Maharashtratil Jilhe
1. अहमदनगर
- अहमदनगर हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
- क्षेत्रफळ १७,४९३ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : प्रशासकीयदृष्ट्या अहमदनगर जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागात आहे.
- अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेस : बीड जिल्हा.
- आग्नेय-पूर्वेस: उस्मानाबाद,
- आग्नेय-दक्षिणेस : सोलापूर
- दक्षिण, पश्चिम व नैऋत्येस : पुणे,
- पश्चिमेस : ठाणे,
- उत्तरेस: नाशिक व औरंगाबाद जिल्हे,
- तालुके १४
- १) अहमदनगर २) अकोले ३) कर्जत ४) कोपरगाव ५) जामखेड ६) पाथर्डी ७) पारनेर ८) राहूरी ९) शेवगाव १०) संगमनेर ११) श्रीरामपूर १२) श्रीगोंदे १३) राहता १४) नेवासे.
- नद्या : गोदावरी ही प्रमुख नदी तसेच प्रवरा ही गोदावरीची उपनदी. याशिवाय, भीमा, घोड, सीना, कुकडी या नद्या
- धरणे : प्रवरा नदीवर भंडारदरा (ता. अकोले) येथे मोठे धरण. ‘विल्सन बंधारा’ (आर्थर लेक) या नावे प्रसिद्ध.
- धरण परिसरात प्रवरा नदीवर रांधा धबधबा व त्यापुढे Umbrella Falls हे धबधबे आहेत.
- प्रमुख पिके : गहू, ज्वारी, बाजरी, भुईमूग, ऊस.
- ऊसाखालील क्षेत्र व उत्पादनात अहमदनगरचा राज्यात दुसरा क्रमांक
- फळपिके : मोसंबी, डाळींब, द्राक्षे.
- श्रीरामपूरची मोसंबी जगप्रसिद्ध आहेत.
- औद्योगिक : साखर उत्पादनात अहमदनगरचा राज्यात प्रथम क्रमांक.
- कै. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरा-लोणी येथे १९४९ साली देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला.
- सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यात आहेत.
- याशिवाय इलेक्ट्रॉनिक उद्योग व वाहन उद्योगही अस्तित्वात आहेत.
- शैक्षणिक : राहुरी येथे म. फुले कृषी विद्यापीठ (स्थापना २९ मार्च १९६८).
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- नेवासे : प्रवरा नदीकाठी ज्ञानेश्वरांनी येथेच ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली.
- अहमदनगर : चांदबिबीचा महाल, ऐतिहासिक भुईकोट किल्ला, संरक्षण मंत्रालयाचा ‘वाहन संशोधन व विकास विभाग भिंगार छावणी, कारागृह.
- पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘भारताचा शोध’ (डिस्कव्हरी ऑफ इंडिया) हा ग्रंथ अहमदनगर तुरुंगात लिहिला.
- राहूरी येथे म. फुले कृषी विद्यापीठ.
- अकोले येथे अगस्तींचा आश्रम.
- शनि शिंगणापूर : नेवासे तालुक्यात. प्रसिद्ध शनि मंदिर. शनि चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदीवरून वादग्रस्त
- हरेगाव (ता. श्रीरामपूर) येथील ‘सेंट तेरेसा चर्च’ महाराष्ट्राचे ‘जेरुसलेम’ म्हणून प्रसिद्ध.
- राळेगणसिद्धी : पारनेर तालुक्यात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची कर्मभूमी.
- हिवरे बाजार : नगर तालुक्यात. सरपंच पोपटराव पवार यांनी या गावाला आदर्श गाव बनविले.
- चोंडी (ता. जामखेड) : ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी.
- प्रवरा नदीवर रांधा धबधबा (१७० फूट) • विल्सन बंधारानजिक ‘Umbrella Falls’
- शिर्डी : राहता तालुक्यात. साईबाबांचे प्रसिद्ध मंदिर.
- पुणतांबे (ता. कोपरगाव) : येथे संत चांगदेवांची समाधी.
- पारनेर ही सेनापती बापटांची जन्मभूमी.
- भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण (अकोले तालुक्यात).
- सिद्धटेक: अष्टविनायकांपैकी ‘श्री सिद्धीविनायक’ हा गणपती. कर्जत तालुक्यात.
- कळसुबाई (उंची १६४६ मी.) हे सह्याद्री पर्वतातील राज्यातील सर्वोच्च शिखर.
- देऊळगाव-रेहेकुरी येथील काळवीट अभयारण्य (कर्जत तालुक्यात).
- अहमदनगर व सोलापूरच्या सीमेवर नान्नज येथे माळढोक पक्षी अभयारण्य ही जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
2. अकोला
- क्षेत्रफळ ५४३० चौ. कि.मी.
- मुख्यालय : अकोला
- स्थान : अमरावती या प्रशासकीय विभागात.
- राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ (धुळे-कोलकाता) या जिल्ह्यातून जातो.
- विस्तार : अकोला जिल्ह्याच्या पूर्वेस व उत्तरेस : अमरावती जिल्हा,
- पश्चिमेस : बुलढाणा जिल्हा,
- दक्षिणेस : वाशिम जिल्हा .
- मोर्णा नदीच्या तीरावर अकोला शहर वसले आहे.
- तालुके : अकोला जिल्ह्यात एकूण ७ तालुके आहेत.
- १) अकोला २) बाळापूर ३) मूर्तिजापूर ४) पातूर ५) अकोट ६) बार्शी-टाकळी ७) तेल्हारा
- प्रमुख नद्या : पूर्णा ही मुख्य नदी व तिच्या उपनद्या. धरणे ‘वान-प्रकल्प’ (ता. तेल्हारा) प्रमुख धरण.
- प्रमुख पिके : खरीप ज्वारी, कापूस, तूर, मूग, गहू, हरभरा.
- खरीप ज्वारीच्या उत्पादनात अकोला राज्यात आघाडीवर.
- फळे : मूर्तिजापूर, अकोट परिसरात संत्र्याचे उत्पादन घेतले जाते.
- ऊर्जानिर्मिती : पारस (ता. बाळापूर) येथे राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र.
- औद्योगिक : कापसाच्या अधिक उत्पादनामुळे अकोला जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग उद्योग तसेच हातमाग, खादी वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.
- बाळापूर, अकोट येथे सतरंज्या निर्मितीचा व्यवसाय केंद्रीत झाला आहे.
- शैक्षणिक : अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (स्थापना: २० ऑक्टोबर १९६९)
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ठिकाण.
- असदगड किल्ला व तेथील आझाद पार्क बगिचा (सध्या भग्नावस्थेत)
- नर्नाळा : २७ दरवाजांचा ऐतिहासिक किल्ला, अभयारण्य.
- बाळापूर : बाळापूर देवीचे मंदिर, किल्ला, राजा मिर्झा जयसिंगाची छत्री, मन-म्हैस नद्यांचा संगम.
- मूर्तिजापूर : मुंबई-कोलकाता रेल्वे मार्गावरील जंक्शन. संत गाडगेबाबांचा आश्रम, सांगवी येथे पूर्णा-उमा संगम.
- महत्वाचे : १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशिम हा नवा जिल्हा तयार झाला.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
3. अमरावती
- सहा प्रशासकीय विभागांपैकी अमरावती हा एक प्रशासकीय विभाग असून यामध्ये विदर्भातील ५ जिल्ह्यांचा समावेश होतो.
- जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय : अमरावती.
- क्षेत्रफळ : १२,२१० चौ. किमी.
- विस्तार : जिल्ह्याच्या पूर्वेस : नागपूर व वर्धा जिल्हे.
- पश्चिमेस व नैऋत्येस : अकोला,
- दक्षिणेस : यवतमाळ.
- तालुके : १४
- १) अमरावती २) अचलपूर ३) अंजनगाव सुर्जी ४) चांदूर-बाजार ५) चांदूर-रेल्वे ६) चिखलदरा ७) तिवसा ६) दर्यापूर ९) धारणी १०) धामणगाव-रेल्वे ११) नांदगाव खंडेश्वर १२) मोर्शी १३) भातकुली १४) वरूड
- प्रमुख नद्या तापी, पूर्णा, वर्धा या मुख्य नद्या व त्यांच्या उपनद्या.
- जिल्ह्यातील तापी नदीच्या उपनद्या गाडगा, कापरा, सिपना
- जिल्ह्यातील पूर्णेच्या उपनद्या चंद्रभागा, शहानूर, पेढी.
- जिल्ह्यातील वर्धेच्या उपनद्या चुडामण, माडू, वेंबळा, विदर्भा, चारघड, खोलाट.
- धरणे : सापन, पूर्णा, चंद्रभागा, बगाजी सागर, वर्धा नदीवरील मोर्शी प्रकल्प पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत.
- प्रमुख पिके : ज्वारी, कापूस, तूर, ऊस.
- फळपिके : मोर्शी परिसरात संत्री, मोसंबीचे उत्पादन.
- औद्योगिक : कापसाच्या उत्पादनामुळे जिनिंग व प्रेसिंग उद्योग, कापड गिरण्या.
- सातुर्णा येथे औद्योगिक वसाहत. नंदगाव-पेठ येथे औद्योगिक नागरी संकुल.
- शैक्षणिक कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती (स्थापना: १ मे १९८३)
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- अमरावती : जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय, संत गाडगेबाबा विद्यापीठ, कापसाची प्रमुख बाजारपेठ, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेले तपोवन, डॉ. पंजाबराब देशमुख यांची शिवाजी शिक्षण संस्था व श्रद्धानंद छात्रालय, गाडगेबाबांची समाधी, गुरू हनुमान आखाडा.
- चिखलदरा : थंड हवेचे ठिकाण, विदर्भाचे नंदनवन (विदर्भाचे काश्मीर), येथून जवळच ‘बैराट’ हे सातपुड्यातील शिखर, चिखलदऱ्यात कॉफीचे मळे फुलू लागले आहेत. मेळघाट येथे वाघांचे अभयारण्य, पंचधारा धबधवा.
- मोर्शी : तालुक्याचे ठिकाण. रिथपूर (रिद्धपूर) येथे चक्रधरस्वामींचे गुरू श्री गोविंदप्रभू यांची समाधी.
- यावली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव.
- चिखलदरा येथे भीमाने किचकाचा वध केला.
- मोझरी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ‘गुरुकुंज आश्रम’, तुकडोजींची समाधी.
- कौंडिण्यपूर भगवान श्रीकृष्णांची पत्नी रुक्मिणीदेवी, तसेच नळ-दमयंती आख्यानातील दमयंती यांचे माहेरगाव
- शेंडूरजनाघाट (ता. वरुड) : शेंदूर, कुंकू यांची निर्मिती. विदर्भातील सर्वात मोठी हळद व मिरचीची बाजारपेठ, येथे ‘पानेरी’ ही संत्र्याच्या झाडाची रोपे तयार केली जातात.
- महिमापूर येथील सात मजल्यांची विहिर
- ऑक्टोबर २०१५ : मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभागातील ‘रोरा’ हे ४५० लोकवस्तीचे गाव ग्रामपरिसर विकास समितीच्या माध्यमातून सरपणमुक्त व चराईमुक्त गाव ठरले.
- मेळघाट हे ‘कोरकू’ आदिवासी जमातीचे निवासस्थान.
- अमरावती येथे ‘राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था.
- अमरावती शहराचे प्राचीन नाव : उदुंबरावती लासूर, ता. दर्यापूर येथील यादवकालीन मंदिर.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
Pruthvigol, Nakasha Tulana v Kshetrabhet – पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट
Naisargik Pradesh – नैसर्गिक प्रदेश
4. औरंगाबाद
- महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग. या प्रशासकीय विभागात ८ जिल्ह्यांचा समावेश होतो.
- जिल्ह्याचे व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय – औरंगाबाद.
- क्षेत्रफळ : १०,१०७ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : मराठवाडा विभागात.
- औरंगाबाद जिल्ह्याच्या पूर्वेस : जालना,
- पश्चिमेस : नाशिक,
- आग्नेयेस : बीड,
- दक्षिण व नैऋत्येस: अहमदनगर,
- उत्तरेस : जळगाव जिल्हा.
- तालुके ९
- १) औरंगाबाद २) कन्नड ३) खुल्ताबाद ४) गंगापूर ५) पैठण ६) फुलंब्री ७) सिल्लोड ८) सोयगाव ९) वैजापूर.
- नद्या : गोदावरी ही मुख्य नदी. पूर्णा, अंजना, शिवना, खाम, येळगंगा या उपनद्या. पूर्णेचा उगम मेहूण (ता. कन्नड)
- धरणे : गोदावरीवरील ‘जायकवाडी’ हा राज्याचा सर्वात मोठा बहूउद्देशीय प्रकल्प.
- त्याअंतर्गत पैठण येथे ‘नाथसागर’ जलाशय.
- प्रमुख पिके : बाजरी, ज्वारी, ऊस, तेलबिया,
- फळपिके : दौलताबादची सिताफळे प्रसिद्ध.
- औरंगाबाद येथील हिमरू व मशरू शाली प्रसिद्ध,
- औद्योगिक वाळूज, चिखलठाणा येथे औद्योगिक संकुले, धूत यांचा व्हिडिओकॉन हा इलेक्ट्रॉनिक उद्योग.
- लघुउद्योग : औरंगाबादच्या हिमरू शाली, महारू किनखाब.
- पैठणच्या पैठणी, दसन्नी, मंदिल.
- शैक्षणिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (स्थापना २३ ऑगस्ट १९५८)
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- २०१० मध्ये औरंगाबाद शहरास ‘महाराष्ट्राची पर्यटन राजधानी’ म्हणून दर्जा.
- औरंगाबाद : ५२ दरवाजांचे शहर, पाणचक्की, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, दौलताबादचा ‘देवगिरी’ किल्ला.
- बिबी का मकबरा : मुघल सम्राट औरंगजेबची बेगम दिलरास बानू बेगम यांचे स्मृतीस्थळ. याला दख्खनचा ताजमहल म्हणतात.
- अजिंठा : सिल्लोड तालुक्यात जगप्रसिद्ध लेणी.
- औरंगाबाद हे दरवाजांचे शहर (City of Doors).
- वेरूळ : खुल्ताबाद तालुक्यात ऐतिहासिक लेणी व गुंफा मंदिरे. जगप्रसिद्ध कैलास लेणे, १२ ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग.
- पितळखोरा : कन्नड तालुक्यात. सर्वात प्राचीन बौद्धकालन लेणी.
- पैठण (प्रतिष्ठान) : सातवाहनांची राजधानी, संत एकनाथांची जन्मभूमी. नाथसागर जलाशय,
- आपेगाव पैठण तालुक्यात. संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव.
- थंड हवेची ठिकाणे : म्हैसमाळ (ता, खुल्ताबाद), शुलीभंजन
- औरंगाबाद-नगर, बीड सीमेवर जायकवाडी पक्षी अभयारण्य.
- औरंगाबादचे जुने नाव खडकी, फतेहपूर.
- गौताळा- औटरमघाट हे औरंगाबाद-जळगाव सीमेवरील अभयारण्य.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
5. बीड
- औरंगाबाद या प्रशासकीय विभागातील जिल्हा.
- मुख्यालय : बीड
- क्षेत्रफळ : १०६९३ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : बीड जिल्ह्याच्या पूर्वेस व आग्नेयेस: लातूर,
- दक्षिणेस : उस्मानाबाद जिल्हा.
- नैऋत्य, पश्चिम व वायव्येस : अहमदनगर जिल्हा,
- उत्तरेस : औरंगाबाद व जालना,
- ईशान्येस : परभणी जिल्हा.
- तालुके : ११
- १) बीड २) आंबेजोगाई ३) आष्टी ४) केज ५) गेवराई ६) माजलगाव ७) परळी ८) पाटोदा ९) धारूर १०) वडवणी ११) शिरुर-कासार
- नद्या : गोदावरी ही प्रमुख नदी. मांजरा, सिंधफणा, सीना, रेना, बिंदुसरा या अन्य नद्या. विंचरणा (सीनेची उपनदी).
- प्रमुख धरणे : सिंधफणा नदीवरील माजलगाव धरण, मांजरा नदीवरील मांजरा प्रकल्प.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- आष्टी-पाटोदा दरम्यान विंचरणा नदीवर सौताडा धबधबा व रामेश्वर मंदिर
- बीड – बिंदूसरा नदीकाठी, कंकालेश्वर जलमंदिर, ‘खजाना’ विहिर, पीर बालाशाह व मन्सूरशहा दर्गे.
- परळी: परळी-वैजनाथ हे राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. परळी येथेच राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प.
- आंबेजोगाई : आद्यकवी मुकुंदराज, दासोपंत यांच्या समाधी. योगेश्वरी माता मंदिर.
- राक्षसभुवन : गेवराई तालुक्यात. १७६३ च्या येथील लढाईत माधवराव पेशव्यांनी निजामास पराभूत केले.
- चिंचोली (ता. पाटोदा) हे थंड हवेचे ठिकाण.
- मांजरसुभा येथील कपिलधार धबधबा.
- बीडमधील ‘सीताफळ’ या फळास नोव्हेंबर २०१६ मध्ये GI (Geographical Indication) मानांकन मिळाले.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
6. भंडारा
- नागपूर या प्रशासकीय विभागातील जिल्हा.
- मुख्यालय : भंडारा
- क्षेत्रफळ : ३७१७ चौकिमी
- स्थान व विस्तार : भंडाऱ्याच्या पूर्वेस: गोंदिया,
- पश्चिमेस : नागपूर,
- दक्षिणेस: चंद्रपूर,
- उत्तरेस: मध्य प्रदेश हे राज्य,
- आग्नेयेस: गडचिरोली,
- तालुके : ७
- १) भंडारा २) तुमसर ३) पवनी ४) मोहाडी. ५) साकोली ६) लाखांदूर ७) लाखनी,
- नद्या : वैनगंगा ही मुख्य नदी. बावनथडी, चूलबंद, मरू, सूर या अन्य नद्या.
- पिके : तांदूळ हे प्रमुख पीक
- खनिज संपत्ती : तुमसर तालुक्यात मँगेनीज खाणी. याशिवाय क्रोमाईट हे खनिज
- औद्योगिक जवाहरनगर येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना.
- भंडारा येथे तांब्या-पितळेची भांडी बनविण्याचे कारखाने.
- तुमसर तालुक्यात मँगेनीज शुद्धीकरण कारखाने व विडी उद्योग.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- भंडारा : तलावांचे शहर (जिल्हा), प्रसिद्ध खांब तलाव, तांब्या-पितळेची भांडी प्रसिद्ध. भंडारा रोड येथे लोह-पोलाद प्रकल्प.
- तुमसर : तांदळाची मोठी बाजारपेठ.
- अड्याळ (ता. पवनी) : येथील हनुमान मंदिर व ‘घोड्याची यात्रा’ प्रसिद्ध.
7. बुलढाणा
- बुलढाणा हा विदर्भातील व अमरावती प्रशासकीय विभागातील जिल्हा. (बुलढाणाचे जुने नाव : भिल्लठाणा)
- मुख्यालय : बुलढाणा
- क्षेत्रफळ ९६४० चौ. किमी.
- महसूल उपविभाग : ०५
- स्थान व विस्तार बुलढाण्याच्या पूर्वेस : अकोला,
- पश्चिमेस जालना व जळगाव,
- आग्नेयेस : वाशिम जिल्हा,
- दक्षिणेस व नैऋत्येस : जालना,
- उत्तरेस मध्य प्रदेश (नेमाड जिल्हा).
- तालुके : १३
- १) बुलढाणा २) चिखली ३) जळगाव ४) देऊळगाव-राजा, ५) सिंदखेड-र -राजा ६) नांदूरा ७) मलकापूर ८) मेहेकर ९) मोताळा १०) खामगाव ११) संग्रामपूर १२) शेगाव १३) लोणार.
- नद्या : पूर्णा, पैनगंगा या मुख्य नद्या. वेंबळा, निपाणी, पांडव, बोर्डी, नळगंगा, बाणगंगा, खडकपूर्णा या अन्य नद्या.
- प्रमुख पिके ज्वारी, ऊस, कापूस
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- सिंदखेड राजा राजमाता जिजाऊसाहेबांचे जन्मगाव,
- लोणार सरोवर,
- फळे : केळी,
- देऊळगाव राजा: प्रसिद्ध बालाजी मंदिर,
- शेगाव : संत गजानन महाराज मंदिर,
- ज्ञानगंगा अभयारण्य,
- नांदूरा येथे जगातील तिसऱ्या क्रमांकाची उंच हनुमान मूर्ती (१०५ फूट),
- सैलानी बाबा दर्गाह, चिखली,
- मेहकर येथील प्रसिद्ध बाल्गी मंदिर,
- ज्ञानगंगा अभयारण्य.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
8. चंद्रपूर
- पूर्व विदर्भात व नागपूर प्रशासकीय विभागात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश होतो.
- मुख्यालय : चंद्रपूर
- क्षेत्रफळ : ११,४४३ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : चंद्रपूरच्या पूर्वेस: गडचिरोली जिल्हा,
- पश्चिमेस : यवतमाळ,
- दक्षिणेस : तेलंगणा (आदिलाबाद जिल्हा),
- उत्तरेस भंडारा व नागपूर जिल्हे,
- तालुके १५
- १) चंद्रपूर २) चिमूर ३) भद्रावती ४) वरोडा ५) ब्रह्मपुरी ६) गोंडपिंपरी ७) नागभीड ८) राजुरा ९) मूल १०) सिंदेवाही ११) कोरपना १२) सावली १३) पोंभूर्णा १४) बल्लारपूर १५) जिवती
- नद्या : वर्धा ही प्रमुख नदी. याशिवाय वैनगंगा, इरई, मूल, अंधारी, पाथरी या अन्य नद्या.
- धरणे : पाथरी नदीवरील असोलमेंढा धरण.
- ‘झाडी’ ही बोलीभाषा चंद्रपूरची राजभाषा होती.
- खनिज संपत्ती : घुगुस, वरोडा येथे दगडी कोळशाच्या खाणी, तांब्याच्या खाणी, चिमूर, ब्रह्मपुरी तालुक्यात लोह खाणी.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- चंद्रपूर : इरई नदीकाठी. जिल्हा मुख्यालय.
- माडिया गोंड ही अतिमागास जमात चंद्रपूर जिल्ह्यात आढळते.
- वरोडा : कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटेंनी स्थापन केलेले ‘आनंदवन’ येथे आहे.
- सिंदेवाही येथे राज्य शासनाचे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
9. धुळे
- उत्तर महाराष्ट्रात खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला नाशिक या प्रशासकीय विभागातील जिल्हा.
- धुळे शहराचा आराखडा सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांनी निश्चित केला होता.
- मुख्यालय : धुळे.
- क्षेत्रफळ ८०६३ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : धुळे जिल्ह्याच्या उत्तरेस नंदूरबार जिल्हा व मध्य प्रदेशची सीमा (मेवाड जिल्हा),
- पूर्वेस: जळगाव जिल्हा,
- दक्षिणेस नाशिक जिल्हा,
- पश्चिमेस गुजरातची सीमा व नंदूरबार जिल्हा.
- तालुके : ४
- १) धुळे २) साक्री ३) शिंदखेड ४) शिरपूर
- नद्या : तापी ही प्रमुख नदी. पांझरा, अनेर, अरुणावती, बुराई अमरावती या अन्य नद्या.
- प्रमुख पिके : भुईमुगाच्या उत्पादनात जिल्हा आघाडीवर.
पर्यटन ( प्रमुख स्थळे)
- तापी-पांझरा संगमावर मुडावद (ता. शिंदखेड) येथे कपिलेश्वर मंदिर.
- धुळे : पांझरा नदीकाठी.
- हाजीरा-धुळे-कोलकाता (NH-8) या राज्यातील सर्वाधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गावरील शहर.
- वि. का. राजवाडे संग्रहालय.
- एकवीरा देवीचे मंदिर.
- वाग्देवता मंदिर.
- धम्म सरोवर.
- सोनगीर किल्ला.
- लालिंग किल्ला.
- दौडाईचा (ता. शिंदखेड) मिरचीचा मोठा बाजार.
- धुळे हे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर मधील शहर.
- महत्त्वाचे : दुधा-तुपाचा जिल्हा ही धुळे जिल्ह्याची विशेष ओळख.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
10. गडचिरोली
- महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा.
- ऑगस्ट १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती.
- क्षेत्रफळ १४,४१२ ची. किमी.
- मुख्यालय : गडचिरोली.
- स्थान व विस्तार : विदर्भातील नागपूर या प्रशासकीय विभागात समावेश,
- गडचिरोलीच्या पूर्वेस – छत्तीसगढ़,
- पश्चिमेस – चंद्रपूर जिल्हा,
- दक्षिणेस व नैऋत्येस – तेलंगणा,
- उत्तरेस – भंडारा व गोंदिया जिल्हे
- तालुके : १२
- १) गडचिरोली २) धानोरा ३) कुरखेडा ४) आरमोरी ५) अहेरी ६) एटापल्ली ७) चामोर्शी ८) सिरोंचा ९) मूलचेरा १०) भामरागड ११) देसाईगंज १२) कोची.
- नद्या: वैनगंगा ही प्रमुख नदी
- चपराळा येथे वर्धा वैनगंगा संगम यांच्या एकत्रित प्रवाहास ‘प्राणहिता नदी म्हणतात.
- प्रमुख पिके : तांदूळ (भात) हे प्रमुख पिक,
- औद्योगिक प्रमुख उद्योग नसल्याने या अविकसित जिल्ह्यास शासनाने ‘उद्योगविरहीत जिल्हा’ म्हणून घोषित केले.
- देसाईगंज येथे बांबूपासून कागद निर्मिती केली जाते.
- खनिज संपत्ती लोहखनिजाने हा जिल्हा समृद्ध आहे.
- देऊळगाव येथील लोखंडाच्या खाणी, अलापल्ली येथील क्वार्टझ खाणी
- जंगले महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात व त्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात.
- चपराला अभयारण्य.
- नागेपल्ली (हेमलकसा) येथे बाबा आमटेंचा कुष्ठरुग्णांसाठी आश्रम.
- ‘लोक बिरादरी’ हा बाबा आमटेंचा आदिवासी विकास प्रकल्प.
- भामरागड येथील त्रिवेणी संगम (इंद्रावती, पामुलगीतम, पर्लकोटा नद्या)
- महत्वाचे छत्तीसगढ़ व आंध्र प्रदेशच्या सीमेलगत वसलेल्या या जिल्ह्यात नक्षलवादी चळवळीने सातत्याने जोर धरला आहे.
- शैक्षणिक गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, (घोषणा मे २०१० स्थापना २७ सप्टेंबर २०११).
- रेला : शुभकार्यावेळी व पिकांचे उत्पादन झाल्यावर येथील आदिवासी बांधव रेला नृत्य करून आनंद व्यक्त करतात.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
11. गोंदिया
- १ मे १९९९ रोजी भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. महाराष्ट्राच्या ईशान्येस हा जिल्हा आहे.
- क्षेत्रफळ ५४२५ चौकिमी.
- जिल्ह्याचे मुख्यालय : गोंदिया
- स्थान व विस्तार : प्रशासकीयदृष्ट्या पूर्व विदर्भातील हा जिल्हा नागपूर प्रशासकीय विभागात समाविष्ट.
- गोंदियाच्या पूर्वेस: छत्तीसगढ़,
- उत्तरेस : मध्य प्रदेश हे राज्य,
- पश्चिमेस: भंडारा जिल्हा,
- दक्षिणेस: गडचिरोली जिल्हा.
- तालुके : ८
- १) गोंदिया २) गोरेगाव ३) आमगाव ४) तिरोडा ५) देवरी ६) सालेकसा ७) सडक-अर्जुनी ८) अर्जुनी-मोरगाव.
- नद्या: चूलबंद ही प्रमुख दक्षिणवाहिनी नदी. गाढवी, पांगोली, बाघ या नद्या तसेच उत्तर सीमेवरून वाहणारी वैनगंगा.
- धरणे : गाढवी नदीवरील ‘इटियाडोह’ प्रकल्प (अर्जुनी मोरगाव तालुक्यात)
- याशिवाय, ‘तलावांचा जिल्हा’ ही विशेष ओळख. नवेगावबांध, बोदलकसा, खलबंदा, चोरखमारा हे प्रमुख तलाव.
- पिके : धान (भात), हे प्रमुख पिक.
- प्रमुख खनिजे : खुर्सीपार, आंबेतलाव येथे लोखंडाच्या खाणी.
- औद्योगिक : गोंदिया, तिरोडा येथे तेंदूच्या पानांपासून विड्या विळण्याचा उद्योग, भात सडण्याच्या गिरण्या.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- तेंदूपत्तीचे महत्त्वाचे व्यापारकेंद्र.
- तिरोडा तांदळाची बाजारपेठ.
- बिडी उद्योगाचे केंद्र.
- गोंदिया : मुंबई-कोलकाता लोहमार्गावरील जंक्शन. (महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते).
- नवेगाव बांध : राष्ट्रीय उद्यान (अर्जुनी-मोरगाव तालुक्यात).
- नागझिरा अभयारण्य (गोरेगाव तालुक्यात).
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
12. हिंगोली
- १ मे १९९९ रोजी परभणी जिल्ह्याच्या विभाजनातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती.
- जिल्हा मुख्यालय: हिंगोली
- क्षेत्रफळ : ४५२६ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : हिंगोलीच्या पूर्वेस : यवतमाळ व नांदेड जिल्हे,
- दक्षिणेस : नांदेड व परभणी जिल्हे,
- नैऋत्य व पश्चिमेस : परभणी जिल्हा,
- आग्नेयेस : नांदेड जिल्हा
- वायव्येस : बुलढाणा,
- उत्तरेस : वाशिम जिल्हा.
- तालुके : ५
- १) हिंगोली २) वसमत ३) ओढ्या-नागनाथ ४) सेनगाव ५) कळमनुरी
- नद्या कयाधू ही प्रमुख नदी. पैनगंगा, पूर्णा, आसना या अन्य नद्या.
- धरणे पूर्णा नदीवर ‘येलदरी’ व ‘सिद्धेश्वर’ ही धरणे, पैनगंगा नदीवर इसापूर धरण.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- हिंगोली कयाधू नदीवर.
- दसरा महोत्सव प्रसिद्ध.
- ओढ्या-नागनाथ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक.
- नरसी (ता. हिंगोली) संत नामदेवांचे जन्मस्थान.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
13. जळगाव
- उत्तर महाराष्ट्रात खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला जिल्हा.
- स्थान व विस्तार : नाशिक या प्रशासकीय विभागातील जिल्हा.
- जळगावच्या पूर्वेस : बुलढाणा जिल्हा व मध्य प्रदेशची सीमा (पूर्व नेमाड जिल्हा),
- पश्चिमेस : धुळे,
- नैऋत्येस : नाशिक,
- दक्षिणेस : औरंगाबाद,
- उत्तरेस : मध्य प्रदेशची सीमा.
- मुख्यालय : जळगाव
- क्षेत्रफळ : ११,७६५ चौ. किमी.
- तालुके : १५
- १) जळगाव २) चाळीसगाव ३) चोपडा ४) जामनेर ५) अमळनेर ६) मुक्ताईनगर ७) यावल ८) रावेर ९) भुसावळ १०) भडगाव ११) पाचोरा १२) पारोळे १३) एरंडोल १४) धरणगाव १५) बोदवड.
- नद्या तापी ही प्रमुख नदी पूर्णा, पांझरा, अनेर, भोकर या अन्य नद्या,
- तापी-पूर्णा संगमावर चांगदेव हे तिर्थक्षेत्र, पाटणादेवी मंदिर.
- धरणे : हातनूर येथे तापी नदीवर अप्पर तापी प्रकल्प.
- प्रमुख पिके : तेलबिया, कापूस उत्पादनात जिल्हा आघाडीवर.
- फळपिके : जळगावची केळी जगप्रसिद्ध. (रावेर व यावल तालुके विशेष प्रसिद्ध)
- औद्योगिक : वरणगाव (भुसावळ) येथे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना
- पोकरी (फेकरी) येथे औष्णिक विद्युत प्रकल्प.
- जळगाव येथे दुधभुकटी निर्मिती प्रकल्प.
- शैक्षणिक : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ.
- जळगाव (स्थापना १५ ऑगस्ट १९९०).
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- पारोळा किल्ला : हे झाशी राणी लक्ष्मीबाईंचे निवासस्थान होते.
- यावल तालुक्यातील आडगाव येथील ‘मनुदेवी’ हे जिल्ह्यातील ७०% जनतेचे कुलदैवत आहे.
- पाटणादेवी हे ज्येष्ठ गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांचे जन्मगाव.
- यावल येथे पाल हे थंड हवेचे ठिकाण.
- जळगाव जिल्हा : मुख्यालय.
- अजिंठ्याचे प्रवेशद्वार.
- फैजपूर (ता. यावल) : १९३६ मध्ये काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनाचे ठिकाण.
- उनपदेव, सुनपदेव, नाझरदेव (ता. चोपडा) : गरम पाण्याचे झरे.
- साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी ही रत्ने जळगाव जिल्ह्यातील.
- यावल येथे अभयारण्य आहे.
- फरकांडे येथे उटवाडी नदीवरील स्थिगिंग टॉवर्स.
- श्री पद्यालय (प्रभा ): एरंडोल तालुक्यातील हे स्थळ देशातील अडीच गणपती पीठांपैकी अर्धपीठ मानले जाते.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
14. जालना
- मध्य-उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यातील औरंगाबाद प्रशासकीय विभागातील जिल्हा.
- मे १९८१ मध्ये औरंगाबादच्या विभाजनातून निर्मिती.
- मुख्यालय : जालना.
- स्थान व विस्तार : जालनाच्या पूर्वेस व ईशान्येस : बुलढाणा जिल्हा.
- पूर्वेस : परभणी जिल्हा व हिंगोलीची सीमा.
- दक्षिणेस : बीड जिल्हा.
- पश्चिमेस : औरंगाबाद जिल्हा.
- उत्तरेस : जळगाव जिल्हा.
- तालुके : ८
- १) जालना २) जाफराबाद ३) अंबड ४) बदनापूर ५) भोकरदन ६) परतूर ७) मंठा ८) घनसावंगी
- क्षेत्रफळ : ७६१२ चौकिमी.
- नद्या गोदावरी ही मुख्य नदी, पूर्णा, गल्हाटी, धामना, खेळणा, दुधना, जुई या अन्य नद्या.
- औद्योगिक : संकरित (हायब्रिड) बी-बियाणे निर्मिती उद्योग.
- मंठा येथील जनावरांचा प्रसिद्ध बाजार.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- जालना : कुंडलिका नदीकाठी.
- गणपती मंदिर, मोती तलाव, मोती बाग, स्वामी जनार्दन स्मारक ही स्थळे, औद्योगिक वसाहत.
- याशिवाय, जांब ही समर्थ रामदासांची जन्मभूमी.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
15. कोल्हापूर
- ‘करवीर नगरी’ तसेच ‘दक्षिण काशी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा आहे.
- क्षेत्रफळ : ७६८५ चौकिमी.
- जिल्ह्याचे मुख्यालय : कोल्हापूर.
- स्थान व विस्तार : प्रशासकीयदृष्ट्या कोल्हापूरचा समावेश पुणे या प्रशासकीय विभागात होतो.
- कोल्हापूरच्या पूर्वेस व दक्षिणेस : कर्नाटक राज्य.
- पश्चिमेस : सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हे.
- ईशान्य व उत्तरेस : सांगली जिल्हा.
- तालुके : १२
- १) करवीर २) कागल ३) गडहिंग्लज ४) आजरा ५) चंदगड ६) भुदरगड ७) राधानगरी ८) गगनबावडा ९) शाहूवाडी १०) पन्हाळा ११) हातकणंगले १२) शिरोळ.
- नद्या पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वारणा या प्रमुख नद्या.
- पंचगंगा ही कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती व सरस्वती (ही गुप्तनदी) या पाच नद्यांपासून बनलेली आहे.
- धरणे: फेज़ीवडे (ता. राधानगरी) येथे भोगावती नदीवरील राधानगरी धरण.
- आसगाव (ता. राधानगरी) येथे दूधगंगा नदीवर महाराष्ट्र-कर्नाटक यांचा काळम्मावाडी प्रकल्प.
- गैबी बोगद्यातून या धरणाचे पाणी दुधगंगेत सोडले आहे.
- चंदगड तालुक्यातील तिलारी येथे गोवा व महाराष्ट्र यांचा तिलारी प्रकल्प.
- प्रमुख पिके : भात (तांदूळ) या प्रमुख पिकाबरोबरच ज्वारी, गहू, तंबाखू यांचे उत्पादन.
- फळपीके : चंदगड तालुक्यात काजू हे प्रमुख फळ.
- खनिज संपत्ती : चंदगड तालुक्यात नांगरतास व कासारवाडा येथे, राधानगरी तालुक्यात दुर्गमानवाड येथे तसेच शाहूवाडी तालुक्यात बॉक्साईटच्या खाणी. या बॉक्साईटपासून बेळगाव (कर्नाटक) येथील ‘इंडॉल’ फॅक्टरीत अॅल्युमिनीयमचे उत्पादन केले जाते.
- औद्योगिक : कोल्हापूरनजिक गोकुळ शिरगाव व पुलाची शिरोली येथे औद्योगिक वसाहत,
- छत्रपती शिवाजी उद्यमनगर ही औद्योगिक वसाहत शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे.
- कागल येथे नव्यानेच पंचतारांकित औद्योगिक वसाहत सुरू झाली आहे.
- फौंड्री व्यवसाय हा कोल्हापुरातील एक प्रसिद्ध उद्योग.
- कोल्हापुरी चप्पल जगप्रसिद्ध आहे.
- सहकारी चळवळीत कोल्हापूर जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे.
- जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखाने शाहू सहकारी साखर कारखाना (कागल), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री), कुंभी-कासारी (कुडित्रे), पंचगंगा (गंगानगर, ता. हातकणंगले), वारणा (वारणानगर), दत्त (शिरोळ), राजाराम (कसबा बावडा), दौलत (हलकर्णी, ता. चंदगड) व गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना.
- दूध संघ : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील गोकुळ दूध प्रकल्प.
- सूतगिरणी : इचलकरंजी येथील सूतगिरणी (आशियातील पहिली).
- यंत्रमाग इचलकरंजी हे शहर यंत्रमाग उद्योगामुळे ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर’ गणले जाते.
- हुपरी (ता. हातकणंगले) येथे चांदी व्यवसाय तेजीत.
- कोल्हापूर शहरात ‘गुजरी’ ही सराफी पेढी.
- शाहूवाडी तालुक्यात ‘आंबा येथे ‘पोलसन इंडिया लिमिटेड या कारखान्यात जंगली हिरड्यापासून टॅनिन बनविले जाते.
- शैक्षणिक : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (स्थापना १९६२).
- गारगोटी (ता. भुदरगड) येथे मौनी विद्यापीठ.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- कोल्हापूर : पंचगंगेच्या काठावरील शहर.
- ऐतिहासिक राजधानी.
- महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर,
- रंकाळा तलाव,
- शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ,
- मोतिबाग तालीम,
- खासबाग कुस्ती आखाडा,
- कोल्हापूर चित्रनगरी,
- न्यू पॅलेस,
- जयप्रभा व शालिनी स्टुडिओत चित्रपटांचे चित्रीकरण,
- शिवाजी विद्यापीठ.
- पन्हाळा : थंड हवेचे ठिकाण.
- वाडी- रत्नागिरी (ता. पन्हाळा) : जोतिबा देवस्थान,
- नरसोबाची बाडी (नृसिंहवाडी) : कृष्णा-पंचगंगा संगम, दत्ताचे देवस्थान.
- नृसिंहवाडी येथे दर बारा वर्षांनी श्रावणात ‘कन्यागत महापर्वकाळ संपन्न होतो. १२ ऑगस्ट २०१६ रोजी हा उत्सव संपन्न झाला. ‘गुरु’ ग्रहाने ‘कल्या’ राशीत प्रवेश केल्यानंतर हा उत्सव सुरू होतो.
- राधानगरी तालुक्यात दाजीपूर हे गव्यांचे अभयारण्य.
- खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्राचीन कोपेश्वर मंदिर.
- कुंभोज (ता. हातकणंगले) येथे जैन धर्मियांचे १००८ भगवान बाहुबली’ हे तीर्थक्षेत्र.
- चंदगडजवळील किल्ले पारगड ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत.
- राधानगरी तालुक्याची ‘धरणांचा तालुका’ अशी ओळख
- १५ जानेवारी २०१६ : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात पश्चिम भारतातील पहिल्या ‘लीड बोटॅनिकल गार्डन’चे उद्घाटन.
- १० जानेवारी २०१८ : कोल्हापूर विमानतळाचे ‘छत्रपती राजाराम महाराज कोल्हापूर विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
16. लातूर
- आग्नेय महाराष्ट्रात, मराठवाडा विभागातील औरंगाबाद प्रशासकीय विभागात लातूर हा जिल्हा समाविष्ट.
- जिल्हा मुख्यालय : लातूर.
- क्षेत्रफळ : ७१५७ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : लातूरच्या पूर्वेस व आग्नेयेस कर्नाटकातील बिदर जिल्हा, ईशान्येस व पूर्वेस नांदेड जिल्हा,
- पश्चिमेस व दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा उत्तरेस परभणी जिल्हा वायव्येस बीड जिल्हा..
- तालुके १० : १) लातूर २) अहमदपूर ३) औसा ४) उदगीर ५) चाकूर ६) निलंगा ७) रेनापूर ८) देवणी, (९) शिरुर अनंतपाळ १०) जळकोट.
- उदगीर, औसा येथील भुईकोट किल्ले. उदगीरचा तह इतिहास प्रसिद्ध.
- रेणापूर येथील रेणुकामाता मंदिराजवळील हलती दीपमाळ.
- देवणी येथील जनावरांचा बाजार.
- लातूर शहरास पाणीपुरवठा करणारी धरणे धनेगाव धरण, साई व नागझरी बंधारे.
- २०१६ च्या दुष्काळावेळी मिरज येथून ‘जलदूत एक्स्प्रेस’ या रेल्वेद्वारे लातूर शहरास पाणीपुरवठा करण्यात आला.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
17. मुंबई शहर
- मुंबई हे सात बेटांचे शहर गणले जाते.
- मुख्यालय : मुंबई
- क्षेत्रफळ : १५७ चौ. किमी.
- मुंबई, माझगाव, परळ, वरळी, माहिम, मोठा कुलाबा, धाकटा कुलाबा ही ती सात बेटे होत.
- मुंबई शहर हा क्षेत्रफळानुसार ‘महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा व सर्वाधिक दाट लोकसख्येचा जिल्हा आहे.
- प्रशासकीयदृष्ट्या हा जिल्हा कोकण विभागात आहे.
- तालुके : मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही.
- १९९० मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याच्या विभाजनातून मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांची निर्मिती.
- स्थान व विस्तार : मुंबईच्या पूर्वेस, पश्चिमेस व दक्षिणेस : अरबी समुद्र,
- उत्तरेस : मुंबई उपनगर,
- मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोनच जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. या जिल्ह्यांना मुंबई ग्राम पंचायत अधिनियमही लागू नाही.
- मुंबई शहरास दक्षिण मुंबई, जुनी मुंबई तसेच Island City या नावे ओळखले जाते.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- राजाबाई टॉवर लंडनच्या ‘बिग बेन’च्या धर्तीवर फोर्ट परिसरातील क्लॉक टॉवर, ४ मजली व २८० फूट स्मारक. यावरील घड्याळास १६ प्रकारच्या ट्यून्स आहेत.
- मुंबई : महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबई विद्यापीठ, राज्याचे उच्च न्यायालय, गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सहार विमातळ, फिरोजशहा मेहता उद्यान (पूर्वीचे हँगिंग गार्डन), तारापोरवाला मत्स्यालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझिमय), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस), जहांगिर आर्ट गॅलरी, नेहरू विज्ञान भवन, सिद्धीविनायक मंदिर, जिजामाता उद्यान, भायखळा (पूर्वीचे व्हिक्टोरिया गार्डन किंवा राणीचा बाग),
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
18. मुंबई उपनगर
- साष्टी बेटांवर वसलेला मुंबई उपनगर जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात आहे.
- जिल्हा मुख्यालय : बांद्रे.
- तालुके : ३
- १) अंधेरी २) कुर्ला ३) बोरीवली
- स्थान व विस्तार : मुंबई उपनगरच्या पूर्वेस : ठाण्याची खाडी,
- पश्चिमेस : अरबी समुद्र,
- नैऋत्येस : माहिमची खाडी,
- दक्षिणेस : मुंबई शहर हा जिल्हा,
- उत्तरेस : ठाणे जिल्हा.
- नद्या : दहिसर, ओशिवरा पोईसर, मिठी (मिठी नदी सर्वाधिक प्रदूषित नदी)
- खाड्या : माहिम, मालाड, मनोरी या मुख्य खाड्या.
पर्यटन स्थळे
- बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.
- कान्हेरी येथे ११२ गुंफांमध्ये कोरलेली लेणी.
- जोगेश्वरी लेणी.
- जुहू चौपाटी.
- वांद्रे पश्चिम येथे रोमन कॅथॉलिक माऊंट मेरी चर्च येशू ख्रिस्त यांची माता मेरी यांच्या जन्मदिनी येथे दरवर्षी माऊंट मेरी (मत माऊली) जत्रा भरते.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
19. नागपूर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या नागभूमीत बौद्धधर्माचा स्वीकार केला. प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने (रामटेक) पुनीत झालेला नागपूर हा विदर्भातील जिल्हा व प्रमुख प्रशासकीय विभाग.
- जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय : नागपूर.
- क्षेत्रफळ : ९,८०२ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : नागपूरचे स्थान राज्यात पूर्वेकडे व देशात मध्यवर्ती आहे.
- म्हणून त्याचा उल्लेख ‘0 मैल’ (Zero Mile) असा करतात.
- नागपूरच्या पूर्वेस : भंडारा,
- दक्षिणेस : चंद्रपूर,
- नैऋत्य व पश्चिमेस : वर्धा,
- वायव्येस : अमरावती जिल्हा,
- उत्तरेस : मध्य प्रदेशची सीमा (छिंदवाडा, सिवनी जिल्हे)
- तालुके : १४
- १) नागपूर शहर २) नागपूर ग्रामीण ३) काटोल ४) कामठी ५) कळमेश्वर ६) कुही ७) रामटेक ८) हिंगणा ९) नरखेड (१०) पारशिवनी ११) साबनेर १२) मीदा १३) उमरेड १४) भिवापूर.
- नद्या : कन्हान ही प्रमुख नदी पेंच, कोलार, नाग, सांड, जांब, वर्धा या अन्य नद्या.
- धरणे : पारशिवनी तालुक्यात पेंच नदीवर महाराष्ट्र मध्य प्रदेश यांचा पेच प्रकल्प.
- प्रमुख पिके : कापूस, गहू, ज्वारी, तेलबिया.
- प्रमुख फळपिके : नागपूरची संत्री जगप्रसिद्ध.
- खनिज संपत्ती : कामठी, उमरेड येथे दगडी कोळशाच्या खाणी, रामटेक, सावनेर येथे मंगेनीज साठे तसेच अभ्रक हे खनिज.
- औद्योगिक : वाडी व अंबाझरी येथे युद्धोपयोगी संरक्षण साहित्य निर्मिती कारखाने, कन्हान येथे कागद गिरणी, कामठी येथे मँगेनीज शुद्धीकरण कारखाना, हातमाग व यंत्रमाग, बुटिबोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत, खापरखेडा, कोराडी येथे औष्णिक प्रकल्प, उमरेड येथे नियोजित अणुविद्युत प्रकल्प.
- शैक्षणिक : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर (स्थापना ४ ऑगस्ट १९२३).
- महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर (स्थापना ३ डिसेंबर २०००)
नागपूर जिल्ह्यातील प्रमुख मानांकित संस्था
- महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ,
- महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ,
- महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ,
- केंद्रीय कापूस संशोधन संस्था.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- १८ व्या शतकाच्या प्रारंभी गौडराज बख्त बुलंद याने नागपूर शहराची स्थापना केली.
- नागपूर नाग नदीकाठी महाराष्ट्राची उपराजधानी राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
- सीताबर्डी किल्ला,
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ,
- मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ,
- नागपूर शहराच्या स्थापनेस २००२ मध्ये ३०० वर्षे पूर्ण.
- काटोल येथे राष्ट्रीय लिंबू संशोधन केंद्र.
- पेंच येथील राष्ट्रीय अभयारण्य.
- रामटेक : कालिदासाचे ‘मेघदूत’ येथेच बहरले. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ येथे आहे.
- नागपूर या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया (भारताची व्याघ्र राजधानी) तसेच ‘ऑरेंज सिटी’ (संत्रा नगरी) म्हणतात.
- सप्टेंबर २०१६ मध्ये नागपूर हा महाराष्ट्रातील ‘पहिला डिजिटल जिल्हा’ बनला.
- नागपूर हे भारताचे दुसरे हरित शहर.
- नागपूरचा मारबत महोत्सव प्रसिद्ध.
- Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
20. नाशिक
- उत्तर महाराष्ट्रातील नाशिक हा एकूण ५ जिल्ह्यांचा प्रशासकीय विभाग आहे.
- नाशिक शहराचे प्राचीन नाव: गुलशनाबाद (फुलांच्या उत्पादनामुळे).
- प्रशासकीय विभागाचे व जिल्ह्याचे मुख्यालय : नाशिक.
- क्षेत्रफळ : १५,५३० चौकिमी.
- स्थान व विस्तार : नाशिकच्या पूर्वेस : जळगाव,
- आग्नेयेस : औरंगाबाद,
- दक्षिणेस : अहमदनगर,
- पश्चिमेस: पालघर,
- नैऋत्येस : ठाणे,
- उत्तरेस : धुळे 8 जिल्हा.
- वायव्येस : गुजरातमधील डांग व सुरत जिल्हे.
- तालुके : १५
- : १) नाशिक २) इगतपुरी ३) कळवण ४) पेठ ५) दिंडोरी ६) चांदवड ७) मालेगाव ८) सुरगाणा ९) बागलाण (सटाणा) १०) येवले ११) नांदगाव १२) निफाड १३) सिन्नर १४) त्र्यंबकेश्वर १५) देवळा.
- नद्या : गोदावरी, गिरणा या मुख्य नद्या. दारणा, गिरणा, बाणगंगा या अन्य नद्या. या सर्व नद्या जिल्ह्यातच उगम पावतात.
- धरणे : गोदावरी नदीवर गंगापूर येथे धरण. (मातीचे पहिले धरण), दारणा, भावली, वालदेवी, आळंदी, भोजापूर नाशिक हा ‘धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
- फळपिके : नाशिकची द्राक्षे प्रसिद्ध.
- प्रमुख पिके : बाजरी, ज्वारी, तांदूळ, ऊस, निफाड व लासलगाव येथील कांदा व लसूण,
- औद्योगिक : सिन्नर, अंबड, सातपूर, मालेगाव येथे औद्योगिक वसाहती,
- नाशिक रोड येथे चलनी नोटांचा कारखाना (सिक्यूरिटी प्रेस),
- ओझर येथे ‘मिग विमानांचा कारखाना,
- एकलहरे येथे राष्ट्रीय औष्णिक विद्युत प्रकल्प.
- शैक्षणिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (स्थापना १ जुलै १९८९).
- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (स्थापना ३ जून १९९८).
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- सिन्नर (सिंदीनगर) : यादवांची राजधानी.
- येथील ‘गोन्देश्वर शिवालय’ प्रसिद्ध.
- नाशिक गोदावरी नदीकाठावरील हिंदूचे तीर्थक्षेत्र.
- दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो.
- महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी).
- देवळाली आर्टिलरी.
- राज्य पोलीस अकॅडेमी.
- पंचवटी.
- सीताकुंड.
- तपोवन.
- काळाराम मंदिर.
- इगतपुरी येथे विपश्यना संशोधन केंद्र.
- मनमाड (ता. नांदगाव) रेल्वे जंक्शन.
- मालेगाव : हातमाग व यंत्रमागाचे प्रमुख केंद्र.
- त्र्यंबकेश्वर राज्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक.
- ब्रह्मगिरी येथे गोदावरीचा उगम.
- रावळगाव (ता. मालेगाव) येथे चॉकलेट उद्योग.
- वणी (ता. कळवण) माता सप्तश्रृंगीचे मंदिर.
- येवले येथील पैठण्या व पितांबर जगप्रसिद्ध.
- डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा येथेच केली.
- नांदूर मध्मेश्वर अभयारण्य (‘महाराष्ट्राचे भरतपूर’ अशी ओळख).
- भगूर (ता. नाशिक): स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव.
- मित्रमेळ्याची स्थापना स्वातंत्र्यवीरांनी येथेच केली.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
21. नंदूरबार
- खानदेशातील तापी खोऱ्यात वसलेला नंदूरबार हा राज्यातील अति उत्तरेकडील जिल्हा. नाशिक प्रशासकीय विभागात.
- निर्मिती : १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याच्या विभाजनातून निर्मिती.
- नंदूरबार हा शंभर टक्के आदिवासी जिल्हा आहे. ‘देवमोगरा देवी’ हे येथील आदिवासींचे प्रमुख श्रद्धास्थान आहे.
मुख्यालय : नंदूरबार - क्षेत्रफळ : ५०३४ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : नंदूरबारच्या नैऋत्येस व पश्चिमेस : गुजरात राज्य
- उत्तरेस व पुर्वेस : मध्य प्रदेश राज्य,
- दक्षिणेस व आग्नेयेस : धुळे जिल्हा.
- तालुके : ६
- १) नंदूरबार २) नवापूर ३) शहादा ४) तळोदा ५) अक्राणी (धडगाव) ६) अक्कलकुवा
- नद्या : तापी, नर्मदा या मुख्य नद्या. गोमाई, रंगावली, उदाई या अन्य नद्या.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- अक्राणी तालुक्यात अस्तंभा शिखर.
- सारंगखेडा येथे दत्त मंदिर.
- नंदूरबार बाल हुतात्मा शिरिषकुमार याचे स्मारक, शहादा तालुक्यात उनपदेव, अनवदेव येथे गरम पाण्याचे झरे.
- प्रकाशे शहादा तालुक्यात तापी-गोमाई संगमावरील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र (खानदेशची काशी, दक्षिण काशी)
- अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण. येथे यशवंत तलाव, सीताखईची दरी व धबधबा आहे.
- अक्कलकुवा येथे होराफली धबधवा.
- तळोद्यानजिक हिडिंबा जंगल.
- देशातील पहिले अश्व संग्रहालय : ८ डिसेंबर २०१७ रोजी सारंगखेडा (ता. शहादा, जि. नंदूरबार) येथे
- भारतातील पहिल्या अश्व संग्रहालयाचे भूमिपूजन संपन्न. सारंगखेडा येथील ‘चेतक महोत्सव’ प्रसिद्ध आहे.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
22. नांदेड
- नांदेड हे नाव भगवान शंकराचे वाहन ‘नंदी’ यांच्या नावावरून पडले. नंदीने गोदातटावर नृत्य केलेले ठिकाण, म्हणून ‘नंदी-तट’ या नावावरून नांदेड हे नाव पडले.
- मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यात नांदेड हा जिल्हा वसलेला आहे.
- क्षेत्रफळ १०,४२२ चौकिमी.
- कवी वामन पंडित, शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंगजी यांची नांदेड ही कर्मभूमी.
- स्थान व विस्तार : नांदेडच्या पश्चिमेस व नैऋत्येस : लातूर जिल्हा,
- पश्चिमेस : परभणी,
- उत्तरेस व ईशान्येस : यवतमाळ,
- उत्तरेस व वायव्येस : हिंगोली,
- पूर्वेस व आग्नेयेस : तेलंगणा,
- दक्षिणेस : कर्नाटक राज्य.
- तालुके : १६
- १) नांदेड २) भोकर ३) उमरी ४) लोहा ५) कंधार ६) किनवट ७) बिलोली ८) हदगाव ९) मुखेड
- १०) मुदखेड ११) देगलूर १२) माहूर १३) हिमायतनगर १४) धर्माबाद १५) अर्धापूर १६) नायगाव (खैरगाव),
- नद्या : गोदावरी ही मुख्य नदी. मांजरा, मनार (मण्यार), लेंडी, आसना, सीता, पैनगंगा या अन्य नद्या.
- धरणे : मनार (मण्यार) नदीवरील मनार धरण (बारुळ, ता. कंधार).
- लेंडी नदी देगलूर तालुक्यातून वाहते.
- गोदावरीवरील ‘विष्णुपुरी’ ही राज्यातील सर्वात मोठी उपसा सिंचन योजना, (जलाशयाचे नाव : शंकर सागर)
- शैक्षणिक स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड (स्थापना १७ सप्टेंबर १९९४).
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- किनवट तालुक्यात उनकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे.
- कंधार किल्ला.
- नादेड गोदावरी काठी.
- गुरू गोविंदसिंगजी समाधी.
- गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी महोत्सव (२००८), स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ.
- माहूर श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान राज्यातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या रेणुकामातेचे मंदिर.
- किनवट येथे अभयारण्य’कोलाम’ ही नांदेड जिल्ह्यातील ‘अतिमागास जमात’ आहे.
- किनवट येथे बाणगंगा नदीवर सहस्रकुंड बाणगंगा धबधबा.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
23. उस्मानाबाद
- क्षेत्रफळ : ७,५६९ किमी.
- उस्मानाबाद हे ‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार’ आहे.
- मुख्यालय : उस्मानाबाद
- स्थान व विस्तार : मराठवाडा विभागात व औरंगाबाद या प्रशासकीय विभागात उस्मानाबादचा समावेश.
- उस्मानाबादच्या पूर्वेस : लातूर,
- आग्नेय व दक्षिणेस : कर्नाटक राज्य,
- नैऋत्येस व पश्चिमेस : सोलापूर,
- वायव्येस : अहमदनगर,
- उत्तरेस : बीड.
- जिल्हा तालुके : ८
- १) उस्मानाबाद २) उमरगा ३) कळंब ४) तुळजापूर ५) परांडा ६) भूम ७) लोहारा ८) वाशी
- नद्या : तेरणा ही मुख्य व सर्वात लांब नदी.
- तेरणेचा उगम : तेरखेड (ता. कळंब).
- प्रमुख पिके : खरीब ज्वारी, रब्बी ज्वारी (शाळू), गहू, हरभरा, तूर, भुईमूग, उडीद.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- तुळजापूर : महाराष्ट्राचे आराध्यदैवत माता तुळजाभवानीचे मंदिर.
- उस्मानाबाद : पूर्वाश्रमीचे धाराशीव.
- भोगावती नदीकाठी.
- हजरत ख्वाजा शमसुद्दीन दर्गा.
- तेर: उस्मानाबाद तालुक्यात तेरणा नदीकाठी संत गोरोबाकाकांचे जन्मगाव व समाधी.
- नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील भुईकोट किल्ला. या किल्ल्यात बोरी नदीवर नर-मादी धबधबा व पाणी महाल प्रसिद्ध.
- वास्तूविशारद मीर महंमद इमादीन यांनी हा पाणी महाल बांधला.
- धरणे : बोरी धरण (ता. तुळजापूर).
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
24.पालघर
- १३ जून २०१४ रोजी राज्य मंत्रिमंडळाचा ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय.
- १ ऑगस्ट २०१४ पासून ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून ‘पालघर’ हा राज्यातील एकूण ३६ वा जिल्हा अस्तित्वात. तसेच पालघर जिल्हा परिषदेची भर पडल्याने राज्यातील जिल्हा परिषदांची संख्या आता ३४ इतकी झाली आहे.
- मुख्यालय : पालघर.
- पालघरचे क्षेत्रफळ : ५३४४ चौकिमी.
- स्थान व विस्तार : पालघरच्या उत्तरेस गुजरातमधील बलसाड जिल्हा व दादरा, नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश.
- आग्नेयस : ठाणे जिल्हा.
- पूर्वेस : नाशिक व ठाणे जिल्हा,
- पश्चिमेस : अरबी समुद्र.
- दक्षिणेस उल्हास नदीखोरे.
- तालुके : ८
- पालघर, वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, वसई-विरार
- धरणे : बांद्री धरण (वांद्री नदीवर), मनोर धरण.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- जव्हार पालघरचे महाबळेश्वर सातपाटी येथे मच्छमारी प्रशिक्षण संस्था.
- बसई किल्ला (१७३९ मध्ये पोर्तुगिजांकडून चिमाजीआप्पांनी हा किल्ला जिंकला),
- अर्नाळा किल्ला,
- कळवा बीच,
- माहीम बीच,
- बाघोबा धबधबा,
- शीतलादेवी मंदिर,
- विरारची जीवदानी देवी,
- तारापूर हा देशाचा पहिला अणुविद्युत प्रकल्प.
- वसई येथे ‘चिंचोटी’ धबधबा.
- जव्हार येथे लेंडी नदीवरील ‘दाभोसा’ धबधबा.
- कसाऱ्याजवळ ‘विहिगाव’ धबधबा.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
25.परभणी
- क्षेत्रफळ : ६५१२ चौ. किमी.
- परभणी शहराचे जुने नाव प्रभावती नगर
- मुख्यालय : परभणी.
- स्थान व विस्तार : परभणीच्या पूर्वेस : नांदेड,
- पश्चिमेस: बीड व जालना,
- नैऋत्येस : बीड,
- ईशान्येस: हिंगोली
- तालुके : ९
- १) परभणी २) पाश्री ३) पालम ४) पूर्णा ५) जिंतूर (जैनपूर) ६) गंगाखेड ७) सेलू ८) सोनपेठ ९) मानवत
- नद्या : गोदावरी ही मुख्य नदी, पूर्णा, दुधना, कापरा, घोंड, मुदगल या अन्य नद्या.
- धरण : लोअर दुधना,
- शैक्षणिक : डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (स्थापना १८ मे १९७२).
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- परभणी मनमाड-काचीगुडा लोहमार्गावरील प्रमुख जंक्शन.
- छ. शिवाजी उद्यान, हजरत शाह तुराबुल-हक दर्गा, रोशनखान गढी, प्रभावती मंदिर,
- जिंतूर येथे गुहेतील जैन शिल्पकला.
- गंगाखेड गोदावरी काठी (दक्षिण काशी),
- संत जनाबाईचे जन्मस्थळ,
- मुदगल नदीतील मुदगलेश्वर मंदिर
- मानवत कापडाची व्यापार पेठ.
- चारगणा (ता. जिंतूर) येथील झुलता मनोरा.
- पालम तालुक्यात गोदावरी पात्रात ‘जांभूळबेट’.
- जिंतूर जबळ नेमगिरी हे जैन तीर्थक्षेत्र.
- २२ वे तीर्थंकर ‘नेमिनाथ’ यांची मूर्ती.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
26. पुणे
- ‘विद्येचे माहेरघर’ गणला गेलेता पश्चिम महाराष्ट्रातील पुणे हा एक विकसित जिल्हा व प्रशासकीय विभाग.
- क्षेत्रफळ : १५,६४२ चौकिमी (‘पुणे तिथे काय उणे?’ या शब्दात पुण्याचे वर्णन केले जाते.)
- जिल्हा व प्रशासकीय विभागाचे मुख्यालय :पुणे
- स्थान व विस्तार : पुण्याच्या उत्तर व पूर्वेस : अहमदनगर,
- आग्नेयेस : सोलापूर,
- दक्षिणेस : सातारा,
- पश्चिमेस : रायगड,
- वायव्येस : ठाणे जिल्हा.
- तालुके : १४
- १) पुणे शहर २) पुरंदर ३) आंबेगाव ४) इंदापूर ५) बारामती ६) भोर ७) हवेली ८) खेड ९) जुन्नर १०) शिरूर ११) दौंड १२) वेल्हे १३) मुळशी १४) मावळ.
- नद्या : भीमा ही मुख्य नदी. इंद्रायणी, घोड, मुळा, मुठा, नीरा या अन्य नद्या,
- धरणे : वेळवंडीवरील भाटघर धरण (लॉईड धरण येसाजी कंक जलाशय), अंबी नदीवर पानशेत धरण (तानाजीसागर जलाशय), मोसी नदीवर वरसगाव धरण (बीर बाजी पासलकर जलाशय).
- प्रमुख पिके : ऊस, बाजरी, गहू, जुन्नर येथील कांदा.
- औद्योगिक : औद्योगिकदृष्ट्या विकसित असलेल्या पुणे जिल्ह्यात अनेक औद्योगिक वसाहती आहेत. बजाज, टेल्को, टेम्पो, किर्लोस्कर आदी नामांकित कंपन्यांचे कारखाने, तळेगाव (दाभाडे) येथे काच उद्योग, पिंपरी येथे हिंदूस्थान अँटिबायोटिकस हा औषध निर्मिती कारखाना,खडकी-देहूरोड येथे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाना, मुंढवा येथे कागद गिरणी.
- शैक्षणिक पुणे विद्यापीठ (स्थापना १९४९).
- पुणे विद्यापीठास ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणतात.
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे (स्थापना १९२१),
- श्री शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ, पुणे
पर्यटन (प्रमुख स्थळे) :
- पुणे मुळा-मुठा संगमावर विद्येचे माहेरघर.
- पेशव्यांची राजधानी शनिवार वाडा,
- लाल महाल या ऐतिहासिक बास्तू,
- सारसबाग,
- पर्वती टेकडी.
- लाल महालातच छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
- आळंदी इंद्रायणीतिरी, खेड तालुक्यात संत ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी येथे घेतली.
- प्रसिद्ध आषाढी यात्रा आळंदीहून पंढरपूरला निघते.
- लोणावळा-खंडाळा नजिक कुणे धबधबा.
- देहू हवेली तालुक्यात जगद्गुरू संत तुकोबारायांची जन्मभूमी.
- भीमाशंकर आंबेगाव तालुक्यात भीमा नदीचे उगमस्थान.
- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग, थंड हवेचे ठिकाण,
- आर्वी (ता. जुन्नर) येथे ‘विक्रम’ हे दळणवळण केंद्र आहे.
- भीमाशंकर येथे कोंढवळ धबधबा,
- जेजुरी (ता. पुरंदर) खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत,
- बारामती कन्हा नदीकाठी द्राक्षांपासून मद्यनिर्मिती प्रकल्प,
- छ. संभाजी महाराजांची समाधी.
- सासवड सोपानदेवांची समाधी.
- उरुळी कांचन गांधीवादी नेते मणिभाई देसाई यांची ‘भारतीय ऍग्रो इंडस्ट्रीज फॉडेशन’ ही संस्था येथे आहे.
- राज्यातील अष्टविनायकांपैकी ५ गणपती पुणे जिल्ह्यात आहेत.
- भीमाशंकर येथे अभयारण्य आहे.
27. रायगड
- पूर्वीचे ‘कुलाबा’ हे नाव १९८९ मध्ये बदलून ‘रायगड’ असे करण्यात आले.
- जिल्ह्याचे मुख्यालय : अलिबाग
- क्षेत्रफळ : ७१५२ किमी.
- समुद्रकिनान्याची लांबी : १२२ किमी.
- स्थान व विस्तार : रायगडच्या पश्चिमेस : अरबी समुद्र,
- उत्तरेस : ठाणे जिल्हा,
- पूर्वेस : पुणे जिल्हा,
- आग्नेयेस : सातारा जिल्हा,
- दक्षिणेस : रत्नागिरी जिल्हा,
- तालुके : १५
- १) अलिबाग २) उरण ३) रोहा ४) पनवेल ५) पेण ६) कर्जत ७) खालापूर ८)महाड ९) सुधागड (पाली), १०) माणगाव ११) पोलादपूर १२) म्हसळे १३) श्रीवर्धन १४) मुरूड १५) तळा (तळे)
- नद्या : उल्हास, पाताळगंगा, कुंडलिका, काळ, सावित्री या प्रमुख नद्या.
- पिके : भात हे प्रमुख पीक.
- फळे : नारळ, सुपारी, पोफळी.
- औद्योगिक : थळ-बायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स हा खत कारखाना, पनवेलजवळ रसायनी कारखाना
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- किल्ले रायगड, कर्नाळा, लिंगाणा, रेवदंडा, खांदेरी-उंदेरी, मुरूड-जंजिरा (सागरी किल्ला), सुधागड, सरसगड.
- रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी.
- रायगड किल्ला ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी. येथेच ६ जून १६७४ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला.
- न्हावाशेवा येतील जवाहरलाल नेहरू बंदर.
- लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ,
- धारापुरी उरण तालुक्यात.
- एलिफंटा लेणी.
- माथेरान (ता. कर्जत) हे थंड हवेचे ठिकाण.
- कर्नाळा पक्षी अभयारण्य गागोदे (ता. पेण) हे आचार्य विनोबा भावेंचे जन्मस्थान.
- शिरढोण (ता. पनवेल) हे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव.
- कर्जत येथे कोंडवे (कोंडाना) लेणी.
- अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर (पाली) व वरदविनायक (महाड) हे दोन विनायक रायगड जिल्ह्यात.
- महाड येथील गंधारपाले लेणी.
- पेण येथील गणेशमूर्ती जगप्रसिद्ध खोपोली हे धबधब्यांचे शहर.
- कुंडलिका नदीवर कोलाड येथे जलक्रीडा केंद्र (राफ्टिंग).
- हरिहरेश्वर येथील शिवमंदिर प्रसिद्ध.
- रायगड जिल्ह्यातील किनारे: अलिबाग तालुक्यात किहीम व आवास बीच (समुद्रकिनारे), हरिहरेश्वर, कोरलाई बीच, काशीद, बर्सोली, आक्षी, नागाव, मांडवा, सासवणे, रेवास हे समुद्रकिनारे (बीच) प्रसिद्ध.
- हरिहरेश्वर किनाऱ्यावर सागरी कडा हे भूरूप आढळते. हरिहरेश्वरला देवघर (हाऊस ऑफ गॉड) म्हणतात.
- रायगड जिल्ह्यातील धबधबे : काळ नदीवर कुंभे (माणगड), पांडवकडा धबधबा (खारघर), भिवपुरी धबधबा.
- शिवथरघळ (सुंदरमठ) येथे समर्थ रामदास स्वामीजींनी ‘दासबोध’ हा ग्रंथ लिहिला.
- जिल्ह्यात ‘रसायनी’ हे औद्योगिक केंद्र आहे. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी रसायनी’ हे नाव दिले.
- १९६० च्या दशकात येथे ‘हिंदुस्तान औरंगनिक केमिकल्स लि. (HOCL) हा कारखाना सर्वप्रथम स्थापन झाला. म्हणून त्यास ‘रसावनी’ हे नाव देण्यात आले.
28. रत्नागिरी
- मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेला रत्नागिरी हा पश्चिम किनाऱ्यावरील व कोकण प्रशासकीय विभागातील प्रमुख जिल्हा.
- मुख्यालय : रत्नागिरी.
- क्षेत्रफळ : ८२०८ चौ. किमी.
- स्थान व विस्तारः रत्नागिरीच्या पूर्वेस : सह्याद्री व त्यालगत सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे,
- पश्चिमेस : अरबी समुद्र,
- दक्षिणेस: सिंधुदुर्ग,
- उत्तरेस : रायगड जिल्हा.
- तालुके : ९
- १) रत्नागिरी २) गुहागर ३) खेड ४) दापोली ५) मंडणगड ६) चिपळूण ७) राजापूर ८) संगमेश्वर ९) लांजा
- समुद्रकिनारा : रत्नागिरी जिल्ह्यास सुमारे २३७ किमी लांबीचा किनारा.
- नद्या : वशिष्ठी, शास्त्री, जगबुडी, सावित्री, मुचकुंदी इत्यादी नद्या.
- पिके : भात, नाचणी, वरी.
- फळे : हापूस आंबे, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस.
- खनिजसंपत्ती : जांभा चीरा, मंडणगड तालुक्यात बॉक्साईटचे साठे, ‘शिरगोळा’ हा रांगोळीचा दगड, ‘कुरुंद’ हा जात्याचा दगड.
- शैक्षणिक : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (स्थापना १८ मे १९७२)
पर्यटन स्थळे
- संगमेश्वर तालुक्यात दाभोळे घाटात गंगोत्री नदीवर मार्लेश्वर (धारेश्वर) धबधबा व शिवमंदिर.
- रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ला व भागेश्वर मंदिर,
- बंदर व तेथील दीपगृह,
- स्वा. सावरकरांनी उभारलेले पतित पावन मंदिर,
- थिबा पॅलेस (म्यानमारच्या थिबा राजाची समाधी),
- मिरकरवाडा हे मच्छिमारी केंद्र.
- वेळास (ता. मंडणगड) ही नाना फडणवीस यांची जन्मभूमी,
- वेळास येथील ‘ऑलिव्ह रिडले कासव महोत्सव’ प्रसिद्ध,
- गणपतीपुळे : समुद्रकिनाऱ्यावरील गणपती मंदिर,
- भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र.
- दापोली : कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय.
- थंड हवेचे ठिकाण : रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर ही ओळख.
- उन्हाळे, उन्हवरे येथील गरम पाण्याचे झरे,
- लोटे परशुराम येथील परशुराम मंदिर (कोकण ही परशुरामाची भूमी गणली जाते).
- पावस येथे स्वामी स्वरुपानंदांची समाधी.
- राजापूरजवळील उन्हाळे तीर्थक्षेत्रावरील लुप्त होणारी गंगा.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
29. सांगली
- दक्षिण महाराष्ट्रातील सांगली हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात आहे.
- जिल्हा मुख्यालय : सांगली.
- क्षेत्रफळ : ८५७२ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : सांगलीच्या पूर्वेस व दक्षिणेस : कर्नाटक राज्य,
- दक्षिणेस व नैऋत्येस : कोल्हापूर,
- पश्चिमेस : रत्नागिरी,
- उत्तरेस व वायव्येस सातारा,
- उत्तरेस व ईशान्येस : सोलापूर.
- तालुके : १०
- १) मिरज २) तासगाव ३) खानापूर ४) आटपाडी ५) जत ६) कवठेमहांकाळ (७) शिराळा (बत्तीस शिराळा) ८) चाळवा ९) पलूस १०) कडेगाव.
- नद्या : कृष्णा ही प्रमुख नदी. वारणा, येरळा, बोर, माणगंगा या अन्य नद्या.
- धरणे : वारणा नदीवरील चांदोली धरण.
- प्रमुख पिके : ज्वारी, गहू, हरभरा, ऊस, हळद, तंबाखू.
- सांगलीचा हळदीचा वायदे बाजार प्रसिद्ध.
- फळपिके : सांगली-तासगावची द्राक्षे प्रसिद्ध.
पर्यटन स्थळे
- कडेगाव येथे १८५ वर्षांची परंपरा असलेला मोहरम प्रसिद्ध या काळात येथे गगनचुंबी ताबुतांच्या भेटी होतात.
- सांगली : कृष्णेच्या काठावर.
- गणेशदुर्ग हा किल्ला.
- येथील आकाशवाणी केंद्र विशेष लोकप्रिय.
- हळदीचा वायदे बाजार.
- मिरज प्रमुख जंक्शन.
- औदूंबर येथे दत्तात्रेय मंदिर,
- ब्रह्मनाळ येथे कृष्णा- येरळा संगम,
- मिरज : मिरासाहेब अवलिया दर्गा येथील उरुस प्रसिद्ध या ऊरुसास ६४० वर्षांची परंपरा आहे.
- बत्तीस शिराळा : येथील नागपंचमी जगप्रसिद्ध जीवंत नागांची मिरवणूक काढण्याच्या प्रथेस पर्यावरणवाद्यांच्या विरोधामुळे २००२ पासून मर्यादा आहेत.
- देवराष्ट्रे (ता. कडेगाव) : स्व. यशवंतराव चव्हाणांची जन्मभूमी.
- खरसुंडी (ता. आटपाडी) : येथील सिद्धनाथबाबाची चैत्री यात्रा प्रसिद्ध.
30. सातारा
- पुणे या प्रशासकीय विभागातील जिल्हा.
- जिल्हा मुख्यालय : सातारा.
- क्षेत्रफळ : १०४८४ चौकिमी.
- स्थान व विस्तार
- साताऱ्याच्या पूर्वेस : सोलापूर,
- दक्षिणेस व आग्नेयेस : सांगली,
- पश्चिमेस : रत्नागिरी,
- वायव्येस : रायगड,
- उत्तरेस : पुणे जिल्हा.
- तालुके : ११
- १) सातारा २) कराड ३) पाटण ४) खटाव ५) माण ६) फलटण ७) कोरेगाव ८) बाई ९) खंडाळा १०) जावळी ११)महाबळेश्वर
- नद्या : कृष्णा ही प्रमुख नदी. कोयना, वेण्णा, उरमोडी, तारळा या कृष्णेच्या उपनद्या. याशिवाय नीरा, बाणगंगा या नद्या.
- धरणे : पाटण तालुक्यात कोयना धरण (जलाशय शिवाजीसागर) हा राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प औद्योगिक बनकुसडे येथे ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचा’ पवन विद्युतनिर्मिती करणारा राज्यातील मोठा प्रकल्प महाबळेश्वर, पाचगणी येथे मधुमाक्षिकापालन,
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- कास पठारावर फुलणारी फुले हे पर्यटकांचे आकर्षण ठोसेघर धबधबा
- सातारा : महाराणी ताराबाईंची राजधानी, अजिंक्यतारा किल्ला, सज्जनगडावरील समर्थ रामदासांची समाधी.
- म्हसवड (ता. माण) येथील श्रीक्षेत्र सिद्धनाथ देवाचा रथोत्सव ३०० वर्षापासून प्रसिद्ध.
- महाबळेश्वर हे ‘महाराष्ट्राचे नंदनवन’ म्हणून प्रसिद्ध.
- मांढरदेवी येथील देवी काळूबाईचे मंदिर.
- महाबळेश्वर Queen of Hill Stations महाबळेश्वर चायनामन धबधवा, धोबी फॉल्स, लिंगमळा धबधबा.
- मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे मुख्यालय,
- मेणवली येथे नाना फडणविसांचा वाडा.
- कराड : कृष्णा-कोयना प्रीतिसंगम स्व. यशवंतराव चव्हाण यांची समाधी.
- महाबळेश्वर वेण्णा लेक.
- शिखर शिंगणापूर शंभू महादेव मंदिर,
- पाली येथील खंडोबा देवस्थान,
- लोणंद येथील कांद्याची बाजारपेठ.
31. सिंधुदुर्ग
- महाराष्ट्राच्या सर्वात दक्षिणेकडील सिंधुदुर्ग हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभागात आहे.
- २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा (लोकसंख्या: ८.४८ लाख).
- जिल्ह्याचे मुख्यालय : ओरोस बुद्रुक.
- क्षेत्रफळ : ५२०७ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : सिंधुदुर्गच्या दक्षिणेस गोवा व कर्नाटक ही राज्ये,
- पश्चिमेस अरबी समुद्र,
- उत्तरेस : रत्नागिरी,
- पूर्वेस : सह्याद्री व त्यालगत कोल्हापूर सिंधुदुर्गचा समुद्रकिनारा सुमारे १२० किमी.
- तालुके : ८
- १) कणकवली २) कुडाळ ३) मालवण ४) वेंगुर्ला ५) देवगड ६) वैभववाडी ७) सावंतवाडी ८) दोडामार्ग.
- प्रमुख पिके : भात, वरी, नाचणी, रागी.
- फळे : देवगडचा हापुस, वेंगुल्यचि काजू,
- खनिज संपत्ती : रेडी (ता. बेंगुर्ला) येथे लोहखनिज परुळे चिपी येथे राज्यातील १४ वा विमानतळ विकसित.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- आंबोली सावंतवाडी तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण, धबधबा.
- किल्ले सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे सागरी किल्ले.
- महादेवगड, देवगड, मनोहरगड. (सिंधुदुर्ग किल्ला कुरटे बेटांवर आहे.)
- सिंधुदुर्ग किल्ला १६६७ साली बांधून पूर्ण. या किल्ल्याच्या सभोवती समुद्राचे खारे पाणी व किल्ल्याच्या आत दूधबाव, दहीबाव व साखरबाव या तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. २०१० साली या किल्ल्यास राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा.
- आंगणेवाडीची भराडीदेवी यात्रा प्रसिद्ध.
- तारकर्ली (ता. मालवण) येथे पर्यटकांसाठी ‘स्नॉर्कलिंग व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्यूबा डायव्हिंगची सुविधा आहे.
- तारकर्ली येथे पर्यटकांना समुद्रतळ व तेथील जीवसृष्टी पाहता येते.
- रेडी महत्त्वाचे बंदर (लोह खनिजाच्या निर्यातीसाठी).
- सावंतवाडी शिल्पग्राम.
- लाकडी खेळणी प्रसिद्ध.
- कुणकेश्वर (ता. देवगड) येथील शिवमंदिर येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
- जामसंडे (ता. देवगड) येथे महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
32. सोलापूर
- दक्षिण-पूर्व महाराष्ट्रातील सोलापूर हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात आहे.
- जिल्हा मुख्यालय : सोलापूर.
- क्षेत्रफळ : १४८९५ चौ. किमी.
- स्थान व विस्तार : सोलापूरच्या पूर्वेस व उत्तरेस : उस्मानाबाद,
- आग्नेयेस व पूर्वेस : कर्नाटक राज्य,
- दक्षिणेस : सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य,
- पश्चिमेस : सातारा व पुणे.
- उत्तरेस : अहमदनगर व उस्मानाबाद,
- तालुके : ११
- १) दक्षिण सोलापूर २) उत्तर सोलापूर ३) अक्कलकोट ४) बार्शी ५) मोहोळ ६) मंगळवेढा (७) पंढरपूर ८) सांगोला ९) माळशिरस १०) करमाळा ११) माढा.
- नद्या : भीमा ही प्रमुख नदी. पंढरपूरजवळ भीमेस ‘चंद्रभागा’ म्हणतात. सीना, चोरी या अन्य नद्या.
- धरणे : माढा तालुक्यात भीमा नदीवरील उजनी प्रकल्प.
- पिके : सोलापूर हे ‘ज्वारीचे कोठार’.
- औद्योगिक : यंत्रमाग, हातमाग, सुती वस्त्रोद्योग, चादर कारखाने शैक्षणिक सोलापूर विद्यापीठ (स्थापना १ ऑगस्ट २००४)
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- सोलापूर वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र, भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर व तेथील याची यात्रा’.
- पंढरपूर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर.
- करमाळा: भुईकोट किल्ला, अष्टकोनी विहिर.
- मंगळवेढा संतांची भूमी, संत दामाजी पंतांचे जन्मगाव.
- नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्य.
- बार्शी भगवंत मंदिर (भगवंताची बार्शी).
- वेळापूर येथील नटेश्वर मंदिर.
- ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव सोलापूरचे पक्षीतीर्थ’ म्हणून प्रसिद्ध.
33. ठाणे
- उत्तर कोकणात पश्चिम किनाऱ्यावरील कोकण या प्रशासकीय विभागातील जिल्हा.
- मुख्यालय : ठाणे
- क्षेत्रफळ : ४२१४ चौकिमी.
- स्थान व विस्तार : पश्चिमेस : अरबी समुद्र,
- दक्षिणेस : रायगड जिल्हा,
- नैऋत्येस : मुंबई उपनगर व मुंबई शहर हे जिल्हे,
- पूर्वेस : सह्याद्री रांगा व त्यापलिकडे
- ईशान्येस : नाशिक,
- उत्तरेस : पालघर जिल्हा.
- तालुके : ७
- १) ठाणे २) भिवंडी ३) शहापूर ४) मुरबाड ५) कल्याण ६) उल्हासनगर ७) अंबरनाथ
- महानगरपालिका : ठाणे हा राज्यातील सर्वाधिक सहा (६) महानगरपालिकांचा जिल्हा.
- १) ठाणे २) नवी मुंबई ३) कल्याण-डोंबिवली ४) उल्हासनगर ५) भिवंडी-निजामपूर, ६) मीरा-भाईंदर
- नद्या : वैतरणा व उल्हास या प्रमुख नद्या. सूर्या, तानसा, पिंजळ या अन्य नद्या.
- ठाणे: तलावांचे शहर
- धरणे : वैतरणा नदीवरील ‘मोडकसागर’, तानसावरील तानसा धरण, भातसावरील भातसा धरण, बारवी धरण (कल्याणठाणे नदी), सूर्या नदीवर सूर्या (धामणी) धरण.
- शहापूर : • सर्वाधिक धरणांच्या संख्येमुळे ठाणे जिल्ह्यास ‘पाणी पिकविणारा जिल्हा’ म्हणतात. धरणांचा तालुका.
- प्रमुख पिके : तांदूळ (भात), वरी, नाचणी.
- फळपिके : डहाणूचे चिक्कू, वसईची केळी.
- औद्योगिक : ठाणे-पुणे-बेलापूर या पट्ट्यातील विकसित औद्योगिक जिल्हा. अभियांत्रिकी, लोह-पोलाद, औषधे व रसायने निर्मिती उद्योग.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- ठाणे : उल्हास नदीवरील प्रमुख बंदर.
- ठाण्याचे प्राचीन नाव : श्रीस्थानक
- अंबरनाथ: संरक्षण मंत्रालयाचा दारूगोळा व शस्त्रनिर्मिती कारखाना
- अंबरनाथ येथील शिवमंदिर
- कल्याणजवळील बाबा हाजीमलंग दर्गा.
- वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी (ता. भिवंडी) येथे गरम पाण्याचे झरे.
- टिटवाळा येथे सिद्धीविनायक महागणपती मंदिर. हे मंदिर चिमाजी अप्पांनी पोर्तुगिजांवर वसई येथे विजय मिळविल्यावर बांधले.
34. वर्धा
- पूर्व महाराष्ट्रात विदर्भातील नागपूर या प्रशासकीय विभागातील वर्धा हा जिल्हा.
- जिल्हा मुख्यालय : वर्धा.
- स्थान व विस्तार : वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेस, पूर्वेस व ईशान्येस : नागपूर जिल्हा,
- आग्नेयेस : चंद्रपूर जिल्हा,
- क्षेत्रफळ : ६३०९ चौ. किमी.
- दक्षिण व नैऋत्येस : यवतमाळ,
- पश्चिमेस व वायव्येस : अमरावती जिल्हा.
- तालुके : ८
- १) वर्धा २) आष्टी ३) आर्वी ४) देवळी ५) कारंजा ६) सेलू ७) हिंगणघाट ८) समुद्रपूर.
- नद्या : वर्धा, पूर्णा, अमरावती, वर्धेच्या उपनद्या बाकळी, यशोदा, वेना.
- पिके : ज्वारी, गहू, कापूस.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- वर्धा : (पूर्वाश्रमीची पालकवाडी) सेवाग्राम येथे म. गांधींचा आश्रम,
- पवनार येथे आचार्य विनोबा भावेंचा आश्रम,
- राष्ट्रभाषा (हिंदी) प्रचार समितीचे मुख्यालय,
- अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ,
- विश्वशांती स्तूप,
- कुष्ठधाम,
- आर्वी कापसाची बाजारपेठ.
- आष्टी १९४२ च्या आंदोलनात प्रकाशात आलेले प्रमुख ठिकाण.
35. वाशिम
- अमरावती या प्रशासकीय विभागातील जिल्हा.
- जिल्हा मुख्यालय : वाशिम.
- क्षेत्रफळ :५९५३ चौ. किमी.
- निर्मिती १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याच्या विभाजनातून वाशिमची निर्मिती,
- स्थान व विस्तार : वाशिमच्या पूर्वेस : यवतमाळ,
- दक्षिणेस : हिंगोली,
- पश्चिमेस : बुलढाणा,
- उत्तरेस : अकोला,
- ईशान्येस : अमरावती.
- तालुके : ६
- १) वाशिम २) रिसोड ३) कारंजा ४) मालेगाव ५) मंगरुळपीर ६) मानोरा.
- नद्या पैनगंगा ही प्रमुख नदी. काटेपूर्णा, मानोरा, अरुणावती या अन्य नद्या.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- वाशिम (पूर्वाश्रमीचे ‘वत्सगुल्म) पद्यावती तलाव,
- बालाजी मंदिर,
- मधमेश्वर मंदिर,
- कारंजा नृसिंह सरस्वती मंदिर,
- प्रमुख बाजारपेठ,
- बीरवलनाथ मंदिर (मंगरुळपीर),
- पोहरादेवी मंदिर ही स्थळे.
Maharashtratil Jilhe – महाराष्ट्रातील जिल्हे
36. यवतमाळ
- विदर्भातील अमरावती प्रशासकीय विभागातील यवतमाळ हा जिल्हा आंध्र प्रदेशच्या सीमेलगत वसलेला आहे.
- कापूस उत्पादनात आघाडीवर असलेला हा जिल्हा पांढरे सोने पिकविणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
- मुख्यालय : यवतमाळ.
- क्षेत्रफळ : १३,५८२ चौ. किमी.
- लोकसंख्या : २४.५८ लाख.
- स्थान व विस्तार : यवतमाळच्या पूर्वेस : चंद्रपूर,
- पश्चिमेस : वाशिम,
- दक्षिण व नैऋत्येस : नांदेड,
- दक्षिणेस : तेलंगणा राज्य.
- उत्तरेस : अमरावती व वर्धा जिल्हे.
- तालुके : १६
- १) यवतमाळ २) वणी ३) पुसद ४) उमरखेड ५) कळंब ६) केळापूर ७) बाभूळगाव ८) घाटंजी ९) राळेगाव, १०) मारेगाव ११) महागाव १२) दारव्हा १३) नेर १४) दिग्रस १५) आणी १६) झरी जामडी.
- नद्या : वर्धा, पैनगंगा या मुख्य नद्या, बेंबळा, निरगुडा, रामगंगा या वर्धेच्या उपनद्या व अरुणावती, पुस, अडाणा, खुनी, विदर्भा या पैनगंगेच्या जिल्ह्यातील उपनद्या.
- धरणे : पैनगंगेवरील इसापूर धरण.
- पिके : ज्वारी, तांदूळ, कापूस, ऊस.
- खनिज संपत्ती : वणी तालुक्यात चुनखडक हे मुख्य खनिज.
पर्यटन (प्रमुख स्थळे)
- यवतमाळ : भारतीय इतिहास संशोधनाशी संबंधित ‘शारदाश्रम’ ही संस्था केदारेश्वर मंदिर.
- वणी चुन्याच्या व्यापाराचे केंद्र. रंगनाथस्वामी मंदिर टिपेश्वर, पैनगंगा येथे अभयारण्ये.
- उमरखेडजवळ जेवली येथे पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा.
- कापेश्वर येथे गंधकमिश्रित औषधी पाण्याचा झरा.
- महत्वाचे ‘कोलाम’ ही यवतमाळ जिल्ह्यातील केंद्र शासन घोषित ‘अतिमागास जमात’ आहे.