Sandesh Vahan V Prasar Maddhyame – संदेशवहन व प्रसार माध्यमे

भारतात संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा अवलंब केला जातो. हे उपग्रह इनसॅट (INSAT Indian National Satellite) या नावाने ओळखले जातात.

             

प्रसारमाध्यमांचे चांगले परिणाम

१. आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो.

२. माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यांत बचत होते.

३. पर्यावरण, स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता इत्यादी बाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत मिळते. वादळे, त्सुनामी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींबाबत पूर्वकल्पना मिळू शकते.

५. आरोग्य, शिक्षण व समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगांबाबत जागरूकता निर्माण होते.

६. लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना यशस्वी करण्यामध्ये मदत होते.

७. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यांबाबतची जाणीव जागृत होते. त्यामुळे जीवनीमध्ये सुधारणा होते.

८. प्रसारमाध्यमांमुळे व्यापार, उदयोगधंदे यांमध्ये वाढ होते.

प्रसारमाध्यमांचे हानिकारक परिणाम

१. दूरदर्शन, संगणक, मोबाइल यांच्या अति वापरामुळे डोळ्यांचे तसेच पाठीचे व श्रवणाचे

आजार होतात. मनोविकार, एकलकोंडेपणा

वाढणे इत्यादी त्रासही संभवतात.
२. दूरदर्शन वाहिन्या, इंटरनेट यांद्वारे अनेक प्रकारची माहिती मिळते. माहितीचा दुरुपयोग करून समाजाची शांतता व स्वास्थ्य बिघडवण्याचे प्रकार घडतात.

३. प्रसारमाध्यमांवरील विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्याने मैदानी खेळ, शारीरिक क्षमता यांकडे दुर्लक्ष होते. याचा विपरीत परिणाम शारीरिक स्वास्थ्यावर होतो.

काय करावे बरे ?

पाचव्या इयत्तेत शिकणारा आमोद शाळेतून घरी आला, की नेहमी संगणकावर वेगवेगळी संकेतस्थळे पाहतो. टीव्हीवरील आवडते कार्यक्रमही न चुकता बघतो. आईच्या मोबाइलवर गेम खेळतो. सारखा घरात बसून असतो. हल्ली त्याला भूक कमी लागते. झोपही जास्त येते. त्याचे वजनही खूप वाढले आहे.
हे नेहमी लक्षात ठेवा.

संदेशवहन व माहिती प्रसारण साधनांचा तारतम्याने वापर करावा. त्यांचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी.

Leave a Comment