इयत्ता सातवी इतिहास – 7th Class History Book

7th-Class-History-Book

इतिहासाची साधने
शिवपूर्वकालीन भारत
धार्मिक समन्वय
शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
स्वराज्यस्थापना
मुघलांशी संघर्ष
स्वराज्याचा कारभार
आदर्श राज्यकर्ता
मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम
१० मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार
११ राष्ट्ररक्षक मराठे
१२ साम्राज्याची वाटचाल
१३ महाराष्ट्रातील समाजजीवन

पूर्ण प्रकरण वाचण्यासाठी, कृपया अधोरेखित केलेल्या प्रकरणाच्या नावावर क्लिक करा

१. इतिहासाची साधने

भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केला आहे. यावर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या नवव्या शतकापासून ते अठराव्या शतकाअखेरपर्यंतचा मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत.

इयत्ता सातवी इतिहास – 7th Class History Book

भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार, शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात.

२. शिवपूर्वकालीन भारत

या पाठात आपण शिवपूर्वकाळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या. आठव्या शतकातील ‘पाल’ हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनोज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला.

उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होत. राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मुहम्मद घोरीचा पराभव केला. मात्र तराईच्या दुसऱ्या युद्धात मुहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान याचा पराभव केला.

३. धार्मिक समन्वय

भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे. मध्ययुगीन भारतातील समाजजीवनामध्येही या तत्त्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.

इयत्ता सातवी इतिहास – 7th Class History Book

भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या. त्यांनी ईश्वरभक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला. यासंबंधीची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. भारतीय धर्मजीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्तिमार्गास महत्त्व आले.

४. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ताविस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्दी लोकांच्या वस्त्या होत्या.

याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगिजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते; तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमांतून वखारींच्या रूपात चंचुप्रवेश केला होता.

५. स्वराज्यस्थापना

सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व उदयास आले. त्यांनी येथील अन्यायी राजसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म शके १५५१, फाल्गुन वदय तृतीयेस म्हणजेच १९ फेब्रुवारी, १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत.

इयत्ता सातवी इतिहास – 7th Class History Book

६. मुघलांशी संघर्ष

आतापर्यंत शिवाजी महाराजांनी आदिलशाहीशी यशस्वी संघर्ष केलेला होता; परंतु स्वराज्याचा विस्तार करताना मुघलांशीही संघर्ष अटळ होता. स्वराज्याचा विस्तार होऊ लागताच स्वराज्यावर मुघलांचे संकट आले. महाराजांनी याही संकटावर मात केली. मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवले. स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली. या सर्व घटनांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.

शायिस्ताखानाची स्वारी : फेब्रुवारी १६६० मध्ये शायिस्ताखान अहमदनगरहून निघून पुणे प्रांतात आला. त्याने आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैन्याच्या तुकड्या पाठवून स्वराज्यातील प्रदेशाची जबर हानी केली. चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा याने त्याच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला. परंतु शेवटी त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला.

७. स्वराज्याचा कारभार

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. स्वराज्याचा विस्तार झाला. या स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यांमधील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता.

इयत्ता सातवी इतिहास – 7th Class History Book

तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यांतील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झाला होता. अशा रीतीने विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा, त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे, यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. याविषयीची माहिती आपण घेणार आहोत.

८. आदर्श राज्यकर्ता

स्वराज्यस्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्दी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीस सामोरे गेले. त्यांनी स्वतंत्र व सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. स्वराज्याचे सुराज्य केले. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टीच निर्माण केली.

स्वराज्यस्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले. अफलजखान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शायिस्ताखानावरील छापा, आग्यातून करून घेतलेली सुटका हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते. त्यांनी या सर्व प्रसंगांवर यशस्वी मात केली. त्यांतून ते सुखरूपपणे बाहेर पडले.

९. मराठयांचा स्वातंत्र्यसंग्राम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्यरक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. या सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला ‘मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम’ असे म्हणतात.

इयत्ता सातवी इतिहास – 7th Class History Book

इ.स. १६८२ मध्ये तर खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेत चालून आला. तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणींवर मात करून मराठे विजयी झाले. हा स्वातंत्र्यसंग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे. आपण या पाठात या स्वातंत्र्यसंग्रामाचा अभ्यास करणार आहोत.

१०. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार

मराठ्यांनी केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या आरंभी मुघल सत्ता आक्रमक होती, तर मराठ्यांचे धोरण बचावाचे होते. या स्वातंत्र्यसंग्रामाच्या अखेरीस मात्र परिस्थिती उलट झाली. मराठ्यांनी चढाईचे आणि मुघलांनी बचावाचे धोरण स्वीकारले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांनी मुघल सत्तेला नमवून जवळजवळ भारतभर आपला सत्ताविस्तार केला, त्याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत.

११. राष्ट्ररक्षक मराठे

शाहू महाराजांनी बाजीरावानंतर त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याला पेशवाईची वस्त्रे दिली. नादिरशाहाच्या आक्रमणानंतर दिल्लीमध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत उत्तरेमध्ये मराठ्यांची सत्ता स्थिर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. या काळात अहमदशाह अब्दालीने पानिपतावर मराठ्यांच्या समोर आव्हान निर्माण केले. या सर्व घडामोडींची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.

१२. साम्राज्याची वाटचाल

आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय व विस्तार पाहिला. स्वराज्य स्थापनेपासून ते साम्राज्यापर्यंतचा प्रवास कसा कसा झाला ते आपण अभ्यासले. मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्यविस्तार झाला, त्यासाठी ज्या सरदार घराण्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत.

इयत्ता सातवी इतिहास – 7th Class History Book

१३. महाराष्ट्रातील समाजजीवन

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. रयतेचे कल्याण व्हावे, लोकांवर जुलूम होऊ नये, महाराष्ट्र धर्माचे रक्षण व्हावे असा त्यांचा उदात्त हेतू होता. शिवाजी महाराजांनंतरच्या काळातही मराठी राज्याचा भारतभर विस्तार झाला. मराठ्यांची सत्ता सुमारे १५० वर्षे टिकून राहिली. मराठी राज्याच्या कारभाराची माहिती आपण मागील पाठांत अभ्यासली. या पाठात आपण त्या काळातील सामाजिक स्थिती व लोकजीवन यांविषयी माहिती घेणार आहोत.


Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)


छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा