Chala vrutte Vaparuyat – चला वृत्ते वापरूयात !

महत्वाची वृत्ते 

  विषुववृत्तापासून २३°३०’ उत्तर तसेच २३° ३०’ दक्षिण अक्षवृत्तादरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात. पृथ्वीवर इतर भागांत सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत. २३° ३०’ उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त व २३°३०’ दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त म्हणतात.

विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील ६६° ३०’ ही दोन अक्षवृत्ते देखील महत्त्वाची आहेत. विषुववृत्त ते ६६° ३०’ उत्तर व दक्षिण अक्षवृत्ते यादरम्यान वर्षभरात २४ तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. यांना अनुक्रमे आर्क्टिक आणि अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतात.

६६° ३०’ उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून ९०° उत्तर व ९०° दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे २४ तासांपेक्षा जास्त असू शकतो. हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त ६ महिन्यांचा असतो. येथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्य क्षितिज समांतर दिसतो.

सूर्यकिरणांचा कालावधी व तीव्रता यांनुसार पृथ्वीवर विविध तापमानांचे पट्टे (कटिबंध) तयार होतात. तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाबपट्टे निर्माण होतात. विविध तापमानांचे पट्टे (कटिबंध) तयार होतात. तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाबपट्टे निर्माण होतात.

जगातील सर्वात लहान देश म्हणून ‘व्हॅटिकन सिटी’ ओळखला जातो.त्याचे क्षेत्रफळ ०.४४ चौकिमी आहे. हा देश इटली द्विपकल्पावरआहे. याच्या सभोवती इटली हा देश पसरलेला आहे. आकृती २.५ मध्य व्हॅटिकन सिटी पिंग्ना बाग ( कोर्टयार्ड) व्हॅटिकन ग्रंथालय या देशाचा विस्तार पहा.

पश्चिमेकडून पूर्वेकडे तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे या देशाच्या विस्तारामध्ये अंश व मिनिटांमध्ये कोणताही फरक आढळत नाही. परंतु सेकंदात फरक आढळतो. यावरून अंशात्मक इथियोपियन महाविदयालय A “शासकीयसेंट पिटर बॅसेलिका सेंट पिटर राजवाडा बॅसेलिका चौक व्हॅटिकन रेडिओ कोषागार १२५ मीटर अंतरातील मिनिट व सेकंद या लघु एककांचा उपयोग लक्षात घ्या.

सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे प्रदेशानुसार वनस्पती व प्राणी यांमध्ये विविधता निर्माण होते. ०° रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त (Prime Meredian) म्हणून महत्त्वाचे आहे. जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ‘ग्रिनिचचे रेखावृत्त’ (G.M.T= Greenwich Mean Time) म्हणूनही ओळखले जाते.

१८०° रेखावृत्त हेही एक महत्त्वाचे रेखावृत्त आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे १८०० रेखावृत्तांपर्यंत इतर रेखावृत्ते काढली जातात. १८०० रेखावृत्ता संदर्भाने ‘आंतरराष्ट्रीय वाररेषा’ विचारात घेतली जाते.

विषुववृत्त हे बृहतवृत्त आहे तसेच एकमेकांसमोरील दोन रेखावृत्ते मिळून बृहतवृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्यांचा वापर होतो.

Leave a Comment