Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

Savitribai-Phule-Information-in-MarathiSavitribai Phule Information in Marathi

आज अनेक क्षेत्रात स्त्रिया यशाचे एक-एक शिखर पादाक्रांत करीत आहेत. न्याय्य अधिकाराच्या प्राप्तीकरिता निर्भिडपणे लढा देत आहेत. स्वाभिमानाने जगण्याचा उदंड आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे. कुटुंबाची, देशाची नव्हे तर जगाची धुरा सांभाळण्याचे बळ स्त्रियांमध्ये निर्माण झाले. या सर्वांमागे ज्यांची प्रेरणा, अपार कष्ट आहेत त्या म्हणजे भारतीय इतिहासातील पहिल्या युगस्त्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

स्त्रियांच्या आणि शुद्रातिशुद्रांच्या अधोगतीचे मुळ कारण म्हणजे, त्यांना समाजाने नाकारलेला विद्येचा अधिकार होय. स्त्रियांकरिता ज्ञानाची द्वारे खुली झाल्याशिवाय त्यांच्या जीवनातील अंधकारात प्रकाशाची ज्योत पेटणार नाही, हा शिक्षणाचा मार्ग त्यांनी जाणला म्हणूनच महात्मा फुलेंनी चालविलेल्या शिक्षणकार्यास, समाजसेवेस सनातनी लोकांनी केलेल्या विरोधाला, अत्याचाराला न जुमानता आपले जीवन समर्पित केले.

सत्याकरिता, न्यायाकरिता बहुमताचा विचार न करता समाजाने हजारो वर्षांपासून स्त्रियांच्या पायात ज्या परंपरेच्या प्रतिष्ठेच्या नावावर बेड्या अडकविल्या होत्या. त्या बेड्या तोडण्याचे महान कार्य सावित्रीबाईनी केले. एकोणिसाव्या शतकात सावित्रीबाईनी केलेले कार्य क्रांतीकारी व प्रेरणादायी आहे.

सावित्रीबाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील नायगांव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्यांचे वडील खंडोजी नेवसे-पाटील हे गावचे पाटील होते. त्यांचे पणजोबा मल्हारराव पाटील यांच्यापासून म्हणजेच इ.स. १७७४ पासून त्यांच्या घराण्याकडे पाटीलकी होती.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वाधात बहुजन समाजातील प्रतिष्ठित व आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या कुटुंबातही शिक्षणाला फारसे अनुकूल वातावरण नसायचे. त्यातच मुलीच्या शिक्षणाला तर समाज अजिबात अनुकूल नसायचा. त्यामुळे माहेरी सावित्रीबाईला शालेय शिक्षण मिळाले नाही. परंतु व्यावहारिक ज्ञान कुटुंबातून त्यांना मिळाले.

धैर्य, शौर्य, दुसऱ्यांविषयी प्रेम, जिव्हाळा, सत्याची, न्यायाची ओढ, परोपकार, त्याग हे गुण सावित्रीबाईच्या ठिकाणी होते. तेव्हाच्या प्रथेप्रमाणे बालवयातच सावित्रीबाईचा विवाह करण्यात आला. इ.स. १८४० मध्ये नायगांव येथे सावित्रीबाई आणि जोतिरावांचा विवाह पार पडला.

त्यावेळी सावित्रीबाईचे वय नऊ वर्षे तर जोतिरावांचे वय तेरा वर्ष होते. हा विवाह म्हणजे दोन व्यक्तींच्या नवजीवनाची सुरुवात नव्हती तर नवसमाज निर्मितीचा तो सर्वोदय होता. त्यामुळे युगप्रवर्तक क्रांतीकार्याचा प्रारंभ झाला.

स्त्री शिक्षणाकरिता संघर्ष : सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू करताच सनातन्यांनी त्यांचा विरोध केला. धर्मबुडवी, बाडगी, कैदांशीण अशा शब्दांनी त्यांची अवहेलना होऊ लागली. टोळकी जमून रस्त्याने जाता-येताना सावित्रीबाईच्या अंगावर चिखल शेण फेकित, दगड मारित, शिवीगाळ करीत तरी सुद्धा त्यांनी न डगमगता या कठीण परिस्थितीचा सामना केला.

कारण त्यांना आपल्या भगिनींना शिकवायच होत, मुक्त करायचं होत. पाशवी बंधनातून आपल्या अंगावर खडे, चिखल शेण फेकणाऱ्यांना त्या म्हणत, “मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्या अंगावर खडे अगर शेण फेकता आहात, ती मला फुलेच वाटतात. देव तुमचे भले करो.”

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा

Mahatma Jyotiba Phule Information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले मराठी

विचारामध्ये एवढी प्रगल्भता असणाऱ्या सावित्रीबाईंचे वय तेव्हा फक्त सतरा-अठरा वर्षाचे होते. एवढे अत्याचार होऊनही सावित्रीबाई आणि महात्मा फुले माघार घेत नाहीत हे पाहून समाजकंटकांनी सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुलेंचे कान भरायला सुरुवात केली.

कुळाची अब्रु जाईल, सून बिघडेल, धर्माला काळीमा लागेल आणि ४२ कुळ्या नरकात जातील असा धाक त्यांनी गोविंदरावांना घातला. समाजात जगायचे आहे तर समाजाला विरोध करून चालणार नाही. समाज वाळीत टाकेल या भितीने गोविंदरावांनी समाजसुधारणेच्या कार्यापासून आपल्या मुलाला व सूनेला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

पण दोघेही आपल्या निश्चयावर ठाम होते. शेवटी घराबाहेर जाण्याचा प्रसंग ओढावला. ही खरे तर सावित्रीबाईच्या सत्वपरीक्षेची वेळ होती. परंतु अशाही बिकट परिस्थितीत त्या डगमगल्या नाहीत. आपल्या पतीने हाती घेतलेले कार्य हे एक सत्यकर्मच आहे असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्यात महात्मा फुलेंना मनापासून साथ दिली.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

सावित्रीबाईवर आणखी एक असाच बिकट प्रसंग ओढवला. नेहमीप्रमाणे शाळेकडे जाताना एक घटिंगण रस्त्यात आडवा येऊन उभा राहिला. सावित्रीबाईला तो धमकाऊ लागला. अब्रु घेण्याचा पवित्रा त्याने घेतला होता. सावित्रीबाईनी निडरपणे त्या घटींगणास दोन थपडा लगावल्या. तेव्हापासून सावित्रीबाईला होणारा त्रास एकदमच कमी झाला.

भिणाऱ्याला लोक अधिक भिती दाखवतात, म्हणून न घाबरता निर्भिडपणे संकटाचा प्रतिकार केला पाहिजे, हा संदेश त्यांनी दिला. अशा अनेक संकटांना तोंड देत सावित्रीबाईनी आपले ज्ञानकार्य यशस्वी केले आणि देशासमोर एक नवा आदर्श उभा केला. तत्कालिन कालखंडामध्ये मुलींना शिक्षण देणे म्हणजे धर्मद्रोह समजल्या जायचा.

म्हणून स्त्री शिक्षणाला प्रचंड विरोध होता. अशावेळी काही पुरोगामी विचाराचे पालक आपल्या मुलींना पोत्यात घालून शाळेमध्ये दाखल करीत असत. नंतर त्या विद्यार्थीनी फुले दांपत्यांच्या शाळेत सुखरुप अध्ययन करायच्या. आज मुली मुलांच्या बरोबरीने चढाओढीचे शिक्षण घेताना सर्वत्र दिसत आहेत.

परंतु शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीने तत्कालिन प्रारंभीच्या ‘पोते शिक्षण पद्धती’चे कायम स्मरण ठेवले पाहिजे, जेणेकरून फुले दांपत्याने शिक्षण प्रसाराकरिता केलेल्या अथक परिश्रमाचा आपल्याला विसर पडणार नाही.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

आद्य स्त्री शिक्षिका : स्त्री शिक्षणाचा पहिला प्रयोग महात्मा फुलेंनी आपल्या शेतामधील आंब्याच्या झाडाखाली सुरू केला. सावित्रीबाई आणि सगुणाबाई या प्रयोगशाळेतील पहिल्या विद्यार्थीनी होत्या. त्यानंतर महात्मा फुलेंनी सावित्रीबाईना पुण्यातील नॉर्मल स्कूलच्या प्रमुख मिसेस मिचेलबाई यांच्याकडे पाठविले.

महात्मा फुलेंनी इ.स. १८४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली होती. भारतीय व्यक्तीने मुलींकरिता सुरू केलेली ती भारतातील पहिलीच शाळा होती. सुरुवातीला स्वतःच या शाळेत विनावेतन शिकवित असत. शाळेत काम करण्याकरिता दुसऱ्या शिक्षकाची गरज होती.

तेथे अस्पृश्य मुलीही शिकत असत, त्यामुळे त्यांना दुसरा कोणी शिक्षण द्यायला तयार नव्हते. तसेच विनावेतन शिक्षक मिळणेही कठीण होते. त्याचबरोबर सनातनी लोकांचा विरोध पत्करण्याची कुणाची तयारी नव्हती. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला शिक्षिका बनविण्याचे ठरविले.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

त्याकरिता सावित्रीबाईना अहमदनगरला मिसेस फॅरारबाईकडे इ.स. १८४९ ला अध्यापनाचे प्रशिक्षण घेण्याकरिता पाठविले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य सुरू केले.

यापूर्वी महाराष्ट्र किंवा अन्य राज्यात एकही भारतीय स्त्रीने शिक्षिका म्हणून काम केल्याचे उदाहरण नाही. म्हणून सावित्रीबाई ह्याच भारतातल्या आद्य भारतीय स्त्री शिक्षिका ठरतात.  तसेच ३ जुलै १८५१ ला अण्णासाहेब चिपळुणकर यांच्या वाड्यात सुरू करण्यात आलेल्या शाळेत त्या मुख्याध्यापिका होत्या.

म्हणून त्या भारतातील आद्य स्त्री मुख्याध्यापिका सुद्धा ठरतात. १२ फेब्रुवारी १८५३ ला फुले दांपत्यांच्या संस्थेच्या शाळेची दुसरी वार्षिक परीक्षा होती. ह्या परीक्षेमध्ये २३७ विद्यार्थीनी बसलेल्या होत्या. यावेळी परीक्षेनंतर आयोजित बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मिसेस ई. सी. जोन्स ह्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले होते.

बक्षीस स्वीकारताना एका विद्यार्थीनीने असे सुचविले की, आम्हाला साड्या, पुस्तकाचे बक्षीस न देता शाळेसाठी प्रत्यक्ष ग्रंथालय द्या. ही सूचना महात्मा फुले व सावित्रीबाईंनी प्रत्यक्षात अंमलात आणली. शालेय ग्रंथालयाच्या योजनेची ही सूचना नांदी ठरली.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

शैक्षणिक विचार : सावित्रीबाईनी शिक्षणकार्य करीत असताना शिक्षिका, मुख्याध्यापिका, संचालिका इ. जवाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांनी शिक्षण क्षेत्रात तुलनात्मक व प्रायोगिक काम करून काही शिक्षणविषयक सिद्धांतही सांगितले.

शिक्षणाच्या प्रगतीस परंपरा व परिस्थितीही कारणीभूत होते, असा मूलभूत विचार त्यांनी मांडला, म्हणून शुद्रातिशुद्रांच्या मुलांचा शैक्षणिक विकास साधायचा असल्यास त्याच समाजातील शिक्षकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. त्याकरिता त्यांनी बुधवार पेठेतील शाळेत अध्यापन कार्याची जबाबदारी ब्राम्हण शिक्षकांवर सोपवून स्वतः शुद्रातिशुद्रांसाठी काढलेल्या शाळेतील मुलांना शिकविले.

तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार समजून घेऊन शिक्षण देण्यासाठी शिक्षक प्रशिक्षित असावा, यावर त्यांचा कटाक्ष होता. यासाठी अध्यापक विद्यालयाची त्यांनी गरज प्रतिपादिली आणि यासाठी फुले दांम्पत्याने अध्यापकासाठी नॉर्मल स्कूल सुरू केले.

कोणत्याही समाजातील नवीन पिढी शरीराने, मनाने निरोगी व्हावयाची असेल तर त्या समाजाचे नैतिक स्वास्थ निरोगी व सुसंपन्न असायला हवे. महात्मा फुले व सावित्रीबाईचा केवळ शिक्षणाचा प्रसार करून लोकांना साक्षर करणे हाच मर्यादीत हेतू नव्हता तर शिक्षण हे जीवनाभिमुख असावे. व्यावसायिक शिक्षण, शेती शिक्षण, तांत्रिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली पाहिजे.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

कारण दीन-दलितांच्या मुलांना वाचावयास, लिहावयास शिकविण्याबरोबरच त्यांचे कपड्यालत्यांचे, पोटापाण्याचे व आरोग्याचे प्रश्न सोडविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अर्धनग्न व भूकेल्यापोटी पांडित्यपूर्ण उपदेश करणे व्यर्थ आहे हे त्यांनी यावरून स्पष्ट केले. जे माता-पिता आपल्या पुत्र व कन्येस शिकवित नाहीत ते त्यांचे शत्रू असतात असे समजावे.

तसेच शिक्षण हे समाजजागृतीचे व समाजक्रांतीचे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. समाजाच्या अवनतीचे मूळ एका अविद्येत आहे. विद्येने परिस्थितीवर मात करता येते असा मूलभूत विचार त्यांनी मांडला.

अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांचा विरोध : सावित्रीबाईनी समाजात परंपरागतरित्या चालत आलेल्या अनिष्ट रूढी परंपरांचा प्रखर विरोध केला. ज्यांनी स्त्री आणि शुद्रातिशुद्रांना गुलाम बनविले होते, त्यांचे जीवन यातनामय केले होते, त्यांचा प्रखर विरोध करीत त्या प्रथा बंद करण्याचा महात्मा फुलेंच्या सोबतीने सतत प्रयत्न केला.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

केशवपन, बालविवाह, बहुपत्नीत्व, सती, बालहत्या इत्यादी प्रथा बंद करण्याकरिता लढा दिला तसेच विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. एखादी मुलगी विधवा झाल्यानंतर तिला विद्रुप करण्याकरिता तिच्या डोक्यावरील केस काढल्या जात होते.

ही दुष्ट प्रथा बंद करण्याकरिता सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी न्हाव्यांची सभा घेऊन विधवा स्त्रीचे केस कापणे कसे वाईट कृत्य आहे हे समजावून सांगितले. न्हाव्यांनी विधवा स्त्रीचे केस कापण्यास नकार दिला. त्यांच्याच प्रेरणेने न्हाव्हांचा संप घडवून आणण्याचा उपक्रम कामगार नेते नारायण लोखंडे यांनी केला.

फुले दांम्पत्यांच्या प्रेरणेने घडवून आणलेला केशवपन प्रथेविरुद्ध न्हाव्यांचा संप भारतील पहिलाच संप होता. त्या ऐतिहासिक संपाचा वृत्तांत लंडनच्या दी टाईम्स या वृत्तपत्राने ९ एप्रिल १८९० रोजी प्रसिद्ध केला. इंग्लंडमधील महिलांनी सावित्रीबाईना अभिनंदन पत्र पाठविले. एक पुरुष कितीही स्त्रियांसोबत विवाह करू शकत असे.

मात्र स्त्रीला तो अधिकार नव्हता. त्यामुळे विधवा मुलींना मृत्यूकंठस्थ जीवन जगावे लागत असे. विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह घडून यावेत याकरिता सावित्रीबाईनी ‘विधवा पुनर्विवाह’ घडवून आणणारी सभा स्थापन केली. स्त्रियांची ही पहिली संघटना मानावी लागेल. सांधिक शक्तीशिवाय स्त्रीमुक्ती आंदोलन यशस्वी होणार नाही हे सावित्रीबाईंनी ओळखले होते.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

महात्मा फुलेंच्या अंत्ययात्रेप्रसंगी सावित्रीबाईंच्या अंगी असलेल्या धैर्याचे व पुरोगामी वृत्तीचे दर्शन होते. महात्मा फुलेंची नामता हडपण्याच्या हेतूने त्यांचे चुलत पुतने अंत्ययात्रेच्या प्रसंगी आडवे आले. महात्मा फुलेंच्या निधनानंतर जीवलग, सखा, परममित्र गेल्याने डोंगराएवढे दुःख सहन करून सावित्रीबाईंनी महात्मा फुलेच्या प्रेतयात्रेत परिस्थितीवश होऊन टिटवे धरले.

इतकेच नव्हे तर हजारो वर्षाच्या परंपरेला छेद देऊन त्यांनी महात्मा फुलेंच्या पार्थिवावर अग्निसंस्कारही केला. सावित्रीबाईनी ज्या अंधश्रद्धामुलक प्रथा, परंपरा, रूढी शृखंलांनी समाजाला गतिहीन केले होते. गुलाम बनविले होते त्या शृंखला मोडण्याकरिता सतत संघर्ष केला.

अस्पृश्योद्धाराचे कार्य : सावित्रीबाईनी स्त्रिया, शुद्रातिशुद्र आणि गोरगरिबांच्या कल्याणाकरिता स्वतःला आपल्या पतीबरोबर झोकून दिले. त्यांनी एका भाषणात म्हटले आहे, सर्व मानव ही एका ईश्वराची लेकरे आहेत हे जोपर्यंत आपणास कळत नाही तोपर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप आपणास कळणार नाही.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

आपण सारे मानव भाऊ-भाऊ आहोत, असे वाटणे हे ईश्वर ओळखण्याच्या मार्गातील महत्त्वाचे चिन्ह आहे आणि ते सत्य आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही श्रेष्ठ व महार, मांग नीच म्हणून स्पृश्य-अस्पृश्यता मानने मुर्खपणाचे आहे. जे लोक असे मानतात व तिचे देव्हारे माजवितात, त्यांना ईश्वराचे सत्य स्वरूप कधीच ओळखता येणार नाही.

उच्च जाती, नीच जाती ही ईश्वरकृत नाहीत. स्वार्थी मानवाने स्वतःचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी आणि त्यायोगे आपले व आपल्या वंशजांचे हित व्हावे म्हणून निर्माण केलेले पाखंडी तत्त्वज्ञान आहे. दुसऱ्या मानवास अस्पृश्य मानणे हे मनुष्यत्त्वाचे लक्षण नाही, म्हणून अस्पृश्यतेचा प्रत्येक व्यक्तीने धिक्कार करणे यातच प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे किंवा कोणत्याही मानवी संस्कृतीचे परमकल्याण आहे.”

यावरून सावित्रीबाईंचे विचार किती उदात्त आणि मानवतावादी होते याची कल्पना येते. अस्पृश्य समजल्या गेलेल्या लोकांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या गुलामगिरीत जखडून ठेवले होते. या सर्व महाभयंकर रोगावर विद्या हेच एक रामबाण औषध आहे. हे फुले दाम्पत्यांनी ओळखले होते.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

म्हणूनच शिक्षणाचा अधिकार नाकारलेल्या अस्पृश्यांसाठी १५ मे १८४८ रोजी पुण्यातील महारवाड्यात दुसरी शाळा उघडली. ही शाळा मुला-मुलींसाठी होती. महारवाड्यातच मुलींसाठी स्वतंत्र शाळा १८५१ मध्ये सुरू केली. नंतर अनेक ठिकाणी अस्पृश्यांकरिता शाळा काढण्यात आल्या. त्यामध्ये फुले दांपत्यांनी शिक्षण देण्याचे काम केले.

अस्पृश्य समजल्या गेलेल्या लोकांना ज्ञानाची दारे खुली करून थंड लोळा गोळा झालेल्या शुद्रातिशुद्र समाजाला विद्येची ऊब देऊन त्यांच्यामधील अस्मिता जागृत केली. १४ जानेवारी १८५२ मध्ये सावित्रीबाईंनी कोणतेही जातीबंधन न पाळता तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित करून जातीची बंधने तोडण्याचे कार्य करून आदर्श उभा केला.

तहानेने व्याकूळ झाल्यावर पाणी देण्याची माणुसकी सुद्धा दुर्मिळ होती. सावित्रीबाईनी अशा काळात आपल्या घरची विहीर अस्पृश्यांकरिता खुली करून जातीव्यवस्थेला तडा दिला. दीन-दलित, निराधार स्त्रियांसाठी सावित्रीबाईंनी काही उद्योग व्यवसाय सुरू केले. पोटाची भूक भागविण्यासाठी शेकडो स्त्रिया लाचारी स्वीकारत होत्या.

लाचारीतून गुलामगिरी आणि गुलामगिरीतून अत्याचार असे हे दुष्टचक्र होते. ते दुष्टचक्र सावित्रीबाईनी स्वावलंबनाचे धडे देऊन तोडून टाकण्याचा प्रयत्न केला. इ.स. १८९३ साली पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सत्यशोधक समाजाची विसावी परिषद आयोजित झाली होती.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

या परिषदेमध्ये अध्यक्षीय भाषणात सावित्रीबाई म्हणाल्या होत्या, “अरे, तुम्ही पळी पंचपात्राच्या आवाजाचा पंचांग का गाता? महारमांगांना अस्पृश्य का समजता? शुद्रादी अतिशूद्रांना अडाणी का ठेवता? तुमच्या या मूर्ख वागण्याने तुमचे जात भाई ब्राम्हण ख्रिस्ती होत आहे.

मूर्खानो, तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता, अस्पृश्य हिंदू असताना त्यांना हिन लेखून दूर का ठेवता? गोरे लोक हिंदू नसताना त्यांच्या शेजारी बसून पावरोटी मटामट खाण्यात भूषण मानतात आणि महारमांगाची सावली पडली तर विटाळ झाला, असे तुम्ही मानता. हे खऱ्या धर्माचे ज्ञान आहे, असे म्हणता येत नाही. ह्यासाठी ब्राम्हणाने खऱ्या धर्माचे ज्ञान घ्यावे.

तत्कालीन समाजावर असलेला धर्माचा व परंपरेचा पगडा, बहुसंख्य लोकांचे अज्ञान यामुळे बाहेरील लोकांबरोबर कुटुंबातील लोकांनी सुद्धा सावित्रीबाईनी चालविलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याचा विरोध केला. परंतु त्याने विचलीत न होता त्यांनी अविरतपणे अस्पृश्योद्धाराचे कार्य सुरू ठेवले.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

महिला सेवा मंडळ : चुल आणि मुल एवढ्यापर्यंतच सिमीत जीवन असलेल्या महिलांना सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनात इ.स. १८५२ च्या सुमारास ‘महिला सेवा मंडळा’ची स्थापना केली. या संस्थेच्या अध्यक्षा मिसेस ई. सी. जोन्स व सचिव सावित्रीबाई होत्या. स्त्रियांच्या प्रगतीकरिता कार्य करणारी देशातील ही पहिली संस्था होय.

या मंडळाने स्त्री चळवळीला गतिमान करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. या अंतर्गत विधवा पुनर्विवाह घडवून आणणे, प्रौढ स्त्रियांना शिक्षण देणे, दारोड्या नवऱ्याच्या जाचातून पत्नीची सोडवणूक करणे, हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून समानता प्रस्थापित करणे इ. कार्य केल्या जात असत. या मंडळाची दर पंधरवाड्याला एक बैठक होत असे.

या मंडळाद्वारे १४ जानेवारी १८५२ ला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सावित्रीबाईनी तयार केली होती. या पत्रिकेत असे लिहिले होते की, … समारंभ सायंकाळी ५ वाजता आहे. कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकाच जाजमावर बसतील.

जातिभेद व पक्षपात न करता सर्वांना सारखेच मानून हळदी-कुंकू लावण्यात येईल आणि तीळ-गुळ वाटण्यात येईल… सौ. सावित्रीबाई अतार जोतिराव फुले सेक्रेटरीण, महील सेवा मंडळ’ ही पत्रिका म्हणजे विषमतेने ग्रासलेल्या समाजाला सुरूंग लावण्याचे घोषणापत्रच होते. हा कार्यक्रम घेण्यामागे धार्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा नव्हता तर सामाजिक दृष्टिकोन महत्त्वाचा होता, हे लक्षात घेतले पाहिजे.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

सावित्रीबाई एक आदर्श पत्नी व आदर्श माता : आपल्या संपूर्ण जीवनात सावित्रीबाईनी पतीच्या कार्याची कास धरली. एक समविचारी मैत्रिण, अडीअडचणीत साथ देणारी, सत्कार्यासाठी धैर्य व प्रेरणा देणारी व सर्वच महिलांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा त्या एका महान समाजसुधारकांच्या आदर्श पत्नी होत्या.

पत्तीच्या कार्यासाठी प्रसंगी समाजाची अवहेलना, अपमान सहन केला. पण पतीला शब्दाने कधी दुखावले नाही. जोतिरावांच्या जीवनाच्या त्या खऱ्या अर्थाने ज्योत बनल्या. १० ऑक्टोबर १८५६ मध्ये सावित्रीबाईने नायगाववरून महात्मा फुलेंना पत्र लिहिले होते.

या पत्रामधून पतीच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रसंगी आप्तस्वकीयांचा विरोध असतानाही सत्यासाठी उभे राहण्याचे धाडस आणि सत्यासाठी संघर्ष करण्याची मानसिकता दिसून येते. या पत्रामध्ये सावित्रीबाई आणि त्यांचे लहान बंधु सिहूजी यांच्यामध्ये घडून आलेल्या वैचारिक मतभेदाचे आणि समेटाचे वास्तव चित्र त्यांनी केले आहे.

समाजसुधारकांना घरच्या उंबरठ्यापासून कसा लढा द्यावा लागतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पत्र होय. या पत्राच्या समारोपामध्ये त्या लिहितात, ‘…यावरून तुमच्या ध्यानात येईल की पुण्यात आपल्या विषयी दुष्टावा माजविणारे विदुषक पुष्कळ आहेत, तसेच येथेही आहेत.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

त्यांना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे? सदा सर्वदा कामात गुंतावे, भविष्यात यश आपलेच आहे.’ विवाह होऊन बरेच वर्ष झाल्यानंतर मुलंबाळ झाले नव्हते. त्यामुळे महात्मा फुलेंना दुसऱ्या विवाहाचा आग्रह होऊ लागला तेव्हा सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन सावित्रीबाईनी महात्मा फुलेंना अगदी हसतमुखाने दुसरा विवाह करण्यास मुभा दिली.

महात्मा फुले पुरोगामी विचाराचे असल्यामुळे त्यांनी त्यास नकार दिला. जैविक अर्थाने सावित्रीबाई माता झाल्या नाहीत पण समस्त दीन-दलितांच्या त्या माता बनल्या. महात्मा फुलेंनी मागासलेल्या विद्यार्थ्यासाठी आपल्या घराशेजारी एक बोर्डींग उघडले. ल्या विद्यार्थ्यांना त्या एका वेळी शंभर शंभर भाकरी करून आनंदाने खाऊ घालीत असत.

त्यांची आईच्या मायेने चौकशी करीत, त्यांची काळजी घेत. तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये कितीतरी बालकांचे संगोपन करून हे जग दाखविण्याचे महान कार्य या मातेने केले. सावित्रीबाईना मात्र शेवटचे दिवस एकांतात काढावे लागले. कारण त्यांची लाडकी सुन राधा ऊर्फ लक्ष्मीबाई ह्या ६ मार्च १८९५ ला मृत्यू पावल्या. यशवंत हे नोकरीकरिता पुण्याच्या बाहेर होते. त्यामुळे सावित्रीबाई भरल्या घरामध्ये एकट्याच राहिल्या होत्या.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव व पेशवाईच्या स्वैराचारी कारभारावर टीका : छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुजनांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले आणि सर्वांना आपल्या राज्यामध्ये न्यायाने, समानतेने व सहिष्णुतेने वागविले. महाराजांच्या या कार्याचा गौरव करताना सावित्रीबाई म्हणतात,

“म्हणोनी शिवाजी स्वराज्या उभारी।

समाजी अतिशूद्र लोकास तारी।।

मनुष्या आणि सुखी ठेवी त्यांना।

परी शिव सत्तापुढे लाभली ना ।।”

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या आदर्श मुल्यांवर आपले राज्य चालविले होते त्या आदर्श मुल्यांचा उत्तर पेशवाईत मात्र न्हास झाला व पेशवाईने शुद्रातिशुद्र लोकांवर अन्याय, अत्याचार करून स्वैराचाराने राज्य चालविले. पेशवाईने लादलेल्या या गुलामीचे चित्रण रेखाटताना त्या म्हणतात,

“पुढे पेशवाई तिचे राज्य आले।

अनाचार देखी अति शूद्र भ्याले।।

स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते।

खुण नाश या ढुंगणी झाप होते।।”

प्लेग रुग्णांची सेवा व मृत्यू : हाँगकाँग बंदरातून मुंबई बंदर मार्गे पुण्यामध्ये इ.स. १८९७ च्या सुरुवातीला प्लेगचे आगमन झाले. पुण्यात या रोगाने थैमान घातले. पुण्यात पुणे परिसरात सत्यशोधक समाजाने सावित्रीबाईच्या नेतृत्वाखाली आपले सेवाकार्य चालू केले होते. त्यांनी अहमदनगरहून प्लेग रूग्णांची सेवा करण्याकरिता यशवंतरावांना बोलावून घेऊन ग्यानोबा ससाने यांच्या हडपसर येथील माळावर दवाखाना सुरू करायला लावला.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

यशवंतरावही रजा टाकून या मानवतेच्या कार्यात सहभागी झाले. सावित्रीबाईनी प्लेग निर्मूलनासाठी शर्तीने प्रयत्न केले. त्यांनी आई-वडील नसलेल्या मुंडव्याच्या पांडुरंग बाबाजी गायकवाड या प्लेगग्रस्त मुलास दवाखान्यात आणले. त्या मुलाचे प्राण वाचले परंतु त्यामुळे सावित्रीबाईना प्लेगची लागण झाली.

समाजसेवा करीत असतानाच १० मार्च १८९७ रोजी युगस्त्री, स्त्री मुक्तीच्या आद्यप्रणेत्या विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाईनी जगाचा निरोप घेतला तो फक्त शरीराने मात्र स्त्रीकर्तृत्वाच्या अफाट वटवृक्षाच्या रुपात त्या आजही जिवंत आहेत.

सावित्रीबाईंच्या कार्याचे महत्त्व : सावित्रीबाईंनी हजारो वर्षापासून दुःख, वेदना, विटंबना, अन्याय, अत्याचार, शोषण झालेल्या स्त्री-शुद्रातिशुद्र हे माणसचं आहेत, त्यांनाही स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे हे सांगून त्यांच्या गुलामीच्या जखमांवर ज्ञानरूपी फुंकर घातले व त्यांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करून क्रांतीची ज्योत पेटविली.

त्यांना माणूस म्हणून जगविले आणि सन्मानाने जगविणे शिकविले. म्हणून सावित्रीबाईला क्रांतिज्योती म्हणणे सार्थक ठरते. एखाद्या स्त्रीने शिकावं हा त्याकाळी मोठा धर्मद्रोह समजल्या जात असतानाच सावित्रीबाई फक्त स्वतः शिकल्या नाहीत तर आपल्या भगिनींनाही शिकविले.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

कारण त्याशिवाय समाजाने धर्माच्या नावावर घातलेल्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांच्या बेड्या स्त्रिया मोडू शकणार नाहीत हे त्यांनी जाणले होते. म्हणून कोणत्याही परिणामांची पर्वा न करता मृत्यूलाही न भिता बुरसटलेल्या समाजाविरूद्ध जाऊन मुलींना शिकविण्याचे अपूर्व धाडस त्यांनी केले.

तसेच महात्मा फुलेंनी समाजसुधारणेचे जे महान कार्य हाती घेतले ते सावित्रीबाईच्या सहकार्याने करू शकले. हे स्वतः महात्मा फुलेंनी कबूल केले. याबाबतीत परिस आणि लोखंड यांची उपमा समजण्यासारखी आहे. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात.

परंतु लोखंडाच्या ठिकाणी परिसाचे गुण आकर्षून घेण्याची मुळातच क्षमता नसेल तर त्याचे सोन्यात रूपांतर होणे शक्य नाही. तेव्हा परिसाप्रमाणेच लोखंडामध्ये गुणग्राही असण्याची गरज असते. सावित्रीबाईमध्ये ती गुणग्राहकता होती. त्यामुळे त्या समाजपरिवर्तनाचे क्रांतीकारी कार्य करू शकल्या.

सावित्रीबाईच्या बहुमोल शैक्षणिक कार्याची प्रशंसा मेजर कॅडी यांनी केली होती. मेजर कँडी यांनी केलेला फुले दांम्पत्याचा गौरव म्हणजे स्त्रीशिक्षणाच्या यशस्वी कार्याची पोचपावती होती. स्त्री-शुद्रातिशुद्रांची सेवा हिच ईश्वर सेवा मानून त्यांच्याकरिता ज्ञानाचे कवाडे खुली करणारी ही पहिली भारतीय स्त्री होती.

Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले मराठी

म्हणून भारतातील स्त्रीमूक्ती आंदोलनाचे मूळ सावित्रीबाईच्या कार्यातच शोधावे लागेल. स्त्री शक्ती जागृत केल्याशिवाय स्त्रीमुक्ती शक्य नाही हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. म्हणूनच सावित्रीबाई ह्या भारतातील स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या प्रेषित व प्रणेत्या ठरतात. त्यांच्याच कार्याने स्त्रीने ‘चूल आणि मूल यापलिकडे जाऊन ज्ञानरूपी पंखांच्या बळावर अंगण ते अंतराळ अशी उत्तुंग झेप घेतली आहे.

Shetkaryancha Asud

Leave a Comment