Gopal Hari Deshmukh Lokhitwadi
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८२३ रोजी झाला. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले. गोपाळराव देशमुखांना ग्रंथसंग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली आहेत.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी ते न्यायालयात भाषांतरकार झाले.
’सदर अदालती’ची मुन्सिफीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८६२पासून ते मुंबई सरकारच्या न्यायखात्यात न्यायाधीश झाले. त्या पदावर त्यांनी अहमदाबाद, नाशिक आणि सातारा येथल्या कोर्टांत काम केले.लोकहितवादीनी कोणाची मजुरी पत्करली नाही.लोकांनी ज्ञानी व्हाव आणि ज्या जुन्या रूढी परंपरा आहेत त्या बाजूला ठेवाव्यात.इग्रंजी भाषेवर प्रभुत्व असावे असे लोकहितवादीना वाटायचे.
श्रमातून संपत्ती निर्माण होते या सूत्रातून गोपाळराव देशमुखांना दारिद्र्य निर्मूलनासाठी काय करायला पाहिजे याची दिशा समजली. हिंदुस्थानात ज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही त्यांची तळमळ होती. स्वदेशात विद्यावृद्धी होऊन स्वभाषेत नवे नवे ज्ञान प्रसारित झाल्याशिवाय हिंदुस्थानला जगातील इतर प्रगत राष्ट्रांच्या बरोबरीचे स्थान मिळणार नाही, असे त्यांना तीव्रपणे वाटे.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक होऊन गेले. या शतकात प्रारंभीच्या कालखंडात होऊन गेलेल्या अनेक समाजसुधारकांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी देशमुख होय. त्यांना आद्यसुधारक व आद्यप्रबोधनकार म्हणून उल्लेखिले जाते.
१९ व्या शतकात वैचारिक प्रबोधनाचा पाया महाराष्ट्रात सर्वप्रथम गोपाळराव हरी देशमुख यांनी घातला. त्यांनी ‘प्रभाकर’ या वृत्तपत्रात ‘लोकहितवादी’ या नावाने लेख लिहिले. त्यामुळे त्यांना ‘लोकहितवादी’ म्हणून ओळखतात.
वृत्तपत्रातील लेखन :- लोकहितवादींनी समाजामध्ये सुधारणा व्हावी, या हेतूने अनेक वृत्तपत्रांतून प्रबोधनपर लेख लिहिले. या प्रबोधनपर लेखांमुळे समाजजागृती होण्यास आणि समाज सुधारण्यास मदत झाली. विद्वान आणि श्रेष्ठ पत्रकार व साहित्यिक दर्जाचे पत्रकार होते. त्यांच्या लेखनाचा कहितवादी व्याप मोठा होता. ते लेखनकार्यात सतत मग्न असत. भाऊ महाजन यांनी ‘प्रभाकर’ हे साप्ताहिक सुरू केले होते.
या वृत्तपत्रातून गोपाळरावांनी ‘लोकहितवादी’ या शीर्षकाखाली वैचारिक निबंध प्रकाशित करण्यास सुरवात केली. याशिवाय त्यांनी ‘थिऑसफिक’, ‘बुद्धिप्रकाश’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘ज्ञानोदय’ व ‘बॉम्बे टाइम्स’ इत्यादी वृत्तपत्रे आणि मासिकांतूनही विविध लेख प्रसिद्ध करून तत्कालीन सामाजिक पद्धतीवर व रूढी-परंपरांवर आघात केला. त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि समाजात वैचारिक जागृती होण्यासाठी ‘लोकहितवादी’ नावाचे मासिक सुरू केले.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
Balshastri Jambhekar in Marathi – बाळशास्त्री जांभेकर मराठी
Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख
शतपत्रे :- गोपाळरावांनी ‘ज्ञानप्रकाश’, ‘इंदुप्रकाश’ आणि ‘लोकहितवादी’ ही वृत्तपत्रे सुरू केली. इ.स. १८४२ मध्ये त्यांनी लेखनकार्यास आरंभ केला. इ.स. १८४८ मध्ये त्यांनी शतपत्रे लिहिण्यास सुरू केले. या शतपत्रांतून त्यांनी तत्कालीन समाजाला उद्देशून समाजातील लोक हिंदू धर्मातील विषमता आणि अंधश्रद्धा या विषयावर टीकात्मक लेखन केले.
या सर्व वाईट कल्पना हिंदू धर्मातील लोकांनी टाकून दिल्या पाहिजेत, असे आवाहन केले. त्यांनी हिंदू समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, म्हणून सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणांबाबत आपली मते आपल्या लिखाणातून निर्भयपणे मांडली. हिंदू समाजाच्या प्रगतीमधील अडथळे दूर व्हावे हाच मुख्य उद्देश गोपाळरावांनी सुरू केलेल्या चळवळीच्या पाठीमागे होता.
वाङ्मयीन कार्य :- गोपाळरावांनी इ.स. १८५२ मध्ये वाङ्मयीन कार्याला सुरवात केली. वास्तविक पाहता इ.स. १८४२ मध्ये त्यांनी लेखनकार्याला आरंभ केला होता. त्याच वर्षी त्यांनी जी. आर. ग्लिंग यांनी लिहिलेल्या ‘हिस्ट्री ऑफ ब्रिटिश ॲन्ड एंपरर इंडिया’ या ग्रंथाच्या आधारे हिंदुस्तानचा इतिहास पूर्वार्ध लिहिला. हाच ग्रंथ इ.स. १८७८ मध्ये प्रसिद्ध झाला.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मराठी भाषेत ३६ ग्रंथ लिहिले. इ.स. १८४८ मध्ये त्यांनी शतपत्रे लिहिली. हिंदुस्तानचा इतिहास व उदयपूरचा इतिहास व उदयपूरच्या राजपुतांचा इतिहास हे त्यांचे इतिहासविषयक ग्रंथ चांगलेच गाजले आहेत. गोपाळरावांच्या वाङ्मयीन कार्यामुळे संस्कृती, राष्ट्रवादी भावना आणि देशप्रेम वाढीस लागले.
गोपाळराव हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते, तरीही त्यांनी मराठी भाषेतून ग्रंथनिर्मिती केली, हे विशेष होय. मराठी ही बहुजन समाजाची भाषा होती. या बहुजन समाजाला ज्ञानी करावयाचे असेल तर मराठी भाषेत वाङ्मयनिर्मिती करणे गोपाळरावांना महत्त्वाचे वाटत होते. आपल्या वाड्मयातून गोपाळरांवानी समाजाच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय व शैक्षणिक प्रश्नांची परिणामकारक मांडणी केली.
त्यांनी समाज आणि हिंदू धर्मातील दोषांवर प्रहार करून ते जिव्हाळ्याच्या भावनेतून कमी करण्याचे प्रयत्न केले. लोकहितवादी थोर विचारवंत व समाजसुधारक होते. या लिखाणामुळेच इ.स. १८४८ पासून त्यांनी शतपत्रे लिहिण्यास सुरवात केली होती. या लिखाणामुळेच ते क्रांतिकारक, समाजसुधारक म्हणून नावारूपास आले.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
‘हिंदुस्तानचा इतिहास’, ‘लक्ष्मीज्ञान’, ‘ग्रामरचना’, ‘पानिपतची लढाई’, ‘गुजरात’, ‘देशाचा इतिहास’ ‘जातिभेद’, ‘लंकेचा इतिहास’ यासारखे अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी ‘लोकहितवादी’ नावाचे मासिक (ऑक्टोबर १८८२) व त्रैमासिक (एप्रिल १८८३) सुरू केले.
समाजसेवा :- गोपाळरावांनी आयुष्यभर लोकसेवा अर्थात समाजसेवा केली. त्यांनी लोकोपयोगी कार्य करण्यावर अधिक भर दिला. त्यांना समाजहित आणि समाजाचा सर्वांगीण विकास याविषयी अत्यंत तळमळ होती. म्हणूनच त्यांनी सरकारी नोकरी करीत असतानाही समाजसेवा निष्ठेने केली. नोकरीच्या निमित्ताने गोपाळराव जेथे गेले, त्या-त्या ठिकाणी त्यांनी निरनिराळ्या संस्था स्थापन करून समाजसेवा करण्याचे कार्य केले.
वाई येथे न्यायाधीश म्हणून काम करीत असताना कृष्णा नदीला महापूर आला. तेथील पूरग्रस्तांना त्यांनी आर्थिक मदत केली. अहमदाबाद व सुरत येथे असताना त्यांनी नवे उपक्रम सुरू करून नवीन संस्था स्थापन केल्या व वृत्तपत्रे सुरू करून त्या शहराच्या सार्वजनिक जीवनात नवचैतन्य निर्माण केले.
थिऑसॉफिकल सोसायटी व प्रार्थना समाज या संघटनांशी त्यांचे जवळचे संबंध होते. या दोन्ही संघटनांनी सुरू केलेल्या धर्मसुधारणांच्या कार्यास गोपाळरावांनी मार्गदर्शन केले. ते आर्य समाजाचे काही काळ अध्यक्ष राहिले. त्यांचे कार्य सर्वव्यापी आणि बहुरंगी होते.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
वैचारिक जागृती :- महाराष्ट्रात होऊन गेलेल्या प्रारंभीच्या समाजसुधारकांमध्ये गोपाळरावांनी केलेले समाजसुधारणांचे कार्य सर्वव्यापी होते. पाश्चात्य देशातील प्रगतीची जाणीव गोपाळरावांना होती. पाश्चात्य देशातील समाजाच्या प्रगतीप्रमाणे हिंदू समाजाची प्रगती करावयाची असेल तर आपल्या देशात सामाजिक परिवर्तन होणे आवश्यक ठरते, अशी त्यांची भूमिका होती.
हिंदू धर्मातील मागासलेपणा आणि समाजातील अज्ञान नष्ट करण्यासाठी सामाजिक परिवर्तन आवश्यक होते. नेमके हेच कार्य गोपाळरावांनी केले होते. समाजामध्ये वैचारिक जागृती निर्माण होण्यासाठी गोपाळरावांनी ‘ज्ञानप्रकाश’, ‘बॉम्बे टाइम्स’, ‘इंदुप्रकाश’, ‘लोकहितवादी’ आणि ‘प्रभाकर’ ही नियतकालिके, त्रैमासिक व वृत्तपत्रांतून सातत्याने लिखाण करून सामाजिक जागृतीचे कार्य केले.
राजकीय विचार :- गोपाळरावांनी समाजसुधारणेचे जे कार्य हाती घेतले, त्या कार्याची पार्श्वभूमी पाहता त्यांचे राजकीय विचार कसे होते, हेही पाहणे आवश्यक होते. केवळ सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करून देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही, तर या सुधारणेशिवाय देशाला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले पाहिजे, असा विचार गोपाळरावांनी प्रस्तुत केला.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
या ध्येयपूर्ततेसाठी जनतेने देशातील परकीय सत्ता हाकलून लावण्यासाठी आणि स्वतःचा राजकीय हक्क मिळविण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असा विचार गोपाळरावांनी जनतेसमोर मांडला. त्यासाठी त्यांनी लोकशाही शासन, संसदेची निर्मिती, समता व स्वातंत्र्याच्या विचारांचा अंगिकार केला.
राजकीय नेत्यांची निवड, त्यांचे चरित्र, राष्ट्रनिष्ठा, त्यांच्या कार्याची तळमळ व त्यांची निःस्वार्थी समाजसेवा करण्याची धडपड पाहून करावी, असेही त्यांनी सांगितले. ब्रिटिश सरकारमुळे समाजातील अनिष्ठ प्रथा कमी होतील, अशी त्यांची अपेक्षा होती. ब्रिटिश सत्तेमुळे भारताचे हित झाले, असेही त्यांना वाटत होते; परंतु ब्रिटिश सत्तेचे उच्चाटन करणे, ही गोष्ट सोपी नाही, ही जाणीव गोपाळरावांना होती.
ब्रिटिश सरकारवर टीका :- ब्रिटिश सत्तेमुळे भारत देशाचे हित झाले. तसेच नुकसान ही झाले. समाजातील अनिष्ट प्रथा कमी झाल्या नाहीत. गोपाळरावांनी ब्रिटिश धोरणावर कडाडून टीका केल्या. त्यांच्या धोरणावर लेखणीरूपी प्रहार केला. ब्रिटिश राजवटीमुळे देशातील पारंपरिक व्यवसाय संपुष्टात आले.
त्यामुळे या देशाची आर्थिक पिळवणूक होते, हा विचार गोपाळरावांनी समाजापुढे मांडला. त्यासाठी राजकीय स्वातंत्र्य नांदल्याशिवाय देशाची आर्थिक स्थिती सुधारणा नाही म्हणून ब्रिटिशांकडून आपला राजकीय हक्क घ्या, असे गोपाळरावांनी जनतेला आवाहन केले.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
वैचारिक प्रबोधनाचे कार्य :- गोपाळ हरी देशमुख यांनी राजकीय प्रबोधनाप्रमाणेच वैचारिक प्रबोधनावरही भर दिला. महाराष्ट्रातील समाज मागासलेला होता. त्याचे मागासलेपण घालवून त्यांची प्रगती घडवून आणायची असेल तर भारतीयांनी पाश्चात्य ज्ञान घेतले पाहिजे, असा विचार त्यांनी समाजापुढे ठेवला.
आपले हे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके आणि अनेक साहित्याच्या माध्यमातून समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.
सामाजिक सुधारणासंबंधी विचार :- गोपाळ हरी देशमुख हे कर्ते समाजसुधारक होते. त्यांनी प्रामुख्याने समाजसुधारणांवर भर दिला होता. समाजसुधारणेचे कार्य करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम समाजात प्रबोधन घडवून आणले. सामाजिक परिवर्तन झाल्याशिवाय समाजाचे कल्याण करणे शक्य नाही, ही त्यांची भूमिका होती.
समाजपरिवर्तनासाठी त्यांनी हिंदू समाजातील श्रद्धा, अंधश्रद्धा आणि रूढी-परंपरा नष्ट झाल्याशिवाय समाजात परिवर्तन होणे शक्य नव्हते. म्हणूनच त्यांनी समाजातील प्रश्नांचा विचार केला.
समाजातील जातिभेदावर टीका :- गोपाळरावांच्या कारकिर्दीत अनेक प्रकारच्या जाती आणि उपजाती, जमाती होत्या. अशा सर्व जाती उपजातीमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीचपणाची भावना होती. त्यामुळे समाज एकोपा, एकता राहिली नाही. सामाजिक एकता निर्माण करायची असेल तर जाती-जातींमध्ये असलेला भेद नष्ट केला पाहिजे, अशी गोपाळरावांनी भूमिका समाजापुढे मांडली.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
जातिवादाचे भूत गाडल्याशिवाय आणि ब्राह्मणांचा पोकळा वरचष्मा संपल्याशिवाय सर्व समाज एकत्र येणार नाही. तसेच त्यांच्यात समान वागणूक राहणार नाही, हे ओळखून गोपाळरावांनी सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ब्राह्मणांनी हाव सोडून दिली पाहिजे, त्यांनी ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचा ठेका आता सोडुन दिला पाहिजे आणि नवीन आचार-विचार व समाजपरिवर्तनाचा स्वीकार केला पाहिजे, असे ठणकावून सांगितले.
समाजाचा विकास होण्यासाठी जातिभेद हा मोठा अडसर आहे. म्हणून समाजातील लोकांनी जातीचा अभिमान धरू नये, असा उपदेश लोकहितवादींनी समाजाला साहित्यातून केला. यावर उपाय म्हणून त्यांनी सांगितले, की समाजात जाती फक्त दोनच आहेत. त्या म्हणजे स्त्री आणि पुरूष जातीचे स्तोम निर्माण करण्याचे कार्य ब्राह्मण करत असतात, अशी गोपाळरावांनी टीका केली आहे.
एका ठिकाणी तर गोपाळराव म्हणतात, की चोर हे ब्राह्मणाचेच सोयरे आहेत. अशा प्रकारची कडाडून टीका लोकहितवादींनी त्यांच्या साहित्यात केली. भारतीय समाजात जातिव्यवस्थेस महत्त्वाचे स्थान दिल्यामुळे जातिभेद पराकोटीला पोहोचला.
त्यामुळेच समाजात भिन्नता निर्माण होऊन समाज दुर्बल बनला, असे लोकहितवादींनी प्रतिपादन केले. त्यांना जातिभेद मान्य नव्हता. ब्राह्मण स्वतः सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ मानीत असत.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
त्यामुळेच समाजात जातिभेद पक्के रुजले. ब्राह्मणांनी आपले महत्त्व वाढविणारे ग्रंथ लिहिले व त्या ग्रंथाचा त्यांनी शास्त्र म्हणून प्रसार केला, त्यावर टीका करताना लोकहितवादींनी म्हटले, ब्राह्मण रयतेला छळतात, जातिभेद करतात, म्हणून लोक ब्राह्मणांपेक्षा इंग्रज बरे असे म्हणतात.
ब्राह्मण महाराची निंदा करतात, त्यास शिवत नाहीत व इंग्रजाजवळ बसतात, हे पाहून मला आश्चर्य वाटते. शास्त्राप्रमाणे पाहिले असता महार बरे परंतु इंग्रजांच्या मंडळीत ब्राह्मण असू नयेत. तथापि, हे ब्राह्मण मूर्ख, त्यास समजत नाही.
समाजातील अनिष्ट प्रथांवर टीका :- समाजात अनेक प्रकारच्या अनिष्ट प्रथा, परंपरा होत्या. या रूढी-परंपरेने समाजाचे अहित झाले होते. समाजामध्ये बालविवाह, हुंडा पद्धत, पडदा पद्धत, सतीची चाल, स्त्रियांचे शोषण व बालकांचे शोषण इत्यादी अनिष्ट प्रथा समाजात प्रचलित होत्या. या सर्व अनिष्ट प्रथा समाजाला विघातक होत्या. त्यामुळे सामाजिक परिवर्तन होणे कठीण होते.
गोपाळरावांनी या सर्व अनिष्ट प्रथा समाजाने सोडून द्याव्यात यासाठी सतत प्रयत्न केले. अगोदरपासून समाजामध्ये अशा अनिष्ट प्रथा होत्या; परंतु कोणत्याही व्यक्तीने या प्रथांना विरोध दर्शविला नाही. गोपाळरावांनीच सर्व अनिष्ट प्रथांवर टीकेचे प्रहार करून या रूढी-परंपरा समाजाने सोडून दिल्या पाहिजेत, असे कळकळीचे आवाहन समाजाला केले.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
धार्मिक विचार :- गोपाळ हरी देशमुख यांनी समाजातील सुधारणांसंबंधी ज्याप्रमाणे आपले विचार प्रस्तुत केले; त्याचप्रमाणे त्यांनी धार्मिक सुधारणांविषयीसुद्धा आपले विचार समाजापुढे मांडले. धर्म हा मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे; परंतु धर्माचे स्वरूप बदलून त्यामध्ये अनेक प्रथा निर्माण झाल्या.
त्या गोपाळरावांना मान्य नव्हत्या. सर्वप्रथम गोपाळरावांनी सामाजिक जीवन आणि नीतिधर्मापासून अलग करण्याकडे लक्ष दिले. खरा धर्म कशाला म्हणावा, याचा गोपाळरावांनी फारसा ऊहापोह केला नाही; परंतु धर्माचे सामाजिक जीवनातील स्थान मात्र ते मर्यादित करू पाहतात.
ते म्हणतात, संसारासाठी लोक काहीही कामे करतात आणि ती देवासाठी केली, असे सांगतात. म्हणून गोपाळरावांनी संसार आणि परमार्थ या दोन कल्पना वेगळ्या कराव्यात, ही कल्पना समाजापुढे मांडली. गोपाळरावांनी हिंदूंच्या दौर्बल्यावरच नेमके बोट ठेवले.
मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांमध्ये प्रार्थनेच्या वेळी एकवाक्यता आढळते; परंतु हिंदू धर्मात अनेक जाती असल्यामुळे एकच भजन होऊ शकत नाही, तसेच मुळापासून धर्म ब्राह्मणांकडे गेला आहे, ही परिस्थिती बदलली पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
हिंदू धर्माविषयीच्या जुन्या कल्पना आणि धर्माची जळमटे सोडून देऊन धर्माच्या बाबतीत बुद्धीचा योग्य वापर करावा, असा उपदेश गोपाळरावांनी समाजाला केला. धर्माच्या नावाखाली केली जाणारी व्रत-वैकल्ये, उपवास, पारायण, सोवळे इत्यादी कल्पना व्यर्थ आहेत. त्या समाजासाठी निरूपयोगी आहेत म्हणून त्या सोडून दिल्या पाहिजेत.
बदलत्या परिस्थितीप्रमाणे धर्म बदलला पाहिजे, असा गोपाळरावांचा आग्रह होता. ‘कर्म हाच खरा धर्म आहे’, हे तत्त्वज्ञान त्यांनी समाजाला पटवून दिले. मात्र, धार्मिक बाबतीत सर्व स्वातंत्र्य असावे, ही कल्पना त्यांनी मांडली.
इंग्रजांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण :- भारतात इंग्रज आले, ही गोष्टी एका दृष्टीने भारताच्या फायद्याचीच ठरली. इंग्रजांच्या सत्तेमुळे भारत विकसित होईल, असे गोपाळरावांना वाटत होते; पण ते इंग्रजधार्जिणे नव्हते. इंग्रजांचे ज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे आणि त्याचा उपयोग समाज विकासासाठी केला पाहिजे, असे त्यांचे मत होते.
इंग्रजांकडे बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. इंग्रजांच्या भारतातील राजवटीचे मर्म त्यांच्या उद्योगप्रियतेत आहे, म्हणून आपणसुद्धा इंग्रजांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे, असा सल्ला गोपाळरावांनी जनतेला, समाजाला दिला आहे.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
शैक्षणिक विचार :- मानवी जीवनाच्या प्रगतीसाठी शिक्षण फार महत्त्वाचे ठरते. शिक्षणामुळे मानवाला ज्ञान प्राप्त होते आणि त्याच ज्ञानाच्या जोरावर तो प्रगतिपथावर जाऊ शकतो. गोपाळराव शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हणतात, शिक्षण हे मानवी जीवनाचे वैभव आहे. पाश्चात्य देशाच्या विकासाचे मर्म शिक्षणात आहे. शिक्षणामुळेच त्यांचा विकास होऊ शकतो.
त्यामुळे भारतातील समाजाने स्वतःच्या विकासासाठी शिक्षणाची कास धरली पाहिजे. शिक्षणामुळेच मानव जागृत होत असतो. त्यामुळे तो समाजातील योग्य आणि अयोग्य परपरांचा विचार करीत असतो. शेवटी शिक्षणामुळेच समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा नष्ट होतात आणि समाजसुधारणा होण्यास मदत होते. गोपाळरावांनी शिक्षणाचा पुरस्कार करीत असताना आधुनिक शिक्षणावर भर दिला.
समाजात प्रचलित असलेली जुनी व संस्कृत शिक्षण पद्धती आज कालबाहा असून, ती सोडून दिली पाहिजे, असा त्यांनी उपदेश समाजाला दिला. पाश्चिमात्य सुधारलेल्या राष्ट्राच्या विकासाचे धर्म लक्षात घेऊन समाजाने भौतिक ज्ञान स्वीकारले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. असे केल्यास राष्ट्राचा विकास होईल, असा विचार त्यांनी व्यक्त केला.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
आर्थिक विचार :- अज्ञानामुळे भारतीय व्यक्ती प्रगती करू शकत नाही. त्यामुळे भारतीयांची आर्थिक अवस्था दयनीय झाली. त्यामुळे गोपाळरावांनी वृत्तपत्रे आणि साहित्यातून लिहिलेल्या वैचारिक निबंधात जनतेच्या आर्थिक परिस्थितीचे वर्णन केले. भारतीय जनतेला ज्ञान नाही, ज्ञान नाही म्हणून काम नाही आणि काम नाही म्हणून दाम नाही, पैसा नाही अशी दयनीय अवस्था अज्ञानामुळे झाली.
हे थांबविण्यासाठी शासनाने तरूणांना रोजगार व धंदा उपलब्ध करून दिला पाहिजे; परंतु शासनाने समाजाच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. मात्र, ब्रिटिश शासनाने तरी समाजाची दयनीय आर्थिक अवस्था दूर करण्याचा प्रयत्न करावा. कारण, जनतेच्या आर्थिक दिवाळखोरीस सरकारच जबाबदार आहे, असे गोपाळरावांनी इंग्रजांना ठासून सांगितले. पुढे ते म्हणतात.
समाजाची आर्थिक दिवाळखोरी दूर करणे आणि जनतेला रोजगार व धंदा उपलब्ध करून देऊन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न सोडविण्याचे कर्तव्य शासनाचे आहे. असे असले तरी समाजाने आईतखाऊपणा सोडून दिला पाहिजे. समाजाने सतत उद्योग, कष्ट व प्रयत्न करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. त्यामुळे जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल, असाही उपदेश गोपाळरावांनी समाजाला दिला.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
प्रारंभीचे समाजसुधारक :- गोपाळ हरी देशमुख हे महाराष्ट्रातील प्रारंभीचे समाजसुधारक ठरतात. ते सरकारी नोकरीत होते. तरी त्यांचे विचार क्रांतिकारी व प्रगतिवादी होते. शासकीय नोकरीत असल्याने त्यांच्या समाजकार्याला काही मर्यादा होत्या, तरीही त्यांनी समाज सुधारण्यासाठी केलेली कामगिरी अत्यंत महत्त्वाची व कौतुकास्पद आहे.
समाजसुधारणांचें कार्य करण्यासाठी प्रसंगी त्यांनी शासनालासुद्धा उपदेश दिला. तसेच त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा आणि रूढी-परंपरा नष्ट करण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
प्रबोधनाचा पाया :- गोपाळरावांनी महाराष्ट्रात समाजप्रबोधनाचा पाया घातला. त्यांनी समाजाला वैचारिक चालना देण्याचे महान कार्य केले. एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे ठरते. गोपाळरावांचा कालखंड समाजसुधारणेचा आरंभ काळ होय. गोपाळराव हे पहिलेच समाजसुधारक असल्याने खऱ्या अर्थाने ते समाजाचे प्रबोधन करणारे पहिले प्रबोधनकार, आद्यसुधारक व महान द्रष्टे ठरतात. चालता-बोलता इतिहास म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो.
पुरोगामी विचार :- गोपाळरावांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक विचार हे पुरोगामी होते. त्यांनी हाती घेतलेले
समाजपरिवर्तनासाठीचे कार्य महत्त्वाचे ठरले. उच्चवर्णीयांनी धार्मिक बदलाची तयारी केली, म्हणजे खालचा समाजही बदलला जाईल, असे त्यांचे मत होते. बदलत्या कल्पनांबरोबर व बदलत्या परिस्थितीबरोबर धर्मही बदलला पाहिजे. कार्य हाच धर्म व समाजाचे कल्याण हाच मानवतावाद, हा नवा धार्मिक विचार त्यांनी आपल्या विचारातुन समाजाला सांगितला.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
राजकीय प्रबोधन :- भारतीय समाज राजकीयदृष्ट्या जागृत नव्हता. त्यांच्यात राजकीय प्रबोधन घडवून आणणे लोकहितावादींना महत्त्वाचे वाटत होते. ब्रिटिश सत्ता भारत देशाची आर्थिक पिळवणूक करीत आहे, ही स्थिती राजकीय स्वातंत्र्यशिवाय बदलणार नाही. यासाठी गोपाळरावांनी राजकीय प्रबोधनाचे कार्य हाती घेतले.हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्यांनी ज्ञानप्रकाश वृत्तपत्रातून अनेक निबंध लिहिले व ते जनतेसमोर सादर केले.
अशाच एका निबंधात ते लिहितात, देशातील जनतेची दुरवस्था, दुर्दशा व लाचार प्रवृत्ती थांबविण्यासाठी देशाला स्वराज्य व स्वातंत्र्याची आवश्यकता आहे; परंतु जोपर्यंत या देशातील विचारवंतांमध्ये राज्यकारभार करण्याची क्षमता निर्माण होत नाही, तोपर्यंत इंग्रज राज्यकर्ते हा देश सोडून जाणार नाहीत. त्यासाठी समाजाने आपल्या सामाजिक जीवनात परिवर्तन करणे आवश्यक आहे.
स्त्री-पुरूष समानता :- गोपाळराव हे गाढे अभ्यासक होते. विद्वान व विचारप्रवर्तक होते. त्यांनी समाजातील सर्व समस्यांचा बारकाईने अभ्यास व विचार केला होता. स्त्री आणि पुरुष यासंदर्भात त्यांनी व्यक्त केलेले विचार महत्त्वाचे आहेत. पुरूष व स्त्री ही समाजरथाची दोन चाके आहेत.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
तेव्हा स्त्रियांच्या प्रगतीसाठी त्यांना हक्काची जाणीव करून दिली पाहिजे, असा त्यांनी समाजापुढे विचार मांडला. गोपाळराव हे बोलके आणि कर्ते समाजसुधारक होते. त्यांनी त्यांच्या वांङ्मयातून समाजाची जागृती केली. म्हणूनच त्यांना राष्ट्रवादाचे आद्यसुधारक म्हणून ओळखले जाते.
समाजातील अज्ञान :- लोकहितवादींच्या काळात भारतातील हिंदू समाजात अज्ञान मोठ्या प्रमाणात निर्माण झाले होते. समाजाचे बौद्धिक नेतृत्व ब्राह्मण वर्गाकडे होते. त्यांच्यातच अधिक प्रमाणात अज्ञान पसरलेले होते. लोकहितवादी म्हणत असत, की ब्राह्मण लोकांना संस्कृत विद्येचा मोठा गर्व होता; परंतु तरीही ते विद्येत पारंगत नव्हते.
पाठांतरास ते विद्या समजत असत. ब्राह्मणांनी भरपूर पाठांतर केले; पण त्याचा त्यांना अर्थच माहित नाही, तर त्यांचा काय उपयोग? आणि जे ज्ञान आहे, तेसुद्धा त्यांनी इतरांना दिले नाही. वेद, पुराणे यात लिहिलेलेच सत्य मानण्याची आपली वृत्ती असल्यानेच आपले अध:पतन झाले आहे. प्राचीन ग्रंथात आहे ते मानण्यापेक्षा नवीन विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच समाजातील अज्ञान दूर होईल.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
कर्मकांड व व्रतवैकल्ये यास विरोध :- कर्मकांड व व्रतवैकल्ये म्हणजे धर्म अशी खुळी कल्पना त्या काळातील लोकांची होती. लोकहितवादींना कर्मकांड व व्रतवैकल्ये, उपास-तापास मान्य नव्हता. धर्म हा समाजाच्या उत्कर्षासाठी आचरण शुद्धीसाठी असतो; परंतु नेमके याच गोष्टींचा विसर लोकांना पडला होता. घरातील मुलामुलींना सदाचार, नीती, प्रेम या गोष्टी शिकवाव्यात, म्हणजे त्यांचा उत्कर्ष होईल.
सामाजिक समतेचा पुरस्कार :- लोकहितवादींनी सामाजिक सेवेचा पुरस्कार धडाडीने केला. जातीच्या अभिमानास बळी पडून आपण एकमेकांचे शत्रू बनलो व आपापसांत भांडत राहिलो. त्यामुळेच आपला उत्कर्ष होऊ शकला नाही. लोकहितवादी म्हणतात, भारतीय लोक परक्याजवळ हात जोडून राहतात; पण आपल्या स्वकियांशी लढतात, अशी चाल आपल्या लोकांची आहे.
आपसांत प्राण देऊन भांडतात; पण परक्याच्या लाथा सोसून नम्र राहतात. सर्व हिंदू लोक मुळापासून बकऱ्यासारखी जात, त्यास कोणीही पोटास दिले तर ते स्वदेश व बाप-भावाची ओळख सोडतात. आपण फितूर होऊन आपल्याच लोकास मारतात व आपणच पेंढारी होऊन आपणासच लुटतात, जातीयतेचे भूत गाडावे व सर्वांनी एकोप्याने राहावे त्याशिवाय देशाला पर्याय नाही, असे त्यांचे मत होते.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
समाजाच्या अधःपतनास ब्राह्मण नेतृत्व जबाबदार :- लोकहितवादी ब्राह्मण कुलास जन्माला येऊनही त्यांनी या काळातील ब्राह्मणवर्गावर टीका केली. ब्राह्मणवर्ग हा अनेक वर्षांपासून हिंदू समाजाचे नेतृत्व करीत होता. त्यामुळेच समाजाचे अध:पतन झाले. ते म्हणतात, लोक ब्राह्मणवर्गास धर्मरक्षक समजतात; परंतु ते अधर्माची वृद्धी करणारे आहेत. समाजाचे नेतृत्व करण्यासाठी असणारा एकही गुण त्यांच्यात नाही. त्यामुळेच समाजाचा घात झाला.
ब्राह्मणाऐवजी कुणबी, क्षत्रियांकडे समाजाचे नेतृत्व असते तर चांगले झाले असते. कारण, ब्राह्मण परदेशात जाऊन परकीय भाषेचे ज्ञान घेऊन ते समाजापर्यंत पोहोचविणार नाही. त्यांच्यामुळेच समाजाचे वाईट झाले. त्यांनी ब्राह्मणांना असा सल्ला दिला, की आपल्या जन्मजात मोठेपणाच्या खुळ्या कल्पना सोडाव्यात. जातीचा अभिमान सोडावा. सर्वांना समान लेखावे. आधुनिक विद्या व कला आत्मसात करावी. चांगले आचरण ठेवावे.
स्त्रियांच्या जीवनात सुधारणा :- जातीयता, वर्णभेद, अज्ञान व • स्त्री-पुरुषातील विषमता यांमुळे समाजाची अनवती झाली. प्राचीन धर्मशास्त्राच्या आधारे या देशातील स्त्रियांवर पुरुषांनी फार अधिकार गाजविले. ज्या देशात स्त्रियांना अधिकार दिले जात नाहीत, तेथील लोकांची स्थिती वाईट असते. त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेचा त्यांनी पुरस्कार केला. समाजात बालविवाह प्रथा प्रचलित होती.
Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
त्यामुळे समाजाचे कर्तृत्वच मारले जाते व समाजाचे नुकसान होते, असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी बालविवाहास विरोध केला. बालविधवांच्या पुनर्विवाहाचा त्यांनी पुरस्कार केला. स्त्रियांना शिक्षण दिल्याशिवाय त्या शहाण्या होणार नाहीत. शहाण्या झाल्या, की त्या आपल्यावरील अन्याय, जुलमाचा प्रतिकार करू शकतील, म्हणून लोकहितवादींनी स्त्रियांना शिक्षण देण्याचा आग्रह धरला.
पाश्चात्य शिक्षणाचा आग्रह :- देशातील पारंपरिक संस्कृत विद्या ही अर्वाचिन युगात कुचकामी आहे. या विद्येमुळे लोकांना अज्ञानाचे प्रमाण वाढते, म्हणून ही विद्या शिकविण्यापेक्षा लोकांना लाकडे तोडण्याचे शिकविलेले बरे, असे त्यांचे विचार होते. इंग्रजांनी विविध शास्त्रे व कला यामध्ये शोध लावलेले असल्यामुळेच ते प्रगत झाले. त्यांची सर्वत्र सत्ता स्थापन झाली. इंग्रजी विद्या ही नवयुगाची संजीवनी आहे, ती आपण आत्मसात केली तर आपणही इंग्रजांप्रमाणे प्रगत होऊ, असे लोकहितवादींना वाटत होते.
लोकहितवादींच्या धर्माचे स्वरूप :- लोकहितवादींची जुन्या धर्मावर टीका केलीच; पण खरा धर्म कसा असावा. यावरही भाष्य केले. सर्वांनी ईश्वराची उपासना करावी. प्रत्येकाने आपापल्या भाषेत भजन, पूजन व संस्कार करावेत. प्रत्येकाला आचार-विचारांचे स्वातंत्र्य असावे. स्त्री-पुरुषांना समान अधिकार असावेत. जातिभेद व्यक्तीच्या गुणावरून करावा. प्रत्येकाने शिक्षण घ्यावे. सर्वांनी सत्याने परस्परांशी प्रेमाने वागावे, असे धर्माचे स्वरूप असावे, असे त्यांचे मत होते. सर्वांगीण समाजसुधारणांचा त्यांचा आग्रह होता.