Bhau Daji Lad – भाऊ दाजी लाड

Bhau-Daji-LadBhau Daji Lad

डॉ. भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड होते. ते शेणवी जातीत इ.स. १८२४ मध्ये त्यांच्या आजोळी म्हणजेच मांजरा येथे जन्माला आले.

त्यांचे मूळ गाव गोव्यातील पेडणे तालुक्यातील पार्से हे होते. इ.स. १८३३ मध्ये त्यांचे वडील रामचंद्र लाड हे उद्योगानिमित्त मुंबईला आले व तेथेच ते स्थायिक झाले.

भाऊ लाड हे थोर समाजसुधारक होते. मुंबई हीच त्यांची कर्मभूमी होती. ३१ मे १८७४ मध्ये त्यांचे निधन झाले.

Bhau Daji Lad – भाऊ दाजी लाड

शिक्षण :- डॉ. भाऊ दाजी लाड हे बद्धिमान होते.  त्यांनी मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर इ.स. १८३६ मध्ये इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला.

इ.स. १८४० मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून नेमणूक झाली. काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम केले.

शिक्षणक्रमात त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या होत्या. इतिहास, भूगोल, रसायनशास्त्र व संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते.

त्यांनी उत्तम शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला. दरम्यानच्या काळात त्यांचे वडील वारले. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.

उच्च शिक्षण :- मुंबई येथे इ.स. १८४५ मध्ये जगन्नाथ शंकरशेठ यांनी गव्हर्नर रॉबर्ट ग्रेट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू केले.

इ.स. १८३५ ते १८३८ या काळात सर रॉबर्ट ग्रँट हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते. डॉ. भाऊ लाड यांनी एल्फिन्स्टन संस्थेतील शिक्षकाची नोकरी सोडून इ.स. १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी

त्यांनी इ.स. १८५१ मध्ये वैद्यकीय व्यवसायातील पदवी संपादन केली. इ.स. १८५१ मध्ये या कॉलेजची पहिली बॅच पदवी घेऊन बाहेर पडली.

त्यामध्ये ८ विद्यार्थी होते. त्यापैकी भाऊ लाड हे एक होत. शिक्षण घेत असतानाच या महाविद्यालयात त्यांनी ग्रंथपालाची नोकरी केली.

ते या सोसायटीचे उपाध्यक्ष झाले. इ.स. १८५५ ते १८५७ या काळात ते या संस्थेचे अध्यक्ष होते.

निबंध स्पर्धेत यश :- मुंबई प्रांत सरकारने बालकन्या हत्येच्या संदर्भात निबंध स्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेत प्रथम येणान्यास ६०० रूपये व द्वितीय येणाऱ्यास ४०० रुपये बक्षीस ठेवले होते. विद्यार्थी असताना डॉ. भाऊ यांनी या स्पर्धेत भाग घेतला.

त्यांच्या लिहिलेल्या निबंधास पहिले बक्षीस मिळाले. बालकन्या वधाची प्रथा हिंदू धर्मशास्त्राच्या विरुद्ध आहे.

ती धर्म, भूतदया व माणुसकीला सोडून असून ती अमानुष आहे, असे त्यांनी आपल्या निबंधात म्हटले होते.

वैद्यकीय व्यवसाय व जनसेवा :- इ.स. १८५५ मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केल्यानंतर, डॉ. भाऊ लाड यांनी मुंबईत स्वतंत्र खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.

अचूक निदान व औषध योजना आणि कुशल शस्त्रक्रिया यामुळे त्यांनी वैद्यकीय व्यवसायात नावलौकिक मिळविला.

त्यांनी पारंपरिक औषधांपेक्षा संशोधनावर अधिक भर दिला. त्यांनी कुष्ठरोगावरील औषधाचा शोध लावला.

विविध वनस्पतींच्या वैद्यकीय गुणधर्माची ते प्रयोग करून तपासणी करीत असत. त्यामुळे ते ‘धन्वंतरी’ म्हणून प्रसिद्ध झाले.

देवीची लस लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी खूप श्रम घेतले. त्यांनी काही श्रीमंत लोकांच्या मदतीने गरिबांसाठी एक धर्मादाय दवाखाना सुरू केला. आणि जनसेवा सुरू केली.

Bhau Daji Lad – भाऊ दाजी लाड

बांबे असोसिएशनमधील कार्य :- २६ ऑगस्ट १८५२ मध्ये मुंबई येथे सर्व जाती-धर्माचे व प्रतिष्ठित देशी नागरिकांची,

एक बैठक जगन्नाथ शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याच बैठकीत बाँबे असोसिएशनची स्थापना करण्यात आली.

भारतीय लोकांच्या गरजांची चौकशी करून देशाची सुधारणा करणे, लोककल्याणासाठी आवश्यक ते उपाय सरकारला कळविणे,

रयतेच्या सुखासाठी सर्व गोष्टीत सरकारला मदत करणे. आणि भारतीयांची दुःखे सरकारच्या नजरेस आणून देणे, ही या असोसिएशनची उद्दिष्टे होती.

डॉ. भाऊ लाड हे या असोसिएशनचे पहिले सरचिटणीस होते. या संस्थेमार्फत त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटला एक अर्ज पाठविला.

या अर्जात त्यांनी कंपनी सरकारचा गैरराज्यकारभार, त्यामुळे होणारे जनतेचे हाल, कंपनीचे पक्षपाती धोरण व उधळपट्टीचे वर्णन केले होते.

या अर्जावर मुंबई, ठाणे आणि पुणे येथील ३००० लोकांच्या सह्या होत्या. याच अर्जाच्या प्रती इंग्लंडमधील प्रमुख वृत्तपत्रांकडेही पाठविल्या होत्या.

अशा प्रकारे त्यांनी संघटना स्थापन करून त्यामार्फत लोककल्याणाचे भरीव स्वरूपाचे कार्य करण्याचा प्रयत्न केला.

Bhau Daji Lad – भाऊ दाजी लाड

अन्यायाविरूद्ध लढा :- ब्रिटिश राजवटीत काळा आणि गोरा असा भेदभाव केला जात असे. भारतीय लोकांना काळे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली जात असे.

सरकार भारतीय लोकांबाबत पक्षपाती धोरण अवलंबीत असत. अशा वेळी भारतीयांना समानतेची वागणूक द्यावी.

आणि लोकांवरीत अन्याय दूर होऊन त्यांना न्याय, हक्क मिळावेत म्हणून डॉ. भाऊ लाड यांनी सनदशीर मार्गानि अन्यायाविरुद्ध लढा दिला.

भारतीयांची गाऱ्हाणी सरकारकडे मांडण्यासाठी प्रभावी संघटनांची आवश्यकता होती.

त्यासाठी त्यांनी जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने २६ ऑगस्ट १८५२ मध्ये बांचे असोसिएशन स्थापन केली.

या संघटनेचे ते पहिले सरचिटणीस होते. त्यांनी कंपनी सरकारला या संघटनेमार्फत अर्ज करून.

भारतीयांना समानतेची वागणूक द्यावी व जनतेचे हाल संपवावेत, अशी मागणी केली होती.

इंग्रज सरकार व लाड :- भारताच्या राज्यकारभार विषयक ग्रंथ इंग्लंडमध्ये प्रकाशित करावेत, असा डॉ. भाऊ लाड यांचा विचार होता.

पण इंग्लंडमध्ये दादाभाई नौमध्ये यांनी स्थापन केलेल्या ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’च्या संस्थेचा प्रदेशही हाच होता. त्यामुळे त्यांनी याच संस्थेला मदत केली.

भारतीय लोकांच्या आर्थिक समस्यांचा विचार करणे व त्या समस्यांकडे इंग्लंडमधील जनमत आकर्षित करणे, हा या संस्थेचा हेतू होता. मुंबई येथे या संस्थेची एक शाखा स्थापन झाली.

Bhau Daji Lad – भाऊ दाजी लाड

डॉ. भाऊ लाड हे या संस्थेचे अध्यक्ष होते. इंग्रज सरकारने व्यापार व व्यवसायावर कर बसविण्यासाठी इ.स. १८५९ मध्ये सरकारने लायसेन्स बिल तयार केले.

व्यापार व व्यवसायावर या बिलाचा परिणाम वाईट होणार होता. या बिलाचा निषेध करण्यासाठी मुंबईत एक सभा आयोजित केली.

यामध्ये दिलेल्या भाषणात डॉ. भाऊ लाड यांनी सरकारला म्हटले, की माझ्या देशात सुधारणा.

व ज्ञानाची वृद्धी होऊन भारतीय आपली राज्यव्यवस्था आपण करण्यास योग्य झाला.

तर ब्रिटन ही गोष्ट कबूल करून उदारपणे आपल्याला साम्राज्याच्या ओझ्यातून मुक्त करील काय?

शैक्षणिक कार्य :- डॉ. भाऊ लाड यांना शिक्षणाचे महत्त्व पटलेले होते. त्यासाठी त्यांनी भारतीय समाजात पाश्चात्य ज्ञानाचा प्रचार केला.

मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्ञानप्रसारक सभा सुरू केली. अज्ञानी देशबांधवांत ज्ञानाचा प्रसार करणे व सामाजिक प्रबोधन घडवून आणणे, हे या सभेचे उद्देश होते.

डॉ. भाऊ लाड यांनी या सभेत काम करून तिला प्रसिद्धीस आणले. त्यांनी बाँबे असोसिएशनच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले.

परिणामी १८ जुलै १८५७ मध्ये विद्यापीठ स्थापन झाले. इ.स. १८४० मध्ये कंपनी सरकारने बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्य.

व सरकारी शाळांचे कार्य यांचे एकत्रीकरण करून शिक्षण मंडळाची स्थापना केली.

डॉ. भाऊ लाड हे इ.स. १८५३ ते १८५५ या काळात या शिक्षण मंडळाचे सदस्य होते. एल्फिन्स्टन निधीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

Bhau Daji Lad – भाऊ दाजी लाड

महिला शिक्षणाचे कार्य :- या काळात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्यांनी शिक्षण घेतल्यास,

त्यांच्या पतीचे आयुष्य कमी होते अशी गैरसमजूत समाजात प्रचलित होती. त्यामुळे स्त्रियांना शिक्षण देणे अब्राह्मणम समजले जात असे.

डॉ. भाऊ लाड यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय समाजसुधारणा होणे शक्य नाही, असे त्यांचे मत होते.

त्यांनी मुलींच्या शाळेस आर्थिक मदतही केली. मुंबईत लोहारचाळ येथे स्टुडंटस लिटररी ॲन्ड सायंटिफिक असोसिएशन या संस्थेचे कन्या हायस्कूल होते.

डॉ. भाऊ लाड यांनी या शाळेला १६,५०० रुपये देणगी दिली होती. पुढे या शाळेला भाऊ दाजी गर्ल्स स्कूल असे नाव मिळाले.

उपरोक्त संस्थेने मुंबईत ३ मराठी व ४ गुजराथी शाळा सुरू केल्या होत्या. डॉ. भाऊ लाड हे या संस्थेचे १० वर्षे अध्यक्ष होते. या काळात संस्थेचा मोठा विकास केला.

विधवा विवाहाचा पुरस्कार :- डॉ. भाऊ लाड यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला.

ते पुनर्विवाहोत्तेजक मंडळीचे सदस्य होते. इ.स. १८६९ मध्ये वेणूबाई या विधवेचा पुनर्विवाह पांडुरंग विनायक करमरकर यांच्याशी झाला.

कुवर नावाच्या स्त्रीनेही पुनर्विवाह केला होता. या दोन्ही पुनर्विवाहाच्या वेळी डॉ. भाऊ लाड हजर होते.

Bhau Daji Lad – भाऊ दाजी लाड

सामाजिक कार्य :- डॉ. भाऊ लाड हे समाजसुधारणेच्या क्षेत्रातही आघाडीवर होते. समाजसुधारणेचा प्रारंभ त्यांनी आपल्या घरापासून केला.

या काळात लग्न, मुंज कार्यक्रमात कलावंतिणीचे नृत्य ठेवत असत. अशा प्रथेवर त्यांनी टीका केली.

आपल्या मुलांच्या मुंज कार्यक्रमात त्यांनी ही प्रथा बंद केली. मादक पदार्थांच्या सेवनामुळे समाजाला वाईट परिणाम भोगावे लागतात.

त्यामुळे त्यांनी याबाबतीत समाजजागृती करण्याची मोहीम उघडली. इ.स. १८५३ मध्ये त्यांनी ब्रिटिश संसदेला पत्र पाठवून,

दारू, अफू व गांजा इत्यादी मादक पदार्थांचे उत्पादन व सेवन यांवर बंदी घालण्याचा आग्रह धरला होता.

बालकन्या वधावरही त्यांनी टीका केली. धर्मशास्त्रानुसार समुद्र पर्यटन निषिद्ध मानले गेले.

डॉ. लाड यांनी भारतीयांनी समुद्र पर्यटन करून परदेशी जाऊन उच्चशिक्षण घ्यावे यासाठी प्रयत्न केले.

समाजातील अनिष्ट प्रथांना त्यांनी विरोध केला. समाजजागृती आणि गरिबांवरील अन्याय दूर करण्यासाठी ते सतत कार्यरत असत.

पारशी गुजराधी या हिंदूंमध्ये चळवळ सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता.

Bhau Daji Lad – भाऊ दाजी लाड

नाट्यकलेला प्रोत्साहन :- डॉ. भाऊ लाड यांनी नाट्यकलेला प्रोत्साहन दिले. त्यांनी नाट्यकलावंतांना प्रोत्साहन दिले.

विष्णुदास भावे यांना मुंबईत डॉ. भाऊ लाड यांनीच आश्रय दिला. ते नाटकाचे प्रयोग पाहण्यास हजर असत.

त्यामुळे नाट्यकलावंत आणि नाट्यकलेला प्रोत्साहन मिळाले. तसेच नाट्यकलेला प्रतिष्ठाही मिळाली.

एल्फिन्स्टन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘शाकुंतल’ नाटकाचा प्रयोग सादर केला, तेव्हा डॉ. लाड यांनी प्रत्यक्ष हजर राहून कलावंतांना उत्तेजन दिले.

ग्रंथप्रेमी : डॉ. भाऊ लाड हे ग्रंथप्रेमी होते. इ.स. १८४५ मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररीचे ते बरीच वर्षे अध्यक्ष होते.

डेव्हिड ससून लायब्ररीशीही ते संबंधित होते. वाचनालयासारख्या संस्था स्थापन करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असे.

मुंबईत एकोणिसाव्या शतकात स्थापन झालेल्या प्रत्येक ग्रंथालय आणि वाचनालयाच्या स्थापनेत डॉ. भाऊ लाड यांचे योगदान आहे.

मुंबई विद्यापीठाचे पुरस्कर्ते :- डॉ. भाऊ लाड हे मुंबई विद्यापीठ स्थापनेचे पुरस्कर्ते होते.

बांबे असोसिएशनचे सदस्य असताना त्यांनी मुंबईत विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी इ.स. १८५२ मध्ये सरकारकडे केली होती.

त्यानुसार १८ जुलै १८५७ मध्ये मुंबईत विद्यापीठ स्थापन झाले. या विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते मृत्यूपर्यंत डॉ. भाऊ लाड हे विद्यापीठाचे संस्थापक सदस्य होते.

Bhau Daji Lad – भाऊ दाजी लाड

विद्यापीठाचे भारतीय लोकांचे जे व्यवस्थापक मंडळ नेमले होते, त्या पाचमध्ये ते एक होते.

मुंबई विद्यापीठाच्या सिंडिकेटचे (व्यवस्थापक संचालक) ते पहिलेच हिंदी सदस्य होते.

या विद्यापीठातून बी.ए. च्या परीक्षेत संस्कृत विषय घेऊन प्रथन वर्गात जो विद्यार्थी प्रथम येतो.

त्यास दरवर्षी १७० रूपयांची पुस्तके द भाऊ दाजी लाड बक्षीस म्हणून प्रत्येक वर्षी देण्यात येते.

ग्रंथसंपदा :- डॉ. भाऊ लाड हे पुराणेतिहासाचे संशोधक आणि अभ्यासक होते. इतिहास संशोधक आणि लेखनात त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

कालिदासाचा कालनिर्णय, शकांचे हल्ले, जैन धर्माची परंपरा, जैन पट्टावतीचा कालानुक्रम व हेमाद्रीचा काळ इत्यादी विषयांवर त्यांनी संशोधनपर ग्रंथ लिहिले.

इतिहास संशोधनाच्या निमित्ताने त्यांनी भारतभर प्रवास करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे आणि चित्रे इत्यादींचे संकलन केले.

ते मुंबई देबील रॉयल एशियाटिक सोसायटीचे सभासद होते. त्यांनी गिरनार पर्वतावरील रुद्रदामन याचा शिलालेख आणि गुप्तांच्या शिलालेखाचे वाचन केले.

त्यांनी इंग्रज संशोधकांनी केलेल्या चुकांची दुरूस्ती केली. प्रिन्सेस याने रूद्रदामन हा चस्टनचा पुत्र असल्याचे लिहिले होते.

तर भाऊ लाड यांनी रूद्रदामन हा चस्टनचा नातू असल्याचे सिद्ध केले. भारताचा इतिहास लिहिण्यासाठी त्यांनी अनेक संदर्भ टिपणे काढली होती. परंतु त्यांना इतिहास लिहिण्याचे कार्य करता आले नाही.

Bhau Daji Lad – भाऊ दाजी लाड

दि लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी’ या नावाने त्यांचे वाड्मय प्रसिद्ध केले आहे. त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये १९ लेख लिहिले.

ते लेख शिलालेख व प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यसंबंधी आहेत. पुराणेतिहास संबंधीच्या संशोधनाचे त्यांचे कार्य पुढे त्यांचे शिष्य पंडित भगवान इंदांनी यांनी चालू ठेवले.

रा. गो. भांडारकर हे डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणतात.

गेल्या दोन हजार वर्षांतील पुरातत्त्वांचे संशोधन करावयाचे झाल्यास संशोधकांना डॉ. भाऊ दाजी लाड यांचे लेखन आणि संदर्भ अभ्यासण्याशिवाय पर्याय नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment