Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

Karmaveer-Bhaurao-PatilKarmaveer Bhaurao Patil

कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा, जि. सांगली हे त्यांचे गाव. त्यांच्या वडीलांचे नाव पायगोंडा वाटील आणि आईचे नाव गंगुबाई होते.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

बालवयात मामाच्या गावाला राहत असताना त्यांना त्यांच्या मामाचे मित्र दीन दुबळ्यांचे कैवारी, अन्यायाची चीड असलेल्या सत्याप्पा भोसलेंचा सहवास लाभला. त्यांच्याकडून भाऊरावांना अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याचे संस्कार मिळाले. पायगोंडा पाटील सरकारी नोकरीत असल्यामुळे भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले.

पाचवा वर्ग विटा, ता. खानपूर (विटा) जि. सांगली येथील शाळेतून उत्तीर्ण झाल्यानंतर इ.स. १९०२ मध्ये त्यांना कोल्हापुरमधील राजाराम हायस्कूलमध्ये दाखल केले. त्यांची राहण्याची व्यवस्था दिगंबर जैन वसतिगृहात करण्यात आली होती. या वसतिगृहाचे व्यवस्थापक ए. बी. लठ्ठे होते. त्यांनी अतिशय जाचक नियम विद्यार्थ्यावर लावले होते.

परंतु त्या नियमांचे पालन व्यवस्थापक स्वतः करीत नव्हते. त्यामुळे भाऊरावांनी या जाचक नियमांचे पालन न करण्याचा निणर्य घेतला व तो कृतीतही उतरविला. याकरिता त्यांना अनेकदा शिक्षाही झाली. परंतु भाऊरावांनी माघार घेतली नाही. शेवटी त्यांना वसतीगृहामधून काढून टाकण्यात आले.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

त्याची ही बंडखोर वृत्ती पुढील क्रांतीची नांदी ठरली. भाऊरावांची शिक्षणात फारसी प्रगती झाली नाही. त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये सहाव्या वर्गापर्यंतच शिक्षण घेतले. परंतु कुस्ती, मल्लखांब यासारख्या खेळांमध्ये ते आघाडीवर असायचे. भाऊरावांचा संपर्क कोल्हापूरच्या शाहू महाराजांसोबत आल्यानंतर शाहु महाराजांचे सुधारणावादी विचार व कार्य यामुळे भाऊराव प्रभावीत झाले.

येथूनच त्यांना समाजसुधारणेची प्रेरणा मिळाली. इ.स. १९०९ मध्ये त्यांचा विवाह कुंभोजमधील अण्णांसाहेब पाटील यांच्या आदाक्का या मुलीशी झाला. विवाहानंतर आदाक्काचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. याच दरम्यान भाऊरावांनी विविध ठिकाणी वेगवेगळी कामेही केलीत.

काही दिवस माणिकचंद हिराचंद जव्हेरी या व्यापाऱ्याकडे काम केले. संस्कृत विषयाच्या शिकवण्याही घेतल्या. किर्लोस्कर व ओगले या कारखानदारांचे फिरते विक्रेते म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या निमित्ताने त्यांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही प्रवास झाला.

त्यामुळे त्यांना येथील समाज जीवनाचे जवळून निरीक्षण करता आले. अज्ञ व मागासलेल्या बहुजन समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे ओळखून माहात्मा फुलेंनी बहुजनांमध्ये शिक्षणाचा प्रसाराचे जे कार्य सुरू केले होते त्याला पुढे नेण्याचा निश्चय केला.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

दूधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना : शिक्षणानेच समाज जागृती होऊन समाजाचे योग्य परिवर्तन घडून येऊ शकते. तसेच शिक्षणाचा अभाव हे व्यक्तिच्या मागासलेपणाचे महत्त्वाचे कारण आहे. याची जाणीव भाऊरावांना झाली होती. म्हणूनच त्यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन इ.स. १९०९ साली ‘दूधगाव विद्यार्थी आश्रमा’ची स्थापना केली. (सांगली जिल्हा) अशाच प्रकारची वसतीगृहे नर्ले व काले या गावी चालविली होती.

भाऊरावांचा समाजसेवेकडे अधिक कल होता. त्यांनी जास्तीत जास्त वेळ समाजसेवेला द्यायला सुरुवात केली. परंतु त्यांच्या वडीलांना वाटायचे की, मुलाने चांगली नोकरी करावी. यामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. शेवटी भाऊराव घरातून बाहेर पडले ते बहुजनांच्या घरापर्यंत शिक्षण गंगा पोहचविण्याकरिता.

रयत शिक्षण संस्थेची स्थापना

भाऊरावांवर माहात्मा फुले, शाहू महाराज यांच्या विचाराचा व कार्याचा प्रभाव होता. त्यामुळे सत्यशोधक समाजाचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले व सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. १५ सप्टेंबर १९१९ मध्ये सत्यशोधक समाजाच्या सातारा जिल्हा शाखेची परिषद प्रसिद्ध वकील केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली काले, ता. कराड या गावी आयोजित करण्यात आली होती.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

या परिषदेमध्ये भाषण देताना बहुजन समाजाला शिक्षण देण्याकरिता शिक्षण संस्था स्थापन करण्याची आवश्यकता भाऊरावांनी व्यक्त केली. येथेच त्या संस्थेला ‘रयत शिक्षण संस्था’ असे नावही जाहीर केले. शेतकरी म्हणजे रयत आणि रयतेला शिक्षण देणारी संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था असा त्या नावामागील आशय होता.

परिषदेमध्ये भाऊरावांच्या या योजनेला सर्वानुमते समंती देण्यात येऊन या संस्थेच्या कार्याची जबाबदारी भाऊरावांकडे सोपविण्यात आली. नंतर काले या ठिकाणी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रितसर रयत शिक्षण संस्था स्थापना केली. या संस्थेची उद्दीष्ट्ये खालीलप्रमाणे होती.

१) शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.

२) मागासलेल्या वर्गातील मुलांना मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

३) मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनविण्याचा प्रयत्न करणे.

४) सामान्य स्थितीतील विद्यार्थ्यास त्यांच्या खर्चाने किंवा फार तर निम्म्या खर्चाने संस्थेत शिक्षण घेण्याकरिता ठेवणे.

५) ज्यांची सांपत्तिक स्थिती समाधानकार आहे. अशा परगावच्या मागासलेल्या विद्यार्थ्यांची त्यांच्याच खर्चाने संस्थेत सोय करणे.

(६) अयोग्य रुढींना फाटा देऊन खऱ्या मार्गाचा अवलंब करण्याचे शिक्षण देणे.

७) संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.

८) संस्थेचे शिक्षणाच्या बाबतीत कार्यक्षेत्र वाढविणे.

‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे संस्थेचे ब्रीद वाक्य तर ‘वटवृक्ष’ हे बोधचिन्ह होते. प्रारंभी संस्थेचे मुख्य कार्यालय काले येथे होते. नंतर सातारा येथे संस्थेचे मुख्य कार्यालय बनविण्यात आले. भविष्यात शिक्षणाचा प्रसार करताना सरकारी अनुदानाचा प्रश्न येणार म्हणून संस्थेचे २५ एप्रिल १९३५ ला रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. 

या संस्थेला प्रारंभी डॉ. नागनाथ अण्णानायकवाडी यांनी १,११,१११ रूपये देणगी दिली होती. भाऊरावांनी या संस्थेद्वारे वसतीगृहे, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शिक्षकांसाठी प्रशिक्षण विद्यालये सुरू केली होती.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

वसतीगृहाची स्थापना : भाऊरावांनी इ.स. १९२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय सातारा येथे नेले होते. याच वर्षी सातारा येथे सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांकरिता वसतीगृह सुरू केले. २५ फेब्रुवारी १९२७ ला महात्मा गांधींच्या हस्ते या वसतीगृहाचे ‘श्री. छत्रपती शाहू बोर्डिग हाऊस’ असे नामाभिधान केले गेले. गांधीजींनी संस्थेला हरीजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली होती.

याविषयी भाऊरावांचे खाजगी सचिव एम. बी. काटकरांनी त्यांच्या ‘प्रबोधनाची धगधगती मशाल : कर्मवीर भाऊराव पाटील’ या पुस्तकात लिहिले आहे. गांधीजी म्हणतात, “भाऊराव साबरमती आश्रमात जे मला जमले नाही. ते तुम्ही येथे यशस्वी करून दाखविले. तुमच्या या कार्यास माझे शुभाशीर्वाद आहेत.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २८ जुलै १९२८ ला या वसतीगृहाला भेट दिली व २५ रुपये देणगी दिली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हणाले होते, “ही एकमेव अशी संस्था आहे की, राष्ट्र कल्याणाची काळजी वाहणाऱ्या प्रत्येक माणसाने तिच्या उत्कर्षासाठी हातभार लावला पाहिजे. ४ एप्रिल १९३३ ला पुरोगामी विचाराचे बडोदा संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनीही वसतीगृहाला भेट देऊन ४००० रुपये देणगी सुद्धा दिली होती.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

इ.स. १९३२. मध्ये भाऊरावांनी ‘युनियन बोर्डिंग हाऊस’ नावाचे मिश्र वसतीगृह पुणे येथे सुरू केले होते. इ.स. १९४० ला मुलींकरिता वसतीगृहाची स्थापना करून मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती. हे वसतीगृहे चालवित असताना भाऊरांवाना आर्थिक अडचणीच्या वेळी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईचे मंगळसुत्र व दागिने सुद्धा विकावे लागले होते.

प्राथमिक शाळा : भाऊरावांनी इ.स. १९३५ मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज सुरू करून शिक्षणासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण वर्ग आखण्यात आले होते. इ.स. १९३७ मध्ये प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुका झाल्या होत्या. यावेळी मुंबई प्रांतासह अनेक प्रातांत काँग्रेसची मंत्रिमंडळे अधिकारावर आली. मुंबई प्रांताच्या सरकारने जनतेमध्ये साक्षरतेचा प्रचार करण्यासाठी खाजगी शिक्षण संस्थाना प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला होता.

भाऊरावांनी इ.स. १९३८ मध्ये प्राथमिक शिक्षण समितीची स्थापना करून पहिली व्हॉलंटरी प्राथमिक शाळा यवतेश्वर (सातारा) या खेडेगावी सुरू केली. या संस्थेमार्फत चालविलेल्या प्राथमिक शाळांची संख्या इ.स. १९५० मध्ये ५७८ एवढी झाली होती. त्यानंतर ह्या शाळा महाराष्ट्र सरकारकडे सुपूर्त करण्यात आल्या होत्या.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

माध्यमिक शाळा : भाऊरावांनी प्राथमिक शाळांसोबतच माध्यमिक शाळांवर आपले लक्ष केंद्रित केले होते. इ.स. १९४० मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या नावे सातारा येथे देशातील ‘कमवा आणि शिका या पद्धतीने चालणारे फ्रि रेसिडेन्सी हायस्कूल सुरू करण्यात आले होते.

सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई यांच्या स्मरणार्थ एक हायस्कूल सुरू करण्यात आले होते. इ.स. १९५४ पर्यंत रयत संस्थेच्या माध्यमिक शाळांची संख्या ४४ एवढी होती. भाऊरावांनी १०१ माध्यमिक शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडला होता व आपल्या हयातीत तो पूर्ण केला होता. 

महाविद्यालय : विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन शिक्षणाची गरज लक्षात घेऊन भाऊरावांनी इ.स. १९४७ मध्ये सातारा येथे ‘छत्रपती शिवाजी महाविद्यालय’ हे संस्थेचे पहिले महाविद्यालय सुरू केले होते. यावेळी एका घनिकाने भाऊरावांना अशी विनंती केली की, “महाविद्यालयास मी इच्छीतो ते नाव दिल्यास सांगान तितका पैसा देईन.” तथापि भाऊरावांनी त्यांची मागणी अमान्य केली व त्यांना बाणेदारपणे उत्तर दिले.

ते म्हणाले, “मी एक वेळ माझ्या जन्मदात्या वडिलांचे नाव बदलेन पण पैशाच्या मोहाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाविद्यालयाला दिलेले नाव कधीही बदलणार नाही.” इ.स. १९५४ मध्ये कराड येथे संत गाडगे महाराजांच्या नावे एक महाविद्यालय सुरू केले होते. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व नंतर इ.स. १९५५ मध्ये मौलाना आझाद यांच्या नावे सातारा येथे पहिले ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले होते.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

कमवा आणि शिका योजना : भाऊरावांना स्वाभिमानाने व ताठ मानाने जगणारे विद्यार्थी निर्माण करायचे होते. परंतु बहुजन वर्गाची स्थिती हालाकिची होती. जेथे दोन वेळ तोंड आणि हात यांची गाठ पडणेही कठीन होते. तेथे मुलांच्या शिक्षणावर कुटुंबाने खर्च करण्याची अपेक्षा करणेही चुकीचे होते, पण विद्यार्थ्यामध्ये श्रममूल्य रुजवायाचे होते; याचाच विचार करून विद्यार्थ्यांना गरिबी ही आपली कमजोरी आहे.

या कारणाने आपण काहीही करू शकत नाही. या न्यूनगंडातून बाहेर काढण्याकरिता त्यांच्यामध्ये आपण स्वतःच्या पायावर स्वतः उभे राहु शकतो हा आत्मविश्वास निर्माण करण्याकरिता आपल्या गरजा भागविण्याकरिता दुसऱ्याकडे याचना न करता स्वतःचे शिक्षण स्वतः कमाई करून करावे याकरिता भाऊरावांनी ‘कमवा आणि शिका’ ही योजना सुरू केली.

या योजनेनुसार विद्यार्थ्यांना दररोज ठराविक तास निरनिराळे काम उपलब्ध करून दिले जात होते.  ती कामे करून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा खर्च भागवावा अशी व्यवस्था या योजनेत करण्यात आली होती. भाऊराव पाटील म्हणायचे, “खडी हे माझे डॉलर आहेत. विद्यार्थ्यांने कोणत्याही प्रकारचे श्रमाचे काम करण्यात कमीपणा मानु नये.

आपण स्वतःच्या कष्टातून शिकत आहोत. असे सांगण्यात विद्यार्थ्यांना मोठेपणा वाटला पाहिजे. श्रमाचे महत्त्व व प्रतिष्ठा सुशिक्षिताना वाटली पाहिजे. “कमवा आणि शिका’ या योजनेने ‘स्वावलंबी शिक्षण’ हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य बनले.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

रयत शिक्षण संस्थेवरील संकट : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इ.स. १९४८ मध्ये महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली. त्यानंतर नथ्थुराम गोडसे समर्थक ब्राम्हणांवर बहुजन वर्ग चिडला. ठिक-ठिकाणी गांधीजींना श्रद्धाजंली वाहण्याकरिता सभा होत होत्या. अशीच सभा सातारा येथे घेण्यात आली होती.

या सभेमध्ये मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या काही पक्षपाती व खोडसाळ विधानांचा भाऊरावांनी जाहीररीत्या प्रतिवाद केल्यानंतर सरकारने याचा संबंध रयत शिक्षण संस्थेशी जोडून संस्थेचे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या परिश्रमाने बहुजनांना शिक्षण देण्याकरिता स्थापन केलेली ही संस्था बंद पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला.

या कठीण प्रसंगी भाऊराव डगमगले नाहीत त्यांनी हे आव्हान स्वीकारले व ते म्हणाले, ‘जनतेच्या सहकार्यावर अनुदान बंद झाले असतानाही आपण रयत शिक्षण संस्था चालुच ठेवू.’ महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेने भाऊरावांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या ५२ दिवसात ५३००० रूपये गोळा केले आणि रयत शिक्षण संस्थेवर आलेले हे संकट दूर झाले.

यावरून भाऊरावांच्या कार्याचा जनतेमध्ये किती आदर होता हे लक्षात येते. जनतेचा भाऊरावांना मनापासून पाठिंबा आहे हे सरकारच्या लक्षात आले. सरकारला पुन्हा ३ जानेवारी १९४९ ला रयत शिक्षण संस्थेचे अनुदान सुरू करावे लागले.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

शैक्षणिक तत्वज्ञान : महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे बाबा यांच्या विचारसरणीचा प्रभाव भाऊरावांवर होता. बहुजन वर्गाच्या सर्वागीण उन्नतीकरिता शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही हे त्यांनी ओळखले होते. शिक्षण म्हणजे जीवन व जीवन म्हणजे शिक्षण होय, असे ते म्हणत. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य ही भाऊरावांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाची चतुःसुत्री होती.

घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाही. तसे स्वावलंबनाशिवाय जीवनात आनंद नाही. हे तत्व शिक्षणामधून विद्यार्थ्यांमध्ये ते रुजवित होते. बॅरिस्टर पी. जी. पाटील यांनी भाऊराव पाटलांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाविषयी अतिशय सुत्रबद्धपणे मांडणी केली ती अशी, “वसतीगृह जीवनावर भर, जातीय ऐक्य, स्वावलंबन व स्वाभिमान, श्रमप्रतिष्ठा व श्रमपावित्र्य, भूमातेशी प्रत्यक्ष संबध, मानवतावाद, विश्वबंधुत्व, स्वांतत्र्यचिंतन व स्वांतत्र्यासाठी प्रयत्न, आदर्श ग्रामसेवक, त्यागी व सेवामय असे तपःपूत जीवनध्येय, साधेपणा, जनतेशी एकरूपता, प्रसिद्धीपासून मुद्दाम चार पावले दूर राहून अज्ञानांधकारात पिचत पडलेल्या रयतेला नंदादीपाप्रमाणे सतत तेवत राहुन मार्ग उजळून टाकण्याची शिकवण, ‘मोडेन पण वाकणार नाही’ हे ब्रीद जीवनात तत्वाबद्दल केव्हाही तडजोड नाही.

न्यायाची चाड, अन्यायाची चीड व त्याविरुद्ध बंड करून उठणे आणि हे सर्व करीत असताना पैशामुळे आपले काम केव्हाही अढून राहणार नाही हा दुर्दम्य आशावाद, शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मुळ आहे. व शिक्षणानेच माणूस बहुश्रुत व विवेकी बनतो, अशी त्यांची विचारसरणी होती.”

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

जातिभेद व अस्पृश्यता निवारण : भाऊरावांना जातीभेद, उच्च-नीचता, अस्पृश्यता ह्या भेदमुलक कल्पना अजिबात मान्य नव्हत्या. अस्पृश्यता मानव जातीवर कंलक आहे. तो आपण स्वप्रयत्नाने पुसून टाकला पाहिजे, असे त्यांचे मत होते. भाऊरावांनी विद्यार्थीदशेत असतानाच ह्याविरुद्ध बंड केले होते.

हायस्कूलमध्ये असताना एका अस्पृश्य मुलाला काही व्यक्तींनी विहीरीवर पाणी पिण्यास मनाई केली होती.  तेव्हा भाऊरावांनी त्याचा विरोध म्हणून विहीरीवरील रहाटच विहीरीत टाकुन दिला होता. इस्लामपूरच्या शाळेबाहेर पावसात भिजत शिक्षण घेताना दिसलेला ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या विद्यार्थ्याला भाऊराव आपल्या घरी घेऊन आले.

आपल्यासोबत आईच्या हाताने जेवू घातले. शिक्षणाचा प्रसार करीत असताना अस्पृश्याच्या वस्तीमध्ये जाऊन शिक्षणाचे धडे त्यांनी मुलांना दिले. शैक्षणिक कार्याद्वारे भाऊरावांनी सामाजिक समतेचा संदेश दिला. रयत शिक्षण संस्थेच्या वसतीगृहात निरनिराळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश असे सर्व विद्यार्थी बंधुभावाने एकत्र राहत असत.

स्वतःच्या हातांनी समुदायिकरीत्या स्वयंपाक करीत आणि एकत्र जेवण घेत होते. अशा तऱ्हेने समानतेची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून मुलांवर बिंबविल्या जात होती. अस्पृश्य मूलांना ते आपल्या घरीही ठेवत असत. अस्पृश्यांच्या परिषदेलाही भाऊराव आवर्जुन उपस्थित राहत.

पुणे येथे आयोजित अहिल्याश्रमाच्या भव्य पटांगणात महाराष्ट्रीय अस्पृश्य तरुणांच्या परिषदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर भाऊरावही उपस्थित होते.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

सत्यशोधक व ब्राम्हणेत्तर चळवळ आणि भाऊराव पाटील : राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिल्यामुळे कोल्हापूर संस्थान सत्यशोधक चळवळीचे माहेर घर बनले होते. काही काळ भाऊराव कोल्हापूरात राहिल्यामुळे शाहू महाराजांसोबत त्यांची जवळीक निर्माण झाली. शाहू महाराजांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांनी सत्यशोधक समाजाचे सदस्यत्व स्वीकारले.

सत्यशोधक समाजाच्या तत्वांचा प्रचार आणि प्रसाराकरिता अतिशय उपयोगी ठरलेल्या सत्यशोधक जलशांमध्ये भाऊरावांनी सक्रिय सहभाग घेतला. जलशांची गाणी व संवाद भाऊराव स्वतः तयार करीत होते. तसेच जलशांमध्ये व्याख्याने देत, डफ वाजवित. त्यांनी विशेषतः सातारा जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचा प्रसार केला. काही वर्षातच सत्यशोधकांचा सातारा जिल्हा केंद्र बनले.

त्यांनी भिक्षुकशाहीविरुद्ध बंड केले. सातारा (आता सांगली) जिल्ह्यामध्ये असलेले औदुंबर या ठिकाणी होणाऱ्या दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला भाऊरावांनी प्रबोधनाचा कार्यक्रम बनवून या ठिकाणी ब्राम्हण भिक्षूकांनी जेवण केल्यानंतर इतरांनी जेवण घेण्याची प्रथा होती ती मोडीस काढली. सज्जनगडावर होणाऱ्या दासनवमीच्या उत्सवात त्यांनी अशाच पद्धतीने समारंभ केला.

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये ‘सत्य धर्म हाच महाराष्ट्र धर्म’ या विषयावर व्याख्यान करून समाज प्रबोधन केले. स्त्रियांवर लादलेल्या केशवपण प्रथे विरुद्धही त्यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून आवाज उठविला. भाऊरावांनी सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते म्हणून तर कार्य केलेच त्याचबरोबर इ.स. १९२० मध्ये स्थापन झालेल्या ब्राम्हणेत्तर पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी कार्य केले होते.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

इ.स. १९२३ व इ.स. १९२६ मध्ये मुबंई कायदेमंडळासाठी झालेल्या निवडणुकामध्ये त्यांनी ब्राम्हणेत्तर पक्षाच्या उमदेवारांचा हिरीरीने प्रचार केला होता. महाराष्ट्रात कॉग्रेस अंतर्गत बहुजन समाजवादी विचारांचा पाठपुरावा करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेसाठी इ.स. १९४६ व इ.स. १९४७ या कालावधीत ज्या राजकीय घडामोडी झाल्या होत्या. त्यामध्ये भाऊरावांची भूमिका महत्त्वाची होती.

मृत्यू : शिक्षणाला समाज प्रबोधन व समाजाच्या प्रगतीचे साधन बनवून समाजाचा मुख्य घटक असलेल्या व्यक्तीला समपातळीवर आणण्याचा प्रयत्न करून माणसाला माणूसपण शिकविणाऱ्या भाऊरावांना महाराष्ट्राच्या जनतेने कर्मवीर ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. भारत सरकारने त्यांना २६ जानेवारी १९५९ ला ‘पद्मभूषण पुरस्कार’ देऊन गौरविले.

५ एप्रिल १९५९ रोजी पुणे विद्यापीठाने डि.लिट. ही सन्मानिय पदवी बहाल केली. महात्मा गांधीनी भाऊरावांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले होते, “भाऊराव का कार्यही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है।” भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटले होते, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक जगतात फार मोठी क्रांती केली आहे.

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

श्रमातून शिक्षण प्राप्त करण्याचा महान मूलमंत्र त्यांनी जनतेला दिला व मानवी समतेचा दिव्य आदर्श जनतेपुढे ठेवला.” यशवंतराव चव्हाण भाऊरावांच्या कार्याविषयी म्हणतात, “कर्मवीर ही व्यक्ती ठराविक नव्हती. ती एक संस्था होती. बहूजन समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले व महाराष्ट्रात नवयुग निर्माण केले.

त्यांची रयत शिक्षण संस्था म्हणजे महाराष्ट्रात नवजीवन ओतणारी गंगा आहे.” अशा या महामानवाचा मृत्यू पुण्याच्या ससून हॉस्पीटलमध्ये ९ मे १९५९ रोजी झाला. १० एप्रिल १९५९ रोजी ‘चार भिंती’ (गांधी टेकडी) सातारा येथे त्यांचा देहावर अग्निसंस्कार करण्यात आला होता. 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment