Maharshi Dhondo Keshav Karve
महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात शेखली या खेडेगावात झाला. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे आई-वडील शांत आणि धार्मिक वृत्तीचे होते. लहानपणापासूनच कर्वे यांना शिक्षणाची आव– महर्षी धोंडो केशव कर्वे
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
त्यांच्याकडून कर्वेना लोकसेवा करण्याची प्रेरणा मिळाली. कर्वेनी सहावीची परीक्षा देण्यासाठी कुंभाल घाटातून पायी सातारा येथे जावे लागले. १२५ मैलांचे अंतर त्यांनी तीन दिवसांत कापलेड होती. मुरूड या गावी त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. विनायक लक्ष्मण सोमण या शिक्षकांनी त्यांच्यावर फार प्रेम केले.
Maharshi Dhondo Keshav Karve . त्यांनी काही दिवस रत्नागिरीला शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये पाचवीत प्रवेश घेतला.
इ. स. १८८१ मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. इ. स. १८८४ मध्ये त्यांनी मुंबई येथील विल्सन कॉलेजातून गणित विषय घेऊन बी. ए. पदवी संपादन केली. शिक्षण घेत असतानाच त्यांना उदरनिर्वाहासाठी विविध कामे करावी लागली. इ. स. १८८४ पासून १८८८ पर्यंत त्यांनी उपजीविकेसाठी मुंबईत विविध शालेय शिकवण्या घेण्याचे कार्य केले.
समाजसुधारणा :- १५ नोव्हेंबर १८९१ रोजी कर्वे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक झाले. त्या वेळी त्यांना ७५ रूपये मासिक पगार होता.त्यांनी प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळविला. गो. कृ. गोखले यांनी त्यांना फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापक म्हणून आणण्यात पुढाकार घेतला होता.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत फर्ग्युसन कॉलेज चालविले जात होते. या सोसायटीचे आजीवन सदस्य म्हणून कर्वेची वर्णी लागली. याचवेळी त्यांनी विद्यार्थी निधी ही योजना काढली. ते महिन्याला १० रूपये या निधीत जमा करीत असत. हाच पैसा त्यांनी सोसायटीला देणगी म्हणून दिला.
कर्वे हे अध्यापनाचे काम करीत असले, तरी त्यांचा मूळ पिंड समाजसुधारणेचा होता. मुरुड येथील विश्वनाथ नारायण मंडलिक आणि त्यांचे प्राथमिक शिक्षक विनायक सोमण यांचा आदर्श त्यांनी समोर ठेवला होता. सोमण गुरुर्जीमुळे ते समाज सुधारणेकडे वळले.
समाजसुधारणेच्या बाबतीत त्यांना महादेव रानडे, गोपाळ गोखले व गोपाळ आगरकर यांच्याकडूनही प्रेरणा मिळाली. कर्वे यांनी एलिफिन्स्टन हायस्कूल (मुंबई) येथेही शिक्षकाची नोकरी केली होती. नोकरी करीत असतानाच त्यांचा इतर समाजसुधारकांशी संबंध आला. १९९४ पर्यंत कर्वे यांनी फर्ग्युसन कॉलेजात प्राध्यापक म्हणून काम केले.
विधवेशी विवाह :- त्या काळात बालविवाह प्रचलित होते. कर्वेचा विवाहसुद्धा वयाच्या पंधराव्या वर्षी इ. स. १८७३ मध्ये राधाबाईशी झाला. त्या वेळी राधाबाई ९ वर्षांच्या होत्या. विधवा स्त्रियांचे जीवन फार कष्टमय होते. त्यांना अत्यंत हालअपेष्टा सहन कराव्या लागत असत. त्यामुळे कवेंनी विधवा स्त्रियांच्या जीवनात सुधारणा करण्याचे ठरविले; पण दुर्दैवाने इ. स. १८९९ मध्ये त्यांची पत्नी राधाबाई यांचा मृत्यू झाला.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
त्या वेळी कर्वेचे वय ४२ होते. त्यांनी ११ मार्च १८९३ रोजी कुमारिकेशी लग्न न करता पंडिता रमाबाई यांच्या मुंबई येथील शारदा आश्रमात ४ वर्षे वास्तव्यास असलेल्या २८ वर्षे वयाच्या गोदूबाई नावाच्या विधवा स्त्रीशी पुनर्विवाह करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. तसेच समाजसुधारणा करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
पुढे गोदूबाईचे नाव आनंदीबाई असे ठेवले. या पुनर्विवाहानंतर कर्वे आपल्या आईला भेटण्यासाठी मुरूड या गावी गेले. कर्वे यांनी सामाजिक चालिरीतीचा भंग केल्यामुळे तेथील लोकांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला. त्यांच्या जेवणाच्या पंक्तीवरही बहिष्कार टाकण्यात आला. त्यांच्या सभेला लोकांनी हजर न राहण्याचे ठरविले. त्यांचे भाऊ भिकाजीपंत कर्वे यांच्यावरही समाजाने बहिष्कार घालण्याचे ठरविले.
गोदूबाईलाही स्त्रियादुय्यम वागणूक देत असत. कुंकू लावण्याच्या प्रसंगी पोरीबाळींना बोलावून गोदूबाईस कुंकू लावण्यास सांगितले जात असे; परंतु स्वतः महिला त्यांना कुंकू लावत नसत. आगरकरांच्या उपस्थितीत कर्वे आणि गोदुबाईचा झालेला पुनर्विवाह हा पहिलाच होता. या पुनर्विवाहानंतर आगरकरांनी पती-पत्नीस भोजनासाठी आमंत्रण दिले होते.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
विधवा विवाहोत्तेजक मंडळी :- महर्षी कर्वे यांनी इ.स. १८९३ मध्ये विदर्भातील वर्धा या ठिकाणी विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्देश पुढीलप्रमाणे होते.
१. विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह घडवून आणणे.
२. पुनर्विवाह केलेल्या कुटुंबास समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
३. पुनर्विवाहित कुटुंबाचे मेळावे आयोजित करणे.
४. पुनर्विवाहाच्या बाबतीत लोकमत तयार करणे.
५. पुनर्विवाहाच्या बाबतीत समाजजागृती करण्यासाठी दौरे काढणे व व्याख्याने देणे.
६. पुनर्विवाह करण्याची इच्छा असणाऱ्यास मदत करणे.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
महर्षी कर्वे यांनी वरील उद्देशपूर्तीसाठी भरपूर प्रयत्न केले. इ. स. १८९४ मध्ये त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेचे नाव ‘विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी’ असे बदलण्यात आले. या संस्थेचे चिटणीस म्हणून त्यांनी इ. स. १८९९ पर्यंत कार्य केले. या संस्थेसाठी त्यांनी निधी उभारण्याचा फार प्रयत्न केला.
विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या मृत्यूला २५ वर्षे झाली होती.nत्यामुळे एक स्मृती निधी जमा करावा व तो विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी या संस्थेमार्फत विधवेशी विवाह करणाऱ्या मंडळीची दरवर्षी वार्षिक संमेलने आयोजित केली. विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी पुरुषांच्या अन्याय व जुलमाखाली भरडलेल्या अनाथ स्त्रियांना चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले.
या काळात रूढी-परंपरा मोडणाऱ्यास सामाजिक बहिष्कारास तोंड द्यावे लागे. त्यामुळे विधवांच्या आई-वडिलांनी व विधुर व्यक्तींनी पुनर्विवाहाकडे नकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिले.
अनाथ बालिकाश्रम :- महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहाची चळवळ सुरू केली; परंतु या चळवळीस यश मिळाले नाही. त्यामुळे विधवांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. त्यांनी १४ जून १८९६ रोजी पुणे येथील सदाशिवपेठेत रावबहादूर भिडे यांच्या वाड्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. या संस्थेचे चिटणीस महर्षी कर्वे व अध्यक्ष डॉ. आर. जी. भांडारकर होते. प्लेगच्या साथीच्या वेळी ही संस्था हिंगणे येथे स्थलांतरित केली होती. या संस्थेचे पुढील उद्देश होते.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
१. विधवा स्त्रियांना शिक्षण देऊन स्वावलंबी करणे.
२. विधवांच्या विचारात आणि मनोवृत्तीत बदल करणे.
३. विधवांची दुःखे हलकी करण्यासाठी प्रयत्न करणे.
४. आपले जीवन निरर्थक नसून एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हा विचार विधवा स्त्रियांमध्ये दृढ करणे.
५. विधवांना मदत करणे व त्यांच्या शिक्षणाची सोय करणे.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
महर्षी कर्वे यांनी संस्था चालविण्यासाठी गावोगावी जाऊन निधी गोळा केला. इ.स. १८९८ पर्यंत त्यांनी ९८७९ रूपये जमा केले. इ. स. १८९९ मध्ये पुणे येथे श्री. गोरे यांच्या वाड्यात या आश्रमाला खरी सुरवात झाली. सुरवातीला या आश्रमात एकटी कमलबाई गरूड ही विधवा शिक्षण घेत होती.
इ. स. १८९९ मध्ये पुणे येथे प्लेगची साथ आल्यामुळे कर्वेनी काही काळासाठी हा आश्रम हिंगणे येथे नेला. तेथे रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांच्या सहकार्याने एक कायम झोपडी बांधली. त्यामुळे हिंगणे येथेच कायमचा अनाथ बलिकाश्रम सुरू झाला. महर्षी कर्वे पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक होते.
कॉलेजातून घरी आल्यानंतर जेवण करून विद्यार्थिनींचे जेवणाचे साहित्य घेऊन ते लगेच हिंगण्याला पायी जात असत. हा रोजचा नित्यक्रम असे. सुरवातीला आश्रमाच्या वतीने ८ विद्यार्थिनी आश्रमाच्या खर्चाने फिमेल हायस्कूल व फिमेल ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेत होत्या. त्या तेथील वसतिगृहातच राहत असत.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
कर्वेनी स्थापन केलेल्या या आश्रमात फार कमी विधवा शिक्षणासाठी आल्या. कारण पुनर्विवाहासाठी विधवांची मने वळविली जातील, अशी भीती लोकांना वाटत होती. सुरवातीला पहिल्या पाच वर्षांत आश्रमात आलेल्या मुलींची संख्या ४,७,१९,१४ व २१ अशा प्रकारे वाढत गेली. इ. स. १९०४ मध्ये आश्रमातील विद्यार्थिनींची संख्या ४० झाली.
या आश्रमात मुलगी, आई व आजीसुद्धा असत. इ. स. १९१० मध्ये आश्रमात ८० विधवा आणि २० कुमारिका शिक्षण घेत होत्या. इ. स. १९०२ मध्ये महर्षी कर्वे हिंगणे येथे आश्रमाची वास्तू तयार झाल्यावर कुटुंबावर राहावयास गेले. त्यामुळे हिंगणे हीच त्यांची कर्मभूमी बनली.
इ. स. १९०२ मध्ये २५ वर्षे वयाच्या पार्वतीबाई आठवले या आश्रमात आल्या त्यांनी तेथेच शिक्षण घेतले आणि आश्रमाचेही काम पाहिले. त्या आश्रमाच्या आधारस्तंभ बनल्या. इ.स. १९०४ मध्ये वेणूबाई नामजोशी व काशीबाई देवघर या आश्रमात आल्या. त्यांनी आश्रमाला उन्नतावस्थेत आणले. काशीबाई देवधा यांनी इ.स. १९१३ पर्यंत आश्रमात महिला अधीक्षक म्हणून काम पाहिले. इ. स. १९०५ पासून कर्वे यांचा हा आश्रम फारच प्रसिद्ध झाला.
महिला विद्यालयाची स्थापना :- महिलांच्या विकासासाठीआवश्यक होते. त्यासाठी कर्वे यांनी इ. स. १९०७ मध्ये हिंगणे येथे महिला विद्यालय सुरू केले. या विद्यालयात स्त्रियांमध्ये सुपत्नी आणि सुमाता होण्यासाठी पात्रता निर्माण करणारे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले. सुरवातीस है महिला विद्यालय ४ मार्च १९०७ रोजी पुणे येथे लाकडी पुलाजवळ एका वाड्यात सुरु केले.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
प्रथम या विद्यालयात ६ विद्यार्थिनी शिक्षण घेत होत्या. पुढे चिंगणे येथे अनाथ बालिकाश्रमाच्या इमारतीचे बांधकाम सुरू केले. ते इ. स. १९१२ मध्ये पूर्ण झाले. हे महिला विद्यालय निवासी महिला विद्यालय झाले. विद्यालयात विधवा आणि कुमारिकांनाही प्रवेश दिला जात असे.
निष्काम कर्ममठाची स्थापना :- महर्षी कर्वे यांनी इ. स. १९०८ मध्ये निष्काम कर्ममठाची स्थापना केली. स्त्रियांची सेवा करणे, स्त्री समाजाच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालविणे व कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार करणे, हे या मठाचे उद्देश होते. लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन, मन, धन अर्पण करणारा संघ निर्माण करून त्यांचा विस्तार करणे, हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.
मठात सामील होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशी शपथ घ्यावी लागे, की माझे स्वतः चे जे काही आहे, त्यावरील सर्व हक्क मी सोडून देत आहे. मी या मठाचा सेवक झाले असून, माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मठाने केलेली तरतूद मला मान्य आहे. ६ डिसेंबर १९९० रोजी कर्वे यांनी मठाच्या सेवक व सेविकांची महिला विद्यालयात एक सभा घेतली. या सभेत त्यांनी मठासाठी पुढील नियम केले.
१. सेवक सेविकांनी आपले राहणीमान साधे ठेवावे.
२. वागणूक शुद्ध ठेवणे.
३. कोणाचाही द्वेष न करणे.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
४. मठाच्या नियमांचे पालन करणे.
५. मठाच्या कार्यासाठी खर्च करणे.
६. विद्यार्थिनींसाठी धान्य जमविणे.
महिला आश्रमाची स्थापना : महर्षी कर्वे यांनी इ.स. १९९५ मध्ये अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालय आणि निष्काम कर्ममठ यांच्या सेवक आणि सेविकांना एकत्र करून महिला आश्रमाची स्थापना केली. कर्वे यांनी आयुष्यभर स्त्रियांच्या उद्धाराचाच विचार केला. स्त्रियांचा उद्धार करणे व त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करणे, ही महिला आश्रमाची उद्दिष्टे होती.
महिला विद्यापीठाची स्थापना :- स्त्रियांमध्ये शिक्षणप्रसार करणे हे पवित्र देशकार्य आणि धर्मकार्य आहे, असे कर्वे यांचे मत होते. स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे, असेही त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी पुणे येथे ३ जून १९१६ रोजी महिला विद्यापीठ सुरू केले. या विद्यापीठाचे उद्देश ३ पुढीलप्रमाणे होते.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
१. स्त्रियांना उच्चशिक्षण देणे.
२. स्त्रियांना स्वावलंबी, स्वाभिमानी व स्वकर्तृत्ववान बनविणे,
३. स्त्रियांना प्रपंचशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला,चित्रकला व गायनकलेचे शिक्षण देणे.
इ. स. १९१५ मध्ये कर्वे यांनी जपान विमेन्स युनिव्हर्सिटी या नावाचे पुस्तक वाचले. त्यामुळे जपानप्रमाणेच आपल्या स्त्रियांतही माध्यमिक व उच्चशिक्षणाचा प्रसार करता येईल, असे त्यांना वाटू लागले. जपानमध्ये इ.स. १९०० मध्ये १२ हायस्कूल होते. इ. स. १९१२ मध्ये ही संख्या १८२ झाली.
जपानच्या मदतीने भारतीय स्त्रियांनाही शिक्षण देता येईल, असे कर्वेना वाटत असल्यामुळे त्यांनी अनाथ बालिकाश्रमाच्या व्यवस्थापक मंडळापुढे महाराष्ट्रासाठी महिला विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव पास झाल्यानंतर भारतवर्षीय महिला विद्यापीठ सुरू केले.
या विद्यापीठात मराठी भाषेतून शिक्षण देण्यात येत असे, तसेच इंग्रजी भाषा सक्तीची करण्यात आली. या विद्यापीठात गणित, आरोग्यशास्त्र, पाकशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, शरीरशास्त्र, इंद्रियविज्ञानशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, गायनकला, वादनकला, माध्यमिक प्रशिक्षण पदवी, गृहविज्ञान पदवी व परिचारिका पदवी यासारखे अभ्यासक्रम होते.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
विद्यापीठात मातृभाषेतून उच्च शिक्षण दिले जात असे. मातृभाषेला प्रथम प्राधान्य असे तर इंग्रजी भाषेला दुय्यम स्थान असे. या विद्यापीठासाठी कर्वे यांनी मुंबई प्रांत चेन्नई व बंगाल प्रांतात दौरे काढून निधी जमा केला. त्यांनी अनेक कन्या शाळा या विद्यापीठाला जोडल्या आणि सरकारचे साहय्य न घेता लोकवर्गणीद्वारे विद्यापीठ व कन्या शाळा चालविल्या.
त्यामुळेच पुणे येथील लोकांनी करेंचा ६१ वा जन्मदिवस १८ एप्रिल १९९८ रोजी आनंदाने साजरा केला. इ.स. १९१७ मध्ये महिला विद्यापीठाच्या वतीने अध्यापिका विद्यालय सुरू केले. त्यामुळे प्राथमिक शिक्षिका होण्याचे भाग्य अनेक स्त्रियांना मिळाले.
इ. स. १९२० मध्ये सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी महिला विद्यापीठास आपली आई श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांचे नाव देण्याच्या मोबदल्यात २० लाख रुपये विद्यापीठास देणगी म्हणून दिले. तेव्हापासून हे महिला विद्यापीठ श्रीमती बाबीबाई दामोदर ठाकरसी भारतवर्षीय महिला विद्यापीठ (एस. एन. डी.टी. महिला विद्यापीठ) या नावाने ओळखले जाऊ लागले.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
मुंबई येथील खटाय बांनीही विद्यापीठाच्या वसतिगृहासाठी ३५००० रुपये देणगी दिली होती. आश्रमाने चालविलेले कॉलेज व विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेली पुणे येथील कन्या शाळा विद्यापीठाकडे देण्यात आली. सातारा, सांगली व बेळगाव येथे स्थानिक लोकांच्या मदतीने हायस्कूल काढले व तेही विद्यापीठास जोडले.
अहमदनगर, हैद्राबाद, सिंध व नागपूर येथेही विद्यापीठाचा विस्तार झाला. मराठी, गुजराती, तेलगू व सिंधी भाषेतून माध्यमिक शिक्षणाची, तर मराठी, गुजराती, व सिंधी भाषेतून उच्चशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. विद्यापीठाने महाराष्ट्र व गुजरातमध्ये शाळा काढल्या.
विदेशी प्रवास :- महषी कर्वे यांनी केलेल्या स्त्रीशिक्षणाच्या कार्याबद्दल इ.स. १८२५-२६ मध्ये मुंबई प्रांताच्या शिक्षण विभागाने त्यांची प्रशंसा केली. कर्वे यांनी इ. स. १९२९ ते इ. स. १९३२ या काळात युरोप, अमेरिका, आशिया व आफ्रिकेचा दौरा केला. ते १३ महिने विदेशात होते.
महिला विद्यापीठाच्या कार्याचा प्रचार करणे, विद्यापीठासाठी आर्थिक साहाय्य मिळविणे, विदेशी हायस्कूल व कॉलेज पाहून त्यापासून काही बोध घेणे व भारताची प्रतिमा जगापुढे सादर करणे, ही त्यांच्या विदेशी प्रवासाची उद्दिष्टे होती. त्यांनी युरोप, अमेरिका, जपान, चीन, जावा, मुलाया, सेलेबीज, फिलिपीन्स, ब्रिटन, फ्रान्स, स्कॉटलंड व अमेरिकेस भेट दिली.
त्यांनी युरोपियन अमेरिकन हिंदी विद्यार्थी व आफ्रिकेत हिंदी स्त्रियांपुढे व्याख्याने दिली. त्यांनी विदेशात कन्या शाळा व व्यायामशाळा पाहिल्या. त्यांना काही अंशी आर्थिक मदतही मिळाली. विद्यापीठ व ठाकरसी ट्रस्ट वाद महर्षी कर्वे हे इ.स. १९३२ मध्ये आफ्रिकेवरून परत आले.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
त्या वेळी त्यांच्यापुढे विद्यापीठ व ठाकरसी ट्रस्ट बाद न्यायालयात गेला. या काळात कवेंनी विद्यापीठ व्यवस्थितपणे चालविले. शेवटी न्यायालयात तडजोड झाली व विद्यापीठाचे कार्यालय पुणे येथून मुंबईला हलविण्यात आले. येथूनच पुढे महिला विद्यापीठाचा हिंगणे येथील संस्थाशी संबंध तुटला गेला. ही तफावत वाढतच गेली. त्यामुळे पुढे आश्रमातील सेवक वर्ग हळूहळू विद्यापीठाच्या कार्यातून मुक्त होत गेला.
महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ :- महाराष्ट्राच्या ग्रामीणभागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वे यांनी इ. स. १९३५ मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ सुरू केले. त्यामुळे अनेक खेडेगावांत शाळा सुरू करण्यात आल्या. ज्या गावात बोर्डाच्या शाळा नाहीत, अशा ठिकाणी प्राथमिकपासून इ. स. १९४७ पर्यंत या मंडळाने कार्य केले. पुण्यात २० ते २५ पेठात जाऊन त्यांने तीन-तीन तास शिक्षणाचा प्रसार करीत असत.
समता संघ :- कर्वे यांनी इ. स. १९४४ मध्ये समता संघ स्थापन करून मानवी समतेला हातभार लावला. पृथ्वीवरील मनुष्या मनुष्यात असलेवे आर्थिक व सामाजिक मतभेद आणि भेद कमी करून सर्वात समतेची भावना निर्माण व्हावी, हा समता संघाचा हेतू आहे, असे कर्वे यांनी नावाची आठ पृष्ठांचे वृत्तपत्र सुरू केले होते.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
हिंगणे स्त्री शिक्षण संस्था :- अनाथ बालिकाश्रम मंडळी या संस्थेला इ. स. १९४६ मध्ये एक समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभात या संस्थेचे नाव बदलून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे ठेवले. इ.स. १९४९ मध्ये मुंबई सरकारने एक कायदा पास करून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी भारतवर्षीय महिला विद्यापीठाला सरकारी मान्यता दिल्याने या विद्यापीठाच्या पदव्यांना इतर विद्यापीठांच्या पदव्यांप्रमाणे दर्जा प्राप्त झाला. कर्वेची पत्नी गोदूबाई उर्फ आंनदीबाई २९ नोव्हेंबर १९५० रोजी मरण पावल्याने हिंगणे स्त्री शिक्षण संस्था शोकसागरात बुडाली.
अध्यापिका विद्यालय :- महर्षी कर्वे यांनी इ. स. १९९७ मध्ये अध्यापिका विद्यालय सुरू केले. हे विद्यालय महिला विद्यापीठाच्या वतीने चालविले गेले. या विद्यालयामुळे अनेक स्त्रियांना प्राथमिक शाळेत शिक्षिका होता आले. श्रीमती पार्वतीबाई आठवले आणि आनंदीबाई उर्फ गोदबाई कर्वे यासारख्या बहिणी होत्या.
पार्वतीबाई यांनी जीवाचे रान करून कर्वे यांची संस्था प्रगतिपथावर आणली. १० ऑक्टोबर १९५५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ अध्यापिका विद्यालयास ‘पार्वतीबाई अध्यापिका विद्यालय’ असे नाव देण्यात आले.
अनाथ बालिकाश्रम मंडळी संस्थेचा गौरव :- १४ जून १९५६ रोजी अनाथ बालिकाश्रम मंडळी म्हणजे आजच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेस साठ वर्षे पूर्ण झाली होती. यानिमित्ताने पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. बाबासाहेब जयकर यांच्या हस्ते या संस्थेचा हीरक महोत्सव साजरा करण्यात आला.
या संस्थेला भेट देणाऱ्यांपैकी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान व राष्ट्रपतीसुद्धा आहेत. १ ऑगस्ट १९५६ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व २९ सप्टेंबर १९५७ रोजी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भेट देऊन संस्थेचा गौरव बाढविला, तर महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीप्रकाश यांनी ८ जुलै १९५७ रोजी संस्थेला भेट देऊन संस्थेविषयी गौरवोद्गार काढले.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
महर्षी कर्वे यांचे कौटुंबिक जीवन :- महर्षी कर्वे यांना चार मुले होती. रघुनाथ हा पहिल्या पत्नीचा मुलगा होता. तो गणिताचा प्राध्यापक आणि ‘समाजस्वास्थ्य’ मासिकाचा संपादक होता. त्यांची पत्नी मालती ही शिक्षिका होती. शंकर हा दुसरा मुलगा होता. तो एम.बी.बी.एस. होता. तिसरा मुलगा दिनकर हा बी. एस्सी. तो बंगलोर येथील संशोधन संस्थेत नोकरीस होता.
चौथा मुलगा भास्कर हा बी. एस्सी. बी. टी. असून शिक्षक होता. कर्वे भिडस्त स्वभावाचे होते. ते दुसऱ्याला नाखुश कधीच करीत नसत. त्यांना पैशांची हाव अजिबात नव्हती. परमेश्वराची पूजा करणे, प्रार्थना, भजन इत्यादी गोष्टीत त्यांना आवड नव्हती. त्यांचे चारित्र्य निष्कलंक होते.
महर्षी कर्वेचा गौरव :- महर्षी कर्वे हे स्त्रीशिक्षणाचे आणि उद्धाराचे शिल्पकार ठरतात. त्यांनी आयुष्यभर स्त्रीशिक्षण आणि त्यांच्या उद्धाराचाच विचार केला. १८ एप्रिल १९५८ रोजी महर्षी कर्वेच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त संपूर्ण भारतभर त्यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू मुंबईला बेबोर्न स्टेडियमवर समारंभाचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘मी आशीर्वाद घेण्यासाठी आलो’ या शब्दांत महर्षी कर्वेच्या कार्याचा गौरव केला. त्यापूर्वी भारत सरकारने २६ जानेवारी १९५८ रोजी महर्षी कर्वेना ‘भारतरत्न’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांच्या स्त्रीशिक्षण कार्याचा गौरव केला.
या समारंभप्रसंगी मला महाराष्ट्र वेगळा झालेला पाहायला मिळावा, हे महर्षी कर्वेनी आवर्जून स्पष्ट केले. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे संपूर्ण भारतात महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेही ओळखले जातात. ते जन्मापासून इ. स. १८९१ एक सर्वसामान्य मनुष्य म्हणून ओळखले जात असत.
इ. स. १८९१ मध्ये त्यांची पहिली पत्नी राधाबाई मरण पावल्यानंतर ते पुण्यात आले. लोकमान्य टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालय, (पुणे) येथील प्राध्यापकपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या जागेवर महर्षी धोंडो केशव कर्वे यांची निवड झाली. तत्कालिन समाजात विधवा स्त्रियांवर होत असलेला अन्याय त्यांनी जवळून पाहिला. येथूनच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.
तत्कालिन समाजात स्त्रियांच्या वाट्याला असंख्य भोग आले. ते दूर करण्याचा त्यांनी विडा उचलला. प्रत्यक्ष कृती करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आणि अंधारात खितपत पडलेल्या विधवा स्त्रियांना न्याय देण्यासाठी अनेक प्रयोग करून संस्थांची उभारणी केली. विधवा विवाह, विधवा शिक्षण, स्त्रियांची विवाह वयोमर्यादा वाढविणे, स्त्रियांना उच्चशिक्षण देणे, या तत्त्वातून त्यांनी आपले कार्य पणास लावले.
Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे
समाजाची चेष्टा, अपमान, तिरस्कार सहन करून भारतीय स्त्रियांसाठी ज्ञानाची कवाडे उघडी केली. आपल्या आयुष्याचा विचार न करता इतरांची आयुष्ये घडवली. म्हणूनच विधवा स्त्रिया त्यांना अण्णा तुम्ही नसते तर आमची आयुष्ये मातीमोल झाली असती, या शब्दांत गौरव करतात. शेवटी ९ नोव्हेंबर १९६२ रोजी स्त्रियांचा कैवारी व स्त्रीशिक्षणाच्या आधारस्तंभाचे निधन झाले.
त्यांच्या मृत्यूमुळे स्त्रीजगताची प्रचंड हानी झाली. आज महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे यांचा अफाट वृक्ष पाहता इवलेसे लावलेले रोपटे इतके वाढले आहे, की भारतभर त्याच्या शाखा निर्माण झालेल्या आढळतात.