Visheshan- विशेषण

Visheshan
                       Visheshan

विशेषण

विशेषण : नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे विशेषण.

Visheshan- विशेषण

विशेष्य : ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात.

    विशेषण 

गुणविशेषण                                संख्याविशेषण                      सार्वनामिक विशेषण

गणनावाचक    क्रमवाचक    आवृत्तीवाचक    पृथकत्ववाचक      अनिश्चित

पूर्णांक    अपूर्णांक      साकल्य

 

1. गुणविशेषण :

ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण / अवगुण किंवा विशेष
दाखविला जाती, त्यास गुणविशेषण असे म्हणतात.

उदा: मोठी मुले, आंबट, शुभ्र, शूर, सुंदर, वाईट, दुष्ट, इ.

Visheshan- विशेषण

2. संख्याविशेषण :

ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते, त्यास संख्याविशेषण म्हणतात.

अ) गणनावाचक संख्याविशेषण :

• पूर्णांक वाचक : एक, दोन, तीन… शंभर, लाख कोटी

• अपूर्णांक वाचक : पाव, अर्धा, पाऊन, तीनपंचमांश

• साकल्य वाचक : दोन्ही, तिन्ही, चारही.

ब) क्रमवाचक संख्याविशेषण :

पहिला, दुसरा, आठवी, साठावे, शंभरावे

क) आवृत्तीवाचक संख्याविशेषण :

चौपट, दसपट, द्विगुणित, दुहेरी, इ.

ड) पृथकत्ववाचक संख्याविशेषण :

एकेक, दहा-दहा, शंभर-शंभर, इ.

इ) अनिश्चित / सामान्य संख्याविशेषण :

सर्व, थोडी, काही इतर, इत्यादी, इ

Visheshan- विशेषण

3. सार्वनामिक विशेषण :

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात.

उदा:

मी-माझा

तू-तुझा

तो-त्याचा

आम्ही-आमचा

तुम्ही-तुमचा

ती-तिचा

हा- असला, असा, इतका, एवढा, अमका

तो-तसा, तसला, तितका, तेवढा, तमका

जो-असा, जसला, जितका, जेवढा

कोण-कोणता, केवढा

काय-कसा, कसला.

नामै धातुसाधितै व अन्ययसाधिते यांचा विशेषणांसारखा उपयोग होतो.

Visheshan- विशेषण

1. नामसाधित विशेषणे :

नामांपासून साधलेली विशेषणे.

उदा. समाज-सामाजिक, कला-कलावंत, सातारा-सातारी, नगर-नगरी, कोल्हापूर-कोल्हापूरी, राग-रागीट, माया-मायाळू, बुद्धीमान, धन-धनवान, कापड-कापडदुकान, फळ-फळभाजी,

2. धातुसाधित विशेषण :

धातूंपासून बनलेली विशेषणे.

उदा : हस-हसरा, पिक-पिकलेला, रांग-रांगणारा, वाह-वाहती, पेट-पेटती, बोल-बोलकी

3. अव्ययसाधित विशेषणे :

अव्ययांपासून बनलेली विशेषणे.

उदा: वर-वरचा, खाली-खालील, मागे-मागील, पुढे-पुढची, इ.

Visheshan- विशेषण

 

अधिविशेषण / पूर्व विशेषण :

विशेषणे सामान्यतः विशेष्याच्या पूर्वी येतात, त्यांना अधिविशेषण किंवा पूर्व विशेषण म्हणतात.
उदा : चांगला मुलगा सर्वाना आवडतो.

विधि- विशेषण :

काही वेळा विशेषण विशेष्याच्या नंतर येतात. त्यांना विधि विशेषण किंवा उत्तर विशेषण म्हणतात.

उदा: मुलगा हुशार आहे. गणेशचे अक्षर सुंदर आहे.

क्रियाविशेषण :

काही विशेषणे क्रियापदाबाबत अधिक माहिती सांगतात. अशा विशेषणांना क्रियाविशेषणे म्हणतात. मात्र काही वेळा ती अव्यये नसतात. ती विकारी असतात, म्हणजे ती नामाच्या लिंग, वचन यानुसार बदलात त्यांना क्रियाविशेषण सव्यय म्हणतात.

Visheshan- विशेषण

उदा: मुलगा चांगला खेळतो-  मुलगी चांगली खेळते- ते चांगले खेळतात.

या वाक्यात चांगला है क्रियाविशेषण आहे, मात्र ते कर्त्याच्या लिंग, वचनानुसार बदलत आहे, म्हणून ते क्रियाविशेषण सव्यय आहे.

शहाणा-शहाणी-शहाणे-शहाण्या

मोठा-मोठी-मोठे-मोठ्या 


Sugam Marathi Vyakaran (M R Walambe)


समानार्थी शब्द – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विभक्ती – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

क्रियापद – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नाम – मराठी व्याकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इतिहास – वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  

Leave a Comment