Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

Lokmanya-TilakLokmanya Tilak

भारतीय असंतोषाचे जनक ही बिरुदावली आपल्या प्रखर राष्ट्रवादी विचारसरणीने, कृतीने सार्थक ठरविणाऱ्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांच जन्म २३ जुलै १८५६ रोजी चिखलगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांचे मुळ नाव केशव होते. पण बाळ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधरपंत होते. गावातर त्यांच्या प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

गणित विषयात त्यांना विशेष गति होती. वडीलांची बदली पुण्याला झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील अँग्लो व्हर्नाक्युलर शाळेत प्रवेश घेतला. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडीलांचेही निधन झाले. त्यानंतर काका गोविंदपंत यांनी त्यांचा सांभाळ केला. इ.स. १८७१ मध्ये कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई सोबत त्यांचा झाला.

इ.स. १८७२ मध्ये मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इ.स. १८७७ मध्ये डेक्कन कॉलेजमधून ते वि.ए. (गणित) झाले. पुढे इ.स. १८७९ मध्ये एल.एल.बी.ला असताना त्यांचा आगरकरांसोबत परिचय झाला. दोघांनीही लोक जागृती आणि राष्ट्रोद्वाराच्या कार्याला स्वतःला वाहून घेण्याचा निश्चय केला. टिळकांनी चिपळुणकर आणि आगरकरांच्या सहाय्याने १ जानेवारी १८८० ला पुणे येथे ‘न्यू इंग्लीश स्कूल’ची स्थापना केली.

आगरकरांच्या मदतीने त्यांनी इ.स. १८८१ ला मराठा व केसरी हे साप्ताहिक सुरू केले. २४ ऑक्टोबर १८८४ ला स्थापन झालेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. २ जानेवारी १८८५ मध्ये या संस्थेच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले होते.पुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याने आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिला.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

टिळक केसरीचे संपादक बनले. त्यांनी मराठा आणि केसरीच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. ते इ.स. १८९० मध्ये तात्वीक मतभेदांमुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून बाहेर पडले. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात सक्रिय भाग घ्यायला सुरुवात केली. इ.स. १८९३ ला सार्वजनिक गणेशोत्सव आणि इ.स. १८९५ ला शिवजयंती उत्सव सुरू केला.

इ.स. १८९५ मध्ये मुंबई प्रांतिक कायदे मंडळाचे सभासद म्हणून त्यांची निवड झाली होती. इ.स. १९०५ मध्ये सुरू झालेल्या स्वदेशी आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला. त्यांनी राजकारणात जहाल मताचा पुरस्कार केला होता. इ.स. १९०७ च्या सुरत अधिवेशनात भवाळ व जहाल गटात संघर्ष होऊन काँग्रेसमध्ये फुट पडली. यामध्ये टिळकांची भूमिका महत्त्वाची होती.

इ.स. १९०८ मध्ये मुजफ्फरपुर बॉम्बहल्ला खटल्यात त्यांना सहा वर्षाची शिक्षा झाली. सुटका झाल्यानंतर त्यांनी जहाल व मवाळ यांच्यामध्ये समेट घडवून आणला. काँग्रेस आणि मुस्लीम लिंग यांच्यामध्ये इ.स. १९१६ ला लखनऊ करार घडुन आणला. इ.स. १९१६ मध्येच ‘होमरुल लीग’ स्थापन करून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच’ अशी सिंह गर्जना करून ते मिळविण्याकरिता स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुःसुत्रीचा पुरस्कार केला.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Gopal Baba Walangkar – गोपाळ बाबा वलंगकर

इ.स. १९१९ च्या मॉटेग्यू सुधारणा कायद्यासंबंधी त्यांनी प्रतियोगी सहकाराचे धोरण स्वीकारले. ‘डेमोक्रॅटिक स्वराज्य पक्षाची स्थापना केली. ‘ओरायन’ (इ.स. १८९३), ‘गीता रहस्य’ (इ.स. १८९५), ‘दि आर्क्टिक होम इन द वेदाज’ (इ.स. १९०३). इत्यादी अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहीले. राजकारणात लोकमान्य टिळकांनी केलेले कार्य नक्कीच प्रेरणादायी होते. त्यांचे सामाजिक सुधारणेसंबंधी असलेले विचार व दृष्टिकोन कसे होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

समाजसुधारणेविषयी दृष्टिकोन : टिळकांच्या काळात आधी सामाजिक सुधारणा की, आधी राजकीय सुधारणा, असा वाद निर्माण झाला होता. आगरकरांनी पहिले मत हिरारीनेमांडले तर टिळकांनी दुसऱ्या मताचा जोरदार पुरस्कार केला. सामाजिक सुधारणेच्या बाबतीत टिळकांचे म्हणणे होते की, इंग्रजी राज हीच आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील खरी घोंडकार आहे. तेव्हा प्रथम आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील खरी घोड दूर करण्यावरच आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.

एकदा ही घोंड दूर केल्यावर आपणास आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणा करता येतील. परंतु जर आपण सामाजिक सुधारणेला अग्रक्रम दिला तर परकीय इंग्रज राज्यकर्त्यांना आपल्या धर्मात व सामाजिक प्रश्नात हस्तक्षेप करण्याची आयतीच संधी मिळेल. कोणा सत्ताधाऱ्याने त्यातही परकीय सत्ताधाऱ्याने कायद्याचा अवलंब करून अगर शिक्षेची भीती दाखवून समाजसुधारणा समाजावर लादणे हे समाजालाही हितावह होणार नाही.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

त्यात यांत्रिकता येईल, समाजाचे स्थैर्यही धोक्यात येईल. समाजसुधारणेच्या प्रश्नावरून जनतेमध्ये मतभेद होतील, पक्षोपक्ष निर्माण होतील, तट पडतील, बेदिली निर्माण होईल व त्यामुळे समाजात एकजुट निर्माण होणार नाही. निर्माण झाल्यास ती टिकणार नाही. तसेच सर्व बाजूंनी आपल्या समाजाची कोंडी झालेली असताना निदान आमच्या रूढी, परंपरा, आमचे आपापसातील संबंध यामध्ये तरी परकीयांचा हस्तक्षेप नको, आमचे आम्ही काय ते पाहून घेऊ, ही भावना टिळकांमध्ये तीव्र होती.

त्यामागे आपले स्वराज्य तर गेलेच पण स्वधर्म, स्वसंस्कृती, स्वत्त्वही घालवून बसू की काय? ही भीती होती. ही भावना एवढी तीव्र होती की, सुधारक ‘देशद्रोह’ करण्यासाठी कमी करणार नाहीत असे टिळक म्हणत असत.

काँग्रेस सामाजिक परिषद : राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर इ.स. १८८७ मध्ये सामाजिक परिषदेची स्थापना झाली होती. काँग्रेसच्या अधिवेशनाच्या कालावधीत काँग्रेसच्या मंडपात सामाजिक परिषद घ्यावी व उपस्थित सभासदांनी समाजसुधारणेचा ऊहापोह करावा असा विचार न्या. रानडेंनी मांडला होता. राजकीय व सामाजिक सुधारणा ही एकाच सुधारणा चळवळीची परस्पर पूरक दोन अंगे आहेत, असे न्या. रानडेंचे प्रामाणिक मत होते.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

समाजात सुधारणा झाल्यास हा प्रगत समाज भारतीय स्वातंत्र्याचा योग्य उपभोग घेऊ शकेल, समानता निर्माण होईल असे त्यांना वाटत होते. मात्र सामाजिक परिषदेच्या कार्यास टिळकांचे मत अनुकूल नव्हते. टिळक सामाजिक परिषदेस उपस्थित राहले तर सुधारकांचा तीव्रविरोध करीत असत. सामाजिक परिषद काँग्रेसच्या मंडपात होऊ नये म्हणून टिळकांनी पुढाकार घेतला होता.

इ.स. १८९० च्या कलकत्ता येथील अधिवेशनात याबाबतचा सनातन्यांचा अर्ज त्यांनीच काँग्रेसच्या अध्यक्षांना सादर केला होता. इ.स. १८९१ च्या नागपूर येथील सामाजिक परिषदेत टिळकांनी प्रश्नोत्तरे करून गोधळ उडविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा परिषदेचे अध्यक्ष दादासाहेब खापडैनी टिळकांना शांत केले होते. इ.स. १९९५ चे काँग्रेसचे अधिवेशन पुण्यात भरविण्याचे ठरले.

याच काळात सनातनी लोकांच्या सभेमध्ये संमती वयाच्या विधेयकाला विरोध केला गेला. यावर टिळकांनी काँग्रेस अधिवेशनाच्या मंडपात सामाजिक परिषद होऊ नये हे मत उचलून धरले. वाद न वाढविता न्या. रानडेंनी माघार घेतली व पुण्याच्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी परंपरावादी गटाच्या आग्रहानुसार सामाजिक परिषदेचे अधिवेशन वेगळ्या जागेत भरविले. तरी टिळकांचा विरोध कायमच होता.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

अस्पृश्यता : १० नोव्हेंबर १९१७ रोजी मुंबईतील महार मंडळींनी टिळक, बेझंट आणि जमनादास द्वारकादास यांच्याकडे अर्ज केला होता. ‘आम्ही हिंदू धर्मात आहोत, आम्हास तुमच्याबरोबर देवदर्शन घडवावे अशी आम्ही अनन्य माये आपणास विनंती करीत आहो. असे त्या अर्जात म्हटले होते. याबाबतीत टिळकांनी काहीच केले नाही. त्यावर ‘हिंदू मिशनरी’ वर्तमानपत्राने लिहिले की, ‘राजकारणामुळे ते लोकमान्य झाले आहेत.

समाजकारण किंवा धर्मकारण हे लोकमान्यता देत नाही. सहभोजन आणि आंतरजातीय विवाह हे प्रश्न स्वराज्याच्या प्रश्नापेक्षा अधिक महत्त्वाचे नाहीत, जो कोणी स्वराज मिळविल त्यांच्या पंगतीस मी जेवेन असे टिळक म्हणत असत. म्हणजे पददलितांनी माणुसपणाला मुकविलेल्या अस्पृश्यांनी भारताचे स्वातंत्र मिळविले तर टिळक त्यांच्या पंगतीस जेवणार होते ?

महर्षी शिंदे यांनी १३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेत टिळकांनी भाषण करताना म्हटले, ‘अस्पृश्य वर्गाचा प्रश्न हा लवकरच निकालात काढला पाहिजे व तो काढण्यासारखा आहे. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ह्या तीन मुख्य वर्णाना जे अधिकार आहेत ते शूद्र वर्णालाही आहेत.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

मात्र शुद्रांनी वैदिक मंत्र म्हणू नयेत. प्रत्यक्ष देव जरी अस्पृश्यता पालू लागला तर मी त्याला देव म्हणून ओळखणार नाही. पूर्वी ब्राह्मण लोकांनी ही रूडी निर्माण केली होती. याच परिषदेत ‘मी आपल्या वैयक्तिक दैनंदिन जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही’ असे जाहीर करणान्या जाहीरनाम्यावर मात्र टिळकांनी सही करण्यास नकार दिला होता.

बालविवाह : बालविवाह पद्धती ही समाजहितास, राष्ट्रहितास घातक आहे. ही सुधारकांची कल्पना टिळकांना मान्य नव्हती. फुलमणीच्या मृत्यूनंतर संमतीवयाचा कायदा करण्यात यावा असा अर्ज सरकारकडे पाठविण्यापूर्वी त्या अर्जावर जनतेच्या सह्या घेण्याचे काम मलवारीनी चालविले होते. त्याला उद्देशून टिळकांनी ‘कायदा मागण्याचा अर्ज’ हा अग्रलेख ३० सप्टेंबर १८९० च्या केसरीत लिहिला.

त्यामध्ये असे लिहिले होते आमच्या समाज रचनेच्या किल्ल्याच्या बळकट भिंती पाडण्याकरिता कायद्याच्या सुरूंगाच्या याही बहूत दारु शेटसाहेबांनी तिकडे (इंग्लंडमध्ये) संपादन केली आहे. मलबारींनी हिंदू समाजात सुधारणा करण्याऐवजी पारशी समाजाकडे लक्ष पुरवावे असा सल्ला टिळकांनी दिला होता. संमतीवयाच्या विधेयकाचा हेतू असा होता की, जर एखाद्याची पत्नी बारा वर्षांची झाली नसेल तर त्याने तिच्याशी संभोग करू नये.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

ती वयोमर्यादा दहा वर्षाची असावी असे म्हणणे ही भयंकर गोष्ट होती. २६ जानेवारी १८९२ च्या ‘अबलोन्नती लेखमाला’ या अग्रलेखात ते म्हणतात, जेथे जेथे एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राची पायमल्ली केली आहे तेथे तेथे त्यास बालविवाह कारण झाला होता असे इतिहासावरून दिसून येत नाही.

मग असा विलक्षण कायदा हिंदुस्थानातच का लागू करावा हे आम्हास समजत नाही. असेच इ.स. १८१५ मध्ये नामदार शास्त्री यांनी लग्नाचे वय वाढवावे अशा उद्देशाने आणलेल्या विधेयकासही टिळकांनी विरोध केला होता. परंतु बालविवाहसंबंधी विधेयकास विरोध करत असतानाच आपल्या तीनही मुलींचा विवाह मात्र वयाच्या चौदाव्या वर्षी केला.

विधवा स्त्री : झाँशीची राणी लक्ष्मीबाईविषयी टिळकांनी आपल्या एका लेखात लिहिले होते, “लक्ष्मीबाईसारखी मानी स्त्री आपले नैसर्गिक भीरूत्व क्षणभर विसरून जाऊन बंडखोरास मिळाली यात नवल ते कोणते? लक्ष्मीबाईसारखी अनाथ विधवा दत्तकाच्या हक्काबद्दल दोन वर्षे इंग्रजांशी भांडली होती याचे कौतुक टिळक करतात.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

विधवा असूनही राणीचे चौकटीच्या बाहेरचे वागणे टिळकांना गौरवास्पद वाटते कारण ती राजकीय हक्कासाठी भांडली. टिळकांनी लक्ष्मीबाईचे कौतुक केले यात गैर काहीच नव्हते. ती अतिशय चांगली गोष्ट होती. परंतु सर्वसामान्य विधवांना त्याचे हक्क मिळावेत, त्यांना माणूस म्हणून अभिमानाने सन्मानाने जगता यावे याकरिता जेव्हा सुधारक हट्ट घरीत होते तेव्हा मात्र टिळक विरोध करीत असत.

केसरीमध्ये ४ मार्च १८९० मध्ये टिळक केशवपण बंदीसंबंधी लिहितात. “या केशवपणबंदीने गताधार स्त्रियांची गृहस्थिती सुधारणे कठीण आहे. म्हणजे चपण केल्यावर विधवेस जी शुद्धी येते म्हणून मानले जाते. ती शुद्धी नाहीशी होऊन सकेशा राहिल्यास त्यांचे हाल कुत्राही खाणार नाही.

करिता सकेशा स्त्रीचा पुनर्विवाह होणे शक्य नाही तेथे त्यांच्या पुढील आयुष्यक्रमाची काही तरी सोय करण्यावाचून निव्वळ जबरदस्तीने प्राप्त झालेल्या विधवापणाच्या बंदीपासून काही एक फायदा न होता उलटे स्त्रियास सतीची चाल फार चांगली होती असे माणण्यास कारण होईल.’

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

बालविवाहाच्या पद्धतीमुळे समाजात मोठ्या प्रमाणात असणारी विधवांची संख्या कायदा होऊनही पुनर्विवाहाला असणाऱ्या कडव्या विरोधामुळे आणि विधवांना जपाव्या लागणाऱ्या परंपरागत कल्पनांमुळे त्या विधवांना जगावे लागणारे हिन-दिन आयुष्य; असे हे दुष्ट वर्तुळ कुठेतरी मोडायला हवे. कोणीतरी ते धारिष्ठ करायला हवे. केशवपणबंदी हा त्यातीलच एक छोटासा प्रयत्न असला तरी आवश्यक आहे, असे न मानता टिळकांनी याचा विरोध केला होता.

बहुपत्नीत्व व जठर विवाह : टिळक म्हणतात, ‘साधारण स्नेहालाही शील, व्यवसायदिकांचे पुष्कळ सामर्थ्य लागते. मग जेथे विचार आचार, अनुभव, मनोविकार इत्यादी कोणत्याही बाबतीत ऐक्य नाही अशा बाल-वृद्ध दांपत्तीमध्ये वैवाहिक संबंधासारख्या संबंधाने अत्यंत प्रेम उत्पन्न होण्याची आशा करणे वेडेपणा नाही तर काय? आणि खरे प्रेम नसेल तर त्या करदिपिका स्थानी झालेल्या भार्येपासून त्याला तिला व कुटूंबातील इतर मनुष्यांना कधीही सुख व्हावयाचे नाही हे अनुभवनिय आहे.

“व्यक्तीपेक्षाही समाजाचे त्यापासून फारच अहित होत आहे व म्हणून तद्विषयक निर्बंध केल्याने व्यक्तिविशेषाला जरी कितीही अडचणी सोसाव्या लागल्या तरीसार्वजनिक हिताकरिता तसला निर्बंध करणे अत्यंत आवश्यक आहे. हा आमचा मुख्य मुद्दा आहे.” विधुरांनी पुन्हा पुन्हा केलेले विवाह व बाल-जठर विवाहामुळे स्त्रियांवर अन्याय होतो ही गोष्ट मान्य असूनही स्त्रियांबद्दल कळकळ वाटते. म्हणून नव्हे, तर ‘सार्वजनिक हिताकरिता’ म्हणूनच अशा विजोड विवाहांवर निर्बंध असावा असे टिळक म्हणताना दिसतात.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

शिक्षण : टिळकांनी केसरी मधून राष्ट्रीय शिक्षणाबद्दल आपले विचार स्पष्ट केले ते म्हणतात, “सरकारी शाळेतून हल्ली जे शिक्षण मिळते ते कारकूनी पेशाचे मिळत असते. …..नवीन पिढीस बायकी बनविण्याचा उपक्रम सरकारने पत्करला आहे. ज्यांना या गोष्टींचा विट आला आहे त्यांनी नवीन खासगी शाळा काढण्याची खटपट चालु ठेवली पाहिजे.

या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी गो. ग. आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासह त्यांनी प्रथम न्यु इंग्लीश स्कूल व नंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीमार्फत फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. काही वर्ष या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही त्यांनी सेवा दिली.

स्त्री शिक्षणाबाबतीत टिळकांची भूमिका पुढीलप्रमाणे होती. …..स्त्री व पुरुष ह्यांची कर्तव्य या जगात भिन्न-भिन्न आहेत व त्यामुळे कधीही एकाचे शिक्षण दुसऱ्याशी जुळणार नाही.” “संसारातील कर्तव्ये नीटपणे करता यावीत यासाठी स्त्रियास शिक्षण द्यावे. टिळक फिनले हायस्कूलमधील शिक्षणक्रमाच्या दुसऱ्या लेखात म्हणतात, “कित्येक लोकांचे असे मत आहे की, ज्याप्रमाणे इंग्रजी विद्येच्या संस्काराने आपण आपल्या जुन्या रीतिभातीवर पाणी सोडण्यास तयार झालो आहोत, त्याप्रमाणेच जर स्त्रियांस शिक्षण दिले तर मग साहेब आणि मॅडम दोघेही बुट-स्कॉकिंग चढवून बर्डगार्डनची हवा खाण्यास जाण्यास तयार होतील.”

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

भीती होती ती स्त्रिया उच्च शिक्षण घेऊ लागल्यावर युरोपियन स्त्रियांप्रमाणे पुरुषांशी बरोबरीच्या नात्याने वागू लागतील, आपली परंपरागत कर्तव्ये, जबाबदारी विसरतील. मुलींना सक्तीचे प्राथमिक शिक्षण द्यावे असा पुणे नगरपालिकेत इ.स. १९२० साली फेब्रुवारी महिन्यामध्ये ठराव आला असता त्या ठरावाला टिळकांनी एका सार्वजनिक सभेत विरोध केला.

पुरेसा पैसा नसल्यामुळे तूर्त मुलांनाच केवळ मोफत शिक्षण देता येईल असेटिळक आणि त्यांच्या अनुयायांचे म्हणणे होते. परंतु खर्चाची सबब पुढे करून स्त्रियांना शिक्षण नाकारने योग्य नव्हते. टिळकांनी आपल्या मुलींना मात्र बी.ए. पर्यंतचे शिक्षण दिले होते.

धर्मातरासंबंधी विचार : टिळकांनी शिवजयंती करून शिवाजी हेच सर्व भारताचे राष्ट्रपुरुष मानले जावे अशी मागणी केली. परंतु त्यांनी शिवाजी महाराजांनी अंगीकारलेल्या समानतेच्या, उदारतेच्या तत्वांचा पूर्णपणे अंगीकार केला नाही. शिवाजी महाराजांनी मुसलमान झालेले बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर ह्यांना जसे शुद्ध करून हिंदू धर्मात घेतले तसे करण्यास टिळक प्रत्यक्षपणे घजले नाहीत.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

दामले नावाचा ब्राह्मण मुलगा ख्रिश्चन झाला होता. त्याला हिंदू मिशनरी गजाननराव वैद्य ह्यांनी शुद्ध करून पुन्हा हिंदू करून घेतले. दामले यास आपल्या पंगतीस घेऊन पावन करावे व इतरास उदाहरण घालवून द्यावे. असा टिळकांकडे वैद्यांनी आग्रह धरला. परंतु त्याला आपल्या पंगतीस बसविण्याचे टिळकांना धैर्य झाले नाही.

कुलकर्णी वतन : छत्रपती शाहू महाराजांनी इ.स. १९१८ मध्ये कुलकर्णी वतन खालसा कमी केले होते. तत्पूर्वी ब्रिटिशांनी आपल्या प्रदेशात कुलकर्णी वतने रद्द करून पगारी तलाठ्यांची नेमणूक करण्याची तरतूद पूर्वीच केलेली होती. शाहू महाराजांनीहीतोच मार्ग अनुसरला, मात्र ब्रिटिशांनी वतने खालसा केली तरी तलाठी नेमणूका ह्या वतनदार कुलकर्ण्यांनाच देण्याचे धोरण राबविले होते.

परंतु शाहू महाराजांनी तलाठी म्हणून भरती करण्याच्या हेतूने ब्राह्मणेत्तरांना प्रशिक्षण दिले. या धोरणामुळे कोल्हापूरातील ब्राह्मणांनी शाहू महाराजांचा निषेध केलाच पण मुंबईतील अनेक वृत्तपत्रांनी शाहू महाराजांवर टीका केली. यावेळी केसरीने ‘राष्ट्रविरोधी’ अशी संभावनः करून शाहू महाराजांवर नव्या दमाने हल्ले करायला आरंभ केला होता.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

शेतकरी व कामगार वर्ग : इ.स. १८७६ मध्ये दुष्काळ पडल्यानंतर सरकारने फॅमिन रिलीफ कोड बनवून त्यानुसार ष्काळ निवारण फंड उभारुन दुष्काळी परिस्थितीत लोकांना मदत कशी करावी. सारासुट किती द्यावी इ. बाबत नियम केले होते. इ.स. १८९६ मध्ये महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ पडला तेव्हा टिळकांनी शेतकऱ्यांना फॅमिन रिलीफ फंडाची माहिती देऊन हक्काविषयी जनजागृती केली तसेच शेतकऱ्यांच्या उन्नतीसंबंधात लेखही लिहिले.

परंतु त्यांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून जेव्हा जेव्हा ब्रिटिश सरकार प्रयत्न करी तेव्हा तेव्हा टिळक हे श्रीमंताची नि जमीनदारांची बाजू घेऊन सरकारशी भांडत असत. टिळक जेव्हा शेतकऱ्यांची बाजु घेत तेव्हा त्याच्या लिखाणाचा व भाषणाचा आशय असा असे की, शेतकऱ्यांच्या कर्जबाजारी अवस्थेला केवळ सरकारच जबाबदार आहे.

सावकार वा जमीनदार हे त्याच्या विपन्नावस्थेला किती जबाबदार आहेत, हे ते कधीच स्पष्टपणे सांगत नसत. मुंबई सरकारने इ.स. १९०१ मध्ये सावकार किंवा जमीनदार यांच्यापासून शेतकऱ्यांच्या जमिनीचे रक्षण व्हावे म्हणून एक विधेयक विधिमंडळात ठेवले. त्याविरुद्ध सावकारांनी मोर्चा काढला. टिळकांनी त्या विधेयका विरुद्ध लेख लिहिले. गोखले, मेहता हे नेते सभात्याग करून विधिमंडळा बाहेर पडले. तेव्हा टिळकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि सरकारची थट्टा केली.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

तत्पूर्वी इ.स. १८९७ मध्ये केसरीत लेख लिहून खोतांच्या हक्काची तरफदारी करताना ते म्हणतात. पुण्यात भिकार पुष्कळ आहेत म्हणून येथील सावकारांच्या घरातील पैसा त्यांस वाटण्याचा ज्याप्रमाणे सरकारास हक्क नाही. त्याप्रमाणे खोती गावातील कुळांची स्थिती चांगली नसल्यासखोतास बुचाडून त्याच्या वसूलीची खैरात करण्याचा सरकारस अधिकार नाही.

हा प्रश्न हक्काचा आहे, भूतदयेचा नाही” सावकार, खोत, जमीनदार हे सर्व जुने सरंजामदार वर्ग होते. राष्ट्राच्या भावी उत्कर्षात त्यांचा कोणताही विशेष कार्यभाग नव्हता, उलट श्रमिकांच्या घामातून निर्माण झालेल्या संपत्तीचा मोठा हिस्सा शोषुन घेत असल्या कारणाने लोकांच्या दारिद्र्यात ते भर घालीत होते.

‘स्वराज्या’ संबंधी विचार : “शरीरात जसे चैतन्य तसे राष्ट्रास स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्य असल्यावाचून राष्ट्राची उन्नती कधीही व्हावयाची नाही. पारतंत्र्य म्हणजे विष, स्वातंत्र्य म्हणजे दूध, राजकीय गुलामगिरी म्हणजे नरक, राजकीय स्वातंत्र्य म्हणजे स्वर्ग, स्वातंत्र्यदेवीच्या अधिष्ठानाकरिता श्रीरामाप्रमाणे वनवास किंवा अज्ञातवास सोसल्याशिवाय स्वराज्याची प्राप्ती होऊ शकत नाही” असे टिळक सांगत असत.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

टिळकांना राजकीय गुलामगिरी नरक वाटली. सर्वच प्रकारच्या गुलामगिरीत खितपत पडलेले बहुजन लोक स्वर्ग सुख उपभोगत होते काय? राजकीय स्वातंत्र्य म्हणजे स्वर्ग मग हा स्वर्ग कोणाकरिता ? पारतंत्र्य म्हणजे विष, स्वातंत्र्य म्हणजे दूध असे म्हणणाऱ्या टिळकांनी सर्वप्रकारच्या पारतंत्र्याचे विष हजारो वर्षापासून पित असलेल्या आपल्या देशबांधवांना सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचे दूध द्यावेसे का वाटले नाही?

स्वातंत्र्यदेविच्या अधिष्ठानाकरिता श्रीरामाप्रमाणे वनवास किंवा अज्ञातवास सोसल्याशिवाय स्वातंत्र्याची प्राप्ती होऊ शकत नाही असे म्हणणाऱ्या टिळकांनी, श्रीरामाने शबरीचे उष्टे बोरेही खाल्ली होती. हा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अस्पृश्यांसोबत सहभोजन का केले नाही? स्वातंत्र्य असल्याशिवाय राष्ट्राची पूर्ण उन्नती व्हावयाची नाही असे ते म्हणतात. परंतु प्रत्येक व्यक्तीच्या उन्नतीवर राष्ट्राची उन्नती अवलंबून असते. मग सर्वांगीण स्वातंत्र्याशिवाय राष्ट्र उन्नती कशी करेल?

शाहू महाराजांनी मागासलेल्या वर्गाकरिता ५०% जागा राखीव ठेवल्या होत्या. संस्थानात समाजवार प्रतिनिधीकडे लक्ष पुरविले. स्वराज्यात अस्पृश्यतेच समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. महार, मांग वगैरे पददलीत वर्गातील साधारण शिक्षित उमेदवारांना वकिलीच्या सनदा दिल्या. या साऱ्या गोष्टी बहुजन समजाला स्वराज्योन्मुख करण्याकरिता व लोकशाहीचे शिक्षण देण्या करिताच होत्या.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

असे असतानाही शाहू महाराजावर टिळकांनी ‘स्वराज्यद्रोही’म्हणून टीका केली. मग अस्पृश्यतेचे संरक्षण करणारे, अर्थात जातिभेद राखू इच्छिणारे सक्तीच्या शिक्षणास विरोध करणारे, कायदेमंडळात जाऊन मराठ्यांनी काय नांगर हाकावयाचे आहेत?, वाण्यांनी काय तागडी धरावयाची आहे? अशी लढाई करणारे सर्वसमावेशक स्वराज्याचे पुरस्कर्ते कसे ठरतील?

समाजसुधारकांसंबंधी मत : सामाजिक सुधार चळवळीला विरोध करताना समाजसुधारकांवरही टिळकांनी वेळोवेळी टीका केली. न्या. रानडे यांनी विधवेसोबत पुनर्विवाह केला नाही म्हणून, वामन मोडक यांनी आपल्या मुलांची लग्न प्रार्थना समाज पद्धतीने केली. हुंडा दिला म्हणून तर तेलंगानी आपल्या अल्पवयीन मुलीची लग्ने केली म्हणून त्यांच्यावर टीका केली, त्यांना दोष दिले बोलके सुधारक म्हणून त्यांची हेटाळणी केली.

टिळकांनी त्यांच्यावर केलेली टीका गैर आहे किंवा त्यांनी ती करायला पाहिजे नव्हती असे कोणी म्हणू शकणार नाही. त्यांची टीका योग्यच होती. परंतु आगरकर निव्वळ तर्कशुद्ध-बुद्धिनिष्ठ भूमिका घेतात म्हणून त्यांना ‘माळावरचा महारोगी’ टिळक म्हणत. पंडिता रमाबाई ह्या ज्ञान, त्याग सहनशीलता कार्यप्रवणता, प्रेम, दया यांचा आदर्श होत्या त्यांनाही दोष देण्यास टिळकांनी मागे-पुढे पाहिले नाही.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

टिळक आपले मत मांडताना सर्वसामान्याच्या बुद्धीला पटेल, आवडेल अशीच उदाहरणे देतात. जसे “शिवाजी महादजी शिंदे, थोरला बाजीराव हे काय पंचविसाव्या वर्षी लग्न केलेल्या मुलीच्या पोटी आले होते?” पण ऋग्वेद काळात बालविवाह नव्हता, जातीपद्धती नव्हती, अस्पृश्यता नव्हती, सर्वांनाच सर्व व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य होते, आजच्यासारखे अवडंबर नव्हते, ह्यएत्संगच्या लिखानात बालविवाहाचा उल्लेख नाही किंवा कालिदासाच्या नाटकातून तरुण स्त्रियांच्या प्रेमविवाहाचे उदाहरण मिळतात.

अशी उदाहरणे टिळक मान्य करीत नाहीत. इतिहासातील आपल्या मताला पुष्टी देणारी उदाहरणेच फक्त टिळक देतात. अर्थात सुधारकांनीही ही गोष्ट केलेली आढळते. टिळक आपल्याला सोयीस्कर नसलेले संदर्भ मान्य करीत नाहीत. तर सुधारक त्यांना सोयीस्कर नसलेले संदर्भ मान्य करतात पण ते योग्य नाहीत म्हणून त्याचा वेगळा अन्वयार्थ लावतात किंवा त्यामध्ये सुधारणा सुचवितात.

सुधारकांचा विरोध करताना ७ एप्रिल १८९१ च्या केसरीच्या लेखातटिळक म्हणतात, “….हे सरकारचे बंदे दास आम्हास केव्हा फसवितील याचा नेम नाही व जोपर्यंत आम्हास त्यांचा विश्वास नाही, तोपर्यंत अर्थातच आम्हास त्यांचा संबंध अवश्य तोडला पाहिजे, इतकेच नव्हे तर हिंदू धर्माची संख्या जे जे करून दृढ होईल व इत-उप्पर कोणीही सुधारक त्यात हात घालू शकणार नाही असे उपाय आपणास योजिले पाहिजे.”

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

टिळकांनी अशा तऱ्हेचे लिखाण करून लोकांना सुमाजसुधारकांच्या विरुद्ध उभे केले. एवढेच नव्हे तर आगरकरां सारख्या सुधारकांची जिवंतपणी प्रेत यात्रा टिळकांच्या पाठींब्याने काढली गेली. शाहू महाराजांचा ही त्यांनी वेळोवेळी विरोध केला. इ.स. १९२० ला महाराजांचे विश्वासू सहकारी तोफखाने टिळकांना भेटावयास सिंहगडावर गेले असता त्यांच्या करवी त्यांनी महाराजांकडे आपली सूचना पोहोचवली होती.

ती अशी “शाहूंनी युरोपियनांना खुश करण्याचे धोरण बदलले नाही आणि ब्राह्मणेत्तरांना स्वतःचे हक्क आणि दर्जा वाढावा असे प्रोत्साहन देऊन ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर ह्यांच्यामध्ये शत्रूत्वाची भावना निर्माण करण्याचे धोरण बदलले नाही तर त्यांनी लक्षात ठेवावे की, जॅक्सन आणि रॅड ह्यांचे भवितव्य त्यांच्या वाट्यास येईल.

अशा पद्धतीने टिळकांनी बहुसंख्येने असलेल्या परंपरागत लोकांच्या भावना जपत राजकीय चळवळ व पर्यायाने त्या चळवळीतील स्वतःचे नेतृत्व निर्विवादपणे उभे करण्यासाठी समाजसुधारणा व समाजसुधारक यांना वेळोवेळी प्रखरपणे विरोध केला.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

मूल्यमापन : स्वराज्य प्राप्तीकरिता समाजसुधारणा अडथळा ठरते हे स्पष्ट करताना ते म्हणतात की, “इंग्रज राज्य हिच आपल्या प्रगतीच्या मार्गातील खरी धोंडकार आहे” पण विचार करता भारतातील बहुसंख्य लोकांची प्रगती न होण्यास येथील जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रियांचे गौण स्थान, अज्ञान ह्या गोष्टी अधिक कारणीभूत ठरल्या होत्या. उलट ब्रिटिश काळात या बहुसंख्य लोकांच्या प्रगतीची दारे खुली झाली.

स्वराज्य प्राप्त केल्यावर आपल्याला आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणा करता येतील’ असेही टिळक म्हणत असत. पण सर्वांना समानतेने सोबत येऊन स्वराज्यासाठी संघर्ष दिला तर स्वराज्य लवकर प्राप्त होऊ शकते हा इतिहास आहे. ‘कायदे मंडळात जाऊन मराठ्यांनी काय नांगर हाकावयाचे आहेत, वाण्यांनी काय तागडी धरावयाची’ आहे असे म्हणून बहूजनांना ब्रिटिश काळातच राजकीय अधिकार नाकारणान्य टिळकांनी त्यांच्या कल्पनेतील स्वराज्यात बहुजनांना किती सुधारणा दिल्या असल्या?

‘सामाजिक सुधारणेमुळे ब्रिटिशांनी आपल्या धार्मिक व सामाजिक प्रश्नात हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल त्यामुळे स्वराज्य प्राप्त होण्यास अडथळा येईल’ असे म्हणून टिळकांनी जेव्हा जेव्हा इंग्रजांनी बहुजनांच्या हिताचे कायदे केले त्याचा विरोध केला. परंतु जेव्हा सनातन्यांच्या हिताचा प्रश्न उद्भवला तेव्हा मात्र त्यांनी ब्रिटिशांचा हस्तक्षेप मान्य केला.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

जसे वेदोक्त प्रकरणात ब्रिटिशांनी लक्ष घालावे अशी मागणी केली. रखमाबाई खटल्यात रखमाबाईला इंग्रजांनी शिक्षा सुनावल्यानंतर त्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी ब्रिटिशांचा सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील हस्तक्षेप स्वराज्य प्राप्तीतील अडथळा का ठरला नाही? ब्रिटिशांच्या कायद्यामुळेच इ.स. १८९५ मध्ये मुंबई प्रांतीय कायदेमंडळाचे समासद म्हणून टिळकांची निवड झाली होती. यावेळीही हे सभासदत्व त्यांनी स्वीकारले होते.

‘सामाजिक सुधारणांमुळे भेदाभेद निर्माण होऊन समाज एकजूट राहणार नाही. “जातिभेद व्यवस्था स्वराज्य घालावयाला कारणीभूत झाली नाही असे टिळक म्हणतात, इतिहास पाहता ज्या परकीय सत्ता या ठिकाणी आल्या त्यांनी येथील जातिभेदाचा फायदा घेत आपल्या सत्ता येथे टिकविल्या ते ब्रिटिश सत्तेतही घडले कारण येथील समाजाने ज्यांना कधी माणूस म्हणून जवळ केले नाही त्यांना या परकीय सत्ताधिशांनी माणूस म्हणून वागविले.

त्यांना स्वत्त्वाची जाणीव करून दिली. त्यामुळे त्यांचे राज्य येथे टिकू शकले. उलट जपानमधील उच्च समजल्या जाणाऱ्या सामुराई लोकांनी आपले विशेष अधिकार स्वत:हून सोडून देऊन तेथे समानता निर्माण केली. त्यामुळे त्यांची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली. ‘स्वहितापेक्षा राष्ट्रहिताकडे लक्ष देणे गरजेचे’ हे टिळकांचे म्हणणे योग्य आहे.

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

परंतु राजकीय स्वातंत्र्य असणे म्हणजेच राष्ट्रहित होऊ शकते काय ? सर्वागीण स्वातंत्र्य येथील जनतेला प्राप्त करून देणे आणि त्यांची उन्नती साधणे हे राष्ट्रहित नाही का? व्यक्तीच्या उन्नतीवर राष्ट्राची उन्नती अवलंबून असते. महात्मा फुले, शाहू महाराज, न्या. रानडे, आगरकर इत्यादींनी केलेले कार्य राष्ट्रहिताकरिता नसून स्वहिताकरिता होते असे कसे म्हणता येईल? सुधारकांनी समाजजागृतीया प्रयत्न केला तेव्हा सुधारकांसोबत असलेले संबंधजनतेने तोडून टाकावे, असा उपदेश टिळकांनी केल्यामुळे वाळीत टाकण्याच्या प्रकाराला प्रेरणा मिळाली.

महर्षी शिंदेनी टिळकांबद्दल असे म्हटले आहे की, “सामाजिक बाबतीत टिळकांचे धोरण समतेच्या व स्वयंनिर्णयाच्या तत्त्वास विघातक असल्या कारणाने ते माझ्या मते खरे राष्ट्रीय पुढारी नाहीत.” नलिनी पंडित लिहतात, “टिळकांना व्यापक भूमिका घेता आली नाही म्हणून त्यांच्या देशभक्तीबद्दल व स्वार्थत्यागाबद्दल लोकांच्या मनात जरी नितांत आदर होता तरी सर्वसामान्य जनतेचा पाठींबा मिळवून देशव्यापी चळवळ उभारण्यास लागणारे सामर्थ्य त्यांच्या पक्षास कधीच प्राप्त झाले नाही.

” ‘लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू एक मूल्यमापन’ या पुस्तकात धनंजय किर म्हणतात, “दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चर्चिल साहेब म्हणत, “आम्ही लोकशाही आणि मानवी स्वातंत्र्य ह्यासाठी लढत आहोत.” पण चर्चिल साहेब तेच हक्क हिंदुस्थानला द्यायला तयार नव्हते. तीच शोचनीय स्थिती टिळकांची झाली. ते ब्रिटिशांशी स्वराज्यासाठी झगडले. परंतु वरिष्ठ समाजाच्या टाचेखाली चेंगरले गेलेले कनिष्ठ समाज, अस्पृश्य समाज, स्त्री यांच्यापर्यंत स्वराज्याचे हक्क कसे पोचतील याचा त्यांनी विचार केला नव्हता. असे मोठ्या दुःखाने म्हणावे लागते.”

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळ

Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक

मृत्यू : सामाजिक सुधारणेबाबत टिळकांचे धोरण प्रतिगामी असले तरी टिळकांचे वैयक्तिक जीवन मात्र अतिशय आदर्श होते. त्यांची राहणी अतिशय साधी असे आपली वृत्तपत्रांची कचेरी किंवा ‘केसरीचे मुद्रणालय दाखवून ‘मीच तो टिळक ‘ असे त्यांनी सांगतास भेटीस गेलेला मनुष्य चकीत होत असे. त्यांचे कुटुंबावरही खूप प्रेम होते.

टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी आपल्या पत्नीच्या प्रकृतीची अतिशय चिंता वाटे.’ सौभाग्यवती व मुले यांना म्हणावे की, मला माझी काळजी वाटत नाही. त्यांचीच अधिक वाटते. मी लवकर भेटेल दुःखात आशा हिच जगण्याची आशा. मुली कोण कुठे आहेत? मुलांची प्रकृती कशी आहे? अभ्यास कसे आहेत? व्यायाम घेतात की नाही’ अशी पत्रातून ते चौकशी करीत. त्यांनी कधी मादक पेयांना स्पर्श केला नाही. ते शक्तीसंपन्न धवलक्रांतीचे सद्गृहस्थ होते. त्यांचा मृत्यू १ ऑगस्ट १९२० ला मुंबई येथे झाला. 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment