Balshastri Jambhekar in Marathi
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ रोजी महाराष्ट्रातील पोंभुर्ले गावात झाला हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात आहे. हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. विश्वविख्यात माध्यमतज्ज्ञ ए.ए. बेर्जर यांनी म्हटले आहे की, वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारधारानुसार जवळपास 183 वर्षापूर्वी म्हणजे 6 जानेवारी 1832 रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला.
त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या महान कार्याची महती सांगणारा हा लेख. अर्थातच 1832 चा काळ इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता आणि या काळात समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती.
इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळशास्त्रींना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘दर्पण’ या पाक्षिकाची सुरूवात मुंबई येथे करुन मराठी वृत्तपत्र इतिहासाची ज्योत पेटविली.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: बाळशास्त्री इंग्रजी मजकुराची बाजू ‘दर्पण’ साठी सांभाळत. त्यामुळे ‘दर्पण’ तील मजकुराचा दर्जा उच्च स्वरुपाचा होता. त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग त्यांनी करुन घेतला आणि समाजप्रबोधनासाठी दर्पणची ठिणगी तेवत ठेवली. 25 जून 1840 साली दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. दर्पण हे मासिक इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले. त्यांचे वडील गंगाधरशास्त्री व आई सगुणाबाई होत्या. बाळशास्त्री हे लहानपणापासूनच बुद्धिजीवी व हुशार असल्याने, त्यांच्या शिक्षकांनी त्यांना ‘बाल बृहस्पती’ असे म्हटले आहे. त्यांची स्मरणशक्ती जबरदस्त होती.
वयाच्या तेराव्या वर्षीच त्यांनी रामदास, तुकाराम, मोरोपंत व वामन यांच्या कविता आणि संस्कृत, गीतापठण, पदपठण व पंचकाव्याचा अभ्यास केला होता. इ.स. १८२५ मध्ये ते मुंबईला आले आणि त्यांनी इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. त्यांनी गणितामध्ये विशेष प्रावीण्य मिळविल्याने, त्यांनी शिक्षण घेत असतानाच १५ रू. पगारावर गणिताचे अध्यापक म्हणून काम केले. संस्कृत, मराठी, इंग्रजी, गुजराती, बंगाली व पारशी भाषा त्यांना अवगत होत्या. १७ मे १८४६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
Click on below links to read more | अधिक पढ़ने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें
Swami Dayanand Saraswati in Hindi – स्वामी दयानंद सरस्वती हिंदी
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
जस्टीस ऑफ पीस किताब
केवळ वृत्तपत्रांद्वारे शैक्षणिक कार्य त्यांनी केले. वृत्तपत्रांसारखे माध्यम आणि त्याची बिकट वाट हे गणित बाळशास्त्रींनी चांगलेच जमविले. केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन ‘दर्पण’ प्रकाशित केले. याची साक्ष म्हणजे ‘दर्पण’ मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही.
अगदी स्वत:चे पैसे टाकून जवळपास आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र त्याकाळी सुरु ठेवले. यावरुनच आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा वृत्तपत्र सुरू करण्यामागील हेतू स्पष्ट होतो. तत्कालीन गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी जस्टीस ऑफ पीस असा किताब देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला.
नोकरी :- विद्यार्थीदशेतच जांभेकरांना गणिताचे अध्यापक म्हणून काम करावे लागले होते. त्यांनी सरकारतर्फे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणूनही काम केले. तेथेच त्यांनी कानडी भाषा अवगत केली. त्याठिकाणी त्यांनी दोन वर्षे वास्तव्य केले. इ.स. १८३४ मध्ये मुंबईत एलफिन्स्टन कॉलेज सुरू झाले.
याचवर्षी जांभेकर या कॉलेजात सहाय्यक प्राध्यापक झाले. येथे त्यांनी गणित, भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र या विषयांचे अध्यापन केले. पुढे ते शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक व मुंबई प्रांतातील मराठी शाळांचे सरकारनियुक्त निरीक्षक झाले.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
समाजसेवा :- बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिले समाजप्रबोधनकार ठरतात. त्यांनी कुटुंब पोषणाची जबाबदारी दुय्यम मानून समाजसेवेला प्राधान्य दिले. देशात परकीय राजवट स्थिर झाली. पाश्चात्य शाळा व संस्कृतीचे पदार्पण झाले. परिणामी समाज द्विधा मनःस्थितीत अडकला. तो अंधारात चाचपडू लागला.
अशा प्रसंगी जांभेकरांनी व्यापक दृष्टीने विचार करून समाजजागृती केली व त्यास योग्य मार्ग दाखविला. आपले राज्य का गेले? इंग्रजांचे राज्य या देशात का आले? याचे अचूक निदान जांभेकरांनी केले. ज्ञान आणि विज्ञानाचा प्रसार झाल्याशिवाय सामर्थ्य निर्माण होणार नाही, याची जांभेकरांना जाणीव झाली होती.
वाङ्मयीन कार्य :- बाळशास्त्री जांभेकर हे इतिहास संशोधक होते. इ.स. १८४६ मध्ये ते प्राचीन शिलालेखाच्या वाचनासाठी वनवेश्वर येथे गेले होते. त्यांनी इतिहास, गणित, भूगोल, मानसशास्त्र, व्याकरण, समाजसुधारणेवर लेखन केले. त्यांनी पुढील ग्रंथ लिहिले.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
१. बालव्याकरण, १८३६
२. सार संग्रह, १८३७
३. हिंदुस्तानचा इतिहास, १८४६
४. संधेचे भाषांतर
५. इंग्लंड देशाची खबर, खंड १ व २, १८३२
६. हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास, १८४९
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
७. हिंदुस्तानातील इंग्रजी राज्यांचा इतिहास
८. शून्यलब्धी
९. नीतिकथा, १८३८
१०. भूगोलविद्या, १८३६
११. ज्योतिषशास्त्र, १८३५
१२. भूगोल विद्येची नीतितत्त्वे
१३. ज्ञानेश्वरी
१४. पुनर्विवाह प्रकरण
१५. मानस शक्तीविषयीचे शोध
त्यांनी शिलालेख व ताम्रपटावर लिहिलेले शोधनिबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियमकालिकात प्रसिद्ध केले आहेत.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
बहुभाषी पंडित :- इ.स. १८२६ मध्ये मुंबईच्या इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच त्यांनी बरेच अध्ययन केले होते. मोडी, मराठी, रामदास, मोरोपंत, तुकाराम, वामन पंडित यांचे काव्य, वेद, संस्कृत गीतापाठ, अमरकोश, पंचमहाकाव्ये व लघुकौमुदी यांचे अध्ययन केले.
गणित व ज्योतिषशास्त्र या विषयांचे अध्ययन त्यांनी प्रो. अर्लिबार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. संस्कृत, लॅटिन, फ्रेंच, १. गुजराती, इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू, बंगाली व भाषा त्यांना अवगत होत्या.
विविध जबाबदाऱ्या :- इ.स. १८३० मध्ये जांभेकर हे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये डेप्युटी नेटिव्ह सचिव झाले. यानंतर त्यांनी अनेक पदे भूषविली. अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्फिस्टन महाविद्यालयात पहिले सहाय्यक प्राध्यापक, ज्युनिअर कॉलेज स्कूलचे प्राचार्य, कुलाबा वेधशाळेचे संचालक, तत्कालीन मुंबईच्या कोर्टाचे ज्युरीचे सदस्य व कार्यकारी ऑफ पीस, लंडनच्या जिऑग्राफिकल सोसायटी शाखा, मुंबईचे सदस्य व कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी अशी अनेक पदे त्यांनी भूषविली.
समाजप्रबोधनाचे अग्रदूत :- जांभेकर यांनी एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात घडून आलेल्या समाजप्रबोधनाचे अग्रदूत म्हणून मोठी कामगिरी केली. त्यांनी केवळ ३६ वर्षांच्या आयुष्यात समाजसुधारक, पत्रकार, इतिहास, संशोधक, लेखक, बहुभाषातज्ज्ञ, पाश्चात्य शिक्षणाचे पुरस्कर्ते व एक शिक्षणप्रसारक म्हणून कार्य पार पाडले.
इ.स. १८१८ मध्ये पेशवाईचा शेवट झाला व महाराष्ट्र इंग्रजांच्या कार्य केले. विद्या हे बळ आहे, असे त्यांचे मत होते. तंत्रज्ञान शिकविणाऱ्या शाळांचेही प्रतिपादन जांभेकरांनी केले.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
मराठीतील पहिले पत्रकार :- जांभेकर हे मराठीतील पहिले पत्रकार होत. स्वदेशात विलायतेतील शिक्षणाचा अभ्यास व्हावा, असे त्यांना वाटत होते. त्यांनी समाजजागृती, ज्ञानप्रसार व लोककल्याणासाठी १२ नोव्हेंबर १८३१ मध्ये ‘दर्पण’ वर्तमानपत्राची घोषणा केली. ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक निघाला.
‘दर्पण’ हे पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र होते. ते सुरवातीस चार महिने पाक्षिक व नंतर साप्ताहिक झाले. १ जुलै १८४० मध्ये ‘दर्पण’ बंद झाले. ‘दिग्दर्शन’ हे पहिले मासिक सुरू करण्याचा मानही त्यांनाच जातो. त्यांच्याच प्रेरणेने ‘प्रभाकर’ व ‘उपदेशचंद्रिका’ ही नियतकालिके निघाली.
स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते : बालविवाह, पुनर्विवाह, सतीप्रथा याबद्दल जांभेकरांनी सर्वप्रथम लिखाण केले व या प्रथांना विरोध केला. स्त्रीशिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते ठरतात. त्यांनी देशाच्या इतिहासाचा प्रथम अभ्यास केला व इतिहास समोर ठेवून प्रत्येकाने जगले पाहिले, असा त्यांचा संदेश होता.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
त्यांनी हिंदू स्त्रियांच्या समस्यांकडे समाजसुधारकांचे प्रथम लक्ष वेधले. त्यांनी समाजप्रबोधनाचे फार मोठे कार्य केले. त्यांनी अनेक धर्मांतरितांचे शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्मात घेतले. जगन्नाथ शंकर शेठ यांना त्यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या तावडीतून वाचविले.
शैक्षणिक कार्य :- बाळशास्त्री जांभेकरांनी शिक्षक, प्राध्यापक, लेखक, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून केलेले शैक्षणिक कार्य उल्लेखनीय ठरते.. इ.स. १८३० मध्ये त्यांची बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे डेप्युटी सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली, तर इ.स. १८३२ मध्ये ते याच संस्थेचे सेक्रेटरी झाले.
त्यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात गणित, खगोलशास्त्र व भौतिकशास्त्र या विषयांचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. ते विज्ञान व वाड्मयाचे तज्ज्ञ होते. सुरवातीच्या काळात त्यांनी पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया घातला. ते मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळांच्या तपासणीचे सरकारी निरीक्षक होते, ते इंग्रजी शिक्षणाचे समर्थक होते.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
पुणे येथे इंग्रजी शाळा सुरू झाली होती, तेव्हा २१ सप्टेंबर १८३२ रोजी ‘दर्पण’ अंकात जांभेकरांनी दखल घेतली व त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व वृत्तपत्रीय क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा व आदर्श राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासून घेतला होता.
शिक्षणामुळे आपला राजकीय, सांस्कृतिक व आर्थिक विकास होतो, असे जांभेकरांचे मत होते. त्यांनी इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांवर कठीण श्रम करून पाठ्यपुस्तके तयार केली व शिक्षणाचा पाया घातला. विद्याभिलासी व्हा, विद्याभ्यास करा, लोकांना शिक्षण द्या, लोकांत देशाभिमान व स्वधर्माभिमान निर्माण करा, असा त्यांनी समाजाला उपदेश केला. त्यांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला.
सामाजिक कार्य :- सामाजिक कार्य सुधारणेच्या क्षेत्रात जांभेकर आघाडीवर होते. त्यांनी पाश्चात्य ज्ञान व इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार केला; परंतु त्यांना हिंदू संस्कृती व धर्माचा स्वाभिमान होता. त्यांनी धर्मभावनेला उदार बनविले पाहिजे, असे प्रतिपादन केले. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा बंद पाडल्या पाहिजेत, असे त्यांचे मत होते.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
त्यांनी विधवा विवाह व स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. परधर्मात गेलेल्या हिंदूचे शुद्धीकरण करून त्यांना स्वधर्मात घ्यावे, असे त्यांचे मत होते. नारायण व श्रीपती ही शेषाद्री ब्राह्मणाची मुले होती. मिशनऱ्यांच्या शाळेतील सहवासाने नारायणने ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली.
त्यापाठोपाठ श्रीपती हाही ख्रिश्चन होऊ नये म्हणून जांभेकरांनी त्यांच्या वडिलास पुढे करून सर्वोच्च न्यायालयाकडून श्रीपतीचा ताबा घेतला. श्रीपतीने धर्मांतर केले नव्हते; पण त्याने मिशनऱ्यांच्या शाळेत शिक्षण घेतले व पाट्र्यांच्या घरात राहिला म्हणून सनातनी ब्राह्मण त्यास हिंदू धर्मात घेण्यास तयार नव्हते.
त्यामुळे जांभेकरांनी श्रीपतीच्या शुद्धीकरणास धर्मशास्त्रज्ञ व करवीर मठाच्या शंकराचार्यांची आज्ञा मिळविली व त्याचे शुद्धीकरण करून त्यास स्वधर्मात घेतले. या प्रकरणाने मुंबईत खळबळ उडाली, तसेच जांभेकरांना ब्राह्मणवर्गाने खूप त्रास दिला. सामाजिक व धार्मिक सुधारणा या बुद्धिवादाने व तारतम्याने केल्या पाहिजेत, अशी भूमिका असल्यामुळेच जांभेकरांना आद्य समाजसुधारक म्हटले जाते.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
सरकार व धर्मकारण :- बाळशास्त्री जांभेकरांचा हिंदू धर्मावर विश्वास होता. ते स्वधर्माचे अभिमानी होते. ते धर्मपालनात आघाडीवर होते. सरकारने शासनव्यवहार व शिक्षणव्यवस्थेत धार्मिक तटस्थतेचे धोरण स्वीकारले पाहिजे, असे जांभेकरांना वाटत होते. सरकारने शिक्षणविषयक धोरणात धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व अंगिकारावे नसता अनर्थ ओढवतात असे जांभेकरांना वाटत होते.
यामुळेच प्रजेच्या धर्मकारणात सरकारचा हस्तक्षेप नको आहे. धर्मशिक्षण दिले पाहिजे; पण ही जबाबदारी त्या-त्या समाजाने पार पाडली पाहिजे, असेही त्यांचे मत होते.
दर्पण :- जांभेकर हे मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत. त्यांनी ६ जानेवारी १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. २० जून १८४० मध्ये या वृत्तपत्राचा शेवटचा अंक निघाला. त्यानंतर हे पत्र लिमिटेड सर्व्हिस गॅझेट अॅण्ड लिटररी क्रोनिकल या पत्रात विलीन केले गेले.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
‘दर्पण’चा खप ३०० होता. त्या काळात कोणतेही वृत्तपत्र ४०० पेक्षा अधिक खपत नव्हते. हैं: वृत्तपत्र इंग्रजी व मराठी असे द्विभाषी होते. ते आठ पृष्ठांचे होते व त्याचा आकार १९x१९.५ इंच एवढा होता. त्यांची वार्षिक वर्गणी ६ रूपये होती. या पत्राचे हेतू पुढीलप्रमाणे होते.
१. पाश्चात्य ज्ञानाचा देशी लोकांना परिचय करून देणे.
२. पाश्चात्य ज्ञान व विद्येद्वारे लोकांचा विकास करणे.
३. लोकांचे कल्याण करणे.
४. लोकांना हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणे.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
‘दर्पण’ या वृत्तपत्राने सामाजिक व आर्थिक विकासाला चालना दिली. हिंदू विधवांचा वाह, व्यावसायिक शिक्षणाची आवश्यकता, लोकभ्रम दूर करणे, लोकांना ज्ञानात्मक मार्गदर्शन, समाजसुधारणाविषयक विचार आणि शिक्षणाचे महत्त्व या बाबींतही या वृत्तपत्राने जागृती केली. जांभेकरांनी इंग्रज सरकार आणि भारतीय समाजाची मने सांभाळून समाजसुधारणेची जबाबदारी पार पाडली.
वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही, राष्ट्रनिष्ठा, ईहवाद, भौतिकवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद इत्यादी पाश्चात्य सुधारणांची तत्त्वे ‘दर्पण’ मध्ये लेख लिहून समाजासमोर मांडली. याच तत्त्वांमुळे नवमहाराष्ट्राची जडणघडण झाली. जांभेकरांनी ‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे समता आणि व्यक्तीस्वातंत्र्य या तत्त्वावर समाजाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला.
वृत्तपत्र हे ज्ञानप्रसार आणि लोकजागृतीचे प्रभावी साधन आहे. जांभेकरांनी या प्रभावी साधनाचा उपयोग नवसमाज उभारणीसाठी केला. इ.स. १८४० मध्ये ‘दर्पण’ वृत्तपत्र बंद पडले. यानंतर त्यांनी ‘दिग्दर्शन’ हे साप्ताहिक सुरू केले. या वृत्तपत्रातूनही त्यांनी लोकजागृतीचे काम केले.
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
भारतीय लोक बुद्धिजीवी, कार्यकुशल, विश्वासू आणि प्रामाणिक आहेत. त्यांना प्रशासनात सामावून घेतले पाहिजे, असा विचार जांभेकरांनी ‘दर्पण’मध्ये मांडला होता; परंतु सरकारने भारतीयांना प्रशासकीय सेवेत घेतले नाही. त्यामुळे त्यांनी खेदही व्यक्त केला होता.