Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

Dr-Babasaheb-Ambedkar-Information-in-MarathiDr Babasaheb Ambedkar Information in Marathi

“तुमच्या उद्धारासाठी कोणी येणार नाही मात्र तुम्ही निश्चय केला तर तुमचा उद्धार तुम्हीच करू शकाल” असे सांगून न्यूनगंडाने पछाडलेल्या जनतेला स्वसामर्थ्याची जाण करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ ला मध्यप्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे लहाणपणीचे नाव भीमराव असे होते.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

त्यांच्या आईचे नाव भीमाबाई व वडीलांचे नाव सुभेदार रामजी मालोजी सकपाळ होते. त्यांचे मुळगाव रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून आठ कि. मी. असलेले आंबावडे हे होय. गावाच्या नावावरूनच आंबावडेकर ह्या अडनावाने सकपाळाचे घराणे ओळखल्या जाई.

पुढे आंबेडकर नावाच्या शिक्षकाने बाबासाहेबांचे आंबावडेकर हे अडनाव बदलून आंबेडकर हे अडनाव लावले. इ.स. १८९६ मध्ये डॉ. आंबेडकांचे आईचे मस्तकशुळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी मातृप्रेमाला पोरख्या झालेल्या डॉ. आंबेडकरांचा सांभाळ आत्या मीराबाईने केला.

सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर सातारा येथे रामजींना दूसरी नोकरी मिळाली इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील ‘कॅम्प स्कूल’ मध्ये डॉ. आंबेडकरांचे नाव दाखल केले. येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. सातारा येथे शिक्षण घेत असताना अनेक बरे वाईट अनुभवही त्यांना आलेत. रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुंब मुंबईला नेले.

तेथील एलिफिन्स्टन सरकारी हायस्कूल मध्ये डॉ. आंबेडकरांचे नाव दाखल केले. इ.स. १९०७ ला ते मॅट्रीकची परिक्षा पास झाले. इ.स. १९०८ मध्ये मुंबई येथे एलिफिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याच दरम्यान त्यांचा विवाह दापोली येथील पार्वतीबाई ऊर्फ रमाबाई वानंदकर यांच्यासोबत झाला.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

इ.स. १९१२ ला मुंबईच्या एलिफिन्स्टन कॉलेजमधून पर्सियन व इंग्रजी विषय घेऊन ते बी.ए. ची परिक्षा पास झाले. पदवीधर झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी बडोदा संस्थानात नोकरी केली. परंतु वडील आजारी पडले हे कळताच ते मुंबईला परत आले. इ.स. १९१३ ला रामजींचे निधन झाल्यामुळे डॉ. आंबेडकरांचा आधारच सुटला आर्थिक अडचणी निर्माण झाल्या.

परंतु शिकण्याची जिज्ञासा होती. त्यामुळे त्यांनी बडोदा संस्थानातील महाराज सयाजीराव गायकवाडांची भेट घेतली.  महाराजांनी डॉ. आंबेडकरांना अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्यासाठी तीन वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर केली. यावेळी सयाजीराव गायकवाडांनी डॉ. आंबेडकरांना एक प्रश्न विचारला, ते म्हणाले, “परदेशी कोणत्या विषयाचा आणि कशाचा अभ्यास करणार आहात?”

यावर डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांचा शिक्षण घेण्यामागील उद्देश किती व्यापक होता हे कळते ते म्हणाले, “समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि विशेषतः पब्लिक फायनान्स या विषयाच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवस्था कशी सुधारावी याचे मार्ग दिसतील व त्या मार्गाने मी समाजसुधारनेचे कार्य करीन.”

डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तीमत्त्वावर अमेरिकेतील वास्तव्याचा खूप प्रभाव पडला होता. त्यांना भारतीय जीवन पद्धती व अमेरिकन जीवन पद्धती यामध्ये भिन्नता दिसून आली. तेथे शिवाशिवीचा अस्पृश्यतेचा प्रश्न नाही. कोणत्याही प्रकारची मानहानी नाही. कोणत्याही प्रकारचे अन्याय्य बंधन नाहीत.

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

अमुक जातीतील जन्मामूळे केस न कापने, कपडे लाँड्रीला न देणे, वाहणात बसू न देणे, पिण्याचे पाणी न देणे, शाळांमध्ये शिक्षक दुरून छड्या मारणे, असे चित्र अमेरिकेत पाहायला मिळत नव्हते. तेथे प्रोफेसर सर्वच विद्यार्थ्यांना कितीतरी आत्मीयतेने शिकवत असत.

कोलंबिया विद्यापिठातील विद्वान प्रोफेसर सेलिग्मन व प्रोफेसर सिगर हे डॉ. आंबेडकरांशी समतेच्या भूमिकेवर चर्चा करीत. या घटनानमधून अमेरिकेत समतेचे वातावरण असल्याचा अनुभव त्यांना आला. समतेची मिळालेली अमेरीकेतील वागणूकीचा डॉ. आंबेडकरांवर मोठा प्रभाव झाला होता.

त्यामुळे भारतात आल्यावर त्यांनी समतेवर आधारित समाज घडविण्यासाठी संघर्ष दिला.  अमेरिकेत पीएच. डी. ही पदवी घेतल्यानंतर अर्थशास्त्रात आणखी संशोधन करण्याची, लंडन विद्यापीठाची पदवी मिळविण्याची, बॅरिस्टर होण्याची डॉ. आंबेडकरांची इच्छा होती.

त्यांच्या विनंतीनूसार महाराज सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्तीला एक वर्षाची मुदतवाढ दिली. त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड पोलिटिकल सायन्स’ या संस्थेत त्यांना प्रवेश मिळाला. परंतु एक वर्षानंतर शिष्यवृत्ती संपल्याने शिक्षण अर्धवट सोडून त्यांना इ.स. १९१७ ला भारतात परत यावे लागले.

नंतर ते बडोदा संस्थानात लष्करी कार्यवाहक या पदावर रूजू झाले. ही नोकरी करीत असताना वेळोवेळी झालेली अवहेलना व मनस्ताप यामूळे त्यांनी राजीनामा दिला. इ.स. १९१९ ला मुंबई येथील सिडनेहॅम या सरकारी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. याच काळात ते सार्वजनिक कार्यात सहभागी होऊ लागले होते.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

हे सर्व करीत असताना अर्धवट सोडावे लागलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा कायम होती. त्याचकरिता डॉ. आंबेडकरांनी आपले स्नेही नवल भथेना यांच्याकडून पाच हजार रूपये मिळविले. कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांच्याकडून मिळविलेले अर्थसाहाय्य आणि प्राध्यापकाची नोकरी करीत असताना मिळालेली काही रक्कम या आधारावर इ.स. १९२० ला डॉ. आंबेडकर पुन्हा इंग्लंडला गेले. इ.स. १९२१ ला ते एम.एस्सी. झाले.

इ.स. १९२२ ला त्यांनी ‘चलनाचा प्रश्न’ (The Problems of the Rupee) हा प्रबंध लंडन विद्यापिठास सादर केला. इ.स. १९२३ ला डी. एस्सी. पदवी त्यांनी प्राप्त केली. इ.स. १९२३ मध्येच बॅरिस्टरच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. काही काळ ते जर्मनीमधील बॉन विद्यापीठात होते. या दरम्यान त्यांनी जर्मन, फ्रेंच या भाषांसोबतच इंडोलॉजी ही भाषाही अवगत केली.

डॉ. आंबेडकर त्यांच्या काळातील सर्वात शिक्षित भारतीय होते, नव्हे सर्वात शिक्षित आशियाई देखील. इ.स. १९२४ ला स्वदेशी परत आल्यानंतर मुंबईच्या उच्च न्यायालयात काही काळ वकीली केली. डॉ. आंबेडकरांनी राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र इ. अनेक विषयांचे ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा उपयोग समाज सेवा व समाजसुधारणेकरिता करून घेतला.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक सुधारणेचा दृष्टिकोन : राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रहित अशा संकल्पना पुढे करून शोषित, उपेक्षित जनतेचे हक्क नाकारणाऱ्या संकुचित वृत्ती बाळगून स्वतःला देशभक्त म्हणविण्याऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३९ ला मुंबई विधिमंडळात सूनावले की, “जेव्हा जेव्हा सर्व देशाचे हित आणि माझे हित यामध्ये विरोध निर्माण झाला तेव्हा तेव्हा मी देशाच्या हिताला नेहमी प्राधान्य दिले आहे.

देश आणि मी यांच्यामध्ये माझा अग्रक्रम नेहमी देशहिताला राहील. पण देश आणि दलित यांच्यामध्ये विरोध निर्माण झाला तर मी दलितांचीच बाजू घेईन.” “आम्ही आधी भारतीय आहोत नंतर हिंदू मुस्लीम, शिख, ईसाई आहोत असे म्हटल्यापेक्षा आम्ही आधीही भारतीय आहोत आणि नंतरही भारतीय आहोत असे म्हणा”, असे ते म्हणत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्वानाच सर्वांगीन स्वातंत्र्य बहाल करण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून समाजिक सुधारणेचे कार्य हाती घेतले होते. समाजामध्ये जो पर्यंत भेद कायम राहत असतील तो पर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद निर्माण होऊ शकत नाही.

निखळ राष्ट्रवाद निर्माण करण्याकरिता तळागाळातील सर्व व्यक्तींना समान हक्क मिळणे आवश्यक आहे. त्याशिवाय मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्याला काहीच अर्थ राहणार नाही, असा त्यांचा विचार होता. डॉ. आंबेडकर म्हणतात की, “स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यावर आधारलेला समाज निर्माण करणे हे माझे ध्येय आहे.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

अशा या आदर्श समाजात जाणीवपूर्वक एकमेकांशी संबंध ठेवून सुख-दुःखांची वाटणी केली पाहिजे.” हाच दृष्टिकोन ठेवून डॉ. आंबेडकरांनी शोषित-पिडितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अनेक लढे उभारले. मनुष्य म्हणून सन्मानाने जगण्याचा प्रत्येक व्यक्तीला हक्क आहे. हे हक्क प्राप्त करण्याकरिता त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. हक्क हे हक्क म्हणूनच मिळाले पाहिजेत हा त्यांचा आग्रह होता.

माणगाव परिषद : कोल्हापूर संस्थानातील, कागल जहांगिरीतील माणगांव येथे आप्पासाहेब दादागोंडा पाटील यांच्या सहकार्याने पहिली अस्पृश्य परिषद २१ ते २२ मार्च १९२० ला आयोजीत केली गेली. परिषदेचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर होते. शाहू महारांजाची प्रमुख उपस्थिती या परिषदेला होती.

शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांविषयी जनतेला संबोधून म्हटले, “माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर, अशी एकवेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला सांगते. शाहू महाराजांचे हे वाक्य डॉ. आंबेडकरांनी भविष्यात केलेल्या कार्याने सत्य ठरविले.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

बहिष्कृत हितकारणी सभा : डॉ. आंबेडकरांनी २० जुलै १९२४ ला ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ नावाच्या सामाजिक संघटनेची स्थापना करून सामाजिक सुधारनेचे कार्य प्रारंभ केले. या संघटनेचे मुख्य कार्यालय दामोदर हॉल परळ, मुंबई १२ येथे होते.

या संघटनेचे अध्यक्ष स्वतः डॉ. आंबेडकर, सचिव सीताराम नामदेव शिवतकर, कोषाध्यक्ष निवृत्ती जाधव हे होते. याशिवाय मेअर निस्सीम, डॉ. र. पु. परांजपे, रुस्तमजी जिनवाला, बी. जी. खेर, डॉ. वि. पा. चव्हाण इत्यादी मंडळी या संघटनेच्या विविध पदावर होत्या. ही संघटना स्थापन करून डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य व अस्पृश्यांविषयी सहानुभूती असणाऱ्या अस्पृश्येत्तर नेत्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले.

महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह : सापांना प्रेमाने दूध पाजणाऱ्या भारतीय संस्कृतीत मात्र माणसाला मानाने पाणी देणे बसत नव्हते. पशु, पक्षी, जनावरे, परधर्मीय लोक इत्यादी सार्वजनिक तळे, विहीरी येथे पाणी पिऊ शकत होते. त्याला स्पर्श करू शकत होते.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

परंतु हिंदू धर्माचा भाग असलेल्या तथाकथित अस्पृश्य लोकांना मात्र सार्वजनिक तळे, विहीरी इत्यादी ठिकाणचे पाणी पिण्याची त्याला स्पर्श करण्याचीही बंदी होती. म्हणूनच या देशात माणसाला पाण्यासाठीही संघर्ष करावा लागला. या संघर्षाला सुरुवात झाली ती महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून तेव्हा महाड गाव कुलाबा जिल्ह्यात होते.

ब्राह्मणेत्तर पक्षाचे नेते सी. के. बेले यांनी ४ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई प्रांताच्या कायदेमंडळात एक ठराव मंजूर करून घेतला होता. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सर्व जातींच्या लोकांना सार्वजनिक पाणवठे, विहीरी, धर्मशाळा यांचा उपयोग करू द्यावा. तसेच शाळा, दवाखाने, कार्यालय, न्यायालय इत्यादी ठिकाणी अस्पृश्य म्हणून कोणालाही प्रवेश नाकारु नये.

अशा आशयाचा तो ठराव होता. त्यानुसार महाडचे त्यावेळचे नगराध्यक्ष सुरेंद्रनाथ गोविंदराव टिपणीस यांनी महाडचे सार्वजनिक पाणवठे खुले केले होते. पण प्रत्यक्षात तसे घडून आले नव्हते. महाडच्या चवदार तळ्यावर पाणी भरण्याचे साहसही कोणी दाखविले नव्हते.

म्हणून डॉ. आंबेडकरांनी दलितांमध्ये आत्मविश्वास, हक्काकरिता संघर्ष करण्याची शक्ती, जिद्द निर्माण होण्याकरिता १९ व २० मार्चला महाड येथे अधिवेशन भरविले.  यावेळी झालेल्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी जनतेचे उद्बोधन करताना म्हटले, “आमच्यावर होत असलेला अन्याय आम्ही मुकाट्याने सहन करत आलो आहोत.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

पण मारेकऱ्यांचा प्रतिकार करण्यास आमचा हात वर का जात नाही? याचे कारण आमच्यात शिक्षण नाही. शिक्षण नाही म्हणून दृष्टी नाही, म्हणून जागृती नाही, मानाच्या जागा नाहीत, तेव्हा तुम्ही शिक्षण घेतले पाहिजे. गावात शिळ्या तुकड्यांची भीक मागून कुत्र्यासारखे जीवन जगू नका.

यामुळे तुम्हाला गावात इज्जत मान-मराब नाही. तुमचा स्वाभीमान नष्ट झाला आहे. काही म्हणा, जोड्यात वागवा पण तुकडा वाढून जगवा. अशी तुमची वृत्ती झाली आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतंत्रपणे उन्नतीमार्ग जगता येणे शक्य नाही. म्हणून शिळ्या तुकड्यांसाठी आपली माणुसकी विकणे ही लाजेची व शरमेची गोष्ट आहे.

तेव्हा याचा त्याग करा. मानाने जगायला शिका अन्यथा पशू आणि तुमच्यात काहीच अंतर नाही. आता जागृत व्हा! जागृतीचा अग्नी आता तुम्ही विझू देता कामा नये.” प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे, वसतिगृहांची खास सोय अस्पृश्य मुलांना करून द्यावी, असे ठराव अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडण्यात आले होते.

“चवदार तळे सार्वजनिक असून अस्पृश्यांना मोकळे असल्याचा महाड म्युन्सिपालटीचा ठराव आहे. तेव्हा आपण स्पृशास्पृश्य बंधू मिरवणूकीने तळ्यावर जाऊ व आपली तृष्णा शांती करू”. असे आवाहन डॉ. आंबेडकरांनी करताच सीताराम नामदेव शिवतरकर, डॉ. बाबासाहेबांचे बंधू बाळाराम रामजी आंबेडकर व पुत्र यशवंतराव, पा. ना. राजभोज, देवजी डोळस, गणपत जाधव इत्यादी मंडळीसह सर्व अनुयायी चवदार तळ्याच्या दिशेने गेले.

आपल्या असंख्य अनुयायांसह डॉ. आंबेडकरांनी २० मार्च १९२७ ला तळ्याचे पाणी प्राशन केले. मानव मुक्तीच्या महान क्रांतीचा हा कृतीरुपाने केलेला प्रारंभ होय.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

नेहरु अहवालावर डॉ. आंबेडकरांचे मत : इ.स. १९२८ मध्ये पंडित मोतीलाल नेहरु अध्यक्ष असलेल्या समितीने सादर केलेला ‘नेहरु अहवाल’ अस्पृश्यांकरिता कसा अहितकारक आहे, हे डॉ. आंबेडकरांनी १८ जानेवारी १९२९ च्या ‘बहिष्कृत भारत’ मध्ये ‘नेहरु कमिटीची योजना व हिंदुस्थानचे भविष्य’ हा अग्रलेख लिहून स्पष्ट केले.

ज्या सवलती नेहरु अहवालाने मुस्लीमांना दिल्या त्याच सवलती अस्पृश्य वर्गास का दिल्या नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अस्पृश्य हे दारिद्र्याने पीडलेले, अन्यायाने ग्रस्त, अज्ञानी असून त्यांना कोणतेही राजकीय हक्क नाहीत, असे असतानाही अस्पृश्यांना काही सवलती नकोत? त्यांचा प्रश्न सामाजिक स्वरूपाचा असून तो शिक्षणाने सुटण्यासारखा आहे.

असा अभिप्राय नेहरु अहवलाने दिला होता. त्यावर डॉ. आंबेडकरांनी खेद व्यक्त केला.  नेहरु कमिटीची भाषा हे तत्त्व आधारभूत मानून नवीन प्रांताची भाषावार पुनर्रचना करण्याची सूचना ही ऐक्याच्या भावनेवर मुळातच घाव घालणारी आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते.

हिंदूच्या हितसंबंधाच्या बाबतीत नेहरु कमिटीने इतकी बेपर्वाई केली आहे की, अल्पसंख्याक मुस्लीम लोकांना जे हक्क देण्यात आले आहेत, तेही हक्क अल्पसंख्याक हिंदूना देण्यात आले नाहीत. म्हणून नेहरु कमिटींच्या योजनेत हिंदूना धोका आहे. इतकेच नव्हे तर हिंदुस्थानवरही अरिष्ट आहे, असे डॉ. आंबेडकरांचे स्पष्ट व परखड मत होते.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

वर्तमानपत्र : समाजातील शोषित, उपेक्षित लोकांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडावी, त्यांच्यात जागृती निर्माण करून आत्मविश्वास वाढवावा, तसेच सामाजिक सुधारणा चळवळीची भूमिका, ध्येय धोरणे स्पष्ट करून पुरोगामी विचारांना व सुधारणेला विरोध करणाऱ्यांना आपली भूमिका स्पष्ट करून सांगावी. याकरिता डॉ. आंबेडकरांनी अनेक वृत्तपत्रे काढलीत.

१) मुकनायक : विषमतावादी समाजव्यवस्थेने वर्षानुवर्षे लादलेल्या गुलामगीरीमुळे दलित माणूस जिवंत असून सुद्धा ‘मूक’ होता. मूक व्यक्तींच्या व्यथा वेदनांना वाचा फोडण्याकरिता त्यांचा आवाज समाजातील इतर घटकांपर्यंत पोहचविण्याकरिता डॉ. आंबेडकरांनी २१ जानेवारी १९२० ला ‘मुकनायक’ पाक्षिकाची सुरुवात केली.

पाक्षिकाचे संपादक पांडूरंग नंदराम भटकर यांना करण्यात आले होते. हे पाक्षिक सुरू करण्याकरिता राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना सहाय्य दिले होते. इ.स. १९२३ पर्यंत हे पाक्षिक चालू होते. खऱ्या अर्थाने ‘मुकनायक’ हे ‘मुक’ समाजाला दिशा देणारे ‘नायकच’ होते.

२) बहिष्कृत भारत : मुकनायक हे वृत्तपत्र बंद पडल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी ३ एप्रिल १९२७ ला ‘बहिष्कृत भारत’ वृत्तपत्र सुरू केले. इ.स. १९२९ पर्यंत हे वृत्तपत्र चालु होते. या दोनवर्षाच्या काळात हे वृत्तपत्र दलित चळवळीचे मुखपत्र बनले. या वृत्तपत्राचे ३४ अंक काढण्यात आले होते.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

३) समता : डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्त्वाखाली चालविल्या जाणाऱ्या समाज समता मुखपत्र असलेले ‘समता’ वृत्तपत्र २९ जून १९२८ साली सुरू करण्यात संघाचे’ आले. या वृत्तपत्राचे संपादक देवराव नाईक होते हे वृत्तपत्र लोकाश्रयाअभावी अल्पजीवी ठरले.

४) जनता : डॉ. आंबेडकरांनी २४ नोव्हेंबर १९२९ पासून ‘जनता’ नावाचे पाक्षिक चालविण्यास सुरुवात केली. ३१ ऑक्टोंबर १९३१ मध्ये जनता साप्ताहिक बनले. ‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. म्हणजे तो बंड करून उठेल’ हे घोषवाक्य जनताचेच होते. देवराव नाईक हे जनताचे पहिजे संपादक होते. नंतर भा. र. कद्रेकर, ग. नि. सहस्त्रबुद्धे, बी. सी. कांबळे आणि यशवंतराव आंबेडकर यांनी संपादकाचे कार्य केले. हे साप्ताहिक फेब्रुवारी १९५६ पर्यंत अस्तीत्त्वात होते.

५) प्रबुद्ध भारत : डॉ. आंबेडकरांनी जनताचे नामांतर करून ४ फेब्रुवारी १९५६ पासून ‘प्रबुद्ध भारत’ साप्ताहिक सुरू केले. ६ डिसेंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निर्वाण झाल्यानंतर हे वृत्तपत्र चालविण्याची जबाबदारी एका संपादक मंडळावर येऊन पडली. प्रबुद्ध भारत हे सुरुवातीला शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे मुखपत्र होते. इ.स. १९५७ मध्ये रिपब्लीकन पक्षाची स्थापना झाल्यानंतर ते रिपब्लीकन पक्षाचे मुखपत्र बनले.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

शैक्षणिक कार्य व विचार : ‘समाजाचा विकास करायचा असेल तर शिक्षणापेक्षा दुसरे मोठे साधन नाही’ या डॉ. आंबेडकरांचा ठाम विश्वास होता. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, या मुल्यांवर आधारित समाज घडविण्यासाठी शैक्षणिक क्रांतीची आवश्यकता असल्याची जाणीवही त्यांना होती.

संधीचा योग्य विनियोग केल्यास अस्पृश्य व्यक्तीही उच्चविद्याविभूषित होतो. हे स्वतःच्या उदाहरणाद्वारे त्यांनी दाखवून दिले होते.  शिक्षणापासून वंचित असलेल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा याकरिता बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून वाचनालये, प्रौढासाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या.

दलितांच्या विकासासाठी त्यांना विशेष सवलती मिळणे आवश्यक आहे, असे मत डॉ. आंबेडकरांचे होते. त्यामुळेच गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून कामकरीत असताना दलितांना आपल्या सर्वांगीन प्रगतीसाठी आवश्यक त्या सर्व सवलती मिळतील याविषयी त्यांनी विशेष दक्षता घेतली.

आर्थिक विचार : समाजशास्त्र, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, मानववंशशास्त्र व कायदेशास्त्र यामध्ये डॉ. आंबेडकरांचा अधिकार सर्वश्रुत आहेच पण त्याचबरोबर ते उच्चदर्जाचे अर्थतज्ज्ञही होते. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲन्ड पॉलिटिकल सायन्स’ येथून अर्थशास्त्रामध्ये ‘डी.एस्सी.’ पदवी मिळविणारे ते पहिले भारतीय होते. त्यांनी अर्थकारणावर प्रचंड लिखाण केले. त्यामध्ये त्यांनी अर्थविषयक मौलीक विचार मांडलेले आहेत.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

‘Administration and Finance of the East India Company’ या एम.ए. च्या परीक्षेसाठी विद्यार्थी जीवनात लिहिलेल्या शोधनिबंधात इ.स. १७९२ ते इ.स. १८५८ या काळात ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय जनतेची जी आर्थिक पिळवणूक केली त्याचे आकडेवारीसह विस्तृत विवेचन केले आहे.

कंपनी सरकारचे या काळातील भारतातील कामगिरीचे मूल्यमापन करताना डॉ. आंबेडकर लिहतात, “भारताने इंग्लंडसाठी केलेले प्रचंड आर्थिक योगदान हे जेवढे थक्क करणारे आहे. तेवढेच इंग्लंडने भारतासाठी केलेले नगण्य आर्थिक योगदान विस्मयकारक आहे.

” ‘The Evolution of provincial in British India’ या प्रबंधामध्ये ब्रिटिश केंद्र सरकार आणि त्यावेळी अस्तित्वात असलेली घटक राज्ये यांच्या इ.स. १८३३ ते इ.स. १९२१ या कालखंडातील विकसित होत गेलेल्या आर्थिक संबंधाची ऐतिहासिक मिमांसा करून या कालखंडात खर्चाचा अर्थसंकल्प करण्याचा अधिकार घटकराज्यांकडे तर लागणारा पैसा उभारण्याची जबाबदारी केंद्राकडे त्यामुळे महसुली तूट वाढू लागली.

म्हणून इ.स. १८७१ पासून केंद्र व राज्य सरकार यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करण्याची पद्धत भारतात सुरू झाली, असे डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केले. ‘The Problem of Rupee Its origion & Its Solution’ हा प्रबंध प्रथम इ.स. १९२३ मध्ये प्रसिद्ध झाला.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

त्यानंतर इ.स. १९४७ मध्ये History of Indian Currency & Banking’ या नावाने पुन्हा प्रकाशित करण्यात आला.

इ.स. १८०० ते इ.स. १८९३ या कालावधीत भारतीय रुपयाची चलनाचे परिणाम म्हणून झालेली जडण-घडण, रुपयाचा विनिमय दर त्या संदर्भातील समस्या, भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम आणि त्यावरील उपाय इत्यादींचे विवेचन डॉ. आंबेडकरांनी यामध्ये केले आहे.

‘Annihilation of Caste’ या ग्रंथामध्ये डॉ. आंबेडकरांनी हिंदूधर्मात जातीव्यवस्थेवर आधारित असलेला श्रमविभागणी सिद्धांत अमान्य केला.  ‘कोणत्याही समाजात स्थैर्यासाठी, श्रमविभागणी अपरिहार्य असते.’ असे त्या सिद्धांताचे समर्थन करणाऱ्यांना उत्तर देताना या ग्रंथामध्ये डॉ. आंबेडकरांनी ‘हिंदू धर्मातर्गत जातीव्यवस्थेमध्ये श्रमाची विभागणी नाही.

तर श्रमिकांची विभागणी आहे. असे परखड आणि स्पष्ट मत व्यक्त केले. यासंबंधी पुढे ते लिहितात, “श्रमाच्या विभागणीमध्ये काहीही गैर नसते.  परंतु श्रमिकांची विभागणी असमर्थनीय आहे. कारण ती अमानवीय आहे. जात हा या विभागणीचा आधार आहे. जगात कुठेही अशी विभागणी झालेली नाही.

या विभागणीमुळे भारताचे अतोनात नुकसान झाले आहे.” ‘What Congress and Gandhi have done to the Untouchables’ या ग्रंथामध्ये अस्पृश्यता, ही केवळ धार्मिक रचना नसून गुलामगिरीपेक्षाही ती भयंकर अशी आर्थिक रचना आहे, असे मत त्यांनी मांडले.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

डॉ. आंबेडकरांनी इ.स. १९४६ ला स्वतंत्र भारताच्या आर्थिक पुनर्रचनेचा आराखडा ‘States and Minorites’ या नावाने ग्रंथरूपात प्रकाशित केला. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची विकास नीती ठरविताना दारिद्र्य निर्मूलन, सामाजिक विषमता, शोषणमुक्त समाज निर्मिती या तत्त्वाचा अग्रक्रमाने विचार करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली होती.

या ग्रंथामध्ये खाजगी उद्यमशीलतेतील व्यक्तिगत प्रेरणांचा संकोच होऊ नये अशी भूमिका घेतली. तसेच आर्थिक क्षेत्रात आणि विशेषतः उद्योग व शेती क्षेत्रात शासनसंस्थेच्या हस्तक्षेपाचे डॉ. आंबेडकरांनी समर्थन केले. त्या अनुषंगाने त्यांनी ‘सामुदायिक शेतीचा प्रयोग’ आणि ‘राज्य समाजवाद’ या दोन्ही गोष्टींचा ऊहापोह या ग्रंथामध्ये केलेला आहे.

डॉ. आंबेडकरांनी कर प्रणाली कशी असावी यासंबधीही आपले विचार मांडले. त्यांच्या मते, “एका चांगल्या महसूल पद्धतीची पहिली आणि सर्वात अनिवार्य आवश्यकता म्हणजे ती विश्वसनिय असली पाहिजे. त्या महसुल पद्धतीमुळे कमी अथवा अधिक महसूल मिळतो, ही गोष्ट महत्त्वाची नाही. महत्त्वाची गोष्ट ही की, महसुलातून जे काही प्राप्त होते ते निश्चित असले पाहिजे.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

“त्यांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या आर्थिक संकल्पनांचे तुलनात्मक विश्लेषण करताना म्हटले, “दुःख मुक्ती किंवा शोषणमुक्तीचे बुद्ध आणि मार्क्स यांचे मार्ग वेगळे आहेत. परंतु आर्थिक गुलामगिरीतून येणारे, निर्माण होणारे दुःख नष्ट झाल्याशिवाय मानवी पातळीवरचे नैतिक जीवन जगताच येत नाही.” ते पुढे म्हणतात, “संपन्न मानवी जीवनाच्या आविष्कारासाठी मार्क्सच्या तुलनेत बुद्धाच्या पर्यायाचा विचार अधिक स्वीकारशील आहे.”

डॉ. आंबेडकरांनी केलेल्या अर्थचिंतनातून देशाच्या आर्थिक प्रगतीकरिता, कल्याणकारी राज्य निर्मितीकरिता न्याय्य तत्वावर आधारित अर्थव्यवस्थेचे व्यवस्थापन करून देशाच्या आर्थिक उन्नतीला गती देण्याचा मूलगामी विचार प्रगट होतो.

लोकशाहीसंबंधी विचार : डॉ. आंबेडकरांची लोकशाहीवर दृढ विश्वास होती. त्यांनी विविध कमिशन पुढे दिलेली साक्ष, वेळोवेळी दिलेली भाषणे, संसदेत विविध विषयांवर केलेली चर्चा, Federation versus Freedom’ यासारखे लिहिलेले ग्रंथ यामधून त्यांचे लोकशाहीसंबंधी विचार प्रगट होतात.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

लोकशाहीमध्ये बंधुभावाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. आंबेडकर म्हणतात, “बंधुभाव हा लोकशाहीचे मूळ आहे. बंधुभाव हेच लोकशाहीचे दुसरे नाव आहे.” “लोकशाही ही प्रजासत्ताक तसेच संसदीय शासन यापेक्षा एकदम वेगळी आहे. लोकशाहीची मुळे ही संसदीय अथवा इतर प्रकारच्या शासन व्यवस्थेत रुजली नाहीत.

लोकशाही ही शासनाच्या प्रकारापेक्षा उच्चतम बाब होय. लोकशाही ही मुळात सहजीवनाची पद्धत आहे. समाज ज्या लोकांचा मिळून बनलेला असतो त्यांच्या परस्पर सहजीवनाच्या सामाजिक संबंधात लोकशाहीची मुळे शोधली गेली पाहिजेत.”

सुशिक्षित समाजावर लोकशाहीचे यश अवलंबून असते. हे स्पष्ट करताना डॉ. आंबेडकर म्हणतात, “लोकशाही यशस्वी करायची असेल तर जनता, समाज नैतिक मूल्याधिष्ठित शिक्षणाद्वारे संस्कारित असावा. लोकशाहीसाठी सुशिक्षित समाजाची अत्यंत गरज आहे.

शिक्षित नैतिक मुल्यधिष्ठित समाजात लोकशाही ही सर्वात यशस्वी किंवा हमखास यशस्वी ठरु शकेल.”  लोकशाही यशस्वी होण्याकरिता काही पथ्थे जरूर पाळली गेली पाहिजेत असा डॉ. आंबेडकरांचा आग्रह होता. त्यांच्या मते, “लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद नसावा, सबल विरोधी पक्ष असावा.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

कायदा आणि सुव्यवस्थेपुढे सर्वाना सारखे लेखण्यात यावे, संसदीय नीतीमत्ता आणि सारासार विचार किंवा सद्सद्विवेकबुद्धीचा काटेकोरपणे वापर व्हावा. बहुसंख्यकांनी अल्पसंख्यकांना सन्मानाने वागवावे त्यांच्यावर अन्याय करू नये.” “सामाजिक व आर्थिक परिवर्तनाशिवाय संसदीय लोकशाही निरर्थक ठरते.

जातिभेद, वर्णभेद व टोकाचे वर्गभेद विद्यमान असल्यास लोकशाही असून नसल्यासारखीच असते.” डॉ. आंबेडकरांचा विभूती पुजेला सक्त विरोध होता. ते म्हणतात, “आपल्या आवडत्या नेत्याविषयी एखाद्याने आदर बाळगणे वेगळे आणि त्यांचे देवारे माजविणे किंवा त्याला डोक्यावर घेणे वेगळे विभूतिपूजा म्हणजे लोकशाहीचे विडंबन होय.”

डॉ. आंबेडकरांनी घटना समिती समोर भाषण देताना लोकशाही अपयशी का होऊ शकते हे सांगताना म्हटले होते. २६ जानेवारी १९५० ला आम्ही विसंगतीपूर्ण जीवनात पदार्पण करणार आहोत राजकीय समता आम्ही प्राप्त केली परंतु सामाजिक आणि आर्थिक विषमता कायम ठेवून.

हजारो वर्षे आमच्या देशात सामाजिक व आर्थिक विषमता आहे. येणाऱ्या काळात आम्ही राजकीय समतेला सामाजिक व आर्थिक समतेत परिवर्तीत केले नाही तर जे लोक सामाजिक व आर्थिक विषमतेचे बळी ठरलेत, ते लोक न्यायाच्या अभावी राजकीय लोकशाही निरर्थक समजून मोठ्या परिश्रम आणि त्यागाने उभारलेल्या लोकशाहीच्या या डोलाऱ्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.”

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

भारतीय घटनेचे शिल्पकार : भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया इ.स. १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यापासून सुरू झाली आणि २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेने संविधान स्वीकारे पर्यंत ती चालली. संविधान निर्मितीकरिता डॉ. आंबेडकरांनी केलेली कामगिरी अतुलनिय आणि असामान्य होती.

भारताला अधिक राजकीय अधिकार देण्यासंदर्भात विचारविनिमय करण्याकरिता सायमन कमिशन भारतात येणार होते. सायमन कमिशन सोबत विचार विमर्श करण्यासाठी राज्यस्तरावर विधिमंडळ समितीची निवड करण्यात आली. या समितीवर डॉ. आंबेडकरांची निवड झाली होती.

खऱ्या अर्थान येथूनच संविधानासंबंधी सखोल व सुक्ष्म माहिती प्राप्त करून घेण्यास व त्यावर चिंतन करण्यास त्यांनी प्रारंभ केला.  सायमन कमिशनपुढे अतिशय अभ्यासपूर्ण साक्ष त्यांनी नोंदवली. नंतर त्यांना गोलमेज परिषदेकरिता आमंत्रीत केले गेले. पहिल्या गोलमेज परिषदेत प्रारंभिक सत्रानंतर एकूण ९ उपसमित्या बनविल्या गेल्या होत्या.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

संयुक्त संविधान समितीचा अपवाद वगळता बाकी सर्व समित्यांचे डॉ. आंबेडकर सदस्य होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेला देखील ते हजर होते. गोलमेज परिषदेत संघीय संरचना, प्रांतीय संविधान, अल्पसंख्याक, मताधिकार संरक्षण, सेवा इत्यादी समित्यांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

भारतीय संवैधानिक सुधारणेबाबत संयुक्त समितीच्या पुढे सर पेट्रीक जेम्सफॅगन, सरजॉन थॉम्पसन, कर्नल बूरस, जेम्स व हटन, सर विन्स्टन चर्चिल, गिडने, सर सॅम्युअल होअर इत्यादी जवळपास २० व्यक्तीच्या साक्षी त्यांनी घेतल्या होत्या.  डॉ. आंबेडकरांनी गोलमेज परिषदेतील उपसमितीच्या बैठकीत जे विचार व्यक्त केले होते, त्याचा प्रभाव इ.स. १९३५ च्या कायद्यावर पडलेला दिसतो.

भारताचे स्वातंत्र्य दृष्टिपथात येऊ लागले होते. तेव्हाचे व्हाईसरॉय लार्ड माऊंटबॅटन यांनी दिलेल्या अंतिम सुचनेनुसार संविधान सभेच्या निवडणुका सुरू झाल्या. डॉ. आंबेडकर १९ जूलै १९४६ ला बंगाल प्रांतातील जस्सोर आणि खुलना या मतदार संघातून संविधान सभेचे सदस्य म्हणून निवडून आलेत.

९ डिसेंबर १९४६ पासून संविधान सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. भारत पाकिस्तान फाळणीनंतर डॉ. आंबेडकरांचा मतदार संघ पाकिस्तानात गेला. त्यामुळे त्यांचे संविधान सभेतील सदस्यत्व धोक्यात येणार होते. म्हणून ए. एम. जयकरांचे मुंबई प्रांतातील संविधान सभेतील सदस्यत्व रद्द करण्यात येऊन त्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून आणण्यात आले.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

२९ ऑगस्ट १९४७ ला डॉ. आंबेडकरांची घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. समितीत डॉ. के. एम. मुन्शी, गोपाल स्वामी अयंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सय्यद मोहम्मद सादुल्लाह, बी. एल. मित्तर (आजारपणामुळे राजीनामा दिल्यानंतर बी. एल. मित्तर यांचे जागेवर एन. माधव राऊ), डी. पी. खेतान (इ.स. १९४८ साली मृत्यूनंतर डी. पी. खेतान यांचे जागेवर टी. पी. कृष्णम्माचारी) असे अध्यक्षांसह एकूण सात सदस्य होते.

परंतु या सदस्यांपैकी कोणीही मसुदा समितीच्या कामकाजात पुरेसा भाग घेऊ शकले नाहीत. त्यामुळे राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी डॉ. आंबेडकरांवर आली. त्यांनी हे कार्य अत्यंत समर्थपणे पार पाडले. डॉ. आंबेडकर संविधान सभेच्या २५ नोव्हेंबर १९४९ ला केलेल्या भाषणात म्हणाले होते, “घटना कितीही चांगली असली तरी ती अंमलात आणणारे लोक जर चांगले नसतील तर त्या घटनेचे मातेरे होते.

मात्र घटना कितीही वाईट असली तरी ती राबविणारे लोक चांगले असतील तर ती घटना निःसंशय चांगली ठरते. २६ नोव्हेंबर १९४९ ला भारताची राज्यघटना तयार झाली हे कार्य २ वर्ष ११ महिने १७ दिवस सुरू होते. २६ जानेवारी १९५० पासून ती अंमलात आली. भारताचे संविधान निर्माण करण्याकरिता डॉ. आंबेडकरांनी अविरत परिश्रम घेतले.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

म्हणूनच भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी म्हटले की, “डॉ. आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. डॉ. आंबेडकरांच्या या कार्याचा गौरव करताना मसुदा समितीचे डॉ. आंबेडकरांचे एक सहयोगी श्री. व्ही. टी. कृष्णम्माचारी यांनी संविधान सभेतील भाषणात असे प्रतिपादन केले की, “संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते.

त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही आणि अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले. त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बऱ्याच लांब होत्या आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती.

म्हणून सरते शेवटी असे घडले की, संविधानाचे उत्तरदायित्व डॉ. बाबासाहेब आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही जवाबदारी हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पाडले यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत. “

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

आरक्षणाची व्यवस्था : ब्रिटिश सरकारने इ.स. १९२८ साली एच. बी. स्टार्ट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीमध्ये डॉ. आंबेडकर, सोळंकी, ठक्कर इत्यादी सदस्य होते. भारतातील सामाजिक स्थितीचा अभ्यास करून या समितीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग असे तीन मागास वर्ग भारतीय समाजात आहेत असे सांगितले आणि त्यांना विशेष संरक्षण देण्याची शिफारस केली.

इ.स. १९३० ला हा अहवाल सादर झाला. या अहवालाच्या शिफारशी नुसार नंतरच्या काळात अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्ग यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आखण्यात आल्या व समाजकल्याण खातेही निर्माण केले गेले. डॉ. आंबेडकरांनी इ.स. १९४६ मध्ये शूद्र पूर्वी कोण होते? हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी शुद्रांचा इतिहास प्रथमच उजेडात आणला. शूद्र हे पूर्वी क्षत्रिय होते.

वैदिक धर्माच्या यज्ञवादी संस्कृतीविरुद्ध ज्या ज्या क्षत्रियांनी आवाज उठवून यज्ञाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे होत असलेले शोषण रोखण्याचा प्रयत्न केला. त्या त्या क्षत्रियांवर अमानूष जुलूम जबरदस्ती करून त्यांना शूद्र कसे करण्यात आले आणि तेव्हापासून शुद्रांवार शेकडो वर्षे इथल्या समाजव्यवस्थेत कसा अन्याय झाला हे सप्रमाण दाखवून दिले.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शुद्रांचा कसा विकास साधल्या जाईल यासंबंधी चिंतन करीत होते कारण शुद्रांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्याहून अधिक होती. पन्नास टक्याहून अधिक जनता मागास अवस्थेत राहली तर देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही याची जाणीव त्यांना होती.

म्हणूनच संविधान निर्माण करीत असताना ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळी प्रथम त्यांनी इतर मागास वर्गाचा विचार केला. संविधानामध्ये इतर मागास वर्गासाठी ३४० वे कलम, अनुसूचित जातीसाठी ३४१ वे तर अनुसूचित जमातीसाठी ३४२ वे कलम तयार केले आणि ही सर्व कलमे घटना समितीकडून मंजूर करून घेतली.

यापैकी ३४१ व्या व ३४२ व्या कलमाला फारसा विरोध झाला नाही. परंतु इतर मागास वर्गाकरिता असलेल्या ३४० व्या कलमाला प्रचंड विरोध झाला. घटना समितीत आणि संसदेत हिंदू धर्मीय सदस्यांनी या कलमा विरुद्ध आवाज उठविला.  परंतु डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या विरोधाला न जुमानता ओबीसी कोण आहेत व ते मागास का राहीले हे पटवून दिले आणि संविधानात ३४० व्या कलमाची तरतूद केली.

२६ जानेवारी १९५० ला संविधान लागू होताच त्यांनी इतर मागास वर्गाचे मागासलेपणाचे कारण शोधून त्यावार शिफारशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याची मागणी केली. परंतु तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंनी याकडे दुर्लक्ष केले.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

इतर मागासवर्गाकडे पाहण्याचा सरकारचा उपेक्षित दृष्टिकोन तसेच हिंदू कोड बिलाविषयी दाखविलेली उदासिनता याचा निषेध म्हणून त्यांनी २७ सप्टेंबर १९५१ ला कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. डॉ. आंबेडकरांनी इ.स. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळी आपल्या पक्षाच्या जाहिरनाम्यात ३४० व्या कलमानुसार ओबीसी आयोग स्थापन करण्याचे अभिवचन दिले होते.

नंतर पंडित नेहरूनीही ओबीसी काँग्रेस पासून दूर जाण्याची भिती निर्माण झाल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्यात ओबीसींकरिता आयोग स्थापन करण्याचे आश्वासन दिले. १९ जानेवारी १९५३ ला दत्तात्रय बाळकृष्ण ऊर्फ काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. मात्र या आयोगाने केलेल्या शिफारशी सरकारने लागू केल्या नाहीत.

कित्येक वर्षापर्यंत ओबीसी आरक्षणाला विरोध होत राहिला. नंतर इ.स. १९९० च्या मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करून ओबीसीचे आरक्षण मान्य करण्यात आले. मागास वर्गाकरिता आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये डॉ. आंबेडकरांची महत्त्वाची भूमिका होती.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

महापरिनिर्वाण : डॉ. आंबेडकरांनी शोषित-पिडित जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता. सर्वांना माणूस म्हणून जगण्याची समान संधी प्राप्त करून देण्याकरिता, देशात समानता प्रस्थापित करून राष्ट्राची प्रगती घडवून आणण्याकरिता कठोर परिश्रम घेतले. हे कार्यकरीत असताना स्वतःच्या शरिराकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले.

ते इ.स. १९४८ पासून मधूमेह रोगाने ग्रस्त होते.  या काळात त्यांची दुसरी पत्नी डॉ. सविता आंबेडकर (शारदा कबीर यांचा इ.स. १९४८ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत विवाह झाल्यानंतर नाव बदलविले) यांनी त्यांची सेवा केली. इ.स. १९५४ मध्ये या आजारामुळे त्यांची दृष्टी कमी होत गेली.

अशा स्थितीतही त्यांनी पांडू लिपीमध्ये ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. त्यानंतर ३ दिवसांनी ६ डिसेंबर १९५६ ला दिल्लीतील त्यांच्या घरी झोपेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. ७ डिसेंबरला मुंबई येथे बौद्ध धर्म पद्धतीने त्यांच्यावर असंख्य अनुयायांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार केला गेला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेला, त्यांच्या कार्याला, जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या, प्रांताच्या देशाच्या सिमा नव्हत्या. त्यांचा लढा न्यायाकरिता होता. अन्यायाविरुद्ध होता. म्हणजेच कोणत्याही व्यक्ती किंवा धर्मा विरुद्ध नव्हता. म्हणूनच भारता बरोबर इतर देशांनी त्यांच्या विद्वत्तेचा, कार्याचा सन्मान केला.

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने ५ जून १९५२ ला त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉज’ ही पदवी बहाल केली. इ.स. १९९० मध्ये भारत सरकारने मरणोपरांत भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चारित्र्य लेखक धनंजय कीर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी लिहितात की, “पददलित समाजाला मनुष्याचा दर्जा मिळवून देणे, त्यांच्या आत्मसन्मानाची वाढ करणे आणि त्याला आत्मोद्धार करण्यास समर्थ करणे हे आंबेडकरांचे जीवितकार्य होते.

“भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले होते की, “हिंदू समाजातील छळ करणाऱ्या सर्व प्रवृत्तीविरुद्ध बंड करणारी व्यक्ती म्हणून आंबेडकरांचे प्रामुख्याने स्मरण राहील. त्या छळ करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध त्यांनी जळजळीतपणे विरोध केला म्हणून लोकांची मने जागृत राहिली होती. जरी ते एक वादग्रस्त व्यक्ती होते, तरी त्यांनी सरकारी कामकाजात मोठे विधायक नि महत्त्वाचे कार्य केले त्यांनी ज्याविरुद्ध बंड केले त्याविरुद्ध प्रत्येक व्यक्तीने बंड केले पाहिजे.”

Shetkaryancha Asud

Leave a Comment