Gopal Ganesh Agarkar
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यात कन्हाडजवळ असलेल्या टेंभू या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. त्यांच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य होते; पण त्यांचे आई-वडील आचरणाने सच्छील आणि सरळ मनाचे होते. त्यांची आर्थिक स्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मामाकडे कन्हाड येथे झाले.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
गरिबीमुळे त्यांनी मुन्सफ न्यायालयात कारकूनचीही नोकरी पत्करली; पण या नोकरीत त्यांचे मन रमले नाही. त्यामुळे ने पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीस गेले. त्या ठिकाणी त्यांनी वार लावून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला; पण ते न जमल्यामुळे ते परत कन्हऱ्हाडला आले आणि त्यांनी कंपाउंडरची नोकरी स्वीकारली. पुढे ते अकोला येथे जाऊन मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
पुढे ते पुणे येथे आले व त्यांनी डेक्कन कॉलेजात प्रवेश घेऊन इ. स. १८७८ मध्ये बी. ए. पदवी संपादन केली. याच वेळी त्यांना दम्याचा आजार जडला. तसेच लोकमान्य टिळकांशी त्यांचा स्नेह वाढला. इ. स. १८८१ मध्ये ते इतिहास व तत्त्वज्ञान घेऊन एम. ए. झाले. विद्यार्थिदशेत निबंध स्पर्धेत बक्षिसे मिळवून आणि ‘वन्हाड समाचार’ मध्ये नियमित लेख लिहून आणि शिष्यवृत्ती प्राप्त करून त्यांनी उपजीविका केली.
त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकांची नोकरी पत्करली. पुढे ते पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. थोडक्यात या काळात ते या कॉलेजचे प्राचार्य झाले. त्यांनी आपले आयुष्य समाजसेवेत घातले. इ. स. १८९५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
समाजसेवा :- आगकरांना गरिबीचे चटके फार सहन करावे लागले. विद्यार्थिदशेतच उपजीविकेसाठी त्यांना नोकऱ्या कराव्या लागल्या होत्या. न्यू इंग्लिश स्कूल (मुंबई) येथे त्यांना शिक्षकांची नोकरी मिळाली; परंतु नोकरीपेक्षा समाजसेवा महत्त्वाची वाटत होती. त्यांनी आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात म्हटले, की माझे शिक्षण संपले. मी मोठ्या पगाराची नोकरी करणार नाही.
मी अधिक संपत्तीची हाव धरणार नाही. पोटापुरते पैसे मिळवून मी त्यावरच समाधान मानणार आहे. माझा सर्व वेळ मी जनहितार्थ घालविण्याचे ठरविले आहे. इंदूरचे संस्थानिक शिवाजीराव होळकर यांनी त्यांना मासिक ५०० रूपये पगार देऊन नोकरीची संधी दिली; परंतु ती त्यांनी नाकारली. त्यांनी आयुष्यभर समाजसेवा आणि देशसेवा केली.
समाजसुधारणा :- आगरकरांनी समाजप्रबोधन करण्यासाठी ‘सुधारक’, ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांचा आधार घेतला. त्यांनी इ. स. १८८१ मध्ये ”केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली. इ. स. १८८७ पर्यंत त्यांनी ‘केसरी’चे संपादन केले. कोल्हापूरच्य बर्वे प्रकरणात आगरकर व लोकमान्य टिळकांना १०१ दिवसांची कारावासाची शिक्षा झाली होती.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
Justice Mahadev Govind Ranade – न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
पुढे या दोघांत सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी? याबाबत मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकरांनी ‘केसरी’चा संबंध तोडला. यानंतर त्यांनी इ. स. १८८८ मध्ये त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र काढले. इ. स. १८९५ पर्यंत हे वृत्तपत्र चालले.
या वृत्तपत्रातून त्यांनी अनिष्ट सामाजिक चालिरीतीविरुद्ध आवाज उठवला व त्यांनी सामाजिक सुधारणेचे विचार मांडले. सनातनी ब्राह्मणांनी त्यांना फार त्रास दिला व जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु त्यांनी न डगमगता समाजसुधारणेचे कार्य चालूच ठेवले.
बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक समता, स्त्री-पुरूष समता, ऐहिक जीवनपद्धत व विज्ञाननिष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती. लोकशिक्षण व लोकांच्या संमतीनेच समाजात परिवर्तन घडवून आणले पाहिजे, असे त्यांचे मत होते. धैर्य, स्वार्थत्याग, मनोनिग्रह व तत्त्वनिष्ठा हे गुण त्यांच्या अंगी होते.
या सर्व सद्गुणांचा उपयोग त्यांनी लोकहितासाठी केला. या कार्यासाठी त्यांनी संसार, पैसा व मानसन्मानाची पर्वा केली नाही; परंतु त्यांच्या कार्याचे व्हावे तसे चीज झाले नाही, अशी खंत त्यांची पत्नी यशोदाबाईंनी व्यक्त केली.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
शैक्षणिक कार्य :- सरकारी नोकरी करण्याऐवजी स्वतंत्र शाळा सुरू करून शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारण्यात आगरकरांचा एक वेगळा ध्येयवाद होता. त्यामुळे त्यांनी इ. स. १८८० मध्ये मुंबई येथे विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळकांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे व जे पालक आपल्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण देणार नाहीत, त्यांना दंड करावा. तसेच मुला-मुलींना समान व बरोबरीने वागणूक दिली पाहिजे. असे आगरकरांचे मत होते. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेणाऱ्यांवरही असली तरी ते दिले की नाही हे सरकारने पाहिले पाहिजे, असेही आगकरांनी प्रतिपादन केले.
त्यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले. ते म्हणतात, मानसिक व शारीरिक क्षीणता, दारिद्रय, पारतंत्र्य, अंधश्रद्धा, जातिभेद व अनिष्ट . चालिरीतींनी गांजलेल्या मरणोन्मुख झालेल्या भारत देशात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. युरोपीय देश व अमेरिकेत प्राथमिक शिक्षणाची सक्ती असलेले कायदे केले; पण रशियात असे कायदे नसल्याने जनता अज्ञानी राहिली, हे त्यांनी तुलनात्मकदृष्ट्या सिद्ध केले.
त्यांनी विद्यापीठीय शिक्षणाचे माध्यम देशी भाषा असावे, असा विचार व्यक्त केला व अशा आशयाचे अर्ज विद्यापीठाकडे पाठवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांनी ‘अनाथाचा बाली कोणी नाही या लेखात विद्यापीठाचा कला शाखेचा त्रैवार्षिक शिक्षणक्रम अत्यंत कष्टा झाल्याची तक्रार मांडली होती.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार :- आगरकरांनी स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला. मुला-मुलींना समान व बरोबरीने शिक्षण दिले पाहिजे, असे त्यांनी मत मांडले. त्यांनी मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची सक्ती हा ‘सुधारक’मध्ये लेख लिहिला होता. स्त्रियांना चरितार्थ चालविण्याचे शिक्षण दिले पाहिजे, असे त्यांना वाटत होते.
कारण, सुशिक्षित स्त्रियांना वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे की नाही? या लेखात ते म्हणतात, स्त्रियांना वरिष्ठ प्रतीचे शिक्षण देण्यापूर्वी त्यांच्या विवाहवयात व विवाहपद्धतीत बराच फरक होण्याची आवश्यकता आहे. बी.ए. एलएल.बी. व एम.ए उत्तीर्ण होण्यासाठी त्या अविवाहित राहणे आवश्यक आहे. मुलींना शिक्षण देण्यात यावे व प्रत्येक क्षेत्रात स्त्री-पुरुषांची स्पर्धा वाली पाहिजे.
स्त्री-पुरूषांना समान व एकत्र शिक्षण दिल्यामुळे त्यांच्यात विषयवासनेवा अपायकारक परिणाम न होता, मैत्रीचा पाया घातला जाईल, अनीती वाढणार नाही आणि अश्लीलता व कामवासनेची भावना कमी होईल, असे आगरकरांचे मत होते. ते ‘सुधारक’ मध्ये सुशिक्षित स्त्रियांचे लेख प्रसिद्ध करीत असत.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
बुद्धिप्रामाण्यवाद :- आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. तार्किक विचारसरणीवर आधारलेला बुद्धिप्रामाण्यवाद लोकांना समजावून सांगणे हेच आगरकरांचे ध्येय होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरा कशा निरर्थक आहेत, हे दाखविण्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादाचा आधार घेतला.
प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसावर घासून पाहणे, बुद्धीला पटेल तीच करणे आणि न पटेल ती गोष्ट टाकून देणे, असा आग्रह आगरकरांनी धरला. कोणतीही गोष्ट अंधश्रद्धेने स्वीकारू नये, ती डोळसपणारे स्वीकारली पाहिजे. सत्य बोलणे व सत्व घरून चालणे महत्वाचे आहे. त्यामुळे मनास जे योग्य वाटेल तेच लिहावे, बोलावे, सांगावे व करावे, असा आगकरावा उपदेश होता.
व्यक्तिस्वातंत्र्य :- आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. प्रत्येक व्यक्तीने परस्परांशी समान व उदारपणे वागले पाहिजे, असे त्यांचे मत होते. जन्मसिद्ध चातुर्वर्ण्यपद्धत ही व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वाच्या विरोधी असल्याने त्यांनी या पद्धतीस विरोध केला.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
प्रत्येक व्यक्तीने आवश्यक असणारी बंधने सोडून स्वातंत्र्याचा घेता येईल, तेवढा उपभोग घ्यावा आणि त्याचा उपयोग समाजहित इदेशहितासाठी असावा, असे आगरकरांनी प्रतिपादन केले. समाजव्यवस्थेत अनेक दोष आहेत. ते लोकांच्या नजरेस आणून देऊन ते दूर करण्यासाठी उपाय योजावेत.
व्यक्ती ही समाजाची घटक आहे; पण ती स्वयंपूर्ण आहे. व्यक्तीसाठी समाज असतो. समाजाला व्यक्तीशिवाय स्वतंत्र अस्तित्व नसते; पण समाजासाठी व्यक्ती नसते. व्यक्तीच्या हितासाठीच सामाजिक नियम केलेले असतात. त्यामुळे व्यक्तिविकास हेच ध्येय समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, असा आगरकरांनी विचार मांडला.
व्यक्तिस्वातंत्र्याचा लोप :- वरील कारणांमुळेच हिंदू समाजात शिलावस्था निर्माण झाली होती; पण पाश्चात्य ज्ञान व शिक्षणामुळे समाज पुन्हा प्रगतीची वाटचाल करू लागला होता. आगरकरांनी ‘गुलामांचे राष्ट्र’ या लेखात म्हटले, की राष्ट्रीय ऐक्यासाठी आवश्यक असणारे गुण आपल्यात नाहीत. आपल्यात धैर्य, उत्साह, बल, ज्ञान, तर्क, उद्योग, कला, देशाभिमान खरी धर्मश्रद्धा व सत्याचे आचरण करणे इत्यादी गुण नाहीत.
आपण भेकड व निरुत्साही आहोत. देशात स्वतंत्र विचार करणारे लोक जोपर्यंत निघणार नाहीत, तोपर्यंत देशाची प्रगती होऊ शकणार नाही. थोडक्यात, आम्ही पारतंत्र्यालाच पात्र आहोत. ‘सामाजिक सुधारणेस अत्यंत अनुकूल काळ सांप्रत काळ या लेखात आगरकरांनी असे म्हटले आहे, की आपली गृहस्थिती आणि धर्माचरण सुधारण्यासाठी सांप्रत काळ अनुकूल आहे. त्यामुळे आपण सामाजिक, धार्मिक व राजकीय सुधारणासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
अस्पृश्यता :- ज्या व्यक्तीचा स्पर्श टाळला जातो किंवा जी व्यक्ती स्पर्श करण्यास अयोग्य समजली जाते, त्या व्यक्तीस अस्पृश्य संबोधले जात असे. हिंदू समाजातील महार, मांग, चांभार व ढोर या जातींतील लोक जन्मसिद्ध अस्पृश्य होत, अस्पृश्यतेच्या नावावर अस्पृश्यांना वाईट व अपमानास्पद वागणूक दिली जात असे.
त्यांना सार्वजनिक पाणवठे, मंदिरे आणि रस्त्यावर फिरण्यास बंदी होती. कारण, त्यांच्या स्पर्शाने स्पृश्य लोकांना विटाळ होत असे. हा विटाळ प्रायश्चित घेतल्यानंतर जात असे. आगरकरांनी अस्पृश्यतेच्या रूढीतील आणि अविचारीपणा दाखवून दिला.
एका लेखात ते मतात, की आपल्या अंगात कसलाही जाण, योग्यता व अधिकार न राहिल्याने ब्राह्मण्य याव बहिष्कार घालण्याचे आपले दिवस आता संपले आहेत, हे ब्राह्मण लोकांना समजत कसे नाही? अस्पृश्य लोकांकडूनच ब्राह्मण आहे. अस्पृश्यांना सार्वजनिक शाळेत प्रवेश दिला पाहिजे, तेथे ब्राह्मण महाविद्याथ्र्यांची पंगत एकच असली पाहिजे.
अस्पृश्याबाबत बंधुभाव असेल तरच समाज बलवान आणि कर्तृत्वाशाली बनेल. पुणे येथे नगरपालिकेच्या हौदावर ब्राह्मणांसाठी आणि शुद्रांसाठी अशा दोन जागी दोन फलक होते. यावर ३० जानेवारी १८९३ च्या ‘सुधारक’ अंकात आगरकरांनी म्युनिसिपल हौद व ब्राह्मणांवर गदा’ हा लेख लिहून श्वासोवळ्या यांच्या कल्पनेवर टीका केली.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
सार्वजनिक हौद व पाणवठ्यावर पाणी याचा व स्नान करण्याचा सर्वांना समान अधिकार असल्याचे प्रतिपादन आगरकरांनी करून त्यांनी प्रत्येक मनुष्य जन्मतः स्वतंत्र असल्याची भूमिका घेतली. त्यांनी जातिभेद, वर्णभेद, जाती संस्था व अस्पृश्यतेमुळे देशाचे फार नुकसान झाले व समाजाचा विकास खुंटल्याचे स्पष्ट केले.
त्यांनी असेही स्पष्ट केले, की स्पृश्य व अस्पृश्यांच्या रंग आणि शरीररचनेत काहीही फरक नसताना त्यांच्यात भेदभाव का करण्यात यावा? एका काल्पनिक समाजपुरुषाच्या मुखातून ब्राह्मण, बाहुतून क्षत्रिय, मांड्यापासून वैश्य व पायापासून सूट जन्माला आले हे तरी कोणी ठरविले? असे पक्षपाती शास्त्र आपण झुगारून दिले पाहिजे.
इंग्रजांच्या गुणांचे अनुकरण :- ब्रिटिश राजवटीचे भारतीय समाजजीवनावर झालेल्या परिणामांची मीमांसा आगरकरांनी केली आहे. इंग्रजी राजवटीमुळे भारतीयांना पाश्चात्य ज्ञान मिळाले, प्रशासनात नोकचा मिळाल्या. विचारस्वातंत्र्य व व्यवसायस्वातंत्र्य मिळाले. आगरकरांनी ‘इंग्रजांच्या कोणत्या गोष्टी अनुकरणीय आहेत या लेखात इंग्रजांच्या पुढील गुणांचे अनुकरण करण्याचा समाजाला उपदेश केला.
१. प्रशासनात तत्परतेने व व्यवस्थित काम करणे
२. संतुलित आहार घेणे,
३. पोषाख व्यवस्थित असणे.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
४. जातिभेद न मानणे,
५. उद्योगीपणा, नियमितपणा व शोधक वृत्ती.
६. व्यापारी वृत्ती.
७. पाश्चात्य देशातील सुधारणेची मूलतत्त्वे.
आर्थिक विचार :- भारतातील दारिद्र्याचे आगरकरांना फार दुःख वाटत होते. या देशाची प्रगती व्हावी यासाठी ते धडपडत होते. वाचाल त चकित व्हाल’ या निबंधात त्यांनी आकडेवारीसह आपल्या देशातील दारिद्र्याचे ग दाखवून दिले. व्यापाराच्या वाढीशिवाय देशाचा व समाजाचा विकास प्रमाण होणार नाही, यासाठी इंग्रजांसारखे आपण उद्योगी बनले पाहिजे, असे सांगून आगरकर म्हणतात, ‘सुशिक्षित लोक ३०-३५ रूपयांच्या मागे लागले आहेत नोकरीमागे न लागता व्यवसाय केल्यास त्यांना काहीच कमी पडणार नाही.”
स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा :- आगरकरांनी स्त्रियांच्या स्थितीस सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रीदाम्य विमोचनाचा प्रश्न आग्रहाने मांडला. स्त्रीशिक्षण, बालविवाह विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न, विधवांची वाईट स्थिती, केशवपन व सती स्त्रियांचे अर्थार्जन याबाबतीत त्यांनी बुद्धिवादी भूमिका घेतली.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
संयुक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार केला. स्त्रीसुधारणेशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, असा त्यांचा विचार होता. पतीच्या निधनानंतर स्त्रीचे केशवपन केले जाई. ही प्रथा अमंगल, निंद्य व अन्यायी होती. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य वामन शिवराम आपटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीचे केशवपन केले.
हे पाहून आगरकर दुःखी झाले आणि त्यांनी आपल्या मृत्यूनंतर केशवपन करणार नाही म्हणून पत्नी यशोदाबाईकडून शपथ घेतली. अमुक वयाच्या आत केशवपन करू नये आणि त्यापुढेही ते स्त्रियांच्या मर्जीविरूद्ध होऊ नये म्हणून सरकारने कायदा करावा, असे त्यांचे मत होते.
‘दिनबंधू’ या वृत्तपत्रात न्हावी लोकांनी विधवांचे केशवपन करू नये, असा लेख प्रसिद्ध झाला. त्या वेळी त्या वृत्तपत्राचे व लेखकाचे आगरकरांनी अभिनंदन केले होते. विधवांना अनेक हालअपेष्टा सहन करीत जीवन जगावे लागत होते. आगरकरांनी ‘शहाण्यांचा मूर्खपणा हा लेख लिहिला.
यामध्ये त्यांनी सक्तीच्या वैधव्यावर टीका केली. विधवा ही हिंदू लोकांच्या मत्सराची, अविचाराची, विपरीत व रानटी धर्मश्रद्धेची व अन्यायीपणाची खुण असल्याचा विचार त्यांनी मांडला.
बालविवाहास विरोध :- आगरकरांच्या काळात बालविवाहाची पद्धत होती. या पद्धतीमुळेच स्त्रियांची दुःस्थिती निर्माण झाली, असे आगरकरांचे मत होते. बालसंगोपन आणि संसार चालविणे, ही कामे व्यवस्थित होण्यासाठी. बालविवाह टाळणे महत्त्वाचे ठरते. बालविवाहामुळेच संततीवर, समाजावर व स्त्रियांवर वाईट परिणाम होतात. स्त्रियांवर वैधव्य व केशवपनसारख्या संकटांना सामोरे जाण्याची वेळ येते.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
व्यावहारिक व अर्थशास्त्रदृष्ट्या आणि स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने बालविवाह हानिकारक ठरतो. बालविवाहामुळेच शक्तिहीनता, स्वातंत्र्यानी, धाडसीपणाचा अभाव व मंदबुद्धी इत्यादी दुर्गुण आपल्या ठायी आले आहेत. त्यामुळे आगरकरांनी बालविवाहास विरोध केला. त्यांनी संमती ज्याच्या बिलास पाठिंबा दिला. त्यांनी प्रौढ विवाहाचा पुरस्कार केला.
महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सुशिक्षित तरूणांनी बालविवाहविरोधात पुढाकार घ्यावा, असे आगरकरांनी सांगितले. त्यांनी महाराष्ट्र बालविवाह निषेधक मंडळी ही संस्था स्थापन करावी. या मंडळीची संख्या दोन हजार असावी आणि या सभासदांनी निधी उभारला म्हणजे बालविवाहाच्या विरोधात यशस्वीपणे कार्य करता येते, असे आगरकरांना वाटत होते.
स्वयंवर विवाह पद्धतीचा आग्रह : प्राचीन भारतात सुरवातीच्या काळात स्वयंवर विवाह पद्धत प्रचलित होती. राम आणि सीता यांचा विवाह स्वयंवर विवाह होता. मध्ययुगात बालविवाहाची प्रथा सुरू झाली. बालविवाहामुळे सद्गुणांचा न्हास झाला आहे. त्यामुळे ही विवाह पद्धत घातक व दृष्ट आहे. यासाठी सभांचे आयोजन करून बालविवाहाऐवजी प्रौढ विवाहाबद्दल समाजप्रबोधन करण्यावर त्यांनी भर दिला.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
मुलाच्या विवाहाचे वय १६-१७ वर्षे व मुलींच्या विवाहाचे वय १०-१२ वर्षांपेक्षा कमी असू नये यासाठी कायदा करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. १४ वर्षांखालील मुलीचा विवाह करणार नाही, अशी पालकांना शपथ घ्यावयास भाग पाडणे, हा पर्यायही आगरकरांनी सुचविला आहे. तसेच बालविवाह झालेल्या मुलीने हा विवाह पसंत नसल्याची तक्रार न्यायालयाकडे केल्यास, न्यायालयाने त्या मुलीचे लग्न रद्द करण्याचीही सूचना आगरकरांनी केली.
जरठ विवाहास विरोध :- ५० वर्षांचा पुरूष आणि ११-१२ वर्षांची मुलगी यांच्यात झालेल्या विवाहास ‘जरठ विवाह’ म्हणतात. या काळात असे विवाह होत असत. त्यामुळे स्त्रियांना कमी वयातच वैधव्य येत असे. तसेच बालसंगोपन व संसाराची जबाबदारी त्यांच्यावर येत असे.
अशा प्रकारच्या विवाहात पुरूषांच्या कामवासनेपासून स्त्रियांना मृत्यूला सामोरे जावे लागे. आगरकरांनी ‘समज नाही हेच’ हा लेख लिहिला. त्यामध्ये जरठ विवाह पद्धतीवा टीका केली. त्यांनी विवाहाच्या वयाची मर्यादा निश्चित करण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली.
संततीनियमन :- आगरकरांनी संततीनियमनाची काळजी घेण्याचाही आदेश समाजाला केला. आपले कुटुंब आटोपशीर ठेवण्याची काळजी पुरुषांनी घेतली पाहिजे. म्हणजे स्त्रियांनाही आत्मविकासाची संधी मिळते. स्त्रियांच्या इच्छेनुसार आणि परिस्थितीस अनुसरून संतती उत्पन्न व्हावी, असे आगरकरांना वाटत होते. मुले इतकीच झाली पाहिजेत, असा आग्रहही पुरुषांनी धरू नये.
स्त्रियांना होणारी संतती त्यांच्या इच्छेनुसार आणि संतोषाने होतात, असे आम्हाला वाटत नाही, असे आगरकर स्पष्ट म्हणतात. अधिक संतती होण्यास ते पुरूषांनाच जबाबदार धरतात. बाळंतपणाचे क्लेश व त्रास पुरूषांना माहीत नसतात. त्यामुळे कृत्रिम साधनांचा उपयोग करून संततीनियमन करावे, असाही त्यांनी पुरुषांना सल्ला दिला आहे.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार :- मध्ययुगात स्त्रियांवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे त्यांना कसलेही स्वातंत्र्य नव्हते. त्यांना पुरूषांच्या बंधनात राहावे लागत असे. आगरकरांनी स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्यांनी ‘सुधारक’ या वृत्तपत्रात मराठमोळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी हे दोन लेख प्रसिद्ध केले.
मराठा लोकांत पुरुषांप्रमाणे स्त्रियांना उघडपणे चागण्यास प्रतिबंध असे. त्यास ‘मराठमोळा’ हा शब्द वापरतात.nस्त्रिया या केवळ प्रजोत्पादनाची हिंडती-फिरती यंत्रे नाहीत. स्त्रियांत पुरूषापेक्षा काय कमी आहे? मग त्यांनाच बंधनात का टाकावे? असे आगरकर म्हणतात.
स्त्रियांना गोषात न ठेवता पुरूषांप्रमाणे त्यांना प्रत्येक व्यवहारात निष्णात केले पाहिजे, तसेच स्त्री-पुरुषातील संबंध स्वामी व सेवक असे न ठेवता समानतेच्या आणि संमतीच्या पायावर त्यांच्यातील संबंधाची उभारणी केली पाहिजे, असे आगरकरांनी प्रतिपादन केले.
व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न :- आगरकरांनी व्यसनमुक्तीसाठी वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध करून लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला. ‘दारूबाजी’ या लेखात त्यांनी दारूमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले आहेत. दारूमुळे पैसा खर्च होतो. बेअब्रू होते, विविध आजार होतात. संसाराचे विघटन होते आणि निद्रानाश होतो इत्यादी दुष्परिणाम होतात. दारूचे व्यसन वाईट आहे.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
त्यासाठी दारूबंदीचा प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांना वाटत होते. ब्रिटिश सरकार दारूच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करते; पण इंग्रज लोकच पक्के ‘दारूबाज’ असल्याची टीका आगरकरांनी केली आहे. तंबाखू आणि अफूच्या व्यसनावरही आगरकरांनी ‘सुधारक’ पत्रात लेख लिहिले आहेत.
तंबाखूमुळे चांगले आणि वाईट परिणाम होतात, विद्यार्थ्यांत तंबाखूचे व्यसन अधिक वाढले होते. त्यामुळे आगरकरांनी २५ वर्षांच्या आतील मुलांनी तंबाखूचे सेवन करू नये, असा उपदेश केला. दारूपेक्षा गांजा बरा आणि गांजापेक्षा अफू बरी; पण असे असले तरी आगरकर या सर्व मादक पदार्थाचे सेवन करू नये, असे बजावतात.
अफूमुळे सरकारला वार्षिक ५-६ कोटी रुपये उत्पन्न मिळत असे. त्यामुळे सरकारही अफूच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत असत. त्यामुळेच आगरकर सरकारवर टीका करीत असत.
समतोल आहार :- आगरकरांचे विचार सर्वव्यापी होते. त्यांनी चांगल्या आरोग्यासाठी समतोल आहार ठेवण्याचे समाजाला मार्गदर्शन केले. समाजात शाकाहार आणि मांसाहार प्रचलित होता. आगरकरांनी मासांहारापेक्षा शाकाहाराला महत्त्व दिले. शाकाहारामुळे दीर्घायुष्य लाभते आणि मनुष्याची शक्ती वाढते.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
मानवाने मांस व अंडी सेवन करू नयेत. ते शरीराला अपायकारक आहेत. याशिवाय मांस आणि अंड्यात जितकी पोषकद्रव्ये आहेत, तीच पोषकद्रव्ये काही धान्यांत व फळांत आढळतात. त्यामुळे मांस व अंड्यांपेक्षा शाकाहार पोषक असल्याचे प्रतिपादन आगरकरांनी केले आहे.
मूर्तिपूजा :- आगरकरांना मूर्तिपूजा मान्य नव्हती. हिंदू लोक विविध देवदेवतांच्या मूर्तीच्या रूपाने पूजा करीत असत; परंतु आगरकरांच्या मते, ही मूर्तिपूजा निरर्थक आहे. त्यांनी ‘सुधारक’ या वृत्तपत्रात ‘मूर्तिपूजेचा उद्रेक’ व ‘मूर्तिपूजेचे प्रकार’ हे दोन लेख प्रसिद्ध केले. जड वस्तूंची पूजा, वनस्पतीची पूजा व प्राण्यांची पूजा अशी तीन प्रकारची मूर्तिपूजा प्रचलित होती.
‘मूर्तिपूजेचे प्रकार’ या लेखात वनस्पती व प्राणिपूजा कशी अस्तित्वात आली, याचे स्पष्टीकरण दिले आहे. आगरकरांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केले नाही. देव न मानणारा देवमाणूस म्हणून त्यांना ओळखले जाते.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
पशुहत्यावर प्रतिबंध :- हिंदू धर्मात अनेक देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी पशुबळी दिला जात असे. देवाच्या उत्सवप्रसंगी आणि यज्ञविधित पशुबळी दिली जात असे. म्हसोबा, मरीआई व लक्ष्मी या देवतांना बकरा, रेडा व कोंबड्यांचा बळी दिला जात असे, तर तुळजापूरच्या भवानीमातेला नवरात्र महोत्सवाच्या वेळी केल्या जाणाऱ्या यज्ञात बकऱ्याचा बळी दिला जात असे. पशुबळीची प्रथा आगरकरांना मान्य नव्हती. त्यांनी ‘सुधारक’मध्ये ‘धर्माचा सकाळ आणि बकऱ्याचा काळ’ हा लेख प्रसिद्ध केला.
या लेखात ते म्हणतात, ज्यांना यज्ञ करून जन्ममरणापासून मुक्त व्हावयाचे आहे, त्याने स्वतःच्या शरीराची किंवा शरीराच्या काही भागांची आहुती देण्यास काय हरकत आहे? यज्ञात बळी दिलेल्या पशूला यातना होत नाहीत आणि त्यास पुन्हा जन्म मिळतो, या कल्पनेस आगरकरांनी विरोध केला. पशुबळी देण्यास प्रतिबंध असावा, असा विचार त्यांनी मांडला.
संमती वयाचे बिल व आगरकर : विवाहित स्त्रीचे संभोग घेण्याचे वय वाढविण्यास मध्यवर्ती कायदेमंडळात सरकारकडून एक बिल मांडले होते. या बिलानुसार स्त्रियांचे संभोग घेण्याचे वय १३ केले जाणार होते. सनातनी लोकांना हे मान्य नव्हते. सरकारने आमच्या धार्मिक जीवनात हस्तक्षेप करू नये, असे त्यांचे मत होते. आगरकरांनी ‘सुधारक’ मध्ये चार लेख लिहून संमती वयाच्या बिलावर प्रकाश टाकला.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
‘जुन्या लोकांचा खोटेपणा’ व ‘संमती वयास धर्मशास्त्र बाधक नाही’. या दोन लेखांत त्यांनी संमती वयाच्या बिलाचा पुरस्कार केला. त्यांनी सनातनी लोकांना असा प्रश्न केला, की स्त्रीला ऋतू प्राप्त झाल्यास १६ दिवसांच्या आत पतीला गर्भधान करण्यासाठी पत्नीस त्याच्याकडे पाठविले पाहिजे, अशी शास्त्राची आज्ञा कोठे आहे? हे धर्माभिमानी लोकांनी आम्हाला दाखवावे.
दत्तकपुत्राची आवश्यकता :- तत्कालिन समाजात अपत्य नसलेले कुटुंब दत्तकपुत्र घेण्याची प्रथा रूढ होती. आगरकरांनी ‘दत्तकपुत्र घेण्याची आवश्यकता’ या लेखात दत्तकपुत्राच्या संदर्भातील विविध स्मृतिकारांची मते काय होती, याचे स्पष्टीकरण केले आहे. प्राचीन काळाप्रमाणे नाव चालविण्यासाठी दत्तकपुत्राची गरज नाही. कारण, दत्तक घेतल्यामुळे घराण्याचे नाव चालते हा युक्तिवाद आगरकरांना मान्य नाही.
नाना फडणीस यांनी दत्तकपुत्र घेतला होता..त्याने नानाच्या घराण्याचे नाव चालविले काय? हा प्रश्न आगरकर करतात. दत्तकशिवाय स्वर्गात प्रवेश नाही व लोकसमजूत होती. ही लोकसमजूत भ्रामक कल्पना असल्याचे मत आगरकरांनी मांडले.
Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर
आत्मा अमर नाही :- आगरकरांना आत्म्याचे अस्तित्व मान्य नाही, त्यांनी ‘सुधारक’ मध्ये ‘धर्मकल्पना आली कोठून?’ हा लेख प्रसिद्ध करून त्यात आत्म्याच्या अमरत्वावर मते मांडली. ते म्हणतात, आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करीत नाही.
आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करताना कोणी पाहिला आहे काय? मनुष्याच्या मृत्यूनंतर सर्वकाही संपते, असे त्यांचे मत होते. स्वर्ग, बैकुंठ, यम, पाताळ, यमपुरी व यमयातना या गोष्टी आगरकरांना मान्य नव्हत्या.
स्वधर्माचा अभिमान :- आगरकरांना स्वधर्माचा म्हणजेच हिंदू धर्माचा अभिमान होता. त्यांनी हिंदू धर्मावर कठोर टीका केली; पण स्वधर्मात, स्वलोकांत व स्वभूमीच राहूनच सुधारणा करणे यामध्येच देशप्रेम आणि देशाचा अभिमान आहे, असा त्यांचा विचार होता.
त्यांनी ‘गुलामांचे राष्ट्र’ या लेखात म्हटले आहे, की हिंदू धर्मात बरीच व्यंगे आहेत, म्हणून यहुदी, महंमदी व ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणे बरोबर नाही. आगरकरांना आर्यजाती, आर्यवंश व आर्य लोकांचा अभिमान होता. आर्यजातीला बलशाही बनविण्यासाठी त्यांना बुद्धिवादाची आवश्यकता होती. आगरकरांना बुद्धिवादाचे जनक समजले जाते.