Pruthvigol, Nakasha Tulana v Kshetrabhet – पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट

भौगोलिक स्पष्टीकरण

नकाशे हे द्विमितीय असतात तर पृथ्वीगोल हा त्रिमितीय असतो.

द्विमितीय घटकाला लांबी आणि रुंदी असते. लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते.

द्विमितीय

 रुंदी व लांबी अशा दोन मिती असलेला पृष्ठभाग. उदा., कागद, फळा, मेज, जमीन इत्यादी.

त्रिमितीय

रुंदी, लांबी व उंची असलेला पृष्ठभाग. उदा., डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र इत्यादी.

त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची असते. तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते.

नकाशाच्या साह्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो.

पृथ्वीगोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते.

पृथ्वीचा गोल नकाशा तयार करायचा झाल्यास प्रत्यक्ष तारेचा पृथ्वीगोल तयार करतात. त्याच्या आत दिवा लावून त्याचे प्रक्षेपण प्रकाशाच्या साहाय्याने कागदावर घेतले जाते.

                     

या प्रक्षेपणाच्या आधारे नकाशा तयार केला जातो. म्हणजेच पृथ्वीचा किंवा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचा नकाशा तयार करण्यासाठी मूलभूत वृत्तजाळी आवश्यक असते. अशा पद्धतीने त्रिमितीय पृथ्वीगोलावरून द्विभिती कागदावर नकाशा तयार केला जातो.

भूगोल दालन

‘अर्था’ हा जगातील एक सर्वांत मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये मेन (Maine ) राज्यात ‘यारमथ्’ (Yarmouth) येथे ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे. या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वे पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे.

Leave a Comment