Vishnushastri Chiplunkar
विष्णुशास्त्री चिपळूणकर हे परंपरानिष्ठ राष्ट्रवादी विचारांचे अध्वर्यू मानले जातात. स्वधर्म, स्वभाषा व स्वसंस्कृती यांच्या आंतरिक अभिमानातून त्यांचा वैचारिक पिंड पोसला गेला होता. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान आणि संस्कृती ही जगातील श्रेष्ठ संस्कृतीपैकी एक आहे व त्याचा आम्हास विलक्षण अभिमान आहे असे ते म्हणत.
सुधारणावादी चळवळीवर ते सातत्याने, निष्ठेने टीका करीत राहिले. पुराणमतवादी लोक त्यांचा जयघोष करीत होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांची पारंपरिक मूल्यांवर अतिरेकी श्रद्धा असल्यामुळे सुधारणावादी विचार त्यांना मानवले नाहीत. डॉ. भांडारकर, न्या. रानडे, सार्वजनिक काका, म. फुले, दयानंद सरस्वती यांनी समाज व धर्म यांच्या चिकित्सेचे व सुधारणांचे जे उपक्रम मोठ्या धैर्याने केले पण त्याचे महत्त्व व मर्म त्यांच्या बुद्धीस पटले नाही.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
सुधारणावादी विचारांची मर्मभेदक पद्धतीने कुचेष्टा करण्यात ते रंगले. म. फुले, लोकहितवादी व स्वामी दयानंद यांच्यावर आक्रमक स्वरूपाची टीका त्यांनी केली, डॉ. जे. व्ही. नाईक त्यांचे वर्णन, प्रतिगामी हिंदू विचारप्रणालीचे मुख्य प्रवक्ते’ या शब्दात करतात.
पूर्वचरित्र :- विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. १७ मार्च रोजी त्यांचा स्मृतीदिन आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा जन्म २० मे, १८५० रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात चित्पावन कुटुंबात झाला.
१८७५ साली मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने ‘किताबखाना’ नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. ‘आधुनिक मराठी गद्याचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे श्रेष्ठ मराठी ग्रंथकार त्यांच्या अगोदर आधुनिक मराठी गद्य जवळजवळ अर्ध्या शतकाहून अधिक काळ निर्माण होत होते परंतु त्यांनी त्याला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त करून दिले.
व इ.स. १८८२ मध्ये ते मृत्यू पावले. रत्नागिरी जिल्ह्यांतील पावस हे त्यांचे मूळ गाव. भाषापंडित भारतीय संस्कृती व इतिहासाचा अभिमानी, पारतंत्र्याचा विरोधक व एक इदिवान माणूस म्हणून विष्णुशास्त्रींची ओळख होती.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
त्यांचे वडील कृष्णशास्वी हे विद्वान, प्रतिभासंपन्न व भाषापंडित होते. तसेच पट्टीचे वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. ते ट्रेनिंग कॉलेजचे प्राचार्य व ‘शालापत्रक’चे संपादक होते. अनुवादक म्हणून शासकीय नोकरीत रुजू झाले. इ.स. १८७५ मध्ये अर्थशास्त्र परिभाषा प्रकरण पहिले’ हा ग्रंथ प्रकाशित झाला.
हा ग्रंथ म्हणजे जे. एम. मिलच्या Principle of Political Economy चे भाषांतर होय. आधुनिक महाराष्ट्राचे ते भाषाप्रभु, पहिले शब्दशिल्पी व पहिले शैलीदार साहित्यिक होते. प्रगल्भ बुद्धिमत्तेबरोबरच असामान्य स्मरणशक्तीची जोड त्यांना मिळाली होती.
त्याकाळात पुण्यात होणाऱ्या सभा त्यांच्याच नेतृत्वाखाली होत असत, कृष्णशास्त्रीनी काही लेखनही केले होते. लेखन व वाचन हा संस्कार विष्णुशास्त्रीवर झाला तो त्यांच्या वडिलांमुळेच त्यांचे आजोबा हरिपंत हे धार्मिक वृत्तीचे होते.
Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
Narayan Meghaji Lokhande – नारायण मेघाजी लोखंडे
धार्मिक विचारसरणीचे आजोबा व सुधारणावादी वडील यांच्या परस्परविरोधी शिकवणीतूनच विष्णुशास्त्रीचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. विष्णुशास्वी शिक्षण पुना हायस्कूल व पुण्याचे डेक्कन कॉलेजमध्ये झाले. इ.स. १८७२ मध्ये बी.ए. झाल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यास करावा किंवा सरकारी नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती; पण मुळातच साहित्यिकाचा पिंड असल्याने त्यांनी या इच्छेकडे दुर्लक्ष केले.
पण नंतर पुना हायस्कूल या सरकारी शाळेतच शिक्षक म्हणून ते नेमले गेले. पण ते शाळेत वेळेवर उपस्थित राहत नसत व वर्गही वेळेअगोदर सोडत. म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मोरेश्वर कुंटे यांच्याशी त्यांचे खटके उडत. म्हणून त्यांनी शाळेतील. शिक्षकांच्या नोकरीचा राजीनामा दिला.
२ जानेवारी १८८० रोजी पुण्यात न्यू इंग्लिश शाळेची स्थापना चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी केली. या शाळेने अल्पावधीत नाव कमावले. शाळेचा झपाट्याने विकास झाला. या शाळेचे यश म्हणजे चिपळूणकरांच्या आयुष्यातील मोठे यश होते. इ.स. १८८५ मध्ये या संस्थेने फर्ग्युसन कॉलेज सुरू केले.
विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी अगोदर स्वतः इ.स. १८७४ मध्ये पुनर्विवाह केला होता. विधवा पुनर्विवाहाचे त्यांनी प्रभावी समर्थन केले. ‘आधी केले व मग सांगितले’ मा. उक्तीप्रमाणे ते या संदर्भात वागले.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
‘काव्येतिहाससंग्रह’ मासिकातील सहभाग : इ.स. १८७७च्या सुमारास चिपळूणकरांनी त्यांचे सहकारी काशीनाथ साने, जनार्दन मोहक व शंकर तुकाराम शाळिमाग यांच्याबरोबर ‘काव्येतिहास’ या नावाचे मासिक इ.स. १८७८ च्या जानेवारीपासून सुरू केले.
मासिक सुरू झाले, पण काही दिवसांतच तिच्या संपादक मंडळीतील विद्वानांत मतभेद झाल्याने इ.स. १८८१ मध्ये चिपळूणकरांनी या मासिकाशी असलेला आपला संबंध तोडला. ‘काव्येतिहास संग्रहामुळे महाराष्ट्रात इतिहासाबद्दलची नवी जाणीव निर्माण झाली व त्यातूनच वासुदेवशास्त्री खरे, पारसनीस, राजवाडे वगैरे तरुण पुढे इतिहासाच्या अभ्यास व संशोधन कार्याला लाभले.
निबंधमालेचा प्रारंभ :- इ.स. १८७३ पासून ‘शालापत्रक’ या मासिकाची जबाबदारी विष्णुशास्त्रींनी स्वीकारली होती. ‘शाल्लापत्रका’च्या धर्तीवरच ‘निबंधमाला’ या नावाचे एक मासिक काढण्याची कल्पना त्यांना व त्यांच्या मित्रांना सुचविली व २५ जानेवारी १८७४ रोजी निबंधमालेचा पहिला अंक निघाला.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
पहिला अंक २० पानी होता. निबंधमालेच्या २५ व्या अंकापासून मात्र ३२ पाते ही पृष्ठसंख्या कायम ठेवली गेली व वार्षिक वर्गणी अडीच रु. एवढी होती. निबंधमालेचे एकूण ८४ अंक प्रकाशित झाले. चिपळणूकरांच्या मृत्यूनंतर ते पुढे प्रकाशित होऊ शकले नाही. या ८४ अंकांत सुमारे २५०० पानांचा मजकूर देण्यात आला आहे.
चार वर्षांच्या काळात वर्गणीदारांची संख्या १००० पर्यंत वाढली होती. शेवटचा अंक इ.स. १८८२ मध्ये निघाला. भाषा साहित्य, राजकारण, काव्य, व्याकरण, इतिहास, गणित, ज्योतिष, विज्ञान, समाजसुधारणा इत्यादी विषयांवर निबंधमाले’त वाद रंगले, चर्चा रंगली.
चिपळूणकरांनी मराठी भाषेचा स्वाभिमान जागृत केला : चिपळूणकरांच्या काळात मराठी भाषेचे महत्त्व व त्यांचा दर्जा महाराष्ट्रातील विद्वानांना समजलेला नव्हता. मराठी ही एक कुचकामी भाषा आहे, भाषांतरासाठी ती उपयोगाची नाही अशा भ्रामक कल्पना रूढ होत्या. इंग्रजी भाषेच्या आकर्षणामुळे मराठी भाषेकडे नवशिक्षितांचे दुर्लक्ष झाले होते.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
निबंधमालेच्या पहिल्याच अंकात ‘मराठी भाषेची सांप्रतची स्थिती’ हा निबंध होता व त्या निबंधाच्या प्रारंभीच चिपळूणकरांनी म्हटले होते. ही वेळ देशाच्या व भाषेच्या स्थित्यंतराची होय. भाषेची अभिवृद्धी हे देशाच्या उत्कर्षाचे मोठे साधन असल्यामुळे भाषेला हाती धरले आहे. निबंधमालेच्या पहिल्या वर्षातील निबंध हे प्रामुख्याने भाषाविषयक आहेत.
उदा. : १) मराठी भाषेची सांप्रतची स्थिती (अंक १)
२) प्रस्तुत मालेचा उद्देश (अंक २)
३) भाषादूषण (अंक ९)
४) लेखनशुद्धी (अंक १०)
५) वाचन (अंक ११)
६) भाषांतर (अंक १२)
पहिल्या निबंधात चिपळूणकरांनी आपली मराठी भाषा क्षयाच्याच पंथास दिवसेंदिवस चालली आहे असे म्हटले होते व त्यासाठी त्यांनी विद्वान लोकांची मराठी भाषेविषयांची उपेक्षाबुद्धी हे कारण सांगितले. त्यांच्या वरील सर्व भाषाविषयक लेखांमध्ये मधून मधून संधी साधून त्यांनी विद्यापीठीय विद्वानांच्या उपेक्षाबुद्धीवर प्रहार केले आहेत.
ते स्वतःला ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणत असत. भाषा या हत्याराचा परिणामकारक वापर करून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादाची प्रेरणा निर्माण केली. आंग्लविद्याभूषित विद्वानांचे उद्बोधन करणे हे पळूणकरांनी एक नियत कर्तव्य मानले होते. जिथे जिथे संधी मिळेल लिये लिये टोचणी लावणारी चार वाक्ये लिहिली आहेत.
परकीय आचारविचारांवर चालणाऱ्या आंग्ल शिक्षितांवर आणि मिशनऱ्यांवर झोड उडविणे हे मालाकारांचे एक उद्दिष्ट होते. वाणी व लेखणी ही देशोद्धारावी प्रमुख साधने होत अशी चिपळूणकरांची धारणा होती.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
चिपळूणकरांचा गाजलेला लेख “आमच्या देशाची स्थिती’ :- निबंधमालेच्या ७७ ते ८३ अंकातून हा लेख प्रकाशित झाला होता. प्रस्तुत निबंधामध्ये चिपळूणकरांनी प्रथम राज्यकर्ते या नात्याने इंग्रजांशी आमचा जो घनिष्ठ संबंध आला त्यापासून झालेले. फायदे मांडले आहेत; पण ब्रिटिशांचे राज्य म्हणजे हिंदुस्थानाला लागलेले ईश्वरी वरदान होय हे सुधारकांचे सिद्धांत त्यांना मान्य नव्हते.
इंग्रजी राज्यापासून आमची पहिली मोठी पनी झाली ती म्हणजे स्वातंत्र्याचा नाश ही होय असे ते म्हणत. आम्ही स्वातंत्र्याच्या स्थितीला योग्य नाहीत व तसे असल्यामुळे आमचे प्रस्तुतचे पारतंत्र्य हितावह होय ही म खोटी आहेत असे चिपळूणकरांना वाटत होते. ‘आमच्या देशाची स्थिती हा निबंध ३ भागांत आहे.
१) आमच्या राज्यकर्त्यांची स्थिती.
२) एतद्देशीय राजेरजवाड्यांची स्थिती.
३) सामान्य लोकांची स्थिती.
पारतंत्र्यापासून होणारी सर्वात मोठी हानी म्हणजे त्यामुळे मानसिक उन्नती अगदी नष्ट होऊन जाते असे चिपळूणकरांचे मत होते. ब्रिटिश लोक येण्यापूर्वी भारत हा देश लक्ष्मी, सरस्वती, अत्रपूर्णा, वीरश्री इत्यादी गुणांनी युक्त होता. तेथे आज सारी नासाडी करून टाकून सहाराचे वाळवंटच झाले आहे असे त्यांना वाटे.
इंग्रज लोकांचे प्रभुत्व येथे जरी शतकानुशतके राहिले तर आम्ही अगदी निःसत्त्व होऊन जाऊन निव्वळ मेंढ्या बनून जाऊ अशी भीती त्यांना वाटे. भारतीय राजेरजवाडे (संस्थानिक) यांच्याबद्दल त्यांनी ‘आमच्या देशाची स्थिती’ या निबंधात विस्ताराने लिहिले आहे.
संस्थानिकांची पूर्वीची स्थिती कशी स्वतंत्रतेची होती, अगदी अलीकडेपर्यंत महादजी शिंदे, यशवंतराव होळकर यांनी कसे पराक्रम गाजविले, त्यांच्या तुलनेत सध्याची संस्थानिकांची स्थिती काशी दुबळी व अपराक्रमी आहे हे त्यांनी मांडले.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
संस्थानिकांना पूर्वीप्रमाणे पराक्रम गाजविण्याची शक्यता नसली तरी व्यापार, कलाकौशल्य इत्यादी बाबींकडे लक्ष देऊन देशाचे हित साधणे त्यांना शक्य आहे. कबुतरांची लग्ग्रे, सेलर्स हाऊस, मक्केला मोत्याची झालर इत्यादी बेडेचारांमध्ये पैशाची उधळणूक न करता देशहिताच्या कामात पैसा खर्च करावा असे त्यांनी सुचवले होते.
आमची सुधारणा होण्यास हिंदू धर्म हा प्रतिबंधक आहे. बालविवाह आमच्या नाशाला कारणीभूत आहे हा सुधारकांचा मुद्दाही त्यांना मान्य नव्हता, जातिभेद, मूर्तिपूजा, स्त्री शिक्षणाचा अभाव इत्यादीमुळे आपण इंग्रजांच्या अंकित झालो हेही त्यांना मान्य नशते. धर्माच्या नावाने व भटांच्या नावाने सुधारकांची ओरड हीसुद्धा त्यांना चुकीचा वाटत होती.
परकीयांची राजवट हेच भारताच्या दैन्यावस्थेचे कारण होय. ब्रिटिश राज्यकर्त्यांचा संबंध तोडून टाकल्याशिवाय आपण सुखी होणार नाहीत असे स्पष्ट मत त्यांनी या निबंधात नोंदवले होते. भारताचे प्राचीन वैभव नष्ट होऊन हा देश आता अत्यंत निकृष्ट स्थितीला गेला आहे हे लोकहितवादींचे मत चिपळूणकरांना मान्य नव्हते.
चिपळूणकरांचा ‘आमच्या देशाची स्थिती’ हा निबंध गाजला आहे. त्यात त्यांनी आपल्या देशाची प्रकृती ही ठणठणीत असून त्याबद्दल विशेष चिंता करण्याचे प्रयोजन नाही असे म्हटले. भारतीय जनतेला विशेषत: विद्वान आणि पंडितांना त्यांनी मार्गदर्शन करून त्यांना आपल्या उणिवा दाखवून दिल्या आहेत.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
पाश्चात्यांनी लिहिलेला इतिहास पूर्वग्रहदूषित आहे :- निबंधमालेच्या ६,७३८ या तीन अंकांत ‘इतिहास’ या विषयावरील निबंधात चिपळूणकरांनी हिंदुस्थानचा इतिहास विकृत करून लिहिणाऱ्या पाश्चात्य इतिहासकारांचा समाचार त्यांनी घेतला आहे. जेम्स मिलने लिहिलेल्या ‘हिंदुस्थानचा इतिहास’ या ग्रंथावर टीका करून तो मंच कसा पूर्वग्रहदूषित आहे हे त्यांनी मांडले आहे.
आपल्या देशाचा खरा इतिहास लिहिला जावा, पाश्चात्त्यांनी लिहिलेला पूर्वग्रहदूषित इतिहास खोडून काढला पाहिजे अशी चिपळूणकरांची इच्छा होती. रत्नागिरीस असताना तेथील ग्रंथालयात बसून इतिहासाच्या जुन्या पुस्तकांचे ते वाचन करत. इतिहासलेखनाचा अभाव याचा प्राचीन विद्येचे व्यंग म्हणून ते उल्लेख करतात.
नीतिबोध, मनाचे रंजन, मनाचे पोषण, जिज्ञासा वृत्ती हे इतिहासाचे उपयोग आहेत असे चिपळूणकर लिहितात. घंट डफ, माल्कम, मॉरीस वगैरेच्या इतिहासलेखनातील उणिवा त्यांनी मांडल्या आहेत. पाश्चात्य इतिहासकारांनी आमची विद्या, कला, रीतिरिवाज इत्यादीचे लिखाणाकडे दुर्लक्ष केले आहे असे चिपळूणकरांना वाटे.
आपल्या देशाचा इतिहास जो उपलब्ध आहे तो परकियांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला आहे. म्हणून तो विपरीत व अतिरंजित झाला आहे. इतिहासाबद्दल उत्कट प्रेम असणाऱ्या चिपळूणकरांना विकृतः माहितीने भरलेले आणि परकीर्यांनी लिहिलेले इतिहास पाहून मनस्वी चीड यावी व खंत वाटावी हे स्वाभाविक आहे.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
मेकॉले, जेम्स मिल, मॉरिस वगैरे पाश्चात्त्य इतिहासकारांनी द्वेषमूलक पद्धतीने इतिहास लिहून अन्याय केला आहे असे स्पष्ट मत नोंदवून परकीय इतिहासकारांनी अनेक वेळा अज्ञानाने, विपर्यास बुद्धीने केलेले इतिहासलेखन आपण स्वीकारू नये हा चिपळूणकरांचा उपदेश समर्थनीय वाटतो.
स्वकियांच्या व स्वदेशाच्या इतिहासाचे संशोधन करण्याची प्रवृत्ती वाढीस लागणे हे महत्त्वाचे आहे. याचाच अर्थ राष्ट्रवादी जाणीव निर्माण होणे महत्त्वाचे आहे असे चिपळूणकरांना वाटत होते.
लोकहितवादींच्या लिखाणावर चिपळूणकरांची टीका :- चिपळूणकरांनी त्यांच्या ‘निबंधमाले’तून सुमारे वर्षभर लोकहितवादी यांच्यावर प्रदीर्घ व प्रखर टीका केली होती. लोकहितवादीनी ब्राह्मण हे आळशी, स्वार्थी, लोभी व मतलबी आहेत अशी टीका केली होती, तर विष्णुशास्त्रींनी सर्वच क्षेत्रात ब्राह्मणच पुढे आहेत, असे अभिमानाने सांगितले होते.
निबंधमालेच्या ६४ ते ७६ व्या अंकापर्यंत लोकहितवादी हा एकच विषय चर्चिला गेला आहे. चिपळूणकरांचा लोकहितवादींच्या लेखनावर पहिला आक्षेप हा तो की, आता हे लेखन जुने व कालबाह्य ठरले आहे. विचारांना चालना देण्याची, चेतना देण्याची या लेखनात काही कुवत नाही; सध्याच्या काळात लोकहितवादींचे वाङ्मय हे बालिश स्वरूपाचे आहे, अशी टीका चिपळूणकरांनी केली होती.
लोकहितवादींच्या निबंधसंग्रहात वैशिष्ट्यपूर्ण, उल्लेखनीय व विचारप्रवर्तक असे काहीच नाही असे आक्षेप घेऊनही चिपळूणकारांनी लोकहितवादीवर टीका केली. त्याची पृष्ठसंख्या १५० पाने एवढी मोठी आहे.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
सत्यशोधक समाजावर चिपळूणकराची टीका :- निबंधमालेच्या ४४ व्या अंकात म. फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज व त्यांचे ‘गुलामगिरी’ हे पुस्तक यांच्या संबंधाने चिपळूणकरांनी लिहिले आहे. त्यात तुच्छतेने फुले यांचा अमर्याद उपहास केला. इ.स. १८७४ साली विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटले होते, ‘फुल्यांचा टिचभरही पुतळा कोणी उभारणार नाही.
‘पण फुल्यांचा पुतळा पुणे महापालिका, महाराष्ट्र विधानभवन व दिल्लीच्या संसदेचे प्रांगणात उभे राहिले. महाराष्ट्रात ठिकठिकाणी फुले यांचे पुतळे आहेत. याउलट विष्णुशास्त्रीचा मात्र फक्त एक दीडफूट उंचीचा अर्धपुतळा पुण्याच्या सदाशिवपेठेत आहे.
चिपळूणकरांची एक मोठी चूक या वादात झाली की, जोतिरावांच्या लिखाणाच्या बुडाशी असलेले समतेचे मूलभूत तत्त्व त्यांनी लक्षात घेतले नाही. समतातत्त्वाची जाणीव चिपळूणकरांना नव्हती असे नाही; पण ती सामाजिक बाबतीत तेवढी तीव्र नव्हती. सत्यशोधक समाजाच्या मर्यादा त्यांनी स्पष्टपणे मांडल्या होत्या.
चिपळूणकरांनी न्या. रानडे, स्वामी दयानंद या सुधारकांवरही टीका केली. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेने राष्ट्रवादी विचारांच्या वाढीवरच अधिक भर दिला. पण त्यांचा राष्ट्रवाद परंपरेच्या प्रेमावर व पूजनावर आधारलेला होता. स्वधर्म व स्वसंस्कृती यांच्यावर आत्यंतिक भक्ती हाच या राष्ट्रवादाचा आधार होता.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
भारतीय परंपरेकडे तटस्थतेने, चिकित्सक पद्धतीने त्यांनी पाहिले नाही. चिपळूणकर राष्ट्रीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते; पण त्यांची राष्ट्रवादाची कल्पना व्यापक नव्हती. समाजसुधारणेला वाहून घेतलेल्या म. फुले व लोकहितवादी यांच्या नवजीवनवादी (Renaissance) विचारांचा त्यांना नीटपणे अन्वयार्थ लावता आला नाही.
सुधारणावाद्यांचा कठोर उपहास करण्यात त्यांनी आपल्या लेखणीचे वैशिष्ट्यपूर्ण सामर्थ्य कामी लावले म्हणूनच ‘निबंधमाले’ला सामाजिक आशय फारसा नाही अशी टीका केली गेली व ती टीका सत्यही होती. म. फुले व लोकहितवादी यांच्या वाङ्मयातील व कार्यातील मानवतावादी उदात्त भागाचे दर्शन घेण्यास ते अपुरे पडले.
स्वामी दयानंदांच्याही धर्मसुधारणेचे महत्त्व त्यांना समजलेले दिसत नाही. चिपळूणकरांना गुरुस्थानी मानणारे ग.त्र्यं. माडखोलकर म्हणतात, ‘रा. गो भांडारकर, रानडे, सार्वजनिक काका, दयानंद सरस्वती, जोतिराव फुले प्रभृती त्या काळातल्या थोर कार्यकर्त्यांनी धर्म व समाज यांच्या शोधनाचे जे उपक्रम मोठ्या धैर्याने केले त्यांचे मर्म व महत्त्व चिपळूणकरांच्या बुद्धीला फारसे आकलन होऊ शकले नाही.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
सामाजिक आंदोलनाची कुचेष्टा चवीने करण्यास ‘मराठी भाषेचे शिवाजी’ समजणान्या चिपळूणकरांनी रस घ्यावा याची खंत वाटते सुधारकांच्या चेष्टा करताना व ख्रिश्चन मिशनऱ्यांवर हल्ले करताना ते आनंदी होत त्यांच्या विचारांचा एककल्लीपणा व प्रतिपक्षावर तुटून पडण्याची पद्धत न. चि. केळकर यांनाही पसंत नव्हती.
ब्राह्मणांच्या विद्वत्तेचा गौरव : लोकहितवादींनी जुन्या ब्राह्मण पंडितांना महामूर्ख म्हटले व त्यांच्या ज्ञानाबद्दल शंका व्यक्त केली होती. तसेच संस्कृतमधील ज्ञान उपयुक्त नाही असे म्हटले होते. पण हे युक्तिवाद चिपळूणकरांनी फेटाळले होते. ब्राह्मणांवरील टीकेला कडक भाषेत उत्तर देणे व ब्राह्मणांचे समर्थन करण्यासाठी विष्णुशास्त्रींनी ‘निबंधमाले’त एकूण १२ निबंध लिहिले.
‘निबंधमाला’ बंद पडल्यावरही ‘केसरी’त २२ मार्च १८८१ रोजी लेख लिहून ब्राह्मणांची बाजू मांडली. ब्राह्मण आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले आहेत. जातिसंस्थेतील ब्राह्मणांचे वर्चस्व हे अपरिहार्य व अटळ आहे असे म्हटले. ज्ञानभांडाराच्या किल्ल्या ब्राह्मणांच्या कमरेला बांधलेल्या आहेत, असाही त्यांचा दावा होता.
खिस्तांनी किंवा मुसलमानांनी जसे इतर धर्मीयांचे छळ केले तसे ब्राह्मणांनी केले नाहीत. ब्राह्मणांकडे इतर वर्णाहून विद्वत्ता, पावित्र्य जास्त आहे. ब्राह्मणांच्या मदतीशिवाय इतर जातींना ज्ञानाचा लाभ होणार नाही अशी मते त्यांनी मांडली.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
धर्मातील व राजकारणातील ब्राह्मण वर्चस्वाचे त्यांनी समर्थन केले होते. ‘अनुकरण’ या शीर्षकाच्या ‘केसरी’तील लेखात इंग्रजांचा व्यवस्थितपणा, वक्तशीरपणा, एकी व देशाभिमान आदी गुणांचे ते कौतुक करतात. या गुणांचा भारतीयांत अभाव आहे.
त्यामुळेच आपला पराभव झाला असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. मराठी निबंधकारांत विष्णुशास्त्री चिपळूणकरांचे असाधारण महत्त्व आहे. मराठी नियतकालिकाच्या इतिहासात एका व्यक्तीने कोणाचेही सहकार्य न घेता चालवलेले व अत्यंत लोकप्रिय झालेले ‘निबंधमाला’ हे एकमेव नियतकालिक आहे.
८ वर्षात चिपळूणकरांनी विविध विषयांवर ८४ अंक प्रकाशित केले. प्रत्येक अंकाचे वाचकवर्गाकडून स्वागत होत होते. उत्तम प्रतिसाद मिळत होता. ‘राष्ट्रवादाची दीक्षा देणारी निबंधमाला’ असा निबंधमालेचा गौरव झाला. सरकारविरोधी मते जहाल भाषेतून त्यांनी मांडली. खिश्चन मिशनन्यांवर त्यांनी सडकून टीका केली. इ.स. १८७८ मध्ये त्यांना निबंधमाला बंद करावी लागली.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
मृत्यु – चिपळूणकरांना अल्पआयुष्य लाभले. वय वर्षे २४ ते ३२ हा ८ वर्षांचा काळ हा त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा काळ आहे. केवळ ८ वर्षात साहित्य, वृत्तपत्र, समाजकारण, राजकारण इत्यादी क्षेत्रांत अत्यंत उत्साहाने त्यांनी आपली पावले टाकली. मराठी भाषेला व साहित्याला चिपळूणकरांनी काही नवीन सामध्ये दिली.
मराठी हीच समर्थ भाषा, मराठीतच उत्तम विचारांचे वाड्मय निर्माण होऊ शकते हे खोटे आहे हे त्यांनी ‘निबंधमाले’ च्या माध्यमातून स्पष्ट व सिद्ध केले. इंग्रजी राजवटीचे स्वागत व समर्थन म्हणजे पराभूत प्रवणतेची एक लाजिरवाणी निशाणी आहे असे ते मानत होते.
भूतकालीन संस्कृतीचे, विद्येचे, वैभवाचे व पराक्रमाचे गुणगान चिपळूणकर निष्ठेने करीत राहिले. भारतीय धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृती, मराठी भाषा यांचे ते विलक्षण अभिमानी होते. चिपळूणकरांच्या देशोद्धाराच्या कल्पना या पुनरुज्जीवनवादाशी निगड़ित होत्या.
आपल्या जुन्या संस्था, मूल्यांची पुन्हा रचना व्हावी असे त्यांना वाटे. आपल्या इतिहासावर, राष्ट्रावर व संस्कृतीवर आपण प्रेम केले पाहिजे, अशी शिकवण आपणास त्यांच्या ‘निबंधमाले’तून मिळते. डॉ. जॉन्सनचे चरित्र लिहून विष्णुशास्त्रीनी चरित्र हा वाङ्मयप्रकार मराठी साहित्यात प्रथम आणला.
Vishnushastri Chiplunkar – विष्णुशास्त्री चिपळूणकर
विष्णुशास्त्रींच्या मृत्यूनंतर (१७ मार्च १८८२) त्यांचे बंधू लक्ष्मण कृष्ण चिपळूणकर यांनी इ.स. १८९४ मध्ये आपल्या बंधूचे चरित्र प्रसिद्ध केले. त्यात ते म्हणतात, ‘विष्णुशास्त्रींनी आपल्या देशबांधवांमध्ये स्वदेशप्रेम, स्वभाषाप्रेम व स्वजातीविषयी अभिमान जागृत केला.’
आगरकरांनी म्हटले की, ‘विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निधनाने ‘केसरी’चा एक पाय लंगडा झाला. महाराष्ट्रीयनांनी एक अद्वितीय रत्न गमावले.’ ज्या रानडेंनी म्हटले होते की, ‘इतक्या लवकर त्यांनी जावयास नको होते.’ आचार्य जावडेकर यांच्या मते, ‘विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एका नव्या राष्ट्रीय विचारसंप्रदायाचे जनक होते.
त्यांची निबंधमाला म्हणजे राष्ट्रवादी जहाल पक्षाचा जाहीरनामाच होय, असे म्हटले जाते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या लेखातून प्रेरणा घेऊन स्वराज्यासाठी लढण्यासाठी टिळक आगरकर हे नेतृत्व पुढे आले. वि. का. राजवाडे यांनी चिपळूणकरांच्या प्रेरणेने लेखनास प्रारंभ केला.
चिपळूणकरांच्या प्रभावामुळे वि. का. राजवाडे यांनी मराठी भाषेत लेखन न करण्याची प्रतिज्ञा केली होती. चिपळूणकरांनी मराठी भाषेला वैभव प्राप्त करून दिले. त्यांच्या प्रभावाखाली येऊन त्याच धाटणीचे लेखन करणारा संप्रदाय निर्माण झाला. यातच विष्णुशास्त्रीचे मोठेपण आहे. ह. म. घोडके ‘महाराष्ट्रनामा’ ग्रंथात म्हणतात, ‘देश, समाज व संस्कृती यांच्या अभ्यदयासाठी त्यांनी आपली लेखणी चालविली.