Sarvanam – सर्वनामे

Sarvanam
                                                                Sarvanam

सर्वनामे

नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणा-या निकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

Sarvanam – सर्वनामे

प्रकार :

1. पुरुषवाचक सर्वनाम

2. दर्शक सर्वनाम

3. संबंधी सर्वनाम

4. प्रश्नार्थक सर्वनाम

5. सामान्य सर्वनाम / अनश्चित सर्वनाम

6. आत्मवाचक सर्वनाम

1. पुरुषवाचक सर्वनामे :

बोलणा-याच्या किंवा लिहिणा-याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात: बोलणाऱ्यांचा, ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहिती त्यांचा आणि ज्यांच्याविषयी आपण बोलती किंवा लिहिती त्या व्यक्तींचा व वस्तूंचा. व्याकरणात यांना पुरुष असे म्हणतात.

या तीनही वर्गातील नामांबद्दल येणा-या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.

अ) बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे.

उदा : मी, आम्ही, आपण, स्वतः

ब) ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करतातना जी सर्वनामे वापरतो, ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे.

उदा: तू, तुम्ही, आपण, स्वतः

क) ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो, ती तृतीय पुरुष वाचक सर्वनामे.

उदा: तो, ती, ते, त्या.

Sarvanam – सर्वनामे

2. दर्शक सर्वनामे :

जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी जे सर्वना येते, त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. उदा. हा, ही, है, तो, ती, ते.

3. संबंधी सर्वनामे :

वाक्यात पुढे येणा-या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणा-या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदा: जो-जी-जे, जे-ज्या.

4. प्रश्नार्थक सर्वनामे :

ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होती, त्यांना प्रश्नार्थक सर्वनामै म्हणतात. उदा: कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी, इ.

5. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे :

कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत, हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे म्हणतात.

उदा :

अ) कोणी कोणास हसू नये.

ब) या जगाचे काय होईल, कुणास ठाऊक.

क) जगी सर्वसुखी असा कोण आहे.

ड) त्या दुकानात काय वाटेल ते मिळते.

इ) देवाच्या मर्जीपुढे कोणाचे काय चालणार.

फ) तिकडे कोण आहे, ते मला माहीत नाही.

ग) कोणी यावे, कोणी जावे.

ह) कोण ही गर्दी.

Sarvanam – सर्वनामे

6. आत्मवाचक सर्वनामे :

आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होती, तेव्हा ते आत्मवाचक सर्वनामे असते.

आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात. या दोहोंमधील फरक :

अ) पुरुषवाचक आपण हे केवळ अनेकवचनात येते. आत्मवाचक आपण हे दोन्ही वचनात येते.

ब) पुरुषवाचक आपण हे वाक्याची आरंभी येऊ शकते. आत्मवाचक आपण तसे येत नाही.

क) आपण हे आम्ही व तुम्ही या अर्थाने येते, तेव्हा ते पुरुषवाचक असते. व स्वतः या अथनि येते, तेव्हा ते आत्मवाचक असते.

आपण चा पुरुषवाचक सर्वनाम म्हणून उपयोग :

1. तुझ्या सांगण्यावरुन आपण त्याच्याशी भांडणार नाही.

या वाक्यात आपण म्हणजे मी. प्रथमपुरुष एकवचन.

2. आम्ही ठरवले आहे की, आपण सहलीला जाऊ.

या वाक्यात आपण म्हणजे आम्ही. प्रथमपुरुष अनेकवचन.

3. शिक्षक विद्यार्थिनीला उपरोधाने म्हणाले, आपण रडणे थांबवून बोलाल का.

या वाक्यात आपण म्हणजे तू. द्वितीय पुरुष एकवचन.

4. मी देवळात गेली, तेव्हा आपण इकडे घरी आलात.

या वाक्यात आपण म्हणजे तुम्ही. द्वितीय पुरुष अनेकवचन.

5. सुरेशने मला शाळेत सोडले आणि आपण मात्र आलाच नाही.

या वाक्यात आपण म्हणजे ती. तृतीय पुरुष अनेकवचन.

6. नेत्यांनी कामगारांना बाहेर थांबविले आणि आपण चर्चेसाठी मालकांकडे गेले.

या वाक्यात आपण म्हणजे ते. तृतीय पुरुष, अनेकवचन.

वरील सर्व वाक्यातील आपण हे सर्वनाम पुरुषवाचक आहे.

आपणस्वतः चा आत्मवाचक सर्वनाम म्हणून उपयोग.

1. मी आपणहून त्या ठिकाणी गेली.

2. नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे.

३. त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केला.

4. ती स्वतः उठला व गाणे म्हणू लागला.

5. मी स्वतः त्याला पाहिले.

6. तुम्ही स्वतः ला काय समजता.

Sarvanam – सर्वनामे

 

सर्वनामांचा लिंगविचार :

मराठीत मूळ सर्वनामे 9:

1. मी,

2. तू,

3. तो,

4. हा,

5. जो,

6. कोण,

7. काय,

8. आपण,

9. स्वतः

यातील लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तीनच आहेत.

1. तो : तो-ती-ते.

2. हा : हा-हि-हे.

3. जो : जो-जी-जे.

याशिवाय इतर सर्व सर्वनामांची तीनही लिंगातील रूपे सारखीच राहतात. ती बदलत नाहीत.

सर्वनामांचा वचनविचार :

9 सर्वनामांपैकी 5 सर्वनामे वचनभेदाप्रमाणे बदलतात.

1. मी-आम्ही

2. तू – तुम्ही

3. तो – ती, ते, त्या

4. हा – ही, हे, हया

5. जो – जी, जे, ज्या

सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाकरिता आले असेल, त्यावर अवलंबून असते.


Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)


छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास – Chhatrapati Shivaji Maharaj History

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  

Leave a Comment