Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

Mahatma-Jyotiba-PhuleMahatma Jyotiba Phule Information in Marathi

११ एप्रिल १८२७ मध्ये गोविंदराव चिमणाबाई यांना एक मुलगा जन्माला झाला. तोच महात्मा जोतिराव फुले होय. फुलेंना राजाराम नावाचा एक भाऊ होता. माळी कुटुंबामध्ये जन्माला आलेले महात्मा जोतिराव फुले हे एक वर्षाचे असतानाच त्यांची आई चिमणाबाई मरण पावली; परंतु त्या काळात बहुपत्नीत्व पद्धत असूनसुद्धा त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला नाही.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

महात्मा जोतिराव फुलेंच्या संगोपनासाठी त्यांनी एका दाईची व्यवस्था केली. त्या काळात गोविंदरावांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन मोठे करण्याचा प्रयत्न केला; परंतु ही गोष्ट फारशी सोपी नव्हती. जोतिराव फुलेंचे मूळ गाव सातारा जिल्ह्यात कठाव तालुक्यातील होते. त्यांचे आजोबा शेटीबा हे स्वभावाने साधे आणि भोळे असल्यामुळे ते कर्जबाजारी झाले.

त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी पुणे येथे आले. त्यांना राणोजी, कृष्णा व गोविंदराव अशी तीन मुले होती. त्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे त्यांच्या तिन्ही मुलांना उपजीविकेसाठी फुलांचा व्यवसाय करावा लागला. या व्यवसायामध्ये त्यांनी नावलौकिक वाढविला.

त्यामुळे माधवराव पेशव्यांच्या दरबारात या मुलांना सजावटीचे काम देण्यात आले. त्यांनी केलेली सजावट पाहून खूश होऊन माधवराव पेशव्यांनी त्यांना फुलांच्या उत्पादनासाठी ३५ एकर जमीन दिली.  त्यामुळे त्यांचा फुलांचा व्यवसाय जोरात सुरू झाला. फुलांच्या व्यवसायावरूनच त्यांना ‘फुले’ हे नाव पडले.

त्यांचे मूळ आडनाव गोन्हे होते. शेटीबाच्या मृत्यूनंतर त्यांचा थोरला मुलगा राणोजी यांनी संपूर्ण जमीन बळकावून कृष्णा व गोविंदराव या दोन भावांना घरातून हाकलून दिले. त्यामुळे उपजीविकेसाठी गोविंद रावांनी भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. अशातच त्यांचे लग्न चिमणाबाई नावाच्या स्त्रीशी झाले.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

महात्मा जोतिराव फुलेंनी समाजसुधारणेचे केलेले कार्य समाजक्रांतिकारक होते. त्यांच्या कार्यामुळेच समाजात क्रांतिकारक परिवर्तन होऊ शकले. त्यामुळे महात्मा फुलेंचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यांच्या या कार्यासाठी घालविलेल्या महात्मा फुलेंचा गौरव करणे उचित होते.

११ मे १८८८ मध्ये मुंबई शहरातील नागरिकांची एक जंगी जाहीर सभा मांडली. कोळीवाडा हॉलमध्ये आयोजित करण्यात आली. या सभेत मुंबई शहारातील प्रतिष्ठित नागरिक, दुकानदार, कारखानदार व मजूर इत्यादी मिळून २५०० लोक जमा झाले होते.

यामध्ये किसान कामगार भरपूर होते. या सभेत मुंबईच्या नागरिकांनी महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी त्यांनी जोतिरावांना ‘महात्मा’ ही पदवी अर्पण केली. यानंतर अल्पावधीतच म्हणजेच २८ नोव्हेंबर १८९० मध्ये महात्मा फुलेंचा मृत्यू झाला,

शिक्षण :- महात्मा फुले यांच्या काळात ब्राह्मणेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. त्या काळात आजसारखे शिक्षण सार्वजनिक नव्हते. त्या काळात शिक्षण ही ब्राह्मणांची मक्तेदारी होती, तसेच त्या काळात मराठी गावठी शाळा, पंतोजीच्या शाळा आणि ख्रिश्चन मिशनन्यांनी सुरू केलेल्या शाळा प्रचलित होत्या. गोविंदरावांनी इ.स. १८३४ मध्येच जोतिरावांना मराठी शाळेत घातले.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Maharshi Dhondo Keshav Karve – महर्षी धोंडो केशव कर्वे

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi – बाबासाहेब आंबेडकर

त्यांनी लवकरच शिक्षणात प्रगती केली. विनायकराव जोशी हे फुर्लेचे पंतोजी होते; परंतु ही गोष्ट ब्राह्मण कारकुनास सहन झाली नाही. हा पोरगा शिकला तर लिहिण्याचा धंदा तो आपल्या हातात घेईल. मग आपणास लबाड्या करून भोळ्या कुळास पूर्वीप्रमाणे फसविता येणार नाही.

त्यामुळे आपल्या नोकरीवर पाणी पडेल, अशी भीती त्यास वाटू लागली. इंग्रज सरकारने क्षुद्रांसाठी शाळा काढल्या; पण ती गोष्ट ब्राह्मणांना बरी वाटली नाही. त्यांनी लगेच धर्म बुडाला! कलियुग आले! विद्या नीच घरी गेली! म्हणून हल्लकल्लोळ उडविला. एवढेच नाही, तर त्यांनी लोकांना धार्मिक धाक दाखविणे सुरू केले.

त्यांनी लोकांना असाही उपदेश केला, की तुमच्या मुलांना शाळेत बसवून तुमचे उद्योगधंदे बुडवावे असा इंग्रज सरकारचा डाव आहे. तुम्ही आपला पारंपरिक व्यवसाय सोडून मुलांना शाळेत जाऊ देऊ नका. गोविंदरावांच्या कारकुनाने व इतर ब्राह्मणांनीही गोविंदरावांना जोतिरावांना शाळेत घालून ऐदी बनविण्यापेक्षा बागेत काम करावयास शिकवा.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

म्हणजे तो तुमचे व कुटुंबाचे पुढे पालनपोषण करील, असा उपदेश ऐकून साध्या-भोळ्या गोविंदरावांनी जोतिरावांना इ.स. १८३८ मध्ये शाळेतून काढले व त्यांना आपल्या बागेत कामाला लावले. इ.स. १८३४ पासून इ.स. १८३८ पर्यंत जोतिरावांनी मराठी शिक्षण पूर्ण केले. त्या काळात बालविवाह प्रथा होती. जोतिराव आता तेरा वर्षांचे झाले होते.

इ.स. १८४० मध्ये त्याचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. या वेळी सावित्रीबाईचे वय आठ वर्षांचे होते. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये झाला होता. सावित्रिबाई या नायगाव (तालुका खंडाळा, जि. सातारा) येथील खंडोजी नेवसे पाटलांच्या कन्या होत्या.

गोविंदरावांच्या बागेशेजारी गफ्फार बेग मुनसी या नावाचे मुसलमान जातीचे विद्वान गृहस्थ राहत होते. त्यांनी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लेजिट साहेब यांनी जोतिराव फुले व गोविंदरावांना शिक्षणाबाबत चांगला उपदेश केला. त्यामुळे गोविंदरावांनी इ.स. १८४१ मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी जोतिरावांना स्कॉटिश मिशनऱ्यांच्या इंग्रजी शाळेत घातले.

त्यांना इंग्रजी पहिल्या वर्गात बसविण्यात आले. शाळेत शिक्षण घेत असताना त्यांना बरेच ब्राह्मण व ब्राह्मणेतर मित्र मिळाले. सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो, विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, वासुदेव बाबाजी नवरंगे व उस्मान शेख हे त्यापैकीच होत. अशा प्रकारे जोतिरावांनी इ.स. १८४१ ते इ.स. १८४७ या कालखंडात मिशनरी शाळेत सात पुस्तकांपर्यंत अभ्यास पूर्ण केला.

ब्राह्मणेतर मुलांनी विद्या शिकू नये, यासाठी ब्राह्मण लोकांकडून धर्माचा धाक दाखविला जात असे. त्यामुळे ब्राह्मण विद्यार्थ्यांनीच बहुतेक शाळा गच्च भरलेल्या असत. बोटावर मोजण्याइतके जे ब्राह्मणेतर विद्यार्थी शिक्षण घेत असत, त्यांच्यावर भट ब्राह्मणाची खुनशी व करडी नजर असे.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

इंग्रजांनी पेशवाई नष्ट केल्यामुळे इंग्रजांनी राजवट उलथून पुन्हा पेशवाई आणण्यासाठी ब्राह्मण मंडळी अनेक कटकारस्थाने करीत होती. त्यामुळे ब्राह्मण लोक ब्राह्मणेतर अज्ञानी लोकांत इंग्रजांबद्दल द्वेष निर्माण करून त्यांना इंग्रजांच्या विरोधात बंड करण्यासाठी प्रवृत्त करीत असत.

ब्राह्मणेतर विद्याथ्र्यांना इंग्रजांविरुद्ध भडकावून देण्यासाठीही ब्राह्मण शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट, थॉमस पेन व जॉर्ज वॉशिंग्टनचे चरित्र त्यांना शिकवू लागले; परंतु याचा परिणाम ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांवर चांगलाच झाला.

या काळात लहूजीबुवा साळवे मांग यांच्याकडे अनेक जण दांडपट्टा, ढाल-तलवार व गोळीबार करण्याचे शिक्षण घेत असत. महात्मा फुलेही त्यापैकीच एक होते. अशा लष्करी शिक्षण घेतलेल्या विद्याथ्र्यांनी इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरोधी झालेल्या बंडात सहभाग घेतला; परंतु महात्मा फुले व त्याचें मित्र मात्र बंडापासून दूर राहिले. ते ब्राह्मणांच्या भूलथापांना बळी पडले नाहीत.

विचारवंताचा प्रभाव :- सदाशिवराव गोवंडे हे महात्मा फुलेंचे विद्यार्थीमित्र होते. ते हुशार आणि महत्त्वाकांक्षी होते. या दोघांनीही छत्रपती शिवाजी महाराज आणि अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टनच्या चरित्राचा अभ्यास केला. थोर पुरुषांच्या स्वदेशी प्रेमवीरवृत्ती आणि उदार दृष्टिकोनाने महात्मा फुले प्रभावित झाले. येथूनच त्यांनी मायभूमी आणि देशबांधवांच्या उद्धारासाठी आयुष्यभर कष्ट करण्याचे ठरविले.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

त्यांच्या दृष्टीने सर्वच स्तरांत परिवर्तन घडवून आणणे महत्त्वाचे होते. जॉर्ज वॉशिंग्टनप्रमाणे थॉमस पेन यांच्या विचारानेही महात्मा फुले प्रेरित झाले. थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ द मॅन’ या ग्रंथातील उदात्त विचाराचा प्रभाव महात्मा फुलेंवर पडल्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील समाजामध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणण्याचे ठरविले.

महात्मा फुले समाजक्रांतीकडे का वळले ? :- महात्मा फुलेंनी शिक्षण घेतल्यानंतर आणि ख्रिश्चन व इस्लाम धर्माचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर तसेच समाजातील जातीयता, अस्पृश्यता, विषमता व आर्थिक दुरवस्था पाहिल्यानंतर समाजपरिवर्तनासाठी सामाजिक क्रांती करण्याचे निश्चित केले. आपल्या या ध्येयासाठी समाजक्रांतीचा झेंडा सर्वप्रथम महात्मा फुलेंनीच उभा केला.

त्यांनी शस्त्रविद्येत पारंगत असलेल्या लहूजीबुवा साळवे मांग यांच्याकडून नेमबाजी व दांडपट्टा चालविण्याचे शिक्षण घेतले, तसेच काही तरूणांना त्यांनी संघटित केले; परंतु मूठभर तरूणांच्या संघटनेने ब्रिटिश सत्तेला विरोध करून चालणार नाही याची जाणीव महात्मा फुलेंना होती. त्यामुळे त्यांनी शस्त्रक्रांती करून ब्रिटिश सत्तेला नमविण्याचा मार्ग सोडून दिला आणि सामाजिक क्रांती करूनच समाजाचे स्वरूप बदलून टाकण्याचे ठरविले.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

यासाठी त्यांनी लोकसेवा करण्याचे व्रत स्वीकारले. ठरविलेल्या ध्येयानुसार महात्मा फुले आयुष्यभर सामाजिक कार्य करीत राहिले. हे कार्य करीत असताना अनेक धर्ममार्तंड व सनातनी लोकांनी महात्मा फुलेंची निंदा-नालस्ती, टिंगल-टवाळी करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली व त्यांना प्रसंगी मारहाणही केली; परंतु महात्मा फुले हे स्वीकारलेल्या कार्यापासून अजिबात ढळले नाहीत.

ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे पुण्यातील पेशव्याचें राज्य बुडाले होते. त्यामुळे पुण्यातील ब्राह्मण ब्रिटिश राजवटीवर नाराज असणे स्वाभाविक होते. त्यांना पेशवाईचे राज्य पुन्हा निर्माण व्हावे, असे वाटत होते. त्यामुळेच शाळेत ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना इंग्रजांच्या विरोधात बंड करण्यासाठी प्रवृत्त करीत असत.

महात्मा फुलेसुद्धा आपल्या मित्रांच्या मदतीने ब्रिटिशाचें राज्य उलथून टाकण्याचे व देश स्वतंत्र करून त्यास बलवान करण्याचे ध्येय उराशी बाळगून होते; पण ब्रिटिश राजवटीच्या विरोधात उमाजी नाईक, दौलतराव नाईक, भाऊ खरे, चिमणाजी जाधव, नाना दरबारे, बापू मांगरे व राघोजी मांगरे यांनी केलेले उठाव इंग्रजांनी मोडून काढले होते, याची कल्पनाही त्यांना होती.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

शेवटी हे एकट्याचे काम नाही, हे ओळखून त्यांनी शिक्षण संपल्यानंतर आपल्या वंशपरंपरागत फुलमाळ्याचा व्यवसाय सुरू केला. याशिवाय याच सुमारास त्यांच्या जीवनात एक अनपेक्षित घटना घडून आली. त्यामुळे त्यांनी ब्रिटिश राजवट उलथून टाकण्याऐवजी आपले लक्ष समाजक्रांतीकडे केंद्रित केले.

शालेय जीवनात जोतिरावांना अनेक ब्राह्मण मित्र मिळाले होते. त्यापैकी एका ब्राह्मण मित्राने त्यांना त्याच्या विवाहाचे आमंत्रण दिले.  त्यानुसार जोतिराव मोठ्या प्रेमाने त्या मित्राच्या विवाहास गेले. नवरा मुलगा नवरीकडे वऱ्हाडी मंडळीसहित मिरवत जात होता.

मिरवणुकीत स्त्रिया, मुले व पुरूष मंडळी होती. मिरवणुकीत अर्थात लग्नाच्या वरातीत सर्व ब्राह्मण मंडळींसह चालत होते; परंतु ब्राह्मणेतर बहुजन म्हणजेच अतिक्षूद्र समाजात ब्राह्मणांबरोबर नुसत्या साध्या रस्त्यानेही चालण्याचा हक्क नव्हता, याची कल्पना मात्र त्यांना नव्हती.

जोतिरावांना मिरवणुकीत पाहून ब्राह्मण मंडळीत कुजबूज सुरू झाली. जोतिरावांचे हे धर्मबाह्य कृत्य सनातनी ब्राह्मण मंडळींना सहन झाले नाही. ते तिरस्कार बुद्धीने एकमेकांस विचारू लागले, की काय हो, हा कुणबट क्षूद्र ब्राह्मण मंडळीत शिरला कसा? याला येथे कोणी बोलाविले? हा उर्मट आहे कोण? याला ब्राह्मण मंडळींबरोबर चालण्यास शरम कशी वाटत नाही? ब्राह्मण आजच लयास गेले की काय?

ब्राह्मणाचें शब्द जोतिरावांना ऐकू येत होतेच. तेवढ्याच त्यांना एका कडव्या ब्राह्मणाने पुढे येऊन दरडावून म्हटले, की अरे ए कुणबटाच्या पोरा, खबरदार, आम्हा ब्राह्मण मंडळींबरोबर चालशील तर ! तू जातीने क्षूद्र असतानाही आमच्या ब्राह्मण मंडळींबरोबर चालतोस ! तुझ्या स्पर्धाने आम्हा ब्राह्मणांना विटाळ होत नाही काय? तू आमचे मागून चाल !

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

ब्राह्मणांचे धमकीवजा बोलणे ऐकून जोतिराव सुरवातीस गोंधळून गेले; परंतु लगेच ते भानावर आले. ब्राह्मणांकडून झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही. तो त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे ते लग्नाच्या मिरवणुकीतून रागाने बाहेर पडले व तड़क आपल्या घरी निघून गेले.

घरी आल्यानंतर मिरवणुकीत घडलेला प्रसंग त्यांनी आपल्या वडिलांना सांगितला, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले की, ब्राह्मण भूलोकीचे साक्षात देव आहेत.  त्यांना आपल्या क्षूद्रांचा विटाळ होतो. तू यांच्यात कशाला गेला होतास? ब्राह्मणांची बरोबरी आपण कधीही करू नये.

हे इंग्रजांचे राज्य आहे म्हणून बरे. जर आज पेशवाई असती तर तुला या गुन्ह्याबदल काय शिक्षा झाली असती कुणास ठाऊक. ब्राह्मणांची बरोबरी केल्याच्या आरोपावरून अनेकांना कठोर शिक्षा केल्या जात असत.  पेशवाईत वाकडे धोतर, वाकडे गंध, वाकडी पगडी, वाकडा जोड़ा व गळ्यात जानवे ब्राह्मणांशिवाय कोणीही घालू नये, असे कायदे होते.

एखाद्या क्षूद्राने या कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याला कठोर शिक्षा करण्यात येत असे. थोडक्यात, समाजव्यवस्थेतील ब्राह्मणांचे सर्वोच्च स्थान व क्षूद्रातिक्षूद्रांना दिली जाणारी हीन व अपमानास्पद वागणूक व सामाजिक विषमता महात्मा फुलेंना मान्य नव्हती. शिवाय, वरील प्रसंगामुळे ते व्यथित झाले होते. त्यामुळेच समाजपरिर्वतनाच्या चळवळीकडे ते वळले.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य

स्त्रियाची स्थिती :- महात्मा फुलेंच्या काळात महाराष्ट्रातील स्त्रियाची समाजातील स्थिती अत्यंत वाईट होती. समाजव्यवस्थेत त्यांना हीन दर्जा होता. स्त्री ही सुखाची व उपभोगाची वस्तू आहे, अशी समजूत तत्कालीन समाजात रूढ होती. स्त्री पुरूषापेक्षा कनिष्ठ असून, तिचे कार्य ‘चूल आणि मूल’ एवढ्यापुरतेच मर्यादित मानले जात होते.

स्त्री ही कुटुंबाचा घटक आहे. ती पतीची अर्धागिनी आहे, असे मानले जात होते; परंतु प्रत्यक्षात स्त्रियाची अवस्था शोचनीय होती. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांनी शिक्षण घेतल्यास त्या आणि शिक्षणसुद्धा भ्रष्ट होते, अशी कल्पना समाजात रूढ होती. हे सर्व बदलले पाहिजे, अशी भूमिका महात्मा फुलेंनी घेतली.

अशा अवस्थेत केवळ महात्मा फुलेंनाच स्त्रियांबद्दल कळकळ निर्माण झाली. त्यांच्या मते स्त्री ही समाजाचे मूळ आहे. म्हणूनच त्यांनी स्त्रियांच्या उद्धाराचे व त्याचें दुःख निवारण्याचे कार्य केले. हे कार्य करीत असताना जोतिरावांनी सर्व जातींतील स्त्रियाचा विचार केला.

स्त्रीशिक्षणाचे महत्त्व :- समाजपरिवर्तन व विकासाच्या दृष्टीने शिक्षणाला फार महत्त्व आले, असे महात्मा फुले याचें मत होते. शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली. गतिविना वित्त गेले. वित्तविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, स्त्रिया आणि क्षुद्रातिक्षुद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नसल्याने त्याची अधोगती झाली. त्यामुळे त्यांना शिक्षण देणे महात्मा फुलेंनी प्रथम ओळखले व त्यांनी स्त्रिया आणि दलितांच्या उद्धारासाठी शैक्षणिक कार्याला प्रारंभ केला.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

स्त्रियाची शाळा :- महात्मा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांच्या शैक्षणिक कार्याला प्रारंभ केला. त्यांनी स्त्रियांची शाळा काढण्यापूर्वी देशात इ. स. १८१९ मध्ये अमेरिकन मिशनने कलकत्ता येथे हिंदू मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मिशनने पुण्याच्या आसमंतात इ. स. १८४० मध्ये मुलींच्या शाळा सुरू केल्या.

पुण्यात स्कॉटिश ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीही एक मुलींची शाळा सुरू केली होती. परंतु ती लगेचच बंद पडली.  महात्मा फुलेनी मात्र सामाजिक रूढी, परंपरेविरूद्ध बंड उभारले आणि त्यांनी ऑगस्ट १८४८ मध्ये पुणे येथे बुधवारपेठेत असलेल्या तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

या कामात त्यांना तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, सखाराम यशवंत परांजपे, जगन्नाथ सदाशिव हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव बल्लाळ, गोवंडे, बापूसाहेब मांडे अणि मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी सहकार्य केले. या शाळेत क्षुद्रातिक्षुद्रांतील स्त्रियांना शिक्षण देण्यात येऊ लागले. क्षुद्रातिक्षुद्रांतील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी महात्मा फुलेंनी सुरू केलेली ही शाळा देशातील पहिलीच ठरते.

विधवा विवाहाचा प्रयत्न :- समाजात बालविवाह, जरठ विवाह, सती प्रथा व केशवपन या सारख्या अनिष्ट प्रथा होत्या. बालविवाहामुळे बालविधवाची संख्या वाढत असे. विधवांना विवाह करता येत नव्हता. त्यामुळे त्यांचे जीवन अत्यंत वाईट होते. त्यांना केवळ विशिष्ट प्रकारचीच वस्त्रे वापरावी लागत. त्यांना सामाजिक व धार्मिक समारंभात सहभागी होता येत नसे.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

पुरूष मंडळही त्यांच्याकडे वाईट नजरेतून पाहत असत आणि त्यांच्याशी अनैतिक संबंधांसाठी जबरदस्ती करीत. अशा प्रसंगी विधवांनाच दोष दिला जाई. स्त्रियांवरील हा अन्याय दूर होण्यासाठी समाजात पुनर्विवाहाची प्रथा रूढ झाली पाहिजे, यासाठी त्यांनी चळवळ सुरू केली.

८ मार्च १८६४ मध्ये त्यांच्या प्रयत्नाने पुण्यात गोखल्यांच्या बागेत एका शेणवी जातीतील अठरा वर्षांच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीतील विधुराबरोबर करण्यात आला. हा पहिला पुनर्विवाह होय. महात्मा फुलेंनी समाजातील नेत्यांशी चर्चा करून सभा व संमेलने आयोजित केली आणि समाजापुढे भाषणे देऊन विधवा विवाहाची आवश्यकता प्रतिपादन केली.

विधवांना केवळ पांढरे वस्त्र परिधान करावे लागे. त्यांना आर्थिक संपत्तीत वारसाहक्क नव्हता, तसेच त्यांना चविष्ट अन्नही घेण्याचा अधिकार नव्हता. त्यांचे जीवन वाईट असल्यामुळेच महात्मा फुलेंनी पुनर्विवाहाची चळवळ सुरू केली. महात्मा फुले यांचे स्नेही व त्यांच्या शिक्षण संस्थेतील एक सभासद विष्णू शास्त्री पंडित यांनी सरकारी नोकरीचा त्याग करून विधवा विवाहास उत्तेजन देण्याच्या कार्यास वाहून घेतले.

बहुपत्नीत्वाला विरोध :- महात्मा फुर्लेच्या काळात बहुपत्नीत्वाची पद्धत प्रचलित होती. ब्राह्मण व श्रीमंत लोक एकापेक्षा अनेक बायका करीत असत. स्त्री व पुरुष समान असल्याने हा अन्याय आहे, असे फुलेंना वाटत होते. पहिली पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी करणे, हा प्रकार फुलेंना त्यांच्या दृष्टीने निंदनीय होता.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

ते म्हणतात, पुरूषांना चार-चार बायका करण्यास परवानगी आहे, तर मग स्त्रियांनी चार-चार बायका लग्नाचे नवरे केल्यास चूक कशी होईल, ही गोष्ट जर पुरुषांना सहन होत नसेल तर स्त्रियांनी तरी त्यांच्या पतीने चार-चार लग्नाच्या बायका सहन का करावे? हा महात्मा फुलेंचा मूळ प्रश्न होता.

महात्मा फुलांना त्यांचे वय ३५ वर्षे होऊन गेले तरी पुत्रप्राप्ती झाली नव्हती, याचे दुःख त्याचे वडील गोविंदरावांना वाटत होते.  आपल्या थोरल्या मुलाप्रमाणे (राजाराम) धाकट्या मुलासही (जोतीराव) पुत्रप्राप्ती होऊन मरता-मरता नातवाचे तोंड पाहावे, असे गोविंदरावांना साहजिकच वाटत असे.

त्यांनी जोतिरावांनी दुसरी बायको करावी म्हणून कधी स्वतः तर कधी त्यांच्या मित्राकडूनही जोतिरावांचे मन बळविण्याचा प्रयत्न केला. जोतिरावांच्या सासऱ्यांनीही त्यांना पुत्रप्राप्तीसाठी दुसरे लग्न करण्याचा आग्रह केला; परंतु स्त्रीवर्गाच्या समान हक्कांसाठी झगडणाऱ्या जोतिरावांनी दुसरे लग्न करण्यास नकार दिला.

यासंदर्भात जोतिरावांनी व्यक्त केलेले मत अत्यंत महत्त्वाचे ठरते. ते म्हणतात, अमुक स्त्रीपासून पुत्र होत नाही, असे समजून घरात एक बायको असतानाही पुरुषाने दुसरा विवाह बिनदिक्कत करावा; परंतु अमुक पुरूषापासून पुत्र होत नाही, म्हणून नवरा असतांनाही एखाद्या स्त्रीने दुसरा नवरा करण्याचे ठरविले तर पुरुषवर्गास कसे वाटेल बरे! वाईटच वाटेल ना?

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

आणि स्त्रीकडून वरील प्रकार घडणे पुरुषांना जसा अन्याय, अनीती व अपमान वाटत नसेल काय? जरूर वाटत असेल. तुम्हाला जर स्त्रियाचे तसे आचरण आवडणार नाही, तर आपणा सर्व पुरूषाचे आचरण स्त्रियास तरी कसे आवडेल? कारण स्त्री व पुरूष हे एकसमान सर्व मानवी अधिकाराचा उपयोग घेण्यास पात्र आहेत.

असे असता स्त्रियांना एका तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरूषास दुसरा लागू करणे, हा निव्वळ पक्षपात होय. त्यामुळेच महात्मा फुले यांनी बहुपत्नीत्वास विरोध दर्शविला.

बालहत्या प्रतिबंधक गृह – महात्मा फुलेंनी विधवा पुनर्विवाहाचा जोरदार पुरस्कार केला असता, तरी त्यांना याबाबतीत समाजात फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. बालपणीच स्त्रियाचें विवाह होत असल्यामुळे समाजात कुमारी अर्थात बालविधवाचें प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे अशा विधवाचें अनैतिक संबंध निर्माण होऊन संतती जन्माला येत असे.

बऱ्याच वेळा समाजापासून स्वतःला वाचविण्यासाठी गरोदर राहिलेल्या विधवा जन्माला येणाऱ्या नवअर्भकाची हत्या करत असत.  अशा या स्त्रियाची समाजात जाचापासून सुटका करण्यासाठी महात्मा फुलेंनी इ.स. १८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.

अनैतिक मार्गाकडे जाऊन गरोदर राहिलेल्या विधवा स्त्रिया गुप्तपणे येऊन सुरक्षितपणे या बालहत्या प्रतिबंधक गृहाने जबाबदारी घेतली. अशा मुलाची सर्व सेवा करण्याचे काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी केले. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा स्त्री अनैतिक मार्गामुळे गरोदर राहिली.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंनी तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. पुढे याच स्त्रीने बालहत्या प्रतिबंधक गृहात प्रसूत होऊन इ.स. १८६५ मध्ये एका मुलाला जन्म दिला. याच मुलाला १८७३ मध्ये महात्मा फुलेंनी दत्तक घेतले.

हाच पुत्र डॉ. यशवंत फुले होय. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या कार्याचा प्रभाव लोकहितवादी, लाल शंकर, उमाशंकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर पडून त्यांनी जोतिरावांच्या कार्यास पाठिंबा दिला. त्यांनी पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.

बालविवाह अमान्य :- महात्मा फुलेंच्या पूर्वकाळापासूनच महाराष्ट्रात बालविवाह करण्याची प्रथा प्रचलित होती. विवाहाच्या वेळी मुलीचे वय आठ आणि मुलाचे वय बारा वर्षांचे असे. विवाहाच्या वेळी महात्मा फुलेंचे वय १३ व सावित्रीबाईंचे वय आठ वर्षांचे होते.

बालविवाहामुळे बालविधवाची संख्या वाढत असे. विधवांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. त्याचे जीवन वाईट असे, महात्मा फुलेंनी बालविवाहाच्या प्रथेला विरोध केला व त्यांनी बालविवाहाच्या विरोधात लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न केला.

जरठ विवाह अमान्य :- महात्मा फुलेंच्या काळात जरठ विवाह प्रथा प्रचलित होती. अशा विवाहात नवरी मुलीचे वय आठ-नऊ वर्षे व नवऱ्या मुलाचे वय ऐंशी वर्षे असे. पती-पत्नीत किमान तीस-पस्तीस वर्षांचा फरक असे. जरठ विवाहामुळे विधवाची संख्या वाढत असे. तसेच त्यांच्यावर अन्याय व जुलूम होत असे. त्यामुळे महात्मा फुलेंनी बालविवाहाप्रमाणेच जरठ विवाह प्रथेलाही विरोध केला.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

बालविवाह व बहुपत्नीत्व विवाह व त्यांच्या दुष्परिणामांबाबत फुलेंनी शास्त्रशुद्ध विचार मांडला आहे. लहान वयात लग्न केल्याने शेतकऱ्यांच्या कोवळ्या वीर्याचा भंग होत चालल्यावरून त्यांची संतती दिवसेंदिवस वीर्यहीन होत चालली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या दुष्परिणामामुळेच त्यांनी या विवाह प्रकारास विरोध दर्शविला. याबाबतीतही त्यांनी समाजप्रबोधन केले.

वाघ्या व मुरळी प्रथा :- महात्मा फुलेंच्या काळात अनेक अनिष्ट प्रथा प्रचलित होत्या. त्यापैकीच एक वाघ्या व मुरळी प्रथा होय. खंडोबा ही भारतीय समाजातील प्राचीन ग्रामदेवता आहे. खंडोबा हा मूळचा कर्नाटकातला लोकदेव असून, तो कर्नाटकात ‘मैलार’ या नावाने प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रात या देवतेचे माहात्म्य अनन्यसाधारण आहे. अस्पृश्यांपासून ब्राह्मणांपर्यंतचे लोक, तसेच मुस्लिम लोकही या देवतेचे उपासक आहेत.  महाराष्ट्रात विविध ठिकाणी २४५ खंडोबाची स्थाने आहेत. खंडोबा या देवतेला आपल्या इच्छापूर्तीसाठी लोक नवस करीत असत. पुत्रप्राप्तीसाठीही नवस केला जात असे.

अशा वेळी मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यास त्याला खंडोबाला वाहिले (अर्पण) जात असे. खंडोबाला सोडलेल्या किंवा वाहिलेल्या मुलाला वाघ्या व मुलीला मुरळी म्हणत असत. या मुरळींना समाजात जीवन जगणे मोठे कठीण असे. त्यांना देवदासी म्हणत.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

त्या मंदिराची साफसफाई व खंडोबाची सेवा करण्याचे काम करीत. त्यांचा विवाह खंडोबा या देवतेशी लावला जात असल्याने त्यांना विवाह करता येत नव्हता. गावातील पाटील, कुलकर्णी, वतनदार व श्रीमंत लोक मात्र त्यांचा शारीरिक उपभोग घेत असत.

त्यामुळे फुलेंनी मुरळी सोडण्याच्या अनिष्ट प्रथेला पायबंद घालण्याचा व मुरळीच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांना स्त्रियाचें पहिले उद्धारक व कैवारी समजले जाते.

दलिताचा उद्धार

दलिताची स्थिती :- महार, मांग, चांभार व ढोर या जातींचा समावेश दलित जातीत होत होता. या जातीतील लोकांना अस्पृश, अंत्यज व अति शुद्र या नावानेही ओळखले जात असे. अस्पृश्यतेच्या नावाखाली त्यांना अत्यंत वाईट व अपमानास्पद वागणूक देण्यात येत असे.

त्याचा स्पर्श उच्चवर्णीयांना झाल्यास त्यांना विटाळ होत असे. विटाळ होऊ नये म्हणूनच उच्चवर्णीय लोक अस्पृश्याचा स्पर्श होणार नाही, याची काळजी घेत असत. अस्पृश्यांच्या सावलीचा व थुंकीचाही विटाळ भट ब्राह्मणांना येत असे. त्यामुळे अस्पृश्यांना सकाळी नऊ वाजेपर्यंत व सायंकाळी तीन वाजेनंतर शहरात फिरण्यास बंदी होती.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

शहरात फिरताना त्यांना प्रवेश करण्यास मनाई होती. शहरात फिरताना त्यांना थुंकण्यासाठी गळ्यात मडके बांधावे लागे. सार्वजनिक शाळा, पाणवठे व मंदिरातही त्यांना प्रवेश करण्यास मनाई होती. त्यांची वसाहत गावकुसाबाहेर ठेवली जाई. उच्चवर्णीयाची वेठबिगार वाहून व त्यांची सेवा-चाकरी करूनच त्यांना उदरनिर्वाह करावा लागत असे.

गावची सर्व हलकी व गलिच्छ स्वरूपाची कामे त्यांना करावी लागत. महार-मांगावर अस्पृश्यतेच्या नावाखाली होणारा जुलूम कमी करण्यासाठी महात्मा फुलेंनी दलिताचा उद्धार करण्याचे कार्य हाती घेतले.

दलित अस्पृश्यांसाठी शाळा (१८५१) :- महात्मा फुले यांनी स्त्रीशिक्षणाप्रमाणेच दलित अस्पृश्यांच्या शिक्षणालाही महत्त्व दिले. शिक्षणाशिवाय त्यांच्यात परिवर्तन होणार नाही, याची त्यांना जाणीव झाली. शिक्षणाच्या अभावामुळे ब्राह्मणेतर समाज नैतिक, बौद्धकदृष्ट्या पंगू झाला आणि त्याची व्यावहारिक क्षेत्रात पीछेहाट झाली. तसेच त्यांच आर्थिक शोषणही वाढले. त्यामुळे त्यांना शिक्षण देऊन सज्ञान करणे आवश्यक असल्याची जाणीव महात्मा फुलेंना झाली.

पाण्याची विहीर व हौद :- अस्पृश्य दलितांना सार्वजनिक पाणवठे आणि मंदिरात प्रवेश करण्यास मनाई होती. त्यामुळे पाण्यासाठी त्यांचे हाल होत असत. महात्मा फुले यांच्या पुणे येथील वाड्यात विहीर होती. ही विहीर आणि हौद त्यांनी अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी इ.स. १८६८ मध्ये खुला केला. स्वतःच्या वाड्यातील विहीर व हौद अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी खुले करणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय अस्पृश्योद्धारक ठरतात. इ.स. १८६८ मध्येच महात्मा फुलेंचे वडील गोविंदराव फुले मरण पावले.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

दलितांसाठी वाचनालय :- महात्मा फुले यांनी दलितांसाठी जशी पाहिली शाळा सुरू केली, त्याचप्रमाणे त्यांनी दलितांसाठी पहिल्यांदा वाचनालय सुरू केले. यासाठी त्यांना पुणे येथील काही सुशिक्षित लोकांनी सहकार्य केले. शिक्षण व वाचनामुळे मनुष्याच्या ज्ञानात भर पडते, तसेच तो आत्मनिर्भर बनतो. याशिवाय मनुष्यात विचार करण्याची क्षमता निर्माण होते, असे महात्मा फुलेंचे मत होते.

मराठा मुलांसाठी शाळा :- महात्मा फुले यांनी इ. स. १८४८ मध्ये जगन्नाथ सदाशिव हाटे व सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने पुणे येथे बुधवारपेठेत मराठा जातीच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा स्थापन केली. महात्मा फुलेंना घराबाहेर पडावे लागल्याने त्यांच्याकडे पैसा नव्हता. त्यामुळे त्यांना या शाळेत शिकविण्यासाठी शिक्षक मिळणे कठीण झाले.

शेवटी दोन पगारी शिक्षक त्यांना मिळाले. महात्मा फुले यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत ही शाळा चालविली. या शाळेत वाचन, लेखन, अंकगणित, व्याकरण, इतिहास-भूगोल, युरोप, आशिया व हिंदुस्तानचे नकाशे, बाळबोध, मोडी अक्षर वळविणे आणि एकेरी इष्टराशिकपर्यंत गणित इत्यादी विषयांचे शिक्षण दिले जात असे.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

प्रौढशिक्षण :- मराठा आणि अस्पृश्यांसाठी काढलेल्या शाळेत शिक्षणाचे व असलेली मुले-मुली शिक्षण घेऊ शकत असत. पण प्रौढ स्त्री-पुरूषांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी इ. स. १८५५ मध्ये रात्रीची शाळा सुरू केली. ही शाळा त्यांनी आपल्याच घरी चालविली. या शाळेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई दररोज दोन तास प्रौढ स्त्री-पुरुषांना शिकवीत असत.

समाजातील प्रत्येकास शिक्षण घेता यावे, हाच रात्रीची शाळा स्थापन करण्यामागचा महात्मा फुले याचा दृष्टिकोन होता. याच दृष्टिकोनातून पुढे भारत सरकारने प्रौढ स्त्री-पुरुषांना साक्षर करण्यासाठी प्रौढशिक्षण पद्धतीच्या अंतर्गत रात्रीच्या शाळा सुरू केल्या. यावरून फुलेंच्या प्रौढशिक्षणविषयक विचाराचे महत्त्व पटते.

प्राणावर संकट :- महात्मा फुले यांनी हाती घेतलेले स्त्री व दलितांच्या उद्धाराचे कार्य ब्राह्मण लोकांना आवडले नाही. त्यांनी इ. स. १८४८ मध्ये स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्याबरोबर ब्राह्मणांनी गोविंदराव फुलेंचे कान भरले. परिणामी, गोविंदरावांनी महात्मा फुलेंना त्यांच्या पत्नीसह घराबाहेर काढले. यानंतरही महात्मा फुलेंचे कार्य थांबले नाही, तर ते वाढतच गेले. मुलींची शाळा, अस्पृश्याची शाळा व मराठा-माळ्याची शाळा व ब्राह्मण धर्मावर रचलेले नाटक यामुळे ब्राह्मणांना महात्मा फुलेंचा संताप आला.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

त्यांनी महात्मा फुलेंना समाजसुधारणेचे कार्य सोडून देण्याचा सल्ला दिला तसेच धमक्याही दिल्या. पण फुले ऐकत नाहीत ते पाहून आपल्या ब्राह्मण धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी फुलेंचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. त्यांनी धोंडिराम नामदेव कुंभार व सज्जन रोडे मांग यांना रूपये एक हजार बक्षीस देऊ केले.

त्यानुसार या दोघांनी इ. स. १८५६ मध्ये एका मध्यरात्री फुलेंच्या घरी जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला; पण फुलेंनी स्वतःहोऊन मारेकऱ्यांपुढे मान केल्याने मारेकरी खजिल झाले व त्यांनी शस्त्रे खाली टाकून फुलेंची माफी मागितली. यानंतर ते फुलेचे एकनिष्ठ सेवक बनले.

व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न :- महात्मा फुलेंनी समाज सुधारण्यामध्ये व्यसनमुक्तीससुद्धा महत्त्व दिले. ते इ. स. १८७६ ते १८८२ पर्यंत ते पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. सदस्य म्हणून त्यांनी नगरपालिकेकडून गरीब जनतेच्या सोयीची अनेक कामे करून घेतली.

समाज व्यसनाधीन बनू नये यासाठी सरकारने पुणे शहरात दारू विक्रीसाठी दिलेले परवाने रद्द करावेत यासाठी महात्मा फुलेंनी चळवळ उभी केली. प्रसंगी त्यांनी सरकारला विरोधही केला. दारू म्हणजे विष, असे त्याचें मत होते. अशा कार्यामुळे काही प्रमाणात का होईना; परंतु बहुजन समाज व्यसनापासून दूर राहिला.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

सत्यशोधक समाजाची स्थापना :- महात्मा फुलेंनी सामाजिक परिवर्तनाचे जे कार्य हाती घेतले, ते कोणत्याही व्यक्तीला करणे शक्य नव्हते. या कार्याच्या यशस्वितेसाठी संघटनात्मक प्रयत्न करणे आवश्यक होते. यामुळे महात्मा फुलेंनीसुद्धा समता, स्वातंत्र्य, बंधुता या कार्यासाठी संघटनात्मक प्रयत्न करण्याचे ठरविले. २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

म. फुलेंचा सत्यशोधक समाज हा मानवता, बुद्धिप्रामाण्य व व्यक्तीस्वातंत्र्य या प्रमुख तत्त्वांवर आधारित होता. प्रचलित धर्मभेद, जातिभेद, प्रांतभेद, लिंगभेद हे खोटे, अन्यायी व मानवी विकासातील अडथळे आहेत. या भूतलावरील समस्त स्त्री पुरूष हे एक असून, त्यांनी परस्पर बंधुभावाने, एकजुटीने समान वर्तन करावे, असे त्यांचे मानवतावादी मत होते.

वेद, स्मृत, पुराणे, उपनिषदे इत्यादी धर्मग्रंथांतील शब्दप्रामाण्यापेक्षा त्यांना विचाराचें प्रामाण्य अधिक मोलाचे व आवश्यक वाटले. सर्व मानव ही एकच निर्मिकाची लेकरे असून त्या सर्वांना ईश्वरनिर्मित नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घेण्याचा समान अधिकार आहे. समाजातील प्रत्येक उपेक्षित माणसाला त्यांच्या विकासाची संधी मिळाली पाहिजे. समाजातील ज्ञानसत्तेचा, राजसत्तेचा, अर्थसत्तेचा सर्वांना न्याय वाटला असला पाहिजे. सत्यशोधकाची परंपरा ऐतिहासिकदृष्ट्या देशात फार प्राचीन आहे.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

सत्यशोधक समाज चळवळ ही एका विशिष्ट समाज व धर्माचे नेतृत्व करणारी चळवळ नसून, ती सर्वसामान्य अस्पृश्य समाजाची एक कार्यप्रवण चळवळ होती. या चळवळीत प्रामुख्याने भट, जोशी, ब्राह्मण यांच्या दास्यातून क्षुद्रातिक्षुद्राची मुक्तता करणे, मतलबी धर्मग्रंथाच्या आधारे क्षुद्राची होत असलेली लूट थांबविणे, क्षुद्रांमध्ये शिक्षणाचा प्रसार करून देऊन जातिव्यवस्थेमुळे निर्माण झालेली सामाजिक विषमता नष्ट करणे.

देव व भट यांच्यामध्ये दलालाची भूमिका वठविणारी भटशाही नष्ट करणे, समाजातील बहुजन समाजाला एक व्यासपीठ तयार केले जावे आणि या व्यासपीठावरून सत्याचा आग्रह धरून समाजजागृती करावी, असा महात्मा फुलेंच्या मनामध्ये विचार आला. या विचाराला अनुसरूनच त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

शेतकऱ्याची चळवळ :- भारत हा कृषिप्रधान देश आहे. महाराष्ट्रही याला अपवाद नव्हता. महाराष्ट्रातील शेतकरी व कामगार वर्ग हा आर्थिकदृष्ट्या सबल नव्हता. ते अज्ञानी होते. देशाची समृद्धी व भरभराट त्यांच्या कष्टावर अवलंबून होती; परंतु हे शेतकरी अज्ञान व कर्जबाजारीपणामुळे आर्थिकदृष्ट्या पिळले गेले होते.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात ‘शेतकऱ्यांच्या दयनीय’ स्थितीचे वर्णन केले आहे. महात्मा फुलेंनी स्त्री आणि अतिक्षुद्रांच्या केलेल्या उद्धाराच्या कार्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या स्थितीतही परिवर्तन करण्याचे कार्य केले. महात्मा फुलेंनी सरकारकडे शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे.

त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी वसतिगृहे स्थापन करावी आणि कनिष्ठ वर्गातील शिक्षकाची नेमणूक करून या मुलांना प्रशिक्षित करावे, तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण द्यावे, या मागण्या केल्या.  शेतकरी अज्ञान व अशिक्षित असल्यामुळे तो आर्थिकदृष्ट्या शोषित बनला आहे, तेव्हा त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे, असे महात्मा फुलेंचे मत होते.

सरकारी अधिकारी, कारकून आणि सावकार हे शेतकऱ्याचा जागोजागी अपमान करतात. त्याची अडवणूक करतात आणि त्याचें आर्थिक शोषण करतात. यावर बोट ठेवून महात्मा फुलेंनी सरकार व सावकारांच्या धोरणावर टीका करून शेतकऱ्यांच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी कार्य सुरू केले.

त्यांनी ‘दिनबंधू’ या वर्तमानपत्रातून लिखाण करून शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडली. इ. स. १८७६-७७ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे शेतकऱ्याची स्थिती हलाखीची बनली. त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी महात्मा फुलेंनी महाराष्ट्रव्यापी चळवळ सुरू केली.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

ही ती खतफोडीचे बंड म्हणून ओळखली जाते. इ. स. १८८८ मध्ये पुणे येथे इंग्लंडचा ड्यूक ऑफ कॅनॉट आला होता. त्याच्या समारंभास महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशात उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी ड्यूक यास शेतकऱ्यांच्या सुधारणा करण्याविषयी निरोप देण्यास सांगितले.

महात्मा फुलेंनी इंग्रज सरकारकडे शेतकऱ्यांना संरक्षण व उत्पन्नवाढीसाठी शेतीच्या विविध योजना आखण्याचा आग्रह धरला. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या शिक्षित मुलांना कनिष्ठ नोकऱ्या देण्यासाठीही प्रयत्न केले.

कामगार चळवळ :- महात्मा फुलेंनी ज्याप्रमाणे स्त्रिया, दलित व शेतकऱ्यांच्या उद्धाराचे कार्य केले; त्याचप्रमाणे त्यांनी  मजुरांच्या स्थितीतही सुधारणा करण्याचे कार्य केले. त्यांची प्रगती व्हावी म्हणून प्रयत्न केले. महात्मा फुले यांना कामगारांविषयी अत्यंत कळकळ वाटत होती.

मुंबईत कामगाराची संख्या भरपूर होती. मुंबईत वारंवार जात असल्यामुळे त्यांना गिरणी कामगारांच्या हाल-अपेष्टांविषयी चांगली कल्पना आली होती.  सूर्योदयापासून तो सूर्यास्तपर्यंत कामगार कामास जुंपलेले असत. दुपारी जेवणापुरतीच काय ती सुटी मिळत होती.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

महात्मा फुलेंचे मित्र मुंबईतील मुख्य सहकारी नारायणराव मेघाजी लोखंडे याची मदत घेतली व त्यांच्याच मदतीने कामगारांचे प्रश्न सोडविले. त्यामुळे नारायणराव लोखंडे यांना मजुरांच्या संघटनेचे पहिले जनक म्हटले जाते. इ. स. १७९२ ते १८७५ या काळात मुंबई व नागपूर येथे विविध उद्योग सुरू झाले होते. 

त्यामुळे ग्रामीण भागातील बेकार कारागीर हाच गिरणीत कामगार म्हणून भरती होत होता. इ. स. १८८७ पर्यंत मुंबई- ४१, कलकत्ता ५, मद्रास २, कानपूर २, हैदराबाद, इंदूर व नागपूर येथे प्रत्येकी १ याप्रमाणे ५३ गिरण्या चालू होत्या. वरील सर्व गिरण्यांतून कामगारवर्गाचे शोषण सातत्याने सुरू होते.

या कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता जोतिरावांच्या प्रेरणेने इ. स. १८८० च्या आरंभी एन. एम. लोखंडे यांनी बाँबे मिल हैंड असोसिएशन स्थापन केली. हिंदुस्थानात पहिली कामगार संघटना हीच मानली जाते. लोखडे हे पहिले कामगार नेते आणि जोतिराव फुले हे पहिले प्रणेते व पुरस्कर्ते आहेत.

कामगारवर्गाचे हाल पाहून महात्मा फुले यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे लोखंडे यांनी इंग्रज सरकार व मालक यांच्याकडे कामगारांच्या समस्या अर्ज व निवेदनाद्वारे पाठविल्या.  या कामगारांच्या प्रश्नांवर इंग्लंडमधील पार्लमेंटमध्ये आवाज उठविला गेला, महात्मा फुले यांनी आपल्या आर्थिक विचारात शेतकरी, ग्रामीण कारागीर आणि कामगार यांना केंद्रबिंदू मानले आहे.

त्यांच्याएवढा तळमळीचा विचारवंत व समाजसुधारक त्यांच्या काळात आणि नंतर प्रदीर्घ काळात त्यांच्याशिवाय दुसरा कोणीच निर्माण झाला नाही. म्हणून खऱ्या अर्थाने ज्योतिराव फुले हे समाज क्रांतिवीर ठरतात.

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

ग्रंथसंपदा :- समाजपरिवर्तनाच्या कार्याप्रमाणे महात्मा फुलेंचे वाङ्मयीन योगदानही महत्त्वाचे ठरते. त्यांनी वाङ्मयीन निर्मिती करून त्याद्वारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य केले. त्यांनी समाज धर्मसुधारणा, स्त्रियाचा उद्धार, अस्पृश्यता आणि शेतकऱ्याची स्थिती यासंबंधीचे विचार सात-आठ लहान गद्य-पद्यात्मक ग्रंथात व्यक्त केले.

त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांपैकी ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्यांचा आसूड’, ‘खतफोडीचे बंड’, ‘अस्पृश्याची कैफियत’ आणि ‘सत्यशोधक समाज’ हे ग्रंथ विशेष उल्लेखनीय ठरतात. महात्मा फुलेंनी लिहिलेल्या ग्रंथांतील भाषा ओबड-धोबड, अशुद्ध आणि ग्रामीण बोलीभाषेत असली, तरी त्यांच्या ग्रंथांतील लिहिण्यातून त्यांनी जनतेच्या दुःखास वाचा फोडली.

त्यामुळे त्यांच्या साहित्यात समाजाच्या दुःखाचे वर्णन केलेले आढळते, तसेच समाजाचे दुःख कमी करण्यासाठी त्यावर उपाय म्हणून महात्मा फुलेंनी लोकशिक्षणाचा प्रथम आग्रह धरला व त्यादृष्टीने त्यांनी कार्य केले. म्हणूनच त्यांना समाज क्रांतिकारक’ म्हटले जाते.

ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षणाचे शिल्पकार ठरतात. त्यांनी सुरू केलेल्या लोकशिक्षणाची परंपरा कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि दलितमित्र बापूजी साळुंके यांनी चालू ठेवली. 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment