Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

Gopal-Krishna-GokhaleGopal Krishna Gokhale

नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म ९ मे १८६६ ला कोतळूक जि. रत्नागिरी या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव सत्यभामा वडिलाचे नाव कृष्णराव होते. कागलला गोपळरावांचे मराठी शिक्षण झाले. मराठी शिक्षणानंतर त्यांना वडिलभाऊ गोविंदसह कोल्हापूरास इंग्रजी शिकविण्यासाठी पाठवण्यात आले. गोपाळराव १३ वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

या दुःखाला आणि गरिबीला धैर्याने तोंड देत त्यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतले. ते इ.स. १८८४ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमधून बि.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. इ.स. १८८५ मध्ये त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लीश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. इ.स. १८८६ मध्ये पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते आजीवन सदस्य बनले.

फर्ग्यूसन कॉलेजमध्ये इ.स. १८८७ पासून इंग्रजी आणि इतिहास विषयाचे अध्यापन कार्य केले. इ.स. १८८८ मध्ये सुधारक वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाच्या सहसंपादकाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. गोपाळ कृष्ण गोखले आधुनिक भारताचे एक महान नेते आणि नेमस्त पक्षाचे अध्वर्यु. अत्यंत गरिबीत गोखले यांचे पहिले दिवस गेले.

अठराव्या वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीचा मार्ग व स्वीकारता स्वार्थत्यागपूर्वक देशसेवा करण्याचे व्रत घेतले. विसाव्या वर्षी ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक झाले आणि त्यांनी सुधारक  पत्राचे सहकारी संपादक म्हणून काम सुरू केले. ते सार्वजनिक सभेचे चिटणीस (१८८७) व सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले आणि पुढे १८९१ मध्ये ते परिषदेचे चिटणीस तसेच राष्ट्रसभेचे चिटणीस झाले.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

गोखले यांनी लोकशिक्षणाच्या द्वारे समाजजागृती करण्याचा व राजकीय सुधारणांसाठी सतत प्रयत्न करून ज्या सवलती मिळतील, त्या राबविण्याचा मार्ग स्वीकारला. गोखले यांचे नाव सर्वत्र प्रथम गाजले ते वेल्बी आयोगापुढील त्यांच्या साक्षीने. हिंदुस्थानात राज्यकारभाराचा खर्च कसा वाढत आहे व त्यामुळे करवाढ कशी डोईजड होत आहे हे त्यांनी सप्रमाण दाखवून राजकीय सुधारणांची आवश्यकता प्रतिपादन केली.

गोखले यांच्या या अभ्यासपूर्व साक्षीचा बराच प्रभाव पडला. न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडे त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादींचा जो अभ्यास केला, त्याचा उपयोग त्यांना या साक्षीच्या वेळीच नव्हे, तर नंतरच्याही जीवनात झाला. ‘अभ्यासेचि प्रकटावे’ या समर्थांच्या उक्तीचे मूर्तिमंत रूप म्हणजे नामदार गोखले.

देशहिताची तळमळ असल्यास सामान्य बुद्धी, दारिद्र्य वगैरे विश्व माणसाच्या कर्तृत्वाला बाधा करू शकत नाहीत हे स्वकृतीतून सिद्ध करणारे मवाळ विचारसरणीचे परंतु वेळप्रसंगी ब्रिटिशांच्या नीतीवर परखडपणे टीका करण्यासाठी मागे-पुढे न पाहणारे, राजकीय सुधारणांचा संबंध सामाजिक सुधारणांशी असतोच म्हणून राजकीय माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आण्याचा प्रयत्न करणारे गोपाळ कृष्ण गोखले आधुनिक भारताचे एक महान नेते होते.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Ramabai Ranade – रमाबाई रानडे

न्या. रानडेंसोबत त्यांचा संपर्क आल्यानंतर न्या. रानडेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारण आणि समाजकारणाचे धडे घेतले. न्या. रानडे हे गोपाळकृष्ण गोखलेंचे गुरू होते. इ.स. १८९९ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्याच वर्षी मुंबई प्रांतिय कायदेमंडळाचे सभासद म्हणून निवडून आले.

इ.स. १९०२ मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद म्हणून निवड झाली. इ.स. १९१२ मध्येमहात्मा गांधीच्या निमंत्रणावरून ते दक्षिण आफ्रिकेला गेले. दक्षिण आफ्रीकेतील सत्याग्रह चळवळीला सहाय्य करण्यासाठी निधी उभारण्याच्या कामातही त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी समाजसुधारणेच्या चळवळीत भाग घेऊन समाजसुधारणेला चालना दिली.

‘सुधारक’मधून समाजजागृती : सामाजिक बाबतीत गोखले न्या. रानडे व आगरकरांचे अनुयायी होते. आगरकरांनी इ.स. १८८८ मध्ये सुरू केलेल्या सुधारक वृत्तपत्राचे इंग्रजी विभागाचे गोखले सहसंपादक होते. सुमारे चार वर्षापर्यंत त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. सुधारक मधून त्यांनी समाजजागृतिपर अनेक लेख लिहिलेत. जातिभेद नसावा, पुनर्विवाह व्हावे, अस्पृश्यता नाहीशी करावी असे त्यांचे म्हणणे होते.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

सार्वजनिक सभा आणि गोखले : गणेश वासुदेव जोशी यांच्या पुढाकाराने इ.स. १८७० मध्ये पुणे येथे ‘सार्वजनिक सभे’ची स्थापना करण्यात आली होती. सभेच्या विकासामध्ये न्या. रानडेंनी महत्त्वाचे योगदान दिले. न्या. रानडेंसोबत गोखलेंचा संबंध आल्यानंतर ते सार्वजनिक सभेकडे वळले. इ.स. १८८७ ते इ.स. १९०१ या काळात न्या. रानडेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी कार्य केले.

इ.स. १८८७ मध्ये सार्वजनिक सभेचे चिटणीस म्हणुन त्यांची निवड झाली. सात वर्षापर्यंत ते सभेचे चिटणीस होते. सभेमार्फत एक त्रैमासिक निघत असे. या त्रैमासिकाच्या संपादनाचे कार्य काही काळ त्यांनी केले. त्यामध्ये त्यांनी केलेले लिखाण लोक शिक्षण, लोक जागृती व सामाजिक सुधारणेकरिता पोषक वातावरण निर्माण करण्यास महत्त्वपूर्ण ठरले. लोकमान्य टिळकांच्या हाती ही संस्था गेल्यानंतर या संस्थेतून ते बाहेर पडले.

डेक्कन शिक्षण संस्था आणि गोखले : इ.स. १८८४ मध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी डेक्कन शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. गोखले इ.स. १८९१ ते इ.स. १८९८ या कालावधीत डेक्कन शिक्षण संस्थेचे सचिव होते. त्यांनी संस्थेच्या प्रगतिकरिता मोठे परिश्रम घेतले. संस्थेला देणग्या मिळवून देऊन आर्थिक बाजू भक्कम केली. संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक शाळा व कॉलेज यांना मदतझाली व शिक्षणाचा प्रसार होण्यास गती आली.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

वेल्बी कमिशनपुढील साक्ष : भारतातील जमाखर्चाचा आढावा घेण्यासाठी इ.स. १८९६ ला इग्लंडमच ‘रॉयल वेल्बी’ कमिशनची निर्मिती करण्यात आली होती. कलकत्त्याचे सुरेन्द्रनाथ बनर्जी, मुंबईचे दिनशा वाच्छा, मद्रासचे जी. सुब्रम्हण्यम अय्यर आदी नामवंत मंडळी इंग्लंडला या कमिशनपुढे साक्ष देण्यासाठी गेली होती. गोखले यांना पुण्यातून डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत साक्ष देण्याकरिता पाठविण्यात आले होते.

वेल्बी कमिशनपुढे साक्ष देणारे ते सर्वात तरुण साक्षीदार होते. गोखलेंनी की, “हिंदुस्थानातील बहुतेक सरकारी वसूल लष्कर बड्या-बड्या अंमलदारांचे मोठमोठे पगार आणि पेन्शने यातच खर्च होतो. अगदी अल्प भाग शिक्षण, आरोग्य, कालवे, शेती यासाठी खर्च होतो. ब्रिटिश व्यापारी आणि ब्रिटिश सावकार यांचेच हितसंबंध प्रथम पाहिले जातात आणि ज्यांच्यापासून कर मिळतो त्यांच्या हिताची वास्तपुस्तही करण्यात येत नाही.

लढायांचे बेसूमार खर्च होतात आणि त्याचा बोजा गरीब बिचाऱ्या हिंदुस्थानावर पडतो. साम्राज्य वाढविण्याची हाव तुम्हास, परंतु प्राण मात्र जाणार हिंदुस्थानचा! दुसऱ्याचा बळी देऊन आपली पोळी पिकविणे हे अत्यंत अनिष्ट, अहितकारक व अन्यायाचे आहे. आधीच शिक्षणादी कार्यासाठी पैसा पूरत नाही तो या गोष्टीमुळे मुळीच पुरणार नाही आणि निःसत्व व निष्कांचन होणाऱ्या रयतेवरील करांचे ओझे मात्र खर्चाची तोंड मिळवणी व्हावी म्हणून वाढतच जाणार!”

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

अशा पद्धतीने गोखलेंनी वेल्बी कमिशनपुढे ब्रिटिश सरकारने भारतामध्ये चालविलेल्या अनिष्ट कारभाराची पुराव्यासह माहिती देऊन शिक्षण, आरोग्य, शेती इ. सामान्य जनतेच्या विकासाच्या मुद्यांकडे ब्रिटिश सरकार दुर्लक्ष करीत आहे. हे उघडकिस आणले तसेच याच दरम्यान इंग्लंडमध्ये शिक्षण काँग्रेसमध्ये स्त्रियांच्या शाखेपुढे त्यांनी ‘हिंदुस्थानातील स्त्री शिक्षण’ हा निबंध वाचला आणि भारतातील स्त्री शिक्षणाचा वास्तविक स्थिती मांडली.

भारत सेवक समाज (सर्व्हर ऑफ इंडिया सोसायटी) : समाजसुधारणेसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची ‘भारत सेवक समाज’ ही संस्था गोखले यांनी १२ जून १९०५ ला स्थापन केली.हि संस्था स्थापन करताना दोन उद्दिष्ट्ये जाहीर केली होती.

पहिले उद्दिष्ट म्हणजे सनदशीर मार्गाने चळवळ करून देशाची सर्वांगीण उन्नती करणे व ती उन्नती करण्यासाठी देशातील तरुणांना तयार करणे आणि ब्रिटिश साम्राज्यातंर्गत स्वराज्य मिळविणे. दुसरे हे करत असताना देश बांधवांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. वरील उद्दिष्ट्ये साध्य करण्याकरिता खालील मार्ग त्यांनी सांगितले.

१) प्रत्येकाने नेहमी देशाची चिंता केली पाहिजे व स्वतःमधील उत्कृष्ट असेल ते देशाला अर्पण केले पाहिजे.

२) स्वार्थी विचार न करता देशाची सेवा केली पाहिजे.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

३) भारताचा उत्कर्ष कसा होईल याचाच विचार प्रत्येकाने करावा. याकरिता जात, पंथ, धर्म याचा विचार न करता बंधूभावाने कार्य केले पाहिजे.

४) संस्था सांगेल त्या कार्यास सभासदांनी आपला सर्व वेळ दिला पाहिजे.

५) सभासदांनी त्यांच्या चारितार्थासाठी सोसायटी करील त्या तरतूदीत समाधान मानले पाहिजे. एखाद्या कामात मानधन म्हणून किंवा अन्य स्वरूपात काही प्राप्ती झालीच तर ती संस्थेला अर्पण केली पाहिजे.

६) स्वतःचे चारित्र्य निष्कलंक कसे राहिल याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.

७) कार्य करताना व्यक्तिगत किंवा सामुदायिक भांडण करू नये.

८) सतत समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून सभासदांनी कार्य करावे.

९) सदस्यांनी तहहयात सेवा करावी.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

या संस्थेचे पहिले अध्यक्ष स्वतः गोखलेच होते. स्वतःच्या आदर्श आचरणाने जनतेत देशप्रेम जागृत करणे, राजकीय ज्ञानप्रसार करून विविध चळवळी सुरू करणे, जाती-जातीतील सलोखा व सहकार्य वाढविणे, शिक्षण प्रसारास सहाय्य करणे, दुष्काळ ग्रस्ताना मदत करणे, कामगार संघटनांच्या चळवळीनां उत्तेजन देणे, दलित व भटक्या जमातीचा उद्धार करणे यासाठी भारत सेवक समाजाने कार्य केले.

या संस्थेमुळे देशात अनेक चांगल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण होऊन, सनदशीर मार्गाने वाढणारी चळवळ अधिक दृढ होण्यास मदत झाली.

प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याची मागणी : गोखले इंग्लंडला असताना त्यांनी भारतात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले पाहिजे याची जाणीव इंग्लंडच्या नेत्यांना करून दिली. भारतात मध्यवर्ती विधिमंडळामध्ये त्यांनी सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाचा जोरदार पाठपुरावा केला. या योजनेची कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थानी करावी असे मत दिले. तेव्हा ब्रिटिश शासनाने ही सूचना मान्य केली नाही.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

परंतु या चर्चेमुळे प्राथमिक शिक्षणाच्या प्रश्नाकडे जनतेचे लक्ष वेधले गेले. प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली नसली तरी इ.स. १९९३ च्या ठरावाद्वारे ब्रिटिश सरकारने निरक्षरता दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे मान्य केले. इंग्लंडच्या राजाने प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले. हे सर्व गोखलेंनी चिकाटीने लावून धरलेल्या प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न या परिश्रमाचे फळ म्हणता येईल.

मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा आणि गोखले : इ.स. १९०९ मध्ये ‘मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा’ भारतीयांकरिता करण्यात आला होता. कायद्यामध्ये अनेक दोष होते. तेव्हा अनेक नेत्यांनी या कायद्यावर टीका केली. परंतु मद्रास येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात गोखलेंनी कायद्याविषयी सकारात्मक भूमिका घेऊन कायद्याचे स्वागत केले.

ते म्हणाले, “मोर्ले आणि मिंटो या दोघांनी मिळून अराजकता आणि असतोंषाकडे जात असलेल्या भारताला या कायद्याद्वारे वाचविले आहे. सरकार कितीही प्रबळ असले तरी त्यांना सामूदायिक लोकांच्या आशा आणि आकांशा एखाद्या शक्तिद्वारे कधीच दडपता येत नाहीत किंवा फार काळ त्या दाबूनही ठेवता येत नाहीत.” काही वर्षातच या कायद्यातील फोलपणा गोखलेंच्याही आला आणि यावर नंतर त्यांनी टीका केली.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

महात्मा गांधीच्या आफ्रिकेतील चळवळीला सहाय्य : आफ्रिकेत महात्मा गांधीनी वर्णभेद विरोधी चळवळ उभारली होती. भारतीय लोकांविषयी असलेले अपमानास्पद कायदे रद्द करण्यात यावे अशी त्यांची मागणी होती. त्याकरिता त्यांनी सत्याग्रहाचा मार्ग अनुसरला होता. याच संदर्भात महात्मा गांधींनी गोपाळ कृष्ण गोखलेंना आफ्रिकेत येण्याची विनंती केली. गोखले इ.स. १९१२ मध्ये आफ्रिकेला गेले तेथे ते तीन आठवडे होते.

त्यांनी आफ्रिकेत बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या व्याख्याने दिली. लोकांची स्थिती जाणून घेतली. प्रिटोरिया येथे मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर गोखलेंनी भारतीयांचा प्रश्न मांडला. भारतीयांवरील काही कर रद्द करण्यात येतील असे वचन या बैठकीत त्यांना मिळाले. मात्र गोखले परतल्यानंतर ती वचने तेथील सरकारने पाळली नाहीत. शेवटी महात्मा गांधींनी इ.स. १९१३ मध्ये पुन्हा सत्याग्रह सुरू केला.

गोखलेंनी गांधीजीच्या या चळवळीकरिता मदत म्हणून ३-४ लाख रुपये गोळा करून पाठविले. आफ्रिकेतील संघर्ष चालविण्याकरिता गोखलेंचे किती सहाय्य झाले हे नेहमी गांधीजी आपल्या व्याख्यानात सांगत असत. “गोखलेंच्या स्फुर्तीने, त्यांच्या प्रोत्साहनाने व सहाय्याने आम्ही इतके दिवस सत्याग्रह लढविला, ज्या निस्वार्थतेने गोपाळराव काम करतात. ती निस्वार्थता अंगी बाणवून घ्या” असे उद्गार गांधी काढत असत.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

ब्रिटिशांच्या आर्थिक नीतीवर टीका : गोपाळ कृष्ण गोखले नेमस्त नेते होते. ब्रिटिशांच्या सहाय्याने आपली प्रगती होईल यावर त्यांचा विश्वास होता. परंतु ते ब्रिटिशांचे स्तुतिपाठक नव्हते. त्यांनी ब्रिटिशांच्या चुकीच्या धोरणावर वेळोवेळी टीका करून भारतीय लोकांच्या हिताची जोपासना केली. लॉर्ड कर्झन मीठावरिल कर आपण कमी केला, दुष्काळ काळात शेतसाऱ्याची थकबाकी माफ केली, प्राथमिक शिक्षणाकरिता प्रयत्न केलेत.

अशा प्रकारची प्रौढी मिरवित असताना ह्या सुधारणा म्हणजे एकप्रकारे भारतीय जनतेची केलेली दिशाभूल आहे असे गोखलेंनी स्पष्ट केले. भारतीय जनतेकडून ज्याप्रमाणात कर घेतल्या जाते. त्या प्रमाणात भारतीयांच्या सुधारणांवर खर्च केला जात नाही. उलट यूरोपियन अधिकाऱ्यांचे पगार वाढवून दिले, लष्करावरील खर्च वाढविला आणि अनेक नवीन पदे निर्माण करून ती पदे भरुन हिंदुस्थान सरकारचा खर्च वाढविला असे न करता सामान्य जनतेवरील कर त्यांना कमी करता आला असता.

शिक्षणाकरिता आर्थिक सहाय्य वाढविता आले असते. अशा तऱ्हेच्या इतरही सुधारणा करता आल्या असत्या पण लॉर्ड कर्झन यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशा तऱ्हेने गोखलेंनी ब्रिटिशांच्या आर्थिक नीतीतील फोलपणा पुढे आणला. गोखलेंची भाषणे एवढी शास्त्रशुद्ध असत की, अँग्लो-इंडियन पत्रकार त्यांचा उल्लेख ग्लँडस्टन असा करीत.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

मृत्यू : धार्मिक बाबतीत अज्ञयवादी असलेल्या गोखले श्रद्धावान होते. त्याची न्या. रानड्यांप्रती डोळस श्रद्धा होती. त्यांना ते आपले गुरु मानीत. त्याच्यामध्ये नेमस्तपणा, सरळपणा, कष्ठाळूपणा, सौजन्य, निस्वार्थता, देशप्रेम, साहिष्णूता हे गुण होते. तापडपणा, हट्टीपणा, उतावडेपणा हे दोषही त्यांच्या स्वभावात होते. यामुळे बरेच वेळा त्यांना मनस्ताप सहन करावा लागत असे.

हे दोष त्यांच्यामध्ये असले तरी ते मुसद्दी राजकारणी आणि निस्वार्थी समाजसेवक होते. त्यांनी अनेकांना विविध क्षेत्रात कार्य करण्याची स्फुर्ती दिली. गांधीनी भारतात येऊन कार्य करावे, कार्यास प्रारंभापूर्वी देशाचा दौरा काढून भारतीय लोकांना जाणून घ्यावे असा सल्ला दिला. त्यानुसार महात्मा गांधींनी भारताचा दौर करून भारतीय लोकांना जाणून घेतले, त्यांच्या समस्या समजून घेतल्या यावरून गोखलेंची दूरदृष्टी लक्षात येते.

म्हणूनच महात्मा गांधींनी गोखलेंना आपले राजकीय गुरु मानले. महात्मा गांधीना ‘फिरोशहा मेहता हिमालयाप्रमाणे अगम्य वाटले. लोकमान्य टिळक महासागरासारखे वाटले तर गोपाळ कृष्ण गोखले गंगानदीप्रमाणे परोपकारी वाटले.’ अशा परोपकारी थोर पुरुषाचे निधन १९ फेब्रुवारी १९१५ रोजी पुणे येथे झाले.

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

गोखलेंच्या मृत्यू समयी दुःख प्रदर्शन करणाऱ्या एका सभेत आगाखान म्हणाले, “हिंदुस्थानला एक राष्ट्रीयत्व येणे शक्य नाही असे कित्येक म्हणतात, पण ना. गोखले हे एका राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे मूर्त स्वरूप होते व त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने देशकार्य करीत राहणे हेच त्यांचे उत्कृष्ट स्मारक होय.” 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment