Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

Chhatrapati-Shahu-MaharajChhatrapati Shahu Maharaj

‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत आणणारे राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ‘राज्य करणे म्हणजे केवळ शांतता व सुव्यवस्था राखणे नव्हे तर गरीब रयतेस सुखी व समाधानी ठेवणे होय.’ हे प्रत्यक्ष आपल्या कृतीतून त्यांनी दर्शविले.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

समाजामध्ये वावरत असताना त्यांना आलेल्या अनुभवावरून त्यांनी येथील समाजात असलेल्या विषमतेचे सखोल चिंतन केले.bही विषमता नष्ट करून तळागाळातील व्यक्तीला वर आणण्याचे हेतुपुरस्सरपणे कार्य केले. राजर्षी शाहू महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वा विषयी अत्यंत आदर होता.

त्यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्यामध्ये शाहू महाराजांना एक समाजसुधारकही दिसत होता. जातीपातीचे बंधने उद्ध्वस्त करण्यासाठी जेव्हा ते पुढे आले तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले सामाजिक परिवर्तनाचे धाडसी कार्य आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते.

तसेच महात्मा जोतिराव फुलेंनी बहुजन समाजाला जागृत व संघटित करण्याचे त्यांना प्रेरणा देण्याचे आणि उत्थानाचा मार्ग दाखविण्याचे जे कार्य केले तेच कार्य शाहू महाराजांनी पुढे चालविले.  म्हणूनच शाहू महाराजांना महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याचा वारसदार म्हटले जाते.

शाहू महाराजांनी केलेल्या समाजसुधारणेच्या कार्यामुळे असामान्य व्यक्तिमत्त्वाचा, बहुजन समाजाचा लोकनेता म्हणून त्यांना मान्यता मिळाली. महर्षी वि. रा. शिंदे यांनी राजर्षी शाहू महाराजांबद्दल म्हटले होते, “शाहूराजा नुसता मराठी नव्हता, ब्राह्मनेत्तरही नव्हता तर तो नवयुगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष होता.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

आधुनिक काळात महाराष्ट्रात झालेल्या सामाजिक सुधारणेचा इतिहास पाहताना राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती घेणे अपरिहार्य ठरते. कागल जहागिरीच्या थोरल्या पालीचे प्रमुख सर जयसिंगराव आबासाहेब घाटगे व श्रीमंत राधाबाईसाहेब घाटगे यांचे शाहू महाराज जेष्ठ सुपूत्र होते.

यशवंतराव हे त्यांचे मुळ नाव. वडील कोल्हापूरला राहत होते. त्यांचा जन्म कोल्हापूरात २६ जून १८७४ रोजी झाला.  कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांना इंग्रजांनी वेडसर ठरवून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले होते. तेथेच त्यांचा इ.स. १८८३ मध्ये निपुत्रिक अवस्थेत मृत्यू झाला.

त्यामुळे कोल्हापूर संस्थानची गादी चालविण्याकरिता दत्तक घेण्याची गरज निर्माण झाली. तेव्हा चौथे शिवाजी यांची पत्नी आनंदीबाईसाहेब यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव घाटगे यांच्या पुत्राला दत्तक घेण्याचे ठरविले. त्यानुसार १७ मार्च १८८४ रोजी दत्तक विधान झाले.

दत्तक विधानानंतर यशवंतराव हे छत्रपती शाहू महाराज म्हणून ओळखले गेले ते कोल्हापूर संस्थानचे वारसदार बनले. दत्तक विधानाच्या पूर्वीपासूनच शाहू महाराजांच्या शिक्षणाला सुरुवात झालेली होती. कृष्णाजी भिकाजी गोखले व हरिपंत गोखले, सर रघुनाथराव व्यंकाजी सबनीस, सर फ्रेजर इत्यादींनी त्यांना शिक्षण दिले.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

इ.स. १८८५ मध्ये त्यांना राजकोट येथे राजपुत्रासाठी असणाऱ्या महाविद्यालयात पाठविण्यात आले. इ.स. १८८९ पर्यंत त्यांनी प्रिन्सिपॉल मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजकोट येथे आपले शिक्षण घेतले. इ.स. १८९० ते इ.स. १८९४ या काळात शाहू महाराजांनी सर एस. एम. फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली घारवाड येथे इंग्रजी भाषा, राज्यकारभार, जगाचा इतिहास इत्यादी विषयाचे शिक्षण घेतले.

धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच बडोदा येथील गुणाजीराव खानविलकर यांची ११ वर्षाची कन्या श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब यांच्याबरोबर १ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्याभिषेक विधी संपन्न झाला तेव्हापासून मृत्यूपर्यंत (६ मे १९२२) एकूण २८ वर्ष त्यांनी कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार पाहिला.

शाहू महाराजांनी राजपदाचा उपयोग सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायासाठी केला होता. त्यांनी शिक्षण, जातिभेद व अस्पृश्यता निवारण, स्त्री जीवन सुधार, क्रीडा, कला, औद्योगिक, आर्थिक, कृषी, जलसिंचन इत्यादीसाठी क्रांतिकारक कार्य केले.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

सामाजिक सुधारणा : शाहू महाराजांच्या काळात आधी सामाजिक की आधी राजकीय सुधारणा हा वाद गाजलेला होता. सामाजिक सुधारणा नंतर करता येतील, स्वातंत्र्य प्रथम मिळविले पाहिजे असा विचार काही राजकीय पुढाऱ्यांनी जोपासला होता. परंतु शाहू महाराजांचे विचार यापेक्षा वेगळे होते.

त्यांच्या मते, माणसाला माणूस म्हणून मान्यता दिल्याखेरीज राजकारण करता येणार नाही. एकीकडे परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी जेव्हा भारतीय नेत्यांनी लढा उभारला होता. तेव्हाच काही लोक आपल्या धर्मातील कनिष्ठ समजल्या गेलेल्या लोकांवर पारंपरिक गुलामगिरीची पकड घट्ट करू पाहत होते. त्यावर उपाय म्हणून सामाजिक सुधारणेला शाहू महाराजांनी अग्रक्रम दिला.

जातिभेद निर्मूलन : शाहू महाराज जातिभेदाचे कड़वे विरोधक होते. जातिभेद देशाच्या ऐक्याच्या व उन्नतीच्या मार्गातील धोंड आहे. जातिभेद नष्ट झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही हे ओळखून जातिभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या वैयक्तिक आचरणाने समाजापुढे आदर्श निर्माण केला. त्यासाठी आवश्यक ते कायदे बनवून त्यांची अंमलबजावणी केली.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

व्यवसाय स्वातंत्र्याचा पुरस्कार : रोटी बंदी, बेटी बंदीप्रमाणेच ‘व्यवसाय बंदी’ जातीव्यवस्थेचा एक भाग होती. या निर्बंधानुसार प्रत्येक जातीला रूढीपरंपरेने जो व्यवसाय दिला होता तोच करण्याची सक्ती होती. म्हणजे सुताराने सुतारकीची, कुंभाराने कुंभारकीची, चांभाराने चांभारकीची, महाराने महारकीची कामे करण्यावाचून अन्य पर्याय समाजाने ठेवलेला नव्हता.

एखाद्याने आपल्या जातीच्या व्यवसायास अन्य पर्याय शोधणे गुन्हा होता. असा गुन्हा करणाऱ्याला कडक शिक्षा दिली जात असे. शाहू महाराजांनी २२ फेब्रुवारी १९१८ रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये एक जाहिरनामा प्रसिद्ध करून संस्थानातील ‘बलुतेदार पद्धती’ खालसा केली.

त्यानुसार सर्व बलुते अलुतेदारांना वाटेल त्या ठिकाणी राहण्याची, वाटेल तो धंदा करण्याची व वाटेल त्या प्रकारचे काम करण्याची परवानगी देण्यात आली. अशातऱ्हेने ग्रामीण क्षेत्रात असणाऱ्या बलुते-अलुतेदारांच्या मागासलेल्या जातींना शाहू महाराजांनी व्यवसाय स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य व निवास स्वातंत्र्य देऊन सामाजिक गुलामगिरीतून त्यांची मुक्तता केली.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

अस्पृश्योद्धाराचे कार्य : भारतीय समाजात अनेक जातींना अस्पृश्य गणल्या गेले होते. त्यांचा स्पर्शही विटाळ मानला जात होता. ते आपणाप्रमाणेच माणूस आहेत हा विचारही वरिष्ठ जातीतील लोकांना येत नव्हता. अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातींना अतिशय हलाखीचे निकृष्ठ जीवन जगावे लागत होते.

वरिष्ठ समजल्या गेलेल्या जातींच्या लोकांची सेवा करण्यासाठीच अस्पृश्यांचा जन्म आहे असा समज येथील वरिष्ठ जातीच्या लोकांनी करून घेतला होता. त्यामुळे अस्पृश्य समजल्या “गेलेले लोक सामाजिक विषमता, आर्थिक शोषण व अन्याय यांचा बळी ठरले. शाहू महाराजांनी परंपरागत शोषण झालेल्या अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्य हाती घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले.

स्त्री उद्धाराचे कार्य : शाहू महाराजांनी परंपरागतरित्या उपेक्षित राहिलेल्या स्त्री वर्गाला समाजामध्ये समान दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा सतत प्रयत्न केला. ज्या अनिष्ट प्रथांनी स्त्रियांचे स्वातंत्र्य, नैसर्गिक अधिकार हिरावून घेतले होते, त्या कायद्याने बंद केल्यात. स्त्री शिक्षणाला चालना दिली. एकप्रकारे स्त्रीमुक्ती चळवळीस महाराजांनी हातभार लावला.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

भटक्या विमुक्त जातींच्या उद्धाराचे कार्य : भटक्या विमुक्त जातींच्या वाट्याला परंपरागतपणे भटकंती आणि दारिद्रय आले होते. भारतात सतत झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे परंपरागतरित्या करीत असलेले कामेही बंद होऊ लागली होती. परिणामी काही लोक पोटाची खळगी भरण्याकरिता गुन्हेगारीकडे वळले.

समाजातील इतर लोक त्यांच्याकडे संशयाने आणि तुच्छतेने पाहत होते. ब्रिटिशांनी भटक्या विमुक्त जातींना जन्मजात गुन्हेगार ठरवून इ.स. १८७१ मध्ये ‘गुन्हेगार जमाती कायदा करून या जातींकरिता खुल्या तुरूंगाची निर्मिती केली होती. एखाद्या मेंढराच्या कळपाप्रमाणे या लोकांना ताराच्या कुंपणाच्या आत कोंडले जाई.

तेथे त्यांना सुधारण्यासाठी अनेक प्रयोग केले जात. पण अनेकदा शिस्तीच्या नावाखाली अत्याचार होत. अशा खुल्या तुरूंगात ज्यांची सुधारणा होई त्यांना बाहेर काढून शेजारच्या मुक्त वसाहतीत राहण्याची परवानगी दिली जाई. पण तेथेही त्यांच्यावर दिवसातून तीन वेळा हजेरी देण्याची सक्ती असे.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

खुल्या तुरूंगासह अशा ज्या वसाहती असत त्यांना ‘सेटलमेंट’ असे म्हणत. शाहू महाराजांनी भटक्या-विमुक्त जातीचे ‘सेटलमेंट’ मात्र मानवतावादी दृष्टिकोनातून केले. माणूस इथून तिथून सर्व सारखाच असतो. तो सर्वगुण संपन्न असू शकत नाही. गुन्हेगारी वृत्ती सर्व जातींमध्ये असते. अमूक एक जात जन्मजात गुन्हेगार असू शकत नाही.

माणूस परिस्थितीने गुन्हेगार बनतो, जन्माने नाही. अशी शाहू महाराजांची विचारसरणी होती. त्यांच्या जीवन प्रवासात त्यांना भेटलेल्या कुंचीकोरवी, वड्डर, डोंबारी, रजपूत भामटा, फासेपारधी, माकडेवाले, कोल्हाटी, कंजारभाट इत्यादी गुन्हेगार समजल्या गेलेल्या जातींना त्यांनी जवळ केले.

या प्रत्येक जातींच्या अंगी कोणतीतरी कला होतीच त्यानुसार त्यांना नोकऱ्या दिल्या. काहींना स्वतःचे अंगरक्षक, शिकारीतले सहकारी, राखणदार म्हणून सेवेत घेतले. त्यांच्या जीवनाला स्थिरता यावी म्हणून निवाऱ्यांची व्यवस्था केली, जमिनी दिल्या, शिक्षण दिले. २७ जूलै १९१८ मध्ये आदेश काढून गुन्हेगार समजल्या गेलेल्या जातींवर अन्याय कारक असलेली हजेरी पद्धती’ बंद केली.

व्यंकाप्पा भोसले शाहू महाराजांच्या या कार्याविषयी म्हणतात, सर्वत्र भटक्या जाती जमार्तीकडे गुन्हेगार म्हणून तुच्छतेने पाहिले जात असता, आणि खुद्द या जाती एक प्रकारचे पशुतुल्य जीवन जगत असता या देशातील एका राजाने त्यांच्याकडे ‘माणूस’ म्हणून पाहिले व आपल्या पोटाशी धरुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे प्रयत्न केले ही गोष्ट आम्हा जातीच्या लोकांना मोठी अभिमानाची वाटते.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

मुस्लीम वर्गाच्या उद्धाराचे कार्य : शाहू महाराज ‘मराठा’ संस्थानिक असले तरी ते केवळ मराठ्यांचे राजे नव्हते. त्यांच्या संस्थानात असलेल्या हिंदू, मुस्लीम, जैन, पारसी, ख्रिश्चन, आदी जातीच्या लोकांचे ते राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अकबर यांच्या व्यक्तिमत्वाची विलक्षण छाप शाहू महाराजांवर होती.

शाहू महाराजांना मुस्लिमांचा मागासलेपणा जाऊन त्यांची उन्नती व्हावी याकरिता त्यांनी शिक्षण घ्यावे असे वाटत होते. त्याकरिता त्यांनी स्वतःहा प्रयत्न केलेत. ‘व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग’ मध्ये दहा मुसलमान विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा हूकूम काढला. याच बोर्डिग मधून शिक्षण घेतलेले शेख महंमद युसूफ अब्दूला यांची पुढे संस्थानातील उच्च पदावर नियुक्ती केली.

त्यांच्यावर मुस्लिमांमध्ये शिक्षण प्रसारांचे कार्य करण्याची जबाबदारी सोपविली. इ.स. १९०६ मध्ये शाहू महाराजांनी स्वतः हा पुढाकार घेऊन मुस्लीम मंडळीच्या सहकार्याने ‘मोहमेडन एज्युकेशन सोसायटी’ ची स्थापना केली. या सोसायटीच्या वतीने ‘मुस्लीम बोर्डींग’ सुरू करण्यात आले. या बोर्डिगला महाराजांनी सर्वप्रकारे सहाय्य दिले.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

न्याय व्यवस्थेतील उच्चवर्णीयांच्या बरोबर बहुजन समाजातील होतकरू तरुणांना वकिलीच्या सनदा दिल्या. त्यामध्ये मुस्लीमांचाही समावेश केला होता. शेख अली महंमद, महंमद हुसेन मिगसाहेब चिकोडीकर, हुसेन दादाभाई जमादार अशी त्याकाळातील मुस्लीम सनदी वकिलांची नावे आहेत.

शाहू महाराजांनी मुस्लीमांच्या अनेक धार्मिक संस्थांना उदार मनाने मदत केली.  जसे, शाहपूरी येथे निर्माण झालेल्या नव्या वसाहतीत मुस्लीमांना नमाज पढण्याकरिता मस्जिद नव्हती तेव्हा महाराजांनी मस्जिद बांधण्याकरिता जागा तर दिलीच त्यास अर्थसहाय्यही केले. मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ ‘कुराण’ चा अर्थ सर्वांना कळावा म्हणजे खरा धर्म कळेल.

याकरिता ‘कुराण’चे मराठीत भाषांतर करण्याची योजना राबविली होती. परंतु महाराजांचे अकाली निधन झाल्यामुळे ती पूर्णत्वास जाऊ शकली नाही.  ११ मार्च १९०८ ला शाहू महाराजांच्या कन्या आक्कासाहेब यांच्या लग्न सोहळ्यांच्या वेळी समाजातील इतर वधू-वरांचे विवाह लावले होते.

त्यामध्ये मुस्लीम वधु-वरांचाही समावेश महाराजांनी इ.स. १९१७ च्या विवाह नोंदनी कायद्यानुसार, मुसलमान धर्मगुरुंचा विवाह लावण्याचा अधिकार मान्य केला. पण अशी विवाह लावली गेल्यावर सरकारची रजिस्टरवर नोंदनी करण्याचे कायद्याने बंधन घातले.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

ही गोष्ट मुस्लीमांच्या विशेषतः मुस्लीम स्त्रियांच्या अधिक हिताची होती. “श्री शाहू विव्हर्स असोसिएशन’ या संस्थेत काम करण्यासाठी काही मुस्लीम कुटूंब बाहेरुन आली होती. महाराजांनी या गरीब मुस्लीम कुटूंबांची राहण्याची व्यवस्था तर केलीच शिवाय त्यांना दरबाराकडून जमिनीही दिल्या व आर्थिक मदतही केली.

शाहू महाराजांनी मुस्लीम वर्गातील कवी, चित्रकार, गायक, पैलवान, अशा गुणीजनांच्या गुणांचा गौरव करून त्यांना उदार राजाश्रय दिला. त्यामध्ये प्रतिभासंपन्न शाहीर लहरी हैदर, चित्रकलेच्या क्षेत्रातील महान कलावंत. ‘रंगसम्राट’ आबालाल रहिमान, अखिल भारतामध्ये आपल्या असामान्य गायनाने टक्याजकीर्त झालेले ‘गानमहर्षी’ अल्लादिय खाँसाहेब, खुद्द महाराजांना मल्लविद्या शिकविणारे ‘मल्लविशारद’ बालेखान वस्तात, इत्यादी प्रमुख होते.

शाहू महाराज १९ जुलै १९२० मध्ये हूबळी येथे भरलेल्या सामाजिक परिषदेत म्हणाले होते, “मुसलमान हे नेहमी मराठ्यांप्रमाणे क्षात्रकर्म करितात. त्यांच्या चालीरीतीही बहूतेक मराठ्यांप्रमाणे आहेत. मराठ्यांच्या फौजेत मोठ मोठे मुसलमान सरदार होते. त्याचप्रमाणे मुसलमानांच्या फौजेत मराठा सरदार होते.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

हल्ली इंग्रज सरकारचे फौजेत मराठे व मुसलमान खाद्यांस खांदा भिडवून लढत आहेत. अशाप्रकारे मुस्लीम वर्ग या देशात कोणी परका नसून ते इथल्या बहुजन समाजाचाच एक भाग आहेत. हे वास्तव समाजमनावर ठसविण्याचा प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केलेला दिसतो.

शैक्षणिक कार्य : शिक्षण हे मानवी हितासाठी समाजाने केलेली भांडवली गुंतवणूक असते. संपूर्ण मानवी जीवनाला व्यापून टाकणारी ती एक प्रक्रिया असते. शिक्षण हेच सर्व सामाजिक सुधारणांची व प्रगतीची जननी आहे. अविद्या हेच अज्ञान, अंधश्रद्धा, मागासलेपणा, याचे मूळ कारण आहे. असे वास्तवादी विचार शाहू महाराजांचे शिक्षणासंबंधी होते. त्यांनी ‘विद्या हेच श्रेष्ठ दान आहे’ असे सांगून देवस्थानांतील उत्पन्नाचा एक भाग शिक्षणावर खर्च केला जावा असे आदेश काढले.

शिक्षणाच्या मक्तेदारीचा अहंगंड असणाऱ्या उच्चवर्णीयांना त्यांनी आव्हान दिले तर शिक्षणांचे क्षेत्र आपले नाहीच या न्यूनगंडाने पछाडलेल्या बहुजनांनामध्ये शिक्षणाचे महत्त्व रूजवून त्यांना शिक्षण घेण्यास प्रेरित केले. शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण क्षेत्रातील प्रचलित परिस्थितीचा आढावा घेऊन यामध्ये प्रगती सुचविण्यासाठी कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी शिक्षण सुधारणा समितीची स्थापना केली.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

धार्मिक सुधारणा : शाहू महाराजांनी आपल्या जीवन प्रवासात धर्मविषयक विचारांची जी वाटचाल केली तिचा प्रवास स्पष्टपणे परंपरेकडून आधुनिकतेकडे होती. जहागीरदार घराण्यात जन्मल्यामुळे आणि सरंजामशाही वातावरणात वाढल्यामुळे, तसेच कसोटी पाहणारी राजपदाची जबाबदारी अल्पवयातच येऊन पडल्यामुळे आपल्यावर काही पारंपरिक संस्कार झाले, काही मर्यादा व बंधनेही पडली हे स्वतः महाराजांनी मान्य केले होते.

पण त्यांच्यावर आपल्या स्वतंत्र बुद्धी व विवेकाच्या बळावर आपण मात केली असे महाराज आवर्जून सांगत असत. महाराज सश्रद्ध होते. परंतु धर्माचा विचार त्यांनी नेहमीच समाजशास्त्रीय दृष्टिने व इहलौकिक संदर्भात केला होता.

प्रशासकीय सुधारणा : शाहू महाराजांनी प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक व सर्वसमावेशक व्हावे याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रयत सुखी व समाधानी असावी आणि रयतेचे उत्तरोत्तर कल्याण व्हावे हेच आपल्या प्रशासनाचे उद्दिष्ट्य आहे, असे त्यांनी २ एप्रिल १८९४ मध्येच जाहीर केले होते. त्यानुसार विरोधाची तमा न बाळगता अनेक प्रशासकीय सुधारणा घडून आणल्यात.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

आर्थिक सुधार : शाहू महाराजांनी आपल्या संस्थानाचा सर्वांगीन विकास घडून यावा म्हणून अनेक उपाययोजना केल्या होत्या. तसेच समाजाच्या आर्थिक विकासावर इतर क्षेत्रातील विकास अवलंबून असतो. या विचाराने त्यांनी आर्थिक विकासाकडे हेतुपुरस्सरपणे लक्ष देऊन शेती, उद्योगधंदे, व्यापार, दळण-वळण, सहकार क्षेत्र इत्यादीमध्ये क्रांतीकारी परिवर्तन घडवून आणले.

सांस्कृतिक योगदान : शाहू महाराजांच्या काळात मल्लविद्या, संगीत, नाट्य, चित्रकला, चित्रपट इत्यादीचे कोल्हापूर हे माहेरघर बनले होते. महाराज विविध कलांचे भोक्ते होते. त्यांनी या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना उदार अंतःकरणाने सहाय्य केले. त्यामुळे फक्त कोल्हापूर संस्थानच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची भर पडली.

वृत्तपत्र आणि शाहू महाराज : शाहू महाराजांनी वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचे प्रभावी साधने आहेत. त्यांचा जर विकास झाला तर सर्वांगीण सुधारणेला पोषक वातावरण निर्माण होईल व समाज मानसिकरित्या प्रगल्भ होऊन प्रगतीच्या वाटेने चालू लागेल. या विचाराने वृत्तपत्रांना आर्थिक सहाय्य व प्रेरणा दिली.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

त्यामुळे त्यांच्या काळात अनेक वृत्तपत्र कोल्हापूर संस्थानात आणि संस्थाना बाहेरही प्रकाशित होऊ लागली. तत्पूर्वी काही वृत्तपत्र कोल्हापूर संस्थानात निघत होते. इ.स. १८५३ ला निघालेले ‘ज्ञान संग्रह’ हे कोल्हापूर संस्थानातील पहिले वृत्तपत्र होते. त्यानंतर ‘वर्तमान संग्रह’, ‘ज्ञान सागर’, ‘सुझानामृत’, ‘शुभवर्तमान दर्शक’, ‘दक्षिण वृत्त’, ‘विद्याविलास’ हे कोल्हापूर संस्थानातील पहिले दैनिक होते.

शाहू महाराजांच्या काळात एप्रिल १८९४ ला प्रो. विष्णु गोविंद विजापूरकर यांनी ‘ग्रंथमाला’, त्यानंतर ‘समर्थ’, ‘विश्ववृत्त’ हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांच्या सनातनी वृत्तीमुळे त्यांनी शाहू महाराजांचा विरोध केला. त्यामुळे ही वृत्तपत्रे बंद पडली. धार्मिक उद्देशाने निघालेली जैनांची ‘महापुराण’ व ‘जैनबोधक’ लिंगायतांचे ‘वीरशैवयत प्रकाश’, ख्रिश्चनाचे ‘प्रकाशक’ तर वैदिकांचे ‘धर्मविचार’ ही प्रमुख पत्रे होती.

याशिवाय ‘नानालहरी’, ‘ज्ञानविलास’, ‘काळ’, ‘आर्यमित्र’, ‘मनोविनोद’, ‘कृषिकर्म’ इत्यादी ज्ञानप्रसार व मनोरंजन या उद्देशाने काढली गेलेली वृत्तपत्रे काही काळ प्रकाशित होत होती. स्त्रियांचे स्त्रियांसाठी असणारे ‘सौभाग्य संभार’ या नावाचे वृत्तपत्रही या काळात प्रकाशित झाले होते.

मुकुंदराव पाटलांचे ‘दिनमित्र’ हे वृत्तपत्र इ.स. १९१७ पर्यत ब्राह्मणेत्तरांच्या बाजूने लढत होते. त्याच वर्षी पुण्यात बालचंद्र कोठारींचे ‘जागरुक’ तर बडोद्यात भगवंतराव पाळेकरांनी ‘जागृति’ अशी ब्राह्मणेत्तरांची दोन वृत्तपत्रे सुरू झाली होती.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

त्यानंतर लठ्ठे आणि कोठारींचे ‘डेक्कन रयत’, बळवंत पिसाळांचे ‘विश्वबंधु’, दत्ताजीराव कुरण्यांचे ‘भगवा झेंडा’, दिनकरराव जवळकरांचे ‘तरुण मराठा’, बाबूराव यादवांचे ‘गरिबांचा कैवारी’, श्रीपतराव शिंद्यांचे ‘विजयी मराठा’, दत्तात्रय रणदिव्यांचे ‘संजीवन’, शामराव देसाईंचे ‘राष्ट्रवीर’, केशवराव बागळे व कीरर्तिवानराव निंबाळकरांचे ‘शिव छत्रपती’, गणेश आकाजी गवईंचे ‘बहिष्कृत भारत’, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘मूकनायक’, भास्करराव जाधवांचे ‘मराठा दीन बंधू’, अशी काही वृत्तपत्रे होती.

या सर्वांच्या मागे महाराजांनी आपले नैतिक व आर्थिक बळ उभे केले होते. कोल्हापूरातील सुप्रसिद्ध राजाराम महाविद्यालयामध्ये ‘दि राजारामीयन’ हे नियतकालीक रेव्ह. ए. डर्बी यांच्या मागदर्शनाखाली सुरू झाले. करविर सरकारचे गॅझेट प्रसिद्ध केल्या जात असे. त्यामध्ये करवीर दरबारचे आदेश, जाहीरनामे, कायदेकानून प्रसिद्ध केले जात होते. शाहू महाराजांनी आगरकरांचे ‘सुधारक’ व अच्यूतराव कोल्हटकरांचे ‘संदेश’ या वृत्तपत्रांनाही सहाय्य दिले होते.

शाहू महाराजांचे कौटुंबिक जीवन व निधन : समाजाचे हित ते आपले हित, समाजाचे सुख ते आपले सुख, समाजाचे दुःख ते आपले दुःख मानणाऱ्या शाहू महाराजांना कौटुंबिक व वैयक्तिक जीवनात अनेक दुःखे सहन करावी लागली. त्यांचा तरुण पुत्र प्रिन्स शिवाजी रानडुकराची शिकार करताना घोड्यावरून पडून मृत्यू पावला. त्यांचा दुसरा पुत्र राजाराम यांच्यामध्ये राज्यकारभार सांभाळण्या एवढी पात्रता नव्हती.

Chhatrapati Shahu Maharaj – छत्रपती शाहू महाराज

त्यांची एक मुलगी लहाणपणीच मृत्यू पावली. त्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई सतत आजारी राहत असे. त्यांची दुसरी मुलगी राधाबाई हिला सासरी सुख नव्हते. त्या कोल्हापूरातच राहत. महाराजांचे शरीरही मधूमेहाच्या आजाराने पोखरले होते. औषध म्हणून थोडेसे मद्य घेण्याचे डॉक्टरांनी सुचविले तेव्हा मद्य घेण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन असे डॉक्टरांना त्यांनी उत्तर दिले. दिवसेन दिवस आजार गंभीर होत गेला.

शेवटी ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे पन्हाळा लॉजवर त्यांचे निधन झाले. प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी शाहू महाराजांच्या निधनाचे दुःख व्यक्त करताना आपल्या लेखात म्हटले होते, “शाहू महाराजांच्या मृत्यूने एक पट्टीचा राजकारणी, मुत्सद्दी, खंबीर समाजसुधारक, धैर्यवान, धर्मक्रांतिकारक, सक्रिय अस्पृश्योद्धारक, जगप्रसिद्ध पहिलवान, निधड्या छातीचा शिकारी, राष्ट्रीय पक्षाच्या कारस्थानी मार्गातला काटा आणि दिनदुनियेच्या भवितव्यतेवर प्रकाश टाकणारा सर्चलाईट नाहीसा झाला असे म्हटले पाहिजे.” 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment