8th Class History Book – इयत्ता आठवी इतिहास

8th-Class-History-Book

इतिहासाची साधने
युरोप आणि भारत
ब्रिटिश सत्तेचे परिणाम
१८५७ चा स्वातंत्र्यलढा
सामाजिक व धार्मिक प्रबोधन
स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ
असहकार चळवळ
सविनय कायदेभंग चळवळ
स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व 
१० सशस्त्र क्रांतिकारी चळवळ
११ समतेचा लढा
१२ स्वातंत्र्यप्राप्ती
१३ स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती
१४ महाराष्ट्र राज्याची निर्मिती

पूर्ण प्रकरण वाचण्यासाठी, कृपया अधोरेखित केलेल्या प्रकरणाच्या नावावर क्लिक करा

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book

१. इतिहासाची साधने

प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक्, श्राव्य आणि दृक्-श्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो.

भौतिक साधने : इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल.

इमारती व वास्तू : आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वास्तू बांधल्या गेल्या.

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book

या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक इमारती आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली. उदा., अंदमान येथील सेल्युलर जेल.

२. युरोप आणि भारत

प्रबोधनयुग : युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला ‘प्रबोधनयुग’ असे म्हणतात.

प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांत ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधनकाळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रांत आपणांस प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले.

३. ब्रिटिश सत्तेचे परिणाम

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना : भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या हे आपण पाहिले आहे. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले.

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book

इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगिजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज- पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. परंतु, भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले.

४. १८५७ चा स्वातंत्र्यलढा

१८५७ साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. हा लढा काही अचानक उद्भवला नाही. त्यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले होते. १८५७ च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकातून ही मांडणी केली त्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.

१८५७ पूर्वीचे लढे : भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली, तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरांतून शोषण होत आहे याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली आणि या सत्तेविरुद्ध असंतोषही वाढत गेला.

शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली. अशातच १७७० मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. इंग्रजी राज्यकर्त्यांचे जनतेशी वर्तन मात्र उदासीन व संवेदनशून्य राहिले. सन १७६३ ते १८५७ या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकिरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले.

५. सामाजिक व धार्मिक प्रबोधन

इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच पाश्चिमात्त्य विचार, संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत बदल झाले.

भारतीय समाजाचे मागासलेपण त्यांच्या अंधश्रद्धा, रूढिप्रियता, जातिभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यांत आहे, याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतिपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता.

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book

या तत्त्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला ‘भारतीय प्रबोधन’ असे म्हणतात.

६. स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ

इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाजजीवनावर संमिश्र परिणाम झाले. नवसुशिक्षित समाजाने घडवून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण झाले. भारताच्या विविध भागांतील चळवळीमुळे वेगवेगळ्या प्रांतांतील राजकीय संस्थांचे एकसूत्रीकरण करणे, राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या विविध गटांना आणि व्यक्तींना एकत्र आणणे आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधून राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करणे यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण : ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला. देशभर समान धोरणे, सर्वांना कायदयासमोर समान दर्जा यामुळे लोकांमध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली.

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book

ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोईसाठी व लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वे, रस्ते यांचे जाळे उभारले. परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला. भारताच्या विविध प्रांतांतील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील संवाद वाढला व राष्ट्रभावना वाढीला लागली.

७. असहकार चळवळ

१९२० ते १९४७ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड ‘गांधीयुग’ या नावाने ओळखला जातो. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.

गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील कार्य : महात्मा गांधी १८९३ मध्ये वकिलीच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले होते. दक्षिण आफ्रिका ही इंग्लंडची एक वसाहत होती. तेथे उद्योग, व्यापार व अन्य कामधंदयासाठी अनेक भारतीय स्थायिक झाले होते. तेथील हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखे वागवले जाई.

८. सविनय कायदेभंग चळवळ

लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती.

परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले.मीठ हा सामान्य जनतेच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादणे अन्यायकारक होते.

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book

त्यामुळे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. मिठाचा सत्याग्रह हा प्रतीकात्मक होता. ब्रिटिश सरकारचे जुलमी व अन्यायकारक कायदे शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मोडणे हा यामागचा व्यापक हेतू होता.मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली.

९. स्वातंत्र्यलढ्याचे अंतिम पर्व

१९३५ चा कायदा : या कायद्याने भारतात ब्रिटिशशासित प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. यानुसार ब्रिटिशशासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता.

संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्तता राहणार नव्हती, त्यामुळे संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला. म्हणून या कायदयातील संघराज्याची योजना अमलात आली नाही.

प्रांतिक मंत्रिमंडळे : १९३५ च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही, तरीही या कायदयानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदेमंडळांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेने भाग घेण्याचे ठरवले. १९३७ मध्ये देशातील अकरा प्रातांमध्ये निवडणुका झाल्या.

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book

त्यांपैकी आठ प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली. तीन प्रांतांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने तेथे संमिश्र मंत्रिमंडळे बनवण्यात आली.

१०. सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध भारतात विविध मार्गांनी आंदोलने झाली. त्यांतील एक मार्ग सशस्त्र क्रांतीचा होता. त्याची ओळख आपण या पाठात करून घेणार आहोत.

सन १८५७ पूर्वी इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेले उठाव आणि १८५७ चा स्वातंत्र्यलढा यांचा अभ्यास आपण केला आहे. त्यानंतरच्या काळात रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन केले होते.

वासुदेव बळवंत फडके : महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे अशी त्यांची धारणा झाली. त्यांनी वस्ताद लहूजी साळवे यांच्याकडे शस्त्रविद्येचे शिक्षण घेतले.

ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी रामोशी बांधवांना संघटित वासुदेव बळवंत फडके करून बंड पुकारले. हे बंड अयशस्वी झाले. ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात केली. तेथेच त्यांचा १८८३ मध्ये मृत्यू झाला. स्वातंत्र्यासाठी त्यांनी सशस्त्र लढा उभारला.

११. समतेचा लढा

आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय स्वातंत्र्यांचा लढा महत्त्वाचा होता. हा लढा मानवमुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला.

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book

स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्त्वही फार महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाजघटकांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले. त्याचे भान ठेवल्याशिवाय आधुनिक भारताची जडणघडण समजू शकणार नाही, म्हणून आपण अशा काही चळवळींचा अभ्यास करूया.

१२. स्वातंत्र्यप्राप्ती

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्यलढा व्यापक झाला होता. भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढत होता. त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकार विविध योजना तयार करू लागले.

राष्ट्रीय सभेची उभारणी धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर झाली होती. राष्ट्रीय आंदोलनात सर्व जाती-धर्माचे लोक सामील झालेले होते. ही चळवळ कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी ‘फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. त्याचा परिणाम ‘मुस्लीम लीग’ची स्थापना होण्यात झाला. १९३० साली डॉ. मुहम्मद इक्बाल या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार मांडला.

१३. स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती

भारत स्वतंत्र झाला तरी स्वातंत्र्यलढा अद्याप संपलेला नव्हता. भारतात अनेक संस्थाने होती. संस्थानांना भारतात सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा हक्क मिळालेला होता. त्यामुळे अखंड भारताचे राष्ट्रीय सभेचे स्वप्न अपुरे राहिले होते. संस्थाने स्वतंत्र राहिल्यामुळे भारताचे अनेक तुकडे पडणार होते. पोर्तुगीज आणि फ्रेंच सत्तांनी भारतातील काही भागांवरील सत्ता सोडून दिलेली नव्हती, पण हे प्रश्न भारताने खंबीरपणे सोडवले. त्याची माहिती आपण या पाठात घेऊ.

संस्थानांचे भारतात विलीनीकरण : भारतात लहान-मोठी अशी सहाशेच्यावर संस्थाने होती. असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे संस्थानांमध्ये राजकीय जागृतीला सुरुवात झाली. संस्थानांमध्ये प्रजामंडळे स्थापन होऊ लागली.

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book

प्रजामंडळे म्हणजे संस्थानांतील प्रजेच्या हितासाठी व त्यांना राजकीय अधिकार मिळावे यासाठी काम करणाऱ्या जनसंघटना होत्या. १९२७ मध्ये अशा प्रजामंडळांची मिळून एक अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आली.त्यामुळे संस्थानांमधील चळवळीला चालना मिळाली.

१४. महाराष्ट्र राज्याची निर्मिती

भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इ.स. १९४६ पासून सुरू झाली. अनेक स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

पार्श्वभूमी : मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाचा विचार विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केला. १९९१ मध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली.

त्या पार्श्वभूमीवर न. चिं. केळकर यांनी लिहिले की, ‘मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अमलाखाली असावी.’ लोकमान्य टिळकांनी १९१५ साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती. परंतु त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने हा प्रश्न मागे पडला.

इयत्ता आठवी इतिहास – 8th Class History Book 8th Class History Book

१२ मे १९४६ मध्ये बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला.


Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)


छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा