राष्ट्रीय चळवळीची वाटचाल

लॉर्ड कर्झन याने इ. स. १९०५ मध्ये बंगाल प्रांताची फाळणी केली. बंगाल प्रांताचा विस्तार मोठा असल्याने प्रशासकीय सोईसाठी फाळणी केल्याचे कारण देण्यात आले; परंतु त्यामागील खरा हेतू हिंदू व मुस्लिम समाजांत फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे हा होता. मुस्लिम बहुसंख्य असलेला पूर्व बंगाल व हिंदू बहुसंख्य असलेला बिहार व ओरिसा मिळून बनलेला पश्चिम बंगाल असे दोन प्रांत निर्माण करण्यात आले. राष्ट्रीय सभेने बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध केला.

वंग-भंग आंदोलन : बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंग-भंग आंदोलन असे म्हणतात. या आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले. फाळणीविरुद्ध तीव्र आंदोलन झाले तरीही ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी रद्द केली नाही. उलट आंदोलकांविरुद्ध दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब केला.

आंदोलकांवर लाठीहल्ले केले. वंग-भंग चळवळीत ‘वंदे मातरम्’ हे आंदोलकांचे घोषगीत होते. हे गीत म्हणणाऱ्या शाळकरी मुलांनाही शिक्षा करण्यात आल्या.बंगालच्या फाळणीविरुद्ध देशभर आंदोलन करण्यात आले. दादाभाई नौरोजींनी भारतीयांना ‘अखंड चळवळ करा’ असा संदेश दिला.

राष्ट्रीय सभेने स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण असा आंदोलनाचा चारसूत्री कार्यक्रम जाहीर केला.राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी सरकारने ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाचा अवलंब केला. हिंदू, मुसलमान यांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. यातून १९०६ साली ‘मुस्लिम लीग’ या संघटनेची स्थापना झाली.

राष्ट्रीय आंदोलनाची वाढती शक्ती कमी करण्यासाठी सरकारने देशातील प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबले.इ. स. १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आली. त्यांना सहा वर्षांची कारावासाची शिक्षा देण्यात आली. लोकमान्य टिळकांना झालेल्या शिक्षेमुळे देशभर संतापाची लाट उसळली.

मुंबई येथील गिरणी कामगारांनी त्या शिक्षेच्या विरोधात सहा दिवस संप केला. जहाल नेत्यांनी चारसूत्री कार्यक्रम भारतभर पोचवला. वंग भंगाचे आंदोलन उग्र होत गेले. अखेर राष्ट्रीय सभेच्या आंदोलनापुढे सरकार नमले. सरकारने बंगालची फाळणी १९११ साली रद्द केली.

होमरूल चळवळ : या आयरिश विदुषीने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भारतीयांना स्वराज्याचा अधिकार मिळावा अशी मागणी केली. यासाठी त्यांनी चेन्नई येथे होमरूल लीगची म्हणजे स्वराज्य संघाची स्थापना केली. या धर्तीवर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात स्वराज्य संघाची स्थापना केली.

स्वराज्य संघाच्या चळवळीला सामान्य जनतेचा पाठिंबा मिळाला. अनेक स्त्रिया या चळवळीत सहभागी झाल्या. या चळवळीने देशभर चैतन्य निर्माण झाले.राष्ट्रीय सभेचे १९९६ साली लखनऊ येथे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात स्वराज्याची मागणी करण्यात आली. भारतीयांमधील असंतोष काही प्रमाणात कमी करणे सरकारला गरजेचे वाटू लागले, म्हणून सरकारने १९९९ साली सुधारणा कायदा मंजूर केला.

Leave a Comment