इतिहास – प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास

इतिहास-Itihas

भारताचा ऐतिहासिक कालखंड तीन भागात विभागला गेला आहे –

  • प्राचीन भारताचा इतिहास
  • मध्ययुगीन भारताचा इतिहास 
  • आधुनिक भारताचा इतिहास

प्राचीन भारताचा इतिहास भारतातील प्राचीन आर्य राजांची राजकीय व्यवस्था उदयापासूनचा इतिहास आर्य राजघराण्यांच्या अंतापर्यंतचा समावेश आहे, ज्यांना प्राचीन भारतीय क्षत्रिय म्हणतात. त्याचा कालावधी सुमारे ३००० ईसापूर्व ते इसवी सन १२०६ पर्यंत निर्धारित केला जातो. म्हणजेच या कालखंडाचा शेवट भारतात मुस्लिम राजवटीच्या स्थापनेने होतो.

मध्ययुगीन भारताचा इतिहास इसवी सन १२०६ मध्ये दिल्ली सल्तनतच्या स्थापनेपासून ते १७६१ च्या पानिपतच्या लढाईपर्यंतचा आहे. या संपूर्ण काळात तुर्कांनी भारतावर सुमारे ३०० वर्षे आणि मुघलांचे राज्य सुमारे २५० वर्षे चालवले, परंतु इसवी सन १७६१ पर्यंत ते इतके कमकुवत झाले की पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांनी मुघलांच्या वतीने अहमद शाह अब्दालीशी लढा दिला. . मराठ्यांच्या दारुण पराभवानंतर मुघल राजवट पूर्णपणे अस्ताचलकडे जाते आणि इंग्रजांना त्यांची शक्ती वाढवण्याची संधी मिळते.

इ.स. १७६५ मध्ये अलाहाबादच्या तहात, मुघल सम्राटाला पेन्शन देण्यात आली आणि ब्रिटीश भारताचे वास्तविक शासक बनले. अशा प्रकारे इसवी सन १७६१ ते १९४७ या कालखंडाला आधुनिक भारताचा इतिहास म्हटले जाते. 

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Click here to Read

 

प्राचीन भारताचा इतिहास

प्राचीन भारताच्या वाटचालीत देशातील प्राकृतिक व ऐतिहासीक परिस्थीतीचे मोठे योगदान राहिलेले आहे. हिमालयाचे अभद्य संरक्षण, सुपीक जमिन, पाऊस व वारा यातून प्राचीन भारतातील मानवाला जीवन संघर्षात एक प्रकारची स्थिरता प्राप्त झाली. सुपीक प्रदेशात मानव टोळया करून राहू लागला, शेतीची कला शिकला, धर्म संस्कृती व विवीध धार्मिक रचनांनी त्यांच्या जीवनास एक धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठाण प्राप्त करून दिले.

जीवन संघर्षाचा मूळ हेतू केवळ जगणे, ऊपभोग घेणे नसून मानवा-मानवातील प्रेम, सहिष्णूता, एकमेकांच्या विचारांचा धर्माचा आदर राखणे या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीव होते. प्राचीन काळातील महाजनपदे, गणराज्ये, प्रादेशिक राज्ये यातील राजांनी घडवून आणलेल्या सुधारणांना आणखी खूप महत्त्व आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

इतिहास – Itihas

कोणत्याही देशाच्या विकासात केवळ साम्राज्यवाद, आर्थिक होत महत्त्वाचे नसते तर जीवनाची व समाज जीवनाची जी विवीध क्षेत्रे असतात जसे शिल्पकला, चित्रकला, संस्कृती, साहित्य यातील जडणघडण यालाही तितकेच महत्त्व आहे. प्राचीन काळापासून भारतावर अनेक परकिय आक्रमकांनी आक्रमणे केलेली आहे.

त्यातूनच सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढली. प्राश्चात्य संस्कृतीच्या प्रकाशात भारतीय संस्कृतीची अनुकूल प्रतिकूल बाजू पाहता आली. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव भारतीय संस्कृतीतील समाज, धर्म, कला, साहित्य इ.वर पडला. त्यातून भारतीय संस्कृती प्रगल्भ बनली.

मध्ययुगीन भारताचा इतिहास

मध्ययुगीन भारत (इ.स. १२०६ ते १८५७) हा इतिहास विषयाचा एक अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात एकूण तीन पुस्तके आहेत. पुस्तक क्र. १ ‘सलतनत ते विजयनगर (१२०६ ते १५२६) यात आपण १२०६ ते १५२६ या काळात हिंदुस्थानावर झालेल्या परकीय स्वान्या, त्याचे हिंदुस्थानावर झालेले परिणाम आणि सुलतानशाहीची स्थापना यांचा सविस्तरपणे विचार करणार आहोत. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून भारतात तुर्की सुलतानांची सत्ता वाढत गेली व भारतातील स्वतंत्र हिंदू राज्यांची सत्ता संपुष्टात येत गेली.

मुसलमानी राजवटीचे राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवनावर परिणाम घडून आले. विविध घराण्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केली. त्यात खिलजी घराणे, तुघलक घराणे व लोदी घराणे अग्रेसर होते. या घराण्यातील प्रत्येक सुलतानाने आपला साम्राज्य विस्तार केला. प्रशासकीय, आर्थिक सुधारणा घडवून आणल्या, विविध कायदे केले. सैन्याची उभारणी केली याचे परिणाम साम्राज्याच्या दृष्टीने त्याचप्रमाणे रयतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले.

इतिहास – Itihas

काही अंगभूत मर्यादांमुळे काही सुलतानांचे निर्णय चुकीचे ठरले. त्याचा परिणाम राज्याच्या प्रशासनावर घडून आला. परकीय आक्रमणास सुलतानाच्या आक्रमणास काही राज्यांनी विरोध केला, त्यांच्याशी युद्ध छेडले. त्यातून काही नवी राज्ये, नवे साम्राज्य उदयास आले. विजयनगर हे अशाच प्रकारचे एक साम्राज्य होय. विजयनगरने आपले स्वतःचे वैशिष्ट्य ठसा कोरला.

विजयनगर साम्राज्यापासूनच पुढे शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. त्यातून पुढे मोठी कामगिरी शिवाजी महाराजांनी केली. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधने, दिल्लीची सुलतानशाही, खिलजी घराणे, तुघलक घराणे व लोदी घराणे यांच्या कारकिर्दीतील विविध सुलतान त्यांचे कार्य, घडवून आणलेल्या विविध सुधारणा यांचा अभ्यास आपण करणार आहोत.

मोगल मराठा कालखंड (१५२६-१८१८) यात आपण बाबर, शहाजान, औरंगजेब यांच्या कारकिर्दीचा अभ्यास करणार आहोत. या तिन्ही सुलतानांनी साम्राज्य, धर्म, राजकारण व प्रशासन या बाबतीत आपआपली छाप पाडली. कला, साहित्य, शिल्प यांना त्यांनी प्रोत्साहन दिले. परंतु त्याचबरोबर आपले वर्चस्व राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. औरंगजेबाने मोठ्या हिमतीने साम्राज्य विस्तार केला.

इतिहास – Itihas

त्याच्यात मोठा मुत्सद्दीपणा होता. १७ व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्र-कर्नाटकात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही यांच्यात संघर्ष झाला. दिल्लीच्या मोगल सत्तेचेही या संघर्षाकडे लक्ष होते. मोगल-निजाम संघर्षातील भातवडीच्या लढाईत शहाजी राजे भोसले यांनी आपले कौशल्य दाखवले. १६४० च्या दरम्यान शहाजीराजेंनी पुण्याची जहागिरी शिवाजीराजांकडे सुपूर्द केली.

शिवाजी महाराजांनी विविध पराक्रम गाजविले. स्वराज्याचा श्रीगणेशा १५ व्या वर्षीच सुरू केला. अनेक किल्ले जिंकले, प्रशासन व न्यायव्यवस्था सुधारली. प्रसंगी वेळ पाहून तह देखील केला. शाहिस्तेखानावर छापा घातला. अफजलखानाचा वध केला. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव होऊन मराठी सत्तेची प्रतिष्ठा संपली. मराठ्यांचा दरारा नाहीसा झाला. अशा परिस्थितीत माधवराव पेशवा झाला.

मराठ्यांच्या इतिहासात माधवराव पेशव्यांचा काळ अनेक दृष्टींनी उज्ज्वल व क्रांतिकारक मानला जातो. पानिपतावर मराठ्यांची गेलेली पत त्यांनी परत प्राप्त केली. अनेक लढाया जिंकल्या. त्यांच्यानंतर नारायणराव पेशवा झाला. नारायणरावाने रायगड किल्ला जिंकला, त्याच्या बधानंतर परत अस्थिरता निर्माण झाली. यानंतर मराठ्यांत बंडाळी माजली. त्याचा फायदा इंग्रजांनी उठवला.

इतिहास – Itihas

आपण बाबर, शहाजान, औरंगजेब यांची कारकीर्द, मोगल शाहीचा अंत, मराठी सत्तेचा उदय, पानिपतोत्तर मराठ्यांचा इतिहास या सर्वांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. व्यापाराबरोबर युरोपियनांनी आपल्या वसाहती स्थापण्यास सुरुवात केली. राज्यकर्त्यांशी त्यांचे संघर्ष झाले त्यात ते यशस्वी होत गेले. पोतुर्गीज, डच लोकांनी व्यापार काबीज केलेला पाहून इंग्रजांनाही व्यापार काबीज करण्याची इच्छा झाली. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा कारभार हिंदुस्थानात सुरू झाला.

या काळात इंग्रजांना फ्रेंच, मराठा यांच्याबरोबर युद्ध करावे लागले. कंपनीने या काळात समाज सुधारण्याचे अनेक कायदे केले. जसे, सतिबंदीचा कायदा, शिक्षण, पाश्चात्त्य शिक्षण यांतून भारतीय लोक परिक्षण करू लागले. आपल्या देशातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती यांवर त्यांनी घणाघाती टीका केली. वृत्तपत्रांचा उदय व वाढ झाली. दळणवळणाच्या सोयी वाढल्या. यंत्रनिर्मित वस्तूंचा ओघ वाढला.

या सर्वांचे भारतीय समाजजीवनावर, देशावर सखोल परिणाम झाले. अर्थात या परिणामाबरोबरच अन्य परिणामही चडून आले. खालसा पद्धती, धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप, धर्मांतरास पाठिंबा सैन्यातील अपुऱ्या सोयी, इत्यादी कारणांमुळे सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला व १८५७ चे स्वातंत्र्य समर घडून आले. युरोपियनांचे आगमन व वसाहतवादाची पार्श्वभूमी, ब्रिटिश सत्तेची स्थापना व वसाहतवादाचा विकास, ब्रिटिशकालीन प्रबोधन, वसाहतवादाचे स्वरूप व परिणाम या सर्वांचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत.

आधुनिक भारताचा इतिहास

ज्या घटनांमधून आधुनिक भारताची जडणघडण झाली, त्या घटनांचा आणि त्याच्याशी संबंधित वैचारिक प्रक्रियांचा अभ्यास आपण या अभ्यासक्रमात करणार आहोत. भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि त्यातून निर्माण झालेला भारताचा स्वातंत्र्यलढा हा केवळ ब्रिटिशांविरुद्धचा लढा नव्हता. साम्राज्यवादी प्रवृत्ती व प्रेरणांविरुद्धचा तो एक व्यापक संघर्ष होता.

आर्थिक व सांस्कृतिक शोषणाच्या साम्राज्यवादी धोरणांविरुद्ध भारतीय जनता उभी राहिली. सुमारे शतकभराच्या वैशिष्ट्यपूर्ण संघर्षानंतर भारताने आपले राजकीय स्वातंत्र्य मिळवले. या कालखंडात जे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक बदल कळत-नकळत घडत गेले त्यांतून आजच्या भारताची उभारणी झाली. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे सर्वसमावेशक स्वरूप लक्षात घेतल्यास एक गोष्ट स्पष्ट होते, या स्वातंत्र्यसंग्रामातून केवळ राजकीय मूल्यांचा उदय झाला असे नव्हे; तर नव्या आर्थिक, सामाजिक, वैचारिक व शास्त्रीय मूल्यांचा परिपोष होत गेला.

इतिहास – Itihas

आपण ब्रिटिश साम्राज्यवादाची पार्श्वभूमी लक्षात घेणार आहोत. विशेषतः आपला ब्रिटिशांपुढे पराभव का झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या निमित्ताने व्यापारासाठी आलेले ब्रिटिश राज्यकर्ते कसे बनले ह्याचा पूर्व इतिहास आपण लक्षात घेणार आहोत. ब्रिटिशांनी भारताचे आर्थिक शोषण कसे केले, पारतंत्र्यात एत्तद्देशियांना कसे अडकविले, येथील ग्रामव्यवस्थेचा हास कसा झाला याचे तपशील आपण पाहणार आहोत.

त्याचबरोबर ब्रिटिश आमदानीतील शेतीचे व्यापारीकरण कसे झाले, भारतात सरंजामदारी अर्थव्यवस्था मागे पडून भांडवलशाली अर्थव्यवस्थेकडे वाटचाल कशी सुरू झाली या स्थित्यंतराचीही मीमांसा करणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर कष्टकऱ्यांचा किंवा कामगारांचा एक नवा वर्ग आपल्या देशात निर्माण झाला. ह्या संघटित कामगारांनी आपल्या अस्मितेसाठी व हक्कांसाठी कोणत्या चळवळी केल्या व त्यातून भारतीय कामगार चळवळीचा आकृतिबंध कसा तयार झाला याचीही चर्चा आपण करणार आहोत.

इतिहास – Itihas

प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास अभ्यासावयाचा आहे. त्यात जहाल व नेमस्थ पंथ, मुस्लिम लीग, महात्मा गांधी यांचे कायदेभंग, सत्याग्रह व असहकार आंदोलने, क्रांतिकारकांचे सशस्त्र उठाव यांचे स्वरूप व परिणाम यांचा अभ्यास करावयाचा आहे. ब्रिटिशांनी प्रारंभी प्रांतिक स्वायत्तता देऊन व नंतर भारत-पाक फाळणी करून स्वातंत्र्य कसे दिले याचे तपशीलही आपण अभ्यासणार आहोत.

नवभारताच्या निर्माणात कायद्याचा व घटनात्मक चौकट निर्मितीचा प्रयत्न कसकसा होत गेला याचा आढावा घेणार आहोत. ब्रिटिश प्रशासनाची चौकट ही लष्करी प्रशासनाबरोबरच न्यायालयीन व केंद्रीय आणि प्रांतिक नागरी प्रशासनाची विशिष्ट पद्धती यांतूनच आजच्या भारतीय प्रशासनाची प्रणाली उत्क्रांत झाली आहे. ब्रिटिश आमदानीत निरनिराळ्या सुधारणा व घटनात्मक हक्कांबाबत कायदे झाले. त्या सर्वांचा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी म्हणून विचार करावा लागतो.


किल्ल्यांची यशोगाथा


MPSC Online