Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

Dr-Panjabrao-DeshmukhDr Panjabrao Deshmukh

शिक्षणमहर्षी, कृषिरत्न म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख हे होय. समाजोन्नतीसाठी शिक्षण प्रसार व लोकहितासाठी राजकारण हे त्यांच्या कार्याचे सूत्र होते. शिक्षणप्रेमी, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते, अस्पृश्य, महिला व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी झटणारे नेते म्हणून भाऊसाहेबांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरते.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

त्यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ मध्ये पापड ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई व वडीलांचे शामराव देशमुख होते. त्यांचे मुळ आडनाव कदम होते. त्यांच्या घराण्यात देशमुखी असल्यामुळे त्यांना देशमुख हे आडनाव मिळाले.

भाऊसाहेबांचे शालेय शिक्षण पापड, चांदूर रेल्वे, कारंजा आणि अमरावती या ठिकाणी झाले.  लहानपणापासूनच त्यांच्या मनामध्ये गरिबांविषयी कणव होती. प्राथमिक शाळेत शिकतानाचा प्रसंग आहे. एकदा भाऊसाहेब व त्यांचा वर्ग मित्र दोघेजण रस्त्याने पायी चालत शाळेत जात होते. उन्हाळ्याचे दिवस होते. मित्राच्या अंगात सदरा नव्हता.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

त्याच्या अंगाला चटके बसत होते. हे बघून भाऊसाहेबांचे संवेदनशील मन एकदम गहिवरून आले. त्यांनी स्वतःच्या अंगातील सदरा काढून आपल्या मित्राला दिला. अमरावतीच्या हिंदू हायस्कूलमधून इ.स. १९१८ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भाऊसाहेब उच्च शिक्षणाकरिता पुण्याला गेले.

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना महाराष्ट्रातील महामानवांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा प्रभाव भाऊसाहेबांवर पडला. इ.स. १९२० ला भाऊसाहेब उच्च शिक्षणाकरिता इंग्लडला गेले. यावेळी त्यांच्या वडिलांनी मुलाच्या शिक्षणाकरिता जमीन गहाण ठेवली पण मुलाचे शिक्षण थांबू दिले नाही.

इंग्डलमध्ये त्यांनी इ.स. १९२१ मध्ये केंब्रिज विद्यापीठातून बार-ॲट-लॉची पदवी संपादन केली. एडिंबरो विद्यापीठातून ते संस्कृत विषय घेऊन एम.ए. झाले. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने इ.स. १९२६ मध्ये ‘वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम व विकास’ या प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट बहाल केली.

इ.स. १९२६ मध्ये भारतात परत आल्यानंतर भाऊसाहेबांनी वकिलीच्या व्यवसायाला प्रारंभ केला. ‘देशाचे दुश्मन’ खटला विनामूल्य चालवून दिनकरराव जवळकरांना पूर्ण यश मिळवून दिले. २५ नोव्हेंबर १९२७ ला मुंबईतील सोनार जातीतील विमलाबाई सोबत सत्यशोधक पद्धतीने त्यांनी विवाह केला.

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Acharya Vinoba Bhave – आचार्य विनोबा भावे

Gopal Hari Deshmukh Lokhitwadi – गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी

राजकीय क्षेत्रातील सहभाग : राजकारण हे समाजकारणात उपयुक्त असणारे साधन आहे, परंतु ते सर्वश्रेष्ठ नाही. असा भाऊसाहेबांचा राजकारणाविषयी दृष्टकोन होता. त्यांनी भूषविलेल्या राजकीय पदांचा उपयोग समाजसेवेकरिता करून घेतला.

सत्तेच्या राजकरणात सतत वावरत असतानाही समाजहिताकडे आपले लक्ष केंद्रित करून बहुजन समाजाच्या चळवळीला सर्वसमावेशक तात्विक आधार दिला.  इ.स. १९२८ मध्ये अमरावती जिल्हा कौन्सिलचे ते अध्यक्ष झाले. इ.स. १९३० ला प्रांतिक कायदेमंडळावर त्यांची निवड करण्यात आली.

याच वेळी ते कृषी, शिक्षण, सहकार व लोककर्म या खात्यांचे मंत्री बनले. परंतु इ. स. १९३३ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. पुढे ते अमरावती मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष झाले. देवास संस्थानात राजकीय मंत्री म्हणूनही त्यांनी कार्य केले. भारताच्या घटना समितीचेही ते सभासद होते.

इ.स. १९५२, इ.स. १९५७ आणि इ.स. १९६२ असे तीन वेळा ते लोकसभेवर निवडून आले. ते दहा वर्ष देशाचे कृषी मंत्री व सहकार मंत्री होते. या काळात त्यांनी शेती व शेतकऱ्यांविषयी मोलाचे कार्य केले.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

शैक्षणिक कार्य : भाऊसाहेबांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शैक्षणिक वारसा पुढे चालविला. शिक्षण प्रसारामागे त्यांची कोणती भूमिका होती हे त्यांच्या पुढील विचारातून लक्षात येते. ते म्हणतात, “मी जरी बॅरिस्टर झालो असलो तरी माझ्या एकट्याचा काय उपयोग? माझ्यासारखे अनेक बॅरिस्टर तयार झाले पाहिजेत.

माझ्या विलायतेचा अनुभव हेच सांगतो की, आपल्या रक्ताचा एकेक थेंब, एकेक कण बहुजनांच्या अभ्युद्ययाकरिता खर्ची करीत रहा. ज्ञानयज्ञ अखंड चालू दे. विद्यामृतानेच विद्यार्थ्यात आणि विशेष करून विदर्भात नवचैतन्य निर्माण हाईल.”

विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना : गावातील गोर-गरिबांच्या मुलांना गावातील शाळेमधील शिक्षण संपल्यानंतर पुढील शिक्षण घेण्याविषयी अडचणी निर्माण होत. शहरात शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेकांना शिक्षण सोडावे लागत होते.

खेड्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये याकरिता इ.स. १९२६ ला भाऊरावांनी अमरावती येथे ‘श्रद्धानंद छात्रालय’ सुरू केले होते. या वसतीगृहामध्ये सर्व जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे. या कार्यासाठी भाऊसाहेबांना आबासाहेब खेडेकर, नानासाहेब मोहोड, मारोतराव कदम, दलपतसिंह चव्हाण आदी मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.

त्यानंतर विविध ठिकाणी अशाप्रकारचे वसतीगृह काढण्यात आले. एवढेच नाही तर लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे याकरिता इ.स. १९६३ मध्ये शिवाजी वसतीगृहाची स्थापना करण्यात आली होती.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार : भाऊसाहेबांनी अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे केले तसेच लोकांवर जादा कर बसवून त्या मार्गाने गोळा होणारा पैसा शिक्षणासाठी खर्च करण्याची योजना आखली. यानुसार करात १८ पैशावरून २७ पैशाची वाढ केली.

यामुळे अमरावती जिल्हा कौन्सिलच्या उत्पनात ५५ हजार रूपयांची वाढ झाली. त्यातून १०० सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची केंद्रे उघडली. ११ वर्ष वयापर्यंत मुलामुलींना शिक्षण सक्तीचे केले होते. पाल्यास न शिकविणाऱ्या पालकास दंड व शिकविणाऱ्या पालकास मदत करण्यास सुरुवात केली.

भाऊसाहेबांच्या या योजनेमुळे तेव्हा शिक्षण प्रसारात अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण विभागाने भारतात दुसरा क्रमांक मिळविला होता.

शिक्षण प्रभावी बिनविण्याचा प्रयत्न : शिक्षण प्रभावी व्हावे याकरिताही भाऊसाहेबांनी प्रयत्न केले. त्यांनी मिडल स्कूलच्या प्रश्नपत्रिका सर्वत्र एकच ठेवण्याचा आग्रह धरला होता. फिरती वाचनालये व बोडर्डाचे दवाखानेही काढण्यात आले होते. शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग असलेल्या शिक्षकाकडेही त्यांनी विशेष लक्ष दिले.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

१५ डिसेंबर १९२८ च्या जिल्हा कौन्सिल शिक्षक संघाच्या ठरावानुसार भाऊरावांनी, शिक्षकांना कार्यालयीन प्रवास भत्ता देण्यास सुरुवात केली. प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविल्या जाव्यात म्हणून त्यांनी ‘भारतीय प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेची स्थापना केली होती.

खेड्यातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांकरिता सोयी व सवलतींची व्यवस्था : इ.स. १९३० मध्ये भाऊसाहेबांची प्रांतिक कायदेमंडळावर निवड झाली. याचवेळी ते प्रातांच्या मंत्रिमंडळात शिक्षण, कृषी, सहकार व लोककर्म खात्याचे मंत्री बनले. यावेळी खेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी याकरिता काही धोरणात्मक निर्णय घेतले.

महाविद्यालयामध्ये प्रवेश देताना गुणक्रमानुसार प्रवेश दिला जात होता.  परंतु शहरातील विद्यार्थ्यापेक्षा खेड्यातील विद्यार्थी त्यांना असणाऱ्या अपुऱ्या शैक्षणिक सुविधांमुळे मागे पडायचे, त्यामुळे त्यांना प्रवेश क्वचितच मिळत असे. म्हणून भाऊसाहेबांनी खेड्यातील विद्यार्थ्यासाठी जागा राखून ठेवण्याचा आदेश काढला, तसेच शाळा व महाविद्यालय यांना जोडून असलेल्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सवलती देण्याचे धोरण स्वीकारले.

नागपूरच्या कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण फी मध्ये १/३ सुट दिली. भाऊसाहेबांच्या या धोरणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण सहज व सुलभतेने घेऊ शकत होते.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना : भाऊसाहेबांनी श्री शिवाजी मराठा हायस्कूल सुरू केले होते. त्यामुळे बहुजनांच्या मुलांना शिकण्याची अधिकच सोय झाली होती. काही समाज कंटक या हायस्कूलला तट्टा हायस्कूल म्हणून हिनवत असत. काहींना तर हे हायस्कूल पेटवून देण्याचाही प्रयत्न केला.

मात्र भाऊसाहेबांनी त्याकडे विशेष लक्ष देऊन हायस्कूलचे संरक्षण केले. नंतर १ जुलै १९३२ ला या हायस्कूलचे ‘श्री शिवाजी शिक्षण संस्था’ असे नामकरण झाले. याकरिता ए. डब्ल्यू. पाटील यांचे भाऊसाहेबांना सहकार्य मिळाले होते. भाऊसाहेबांनी या संस्थेद्वारे शिवाजी हायस्कूलची स्थापना केली. यानंतर अनेक शाळा त्यांनी ग्रामीण व शहरी ‘भागामध्ये काढल्या.

इ.स. १९४६ ला संस्थेने अमरावती, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रथम खाजगी महाविद्यालये काढली. या संस्थेने नवीन शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबरोबरच आर्थिक संकटात सापडलेल्या शाळा व महाविद्यालय ताब्यात घेऊन चालविण्याचे धोरण अवलंबिले. वन्हऱ्हाडात अनेक ठिकाणी आधीपासून सुरू असलेल्या शाळा.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

नॅशनल महाविद्यालयासारखी महाविद्यालय संस्थेला जोडून घेतली. इ.स. १९४८ व इ.स. १९४९ या दोन वर्षात संस्थेने अकोट, यवतमाळ, तेल्हारा, नांदूरा आणि नागपूर या शहरामध्ये नव्या शाळा सुरू केल्या. इ.स. १९४७ मध्ये मोर्शी येथील शिवाजी हायस्कूल, इ.स. १९४८ ला वर्धा येथील मॉडेल हायस्कूल आणि मुर्तिजापूरचे गाडगेबाबा हायस्कूल संस्थेला जोडण्यात आले.

इ.स. १९५७ मध्ये भाऊसाहेबांनी संस्थेद्वारे नागपूरला श्रद्धानंद बाल मंदिर, वरूड येथे जवाहर कॉटन मार्केट फंड कमिटीचे विद्यामंदिर, गाडगे महाराजांच्या स्मृति प्रित्यर्थ गाडगे महाराज प्राथमिक शाळा, शिवाजी नगर अमरावती, ज्यांना कामामुळे दिवसाला शिक्षण घेता येत नाही अशांसाठी ‘नाईट स्कूल’ सुरू करण्यात आले.

बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून संस्थेद्वारे वसतीगृह सुरू करण्यात आले होते. उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय म्हणून इ.स. १९६३ मध्ये लंडन येथे शिवाजी वसतिगृह स्थापन केले. इ.स. १९७० मध्ये या संस्थेची १७ महाविद्यालये,
७२ विद्यालये, २३ वसतीगृह, २० व्यायाम शाळा व १७ इतर सेवा केंद्रे होती.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री शिवाजी शिक्षण संस्थेविषयी म्हणाले होते, “डॉ. पंजाबरावांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा वृक्ष लावून तो सर्व दूर फोफावला त्याची मधुर फळे गोरगरिबांच्या सर्व जाती धर्माच्या मुलांना प्राप्त करून दिलीत. हे कार्य फारच मोलाचे आहे त्यास तोड नाही.” 

स्त्री-शिक्षण : मुलींच्या आयुष्याचे सुखी स्वप्न रंगविताना त्यात शिक्षणाचे रंग भरायला विसरू नका, असा संदेश भाऊसाहेबांनी स्त्री शिक्षणाकरिता केलेल्या कार्यातून समाजाला दिला. इ.स. १९२८ मध्ये अमरावती जिल्हा कौन्सिलचे अध्यक्ष असताना भाऊसाहेबांनी मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते.

त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्याद्वारे वरूडला ‘पार्वती धर्माधिकारी कन्याशाळा’ काढून स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले.  इ.स. १९५२ मध्ये अमरावती येथे ‘कस्तुरबा कन्या शाळा काढली. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण घेता यावे आणि त्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून इ.स. १९५३ मध्ये श्रद्धानंद वसतीगृहाची कन्या शाळा सुरू केली.

विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा प्रयत्न भाऊसाहेबांनी केला. नागपूरचे पी. बी. काळे आणि त्यांच्या पत्नी तत्कालीन खासदार अनुसयाताई काळे यांच्याकडून त्यांच्या ट्रस्टमधून १८ हजार रूपयांची देणगी मिळविली आणि यामधून विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था केली. स्त्री शिक्षिका नेमण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

शारीरिक शिक्षण : भाऊसाहेबांना मेंदू आणि शरीर सुदृढ असलेला तरूण घडवायचा होता. त्याकरिता त्यांनी शारीरिक शिक्षणावर विशेष भर दिला. त्याकरिता व्यायाम व खेळ याचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली. त्यांनी बलभीम व्यायाम प्रसारक मंडळ मुर्तिजापूर व अभिमन्यू व्यायाम प्रसारक मंडळ यांचे एकत्रिकरण करून ‘भारत’ या नावाची संस्था सुरू केली.

भारत सेवक दल हे केवळ शारीरिक शिक्षणाचे मंडळच न राहता ते बळवंताची खाण ठरावे, राष्ट्रीय वृत्ती अंगी बाळगलेले शिस्तप्रिय तरूण त्यामधून निर्माण व्हावेत म्हणून त्यांच्या शिक्षण पद्धतीत आवश्यक तो बदल वेळोवेळी करण्यात आले. ठिकठिकाणी तरूण मुलामुलींचे व्यायाम वर्ग घेण्यात येत असत.

भाऊसाहेबांनी ‘Was moving fast’ व्यायाम शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. त्यांनी प्रत्येक शाळेत व महाविद्यालयात शारीरिक शिक्षकाची नेमणूक करून खेळांना शिक्षणाचा अविभाज्य भाग मानले.

लोकविद्यापीठाची स्थापना : शिक्षण क्षेत्रातले अभ्यासक्रम आणि शेतकऱ्यांचे जीवन यामध्ये तफावत होती. म्हणूनच शिक्षणाला लोकाभिमुख करण्याकरिता भाऊसाहेबांनी अभिनव व सर्वागपूर्ण योजना तयार करून ३० डिसेंबर १९५० मध्ये श्री शिवाजी लोकविद्यापीठा’ ची स्थापना केली. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी लोकविद्यापीठाचे उद्घाटन केले होते.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

लोकविद्यापीठासंदर्भात भाऊसाहेब म्हणाले होते, “अत्यंत उच्च श्रेणीच्या विद्वानांची मालिका आपल्या देशात नेहमीच तयार होत आलेली आहे पण त्यामुळे कोट्यावधी देशवासियांची शैक्षणिक किंवा बौद्धिक पातळी मात्र उंचावली नाही. माझे विद्यापीठ मात्र अज्ञान, दारिद्र्य, कुचंबना व घृणास्पद अवस्था यांच्या काळ्याकुट्ट अंधःकारात चाचपडत पडलेल्या कोट्यावधी स्त्री पुरुषांमधून समाजसेवक व देशभक्त निर्माण करण्याकरिता झटत राहील.

लोकविद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. ज्वालाप्रसाद यांना नेमण्यात आले होते. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ हे बोधवाक्य असलेल्या लोकविद्यापीठाने शिवाजी पत्रिका’ हे नियतकालीकही सुरू केले होते. या विद्यापीठांतर्गत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू करण्यात आले होते.

त्यामध्ये इ.स. १९५० मध्ये कस्तुरबा मेडिकल ॲण्ड वेल्फेअर सेंटर, इ.स. १९५१ मध्ये जनता कॉलेज सुरू करून १८ ते ३० वर्ष वयाच्या ग्रामीण प्रौढांसाठी शिक्षणीची व्यवस्था करण्यात आली होती. गांधी ग्रामोद्योग मंदिर (१९५१), विद्यापीठ क्लब, अमरावती लॅबोटरी टेक्नॉलॉजी (१९५६).

ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड व्हेकेशन, कृषी विज्ञान पदविका सेंटर, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रोडक्शन कम ट्रेनिंग, पंचायतराज प्रशिक्षण केंद्र, अंगणवाडी कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र, जनता कृषी विद्यालय, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र इत्यादी.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

तसेच इ.स. १९५२ पासून मॅट्रीक झालेल्या पण गावातच राहून ग्रामसेवेचे कार्य करू इच्छिणाऱ्यांसाठी ग्रामसंघटकांचे वर्ग उघडण्यात आले होते. वरिलपैकी काही शिक्षणक्रमाला मॅट्रीक नापास विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश घेता येत असे. मॅट्रीकपर्यंत शिकू न शकलेल्या किंवा मॅट्रीक नापास झालेल्या तरुणांना उच्च शिक्षणाची संधी देणे ही कल्पना तेव्हा क्रांतीकारक होती.

शेतकरी, कामगार, मजूर या वर्गाच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन त्यांना काम करून शिक्षण घेता येईल. अशी योजना या विद्यापीठाने केली होती. नंतर लोकविद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण या मूक्त विद्यापीठात रूपांतर करण्यात आले.

शेती व शेतकरी जीवन सुधारणेकरिता कार्य : भाऊसाहेब शेतकरी कुटुंबातील होते. त्यामुळे शेतकऱ्याचे दुःख त्यांनी स्वतः अनुभवले होते. कृषीप्रधान देश म्हणून भारताची स्वतंत्र ओळख आहे. शेती आणि शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा, समाजव्यवस्थेचा कणा असूनही शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था मात्र हालाकीची होती.

ही दैन्यावस्था घालवून त्यामध्ये सुधारणा करण्याचे भरीव कार्य भाऊसाहेबांनी ब्रिटिश काळात व स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय कृषी मंत्री म्हणून सतत दहा वर्षे कार्य करीत असताना केले.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

शेतकरी संघाची स्थापना : शेतकऱ्यांची दारिद्र्य व मागासलेपणामधून सुटका व्हावी, त्यांच्यावरिल अन्यायाचे परिमार्जन व्हावे, शेतकऱ्यांची सावकार, व्यापारी व दलाल यांच्या तावडीतून मुक्तता व्हावी, शेती मालाला योग्य भाव मिळावा याकरिता इ.स. १९२७ मध्ये भाऊसाहेबांनी ‘शेतकरी संघा’ची स्थापना केली.

शेतकरी संघाविषयी भाऊसाहेब म्हणाले होते, “शेतकरी मंच कुठल्याही पद्धतीने राजकीय असणार नाही तर तो शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारा असेल.  शेतकरी व मंच कुण्या मुठभर मोठ्या शेतकऱ्यांच्या हाती राहु नये. तसेच ती केवळ मागण्या करणारी व मतभेदांना महत्त्व देणारीही संघटना होऊ नये.

ती स्वतःवर विश्वास असणारी शेतकऱ्यांना मदत देणारी एक सहकारी संघटना व्हावी.” शेतकरी संघाच्या प्रचारासाठी व शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून त्यांच्यामध्ये नवे विचार रूजविण्याकरिता भाऊसाहेबांनी ‘महाराष्ट्र केसरी’ वृत्तपत्रही सुरू केले होते.”

सावकार व व्यापारी यांच्या शोषणातून शेतकऱ्यांची मुक्तता : इ.स. १९३० मध्ये प्रांतिय कायदेमंडळावर त्यांची निवड झाल्यानंतर भाऊसाहेबांकडे कृषी खाते देण्यात आले होते. तेव्हा त्यांनी जमीनदार, सावकार, भांडवलदार यांच्या पाशातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी २५ ऑगस्ट १९३२ ला कर्जलवाद कायद्याचे सरकारी विधेयक सादर केले.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

२६ जानेवारी १९३३ ला ते मंजूर करून घेऊन ७८ हजार एकर शेती सावकारांच्या कर्जातून मूक्त केली व पिढ्यान्पिढ्या सावकाराच्या पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना मूक्त केले. ३० जानेवारी १९३२ ला कॉटन मार्केट बिल सादर करून कापसाचे अचूक मोजमाप कसे करावे याबाबत स्पष्ट निर्देश दिले.

त्या अंतर्गत शेतकऱ्याला प्रतिनिधित्व, कापसाला हमी भाव, शेतकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था या सर्व बाबी समाविष्ट केल्या. इ.स. १९३४ ला कॉटन मार्केट अमरावती येथे विदर्भ शेतकरी परिषद आयोजित करून शेतकऱ्यांच्या समस्यावर चर्चा घडवून आणली होती.

आधुनिक पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहन : भाऊसाहेब जेव्हा विविध देशांना भेटी देत तेव्हा तेथील शेतीविषयक नवीन प्रयोगांची माहिती मिळविण्याचे प्रयत्न करीत. निरनिराळ्या देशातील शेती पद्धतीचा अभ्यास करून त्यातील योग्य व उपयुक्त पद्धतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत करावा यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले.

उत्कृष्ट खते, बी-बियाणे यांची शेतकऱ्यांना माहिती करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कृषी मंत्री म्हणून कार्य करीत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजनांची आखणी करून त्या यशस्वीपणे राबविल्या. शेती विकासाकरिता निरनिराळ्या समित्या स्थापन करून कापूस बाजार व शेती या क्षेत्रात आमुलाग्र सुधारणा घडवून आणल्या.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

जपानी भात शेतीचा प्रयोग : भाऊसाहेब इ.स. १९५६ ला जेव्हा भारताचे कृषिमंत्री झाले तेव्हा देशात अन्नधान्याची टंचाई होती. अन्नधान्याचा तुटवडा भरून काढणे हे तेव्हाचे मोठे आव्हान होते. भारतात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याकारणाने त्यांनी भारतात जपान भात शेतीच्या पद्धतीचा प्रचार करून तांदुळाच्या उत्पादनात क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणले.

जपानी भात शेतीचा देशभरात अवलंब व्हावा म्हणून संपूर्ण देशात या पद्धतीची माहिती पसरविण्याची त्यांनी मोहीम आखली. याकरिता २५६ केंद्रावर भात प्रयोग दाखविले जात होते. त्याशिवाय खाजगी शेतावरही प्रयोग सुरू केले. १९०० खाजगी प्रयोग केंद्रे भारतात स्थापन केलेत.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता ६३४ प्रशिक्षण केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली. यामुळे भात पिकाचे उत्पादन कितीतरी पटीने वाढले. त्याचबरोबर गहू, ज्वारी, ज्यूट, कापूस, भूईमूंग, काजू इत्याही पिकांचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला. समुद्र किनारपट्टीवरील शेतीची धूप थांबविण्याकरिता काजूच्या लागवडीला प्रोत्साहन दिले.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

जागतिक कृषी प्रदर्शनीचे आयोजन : पारंपरिक शेती व्यवसायात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे हे येथील शेतकऱ्यांना पटवून देणे महत्त्वाचे होते. भारतातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे जगाला ज्ञान व्हावे व जगामध्ये कृषीक्षेत्रात झालेल्या प्रगतीचे भारतीयांना ज्ञान व्हावे याकरिता दिल्लीला ११ डिसेंबर १९५९ ते २९ फेब्रुवारी १९६० या कालावधीमध्ये जागतिक कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

याचे उद्घाटन भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे हस्ते झाले होते. या प्रदर्शनीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयसेन होवर, रशियन प्रधानमंत्री निकीता खुच्छव यांनीही भेटी दिल्या होत्या. भारताचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल भाऊसाहेबांची प्रशंसा केली.

या जागतिक कृषी प्रर्दशनामुळे भारतीय शेतकऱ्यांना जागतिक कृषी संशोधन, तंत्रशास्त्र, कृषिमाल, यांत्रिकीकरण, गुणवत्ता, सुधारित बी-बियाणे, खते यांची माहिती होऊन शेतकऱ्यां मध्ये विज्ञाननिष्ठा व प्रयत्नवाद वाढण्यास मदत झाली. साहजिकच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्याकरिता त्याचा फायदा झाला व ते त्याकरिता प्रोत्साहित झाले.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

शेतीपुरक व्यवसायाची व्यवस्था : शेतीबरोबरच शेतीला पुरक व्यवसायाचा विकास झाला तर शेतकऱ्याची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही हे भाऊसाहेबांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी शेतीला पुरक असलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन दिले. शेतीसोबत परंपरागतपणे करण्यात येणारा जोडधंदा म्हणजे पशुपालन होय.

पशुपालनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाला आधुनिक स्वरूप प्राप्त करून दिल्यास दुग्ध व्यवसायाकडे शेतकरी वळतील व त्यांना अधिक पैसाही मिळेल.  याकरिता दूध डेअरीचा प्रयोग केला. भाऊसाहेबांच्या प्रयत्नाने इ.स. १९४९ मध्ये आरे दुग्धवसाहत मुंबईला स्थापन झाली.

मध्यवर्ती दुग्धशाळा आरेचे उद्घाटन इ.स. १९५१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते झाले होते. ही आशिया खंडातील या प्रकारची पहिलीच दुग्ध शाळा होती. याचबरोबर इतर शेतीशी निगडीत लघु व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले.

सहकारातून शेतीचा विकास : इ.स. १९५७-५८ मध्ये भारताचे केंद्रीय सहकार मंत्री असताना भाऊसाहेबांनी सहकारला गती देण्याच्या दृष्टीने केंद्रीय स्तरावर अनेक निर्णय घेतले. कृषिमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतीला आवश्यक सुधारित खते, बी-बियाणे, औषधी, अवजारे, मिळण्याकरिता राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची त्यांनी स्थापना केली.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

त्यामुळे संपूर्ण देशामध्ये तालुका स्तरापर्यंत सहकाराचे जाळे निर्माण झाले. तसेच त्यांनी भारतीय कृषक सहकारी अधिकोषाची स्थापना केली होती. भाऊसाहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवून शेती, शेतकरी आणि देशाच्या प्रगतीची दारे खुली करून दिली. त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानामुळे त्यांच्या नावाने ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा’ ची २० ऑक्टोबर १९६९ ला स्थापना करण्यात आली.

संविधान निर्मिती व डॉ. पंजाबराव देशमुख : ९ डिसेंबर १९४६ ला भारतीय संविधान सभा अस्तित्वात आली. भाऊसाहेबांची काँग्रेस पक्षातर्फे मध्यप्रांत वन्हऱ्हाडातून संविधान सभेवर निवड करण्यात आली होती. संविधान तयार करण्यासाठी एकूण १३ समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. संविधान सभेची १२ अधिवेशने झाली.

या १२ अधिवेशनात ६५ दिवसाचे कामकाज झाले. २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेचे काम पूर्ण झाले. संविधान सभेच्या कार्यात भाऊसाहेबांनी सक्रिय सहभाग घेतला होता. अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर त्यांनी आपली मते संविधान समेत मांडली. संविधान सभेचे बहुसंख्य सदस्य भारताने संघराज्याची (फेडरल स्टेट) संरचना स्वीकारावी या मताचे पुरस्कर्ते होते.

भारताने अमेरिकेप्रमाणे संघराज्य स्वीकारू नये. एवढेच नव्हे तर राज्यसंघही (कॉन्फेडरेशन) बनू नये, असे भाऊसाहेबांचे मत होते. त्यांना भारताने एकराज्य शासन पद्धती (युनिटरी स्टेट) स्वीकारावी असे वाटत होते.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

युद्धकाळात एकराज्य आणि शांततेच्या काळात संघराज्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तुत केलेले भारतीय संविधानाचे स्वरूपही भाऊसाहेबांना समाधानकारक वाटत नव्हते. मसुद्यात ठिकठिकाणी वापरलेल्या फेडरल संघशासन (युनियन गव्हर्नमेंट) असा शब्दप्रयोग संविधानाला अंतिम रूप देताना वापरण्यात आला तरी भाऊसाहेब संतुष्ट नव्हते.

संघराज्यातील संरचनेचा भर युनियनवर असतो तर एकराज्य शासन पद्धतीचा भर युनिटीवर असतो या महत्त्वपूर्ण भेदाकडे भाऊसाहेब सभेचे लक्ष वेधले होते. संविधानामध्ये शेतकऱ्यांचे स्थान कोणते असायला पाहिजे हे सांगताना भाऊसाहेब म्हणतात, “आपला देश शेतकऱ्यांचा देश आहे शेतकऱ्यांना आणि मजूरांना सत्तेत मोठा वाटा मिळायला हवा आणि सरकारवरही त्यांचे वर्चस्व असले पाहिजे.

आपणच पृथ्वीतलावरील या सर्वात मोठ्या राष्ट्राचे मालक आहोत अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण करावयास हवी.  २४ जानेवारी १९५० रोजी संविधानसभेची बैठक बोलावण्यात येऊन सभेला हजर असलेल्या २८४ सदस्यांनी अंतिम संविधानावर सह्या केल्या. यामध्ये भाऊसाहेबांची सुद्धा सही आहे.

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

संविधान निर्मितीमध्ये भाऊसाहेबांचे योगदान किती महत्त्वपूर्ण आणि अमूल्य होते. हे २५ जानेवारी १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत केलेल्या संस्मरणीय भाषणावरून लक्षात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “जर सर्व सदस्यांनी पक्ष शिस्तीचे नियम काटेकोरपणे पाळले असते तर संविधानसभेचे कामकाज फारच कंटाळवाणे झाले असते.

पक्षशिस्त कडक असती तर संविधान सभेचे रूपांतर होयबांच्या मेळाव्यात झाले असते. सुदैवाने काही सदस्य बंडखोर निघाले. त्यांच्यामध्ये एच. व्ही. कामथ, डॉ. पंजाबराव देशमुख, रूस्तम के. सिध्वा, प्रा. शिब्बनलाल सक्सेना आणि पंडित ठाकूरदास भार्गव होते.

त्यांच्याबरोबर मला प्रा. के. टी. शहा आणि पंडित हृदयनाथ कुंझरू यांचा उल्लेख केला पाहिजे. त्यांनी उपस्थित केलेले बरेचसे मुद्दे विचारप्रणालीविषयी होते. त्यांनी केलेल्या सूचना स्वीकारण्यास मी तयार झालो नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या सूचनांचे मूल्य कमी होत नाही.

त्या सर्वांचा मी ऋणी आहे. ते नसते तर संविधानामागची तत्त्वे स्पष्ट करण्याची संधी मला मिळाली नसती. तांत्रिकरित्या संविधान पारित करून घेण्यापेक्षाही हे जास्त महत्त्वाचे होते.”

Dr Panjabrao Deshmukh – डॉ. पंजाबराव देशमुख

मृत्यू : जन्मभूमी, विदर्भ असलेले परंतु संपूर्ण भारत आपली कर्मभूमी मानूण कार्य करणाऱ्या भाऊसाहेबांनी समाज कल्याणासाठी अनेक अडथळे पार केले. गुणी माणसांना एकत्र आणून शिक्षण, शेती आणि शेतकरी, सहकार इत्यादीकरिता खंबीरपणे कार्य केले. सामान्य माणसाला सकारात्मक प्रेरणा देणारे, समाजाचा आत्मविश्वास जागविण्याकरिता शिक्षणाची व्यवस्था करणारे, कृषकांचा विकास म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास असे ठासून सांगणारे, समाजात असलेल्या प्रत्येक विषमतामुलक कल्पनांचा विरोध करून समता प्रस्थापित करण्याकरिता लढा उभारणारे, उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे भाऊसाहेब यांचे निधन १० एप्रिल १९६५ ला हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील विलिंग्डन हॉस्पिटल येथे झाले होते. 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment