Gopal Baba Walangkar
गोपाळबुवा वलंगकर : दलितांची स्थिती सुधारावी म्हणून दलित नेत्यांनी डॉ. आंबेडकरपूर्व काळात प्रयत्न केले होते. स्वतः डॉ. आंबेडरांनीही त्यांच्या या कार्याची आदरपूर्वक नोंद घेतली होती. दलित वर्गातील महाराष्ट्रातील पहिले पुढारी हा मान गोपाल बूबा वलंगकरे यांना जातो. त्यांचा जन्म इ.स. १८४० मध्ये रायगड जिल्ह्यातील महाड जवळील रावदल गावामध्ये झाला होता.
Gopal Baba Walangkar – गोपाळ बाबा वलंगकर
त्या काळात अस्पृशांना मिळणारी अमानुष वागणूक त्यांनी अनुभवली. वयाच्या अठराव्या वर्षी ते महाड येथे कंपनी सरकारच्या लष्करात भरती झाले. तिथे अशिक्षितांना शिक्षण दिले जाई. त्यांनी ते शिक्षण घेऊन नॉर्मलची परिक्षा पास केली. त्यांनी रामानंद पंथाचा स्विकार केला होता. हिंदू धर्मशास्त्रे, पुराणे, रामायण, महाभारत आदींचे सखोल वाचन करून अस्पृश्यता कोणी सुरू केली.
याचा शोध घ्यायला सुरुवात केली. इ.स. १८८६ साली हवालदार म्हणून पेन्शन घेतल्यानंतर ते दापोलीला राहण्यास आले तेथून त्यांनी आपली चळवळ सुरू केली.
महात्मा फुले आणि गोपाळबुवा वलंगकर : गोपाळबूवा इ.स. १८८६ साली रावडूल येथे फौजेतून निवृत्त झाल्यावर महात्मा फुलेच्या कार्यात सक्रिय सामील झाले. महात्मा फुलेंच्या रविवार सभांना ते नित्यनियमाने उपस्थित राहत असत. गोपाळबूवा वलंगकर महात्मा फुले सोबत सामाजिक, धार्मिक विषयावर चर्चा करीत. महात्मा फुलेंच्या सहवासामूळे त्यांची वैचारिक बैठक पक्की झाली.
Gopal Baba Walangkar – गोपाळ बाबा वलंगकर
हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांनी खोटे धर्मग्रंथ लिहून बहूजन समाजाची कशी फसवणूक केली आहे याची कल्पना त्यांना आली होती. त्यांचे पत्रे ‘दिनबंधु’ आणि ‘सुधारक’ साप्ताहिकातून प्रसिद्ध होत. या पत्रात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सवर्णाना त्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. गोपाळबूवांच्या कार्याची दखल घेऊन इ.स. १८९६ मध्ये पुण्यात सत्यशोधक समाजाच्यावतीने त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते.
मुंबई काँग्रेस अधिवेशन : काँग्रेसच्या समकालीन असा हा अस्पृश्यांच्या जागृतीया उषःकाल होता. इ.स. १८८९ मध्ये मुंबई येथे आयोजित कांग्रेस अधिवेशनात अस्पृश्यतेचा प्रश्न कार्यक्रम पत्रिकेवर घेण्याची गोपाळबुवांना विनंती केली. परंतु तत्कालीन ब्राह्मण व पारसी नेत्यांनी त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले.
Gopal Baba Walangkar – गोपाळ बाबा वलंगकर
विटाळ विध्वंसन पुस्तिका :अस्पृश्यता आणि जातिभेद यांचा उगम ब्राह्मणांच्या स्वार्थीबुद्धीत झालेला आहे. परमेश्वरी इच्छेने ही जात जन्मली नाही. ती ब्राह्मणांच्या क्षुद्र बुद्धीची उपज आहे असे त्यांना वाटे. हा विचार त्यांनी विस्तृतपणे प्रस्तुत करण्यासाठी इ.स. १८८८ ला पन्नास पानांची ‘विटाळ विध्वंसन’ नावाची पुस्तिका लिहली.
Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील
यामध्ये दलिताच्या घरी एका ब्राह्मणाने वास्तूशांती केल्यामुळे इतर ब्राह्मणांनी त्याला कसा त्रास दिला याचे विवेचन आहे. ‘विटाळ विध्वंसन पुस्तिकेद्वारे हिंदू धर्माच्या धर्मग्रंथातील खोटेपणा त्यांनी उघड केला. धर्मातील भ्रामक समजूती, अन्याय, दांभिकता यांना त्यांनी कायम विरोध केला.
Gopal Baba Walangkar – गोपाळ बाबा वलंगकर
मंत्रांनी ब्रम्हहत्या, गोहत्येचे पाप नष्ट होते, मुर्तीत देव येतो, स्त्री पुत्रवती होते, मृत स्वर्गात जातात. इ. अद्भुत घटना घडत असतील तर अस्पृश्यांना पवित्र व शुद्ध करण्याचे सामर्थ्य मंत्रात का नाही? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी यांची उत्तरे आर्य हिंदूनी किंवा शंकराचार्यांनी द्यावीत असे आव्हान केले होते. त्यांनी ‘अखंड’ या शीर्षकाखाली कविताही प्रकाशित केल्या होत्या.
अनार्य दोष परिहार समाजची स्थापना : अस्पृश्यता निवारणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे इ.स. १८९३ ला गोपाळबुवांनी ‘अनार्य दोष परिहार समाज’ नावाची संस्था काढली. संपूर्ण महाराष्ट्रभर या संस्थेच्या शाखा काढाव्यात म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. जातीयता आणि अस्पृश्यता नष्ट करून समता निर्माण करण्याचे उद्दीष्ट या संघटनेने ठरविले होते. या संघटनेद्वारे अस्पृश्यता कायद्याने रद्द करण्याचा अर्ज सरकारला सादर केला होता.
गोपाळबुवांनी संघटनेच्या माध्यमातून धर्मग्रंथाचे दाखले देत. या चळवळीला वैचारिक दिशा देण्यासाठी ‘दिनमित्र’ वृत्तपत्रातून लेख लिहून दलितांना जागे केले. इ.स. १८९८ साली सर हर्बल इसेल यांनी भारतीय लोकांच्या रितीरिवाजाची माहिती संकलीत करण्यास सुरुवात केली असता अस्पृश्य समाजाच्या माहितीकरिता या संस्थेकडे विचारणा केली होती.
Gopal Baba Walangkar – गोपाळ बाबा वलंगकर
अस्पृश्य जातींना पुन्हा लष्करात भरती करण्याची मागणी : इ.स. १८९२ ला लार्ड किचनेर याने भारतीय लष्करात दलितांची भरती बंद केली होती. त्यामुळे शौर्य गाजविण्यास वाव राहिला नाही. उन्नतीचा मार्गही बंद झाला. तेव्हा १ जुलै १८९४ ला गोपाळबुवांनी न्या. म. गो. रानडे यांच्याकडून अर्ज लिहून सरकारकडे पाठविला आणि दलितांची पुन्हा लष्करात भरती केल्या जावी ही मागणी केली.
पुणे येथिल सामाजिक परिषद : न्या. म. गो. रानडे यांच्या पुढाकाराने इ.स. १८९५ ला पुण्यामध्ये भरलेल्या सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाच्या वेळी गोपाळबुवांनी सवर्ण हिंदूनी आपल्या शाळा, विहीरी, तलाव, धर्मशाळा, विविध व्यापार व सार्वजनिक सेवांमध्ये दलितांना प्रवेश द्यावा अशा प्रकारची विनंती केली होती. तसेच समाजिक सुधारणांशिवाय राजकीय सुधारणांना अर्थ राहणार नाही असे प्रतिपादन केले होते.
Gopal Baba Walangkar – गोपाळ बाबा वलंगकर
महाड लोकल बोर्डाचे सदस्य : महाड लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून कूलाबाच्या जिल्हाधिकाऱ्याने गोपाळबुवांनी इ.स. १८९५ ला नेमणूक केली. तेव्हा २० मार्च १८९५ रोजी होऊ घातलेल्या लोकल बोर्डाच्या बैठकीवर सर्व सवर्ण सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. पण जिल्हाधिकारी व गोपाळबुवा हे सवर्णाच्या दडपणास बळी पडले नाहीत.
‘दिनबंधू’ संपादक नारायण मेघाजी लोखंडे यांनी म्हटले होते, “कोणाची इच्छा असो वा नसो. पूर्वीच्या उच्चवर्णीयांच्या कल्पना लयास जाणार तेव्हा आम्ही वेडगळ उच्चनीचतेच्या कल्पनास रजा देण्यास तयार व्हावे.” इ.स. १९०१ साली दलित चळवळीचे अग्रणी असलेले गोपाळबुवा वलंगकर काळाच्या पडद्या आड गेले. त्यांची चळवळ खऱ्या अर्थाने विटाळांचा त्या विटाळातून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा व अस्पृश्यतेतून निर्माण झालेल्या अन्याय, विषमतेचा विध्वंस करण्याकरिता होती.
त्यांनी उभारलेल्या चळवळीने दलितांमध्ये जाणीव जागृती निर्माण झाली. त्यातूनच दलित चळवळीचा पाया घातला गेला. डॉ. आंबेडकर गोपाळबुवांचा गौरव करताना म्हणतात, “अस्पृश्योन्नतीची चळवळ प्रथम सुरू केल्याचा मान जर कोणास द्यावयाचा असेल तर तो वलंगकरांनी स्थापन केलेल्या अनार्य दोष परिहारक समाजास व मुंबई प्रांतास द्यावा लागेल. “