Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

Maharshi-Vitthal-Ramji-ShindeMaharshi Vitthal Ramji Shinde

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकात जमखंडी येथे झाला. त्यांचे वडील रामजी व आई यमुना हे कानडी भाषिक असून, ते वारकरी पंथाचे होते. त्यांच्या घरी ज्ञानेश्वर, तुकाराम व महिपतीबुवा इत्यादी ग्रंथांचे व अभंगाचे नित्य नेमाने वाचन होत असे.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

शिंदेचा परिवार जमखंडी गावात प्रतिष्ठित होता; परंतु आर्थिकदृष्ट्या सधन नव्हता. साधारणपणे आर्थिक परिस्थिती असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा प्रचलित होती. या प्रथेनुसार विठ्ठल शिंदेचे लग्न वयाच्या ९ व्या वर्षी रूक्मिणी नावाच्या मुलीशी झाले.

विवाहप्रसंगी तिचे वय ६ महिने एवढे होते. आई-वडील वारकरी पंथाचे असल्यामुळे विठ्ठल शिंदेवर बालपणापासून वारकरी संप्रदायाचे संस्कार घडले. त्यामुळे तेसुद्धा वारकरी संप्रदायाच्या भक्तीमध्ये बालपणापासून रमले गेले. इ. स. १८७७ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता.

लोक अन्न, पाण्यासाठी रानावनात भटकत होते. त्याप्रसंगी विठ्ठल शिंदेंनी एका भिकाऱ्याला स्वतःच्या जेवणाचे ताट देऊन टाकले. ४ वर्षे वयाच्या विठ्ठल शिंदेंनी आपल्या जीवितकार्याची चुणूक समाजाला दाखवून दिली.

शिक्षण :- विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण जमखंडी येथे पूर्ण झाले. वयाच्या १२ व्या वर्षी इ. स. १८८५ मध्ये इंग्रजी हायस्कूलच्या पहिल्या वर्गात त्यांनी प्रवेश घेतला. इयत्ता दुसरीत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले व त्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली. इ. स. १८९१ पर्यंत, म्हणजे मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर लगेच त्यांना संस्थानाच्या शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले, त्याच शाळेत त्यांना शिक्षकांची नोकरी मिळाली; परंतु पुढे आणखी शिक्षण घ्यावे, अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यामुळे त्यांना संस्थानाच्या राजे-साहेबांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी गंगाराम भाऊ मस्के यांच्या मदतीने पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांना प्रत्येक महिन्याला १० रूपये स्कॉलरशिप मिळाली. या स्कॉलरशिपमध्ये शैक्षणिक खर्च भागविणे कठीण होते; परंतु तशाही स्थितीत त्यांनी शिक्षण सोडले नाही.

त्याचे मित्र विष्णुपंत देशपांडे यांच्या मदतीमुळे ते पहिल्या वर्षाची परीक्षा देऊ शकले. इ. स. १८९३-१८९८ या काळात विठ्ठल रामजी शिंदे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. इंटर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संस्थानात नोकरी करण्याच्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांना दरमहा २५ रूपये शिष्यवृत्ती सुरू केली होती.

पुण्यातील जीवन :- पुणे येथे असताना विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वाचनात मिल्स व मेकॉले यांचे साहित्य आले. त्यामुळे शिंदे नास्तिकवादाकडे ओढले गेले. इ. स. १८९५ मध्ये पुणे येथे अखिल भारतीय राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. तेव्हा शिंदेंनी स्वयंसेवक म्हणून काम केले, तेव्हापासून ते राष्ट्रीय पक्षाकडे ओढले गेले.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Gopal Ganesh Agarkar – गोपाळ गणेश आगरकर

२५ मे १८९८ रोजी विठ्ठल शिंदे पुण्यातील प्रार्थना समाजाच्या मंदिरात प्रार्थनेला गेले. प्रार्थना समाजातील न्यायमूर्ती रानडे व डॉ. भांडारकर यांच्या सहवासामुळे विठ्ठल शिंदे भारावून गेले. इ. स. १८९८ मध्ये बी. ए. झाल्यानंतर इ. स. १८९९ मध्ये एल. एल. बी. च्या शिक्षणासाठी विठ्ठल शिंदे मुंबईला गेले.

इ. स. १९०० पर्यंत ते मुंबईत होते. ते प्रार्थना समाजाच्या उपासनेला नियमित उपस्थित राहत असत. पुढे ते प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक बनले. डॉ. भांडारकरांच्या प्रयत्नांमुळे विठ्ठल शिंदे इ. स. १९०१ ते १९०३ या कालखंडात शिक्षणासाठी इंग्लंडला गेले.

तेथे त्यांनी पाली भाषा व बौद्ध धर्माचा अभ्यास केला. याच काळात ते स्कॉटलंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड व इटली या देशांत गेले. सप्टेंबर १९०३ मध्ये आर्मस्टरडॅमला आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद भरली. या परिषदेला विठ्ठल रामजी शिंदे भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. या परिषदेत त्यांनी हिंदुस्तानातील उदार धर्म हा निबंध वाचला. ऑक्टोबर १९०३ मध्ये ते भारतामध्ये परत आले.

समाजसुधारणेच्या कार्याकडे वाटचाल :- इंग्लंडहून भारतात परत आल्यानंतर विठ्ठल शिंदेनी प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून कर्नाटक, ओरिसा, बंगाल, बिहार व मद्रास इत्यादी प्रांतांत प्रवास केला. या कालखंडामध्ये त्यांनी भारतातील सामाजिक व धार्मिक जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण केले.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

सर्व जातिधर्मामध्ये कमी अधिक प्रमाणात अस्पृश्यता पाळण्यात येते, हे त्यांच्या निदर्शनास आले. प्रांता प्रांतांतील अस्पृश्य लोकांची दयनीय अवस्था पाहून त्यांचे मन हेलावून गेले, स्पृश्य लोकांकडून अस्पृश्य लोकांवर होत असलेला अन्याय, अत्याचार आणि अपमानास्पद वागणूक अस्पृश्य लोक मूकपणे सहन करत होते.

याचाही प्रयत्य विठ्ठल शिंदेंना आला. यासंदर्भात विठ्ठल शिंदे म्हणतात, हजारो वर्षांच्या सवयीने मानवी अस्पृश्यतासुद्धा यावेळी सोवळ्या धर्माने ठरविलेली अत्यंत हीन स्थिती आपला स्वभावच आहे, असे वाटू लागते. त्यामध्येच समाधानी राहणे, हाच आपला सुधर्म असून त्याला प्रतिकार करणे, हा मोठा अधर्म व सामाजिक गुन्हा आहे, अशी अस्पृश्यांची मानसिकता झाली. प्रांता-प्रांतांमध्ये जातिभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, अंघरूढी आणि अज्ञान पसरलेले होते.

या सर्व गोष्टींमुळे समाजाचे 3 नुकसान झाले होते. हे सर्व प्रश्न भाषणे करून संपणारे नाहीत. त्यासाठी प्रत्येक मोठे मानवाने कृतिशील प्रयत्न केले पाहिजेत, असे विठ्ठल शिंदे यांना वाटत असे. लोकशिक्षण आणि समाजप्रबोधन यामुळे जातिभेद, अस्पृश्यता व अंधश्रद्धा हे प्रश्न सुटू शकतील, असे विठ्ठल शिंदेंना वाटत होते.

वऱ्हाड-नागपूर येथील अस्पृश्य लोकांनी सोमवंशी हितचिंतक समाज ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेची शाखा नगर लिंगा येथे स्थापन होणार होती. या कार्यक्रमाला विठ्ठल शिंदे उपस्थित राहिले. तेथील कार्यक्रमाची मार्गदर्शन पत्रिका पाहून त्यांची पुढील देशाच स्पष्ट झाली. आपल्या जीवितकार्याची रूपरेषा ठरवून त्याच वेळी त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य करण्याचा निश्चय केला.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

शाळा आणि वसतिगृहे :- डिप्रेस्ड क्लास मिशनने अनेक शाळा आणि वसतिगृहे सुरू केली होती. १९१२ मध्ये विठ्ठल शिंदे कायम वास्तव्यासाठी पुणे येथे आले. मुंबईप्रमाणे पुणे येथेही मिशनचे वसतिगृह असावे यासाठी स्वतःची जागा किंवा इमारत असावी, असा विचार विठ्ठल शिंदेच्या मनात आला.

पुणे येथे मिशनच्या १४ ठिकाणी २३ शाळा, ५ वसतिगृहे व १२ इतर संस्था होत्या. मिशनमध्ये पाच प्रचारक होते आणि मिशनच्या शाळेत ५५ शिक्षक होते. पुणे शाखेचा अहवाल पाहून श्रीमंत तुकोजी महाराज होळकरांनी शिंदेना २० हजार रूपये देणगी दिली व पुणे येथील मुक्कामाच्या ठिकाणाची ७ एकर जमीन पुणे नगरपरिषदेने ९९ वर्षांच्या कराराने मिशनच्या स्वाधीन केली.

या जागेच्या आसपास त्या काळात अस्पृश्य समाजाची भोकरवाडी वस्ती होती. येथे इ. स. १८२२ मध्ये भव्य इमारत बांधली. या इमारतीला ‘अहिल्या आश्रम’ हे नाव दिले. सेवाभाव बंधुभावाचा वर्षाव करीत विठ्ठल शिंदेंनी सुरू केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशनला समाजात आदराचे स्थान प्राप्त झाले.

विठ्ठल शिंदेंचे यश आणि त्यांनी सुरू केलेले सामाजिक कार्य काही मंडळींना सहन झाले नाही. या मंडळींनी अगदी खालच्या पायरीला जाऊन त्यांच्यावर आरोप केले. त्यांच्यावर चिखलफेक करण्याचाही प्रयत्न सुरू केला.

त्यामुळे १९२३ मध्ये विठ्ठल शिंदेनी कंटाळून मिशनचे दायित्व ज्या समाजासाठी ते कार्य करीत होते, त्यांच्याकडे सोपवून ते मिशनच्या कार्यातून कायमचे मुक्त झाले.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

अस्पृश्यता हा राजकीय प्रश्न बनविला :- डिप्रेस्ड क्लास मिशनच्या कार्यातून मुक्त झाल्यानंतर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण करण्याच्या कामावर पुन्हा प्रामुख्याने भर दिला. अस्पृश्यता हा मानवजातीला लागलेला एक कलंक असून, तो शक्य तितका लवकर दूर झाला पाहिजे.

नसता त्याचे दूरगामी परिणाम होतात, असे विठ्ठल शिंदेंना वाटत होते. त्यांनी ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध इ. स. १९३३ मध्ये कोल्हापूर येथे प्रकाशित केला.  या प्रबंधात त्यांनी अस्पृश्यतेच्या दूरगामी परिणामांचा विचार मांडला. त्या प्रबंधात ते म्हणाले, अस्पृश्यांना आपण उदार दृष्टीने आपल्यात मिसळून घेतले पाहिजे.

त्यांचा वेगळा नाव निर्देशही आपण करता कामा नये. असे जर आपण केले नाही तर अस्पृश्यता ही मुसलमानांसारखा सवता-सुभा निर्माण होईल आणि तो झाल्यास आपल्याला अखेरपर्यंत जाचक होऊन बसेल. आत्महिताच्या दृष्टीने आपण विचार केला तरीही अस्पृश्यांना वर आणणे, हे आपले कर्तव्य ठरते.

राजकारणामध्ये ब्राह्मणेतर मुसलमान जे स्वतंत्र सुभे निर्माण झाले; त्याचप्रमाणे अस्पृश्यांचासुद्धा तिसरा सवत-सुभा निर्माण होऊन तिसरी मेख तयार होत आहे. हे देशाच्या दृष्टीने घातक ठरेल. यावरून स्पष्ट होते, की विठ्ठल शिंदे यांना दूरदृष्टी होती. अस्पृश्यतेमुळे राष्ट्रहिताच्या कामात बाधा निर्माण होते. म्हणून अस्पृश्यता हा विषय संपला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

अस्पृश्यता निवारणाला केवळ सामाजिक पाठिंबा असून चालणार नाही, तर राजकीय पाठिंबा मिळाला पाहिजे याची जाणीव विठ्ठल शिंदेना होती. त्यामुळे त्यांनी सामाजिक कार्यातून अस्पृश्यता नष्ट करताना तो प्रश्न राजकीय व्यासपीठावर मांडण्याचे प्रयत्न केले. विठ्ठल शिंदे हे काँग्रेसच्या विचारांशी संबंधित होते.

त्यांनी इ. स. १८९५ पासून काँग्रेसच्या विविध अधिवेशनात सहभाग घेतला होता.  त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना विठ्ठल शिंदेच्या अस्पृश्यता निवारण्याचे कार्य माहीत होते. इ. स. १९१७ मध्ये कलकत्ता येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले. या अधिवेशनाच्या अध्यक्षा डॉ. ॲनी बेंझट या होत्या. या अधिवेशनात विठ्ठल शिंदेनी अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला होता. अशा रीतीने विठ्ठल शिंदेंनी अस्पृश्यता निर्मूलन कार्याला राजकीय रूप प्राप्त करून दिले.

भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद :- महर्षी विठ्ठल शिंदेंनी इ. स. १९१७ मध्ये अस्पृश्यता निर्मूलन कार्याला राजकीय स्वरूप प्राप्त करून दिले. त्यांनी इ. स. १९९८ मध्ये मुंबईमध्ये २३ ते २५ मार्चदरम्यान अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद आयोजित केली. या परिषदेचे अध्यक्ष बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड होते. या परिषदेमध्ये बॅरिस्टर जयकर यांनी असा ठराव मांडला, की निकृष्ट वर्गावर लादलेली अस्पृश्यता ताबडतोब काढून टाकावी.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रत्येक प्रांतातील वजनदार, प्रतिष्ठित, प्रभावी कार्यकर्ते व पुढान्यांची अस्पृश्यता निवारणाच्या संबंधात एक जाहीरनामा काढून शाळा, दवाखाने, न्यायालय या सार्वजनिक संस्था आणि विहीर, कालवे, धरणे, तलाव, नगरपालिकेचे सार्वजनिक पाणवठे, सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे व देवालये या ठिकाणी अस्पृश्यांना मोकळीक द्यावी, असे या परिषदेचे मत आहे. हा ठराव पास करण्यात आला. या परिषदेला बाळ गंगाधर टिळक उपस्थित होते.

व्हायकोम सत्याग्रह – विठ्ठल रामजी शिंदे इ. स. १९२३ मध्ये डिप्रेस्ड क्लासच्या कार्यातून निवृत्त झाले. त्यानंतर ते ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून दक्षिणेत गेले, ते मंगलोर येथे हिंदू पद्धतीने कीर्तन करीत असत. याच हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन लोक हजर राहत असत. दक्षिणेत त्रावणकोर संस्थानात व्हायकोम येथे इ. स. १९२४ मध्ये मोठा सत्याग्रह करण्यात आला.

व्हायकोम या गावात अस्पृश्य लोकांवर फार बंधने होती. तेथील मंदिरात जाण्या-येण्याच्या रस्त्यावर अस्पृश्य लोकांना फिरण्याची मनाई होती. याउलट मुसलमान, ख्रिश्चन इत्यादी कोणत्याही परधर्मीय लोकांना मंदिराच्या वाटेवर फिरण्याची मोकळीक होती.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

एवढेच नव्हे; तर मंदिरांच्या मंडपात, बाह्य मंडपात अशा परकीय लोकांना प्रतिष्ठितपणे नेमण्यात येत असे. हा अन्याय नार करण्यासाठी व्हायकोम येथे सत्याग्रह करण्यात आला. हा विषय प्रामुख्याने धार्मिक व अस्पृश्यता निर्मूलनाचा होता. इंग्रज सरकार भारतातील धार्मिक बाबींमध्ये लक्ष घालत नसल्यामुळे व्हायकोम येथे अस्पृश्यतेसारख्या अनिष्ट प्रथा चालूच राहिल्या.

विठ्ठल शिंदेंनी इंग्रज सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. यासंदर्भात ते म्हणतात, भारतातील लोकांच्या धर्मसमजुतींना हात घालायचा नाही. त्यामध्ये हस्तक्षेप करावयाचा नाही, हे सरकारचे धोरण इष्ट व आवश्यक असले तरी प्रजेपैकी काही वर्गाच्या धर्मसमजुती व सार्वजनिक शांतता इत्यादी बाबींवरून एखाद्या वर्गाच्या उपजत हक्कांची पायल्ली होते. तेव्हा सरकारने तिकडे कानाडोळा करणे म्हणजे आपल्या प्रजेचे पालन करण्याच्या कर्तव्यात काही प्रमाणात चुकणे होय.

व्हायकोम येथील अनिष्ट प्रथा व शिंदेंचे कार्य :- विठ्ठल शिंदे दक्षिणेत ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून काम करीत होते. ते काम करीत असताना त्यांनी तेथील सामाजिक स्थितीचा अभ्यास करून बारकाईने निरीक्षण केले. व्हायकोम येथे अनिष्ट व वाईट प्रथा सुरू होत्या.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

दक्षिणेत नायर व त्याखालच्या जातीची स्त्री वस्त्र वापरण्याच्या बाबतीत रानटी प्रवृत्तीचा वापर करीत असत. त्या स्त्रिया छातीवर कसल्याच प्रकारचे वस्त्र वापरत नसत. अर्धनग्न राहत असत. विठ्ठल शिंदेंनी त्यांना वस्त्र वापरण्याच्या बाबतीत चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला. व्हायकोम येथे अनेक सामाजिक प्रथा होत्या.

पिट्या या अस्पृश्य जातीचा शिवप्रसाद हा एक साधू होता. या साधूबरोबर विठ्ठल शिंदेनी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. या सत्याग्रहात साधू शिवप्रसाद यांना मंदिर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. याबाबत विठ्ठल शिंदेनी मंदिराचे व्यवस्थापक व संस्थानच्या दिवाणाकडे दाद मागितली, तसेच सत्याग्रहात भाषण करून अस्पृश्यांना मंदिर प्रवेश दिला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

याच वेळी संस्थानच्या दिवाणाचा निरोप आला, की साधू शिवप्रसाद हे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आहेत. तेव्हा त्यांनी मी हिंदू नाही, असे जाहीर करावे; परंतु हा तोडगा विठ्ठल शिंदे व साधूशिवप्रसाद यांनी मान्य केला नाही. यानंतर व्हायकोम येथे मोठी सभा घेऊन त्या विठ्ठल शिंदेनी लोकांना मंदिर प्रवेशासाठी करण्याचे आवाहन केले. विठ्ठल शिंदेच्या या सत्याग्रहामुळे त्यांचे ब्राह्मो समाजाचे आचार्यपद जागृत काढून घेण्यात आले.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

शेतकरी चळवळ :- भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील ८०% लोक शेतकरी आहेत. शेती हेच त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. थोडक्यात शेतकरी हा देशाचा आत्मा आहे. तो सुखी असेल तर देश सुखी होईल; परंतु शेतकरी सुखी न राहता तो कर्जबाजारी, नडलेला व सावकाराच्या गुलामगिरीत अडकलेला होता.

महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांची ही स्थिती पाहून त्यांच्यात प्रबोधन घडवून आणले. त्याचीच पुढील पायरी विठ्ठल शिंदे यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन आणि संघटन केले. इ. स. १९२६ ते १९२९ या कालखंडात त्यांनी शेतकरी चळवळीत मोलाचे योगदान दिले. इ. स. १९२१ ते १९२९ या कालखंडात जागतिक महामंदीचे संकट जगावर कोसळले.

त्याचा परिणाम अर्थव्यवस्था विस्कळीत होण्यात झाला. कोकण व वन्हाड प्रांतात महसूल गोळा करण्यावरून वाद निर्माण झाले. धान्याच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान्याऐवजी रोख रकमेच्या स्वरूपात खंड देण्याचे निश्चित केले. यावरूनच शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला.

याच काळात गुजरात प्रांतात सरदार वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली बारडोली येथे शेतकऱ्यांचा सत्याग्रह झाला. विठ्ठल शिंदेनीसुद्धा महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या परिषदा घेऊन त्यांना संघटित केले.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

परिषदेतील भाषणामध्ये ते म्हणतात, शेतकरी तोच आहे, की जो आपल्या कुटुंबाच्या व आपल्यावर अवलंबून असलेल्या नातेवाईकाच्या पोषणाला, शिक्षणाला व योग्य त्या सुखसोयींना आवश्यक असेल इतकीच आणि आपल्याला वाहित करता येईल इतकीच जमीन बाळगतो.

जो योग्य रीतीने खरोखरच जमीन वाहतो, तोच खरा खेतकरी होय. शेतकरी अज्ञानी असल्यामुळे त्याची स्थिती वाईट झाली होती.  त्याला सज्ञान केल्यास त्याच्यात बदल होईल, असे विठ्ठल शिंदेंना वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

शेतकरी साक्षर झाला तर देशाचा विकास होईल व भांडवलदारांचे प्राबल्य कमी होईल, असेही शिंदेंना वाटत होते. अस्पृश्यतेचा प्रश्न सामाजिक व राजकीय जुलमाचा आहे. त्या काळातील इंग्रज सरकारच्या धोरणावर टीका करताना विठ्ठल शिंदे म्हणतात, शेतकऱ्यांच्या स्थितीत बदल करावयाचा असेल तर तो सक्तीच्या शिक्षणामुळे होणार आहे.

शेतकन्यांची भरभराट करावयाची असेल तर त्यांना सामाजिक शिक्षण दिले पाहिजे, तसेच त्यांची भरभराट सामाजिक शिक्षण व हितसंबंधाच्या सहकार्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. विठ्ठल शिंदेनी अस्पृश्य शेतकऱ्यांनासुद्धा जागृत केले. अस्पृश्य लोक जमीनदाराकडे पगारी गुलाम म्हणून काम करीत होते.

जमीनदार लोक अस्पृश्यांना आपल्या शेतीत रात्रंदिवस राबवीत असत. मात्र, त्याचा मोबदला दिला जात नव्हता. विठ्ठल शिंदेंनी अशा अस्पृश्य लोकांना संघटित करून त्यांना जमीनदाराकडून योग्य दाम मिळविण्यासाठी प्रयत्न केले. थोडक्यात विठ्ठल शिंदेच्या कार्यामुळेच स्वातंत्र्यानंतर कुळ कायदा व विनोबा भावेंची भूदान चळवळ आकारास आली.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

मांगाची वसाहत :- महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंनी आपले कार्य अस्पृश्यता निवारणापुरतेच मर्यादित ठेवले नव्हते, तर त्यांनी सामाजिक कार्य करीत असताना समाजप्रबोधन आणि राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवले. मांग ही दलितजातीपैकी एक जात होय. ही जात हक्क व अधिकारापासून वंचित होती.

इंग्रजांनी गुन्हेगार म्हणून या जातीवर शिक्का मारलेला होता. त्यामुळे या जातीतील लोकांवर अन्याय होत असत.  या लोकांवर हजेरी पद्धत लादून त्यांना वेठीस धरण्यात आले. या जातीतील स्त्रिया व मुलेही या हजेरी पद्धतीपासून सुटू शकले नाहीत.

मांग या उपेक्षित समाजाच्या जीवनामध्ये सुधारणा व्हावी आणि त्यांचे दारिद्र्य नष्ट व्हावे, या हेतूने विठ्ठल शिंदेंनी इंग्रज सरकारपुढे मांग वसाहत संकल्पना सादर केली. त्यानुसार सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर पहिली वसाहत उभारण्याचे ठरले.

इ. स. १९१३ मध्ये विठ्ठल शिंदेंनी मांग वसाहतीसाठी जागा निश्चित केल्या. त्यासाठी प्रारंभिक खर्च म्हणून २००० रुपये मिळण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारकडे अर्ज सादर केला; परंतु इंग्रज सरकारला मांगाची वसाहत उभी करण्याची मुळात इच्छा नसल्यामुळे वेगवेगळ्या कारणास्तव हा प्रकल्प पुढे ढकलला.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

शेवटी पहिल्या महायुद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना विठ्ठल शिंदेंनी मांग वसाहतीसाठी निश्चित केलेली जागा मिळविण्यात इंग्रज सरकारच्या कारणामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. तरी ते नाराज झाले नाहीत. ते नेहमी म्हणत असत, की कामे भरपूर आहेत. त्यासाठी कोणताही देवदूत येणार नाही. त्यामुळे देवदूत येण्याची वाट पाहण्यात वेळ घालण्यापेक्षा आपल्याला जे काम करता येणे शक्य आहे, ते करावे.

मुरळी प्रतिबंधक सभा :- विठ्ठल रामजी शिंदेंनी अनेक सामाजिक अनिष्ट रूढी व परंपरांविरोधी दंड थोपटले होते. महाराष्ट्र, कर्नाटक प्रदेशात खंडोबा नावाची देवता समाजप्रिय व लोकप्रसिद्ध होती. आपल्याला मूल होण्यासाठी खंडोबाला नवस करण्याची प्रथा समाजात प्रचलित होती. आपल्याला जे पहिल मूल होईल ते खंडोबाला वाहिले जाईल, असा नवस केला जात असे.

अशा वेळी नवस केलेल्या जोडप्याला झालेले पहिले मूल खंडोबाला वाहिले जात असे. अशा मुलास वाघ्या व मुलीस मुरळी म्हटले जात असे. वाघ्याच्या वनात फारसा फरक पडत नसे; परंतु मुलीला (मुरळीला) देवाची दासी म्हणून आजन्म राहावे लागत असे. तिला विवाह करता येत नव्हता. कर्नाटकात संबरदेतीच्या देवीला मुरळी सोडण्याची धार्मिक पंरपरा होती.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

मुरळी अर्थात देवदासीवर जुलूम आणि अत्याचार केले जात असत. विठ्ठल शिंदेची आजी वल्लम्माची भक्तीण होती. देवीची पूजा व लिंब नेसणे या गोष्टी त्यांना लवयापासूनच माहीत होत्या. मुरळी व देवदासींचे आयुष्य कसे बरबाद होते, तिच्यावर जुलूम व अत्याचार कसे केले जातात, तसेच समाजातील धनदांडगे लोक त्यांच्यावर लैंगिक अत्याचार कसे करतात, याची जाणीव विठ्ठल शिंदेना होती.

त्यामुळे त्यांनी मुरळी (देवदासी) या वयाने लहान असून, त्या अस्पृश्य समाजातील असत. २५ एप्रिल १९१० रोजी विठ्ठल शिंदेंनी देवदासी या समाजघातक प्रदेवर एक सभा घेतली. त्याच वेळी मुरळी करण्यासाठी घेऊन जात असणाऱ्या एका लहान मुलीची सुटका केली.

ही प्रथा बंद करण्यासाठी कार्यकर्त्यांचा संघ उभारला व कार्यकर्त्यांनी मुरळी अर्थात देवदासी या प्रथेत सुधारणा करून त्यांच्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर काही कार्यकर्त्यांनी मुरळी झालेल्या मुलींबरोबर लग्न करून समाजात एक आदर्श निर्माण केला.

स्त्री अत्याचारमुक्तीची परिवर्तनवादी चळवळ म्हणून विठ्ठल शिंदेच्या कार्याकडे पाहिले जाते. विठ्ठल रामजी शिंदे यांनी केवळ स्त्री अत्याचाराच्या मुक्तीसाठीच प्रयत्न केले नाहीत, तर शेतकरी व अस्पृश्यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे म्हणूनही त्यांनी अनेक सभा-संमेलनांतून आपली भूमिका स्पष्ट मांडली. मुलींनासुद्धा शिक्षणाची सक्ती करावी यासाठीही त्यांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरतात.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

असहकार आंदोलन व विठ्ठल शिंदे :- विठ्ठल रामजी शिंदे हे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींचे पुरस्कर्ते होते. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि महात्मा गांधींकडे राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व आले. राष्ट्रीय काँग्रेसच्या आदेशानुसार महात्मा गांधींनी इ. स. १९२० मध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन सुरू केले.

या आंदोलनान विठ्ठल रामजी शिंदे यांनी सहभाग घेऊन पुणे येथे नेतृत्व करावे, अशी विनंती हरिभाऊ फाटक व बाबु काका कानीटकर यांनी केली. त्यानुसार एप्रिल १९२० मध्ये विठ्ठल शिंदे यांनी असहकार आंदोलनाच्या दौऱ्याचा प्रारंभ केला. त्यांनी हवेली, खेड तालुका व पुणे शहराच्या आसपासचा भाग ढवळून काढला. त्यांनी आपल्यासोबत तरूणांचे पथक उभे केले. सत्याग्रहाचा झेंडा हातात घेऊन त्यांनी गावागावांत दौरे काढले व प्रभातफेया काढल्या.

त्यांच्या प्रचारदीन्यामुळे ग्रामीण भागातील जनता ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध पेटून उठली. विठ्ठल शिंदेंनी पुणे येथील असहकार चळवळीचे नेतृत्व केल्याने ब्रिटिश सरकारने त्यांना अटक केली. त्यांनी येरवडा येथील कारागृहात सहा महिने शिक्षा भोगली, कारागृहात निकृष्ट दर्जाचे अन्न-पाणी दिले जात होते, तसेच त्यांच्याकडून कठीण परिश्रम करून घेतले जात होते. त्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम झाला; परंतु त्यांनी ब्रिटिश सरकारपुढे शरणागती न पत्करता करावास सहन केला आणि आपल्या ध्येयाशी ते एकनिष्ठ राहिले.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

साहित्यिक व संशोधक :- विठ्ठल रामजी शिंदे हे थोर साहित्यिक व तत्त्वचिंतक आणि संशोधक होते. त्यांनी तरुण वयातच कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांना कामाच्या व्यापामुळे कादंबरीचे लेखन करता आले नाही. त्यांनी कवने रचण्याचे काम केले. त्यांनी रचलेला महात्मा फुलेंचा पोवाडा प्रसिद्ध आहे. ते रोजनिशी लिहीत असत. आपण केलेल्या दररोजच्या कामाचा वृत्तांत त्यामध्ये असेही रोजनिशी पुस्तकरूपाने प्रकाशित झाली आहे.

कारागृहात असतानाच त्यांनी ‘माझ्या आठवणी’ व ‘अनुभव’ या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखन केले. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिले. हे लेख आज पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहेत. या लेखाचे संपादन म. पं. मंगूडकर यांनी केले असून, हा ग्रंथ पुणे येथील ठोकळ प्रकाशनने प्रकाशित केला आहे. विठ्ठल शिंदे यांनी ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध लिहिला.

हा प्रबंध नागपूर येथील नवभारत ग्रंथालयाने इ. स. १९३३ मध्ये प्रकाशित केला. हा संशोधन ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरलेला आहे. इ. स. १९३५ मध्ये बडोदा येथे साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनात विठ्ठल शिंदे यांनी तत्त्वज्ञान शाखेचे अध्यक्षपद भूषविले. विठ्ठल शिंदेंनी केलेले सामाजिक कार्य अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांच्या या कार्याची नोंद बडोदा सरकारने त्यांना इ. स. १९३२-३३ मध्ये ‘दलितमित्र’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल शिंदेंच्या कार्याचे महत्त्व :- विठ्ठल शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचे, दलितांचा उद्धार करण्याचे आणि उपेक्षित, वंचित वर्गाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले. राजर्षी शाहू महाराजांनी २६ जुलै १९०२ रोजी आपल्या कोल्हापूर संस्थानात सरकारी मोकन्यांत ५० % आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उद्योगधंद्यांना भरीव स्वरूपाची मदत केली.

त्यामुळे कोल्हापूर संस्थानाच्या स्थितीत बदल झाले; परंतु या संस्थानाबाहेरील उपेक्षित दलितांची स्थिती वाईट होती. त्यामुळे परिवर्तन घडविण्यासाठी इ. स. १९००-१९९७ या कालखंडात कोणीही समाजसुधारक अस्तित्वात नव्हते. इ. स. १९९७ नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने उपेक्षित अर्थात दलित समाजाला समर्थ नेतृत्व प्राप्त झाले.

याचवेळी इ. स. १९०६-१९९८ या कालखंडात विठ्ठल शिंदे यांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निवारणाचे कार्य तन-मन-धनाने केले. त्यांनी कधीही राजकीय लाभ घेतला नाही. ते पुणे नगरपलिकेच्या निवडणुकीत अस्पृश्यांच्या मतदारसंघात उभे न राहता सर्वसाधारण गटातून उभे राहिले. ते निवडणुकीत पराभूत झाले. त्यांना सर्व समाज एका पातळीवर असला पाहिजे, असे वाटत होते.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

कोणत्याही विशिष्ट समाजाला वेगळी वागणूक दिल्यास धोक्याचे ठरू शकते, असे त्यांचे मत होते. अस्पृश्यतेच्या स्वतंत्र मतदारसंघावरून शिंदे यांच्यात आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभेद होऊन त्यांनी परस्परांवर टीकाही केली; परंतु हे वैचारिक मतभेद होते. हे सोडले तर त्या दोघांचीही उपेक्षित व वंचित समाजाबद्दलची आस्था आणि कार्याचा मोठेपणा मान्य करावा लागेल.

विठ्ठल शिंदे यांनी समाजसुधारणेचे कार्य करीत असताना इतर समाजसुधारकांचीही दखल घेतली. अनेक ठिकाणांहून समाजसुधारणेचे कार्य होत राहिले, तर अस्पृश्यता लवकर नष्ट होईल, असे त्यांचे मत होते. त्यामुळे त्यांनी इतर समाजसुधारकांच्या कार्याचा गौरव केला. विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे सामाजिक कार्य चालविले होते.

ते कार्य पाहून शिंदे म्हणतात, देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य पाहूनही विठ्ठल शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. विठ्ठल शिंदे यांनी सतत १२ वर्षे समाजसुधारणेच्या कार्यात घालविली. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी समाजाची मानसिकता तयार करण्याचे कार्य केले. जातिभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा व दगडधोंड्यांनी व्यापलेली महाराष्ट्र भूमी आपल्या कार्यांनी भुसभुशीत केली. त्यांच्या कार्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले.

Maharshi Vitthal Ramji Shinde – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

आजार आणि मृत्यू :- विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाजसुधारणा, अस्पृश्यता निर्मूलन आणि उपेक्षित समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती केली. जनसभा घेतल्या व समाजप्रबोधने केली. परिणामी इ. स. १९३५ पासून त्यांना अनेक रोगांनी पछाडले. त्यांचे प्रवास व कष्ट झेपेनासे झाले.

त्यातच त्यांना गोवर नावाचा आजार प्रचंड वेदनामय असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला. इ. स. १९४३ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व त्यांचे शरीर लुळे पडले. त्यामध्येच त्यांचा २ जाने १९४४ रोजी अंत झाला; परंतु त्यांचे विचार आणि कार्यामुळे ते अजरामर राहिले. 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment