
इयत्ता पाचवीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो, हे विस्ताराने पाहिले. आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते, हे पाहिले. अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषिप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला, याचा आपण आढावा घेतला.
इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते.
इयत्ता सहावी इतिहास – 6th Class History Book
२. इतिहासाची साधने
आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. इतिहासाची साधने तीन प्रकारची आहेत: भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने.
३. हडप्पा संस्कृती
हडप्पा संस्कृती इ. स. १९२१ मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. या संस्कृतीला ‘सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे ६५० किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले, त्यांच्यात कमालीचे साम्य होते. धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले आहेत.
४. वैदिक संस्कृती
वेदकाळात एकत्र कुटुंबपद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजे ‘गृहपती’ असे गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध मातापिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्याची पत्नी आणि मुले, त्याच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश असे. ही कुटुंबव्यवस्था पुरुषप्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले.
इयत्ता सहावी इतिहास – 6th Class History Book
५. प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह
वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधींमधील बारीकसारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. इतरांना ते मिळवण्याची मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला, यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले.
त्यामुळेच उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधींपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यांवर भर देणारा होता. सर्वसामान्यांना समजायला अवघड होता. त्यामुळे विशिष्ट देवतांच्या उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. जसे, शिवभक्तांचा शैवपंथ आणि विष्णुभक्तांचा वैष्णवपंथ. या देवतांच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली.
६. जनपदे आणि महाजनपदे
साधारणपणे इ.स.पू. १००० ते इ.स.पू. ६०० हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्ये होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या ‘अश्मक’ या जनपदाने व्यापलेला होता.
इयत्ता सहावी इतिहास – 6th Class History Book
संस्कृत पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते. त्यांतील काही जनपदांमध्ये राजेशाही होती. काहींमध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची ‘गणपरिषद असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत, त्या सभागृहास ‘संथागार’ असे म्हटले जाई. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती.
७. मौर्यकालीन भारत
ग्रीक सम्राट अलेक्झांडर ऊर्फ सिकंदर याने इ.स.पू. ३२६ मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. तरीही पंजाबपर्यंत पोचण्यात सिकंदर यशस्वी झाला, मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या.
त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. सिकंदराला माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना ‘सत्रप’ असे म्हटले. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन येथे इ.स.पू. ३२३ मध्ये तो मरण पावला.
हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते, त्यांनी त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला.
८. मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये
सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते. मौर्यांचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहद्रथाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. त्या राजांना ‘इंडो-ग्रीक राजे’ असे म्हटले जाते.
इयत्ता सहावी इतिहास – 6th Class History Book
प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. ती पुढे भारतात रुजली. इंडो-ग्रीक राजांमध्ये मिनँडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली होती. मिनँडर म्हणजेच मिलिंद.
९. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये
दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील तीन राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो. चेर, पांड्य आणि चोळ या त्या राजसत्ता होत. या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत्या. त्यांचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये करण्यात आला आहे. तमिळ भाषेतील संघम साहित्यात या तीन राजसत्तांचा उल्लेख आहे.
मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्यांचा उल्लेख आहे. ‘पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी’ या पुस्तकात ‘मुझिरीस’ हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्त्वाचे बंदर असल्याचे म्हटले आहे. हे बंदर चेर राज्यात होते. मुझिरीस या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे.
१०. प्राचीन भारत : सांस्कृतिक
प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना ‘श्रेणी’ असे म्हणत. सागरी आणि खुश्कीच्या मार्गांनी व्यापार चालत असे. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती.
११. प्राचीन भारत आणि जग
हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हापासूनच भारताची बाह्य जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू होती. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढीस लागला. त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले. त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला. पुढे सिकंदर ज्या मार्गांनी आला, ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमधील व्यापारासाठी खुले झाले.
Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History
इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा