Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

Pandita-Ramabai-Information-in-MarathiPandita Ramabai Information in Marathi

पंडिता रमाबाईंचा जन्म २३ एप्रिल १८५८ रोजी कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील माळेहरंजी गावानजीकच्या गंगामूळ या डोंगरमाथ्यावरील वस्तीत राहणाऱ्या कुटुंबात झाला. वडिलांचे नाव अनंतशास्त्री होते. अनंतशास्त्री हे वेदशास्त्र संपन्न व संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक व पुरोगामी विचाराचे होते. त्यांनी आपली पत्नी अंबाबाई, मुलगी रमा, मुलगा श्रीनिवास यांना संस्कृतचे व प्राचीन वैदिकशास्त्राचे उत्तम शिक्षण दिले.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

स्त्रियांना वेदांचे शिक्षण दिल्याबद्दल व कन्या रमा नऊ वर्षाची झाल्यानंतर तिचे लग्न न केल्याबद्दल नातीबांधवांनी अनंतशास्त्रीना वाळीत टाकले. समाजाच्या या जाचाला कंटाळून अनंतशास्त्री आपल्या पत्नी व मुलांसह तिर्थयात्रेला पायी निघाले. इ.स. १८७६ ते ७८ दरम्यानच्या भयंकर दुष्काळामुळे रमाबाईचे वडील व आईचे इ.स. १८७७ मध्ये निधन झाले. रमाबाई श्रीनिवास पोरके झाले.

त्यानंतर त्यांनी भारतभर संचार केला. या काळात त्यांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. जीवन जगत असताना कधी-कधी दुःख येतात, तो सामान्य माणूस सहन करतो. परंतु जर जीवन दुःखद घटनांची मालीकाच झाले तर त्याला तोंड देणे कठीन जाते. अशा दुःखाच्या प्रसंगातून स्वतःला सावरत समाजसेवेचे कार्य पंडिता रमाबाईनी केले.

त्यांच्या जन्मानंतर काही वर्षातच आई-वडिलांच्या मायेचे छत्र काळाने हिरावून घेतले. 1 भाऊही काळाच्या पडद्या आळ गेला. या दुःखातून स्वतःला सावरत संसार बसविला परंतु अवघ्या दोन वर्षातच अल्पशा आजाराने पतीचे निधन झाले. एवढेच नाही तर स्वतःच्या मुलीचा मृत्यूही स्वतःच्या डोळ्याने पाहवा लागला.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

या कौटूंबिक दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला असताना स्त्रियांच्या जीवनात आनंद फुलविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्याचीही समाजाने उपेक्षा केली. सर्व दु:खे, वेदना, यातना, उपेक्षा याचा त्यांनी घिरोदात्तपणे सामना करीत स्त्री जीवन सुधारण्याचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले. त्यांनी केलेला हा पराक्रम, दाखविलेले कर्तृत्व जगातील कोणत्याही योद्धयापेक्षा कमी नाही.

विद्यतेला मान्यता : आईवडिलांच्या मृत्यूनंतर रमाबाई व श्रीनिवास यांनी सूमारे सहा वर्षापर्यंत भारतभ्रमण केले. या काळात त्यांना खूप दुःख सोसावे लागले. अनाधिना दिवस काढावे लागले. अखेरिस ते इ.स. १८७८ ला कलकत्ता येथे आले. या ठिकाणी त्यांनी मोठमोठ्या पंडिताना व शास्त्रींना वादात हरवले.

रमाबाईच्या बुद्धीवैभवाने प्रभावित झाल्यामुळेच कलकत्यातील विद्वान, पंडित, समाजसुधारक इत्यादींनी सिनेट हॉल मधील सभेत रमाबाईना ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ ह्या पदव्या बहाल करण्यात आल्या. या सभेत त्यांच्या उत्स्फुर्त संस्कृत काव्यनिर्मितीचीही श्रोत्यांना प्रचिती आली. कलकत्ता येथेच बंगाली स्त्रियांनी त्यांना ‘भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण’ म्हणून मानपत्र दिले.

त्यामुळे पंडिता रमाबाईच्या नावलौकिकाची संपूर्ण देशाला ओळख झाली. या वेळेपासून त्यांना पंडिता रमाबाई या नावाने ओळखले जाऊ लागले. विशेष म्हणजे ‘पंडिता’ या पदवीने तत्कालीन काळात गौरविलेल्या त्या एकमेव महिला होत्या. त्यांना संस्कृतबरोबर मराठी, हिंदी, कन्नड ह्या भाषाही अवगत होत्या.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Karmaveer Bhaurao Patil – कर्मवीर भाऊराव पाटील

आंतरजातीय विवाह एक आदर्श : कलकत्याला वास्तव्यात असताना रमाबाईचे बंधू श्रीनिवास यांचा इ.स. १८८० ला मृत्यू झाला. पुन्हा एकदा त्यांना काळाने एकटे पाडले. कलकत्याला असतानाच त्यांना बाबू बिपीन बिहारीदास मेधावी या शुद्रजातीतील पदवीधर व पुरोगामी विचारांच्या वकिलाने लग्नाची मागणी घातली.

हि लग्नाची मागणी रमाबाईंनी विचारपूर्वक स्वीकारली व बिपीन बिहारीदास यांच्या सोबत १३ नोव्हेंबर १८८२ ला विवाह केला. हा आंतरजातीय विवाह होता. त्यामुळे सनातन्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. हा विवाह करून रमाबाईंनी समाजापुढे समानतेचा आदर्श उभा केला. विवाहानंतर त्यांना एक मुलगी झाली. तीचे नाव मनोरमा ठेवण्यात आले.

संसारिक सुख त्यांना अधिक काळ उपभोगता आले नाही. इ.स. १८८२ मध्ये अल्पशा आजाराने बिपीन बिहारिदास यांचे निधन झाले. रमाबाईच्या वाट्याला पुन्हा एकाकी जीवन आले. तथापि यावेळी लहानशी मनोरमा त्यांच्या सोबत होती.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

आर्य महिला समाजाची स्थापना : पती निधनानंतर पुनर्विवाहाचा विचार न करता स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करण्याचे पंडिता रमाबाईनी ठरविले. त्या एप्रिल १८८२ मध्ये पुण्यात आल्या. त्यांनी प्रार्थना समाजाच्या सहकार्याने १ मे १८८२ रोजी ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली. त्यानंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी या संस्थेच्या शाखा स्थापन करण्यात आल्या.

जात, कुळ, धर्म, पद यावर नजर न ठेवता सर्वच स्त्रियांना समान वागणूक मिळावी सर्वांगाने स्त्रियांची प्रगती व्हावी हा हेतू या संस्थेच्या स्थापने मागे होता. यामध्ये पंडिता रमाबाई, काशीबाई कानिटकर, रमाबाई रानडे, नियमितपणे व्याख्याने देत असत. पंडिता रमाबाईंनी एक नियम घातला होता की.

पुरुषांनी व्याख्यानास येताना आपल्या कुटुंबातील एक तरी स्त्री बरोबर आणली पाहिजे. हा नियम न पाळणाऱ्याला समेत बसू दिल्या जात नव्हते. अशा तऱ्हेची अट घालून पंडिता रमाबाईंनी स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. तेव्हा सभेसारख्या अपारंपरिक ठिकाणी पुरुषांसोबत महिलांनी जाणे म्हणजे एक क्रांतीच होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पंडिता रमाबाईंनी या संस्थेच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास व आत्मसन्मान निर्माण करण्याचा प्रयत्न केले.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

हंटर कमिशन पुढील साक्ष : भारतातील शिक्षणासंबंधीचा विचार करण्यासाठी इ.स. १८८२ च्या सप्टेंबर महिन्यात डॉ. सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग पुण्यास आले होते. या कमिशन पुढे पंडिता रमाबाईनी साक्ष दिली तेव्हा त्यांनी सांगितले, “स्त्रियांना फक्त संसारोपयोगी शिक्षणच न मिळता सर्व तऱ्हेचे शिक्षण मिळावे. मुलींच्या शाळा तपासणीस स्त्री अधिकारीच असाव्यात कारण हिंदू मूली परक्या पुरुषांसमोर बोलायला लाजतात.

त्यामुळे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माहीत असूनही ती द्यायला त्या संकोचतात त्याचप्रमाणे आपल्या अडचणीही त्या सांगू शकत नाहीत. त्यांच्या या वृत्तीमुळे पुरुष डॉक्टरांना आपली प्रकृती दाखवून औषध घेणे त्यांना अशक्य वाटते त्यासाठी स्त्रियांना वैद्यकीय शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी मोठी योजना सरकारने आखावी तसेच ज्या देशात स्त्रियांची स्थिती सुधारते त्याच देशाची एकदंर स्थिती सुधारते असे आपल्या देशाची आपणास उन्नती करावयाची असेल तर प्रथम येथील यांच्या स्थितीत सुधारणा घडवून आणण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. डॉ. सर विल्यम हंटर यांनी पंडिता रमाबाईने दिलेल्या साक्षसंबंधी म्हटले. “ही साहा म्हणजे फक्त त्यांचीच नसून या देशातील असंख्य आणि कर्तृवान अशा स्त्रियांचेही ते मनोगत आहे.”

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

खिश्चन धर्माचा स्वीकार : स्त्री सेवेचे कार्य प्रभावीपणे करण्याकरिता इंग्रजी व वैद्यकशास्त्र या विषयाचे ज्ञान असणे पंडिता रमाबाईना आवश्यक वाटत होते. त्यामुळे २० एप्रिल १८८३ रोजी आपल्या मुलीसह त्या इंग्लंडमधील बॉटीज या गावात गेल्या. येथे सॅटमेरी मठात राहील्या. याच मठात त्यांनी इंग्रजी व वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले हे शिक्षण घेत असताना येथे त्यांनी येशु ख्रिस्तांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला.

येशुंच्या स्त्रियांसंबंधी उदात्त विचाराने त्या खिश्चन तत्वज्ञाना कडे प्रभावित झाल्या. तसेच हिंदू धर्मात स्त्रियांना असलेल्या दुय्यम स्थानाविषयी त्यांना दुःख वाटू लागले. शेवटी त्यांनी बॉटिज येथील चर्चमध्ये आपल्या मुलीसह २९ सप्टेंबर १८८३ ला खिश्चन धर्म स्वीकारला.

परदेशातील वास्तव्यात रमाबाई ख्रिस्ती झाल्याची बातमी कळताच ‘इंदूप्रकाश’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘ज्ञानचक्षू’, पुणेवैभव’, ‘केसरी’ इत्यादी वर्तमानपत्रांनी रमाबाई बाटली’, ‘रमाबाईने शेवटी फसविले’ असा आरडाओरडा करून रमाबाईवर अपशब्दाचा वर्षाव केला.

तेव्हा महात्मा फुलेंनी पंडिता रमाबाईंची बाजू घेऊन इ.स. १८८५ ला सत्सार अंक क्र. १ व सत्सार अंक क्र.२ प्रकाशित करून पंडिता रमाबाईच्या टीकाकारांचा समाचार घेतला. तत्पूर्वी वैवाहिक जीवन जगत असताना पंडिता रमाबाईच्या पतीच्या ग्रंथालयातील बंगाली भाषेत असलेली एक बायबलची प्रत त्यांच्या वागण्यात आली.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

तेव्हापासून त्यांच्या मनात ख्रिस्त व त्यांचा धर्म याविषयी आस्था निर्माण झाली होती. तसेच पुणे येथे वास्तव्यास असताना खिरी मिशनन्यांसोबत त्यांचा संबंध आला. त्याचबरोबर हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा, परंपरा यामुळेही त्या ख्रिस्ती धर्माकडे वळल्या.

रमाबाईनी खिश्चन धर्म स्वीकारला असला तरी तेथील चर्चच्या लोकांनी त्यांच्यावर काही बंधने लादण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी त्यांचा विरोध करताना रमाबाईनी त्यांना म्हटले, “भारतीय पुरोहितांच्या जमातीपासून, त्यांनी घातलेल्या बंधनापासून मी स्वतःला प्रयत्नपूर्वक मुक्त करून घेतले आहे.

त्यामुळे त्यांच्यासारख्या आणखी काही लोकांच्या बंधनात सापडण्याची माझी मुळीच इच्छा नाही. धर्मगुरु जे काही सांगतील ते सर्वोच्च शक्तीची अधिकृत आज्ञा म्हणून मी मुळीच स्वीकारणार नाही. या मतभेदामुळे त्यांनी इंग्लंड सोडण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये इंग्रजी, शास्त्र व गणित यांचे शिक्षण घेत असताना वेल्टनहॅम येथील महिला महाविद्यालयात संस्कृत शिकविण्याचे कामही त्यांनी केले होते.

अमेरिकेचा प्रवास : आनंदीबाई जोशी इ.स. १८८६ ला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेल्या होत्या. त्यांच्या पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी तेथील प्राचार्य व आनंदीबाईनी पंडिता रमाबाईना आग्रह केला. त्यांच्या आग्रहावरून पंडिता रमाबाई अमेरिकेला गेल्या तेथे गेल्यानंतर त्यांनी भारतातील बालविधवांना उपयुक्त ठरणारी ‘बालोद्यान शिक्षणपद्धती’ची माहिती घेतली.

त्याचबरोबर फ्रॉयबेलच्या शिक्षण पद्धतीचाही अभ्यास केला. भारतात पंडिता रमाबाईंच्या बालविधवा उन्नतीच्या कार्यात मदत करण्यासाठी बोस्टन येथील लोकांनी इ.स. १८८७ ला ‘रमाबाई असोसिएशन’ नावाची संस्था स्थापन करून पुढील दहा वर्ष त्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ या पंडिता रमाबाईनी लिहिलेल्या ग्रंथाला अमेरिकेत खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

शारदा सदनची स्थापना : पंडिता रमाबाईंनी अमेरिकेहून आल्यानंतर न्या. रानडे, तेलंग, भांडारकर आणि चंदावरकर यांच्या सहकार्याने ११ मार्च १८८९ मध्ये मुंबईला ‘शारदा सदन’ची स्थापना करून विशेषतः विधवांसाठी शाळा, वसतिगृह सुरू केले. या संस्थेत दाखल झालेली पहिली बालविधवा शारदा गद्रे ही होती. तिच्याच नावावरून या संस्थेला शारदा सदन हे नाव देण्यात आले.

शारदा सदन काढण्यामागची भूमिका पंडिता रमाबाई अशी मांडतात, “तिला पाहताच माझ्या मनात कालवाकालव सुरू झाली (ती पाचव्या वर्षी विधवा झाली होती. त्यानंतर सासर-माहेरच्यांनी तिचा अतोनात छळ केला होता. ती कुरुप, काळी, तिरळी होती. एका सहृदय शेजाऱ्याला तिचा छळ बघणे असह्य झाल्याने त्याने तिला पंडिता रमाबाईच्या दाराशी आणून टाकली होती).

अशा या क्लेश भोगणान्या भगिनींसाठी काही करायला हवे असे जे विचार पूर्वी मनात येत के वायावरच असत. त्या विचारांना आता खराखुरा आकार येऊ लागला, हिंदू विधवांच्या वसतिगृहांचा एक आराखडा तयार करून तो आपल्या देश बांधवांपुढे मांडावा असे एक मोठे जोराचे विचार चक्र माझ्या डोक्यात फिरा लागले. शारदा सदमाच्या माध्यमातून बालविधवांच्या जीवनात नवचेतना आनण्याचे कार्य पंडिता रमाबाईनी केले होते.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

विशेष म्हणजे ज्या स्त्रियांना आजवर कधी आपुलकीचा सुखाचा एखादा शब्दही ऐकायला मिळाला नव्हता, अशा अनाथ व विधवा स्त्रियांना पंडिता रमाबाईनी शारदा सदनमध्ये प्रेम द जिव्हाळा याचा प्रत्यय आणून दिला. तसेच किती तरी विधवांचा पुनविवाह घडून आगला. घोडो केशव कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई (गोदुबाई) ह्या शारदा सदनच्याच बालविधवा सदस्य होत्या. पंडिता रामाबाईंनी खर्चाचा व वातावरणाचा विचार करून सदन इ.स. १८९० मध्ये मुंबईवरून पुण्यास हलविले.

पुण्यात शारदा सदनची इमारत बांधण्यात आली. शारदा सदनला अमेरिकेहून आर्थिक सहाय्य मिळत असे. यावेळी रमाबाई हिंदू मुलींना बाटवितात अशीही टीका होत होती. खुद्द लोकमान्य टिळक त्यांच्या केसरीमधून रमाबाईवर चौफेर हल्ला चढवित होते. मात्र गोपाळ गणेश आगरकरांच्या ‘सुधारक’ ने शारदा सदनची बाजू उचलून धरली आणि रमाबाईना नेहमी पाठिंबा दिला.

संमतीवय विधेयकाला पाठींबा : नागणी मलबारी व त्यांचे सहकारी यांनी संमतिवयासंबंधी कायदा करण्याची लावून धरली होती. पुण्यामध्ये पंडिता रमाबाई, काशीबाई कानिटकर यांनी स्त्रियांची सभा भरवली आणि संमतिवयाच्या कायद्याची मागणी करणाऱ्या अभिनंद केले, आपला पाठींबा दिला तसेच सरकारने संमतिवयाचा कायदा करावा असा अर्ज सरकारकडे पाठविला. या अर्जावर पुण्यातील जवळपात तीनशे स्त्रियांनी सह्या केल्या होत्या.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

इ.स. १८९१ मध्ये सरकारने संमति वयाचा कायदा पास केला. त्यामध्ये स्त्रियांच्या सभा, त्यांनी पाठविलेले अर्ज यांचा मोठा वाटा होता. संमतिवय विधेयक मंजूर झाल्यावर पुण्यातील सनातन्यांनी शारदा सदनवर अधिकच त्वेषाने हल्ले करायला सुरुवात केली. ही खिश्चन धर्माची संस्था असून संस्थेतील मुलींना खिश्चन धर्माचे शिक्षण दिले जाते. अशाप्रकारची टीका त्यांच्यावर होऊ लागली. त्यामुळे लोकांमध्ये या संस्थेविषयी गैरसमज निर्माण झाले.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

केडगावचे मुक्तिसदन : पुणे येथील शारदा सदनविषयी लोकांच्या झालेल्या गैरसमजूतीमुळे सनातन्यांनी केलेल्या विरोधाला कंटाळून पंडिता रमाबाईनी पुणे-दौड मार्गावरील केडगाव येथे इ.स. १८९८ मध्ये मुक्तिसदन’ची स्थापना केली. शारदा सदनप्रमाणेच मुक्तिसदनातही निराश्रीत मुली व स्त्रिया यांच्या राहण्याची जेवणाची व शिक्षणाची व्यवस्था केलेली होती. याच काळात काही दिवस त्या अमेरिकेला गेल्या होत्या.

अमेरिकेहून परत आल्यानंतर त्यांनी आपले कार्य विस्तृत केले. आजारी व अपंग रोग्यांची सेवा केली पाहिजे असे त्यांना वाटू लागले. या उद्देशाने त्यांनी कृपा सदनाला जोडून एका रुग्णालयाची स्थापना केली. मुक्तिसदनात प्रितीसदन, शारदा सदन आणि शांती सदन ह्याही इमारती होत्या. यात निरनिराळ्या गटातील स्त्रिया राहत असत. वृद्ध व आजारी स्त्रियांची व्यवस्था ‘सायं घरकूल’ मध्ये केलेली होती.

स्त्रियांना शारीरिक श्रमाचे महत्त्व पटावे, त्यांना स्वावलंबी होता यावे याकरिता स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इत्यादीचे शिक्षण दिले जात होते. मुक्ती सदनाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तुंचे उत्पादन येथील स्त्रियाच करीत असत.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

सामाजिक परिषद : इ.स. १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच इ.स. १८८७ मध्ये सामाजिक समस्यांविषयी विचार विमर्श करण्याकरिता सामाजिक परिषदेची स्थापना करण्यात आली होती. राष्ट्रीय काँग्रेसमधील बरेच सभासद सामाजिक परिषदेमध्ये भाग घेत. त्यामुळे प्रारंभापासूनच पद्धत अशी पडलेली होती की, राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच मंडपात सामाजिक परिषद भरत असे.

इ.स. १८८९ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात पंडिता रमाबाईच्या नेतृत्वाखाली आठ स्त्रियांनी भाग घेतला होता. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये स्त्रियांनी भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती. परंतु काँग्रेसध्या अधिवेशनात स्त्री समस्यांचा उल्लेखही झाला नाही. मात्र दुसऱ्याच दिवशी झालेल्या सामाजिक परिषदेमध्ये पंडिता रमाबाईंनी केशवपन, विचवा विवाह संदर्भात अतिशय हृदयद्रावक भाषण करून स्त्रियांचा प्रश्न मांडले.

दुष्काळ पिडितांची सेवा : एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात अनेकदा भिषण दुष्काळ पडले होते. यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ब्रिटिश सरकारने दुष्काळ पिडितांसाठी उचीत व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे दुष्काळाची समस्या अधिक भयंकर झाली. इ.स. १८९७ ला मध्यप्रदेशमध्ये दुष्काळ पडला होता.

दुष्काळात उपासमारीने मरत असलेल्या लोकांची माहिती पंडिता रमाबाईला मिळताच त्यांनी तेथे जाऊन तेथील ‘Poor House’ व ‘रिलीफ कॅम्प’मधील गुंडाच्या तावडीतून सोडवून सुमारे ६०० असहाय्य स्त्रियांना आश्रय देऊन जीवन दान दिले. इ.स. १८९७ च्या महाराष्ट्रातील दुष्काळातही पंडिता रमाबाईनी गरिबांना मदत केली.

इ.स. १९०० च्या दरम्यान गुजरातमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. तेव्हा त्यांनी गुजरात व काठेवाड येथून शेकडो स्त्रिया व मुले यांना मुक्ती सदनात आणले. सुमारे १०० जनावरेही सांभाळली.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

पंडिता रमाबाईची ग्रंथ संपदा : पंडिता रमाबाई विद्वान असून त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, हिब्रु इत्यादी भाषांचे ज्ञान होते. त्यांनी लिखाणाच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्या व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारावर प्रकाश टाकला.

त्यांच्या विद्वत्तेची किर्ती भारतातील सर्व प्रांताबरोबरच इंग्लंड व अमेरिकेतही पसरली होती. भारतातील स्त्रियांची स्थिती व त्यातील बदलाच्या जाणीवेने त्यांनी ‘स्त्रीधर्म नीती’ हे पुस्तक लिहिले. अमेरिकेत असताना हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे ‘द हायकास्ट हिंदू वूमन’ हे पुस्तक लिहिले.

अमेरिकेमध्ये पुस्तकाला खूप प्रतिसाद मिळाला. अमेरिकेत गेल्या तेव्हा ‘युनायटेड स्टेटची लोकस्थिती आणि प्रवास वर्णन’ हे पुस्तक लिहिले. ‘नवा करार’, ‘प्रभू येशू चरित्र’ (बायबल या खिस्ती धर्मग्रंथांचे मराठीत भाषांतर) : ‘भविष्य कथा’, इत्यादी पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

मृत्यू : पंडिता रमाबाईनी ज्या काळात स्त्रियांवर अनेक जाचक व कडक बंधने होती त्या काळात विद्वान स्त्री असा लौकिक संपादन केला होता. त्यांच्या विद्वत्तेला विरोध करत का होईना भारतीयांना ते मान्य करावेच लागले. त्यांच्या कार्याची विशेषता म्हणजे त्यांनी आपल्या जीवनाची दिशा स्वतः ठरविली.

त्यांच्या कार्याला प्रोत्साहीत करणाऱ्यांपेक्षा त्यांच्यावर टीका करणारे त्यांची निंदा करणारे अधिक होते. असे असतानाही न डगमगता, विरोधकांना भीक न घालता आपले कार्य सतत चालू ठेवले. विधवा स्त्रीला सुखी जीवन जगण्याचा अधिकारच नाकारणाऱ्या समाजाला विधवा स्त्रीने समाजसुधारणा करावी ही गोष्ट पचण्याजोगी नव्हती.

असे असताना विधवा स्त्रीने स्त्री सुधारणेचे कार्य करावे ही गोष्ट अतिशय क्रांतिकारी होती. त्यांनी आंतरजातीय विवाह करून जातिभेदाला छेद दिला. ज्यांना समाजाने स्त्री म्हणून हिनवल, प्रेम, आपुलकी याला पोरक केले अशा महिलांना पंडिता रमाबाईनी उराशी धरुन त्यांना प्रेम दिले. आत्मसन्मानाने जीवन जगायला शिकविले.

Pandita Ramabai Information in Marathi – पंडिता रमाबाई मराठी

स्त्रियांच्या उन्नतीशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही हे वास्तव समाजापुढे मांडले. राष्ट्रीय चळवळीत स्त्रियांचा सहभाग असावा याकरिता प्रयत्न केलेत. व्यक्तिगत जीवनात त्यांना अनेक दुःखे सोसावी लागली. लहान असताना आई-वडिलानंतर भाऊ, पती व शेवटी इ.स. १९२१ मध्ये मुलगी मनोरमाचाही मृत्यू आपल्या डोळ्याने पाहावा लागला.

स्वतःहा वैयक्तिक जीवनात अनेक दुःख सोसत असतानाच दुःखी पीडीत स्त्रियांच्या जीवनात सुखाची बाग फुलविणाऱ्या पंडिता रमाबाईच्या कार्याचा गौरवा करण्याकरिता ब्रिटिश शासनाने त्यांना इ.स. १९१९ मध्ये ‘कैसर-ई-हिंद’ ही पदवी व सुवर्ण पदक दिले. अशा क्रांतिकारी, त्यागी, समाजसुधारणेची तळमळ असणाऱ्या असामान्य कर्तृत्व करणाऱ्या पंडिता रमाबाईंचे निधन ५ एप्रिल १९२२ ला केडगाव येथे झाले. 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment