Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

Prabodhankar-ThackerayPrabodhankar Thackeray

प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांचे पूर्ण नाव केशव सीताराम ठाकरे होते. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १८८५ मध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पनवेल व देवास येथे झाले. इ.स. १९०३ मध्ये ते मुंबईहून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी काही काळ रेल्वेत नोकरी केली.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

त्यांचे व्यक्तिमत्व सर्जनशील असल्यामुळे त्यांनी छायाचित्रकार, विमा एजंट, टंकलेखन यासारखे व्यवसाय देखील केले. त्यांना नाटकाची आवड होती. त्यामुळे त्यांनी स्वतःची नाटक कंपनीही काढली. त्यांची ओळख समाजसुधारक, लेखक, निबंधकार, प्रभावी वक्ते, इतिहास संशोधक, पत्रकार अशी आहे.

सामाजिक सुधारणेला अग्रक्रम : तत्कालिन परिस्थितीमध्ये भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये दोन मतप्रवाह होते. आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा असा तो वाद होता. त्यामध्ये काही नेत्यांना वाटायचे जोपर्यंत राजकीय स्वातंत्र प्राप्त होणार नाही, तोपर्यंत समाजाचा, देशाचा विकास होऊ शकणार नाही. याउलट प्रबोधनकारांनी सामाजिक सुधारणेला अग्रकम दिला.

राजकीय स्वातंत्र्याबाबत ते म्हणतात, ‘सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती वांझ आहे. राजकीय सुधारणा झाली म्हणजे इतर सुधारणा आपोआप होतील ही निव्वळ अंधश्रद्धा आहे, ते चुक आहे. शिक्षण, बुद्धी, काही मुठभर लोकांच्या हाती असून सत्ता त्यांच्या भोवती फिरत असते आणि इतर समाजघटक ह्या सर्व बाबींपासून वंचित राहतो.

जेव्हा खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती होईल तेव्हाच समाजातील विषमतानष्ट होईल. राजकीय स्वातंत्र्य प्राप्त जरी झाले तरी ते पूर्णतः त्यामुळे सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती आपली पकड धरू शकत नाही, असे मत प्रबोधनकारांनी मांडले.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

वर्णव्यवस्था : वर्णव्यवस्था ही समाजाच्या प्रगतीपथात येणारा मोठा अडथळा आहे. समाजामध्ये प्रामुख्याने प्राचीन काळामध्ये चार वर्ण अस्तित्वात होते. या वर्णामधूनव हळूहळू जाती, उपजाती, पोटजाती यांचा जन्म झाला आणि समाजाची विभागणी झाली. मानवा मानवामध्ये भेद करणारी ही व्यवस्था धर्माधारीत किंवा धर्मपुरस्कृत आहे.म्हणूनच प्रबोधनकारांनी वर्णव्यवस्था पुरस्कृत धर्माला ‘सैतानी धर्म संबोधले आहे.

याविषयी आपले विचार व्यक्त करताना प्रबोधनकार म्हणतात, गुणकर्मदर्शक वर्णभेदावरून जातिभेदावर घसरलेला धर्म सैतानी धर्म होय. म्हणूनच शुद्ध व्यावहारिक वर्णव्यवस्थेचे असंख्य जातीत पर्यावसान होऊन एकीची होळी झाली. वर्णव्यवस्था जीवंत ठेवायची आणि राज्य करायचे या सूत्रावर सत्ताधारी वर्ग कृती करीत असतो.

प्रबोधनकार म्हणतात, “वर्णव्यवस्थेत गुणकर्माला मान्यता द्यायची आणि व्यवहारात मात्र वर्णव्यवस्था जन्मावरच ठेवायची हे धूर्तपणाचे वागणे आहे, असे नसते तर कोणताही वर्ण असो त्या घरी कोणत्याही वर्णाचे मूल जन्माला आले असते असे सांगून देशात धूर्त मतलबी आणि परंपरावाद्यांना ऊत आला आहे. यापासून समाजाने सावध राहिले पाहिजे, असा इशारा ते समाजाला देतात.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

जाती व्यवस्था गुलामगिरीचे कारण : भारतामध्ये विविध जाती, उपजाती, पोटजाती असून त्या आपआपसामध्ये विभागलेल्या आहेत. यामुळेच बाहेरील आक्रमण येथे यशस्वी झाले आहे. आपआपसातील वाद, भेदभाव, विषमता संपावी असे प्रबोधनकारांना वाटत होते. ते म्हणतात, ‘समाजात रक्तशुद्धीच्या बाष्कळ कल्पना फोफावल्या आहेत.

जातीतल्या जातीत लग्ने लावण्याचा, स्वयंवराच्या पद्धतीला गचांडी देण्याचा आणि बाळ असतानाच लग्ने ठोकण्याचा उपक्रम या रक्तशुद्धीच्या कल्पनेनेच केला आहे. या कल्पनेला जबरदस्त ठोकर दिल्याशिवाय जातिभेदाचा किल्ला जमीनदोस्त होणार नाही. या नुसत्या बाहेरच्या मलमपट्ट्या आहेत. जातिभेदनरकासुराचे वर्म या रक्तशुद्धीच्या कल्पनेत भरले आहे. या वर्माच्या मर्मावर डाग देण्याचे काम केले पाहिजे.”

अस्पृश्यता निवारणाचे कार्य : हिंदू धर्माची अधोगती होण्यास कारणीभूत घटक म्हणजे अस्पृश्यता होय, असे प्रबोधनकार म्हणत असत. त्यांच्या मते, “हिंदू धर्मामध्ये पसरलेली विषमता, अनिष्ट चालीरीती, परंपरा, संकुचित प्रवृत्ती या सर्व कारणांमुळे विशिष्ट गट समाजाच्या बाहेर बाहेर पडत गेला. या समाजघटकांना हिंदू धर्नामध्ये समाविष्ट करून घेण्याची भट-ब्राम्हणांची मानसिकता नाही.

त्यामुळे हिंदू धर्मामध्ये स्पृश्य-अस्पृश्य उदयास आले आणि हिंदू धर्माचा ऱ्हास झाला. प्रबोधनकारांनी ‘अस्पृश्यांनी स्पृशांपासून सावध राहा’ हा अग्रलेख लिहिला. यामध्ये ते लिहितात, “स्वराज्य जसे मागून मिळणार नाही तशी अस्पृश्यता घालवा म्हणून कोणीही घालवणार नाही. हक्क व अधिकार कोणी कोणाला देत नसते ते बळजबरीने घ्यावे लागतात?”

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Gopal Krishna Gokhale – गोपाळ कृष्ण गोखले

पुढे ते म्हणतात, “स्पृश्यांनी केलेली अस्पृशांची मध्यस्थी ही तर एक प्रकारची भिक्षुकशाहीच आहे.” प्रबोधनकारांच्या मते, “इ.स. ७-८ व्या शतकात भिक्षुकशाहीचे उद्धारक आद्य शंकराचार्य यांचा अवतार झाला. त्यांनी शुद्धी करून घेतलेल्या सिथीयनांच्या ऊर्फ राजपुतांच्या पाठबळाने बौद्धांच्या भयंकर कत्तली करविल्या. त्यांच्या विहारांची नासधूस केली. उरल्यासुरल्या बौद्धांना देशोधडीला लावले.

लक्षावधी लोकांना मसणवटीत पार धुडकावले. या दुर्दैवी लोकांच्या नशिबाची माणुसकीही हिरावून घेण्यात आली. अशा रीतीने हिंदुस्थानात हिंदु समाजात अगदी पहिल्यानेच आद्य शंकरचार्याने अस्पृश्यता निर्माण केली. ठिकठिकाणच्या बौद्ध विहारातल्या पवित्र वस्तूंचा आणि बौद्ध मूर्तीचा उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या स्थापल्या. कित्येक ठिकाणी तर बुद्धांच्या मूर्तीनांच थोडाबहुत फरक करून त्यांना शंकरमूर्तीचा बाप्तीस्मा दिला. अशारीतीने बौद्ध विहारांचे रूपांतर शंकराच्या देवळात झाले.”

स्त्री-जीवन सुधारणेचे कार्य : प्रबोधनकारांनी स्त्रियांच्या बिकट परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करीत असताना, त्याकरिता धर्म, पुराणे जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. तत्कालिन परिस्थितीमध्ये धर्मांतर्गत स्त्रियांवर अन्यायकारक रीती, परंपरा लादल्या जात होत्या. बालविवाह, परदा पद्धती, हुंडा, केशवपण, विधवा विवाहास विरोध,देवदासी इत्यादी अनिष्ट चालीरीती होत्या.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

यामधून स्त्रियांची मुक्तता व्हावी याकरिता प्रबोधनकारांनी सतत प्रयत्न केले. सत्यशोधक जलशामधून त्यांनी विधवांच्या केशवपणावर लोकजागृती करीत समाजपरिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या सर्व अनिष्ट परंपरांना धर्मच जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणतात, ‘धार्मिक सामाजिक गुलामगिरी संपूर्ण स्त्री वर्गावर लादली आहे.

समाजावर कायद्यापेक्षा धर्माचा जास्त पगडा असून धर्मसूत्रामध्ये ते वर्णीत आहे. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करताना त्यांनी ‘संगीत विधी निषेध’ नाटकाच्या माध्यमातून स्त्रियांचे प्रश्न समाजासमोर ठेवले. या संदर्भात त्यांनी आपल्या ‘प्रबोधन’ या नियतकालीकातून वारंवार लिखाण केले. त्यांनी रामायणावर टीका केली.

‘सीतेच्या शिलाबद्दल रामायणामध्ये शंका व्यक्त केली तेव्हा रामायणसारख्या धर्मग्रंथाने किती घाणेरडा परिणाम समाजजीवनावर केलेला आहे. त्यामुळेच स्त्रियांची असल्या दास्यातून मुक्तता करायची असेल तर धर्मग्रंथाचे प्रमेय खुशाल घुडकावून दिले पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. तत्कालिन स्थितीमध्ये हुंड्याचा प्रश्न फार गंभीर होता. यासाठी प्रबोधनकारांनी ‘हुंडा विध्वंसक सभे’ची स्थापना केली.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

वर्तमानपत्रामधून जाहीरपणे हुंडा घेणाऱ्यांचा समाचार ते घेत असत. तसेच अनेक वेळा वर पित्यांना त्यांनी घेतलेल्या रक्कमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळामध्ये प्रेमविवाह करणे सामाजिक गुन्हा समजल्या जायचा. अशा काळातही प्रबोधनकारांनी प्रेमी युगलाचे विवाह लावून दिले.

ब्राम्हणांविषयी भूमिका : प्रबोधनकारांचे असे मत होते की, समाजातील सर्व विकाराचे मर्म ब्राम्हणी कर्मकांडात आहे. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राम्हणांनी आपला स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दृष्ट परंपरांमुळे स्त्रियांवर न्याय्य अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो.

सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढीखाली भरडली जाते. असे रूढी वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर म्हणजेच ब्राम्हणशाहीवर घणाघाती प्रहार केला. परंतु पुरोगामी, उदारमतवादी, परिवर्तनवादी, सुधारक विचारांच्याब्राम्हणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाहीचे हे टीकाकार होते.

त्यांनी संत एकनाथांच्या जीवनावरील ‘खरा ब्राम्हण’ या नाटकाद्वारे खरा ब्राम्हण कोण व खऱ्या ब्राम्हणाची भूमिका काय? हे विषद केले आहे. परंतु पुण्यातील कर्मठ ब्राहणांनी ‘खरा ब्राम्हण’ या नाटकाला परवानगी देऊ नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती, परंतु न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

धर्मविषयक विचार : वास्तविक पाहता प्रबोधनकार हे कोणत्याही धर्माचे द्वेष्टे नव्हते. धर्मामध्ये असलेल्या वाईट प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती यांना त्यांनी सातत्याने विरोध दर्शविला. म्हणूनच ते म्हणतात की, “धर्माने मनुष्याची निर्मिती केलेली नसून माणसाने धर्माची निर्मिती केली आहे. त्यामुळे धर्माधिष्ठीत मानवाचे आचरण, विचार असू नयेत.

” धर्म माणसावर वर्चस्व गाजवू शकत नाही. त्यापलिकडे जाऊन ते आणखी प्रखर शब्दांत म्हणतात, “हजारो वर्षाच्या कायद्याची बळजबरी धर्माच्या नावाखाली आजच्या विसाव्या शतकातील माणसांवर होत असेल तर त्या धर्माच्या पुरस्कर्त्याला फासावर लटकविलेच पाहिजे.” काळानुसार धर्मामध्ये बदलती भावना, लवचिकता नसेल तर असल्या धर्माला मुठमाती देणे योग्य. थोडक्यात, बदल्या काळाप्रमाणे धर्मामध्येदेखील योग्य परिवर्तन केले गेले पाहिजे, असे त्यांचे मत होते.

हिंदू धर्माच्या अधोगतीची कारणे : भारतामध्ये बहुसंख्य लोक हिंदू धर्माचे असून सुद्धा हिंदू धर्माचा फारसा * प्रसार झाला नाही. उलट हिंदू धर्म ह्या भूमीमध्ये अपयशी ठरल्याचे आढळते. प्रामुख्याने या ठिकाणी धर्मांतरण पुष्कळ प्रमाणात झालेले आहे. पण अशी । परिस्थिती हिंदूवर का आली? याचे विश्लेषण करीत असताना प्रबोधनकारांनी या सर्व बाबीला खुद्द हिंदूच जबाबदार असल्याची टीका केलेली आहे.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

त्यांच्या मते हिंदू धर्माच्या अवनतीला हिंदूच जबाबदार आहेत. अज्ञानी, अडाणी ह्या वर्गाचा विकास खुंटलेला आहे. अशा लोकांकरिता धर्ममार्तंड लोक काहीच करीत नाही. उलट स्वतःचे वर्चस्व गाजवीत राज्य करतात. यामुळे इतर दीन दलित, अस्पृश्य हा हिंदू धर्मातील गट दुसऱ्या धर्माकडे आकृष्ट होतो. त्यामुळे धर्मातरण घडून येऊन हिंदू धर्माचा न्हास झालेला आहे. एकंदरित हिंदू धर्माच्या हासासाठी हिंदूच्या चुकीच्या धर्मकल्पना जबाबदार आहेत. असे प्रबोधनकार मानतात.

सत्यनारायणाच्या पुजेला विरोध : सत्यनारायणाचा विरोध करीत असताना प्रबोधनकारांनी स्वतःच्या घरातूनच याची सुरुवात केली. घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांना स्पष्ट शब्दात सांगितले की, ‘हे सत्यनारायणाचे लिगाड मी चालू देणार नाही. सत्यनारायणच काय पण देव्हाऱ्यातले सारे देव-देवी हेही फेकून दया तळ्यात. आम्हाला दाताखाली घालायला तांदळाचा दाणा नाही आणि त्यांना कशाला नैवेद्य दाखवता? फतराचा?” अशा प्रखर शब्दांत त्यांनी विरोध केला.

प्रचलित भिक्षुकशाहीचा धर्म : माणूस धर्माधारित जीवन जरी जगत असेल मात्र त्या धर्मावर भटांचे जीवन अवलंबून असते, असे प्रबोधनकार म्हणत असत. त्यांच्या मते, “हिंदू धर्म हा धर्म उरलेला नसून मात्र एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी बनून बसला आहे. आजचा धर्म हा भिक्षुकशाहीचा धर्म असून भटांचे धर्मावर पोटापाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. प्रबोधनकार म्हणतात, “आमचा आजचा धर्म हा मुळी धर्मच नव्हे.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

प्रचलित भिक्षुकशाही धर्म म्हणजे बुळ्याबावळ्या खुळ्यांना झूलवून भटांची तुंबडी भरणारे एक पाजी थोतांड आहे. या थोतांडाच्या भाराखाली अफाट भटेत्तर दुनिया माणूस असून पशुपेक्षाही पशू बनली आहे. त्यामुळे आमच्या सर्वांगीण हलाखीचे मूळ भटांच्या पोटात आहे. त्यांच्या गोडबोल्या ओठांत नव्हे; हे शेकडा दहा लोकांना पटतापटताच एक शतक काळाच्या उदरात गडप झाले.

प्रबोधनकारांच्या मते मनुस्मृती, पुराणे आणि देवळे गुलामगिरीचे कारण : हिंदू धर्म या भूमीवर शेकडो वर्षापासून जिवंत आहे. मात्र हिंदूवर राज्य करण्याची वेळ मात्र क्वचित आली. त्यामुळे भारतावर बाहेरील आक्रमण झाले. राजकीयदृष्ट्या गुलाम झाल्यानंतर जातिअंतर्गत, धर्मातर्गत आणखी कठोरपणा येत असता बंधने कठोर होत गेली आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक गुलामगिरीमध्ये समाज खितपत पडला.

जो आतापर्यंत तशाच परिस्थितीत आहे. प्रबोधनकारांनी या सर्व गुलामगिरीचे कारण प्रामुख्याने मनुस्मृती, पुराणे आणि देवळे यात आहे. असे मत मांडले. याविषयी ते लिहितात, “मनुस्मृती, पुराणे आणि देवळे असा तीनपेडी फास हिंदू समाजावर लटकावून भिक्षुकशाही ब्राम्हणांनी आपल्या जातीच्या सवत्या सुग्याचे सोवळे वर्चस्व आजवर टिकवून धरलेले आहे.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

या मार्गावर कोणी घाव घालताच जातसुधारक उद्धारक भटे सापासारखी का फुसफुसतात. याचे अजून बऱ्याच बावळट शहाण्यांना आणि भोळसट भटेत्तरांना मोठे आश्चर्य वाटते. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या तीनच गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनच गोष्टी म्हणजे अखिल भटेत्तर दुनियेच्या उरावर तीन प्राणघातक धोंडी आहेत.

या तीन गोष्टी नष्ट करा. जाळून पोळून खाक करा की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच… पुराणे म्हणजे शौचकूप असे आमचेआहे. पुराणात काही गोष्टी चांगल्या आहेत, असे काही भेदरट सुधारकही गतात असतील शौचकूपात पडलेल्या मोहरापुतळ्या, ज्यांना उचलायच्या असतील त्यांनी खुशाल उचलाव्या, आम्ही त्यांचा हात धरू इच्छित नाही. पुराणे म्हणजे शौचकूप ठरल्यावर त्यांच्या जीवावर जगणाऱ्या देवळात काय काय पातकांच्या गिरण्या सुरू असतात याची कल्पनाच केलेली बरी.”

देव-देवळांची निर्मिती ही मानवाने स्वतःच्या हिताच्या दृष्टीने निर्माण केलेली आहे. भटांनी भटेत्तरांवर स्वतःच्या कल्पना लादलेल्या आहेत. याविषयी प्रबोधनकार म्हणतात, “भटेत्तरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रम्हदेवाच्या बारशाला खास झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलिकडची कमाई आहे.

सर्वव्यापी देवाला चार भिंतीच्या आणि कळसबाग घुमटाच्या घरात येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती! बोरीबंदरवर उतरलेल्या नवख्या प्रवाशाला सभागृहात किंवा ताजमहालात जाण्याचा जसा प्रसंग येतो, तसा ‘चराचर व्यापुनी दशांगुळे उरलेल्या’ देवाला सारे जग ओसाड टाकून हिंदूच्या देवळातच ठाणे देण्याचा असा कोणता प्रसंग ओढवला होता न कळे.”

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

गौतम बुद्धांविषयी प्रबोधनकारांचे विचार : प्रबोधनकारांवर बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडल्याचा दिसून येते. ते कोणत्याही एका धर्माचे उपासक नव्हते. बुद्धाच्या विचारांचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला होता. त्यांच्या मते, “गौतम बुद्ध राजवैभव सोडून ज्ञानाच्या प्राप्तीसाठी व जगातील दुःख निवारण्यासाठी सर्व सोडून निघून गेले. अशा महापुरुषास देवच का मानू नये, जो सर्व सुख, सोई, वैभव सोडून जनसामान्यांच्या कल्याणासाठी भटकत राहिला.

असा महापुरुष आमचा देवच आहे. हिंदुस्थान हा बुद्धांचाच आहे. पण या बुद्धाला आजचा हिंदुस्थानच विसरत चालला आहे. ज्या बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने प्रेरीत होऊन बड्या बड्या राष्ट्रांनी प्रगती केली. सायाम, कंबोडीया, ब्रम्हदेश, सिलोम, तिबेट इत्यादी राष्ट्रांत आजही मानवजातीच्या कल्याणासाठी खवळत आहे.”

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रबोधनकारांचे विचार : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रबोधनकारांना खूप आदर होता. समाजामध्ये खरे शिवाजी पोहचविण्याचे महत्त्वाचे कार्य प्रबोधनकारांनी केले.त्यांच्या मते, “शिवाजी महाराज समाजापर्यंत चूकीच्या पद्धतीने पोहचविण्या आल्यामुळे खरा शिवाजी लोकांपर्यंत जाऊ दिला नाही. शिवाजी महाराज फक्त हिंदूचे, मुस्लीम विरोधी असल्याप्रकारचे शिवाजी महाराजांचे चित्र समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला असल्यामुळेच शिवाजी महाराज जनतेला कळाले नाहीत.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

हे सर्व जाणीवपूर्वक करण्यात आलेले आहेत आणि या सर्व गोष्टीचा फायदा राजकारणी, धर्ममार्तड यांनी घेतला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ते म्हणतात, शिवाजी महाराज म्हणजे हिंदू धर्माचा मूर्तीमंत चेहरा. ते कुराणाचा देखील पालखीतून वाजतगाजत सन्मानपूर्वक परतवणी करीत असत. दक्षिणेतील कित्येक मशीदींना त्यांनी वर्षासने दिलेली आहेत.

मग शिवाजी महाराज मुस्लीमांचे द्वेष्टे होते, असे कसे म्हणता येईल. म्हणूनच अफजल खान तो मुस्लीम म्हणून नव्हे तर स्वराज्याचा शत्रू म्हणून त्याचा कोथळा त्यांनी बाहेर काढला आहे.” पुढे प्रबोधनकार म्हणतात, “शिर्के, मोरे किंवा जाधवांसारखे स्वधर्मीय जरी आडवे आले असते तर त्यांचेही छत्रपती शिवाजी महाराजांनी खून पाडले असते.”

महात्मा फुले व प्रबोधनकार : प्रबोधनकारांचे महात्मा फुले आदर्श होते. महात्मा फुलेंचा जेव्हा छळ झाला तेव्हा त्यांचा लढा निकराने पुढे चालविणासाठी प्रबोधनकार पुण्याला स्थायिक झाले. या कार्यात आपल्या धाडसी वृत्तीने व बौद्धीक कुशलतेने त्यांनी सर्व विरोधकांची दानादान उडवून दिली. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणे बाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

सत्यशोधक समाजाच्या वतीने घेण्यात येणारे प्रबोधनात्मक उपक्रम, कार्यक्रम यांच्या धर्तीवरच प्रबोधनकारांनी आपले कार्य केले. लेखणीच्या माध्यमातून असो वा वक्तृत्वाच्या त्यांनी सदैव सामाजिक सौदार्ह वाढविण्याचा, जोपासण्याचा प्रयत्न केला. ‘खरा ब्राहण’ या त्यांच्या नाटकाच्या माध्यमातून समाजातील खरे ब्राम्हण कसे असावे, कोण आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

ग्रंथ : प्रबोधनकार एक लेखक, साहित्यिक, व्यासंगी अभ्यासक, कथाकार, कादंबरीकार, इतिहास संशोधक होते. त्यांची साहित्य संपदा अफाट आहे. प्रबोधनकारांच्या लिखाणाचा केंद्रबिंदु सामाजिक सुधारणेचा होता. त्यामध्ये त्यांनी हिंदू धर्मावर, धर्मशास्त्रांवर, पुराणांवर, देव आणि देवळे यावर प्रामुख्याने टीका केलेली आहे. त्यांच्या लिखाणातून विद्रोही भावना आपल्याला दिसून येते. प्रबोधनकारांनी दि. १६ ऑक्टोबर १९२१ रोजी ‘प्रबोधन’ हे नियतकालिक सुरू केले.

त्यातून बालविवाह, विधवांचे प्रश्न, हुंडाबळी, अस्पृश्यता, अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा इत्यादी प्रश्नांसंबंधित जागृतीपर लिखाण केले. या कार्याची पावती म्हणून महाराष्ट्रातील जनतेने त्यांना ‘प्रबोधनकार’ ही उपाधी दिली. समाजोद्धारासाठी त्यांनी आपली लेखनी चालविली. ‘संगीत सीताशुद्धी’, ‘ग्रामण्यांचा इतिहास’, ‘बापाची कसरत आणि मुलीची फसगत’, ‘हिंदवी स्वराज्याचा खून’, ‘खरा ब्राम्हण’, ‘निवडक प्रबोधन’, ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’, ‘कोदंडाचा रत्नकार’, ‘संस्कृतीचा संग्राम’.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

‘संगीत विधिनिषेध’, ‘पावनाखिंडीचा पोवाडा’, ‘प्रबोधन सहाय्यक फंड’, ‘शेतकऱ्यांचे स्वराज्य’, ‘The Temptress’, ‘शिवसेना कशासाठी’, ‘आई थोर तुझे उपकार’,’भिक्षुकशाहीचे बंड’, ‘बावला-मुमताज प्रकरण’, ‘हिंदुजनांचा हास आणि अधःपात’, ‘कुमारिकांचे शाप’, ‘निवडक प्रस्तावना’, ‘हिंदूधर्माचे दिव्य’, ‘वाचकांचे पार्लमेट’, ‘वक्तृत्वकला आणि साधना’, ‘वैदिक विवाह विधी’, ‘पोटाचे बंड, ‘टाकलेलं पोर’, ‘जुन्या आठवणी’, ‘काळाचा काळ’, ‘विजयादशमीचा संदेश, ‘साताऱ्याचे दैव का दैवाचा सातारा’.

उठ मऱ्हाठ्या उठ’, ‘वैचारिक ठिणग्या’ ‘शनि महात्म्य’, ‘दगलबाज शिवाजी’, ‘शिवाजीचा वनवास’, ‘प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी’, ‘पंडिता रमाबाई सरस्वती’, ‘श्री संत गाडगे बाबा’, ‘बाजी प्रभू देशपांडे यांचा पोवाडा’, ‘माझी जीवनागाथा’ इत्यादी विपूल ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली.

Prabodhankar Thackeray – प्रबोधनकार ठाकरे

मृत्यू : थोर समाजसुधारक, विचारवंत, लेखक, नाटककार, कादंबरीकार, साहित्यिक, इतिहास संशोधक बहुआयामी गुणवैशिष्ट्ये असलेले विद्रोही व्यक्तिमत्व, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी २० नोव्हेंबर १९७३ रोजी मुंबई येथे निधन झाले. महाराष्ट्रातील ज्येष्ठ व नामवंत नेते बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव होते. त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाला ‘शिवसेना’ हे नाव प्रबोधनकारांनीच सुचविले होते. 

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज चरित्र

Leave a Comment